Tag: MH34

  • electric current | विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

    electric current

    electric current : वरोरा : शहरापासून १२ किलोमीटर असलेल्या सालोरी येथे अति दुर्दैवी घटना घडली. शेतातील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून जिवंत विद्युत प्रवाहाचा वापर करुन सभोवताल तारांना करंट लावणे हे गुन्हा असून सुद्धा करंट लावल्याने सालोरी येथे अरून शेरकुरे यांच्या शेतात काम करणाऱ्या संजय मारुती शिरपूरकर या व्यक्ती चा जागीच मृत्यू झाला.

    चंद्रपुरात 804 नागरिकांवर कारवाई

    अरून शेरकुरे यांच्या शेतात काम करण्याकरीता सालगडी म्हणून संजय शिरपूरकर हा व्यक्ती काम करायचा, दि.२९ डिसेंबर ला रात्रो ९ वाजता अरून शेरकुरे यांच्या शेतात संजय हा जागली करीता गेला परंतु तो घरी काही परतला नाही. संजय ची दुसऱ्या दिवशी शोधाशोध त्याच्या परिवाराकडून करण्यात आली परंतू त्याची काही माहिती मिळाली नाही, त्यामुळे मृतकाचा भाऊ राजेंद्र शिरपूरकर यांनी शेगाव पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली.

    एक यु टर्न बेतला जीवावर, तिघांचा मृत्यू

    पोलिसांनी या प्रकरणी शोधाशोध केली असता मारोती नागोसे राहणार सालोरी यांच्या शेतात इलेक्ट्रिक करंट लावून असलेल्या ताराला जवळ संजय हा मृत अवस्थेत मिळुन आला. नागोसे यांनी त्याचे शेतातील पिकाच्या संरक्षणाकरिता शेतात असलेल्या मीटर मधून ताराने जिवंत वीज प्रवाह शेताच्या भोवताल सोडला.

    मृतक हा त्या ताराला चिटकून मरण पावला प्राप्त तक्रारीवरून नागोसे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्यामार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक महेंद्र शहारे हे करीत असून गुन्ह्यात आरोपीस अटक करण्यात आली आहे.

  • oppo find n5 | ओप्पो चा फोल्डेबल मोबाईल बाजारात येणार

    oppo find n5

    OPPO Find N5 हा कंपनीचा पुढील फोल्डेबल स्मार्टफोन असणार आहे ज्याला आता अनेक जागतिक स्तरावर प्रमाणपत्रे मिळाली आहेत. यामुळे हा फोन लवकरच बाजारात दिसू शकतो असे संकेत मिळत आहेत. हा फोन 2025 च्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्याची अनेक वैशिष्ट्ये विविध प्रमाणपत्रांद्वारे त्याचे स्पेसिफिकेशन पुढे आले आहे. फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा असेल.

    मलेशियाच्या SIRIM डेटाबेसमध्ये फोन स्पॉट झाला आहे. याशिवाय, हे इंडोनेशियाच्या SDPPI सर्टिफिकेशन मध्ये बघितला गेला आहे. टेक आउटलुकच्या रिपोर्टनुसार, फोन कॅमेरा FV-5 सर्टिफिकेशनमध्ये देखील स्पॉट झाला आहे. येथे फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बरीच माहिती समोर आली. (Oppo mobile)

    गुगल पिक्सेल चा हा मोबाईल 37 हजार रुपयांनी मिळणार स्वस्त

    कॅमेरा द FV-5 सूचीनुसार फोनमध्ये प्रगत इमेजिंग क्षमता असेल. यात 12.6MP रियर कॅमेरा असेल. 7.1MP फ्रंट कॅमेरा असेल. मागील मुख्य कॅमेरा पिक्सेल बायनिंगसह 50MP सेन्सर असेल. तर फ्रंट कॅमेरा पिक्सेल बायनिंगसह 28MP सेन्सर असल्याचे सांगितले आहे. दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन असेल.

    Oppo Find N5 मध्ये मोठे अपग्रेड्स दिसतील. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट यामध्ये दिसू शकतो. फोन Android 15 सह येणार आहे ज्यावर ColorOS 15 स्किन असेल. मुख्य डिस्प्ले 8 इंच आकारात येऊ शकतो. फोनमध्ये 120Hz चा रिफ्रेश दर दिसू शकतो. हा फोन अल्ट्रा फ्लॅट डिझाइनमध्ये येण्याची शक्यता आहे.

