Tag: MH34

  • Pratibha Dhanorkar News | कृषी पंप वीज जोडणीवरून खासदार आक्रमक

    Pratibha Dhanorkar News

    pratibha dhanorkar news : सन 2018 पासून अनेक शेतकऱ्यांनी कृषीपंप वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज केला असुन शासनाच्या उदासिन धोरणामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज जोडणी मिळत नसल्याची खंत मा. मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देंवेद्र फडणविस यांना पाठविलेल्या पत्राद्वारे खा. धानोरकर यांनी व्यक्त केली.

    चंद्रपुरात क्रूर हत्या


    चंद्रपुर जिल्हात 1596 शेतकऱ्यांनी शेतीच्या सिंचनासाठी कृषी पंप वीज जोडणी मिळावे याकरिता अर्ज केला असुन त्यांना अद्यापही वीज जोडणी मिळालेले नाही. शासन कृषी पंपाना सौर उर्जा लावण्यासाठी शेतकऱ्यांना जबरदस्ती करित आहे. ते योग्य नसल्याची बाब खा. धानोरकर यांनी व्यक्त केली.

    एमईआरसी च्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना सौर उर्जे करिता शासन जबरदस्ती करु शकत नाही. त्यामुळे अनामत रक्कम भरलेल्या शेतकाऱ्यांना तात्काळ कृषी पंप वीज जोडणी देण्याची मागणी खा. धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणविस (cm devendra fadnavis) यांना पत्राद्वारे केली आहे.

    सदर मागणी तात्काळ पुर्ण करावी अशी विनंती देखिल खा. धानोरकर यांनी केली आहे. सदर मागणी पुर्ण न झाल्यास शेतकऱ्यांसह महावितरण कार्यालयावर उग्र आंदोलन करण्याचा ईशारा खा. धानोरकर यांनी दिला आहे.

  • brutal murder |चंद्रपुरात अल्पवयीन मुलाची क्रूरपणे हत्या

    brutal murder

    brutal murder : 3 जानेवारी रोजी चंद्रपूर शहरात 17 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी 3 आरोपीना अटक केली असून एक आरोपी अद्याप पसार आहे. मृतकाचे नाव तन्मय असून तो बाबूपेठ येथील रहिवासी होता.

    चंद्रपुरात 13 किलो गांजा सहित दोन आरोपीना अटक

    सूत्राच्या माहितीनुसार तन्मय हा घराकडे जात असताना वाटेत काहींच्या दुचाकी वाहनाला त्याच्या वाहनाचा कट लागल्याने चार अल्पवयीन मुलांनी तन्मय ला कट का मारली म्हणून मारहाण केली, त्यानंतर त्याला बाबूपेठ रेल्वे फाटक जवळील रेल्वे पटरी जवळ त्याला मारहाण करीत दगडाने ठेचून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
    आरोपीनी अत्यंत क्रूरतेने तन्मय ची हत्या केली असून त्याचा चेहरा ही ओळखणे कठीण आहे.


    शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत आरोपीना अटक केली आहे. हत्येचे नेमकं कारण काय हे पूर्ण तपास झाल्यावर कळेल.

  • Road Safety Week 2024 | पोलीस अधिक्षकांनी नागरिकांना पाजले वाहतूक नियमांचे डोज

    Road Safety Week 2024

    Road Safety Week 2024 : जिल्ह्यामध्ये 1 ते 30 जानेवारी 2025 या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनमालक व चालकावर मोटार वाहन विभागातंर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे. तेव्हा दारु पिऊन किंवा विना सिटबेल्ट तसेच विना हेल्मेट वाहने चालवू नये. सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले.

