Tag: MH34

  • Chandrapur Traffic Diversion । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चंद्रपूर दौरा: 16 फेब्रुवारीला वाहतूक मार्गात बदल, नागरिकांनी घ्यावी दक्षता

    Chandrapur Traffic Diversion

    Chandrapur Traffic Diversion : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा 16 फेब्रुवारी रोजी चंद्रपुर येथील प्रियदर्शिनी सभागृह येथे दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाकरीता नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच कार्यक्रमा दरम्यान उपस्थित असणारे मान्यवर व इतर नागरीकांची वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक या मार्गावरुन आगमन व निर्गमन होणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातुन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. (Devendra Fadnavis Chandrapur Visit)

    २० फेब्रुवारीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

    दौरा कार्यक्रम असलेल्या मार्गावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास अथवा गैरसोय होऊ नये म्हणुन वाहतुक व्यवस्थेमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.

    हा मार्ग राहणार बंद

    16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक हा मार्ग  सर्व प्रकारचे वाहनाकरीता बंद राहील. तसेच सदरचा मार्ग हे नो पार्कींग झोन व नो हॉकर्स झोन म्हणुन घोषीत करण्यात येत आहे. (Chandrapur Road Closure 16 Feb)

    या कालावधीत सर्व वाहतुकदारांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

    १) सदरच्या कालावधीत नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने वरोरा नाका-उडान पुल-सिध्दार्थ हॉटेल-बस स्टॅड-प्रियदर्शनी चौक मार्गे किंवा मित्र नगर चौक-संत केवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश जातील.

    २) सदरच्या कालावधीत शहरातुन बाहेर जाण्यासाठी नागरीकांनी जटपुरा गेट-प्रियदर्शीनी चौक-बस स्टॅण्ड चौक-सिध्दार्थ हॉटेल-उडान पुल-वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक-मित्र नगर चौक मार्गे बाहेर जातील.

    ३) सदर अधिसुचनेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल.

    नागरीकांनी सदर अधिसुचनेचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे,  असे आवाहन पोलिस  विभागाने केले  आहे.

  • OBC Protest Maharashtra | ओबीसी न्याय हक्कांसाठी २० फेब्रुवारीला धरणे आंदोलन, १६ फेब्रुवारीला आढावा बैठक

    OBC Protest Maharashtra

    OBC Protest Maharashtra : चंद्रपूर- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे २० फेब्रुवारी २०२५ ला ओबीसींच्या न्याय मागण्यासाठी राज्यभरात धरणे आंदोलन होणार आहे. धरणे आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १६ फेब्रुवारीला वरोरा नाका येथील पत्रकार भवनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

    धारिवाल कंपनी प्रबंधनावर कठोर कारवाई करा, आपची मागणी

    राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसी, व्हीजे,एनटी & विमाप्र विद्यार्थ्याना अजूनही आधार योजनेतील रक्कम मिळाली नाही यासह जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी साठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा १५ लक्ष रुपये करण्यात यावे, आरक्षणाची ५०% मर्यादा रद्द करण्यात यावी.

    ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा इत्यादी प्रलंबित मागण्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर चंद्रपूर येथे धरणे आंदोलन करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, तसेच राष्ट्रीय ओबिसी महासंघाच्या सर्व कक्षाचे प्रमुख व समविचारी संघटना ओबीसी समाजात मोडणाऱ्या जातीय संघटना, विध्यार्थी यांची सभा १६ फेब्रुवारीला २०२५ रविवार ला दुपारी १ -०० वाजता चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ, वरोरा नाका,चंद्रपूर,येथे आयोजित केली आहे. (National OBC Federation Dharna)

    तरी सर्व विंगच्या पदाधिकाऱ्यांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवानह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी केले आहे.

  • Chandrapur Power Plant Accident | धारीवाल पावर प्लांट दुर्घटना: आम आदमी पक्षाची कंपनी प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी

    Chandrapur Power Plant Accident

    Chandrapur Power Plant Accident : चंद्रपूर – धारीवाल पावर प्लांटमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेवर आम आदमी पक्ष चंद्रपूरने कठोर भूमिका घेतली असून, कंपनी प्रशासनाविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. LCPL कंपनीतील फील्ड ऑपरेटर कर्णधर अशोक शेरके यांचा कन्व्हेअर बेल्टमध्ये (Conveyor Belt Accident) अडकून मृत्यू झाला, ही घटना कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे गंभीर उदाहरण आहे.

