Tag: MH34

  • A notorious criminal । विविध पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार दुर्गापूर पोलिसांच्या ताब्यात

    A notorious criminal

    A notorious criminal : राजुरा, बल्लारपूर व चंद्रपूर शहरात घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार दुर्गापूर पोलिसांच्या हाती लागले आहे. दुर्गापूर वेकोलि क्षेत्रातील मेन स्टोर मधून आरोपीनी तांब्याचा तार चोरी केला होता त्या गुन्ह्याचा तपास करतेवेळी विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करणारे आरोपी अट्टल गुन्हेगार दुर्गापूर पोलिसांच्या हाती लागले आहे.

    चंद्रपूर भाजपात गटबाजी

    २४ जानेवारीला दुर्गापूर वेकोलि क्षेत्रातील मेन स्टोर मधून ७० हजार रुपयांचे तांब्याचा इलेकट्रीक केबल चोरी झाला होता. वेकोलि तर्फे याबाबत पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे फिर्याद नोंदविण्यात आली होती. 

    पोलीस निरीक्षक लता वाडिवे यांच्या नेतृत्वात गुन्ह्याचा तपास सुरु झाला, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली. आरोपीबाबत गोपनीय माहिती घेत पोलिसांनी १९ वर्षीय प्रिन्स उर्फ कालू संग्राम बहुरिया राहणार बल्लारपूर, २१ वर्षीय प्रफुल उर्फ दाद्या वामन कुकडे राहणार राजुरा, १८ वर्षीय दिलीप उर्फ नेपाळी रामचंद्र निषाद राहणार बल्लारपूर यांना अटक करण्यात आली.

    आरोपीकडून चोरी गेलेला माल सहित मोबाईल व दुचाकी असा एकूण ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष बाब म्हणजे अटकेतील आरोपींवर घरफोडीचे विविध गुन्हे दाखल आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात दुर्गापूर पोलीस स्टेशन निरीक्षक लता वाडिवे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गिरीश मोहतुरे, पोलीस कर्मचारी योगेश शार्दूल, मोरेश्वर गोरे, प्रमोद डोंगरे, मंगेश शेंडे, किशोर वलके, संपत पुलीपाका यांनी केली.

  • Chandrapur bjp । पालकमंत्री उईके यांचा कार्यक्रम अयशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्याने केली दिशाभूल

    chandrapur bjp

    chandrapur bjp : भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करून पक्षवाढीसाठी काम करण्याची शपथ घेतलेल्या कार्यकर्त्यांकडूनच पक्षवाढीसाठी आयोजित कार्यक्रमाला अडथळा आणण्याचा प्रकार समोर आला आहे. आदिवासी संघर्ष कृती समिती आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आयोजित पालकमंत्री सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने हा प्रकार उघडकीस आला आहे.

    चंद्रपुरात कांग्रेसचे आंदोलन, निवडणूक आयोगाचा केला निषेध


    पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या चंद्रपूरातील प्रथम आगमनानिमित्त प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी सात वाजता सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, नियोजित वेळ सात वाजताची असतानाही भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना दुपारी साडेतीन वाजताच कार्यक्रमाला येण्याचे निरोप पाठवले. या गोंधळामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, नियोजित वेळेत उपस्थिती कमी राहावी यासाठी हा प्रकार करण्यात आल्याची चर्चा आहे.


    कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे पक्षातील शिस्त ढासळल्याचे बोलले जात आहे. पक्षवाढीसाठी आयोजित कार्यक्रमाला अडथळा निर्माण करण्याचा हा प्रकार पक्षासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. प्रमुख पदाधिकाऱ्याने असे वर्तन करणे पक्षाच्या शिस्तीला हरताळ फासणारे असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या प्रकारामुळे पक्षाच्या एकजुटीवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


    सत्कार सोहळा सायंकाळी सात वाजताच होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले असून, नियोजित वेळेत कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून पक्षविरोधी वर्तन होत असल्याने पक्षाच्या गटांतर्गत मतभेद उघड होऊ लागले आहेत.

    ज्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाला यावे असा निरोप दिला त्यांच्या विरुद्ध पक्षात चांगलाच असंतोष पसरला आहे, निवडणूक असो पक्ष वाढीसाठी प्रयत्न यामध्ये हा पदाधिकारी सपेशल फेल ठरला आहे. या पदाधिकाऱ्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा नुकसान झालं आहे.