    फोनच्या मागील बाजूस एक ट्रिपल कॅमेरा सिस्टम प्रदान केला जाऊ शकतो ज्यामध्ये तीन 50MP चे 3 कॅमेरा लेन्स असतील. मुख्य सेन्सर वाईड अँगल लेन्स असेल, दुसरा सेन्सर अल्ट्रावाइड असेल आणि तिसरा सेन्सर पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स असेल. यामध्ये 3X झूम क्षमता पाहता येईल.

    Oppo च्या या फोल्डेबल फोनमध्ये 5700mAh ची बॅटरी असू शकते. ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग असेल. हे IPX8 रेटिंगसह सुसज्ज असू शकते, ज्यामुळे मोबाईल वॉटरप्रूफ असेल. हे समोर येत आहे की फोनमध्ये झिरो-क्रीज हिंग असेल.

  • District sports awards | क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलीय का?

    District sports awards

    District sports awards : जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने, दरवर्षी शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गुणवंत खेळाडू (महिला, पुरुष व दिव्यांग) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार दिले जातात.

    चंद्रपुरात भीषण अपघात, 3 जण ठार

    त्याअनुषंगाने, सन 2024-25 करिता जिल्हयातील खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता (krida purskar) अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज दि. 15 जानेवारी 2025 पर्यंत क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड (मो. क्र. 9423673232) यांचेकडे उपलब्ध आहे. सदर अर्ज 15 जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. उशीरा येणारे अर्ज स्विकारले जाणार नाही.

    चंद्रपुरात 804 नागरिकांनी मोडले वाहतुकीचे नियम

    अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रात 10 वर्ष क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असावे. अर्जदाराने वयाची 35 वर्ष पुर्ण केलेले असावे. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपुर्व 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत खेळांमध्ये प्रतिनिधीत्व केलेले असावे.

    अर्ज करतांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन निर्णय दि. 14 डिसेंबर 2022 च्या जिल्हा क्रीडा पुरस्कार नियमातील अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक आहे. सर्व पुरस्कारांमध्ये प्रत्येकी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रु. 10 हजार या बाबींचा समावेश आहे. पुरस्काराकरिता निवड झालेल्या युवकांना दि. 26 जानेवारी रोजी होणाऱ्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनदिनी मुख्य शासकीय कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

  • importance of traffic rules : चंद्रपुरात 3 दिवसात 804 नागरिकांनी मोडले वाहतुकीचे नियम

    importance of traffic rules

    importance of traffic rules : चंद्रपूर – नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात एकीकडे तरुणाई सज्ज झाली होती तर दुसरीकडे काही अप्रिय घटना घडू नये यासाठी चंद्रपूर पोलीस आपले कर्तव्य बजावीत होते.

    चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेच्या (chandrapur traffic police) वतीने 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागात नाकेबंदी करीत मद्य प्राशन करून वाहन चालविणे, बुलेट सायलेन्सर मध्ये बदल व ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्यावर कारवाई मोहीम राबवली.

    चंद्रपुरात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, यु टर्न जीवावर बेतला

    नव वर्षाच्या स्वागत दरम्यान स्टंटबाजी, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईचा बडगा उभारत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या 406 चालक, ट्रिपल सीट वाहन चालविणारे 374, बुलेट दुचाकी वाहनाच्या सायलेन्सर मध्ये बदल करणाऱ्या 24 चालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेच्या या कारवाईत एकूण 40 हजार दंड वसूल करण्यात आला.

    नव्या वर्षात वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई मोहीम सुरू राहणार अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी दिली. 3 दिवसात एकूण 804 नागरिकांवर कारवाई करण्यात आली हे विशेष.

  • road accident news | चंद्रपुरात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

    road accident news

    road accident news : 31 डिसेंबर ला रात्री 10 वाजताच्या सुमारास चंद्रपूर-नागपूर मार्गावर ट्रक व दुचाकीच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

    नातेवाईकांची भेट घेत वाटेतील हॉटेलात जेवण करीत वणी आपल्या स्वगावी जाणाऱ्या नागपूरे कुटुंबावर घात झाला.

    सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती, एकीकडे वणी येथील नागपुरे कुटुंब भद्रावती येथील नातेवाईकांच्या घरी भेटीसाठी आली, भेट आटोपल्यावर नागपुरे कुटुंब आपल्या दुचाकी क्रमांक MH29 A Z 9949 ने परतीच्या प्रवासावर निघाले.

    नागरिकांचा गळा कापण्यासाठी जिल्ह्यात आला प्रतिबंधित नायलॉन मांजा


    जाण्यापूर्वी हॉटेलात जेवण केल्यावर चंद्रपूर-नागपूर हायवेवरील डॉली पेट्रोल पंप जवळ यु टर्न घेताना MH40 AK 2095 या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.
    धडक इतकी जोरदार होती की यामध्ये 51 वर्षीय सतीश भाऊराव नागपुरे, 47 वर्षीय मंजुषा सतीश नागपुरे यांचा जागीच मृत्यू झाला तर 2 वर्षीय माहिरा राहुल नागपुरे या बालिकेचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. Road accident news


    अपघातात 7 वर्षीय स्मायली कामतवार ही मुलगी किरकोळ जखमी झाली.
    अपघातानंतर ट्रक चालक नंदू चव्हाण याला पोलिसांनी अटक केली.
    एकीकडे नविन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज होते तर या दिवसात अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला होता.
    तरीसुद्धा दुर्दैवाने हा अपघात घडला या अपघातामुळे नागपुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • google pixel 8 pro | गुगल पिक्सल आता 37 हजार रुपये स्वस्त

    google pixel 8 pro

    google pixel 8 pro : जर तुम्ही Google Pixel 8 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. सेल मध्ये किंमत कपात आणि बँक ऑफरमुळे बचत होत आहे.

    विधी अधिकारी पदाची नोकरी हवी तर आजच करा अर्ज

    Pixel 8 Pro मध्ये 6.7-इंचाचा QHD+ LTPO OLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. येथे आम्ही तुम्हाला 8 Pro वर उपलब्ध असलेल्या डील आणि ऑफर्सबद्दल तपशीलवार सांगत आहोत.

    Google Pixel 8 Pro किंमत, सवलत

    Google 8 Pro किंमत, सवलत

    Google Pixel 8 Pro चा 12GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 69,999 रुपयांना सूचीबद्ध आहे, तर तो 1,06,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. बँक ऑफरबद्दल बोलायचे तर, तुम्हाला ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 4000 रुपयांची सूट मिळू शकते, त्यानंतर प्रभावी किंमत 65,999 रुपये होईल. एक्सचेंज ऑफरद्वारे तुमचा जुना किंवा सध्याचा फोन देऊन तुम्ही 39,150 रुपये वाचवू शकता. तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की एक्सचेंज ऑफरचा जास्तीत जास्त फायदा बदल्यात दिलेल्या फोनच्या सध्याच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असतो.

    Google Pixel 8 Pro

    Google Pixel 8 Pro मध्ये 6.7-इंचाचा QHD+ LTPO OLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1344×2992 पिक्सेल आहे, रिफ्रेश रेट 120Hz आणि 2400 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आहे. 8 Pro मध्ये Google Tensor G3 चिपसेटसह Titan M2 सुरक्षा प्रोसेसर आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, 8 Pro च्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, दुसरा 48-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि तिसरा 48-मेगापिक्सेल क्वाड-PD 5x झूम कॅमेरा आहे. 8 Pro मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10.5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. 8 Pro मध्ये 5,050mAh बॅटरी आहे

  • Legal Officer Jobs : चंद्रपुरात विधी अधिकारी पदासाठी अर्जाची मागणी

    Legal Officer Jobs : महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयान्वये, दि. 6 एप्रिल 2011 व समक्रमांकाचे निर्णय दि. 30 जुलै 2011 मधील तरतुदीनुसार ‘विधी अधिकारी’ हे पद कंत्राटी पद्धतीने एकावेळी 11 महिन्याच्या कालावधीसाठी भरावयाचे आहे. त्याकरिता, पात्र उमेदवारांकडून 10 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

    शैक्षणिक अहर्ता व अनुभव:

    उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा तसेच तो सनद धारक असावा. विधी अधिकारी या पदासाठी वकिली (Lawyer) व्यवसायाचा किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवार महसूल, सेवाविषयक तसेच प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती व विभागीय चौकशी आदीबाबत ज्ञानसंपन्न असेल. ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो सक्षमतेने पार पाडू शकेल. विधी अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे वय नियुक्तीच्या वेळी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

    चंद्रपुरात बॅनर लावायचा तर गुन्हा होणार दाखल

    सदर पदाकरिता एकत्रित मानधन रु. 30 हजार असून दुरध्वनी व प्रवास खर्च रु. 5 हजार असे एकत्रित मानधन रुपये 35 हजार प्रति महिना देय राहील. या व्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.