    चंद्रपुरात गांजा विक्री, 13 किलो गांजा सहित 2 आरोपीना अटक

    जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल, पोलीस निरीक्षक (वाहतूक) प्रवीणकुमार पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम,  ड्राइविंग स्कूलचे संचालक, वाहन मालक व चालक, ऑटो रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी,  कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी शहरातील जनतेला वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे म्हणाले, अपघातात दुचाकीस्वाराचे प्रमाण अधिक असते. त्यातही डोक्याला मार लागून होणाऱ्या मृत्यूची संख्या अधिक असते. त्यामुळे हेल्मेटचा वापर अत्यंत आवश्यक आहे.

    वाहन चालविताना वेळेचे नियोजन करावे. वेगात वाहन चालवू नये. वाहन चालविताना संयम बाळगणे व वहातूकीच्या नियमाचे (traffic rules and regulations) पालन करणे आवश्यक आहे. दुचाकी वर तिघेजण बसून प्रवास करू नये. कर्कश आवाज करणारे हॉर्न लावू नये, असे आवाहन त्यांनी वाहन चालक,  मालकांना केले. (Road Safety Week 2024)

    या कालावधीमध्ये कार्यालयात तसेच टोल नाक्यावर नेत्र तपासणी, आरोग्य तपासणीचे कार्यक्रम घेण्यात येईल. तसेच वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालक- मालकावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे म्हणाले.

    कार्यालयीन अधीक्षक प्रविण अदेंकिवार यांनी उपस्थितांना अपघाताची गंभीरता, वाहन चालक व मालकाची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. सदर रस्ता सुरक्षा अभियान जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला.

    कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांनी तर आभार पोलीस निरीक्षक (वाहतूक) प्रवीणकुमार पाटील यांनी मानले.

  • savitribai phule jayanti 2024 | सावित्रीबाई फुले यांचा लढा स्त्रीशिक्षणाचे प्रेरणास्त्रोत – आ. किशोर जोरगेवार

    savitribai phule jayanti 2024

    savitribai phule jayanti 2024 : सावित्रीबाई फुले यांनी आपल्या आयुष्यभर समाजातील रूढी-परंपरांविरोधात लढा दिला आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी स्त्रिया आणि मागासवर्गीयांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्या काळातील प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी हिम्मत न हारता, शिक्षणाचा दिवा पेटवत ठेवला. त्यांचा हा लढाच स्त्रीशिक्षणाचे प्रेरणास्त्रोत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    चंद्रपुरात युवासेना मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन

         बाबुपेठ येथील महानगर पालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी अश्विनी सोनवने,  मुख्याध्यापक नागेश निट, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंदा बावणे, उपाध्यक्ष राधा चिंचोळकर, माजी नगरसेवक प्रदिप किरमे, रुपेश पांडे, अमोल नालमवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

     यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (savitribai phule jayanti 2024) यांचे विचार मार्गदर्शक ठरतात. त्यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दार खुले केले. आज महिला केवळ शिक्षितच झाल्या नाहीत, तर प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्या आहेत.

    50 वर्षीय नागरिकांनी सुरू केला गांजाविक्री चा व्यवसाय

    लोकप्रतिनिधी म्हणून आमचीही जबाबदारी असून मुली शिकाव्यात, त्यांना शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अनेक गरजू विद्यार्थिनींना आपण सायकल वितरित केली आहे. पुढेही हा उपक्रम सुरू राहणार असून गरजू विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी सायकलचे वितरण करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार (kishor jorgewar) म्हणाले.

    kishor jorgewar

    आजही त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा आपल्याला समानतेचा आणि शिक्षणाचा मार्ग दाखवते. आपण सर्वांनी सावित्रीबाईंच्या विचारांना आत्मसात करून शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची उन्नती साधावी, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे ते यावेळी म्हणाले.