  • congress on election commission | निवडणूक आयोगविरोधात कांग्रेसचा एल्गार

    congress on election commission

    congress on election commission : वर्ष २०२४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या ६  महिन्यांनी राज्यात ५० लाख नवीन मतदार वाढले, विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी रात्री ७६ लाख मतदार वाढले, याबाबत निवडणूक आयोग पुरावे देत नाही.

    राज्यात आलेले सरकार हे जनमताचे नाही अशी भावना जनमानसात निर्माण झाली आहे. निवडणूक आयोग भाजप पक्षाच्या बाजूने असल्याचा आरोप प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. लोकशाही वाचविण्यासाठी कांग्रेस पक्ष आंदोलन करणार असा इशारा पटोले यांनी दिला. २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनी चंद्रपूरात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. 

    शिवा वझरकर च्या मारेकऱ्यांवर मोक्का लावा, कुटुंबाची पत्रकार परिषद

    निवडणूक आयोगाविरोधात कांग्रेसने कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली, विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोग विरोधी पक्षाचे काही ऐकायला तयार नव्हते, अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रियेत घोळ बघायला मिळाला. मतदानाच्या आकड्यात रात्री अचानक वाढ झाली याबाबत आयोग गप्प आहे.

    सत्तारूढ पक्ष व आयोगाची हातमिळवणी झाली आहे सोबतच ईव्हीएम चा घोळ विधानसभा निवडणुकीत करण्यात आला असल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला.

    सामान्य जनतेचे प्रश्न व लोकशाही वाचविण्यासाठी कांग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आल्याची माहिती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली.

    आंदोलनात माजी आमदार कांग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, कांग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, महिला अध्यक्ष चंदा वैरागडे, विनोद दत्तात्रय, विनायक बांगडे, प्रवीण पडवेकर, नंदू नागरकर, सुनीता लोढिया, केके सिंग आदी उपस्थित होते. 

  • Bhik Mango Andolan। कांग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे भीक मांगो आंदोलन

    Bhik Mango Andolan

    Bhik Mango Andolan : ग्रामीण तसेच शहरी भागातील सामान्य नागरीकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागत आहे. या विरोधात भारतीय राष्ट्रीस काँग्रेस कमेटीच्या चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाद्वारा मा.सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भिंक मांगो आंदोलन करण्यात आले.

    चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याची बाब अनेक वर्तमान पत्रात प्रसिध्दीस आली. एक्स-रे मशिन सुविधा, एम.आर.आय. सुविधा, सिटी स्कॅन या सुविधा योग्य वेळी मिळत नसल्याने या विरोधात चंद्रपूर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाने भिक मांगो आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले.

    पूजा केटरर्स वर चंद्रपूर मनपाची दंडात्मक कारवाई

    यावेळी प्राप्त निधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालयात जमा करण्यात आली व समस्यांच्या संदर्भाने जिल्हाधिकारी तसचे, खासदारांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनातून रुग्णांना सर्व अत्याधुनिक सुविधा तात्काळ पुरविण्याची विनंती करण्यात आली. अन्यथा भविष्यात या संदर्भाने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या पत्रातून देण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व सोहेल रजा यांनी केले.

    कांग्रेस

    यावेळी, गोपाल अमृतकर, प्रविण पडवेकर, प्रशांत भारती, चंदा वैरागडे, राहूल चौधरी, सचिन रामटेके, मुन्नी बाजी, शोभा वाघमारे, सिरीन कुरेशी, रामकृष्ण कोंड्रा, अंकित रामटेके, रमिज शेख, शहजाद अहमद, आमिर शेख, सादिक शेख, शकील सुफी व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

  • Nehru Market Shop | अडीच लाखांची थकबाकी, मनपाने ४ गाळ्यांना ठोकले टाळे

    Nehru Market Shop

    Nehru Market Shop :  2 लक्ष 47 हजार रुपयांची थकबाकी असणाऱ्या झोन क्रमांक १ मधील नेहरू मार्केट येथील ४ गाळ्यांना मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे. मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊन, यापुर्वी तीनदा थकबाकीची नोटीस दिल्यानंतरही सदर मालमत्ता धारकांनी कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.


