Tag: MH34

  • Olympics 2036 : चंद्रपुरात विदर्भस्तरिय बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटन

    Olympics 2036

    Olympics 2036 : चंद्रपूर – प्रयत्नांना सातत्याची जोड दिली तर असाध्य गोष्ट साध्य होऊ शकते. माझ्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात खेळणाऱ्या तरुण-तरुणींची मोठी फौज आहे. त्यांना मुबलक सुविधा, उच्च प्रतीचे स्टेडियम मी मिळवून देईन. २०३६ च्या ऑलम्पिक स्पर्धांमध्ये मला चंद्रपूर आणि गडचिरोलीचे वाघ बघायचे आहेत, अशी अपेक्षा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी (बुधवार) व्यक्त केली. चंद्रपूर येथे आयोजित विदर्भस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

    1 जानेवारी पासून बदलणार हे नियम

    चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशन व जी.एच. रायसोनी मेमोरियल यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे चंद्रपूरचे अध्यक्ष गिरीश चांडक, उपविभागीय अधिकारी संजय पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, मनोज सिंघवी, लक्ष्मीकांत आर्के, संस्थेचे सचिव ज्यो एलजी चांदेकर, विश्वास देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    Badminton tournament

    यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी तरुणांना प्रोत्साहित केले. आमदार मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूरचा सी चॅम्पियनचा व्हावा. जीवनात यश-अपयश, जय-पराजय येत असतो; परंतु खरा स्पर्धक तोच आहे जो पराजयानंतरही विजयासाठीचे प्रयत्न सोडत नाही. मला विश्वास आहे विदर्भातील संस्कारानुसार तुम्ही सर्व बॅडमिंटनचा उत्तम खेळ दाखवाल.’

    चंद्रपुरात वादळी पावसाचा अंदाज

    भारत देशासारख्या बलाढ्य देशाचा ऑलिम्पिकबाबत जेव्हा विचार केला जातो तेव्हा खंत वाटते. अमेरिकेने 1900 सालापासून 2020 पर्यंत म्हणजे 120 वर्षांत 2520 आणि रशियाने 1222 पदके पटकावली. तोपर्यंत आम्ही फक्त 28 पदके जिंकू शकलो. मागच्याही ऑलिम्पिकचा विचार केला तर त्यात सातच पदकांची भर पडली. म्हणजे आतापर्यंत फक्त 35 पदकांपर्यंत आपण पोहोचू शकलो. म्हणूनच हे निराशादायी चित्र बदलण्यासाठी मी अर्थमंत्री असताना शेवटच्या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज स्टेडियम व्हावे अशी घोषणा केली. प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक स्टेडियमचे बांधकाम झालेच पाहिजे, असा आग्रह होता, याचा आ. श्री. मुनगंटीवार यांनी उल्लेख केला.

    ऑल्पिम्पिकमध्ये भारताची ध्वजा उंचावणारा राजवर्धन राठोड याने केवळ पाच वर्षांच्या प्रयत्नात नेमबाजीत यश मिळवले. हेच यश तुम्हाला कमवायचे आहे. सर्वाधिक वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणांनी वाघांसारखी कारकीर्द घडवली पाहिजे. शक्तिदायिनी माता महाकालीचा आशीर्वाद तुमच्यावर आहेत, असे सांगत आ. श्री. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

    sudhir mungantiwar

    इनडोअर स्टेडियम करणार
    आगामी काळात चंद्रपूर जिल्हा सुविधांनी सुसज्ज करणार असून, वर्षभरात 4500 लोकांना बसता येईल एवढ्या क्षमतेचे इनडोअर स्टेडियम साकारणार असल्याचे आ. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट पाहिल्यानंतर त्या चित्रपटाच्या नायकाला भेटलो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, तुम्ही लक्ष्य निश्चय केले तर तुमचे यश कुणी रोखू शकणार नाही. त्यामुळे लक्ष्य निर्धारित करा. एअर कंडिशनरसाठी सोलर पॅनलची व्यवस्था करणार असून, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे आ. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