    शिक्षणाच्या क्षेत्रात कोणत्याही विद्यार्थ्याला अडथळा येणार नाही. नव्या योजना आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुलींनी शिक्षणात पुढे जावे, नवे कौशल्य आत्मसात करावे आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

      यावेळी स्नेहमीलन आणि क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम आमदार किशोर जोरगेवार यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाला शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • yuva sena office | चंद्रपुरात युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन

    yuva sena office

    yuva sena office : शिवसेना प्रणित युवासेना चंद्रपूर जिल्ह्यात संघटन बांधणीत सतत पुढे जात आहे.
    आज हजारोच्या वर युवावर्ग युवासेनेला पसंती दर्शवित आहे.

    2 जानेवारी रोजी ठाकरे गट शिवसेना प्रणित युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख आमदार संजय देरकर व युवासेना कोर कमिटी सदस्य हर्षलदादा काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. (Yuvasena chandrapur)

    चंद्रपुरात 50 वर्षीय नागरिक गांजाविक्री साठी येतात तेव्हा

    आमदार देरकर यांनी उदघाटन प्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतील युवक हा पक्षबांधणीत अविरत पुढे जाणार व जिल्ह्यातील युवा वर्गाच्या समस्या सोडविण्यात अग्रेसर असेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

    yuva sena chandrapur

    आयोजित युवासेना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय उदघाटन प्रसंगी वरोरा-भद्रावती शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखडे, युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक संदीप रियाल पटेल, युवासेना सहसचिव जयसिंग राजे भोसले यांच्यासहित असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Ganja drugs | 50 वर्षीय नागरिक गांजा विक्रीसाठी चंद्रपुरात येतात तेव्हा….

    ganja drugs

    ganja drugs : 2 जानेवारीला रात्री 10 वाजताच्या सुमारास जिवती तालुक्यावरून 2 इसम गांजा घेऊन दुचाकीने राजुरा शहराच्या दिशेने निघाले होते, वाटेतच पोलिसांनी दोघांना अटक केली, यावेळी पोलिसांनी 13 किलो 835 ग्राम गांजा पकडला.

    जिल्ह्यातील शेवटचा तालुका जिवती व राजुरा येथे मागील काही वर्षात अंमली पदार्थाच्या तस्करी मध्ये वाढ झाली होती, त्यावेळी पोलिसांनी या तस्करीवर नियंत्रण आणले होते.

    नायलॉन मांजाची छुप्या पध्दतीने विक्री, एलसीबीची धाड

    नव्या वर्षात पुन्हा अंमली पदार्थाची तस्करी काहीं छुप्या पध्दतीने करीत आहे अशी माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. Crime news

    माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राजुरा हद्दीतील भेंडवा फाटा येथे सापळा रचून बसले होते, रात्री 10 वाजताच्या सुमारास दोघेजण मोटारसायकल वर पोत्यात गांजा भरून येत होते, दोघे त्याठिकाणी आल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने छापा मारत दोघांना ताब्यात घेतले.

    यावेळी 50 वर्षीय देवराव माणिकराव केसगीर व 50 वर्षीय दिनकर शंभू कुळसंगे दोघेही राहणार जिवती यांना अटक करीत त्यांच्या जवळील पोत्यात 13 किलो 835 ग्राम गांजा व दुचाकी वाहन असा 2 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेला गांजा आरोपी राजुरा येथे विक्री करणार होते.

    दोन्ही आरोपीवर कलम 8(क), 21(ब), ii (ब), 29 NDPS प्रमाणे राजुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.


    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, पोउपनी विनोद भुरले, पोउपनी मधुकर सामलवार, पोलीस कर्मचारी किशोर वैरागडे, दीपक डोंगरे, संतोष येलपुलवार, गोपाल आतकुलवार, दिनेश अराडे यांनी केली.