        नेहरू मार्केट येथे 2 गाळे असणाऱ्या पी कुमार आबाजी यांच्याकडे 82,274,जय गोपाल सुरेशचंद्र शहा यांच्याकडे 70,019 तर शामराव बालाजी नागपुरे यांच्याकडे एकुण 94,757 रुपयांची थकबाकी आहे.यापुर्वी तीनदा थकबाकीची नोटीस या सर्वांना बजाविण्यात आली होती. मात्र करचुकवेगिरी करत असल्याने मनपा कर विभागाने गाळे सील केले आहेत.  

    शिवा वझरकर हत्याकांडाला १ वर्ष पूर्ण, आरोपींवर मोक्का लावा, वझरकर कुटुंबाची पत्रकार परिषदेत मागणी


        चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची पथके सुटीच्या दिवशीही कार्यरत आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येत आहे.

             
          सदर कारवाई 24 जानेवारी रोजी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,कर विभाग प्रमुख अनिल घुले, प्रविण हजारे व इतर कर्मचारी यांनी केली.

  • Purple Festival। दिव्यांगांच्या रोजगार निर्मितीसाठी १ कोटी निधी देणार – आमदार किशोर जोरगेवार

    Purple Festival

    Purple Festival : दिव्यांग बांधवांना आपले कलागुण सादर करण्यास शहरातील सर्वात मोठे सभागृह महानगरपालिकेने उपलब्ध करून दिले, यापेक्षा मोठा आनंद कुठलाच नाही त्यामुळे मनपाने दरवर्षी पर्पल महोत्सवाचे आयोजन करून हा उपक्रम सुरु ठेवण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.  

     
       चंद्रपूर महानगरपालिकेच्या दिव्यांग धोरण अंतर्गत, दिव्यांग कौशल विकास मल्टीपर्पज सोसायटी व पुनम प्रॉडक्शन यांच्या साहाय्याने दिव्यांग बांधवांच्या उत्कर्ष आणि विकासासाठी गणतंत्र दिनानिमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन २४ जानेवारी रोजी प्रियदर्शिनी सभागृह येथे करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. शरीराने धडधाकट असणारे अनेक लोक मनाने समाधान नसतात,मात्र दिव्यांग बांधवांना शरीराच्या सीमा असतांनाही जीवनावर प्रेम करतात,हे बोध घेण्यासारखे आहे.

    न्यायाच्या प्रतीक्षेत वझरकर कुटुंब, युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण


        चंद्रपूर शहरात १० बस स्टॅन्ड मनपाने तयार करावे ज्यात सोलर व्यवस्था असावी,महिलांसाठी प्रसाधन गृह असावे व ते दिव्यांग बांधवांस चालविण्यास देण्यात यावे,ज्यायोगे त्यांना रोजगार मिळेल यासाठी १ कोटी रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच दिव्यांग बांधवांच्या रोजगारासाठी इतरही प्रस्ताव मनपाने तयार करावे त्यासाठी लागेल तेवढा निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली. महाकाली महोत्सवातही दिव्यांग बांधवांना सादरीकरण करण्यास स्टेज उपलब्ध करून देणार असुन या माध्यमातुन त्यांचे कलागुण देशपातळीवर पोहोचण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मोठ्या पातळीवर जर दिव्यांग बांधवांना संधी मिळत असेल तर उपलब्ध करून द्यावी त्यासाठी लागणारी सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.    

    किशोर जोरगेवार


     पालक सचिव श्री.संतोष कुमार – ज्या उत्साहाने दिव्यांग बांधवांनी आहे येथे नृत्य सादर केले त्यावरून त्यांना आपले कलागुण सादर करण्यास स्टेज मिळाल्याचा आनंद दिसुन येतो.चंद्रपूर मनपाने दिव्यांग बांधवांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.पुढील वर्षी याहुन दुप्पट लोक कार्यक्रम सादर करण्यास व बघण्यास असतील अशी आशा व्यक्त करतो.    


        जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा –  व्यक्त होण्यासाठी दिव्यांग बांधवांना स्टेज उपलब्ध करून त्यांना समाजाचा महत्वाचा घटक म्हणुन गौरवान्वित केल्याबद्दल चंद्रपूर मनपाचे अभिनंदन.पुढील वर्षी ज्यास्तीत ज्यास्त दिव्यांग बांधवांनी पर्पल उत्सवात सहभाग घेऊन आनंद घेण्याचे अपेक्षा व्यक्त करतो.  