  • New Rules | 1 जानेवारी पासून या नियमात होणार बदल

    New Rules

    New Rules : दर महिण्याला शासन व विविध खाजगी कंपनी आपल्या नियमात बदलाव आणतात, या नियमाचा सामान्य जीवनावर मोठा परिणाम होतो, नवीन वर्षातील पहिल्या दिवशी सुद्धा नवे नियम लागू होणार आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात या दिवशी होणार वादळी पाऊस

    नवीन वर्ष सुरू होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. नवीन वर्षात नवीन नियमदेखील येत आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये कारच्या किमती, LPG सिलिंडरच्या किमती, पेन्शनशी संबंधित नियम, Amazon प्राइम मेंबरशिप, UPI नियम आणि FD संबंधित नियमांचा समावेश आहे. Rule changes

    कारच्या किमती वाढणार


    नवीन वर्षात कार खरेदी करणे महागणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून, मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, होंडा, मर्सिडीज-बेंझ, ऑडी आणि BMW सारख्या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांच्या किमती 3% ने वाढवतील. कंपन्यांनी उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे कारण सांगितले आहे. त्यामुळे, तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला जास्त खर्च करावा लागू शकतो.

    LPG सिलेंडरच्या किमती वाढणार


    दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल झालेला नाही. सध्या दिल्लीत त्याची किंमत 803 रुपये आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $73.58 आहे, ज्यामुळे भविष्यात किंमती बदलू शकतात.

    पेन्शन काढण्यात बदल


    नवीन वर्ष पेन्शनधारकांसाठी दिलासा देणारे आहे. 1 जानेवारी 2025 पासून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पेन्शन काढण्याचे नियम सोपे केले आहेत. आता पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे. यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही. ही सुविधा पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा आहे.

    Amazon Prime सदस्यत्वाचे नवीन नियम


    Amazon प्राइम सदस्यत्वाच्या नियमांमध्ये बदल जाहीर करण्यात आले आहेत, जे 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील. नवीन नियमांनुसार, प्राइम व्हिडिओ एका प्राइम खात्यातून फक्त दोन टीव्हीवर स्ट्रीम केला जाऊ शकतो. जर एखाद्याला तिसऱ्या टीव्हीवर प्राइम व्हिडिओ पाहायचा असेल, तर त्याला अतिरिक्त सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. पूर्वी प्राइम सदस्य एकाच अकाउंटवरुन पाच डिव्हाइसवर व्हिडिओ पाहू शकत होते.

    मुदत ठेवीचे नियम (FD


    RBI ने NBFC आणि HFC साठी मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलले आहेत. नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील. या बदलांतर्गत ठेवींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकांकडून ठेवी घेणे, मालमत्तेचा काही भाग सुरक्षित ठेवणे आणि ठेवींचा विमा करणे यासारख्या बदलांचा समावेश आहे.

    UPI 123p ची नवीन व्यवहार मर्यादा
    रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी सुरू केलेल्या UPI 123Pay सेवेमध्ये व्यवहार मर्यादा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी या सेवेअंतर्गत कमाल 5,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येत होते, परंतु आता ही मर्यादा 10,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही सुविधा 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.

  • Rain forecast | चंद्रपूर जिल्ह्यात या दिवशी वादळी पावसाचा अंदाज

    Rain forecast

    Rain forecast : दिनांक 27-28 डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

    27 डिसेंबरला दूपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल. (Accurate weather forecast rain)

    चंद्रपुरात भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन

    शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे.

    28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. (Rainfall updates live)

    पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल.

    29 डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पहिला मिळेल, आणि 30 डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल.

    शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.  प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली,  वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

  • Krishi Mahotsav 2024 : चंद्रपुरात भव्य कृषी महोत्सव

    Krishi Mahotsav 2024

    Krishi Mahotsav 2024 : धनोजे कुणबी समाज मंडळांतर्गत चांदा क्लब ग्राऊंड येथे दिनांक 27, 28 व 29 डिसेंबर 2024 ला कृषी महोत्सव तर दि. 27 व 28 ला धनोजे कुणबी उपवर-वधू परिचय मेळावा आयोजित केला आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेद्वारे आयोजकांनी दिली.

    तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम सहित, कृषी महोत्सव, सरपंच परिषद, वधू वर परिचय मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला आहे.


    शुक्रवार दिनांक 27 डिसेंबरला सकाळी 10.00 वाजता कृषी महोत्सव व उपवर-वधू परिचय मेळावा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते, उद्घाटक खासदार प्रतिभा धानोरकर, स्वागताध्यक्ष श्रीधर मालेकर, विशेष अतिथी हंसराज अहीर उपस्थित राहणार आहे.

    सन्मित्र सैनिक शाळेच्या वार्षिक संमेलनात मोहन भागवंतांची उपस्थिती

    याच कार्यक्रमात नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार संजय देरकर तर विशेष उपस्थितीत आय.ए.एस. डॉ. विजय झाडे, कृषी तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. गजानन सातपुते, बालाजी धोबे, नरेंद्र जिवतोडे, सुधीर सातपुते उपस्थित राहणार आहे.


    शनिवार दि. 28 डिसेंबर सकाळी 10.00 वाजता उपवर-वधू परिचय मेळाव्याला अध्यक्षस्थानी डॉ. अशोक जीवतोडे तर उद्घाटक आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून आमदार सुधाकर अडबाले, वामनराव चटप, सुभाष धोटे, सुदर्शन निमकर, अँड. संजय धोटे उपस्थित राहणार आहे. याच दिवशी द्वितीय सत्रात उद्योजकता मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे.

    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश राजुरकर, मार्गदर्शक रामभाऊ मुसळे, सुभाष देवाळकर, संजय ढवस, आशिष खुलसंगे, सुनिल मुसळे उपस्थित राहणार आहे. 29 डिसेंबरला सकाळी 10 वाजता अमृत महोत्सवी ज्येष्ठांचा सत्कार आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर मालेकर, स्वागताध्यक्ष सरदार पावडे, उद्घाटक लक्ष्मण गमे उपस्थित राहतील. (Krishi Mahotsav events)

    दुपारच्या सत्रात सरपंच परिषद कार्यक्रमात अध्यक्ष नरेशबाबु पुगलिया, स्वागताध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते राहतील. सत्कारमूर्ती आमदार कीर्तिकुमार भांगडिया,आमदार करण देवतळे, शंकर तोटावार, डॉ. सुमंत पांडे, दत्ता पाटील, अश्विनी कुलकर्णी, संजिव निकम, राजेंद्र कराळे,देवा पाचभाई, संदीप गि-हे उपस्थित राहणार आहे. (Agriculture workshops at Krishi Mahotsav)

    मेळावा आयोजनाचा उद्देश हा की, समाज बांधव एकत्र येऊन समाजसंघटन वाढावे. आधुनिक शेतhविषयक तंत्रज्ञान व शेतीविषयक माहिती प्राप्त व्हावी शिवाय उपवर-वधूंना योग्य जोडीदार मिळावा. सदर तीन दिवसीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मेळावा पदाधिकारी व कार्यकारिणी यांने केले आहे.


    आयोजित पत्रकार परिषदेला अँड. पुरुषोत्तम सातपुते, श्रीधर मालेकर, विलास माथनकर, अतुल देऊळकर, विनोद पिंपळशेंडे, अरुण मालेकर, भाऊराव झाडे, सुधाकर काकडे, प्रा. अनिल डहाके, प्रा. नामदेव मोरे्, रणजीत डवरे, सुधाकर जोगी, देवराव सोनपित्रे, निळकंठ पावडे, महेश खंगार, मनिषा बोबडे, सरदार पावडे उपस्थित होते.

  • Mohan Bhagwat | शिक्षण व आरोग्य या दोन्ही गोष्टी आता महाग – डॉ.मोहन भागवत

    Mohan Bhagwat

    Mohan Bhagwat : चंद्रपूर – डॉ. मोहनजी भागवत : शाळा चालवणे सोपे काम राहिले नाही. शिक्षण व आरोग्य या दोन्ही गोष्टी आता महाग झाल्या आहेत. त्यातही काही जण पैसा कमवण्यासाठी शाळा चालवतात. सेवा म्हणून शाळा चालवणे हे व्रत आहे. व्रत हे नेटाने आणि तेवढ्याच निष्ठेने चालवावे लागते. सन्मित्र सैनिकी शाळा (sanmitra sainik vidyalaya) तसा प्रयत्न करीत आहे ही आनंदाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.