  • chinese manja | नागरिकांचे गळे कापण्यासाठी नायलॉन मांजा चंद्रपुरातील बाजारात धडकला

    chinese manja

    chinese manja : मकरसंक्रांत आली की चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांच्या जीविताला धोका असलेल्या नायलॉन मांजा ची आवक वाढते, विशेष बाब म्हणजे मांजा विक्रेते आपल्या फायद्यासाठी नागरिकांचे गळे कापायला तयार असतात. यावर्षी नायलॉन मांजा जिल्ह्यातून भुईसपाट व्हावा यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (local crime branch) कंबर कसली आहे.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मूल शहरात नायलॉन मांजाची छुप्या पध्दतीने विक्री करणाऱ्या अंकुश बोडखे यांच्या प्रसाद कॉम्प्लेक्स, बाजार चौकातील गोडावून मध्ये धाड मारली.

    चंद्रपुरात वाघाचा मृत्यू


    गुन्हे शाखेने गोडवूनची झडती घेतली असता प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या 43 चकऱ्या आढळून आल्या, पोलिसांनी यावेळी एकूण 39 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत करन किराणा दुकानाचे संचालक 31 वर्षीय अंकुश नंदकिशोर बोडखे यांनी आपल्या मालकीच्या गोडावून मध्ये मानव व पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण करणारा नायलॉन मांजा साठवून ठेवल्याने बोडखे यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 223, 292, 293 सहकलम 5, 15 पर्यावरण (संरक्षण)अधिनियम 1986 अंतर्गत गुन्हा दाखल केला.


    याप्रकरणी पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.
    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि बलराम झाडोकार, सपोनि संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी नितीन साळवे, सुभाष गोहोकार, मिलिंद जांभुळे यांनी केली.

  • Wcl Coal Mine | वेकोली कोळसा खाणीत अचानक पोहचल्या खासदार धानोरकर

    Wcl Coal Mine

    Wcl Coal Mine : खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या  विविध विभागात आकस्मित भेटी देणे सुरु केले असुन दि. 31 डिंसेबर 2024 रोजी वेकोली क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या  खाणीत भेटी दिल्या.

    खा. प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या  वेकोली खाणीना भेटी दिल्या या वेळी वणी क्षेत्रा अंतर्गत निलजई खाणीत व बल्लारपुर क्षेत्रातील गोवरी-पवनी येथिल श्री. बुध्दा कंपनीत तसेच पवनी येथिल हर्षा कंपनीत आकस्मिक भेट दिली.

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या मृत्यूने खळबळ

    यावेळी तेथिल कार्यरत कर्मचाऱ्याची सुरक्षा, कल्याण सुविधा, एच.पि.सी. वेतन या संदर्भाने वेकोली तसेच कंत्राटदारांशी चर्चा करण्यात आली. तसेच वेकोली खाणीमुळे प्रभावित होणाऱ्या क्षेत्रातील बेरोजगारांना रोजगार देण्या संदर्भाने देखिल चर्चा करण्यात आली.

    यावेळी खासदार धानोरकर यांनी अधिकारी व कंत्राटदारांना कर्मचाऱ्याच्या सुरक्षे सबंधी सुचना दिल्या व खाणीतील कर्मचाऱ्याशी चर्चा करुन त्यांना येणाऱ्या  समस्या जाणुन घेतल्या. खाणीन मुळे प्रभावित होणाऱ्या  क्षेत्रातील नुकसानीचा आढावा देखील खा. धानोरकर (pratibha dhanorkar) यांनी घेतला.

    यावेळी खासदार धानोरकर यांच्या सोबत वेकोलीतील अधिकारी तसेच कंत्राटदार व कार्यकर्ते खाण प्रभावित गावातील असंख्य गावकरी उपस्थित होते.

  • Material purchase | चंद्रपूर मेडिकल कॉलेजबाबत महत्त्वाची बैठक

    Material purchase

    Material purchase : चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजसाठी साहित्य खरेदी प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीची दखल घेत गुरुवारी मुंबई मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेत उच्चस्तरीय बैठक पार पडली.