    महसूल विभागाच्या (Revenue Department) शासन निर्णयानुसार, विधी अधिकारी यांची निवड जिल्हा निवड समितीच्या अखत्यारित राहील. विधी अधिकारी हे पद नियमित स्वरूपात 11 महिन्याकरिता कंत्राटी तत्वावर भरण्यात येईल. विधी अधिकारी (कंत्राटी) या पदाकरिता अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांवर फौजदारी तसेच कोणताही गुन्हा नोंद नसावा.

    विधी अधिकारी यांचे काम असमाधानकारक असल्याचे निष्पन्न झाल्यास किंवा त्यांचे विरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची तात्पुरत्या स्वरूपातील नेमणूक रद्द करण्यात येईल. तसेच विधी अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर इतर खाजगी कामे करता येणार नाही.

    पदभरतीबाबत कार्यक्रम :

    सदर पदाकरिता अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2025 असून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी 14 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. प्रसिद्ध केलेल्या यादीमधील चुकीबाबत उमेदवारांनी कार्यालयामध्ये समक्ष लेखी अर्ज करण्याची 16 जानेवारी 2025 ही अंतिम तारीख असेल. तर झालेल्या चुकांची दुरुस्ती करून पात्र-अपात्र उमेदवारांची यादी 17 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

    उमेदवारांची प्राविण्य पडताळणीसाठी लेखी चाचणी, प्रत्यक्ष मुलाखत अथवा दोन्ही घेण्याची सूचना दि. 20 जानेवारी 2025 रोजी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

    उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे,  प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती, अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. सदर जाहिरात व विहित नमुन्यातील अर्ज, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र कार्यालयाच्या  https://chandrapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती,  जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर या पत्त्यावर दि. 10 जानेवारी 2025 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा, स्थगित, रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती, चंद्रपूर यांना राहील.

  • Kite nylon manja | चंद्रपुरात नागरिकांचा गळा कापणारे सक्रिय?

    Kite nylon manja

    Kite nylon manja : मकरसंक्रांत जवळ आली की नागरिकांचा गळा कापणारे सिंडिकेट चंद्रपुरात सक्रिय होतात, प्रतिबंधित नायलॉन मांजा ची विक्री करीत आपल्या फायद्यासाठी सामान्य नागरिक व पक्ष्यांचे गळे कापत त्यांचे जीव घेण्याचं काम या दिवसात चालतं.

    राज्यात नायलॉन मांजा ची विक्री प्रतिबंधित असताना सुद्धा छुप्या मार्गाने सदर मांजा राज्यात पोहचत आहे, हे सर्व थांबावं यासाठी चंद्रपूर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

    वाघांची शिकार करणारी टोळी सक्रिय? चंद्रपुरात 4 वाघनखे जप्त

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (crime branch) वर्षाच्या शेवटच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजा असा एकूण 24 हजार रुपयांचा माल जप्त करीत एकाला अटक केली आहे.

    रयतवारी बीएमटी चौक परिसरात राहणारे 28 वर्षीय श्रावण सविता हा आपल्या राहत्या घरी प्रतिबंधित नायलॉन मांजाची छुप्या पध्दतीने विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

    माहितीच्या आधारे पथकाने धाड मारीत श्रावण यांच्या घरची झडती घेतली असता विविध रंगांच्या चक्रीवर गुंडाळलेला नायलॉन मांजा एकूण किंमत 24 हजार रुपये जप्त करण्यात आले.

    आरोपी श्रावण वर कलम 223, 292, 293 सहकलम 5, 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत गुन्हा रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांकरेडवार, पोउपनी संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी संतोष येलपुलवार, गोपीनाथ नरोटे, गोपाल आतकुलवार यांनी केली.