    बुधवार, 25 डिसेंबर 2024 रोजी सकाळी येथील सन्मित्र सैनिकी शाळेच्या 30 व्या वार्षिकोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. परमानंद अंदनकर, सचिव अ‍ॅड. निलेश चोरे, शाळेच्या प्राचार्य अरुंधती कावडकर, कमांडंट सुरेंद्रकुमार राणा व्यासपीठावर उपस्थित होते.

    खासदार धानोरकर यांनी गाजवलं लोकसभा अधिवेशन

    डॉ. भागवत पुढे म्हणाले, सेवा म्हणून शाळा चालवणे ही केवळ शाळा व्यवस्थापनाचीच जबाबदारी नाही, तर ती समाजाचीही आहे. पोट भरण्यासाठी शिक्षण हे संकुचित व्याख्या झाली. शिक्षणाचा खरा उद्देश मनुष्य विचारशील व्हावा हा आहे.

    सुबुध्दी देणारे, संवेदना निमार्ण करणारे शिक्षण हवे. दुसर्‍याचा विचार करायला लावणारे शिक्षण हवे. स्वतः शिकून आपल्या कुटुंबाचे जीवन उन्नत करणार्‍याला चांगले मानले जाते. कुटुंबासोबतच गावासाठी धावपळ करणार्‍याला त्यापेक्षा जास्त मान दिला जातो.

    आपल्या देशासाठी कार्यरत राहिलेल्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी होते आणि जो अवघ्या जगासाठी झटतो त्याला साष्टांग नमस्कार घातला जातो. स्वामी विवेकानंदांसारखे जीवन असेल तर ते सार्थकी लागते, असे विचार त्यांनी मांडले. डॉ. परमानंद अंदनकर यांनी, ‘सर्वे भवन्तु सखिनः सर्वे सन्तु निरामया’ हे ब्रिद व्हावे यासाठी सन्मित्र मंडळ कार्यरत असल्याचे म्हटले. प्रास्ताविक अ‍ॅड. निलेश चोरे यांनी, तर संचालन व आभार प्रदर्शन अरुंधती कावडकर यांनी केले. (Sanmitra sainik school chandrapur)

    मोहनजींच्या हस्ते ‘सन्मित्र बेस्ट कंपनी अवार्ड’ने नेताजी सुभाष कंपनीला पुरस्कृत करण्यात आले. तर ‘सन्मित्र बेस्ट कॅडेट’ म्हणून नायक श्रीकांत वाडणकर या विद्यार्थ्याचा सत्कार झाला. यावेळी रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक दीपकजी तामशेट्टीवार, जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, तालुका संघचालक लक्ष्मण ओलालवार, नगर संघचालक अ‍ॅड. रवींद्र भागवत, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आ. किशोर जोरगेवार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र बोकारे, डॉ. मुकुंद अंदनकर, डॉ. प्रवीण पंत यांच्यासह जिल्ह्यातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.

    बाल सैनिकांनी सादर केले युध्द कौशल्य
    डॉ. मोहनजी भागवत यांच्यापुढे सन्मित्र सैनिकी शाळेच्या बाल सैनिकांनी युध्द कौशल्य सादर केले. व्यायाम योग, योगासन, नियुध्द, मल्लखांब आणि घोष प्रात्यक्षिकांसह चित्तथरारक मनोरेही त्यांनी उभारले.

  • Pratibha Dhanorkar | चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाबाबत खासदार धानोरकरांचा आक्रमकपणा

    Pratibha Dhanorkar

    Pratibha Dhanorkar : लोकसभेचे हिवाळी अधिवेशन दिल्ली येथे 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत पार पडले. हे अधिवेशन विविध कारणांनी चर्चेत राहिले. विरोधकांनी विविध आयुधांच्या माध्यमातून संसदेत सरकार ला घेरण्याचा प्रयत्न केला.