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा मृत्यू

    या बैठकीत 57 कोटी रुपयांचे फर्निचर खरेदी करण्याचे निर्देश एचबीसीसी कंपणीला देण्यात आले आहेत तसेच, इतर वैद्यकीय उपकरणांसाठी विविध विभागांमार्फत निधीचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या साहित्य खरेदी प्रक्रियेला वेग मिळाला आहे.


      या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, वैद्यकिय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकिय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, संचालक अजय चंदनवाले यांच्यासह संबंधित विभागाचे उप सचिव आणि अवर सचिवांची उपस्थिती होती.

    शेतात विजेचा प्रवाह एकाचा मृत्यू


          नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदारसंघातील प्रश्न सभागृहात मांडले. यावेळी त्यांनी चंद्रपूर मेडिकल कॉलेजसाठी साहित्य खरेदीसाठी ( Material purchase) निधीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.


        चंद्रपूर मेडिकल कॉलेजची (GMC chandrapur) सुमारे ५० एकरातील नवीन वास्तू पूर्णत्वास आली असली तरी वैद्यकीय साहित्य आणि फर्निचरसाठी निधी उपलब्ध नव्हता. विशेषतः गडचिरोली, यवतमाळ, तसेच तेलंगणातील आसिफाबाद आणि करीमनगर येथील रुग्ण उपचारासाठी चंद्रपुरात येतात. सध्याच्या परिस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात कॉलेज चालवले जात आहे.

    रुग्णसंख्येत वाढ झाल्याने खाटांची संख्या कमी पडत आहे आणि गैरसोय होत आहे. तसेच निवासी डॉक्टरांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नवीन इमारतीत कॉलेज हलविण्याची मागणी होत आहे. मात्र, साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे काम रखडले होते.


       सदर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. तसेच हिवाळी अधिवेशनातही त्यांनी हा विषय सभागृहात मांडला. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून गुरुवारी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत फर्निचर खरेदीसाठी 57 कोटी आणि इतर वैद्यकीय उपकरणांसाठी 41 कोटी रुपये असा एकूण 100 कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले.

    यावेळी फर्निचर खरेदीचे निर्देश एचबीसीसी कंपनीला मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. तर इतर साहित्य खरेदीसाठी निधीचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच दुसरी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.

  • tiger death news | चंद्रपुरात वाघाच्या मृत्यूने वनविभागात खळबळ

    tiger death news

    tiger death news : सिंदेवाही – नववर्षाच्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

    सिंदेवाही वनपरिक्षेत्रात बिट वनरक्षक सकाळी गस्त करीत असताना मौजा लाडबोरी शेतशिवारातील रमेश पांडुरंग गंडाईत राहणार सिंदेवाही यांच्या शेतातील नाल्याजवळ वाघ मृतावस्थेत आढळून आला.

    शेतात जिवंत विद्युत तारेच्या प्रवाहाने धक्का लागून एकाचा मृत्यू

    वनरक्षकाने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याना माहिती दिली, माहिती मिळताच घटनास्थळी उपवनसंरक्षक राकेश सेपट, सहायक वनसंरक्षक चोपडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे दाखल झाले.

    यांच्या उपस्थितीत मृत वाघाचे निरीक्षण करण्यात आले, सदर मृत वाघ हा नर असून तो वयोवृद्ध असल्याचे प्राथमिक निरीक्षणातून दिसून आले. वाघाचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत होता. मृत वाघाचे संपूर्ण अवयव शाबूत होते. Chandrapur tiger death

    घटनास्थळी वाघाच्या मृतदेहाचे शव विच्छेदन करीत उत्तरीय तपासणीकरिता विसेरा घेण्यात आला, पंचासमक्ष घटनास्थळी वाघाचे दहन करण्यात आले. वनविभागाने या प्रकरणी वनगुन्हा नोंद केला असून तपास सुरू केला आहे.

    सदर वाघाचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत शवविच्छेदनाचा विस्तृत अहवाल आल्यावर त्याचे निदान करण्यात येईल अशी माहिती वनविभागाने दिली आहे.