    आयुक्त श्री. विपीन पालीवाल – चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदा पर्पल महोत्सवाचे यशस्वी आयोजन मनपाने केले आहे. विशेष क्षमता असणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी पर्पल उत्सव ओळखला जातो.दिव्यांग मुलांच्या पालकांना आज नक्कीच आनंद होत असेल.उत्सवात दिव्यांग बांधवांसाठी लागणारी सर्व व्यवस्था कार्यक्रमात करण्यात आली होती. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मनपाचे धोरण आहे. असेच कार्यक्रम पुढेही आयोजित करण्याचा मनपाचा प्रयत्न राहील.

       याप्रसंगी पालक सचिव संतोषकुमार,जिल्हाधिकारी विनय गौडा,आयुक्त विपीन पालीवाल, समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे,उपायुक्त मंगेश खवले,सहायक आयुक्त शुभांगी सुर्यवंशी,अक्षय गडलिंग संतोष गर्गेलवार,समाज विकास अधिकारी सचिन माकोडे, रफिक शेख,प्राचार्य डॉ. कापसे-गावंडे,निलेश पाझारे, रमेशकुमार बोरकुटे,अमोल शेंडे, दत्ताजी,रोशनी तपासे,चिंतेश्वर मेश्राम,शहर अभियान व्यवस्थापक तसेच समुदाय संघटक पांडुरंग खडसे,सुषमा करमनकर,रेखा लोणारे, रेखा पाटील, चिंगुताई मुन तसेच वॉर्ड सखी उपस्थीत होते.          

  • Justice For Shiva Vazarkar | शिवा वझरकर हत्याकांडाला 1 वर्ष, आरोपीवर मोक्का लावा

    justice for shiva vazarkar

    justice for shiva vazarkar : 24 जानेवारी 2024 रोजी चंद्रपूर शहरात युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला आता एक वर्ष झाले आहे. या खून प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाला असला तरीही त्यांना शहरात राहण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. असे असूनही आरोपी शहर मुक्तपणे संचार करीत असल्याचा आरोप वझरकर परिवाराने केला आहे त्यामुळे कुटुंबात भीतीचे वातावरण आहे.

    25 लाख द्या, नोकरी घ्या

    या संदर्भात वझरकर परीवाराने पत्रकार परिषदेद्वारे पोलिस प्रशासनाकडे सुरक्षा आणि न्यायाची मागणी केली आहे.
    शिवा वझरकर यांच्या परिवाराचे न्यायासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु आरोपीं द्वारे वारंवार येत असलेल्या धमक्या आणि दबावामुळे कुटुंब नेहमी चिंतेत असल्याची माहीती दिली.

    जामिनावर शहरात मुक्तपणे फिरणाया आरोपींना कायद्याची भीती राहिलेली नाही. यावेळी आरोपीं व त्यांचे सहकारी साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप परीवाराने केला आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर कुटुंबाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का लागू करण्याबाबत पोलिस अधीक्षक आणि विशेष पोलिस महानिरीक्षकांना पत्रे पाठवली.

    स्मार्ट प्रीपेड मीटर वरून आमदार वडेट्टीवार आक्रमक

    या पत्राद्वारे पोलिस प्रशासनाकडे मोक्का कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. परंतु आजपर्यंत मोक्का अंतर्गत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अशा परिस्थितीत त्यांनी कुटुंबाच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले.

    शिवा वझरकर हा वडिलांना वाईट बोलल्याने हिमांशू कुमरे ला जाब विचारण्यासाठी गेला होता, मात्र आरोपीने शिवा च्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले, यावेळी शिवा खाली कोसळला व त्याला आरोपीनी लाथा बुक्क्यानी मारहाण केली, यामध्ये शिवा चा जागीच मृत्यू झाला होता.

    आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी शहरात आंदोलने झाली मात्र त्याचा प्रशासनावर फरक पडला नाही, आरोपी वर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झाले होते, विशेष बाब म्हणजे आरोपीपैकी एक हा पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे.

    शिवा वझरकर हत्याकांडात 25 वर्षीय हिमांशू कुमरे, 38 वर्षीय स्वप्नील काशीकर, 20 वर्षीय चैतन्य रासकर, 25 वर्षीय रिजवान पठाण, 21 वर्षीय नाझीर खान, 24 वर्षीय रोहित पितरकर, 27 वर्षीय सुमित दाते, 25 वर्षीय अन्सार खान यांना अटक झाली होती.