    चंद्रपूर-वणी-आर्णी लोसकभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विविध प्रश्न व चर्चेच्या माध्यमातून सरकार ला धारेवर धरले होते. यामध्ये प्रामुख्याने उर्जा विभागाद्वारे सौर ऊर्जेच्या संदर्भात सरकार कडे विचारणा केली. त्यासोबतच, कृषी मंत्री यांना शेतकऱ्यांना तात्काळ कृषी पंपाकरीता विज देण्याकरीता काय उपाययोजना केल्या या संदर्भाने विचारणा केली.

    महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारासंदर्भात सरकार कडे विविध प्रश्न विचारले. वित्त मंत्रालयाअंतर्गत खासदार धानोरकर यांनी मजुरांचा आर्थिक परिस्थितीसंदर्भात सरकार कडे विचारणा करुन देशातील मजुरांच्या आर्थिक परिस्थिती संदर्भात चर्चा केली. विद्युत मंत्रालयाअंतर्गत जल विद्युत, पवन उर्जा यासंदर्भात देखील चर्चा केली. श्रम व रोजगार मंत्रालय अंतर्गत अनुसूचित जाती, जनजातीतील बेरोजगार युवकांचा प्रश्न संसदेत मांडला.

    राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

    विधी व न्याय विभागाअंतर्गत न्यायालयीन शुल्क वृध्दी संदर्भात चर्चा करुन सरकार कडे विचारणा केली. त्यासोबच कृषी व कल्याण विभागाअंतर्गत किटकनाशकाद्वारे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यु संदर्भात सरकार चे लक्ष वेधले. ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याकरिता सरकार चे लक्ष वेधले. स्टील, कोळसा व खदान समिती अंतर्गत विविध प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात सरकार चे लक्ष वेधले.

    शून्य प्रहरात देखील बी.एस.एन.एल. च्या महसुल वाढी संदर्भात विविध उपाययोजना करण्याच्या सुचना करीत या कंपनीच्या घसरलेल्या आर्थिक परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली.तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील 2023 च्या पिकविम्याचे हजारो शेतकऱ्यांचे पैसे थकीत असून ते तात्काळ मिळावे अशी आग्रही मागणी लोकसभेत केली.

    खासदार धानोरकर यांनी हिवाळी अधिवेशनात (lok sabha winter session 2024) अनेक प्रश्न व चर्चेत सहभाग नोंदवून जिल्ह्यातील विकासाच्या संदर्भात आक्रमकपणा दाखवून दिला.

  • Squid Game season 2 | 26 डिसेंबर पासून थरारक खेळाला होणार सुरुवात

    Squid Game season 2

    Squid Game season 2 : नेटफ्लिक्सच्या सुपरहिट आणि सर्वाधिक पाहिलेल्या थ्रिलर ड्रामा वेब सिरीज स्क्विड गेमच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. निर्माते लवकरच त्याचा दुसरा सीझन OTT वर स्ट्रीम करणार आहेत. तुम्ही हा शो कधी आणि कुठे पाहू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.

    सन 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर ‘स्क्विड गेम’ (Squid Game) नावाची वेब सिरीज रिलीज झाली होती. हा शो प्रेक्षकांना खूप आवडला, त्यानंतर तो नेटफ्लिक्सची सुपरहिट आणि सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सीरिज बनला. आता या यशस्वी मालिकेचा दुसरा सीझनही येणार आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढत आहे, ही शोची क्रेझ आहे ज्यामुळे प्रेक्षक खूप उत्साहित आहेत. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही हे जगण्याचा संघर्ष दाखविणारी थ्रिलर सिरीज कुठे आणि केव्हा पाहू शकता.

    स्क्विड गेम 2 कधी आणि कुठे पहायचा?


    या मालिकेच्या दुस-या सीझनची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत होते आणि आता त्यांची प्रतीक्षा संपलेली दिसत आहे. ही मालिका ख्रिसमसच्या आठवड्यात म्हणजेच २६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. मालिकेबाबत बोलायचे तर, ती रात्री 3 वाजतापासून स्ट्रीट व्हायला सुरूवात होईल आणि सर्व 7 भाग एकाच वेळी प्रदर्शित केले जातील.