  • waghnakh | वाघांची शिकार करणारी टोळी सक्रिय?

    waghnakh

    waghnakh : चंद्रपूर शहरातील लोहारा येथे 4 वाघनखे सहित 2 आरोपीना वनविभागाने 30 डिसेंबर रोजी अटक केली असून या प्रकरणी काही आरोपी पसार आहे.
    जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यात असंख्य वाघ वास्तव्यास आहे मात्र काही वाघ हे जंगलाबाहेर आपला घरोबा करून आहे.


    वर्ष 2024 मध्ये 20 वाघ तर 17 बिबट्याचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये बरेचसे वाघ हे दोन वाघांच्या झुंजीत तर इतर वाघाचा मृत्यूचे कारण हे अस्पष्ट आहे.
    वर्ष 2024 मध्ये वनविभागाने वाघाची शिकार (tiger hunting) करणाऱ्या टोळीला अटक केली होती, त्यानंतर वनविभाग अश्या शिकाऱ्यांवर नजर ठेवून होती.

    खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहलं महत्वाच्या विषयावर पत्र

    चंद्रपुरातील वनपरिक्षेत्र अधिकारी जी.आय.नायगामकर यांना वाघनखांच्या अवैध व्यापाऱ्यांची माहिती मिळाली होती, त्या आधारे 30 डिसेंम्बर रोजी सापळा रचत लोहारा येथील संदीप हरी तोडासे, शेखराम किसन तोडासे या दोघांना 4 वाघनखांसहित (waghnakh) अटक करण्यात आली.
    सदर वाघनखे हे अवैध व्यापारासाठी आणल्याचे निष्पन्न झाले, आरोपीना अटक करीत त्यांना न्यायालयात हजर करीत 2 दिवसांची वनकोठडी घेण्यात आली.

    सदर प्रकरण हे वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अत्यन्त गंभीर स्वरूपाचे आहे, या प्रकरणी आरोपीची संख्या मोठी असू शकते, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीनी वाघाची शिकार केली का? याबाबत आरोपीची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नायगामकर यांनी दिली.

    सदरची यशस्वी कारवाई मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, विभागीय वनाधिकारी निकिता चौरे, सहायक वनसंरक्षक विकास तरसे, मध्य चांदाचे आदेश शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नायगामकर, क्षेत्र सहायक तिजारे, एचपी डोंगरे, वनरक्षक कविता यादव, कोडापे, बोबाटे, यादव, पारवे व मट्टामी यांनी केली.

  • Wet and dry waste management | ओला व सुका कचरा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

    Wet and dry waste management

    Wet and dry waste management : चंद्रपूर महानगरपालिका स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता कर्मचारी व वॉर्डसखींसाठी आयोजित करण्यात आलेली  “ओला व सुका कचरा व्यवस्थापन ” कार्यशाळा उत्साहात पार पडली. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात स्वच्छता कर्मचारी व वॉर्डसखींनी सहभाग दर्शविला.

    सेतू कामगारांच्या महत्वाच्या मागणीसाठी खासदार धानोरकर यांनी लिहलं मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र


     सोमवार 30 डिसेंबर रोजी स्वच्छ भारत अभियान 2.0 व स्वच्छ संरक्षण 2024-25 अंतर्गत भिवापूर वॉर्ड येथील तिरुमला भवन येथे झालेल्या कार्यशाळेत घर ते घर कचरा वर्गीकरण कसे करावे व कचऱ्यापासुन कंपोस्ट खत (Compost fertilizer from waste) कसे तयार करावे याचे प्रशिक्षण उपस्थितांना देण्यात आले. त्याचप्रमाणे स्वच्छतेविषयी जागरूकता वाढावी व त्यायोगे आपले शहर,नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.  


     स्वयंसेवकांनी स्वच्छता दूत म्हणून समाजात काम केले पाहिजे. स्वयंसेवक म्हणून प्रबोधनातून प्लास्टिक बंदी केली पाहिजे.’स्वच्छता अँप‘ याविषयी माहिती देऊन वापरण्याचे आवाहन चंद्रपूर पालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले यांनी यावेळी केले.

    स्वच्छता मोहिमेत कचरामुक्त परिसर करण्यासाठी आपण सर्वांनी करण्याचे आवाहन करत डॉ.अमोल शेळके व सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून या कार्यशाळेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.