    जामिनावर सुटलेले आरोपी त्यांना खटला मागे घेण्यासाठी वारंवार धमकावत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे शिवा वझरकर यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. कुटुंब मानसिक तणावाचा सामना करत आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाकडे मदतीची विनंती केली आहे. आरोपींकडून साक्षीदारांवर दबाव वाढवला जात आहे. कायदेशीर न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने आरोपींवर त्वरित आणि प्रभावी कारवाई करावी अशी अपेक्षा कुटुंबाने व्यक्त केली आहे.

  • Smart prepaid meter | स्मार्ट प्रीपेड मीटर वरून आमदार वडेट्टीवार आक्रमक

    Smart prepaid meter

    Smart prepaid meter : निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने ,फसव्या योजना व भूलथापांची वचने देऊन महायुती सरकार सत्तेवर आली. सत्ता प्राप्त होताच सरकारने व्यवसायदारांचे हित जोपासण्यासाठी राज्यातील वीज वापर करणाऱ्या जनतेच्या मानगुटीवर आर्थिक भुर्दंड लादणारे व दीड पट अधिक गतीने चालणारे स्मार्ट मीटर (प्रीपेड रिचार्ज मीटर) ग्राहकांच्या घरी जबरदस्तीने लावणे सुरू केले असून जनतेने सरकारच्या या अन्यायकारक धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करीत असून प्रीपेड स्मार्ट मीटर लावणे तात्काळ बंद करा.

    चंद्रपूर मनपाचा पूजा कॅटरर्स ला दणका

    अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल. असा सज्जड इशारा राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

    ते पुढे बोलताना म्हणाले की, महायुती सरकारने केवळ सत्ता प्राप्तीसाठी प्रलोभने देऊन जनतेला मूर्ख बनविण्याचे काम आजवर केले आहे. देशासह राज्यात महागाई, बेरोजगारी यामुळें सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अश्यातच विवीध जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या असून सर्व सामान्यांना जिवन जगणे अवघड झाले आहे. अशातच गेल्या वर्षभरापूर्वी विज वितरण कंपनी कडून विज ग्राहकांचे विद्युत मीटर बदलाविण्यात आले होते. मात्र वर्ष लोटताच आता सरकारने स्मार्ट मीटर च्या नावाखाली वेठीस धरण्याचा सपाटा सुरू केला आहे.

    सिडीसीसी बँकेत नोकरी हवी, तर मोजावे लागेल 25 ते 40 लाख

    या संदर्भात विरोधी बाकावरून स्मार्ट मीटर ला कडाडून विरोध करीत आम्ही जनहिता करिता आवाज उचलला असताना मुख्यमंत्र्यांनी भर सभागृहात स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही अशी ग्वाही दिली होती. मात्र त्यावरून आता तुमच्या केले असून जनतेला दिलेले स्मार्ट फिटर न लावण्याचे आश्वासन फोल ठरल्याचे दिसून येते असेही ते म्हणाले. तर स्मार्ट मीटर हे दीड पट अधिक गतीने चालणारे मीटर असुन हे प्रीपेड असल्याने यात अगोदर रिचार्ज कारणे अनिवार्य आहे.

    मोबाईल प्रमाणेच रिचार्ज संपला की विज पुरवठा आपोआप बंद होईल. म्हणजेच जनतेला रात्रौ बेरात्री लहान मूल,अभ्यासक मुले तसेच इतर सर्व कार्यासाठी चक्क अंधारात रात्र काढावी लागणार आहे.

     देशांतील व राज्यातील महायुती सरकार हे गोरगरिबांसाठी नसून केवळ व्यापारी हीत जोपासणारे सरकार असुन स्मार्ट मीटर (प्रीपेड रिचार्ज मीटर) योजने अंतर्गत जनतेची अर्थिक लूट करु पहाणाऱ्या या लुटारू सरकारच्या अन्यायकारक धोरणाला आपण सर्वांनी मिळून एकजुटीने प्रखरपणे विरोध करणे गरजेचे असुन जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच तत्पर आहे.