    आजपासून शिकाऱ्यांची होणार शिकार, बघिरा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित

    याचा अर्थ चाहते कोणत्याही व्यत्ययाशिवाय किंवा प्रतीक्षा न करता शोचा आनंद घेऊ शकतात. प्रेक्षक ही मालिका (Squid Game Netflix season 2) नेटफ्लिक्सवर फक्त मासिक किंवा वार्षिक सबस्क्रिप्शनसह पाहू शकतात. या सीझनसह मालिका अधिक रोमांचक आणि नवीन नाटकासह नवीन ट्विस्ट घेऊन येत आहे.

    Squid Game season 2 Netflix

    पहिला सीझन सुपरहिट

    जर आपण स्क्विड गेमच्या पहिल्या सीझनबद्दल बोललो तर ते खूपच मजेदार आणि धोकादायक होते. प्रत्येक खेळात सदस्यांच्या मृत्यूपासून ते पैशाची टोपली भरण्यापर्यंत प्रेक्षकांना शोमध्ये खिळवून ठेवण्याचे काम करते. त्याच्या अनोख्या कथेने देश-विदेशात आपली ताकद दाखवली होती. सध्या हा अनेकांचा आवडता शो आहे. प्रेक्षकांना या शोची संकल्पना अगदी नवीन वाटली ज्यावर आजपर्यंत क्वचितच चित्रपट किंवा मालिका बनली आहे.

    स्क्विड गेम सीझन 2 बद्दल…

    ली जंग-जे दुसऱ्या सीझनमध्ये पुन्हा एकदा सेओंग गि-हुनच्या भूमिकेत परतणार आहे. खेळाडू क्रमांक 456 चे यावेळी लक्ष्य हा धोकादायक खेळ कायमचा संपवणे हे असेल. यासाठी तो पुन्हा एकदा रेड आणि ग्रीन लाईट अशा अनेक नव्या आव्हानांना सामोरे जाणार आहे.

    शिवाय, तो फ्रंट मॅन (गॉन्ग यू) विरुद्ध एक नवीन लढाई लढणार आहे, जो स्क्विड गेमचा मास्टरमाईंड असल्याचे म्हटले जाते. आता गि-हुन हा खेळ संपवण्यात यशस्वी होतो की त्यात अडकत राहतो हे पाहायचे आहे. यावेळी शोमध्ये अनेक नवीन पात्रांचाही समावेश करण्यात आला आहे, जे पाहण्याची मजा द्विगुणित करेल.

  • ias transfer maharashtra : राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

    ias transfer maharashtra

    ias transfer maharashtra : महायुती सरकारचे खातेवाटप झाल्यावर सरकार ऍक्शन मोड वर आले आहे. शासनाने राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे.

    यामध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली ही दिव्यांग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. (IAS officer transfer Maharashtra 2024)

    मोफत रुग्णवाहिकेचे चंद्रपुरात लोकार्पण

    हर्षदीप कांबळे यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात झाली असून त्याचाच भाग म्हणून या बदल्यांकडे पाहिलं जातंय.

    या अधिकाऱ्यांच्या बदल्या

    • मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली.
    • महाजेनकोचे अध्यक्ष अनबाल्गन यांच्याकडे आता उद्योग विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी.
    • गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांकडे नागपूर टेक्सटाईल आयुक्तपदाची धुरा.
    • आयुक्त अविशांत पांडा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी पदावर बदली.
    • वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली.
    • राज्य कर सहआयुक्त सी वनमाथी यांची वर्ध्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
    • सा वनमाथी यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ संजय पवार यांची वर्णी.
    • विवेक जोन्सन हे चंद्रपूरचे नवे जिल्हा परिषद सीईओ.
    • पुणे विभागीय महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण यांची महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या सीईओपदी बदली.
    • गोपीचंद कदम यांना सोलापूर स्मार्ट सिटी सीईओपदी नियुक्ती
  • free ambulance service | आमदार जोरगेवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

    free ambulance service

    free ambulance service : भाग्यजीत बहुउद्देशीय विकास संस्थेने लोकसहभागातून खरेदी केलेल्या दोन रुग्णवाहिकांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विधीवत लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर आता या दोन्ही रुग्णवाहिका रुग्णसेवेत रुजु झाल्या आहे. या माध्यमातून रुग्णांना मोफत सेवा दिली जाणार आहे.

    अमित शाह विरोधात कांग्रेसचा निषेध मोर्चा

     एम.ई. एल प्रभागातील इंदिरानगर येथे आयोजित या लोकार्पण कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष जितेश कुळमेथे, सिद्धार्थ मेश्राम, विलास नखाते, विजय पाटील, गणवीर, तापोष डे,  महेश चहारे, सिंपल उरकुडे, परशू चव्हाण, मुकेश पुरटकर, बाळू कुळमेथे, एकनाथ मोहितकर, रुपेश मुलकावांर, प्रवीण पचबुधे, विराज सुरपाम, निखिल कोडापे, दिलीप साहू, संतोष साहू, मुन्ना जाधव, चैत्राम ठाकूर, पंकज चटप, नितेश कौरासे, अनिल बडवाईक, मोरेश्वर कुरेकार, आत्माराम खैरे आदींची प्रमूख उपस्थिती होती.

       भाग्यजीत बहुउद्देशीय विकास संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असुन संस्थेच्या (NGO offering free ambulance service) वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जात आहे. आता आरोग्य क्षेत्रात सेवा करण्यासाठी संस्थेने पूढाकार घेतला असुन दोन रुग्णवाहिका रुग्णसेवत रुजु करण्यात आल्या आहे.

    चंद्रपुरात गोवंश जनावरांची तस्करी, स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई

    या दोनही रुग्णवाहिकांचे संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले आहे.

      या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, आजचा हा प्रसंग अतिशय महत्त्वाचा आहे. आज एक नव्या जीवनदायी सुविधेचा शुभारंभ होत आहे. आरोग्य ही कोणत्याही समाजाची खरी संपत्ती असते, आणि त्या दृष्टीने ही रुग्णवाहिका सेवा आपल्यासाठी एक मोठे वरदान ठरणार आहे.

    ही रुग्णवाहिका केवळ आपत्कालीन स्थितीत उपयोगी पडणार नाही, तर प्रसूती, अपघात आणि गंभीर (Free ambulance for patients) आजारांमध्येही वेळेवर उपचार मिळवून देण्याचे कार्य करणार आहे. वेळेवर उपचार मिळाले तर अनेक जीव वाचवता येतो त्यामूळे या रुग्णवाहिकांचा मोठा उपयोग रुग्णांना आणि पर्यायाने रुग्णांच्या नातलगांना होणार असल्याचे ते यावेळी बोलतांना म्हणाले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Amit shah controversy : चंद्रपुरात अमित शाह विरोधात कांग्रेसचा निषेध मोर्चा

    Amit shah controversy

    Amit shah controversy : आंबेडकर, आंबेडकर हे नाव घेणं आता फॅशन झाली आहे, देवाचे नाव घेतलं असत तर तुम्हाला स्वर्ग भेटला असता, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या या विधानाने देशात वादंग सुरू झालं.


    अमित शाह यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला, (amit shah on ambedkar) यासाठी शाह यांनी देशातील जनतेची माफी मागत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी कांग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आजच्या निषेध मोर्च्यात केली.

    चंद्रपुरात गोवंश जनावरांची तस्करी

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर शहर काँग्रेस, जिल्हा काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मंगळवारी (२४ डिसेंबर) सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून मोर्चास प्रारंभ झाला. (Chandrapur congress morcha)

    या मोर्चामध्ये काँग्रेसच्या विविध फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत मोर्चा पार पडला. सहभागी झालेल्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना जाहीर माफी मागण्याची तसेच त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली.

    चंद्रपूर पोलिसांना मिळाला जल्लाद

    मोर्चामध्ये प्रमुख नेत्यांमध्ये माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी सहभाग घेतला.
    मोर्चादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

    काँग्रेस कार्यकर्त्यांनी शाह यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत देशातील लोकशाही व घटनात्मक मुल्यांचे रक्षण करण्यासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.