    आपण सर्व विज ग्राहकांनी स्मार्ट मीटर लावण्यास विरोध दर्शवावा. तसेच विज वितरण कंपनी कडून कुठल्याही ग्राहकाकडे  बळजबरीने स्मार्ट मीटर लावण्याचा प्रयत्न होत असल्यास आमच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन देखिल काँग्रेस नेते, राज्याचे माजी विरोधी विरोधी पक्षनेते,तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

  • Maharashtra Export Convention | चंद्रपुरात महाराष्ट्र एक्सपोर्ट कॉन्व्हेंशन

    Maharashtra Export Convention

    Maharashtra Export Convention : चंद्रपूर हा खनीज आणि वनसंपत्तीने समृध्द जिल्हा असून त्यावर आधारीत उद्योग येथे मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय धान, कापूस आणि सोयाबीन ही पिके सुध्दा जिल्ह्यात घेतली जातात. निर्यात क्षमतेसाठी अतिशय चांगले वातावरण जिल्ह्यात असून या जिल्ह्यातून किमान पाच निर्यातदार तयार व्हावेत, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केली.

    चंद्रपुरात एका शासकीय नोकरीची किंमत 25 ते 40 लाख

    जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर च्या वतीने नियोजन सभागृह येथे आयोजित महाराष्ट्र एक्सपोर्ट कॉन्व्हेंशनचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर नागपूर विभागाचे उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडच्या सहायक संचालक स्नेहल ढोके, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्या,  इंडिया पोस्टचे रामकृष्ण, एसएमई फोरमच्या संचालक उर्वशी वुथू, मिनाक्षी बागडे, सुनील कुलकर्णी, अक्षय गोंदाणे आदी उपस्थित होते.

    यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यातील उत्पादन निर्यात करून त्याचा लाभ स्थानिक उद्योजकांना, शेतक-यांना व्हावा, या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारने निर्यातीला चालना दिली आहे. शासनाच्या निर्यात धोरणाला वृध्दींगत करणे, स्थानिक उद्योजकांच्या शंका – कुशंकांचे निरसन करणे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    निर्यातीकरीता चंद्रपूरमध्ये अतिशय चांगले वातावरण आहे. बांबू आधारीत वनउपज व कृषी उत्पादनसुध्दा जिल्ह्यातून निर्यात होऊ शकते. त्यामुळे येथील शेतकरी आणि कामगारांना चांगला लाभ मिळेल, असेही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

    तत्पुर्वी जिल्हाधिका-यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उद्योग संबंधित विविध चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाला एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे मधुसूदन रुंगठा, डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रीयल असोसिएशनचे प्रवीण जानी, राईस मील असोसिएशनचे श्री. कोंतमावर यांच्यासह नामांकित निर्यातदार, निर्यात इच्छुक उद्योजक, तरुण, तरुणी आदी उपस्थित होते.

  • Lokshahi Din Chandrapur | चंद्रपूर मनपाचा लोकशाही दिन

    Lokshahi Din Chandrapur

    Lokshahi Din Chandrapur : सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणींची न्याय व तत्परतेने शासकिय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी  उपाय योजना म्हणून ‘लोकशाही दिन’ चंद्रपूर महानगरपालिका कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजीत केला जातो.

    पूजा कॅटरर्स वर चंद्रपूर मनपाची कारवाई

    फेब्रुवारी महीन्यातील लोकशाही दिन, सोमवार दि.3 फेब्रुवारी 2025 रोजी महानगरपालिका कार्यालयात मा. आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता आयोजीत करण्यात आलेला आहे. (Lokshahi Din public issues)


        ज्या नागरिकांना प्रत्यक्षरित्या उपस्थीत राहणे शक्य नाही त्यांच्यासाठी मनपाने ई-लोकशाही दिनाची सुविधा करून दिली असुन यात त्यांना आपले निवेदन   lokshahidincomplaint@gmail.com या ईमेल आयडी वर पाठविता येईल.लोकशाही दिन प्रसंगी अर्जदारांनी विहीत नमून्यातील दोन प्रतीत अर्ज सादर करावे.  

    सिडीसीसी बँकेत एका नोकरीची किंमत 25 ते 40 लाख


       अर्ज सादर केल्यानंतर संबंधीत विभागाकडे निवेदन कार्यवाही करीता पाठविण्यात येईल. संबंधीत विभागप्रमुख अर्जदाराला आपल्या स्तरावर निवेदनासंबंधी केलेली कार्यवाही किंवा चालु असलेली कार्यवाही याबाबत अवगत करतील,तसे विभाग प्रमुखाकडून न झाल्यास किंवा अर्जदाराचे समाधान न झाल्यास अर्जदारांना  लोकशाही दिनामध्ये मा. आयुक्त यांचे कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करता येईल