    चंद्रपूर ते मुंबई रेल्वे सुरू होणार, आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा

    घटनेचे वर्णन व प्रशासनाचे गैरप्रकार:
    १. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष: कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने अपघात घडला.
    २. शव बेकायदेशीररीत्या हलवण्याचा प्रयत्न: मृतकाच् शरीरार तातडीने हलवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. (Dhariwal Company Negligence)


    ३. कामगार व नेत्यांना घटनास्थळी प्रवेश नाकारणे: कामगार संघटनांच्या नेत्यांना व आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आले.
    ४. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न: कंपनीने अपघाताची जबाबदारी झटकण्यासाठी महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.


    ५. पोलिस प्रशासनाची भूमिका: संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी कामगार व नेत्यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखून अन्यायकारक भूमिका घेतली.

    आम आदमी पक्षाच्या मागण्या:
    १. कंपनी प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
    २. मृतकाचे शव बेकायदेशीररीत्या हलवण्याच्या व पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नांवर कायदेशीर कार्यवाही करावी.
    ३. कामगार व नेत्यांवर झालेल्या धक्का-बुक्कीबद्दल संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
    ४. कामगारांच्या सुरक्षेच्या तपासणीसाठी तात्काळ समिती स्थापन करावी.


    ५. सुरक्षेचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
    ६. जिल्ह्याला कायमस्वरूपी सहाय्यक कामगार आयुक्त द्यावा.

    इशारा:
    जर वरील मागण्या त्वरित पूर्ण झाल्या नाहीत, तर आम आदमी पक्ष कामगारांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन उभारेल. कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

    प्रमुख नेत्यांची उपस्थिती:
    यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, कामगार नेते व युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महिला शहर अध्यक्षा तब्बसूम शेख, शहर संघटनमंत्री संतोष बोपचे, युवा जिल्हा संघटनमंत्री मनीष राऊत, युवा सचिव आदित्य नंदनवार, अजय बाथव, अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सय्यद, वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे, अनुप तेलतुबडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

  • Vijay Wadettiwar Development Work । आमदार विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांची बोलती केली बंद

    Vijay Wadettiwar Development Work

    Vijay Wadettiwar Development Work : एखादी काम हाती घेतल की ते पूर्णत्वास  नेल्याशिवाय स्वस्त न बसणारे व दिला शब्द समर्थपणे पुर्ण करणे अशी राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांची राजकीय क्षेत्रात ओळख आहे. याचाच प्रत्यय नुकताच सिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्यांतील नागरीकांना आला असुन आपल्या अथक प्रयत्नातून आ.वडेट्टीवार यांनी मंजुर केलेल्या सिंदेवाही – पाथरी तसेच ब्रम्हपुरी – आरमोरी रेल्वे मार्गावरील उडाण पुलाचे बांधकाम सुरू झाल्याने नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरविणाऱ्या विरोधकांची प्रचंड गोची होऊन बोलती बंद झाल्याची दिसून येते.

    आपल्या घराण्याला कुठलाही मोठा राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वाच्या बळावर बड्या प्रस्थापितांना धक्का देऊन विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्याची जन्मभूमी  तर  गडचिरोली जिल्हा ही कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्राच्या मातीत विजय वडेट्टीवार नावरूपाने एक कणखर कर्तुत्ववान नेतृत्व उदयास आल. एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याचे कॅबिनेट मंत्री व विरोधी पक्षनेते पदापर्यंत मजल मारून जनतेने दाखविलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता सार्थक ठरवीत प्रगल्भ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्वी चिमुर तर आता ब्रह्मपुरी मतदार संघाचा झपाट्याने विकास केला. (Sindewahi Pathari Flyover Project)

    जिल्हाधिकारी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

    शेतकरी, कामगार, बेरोजगार युवक, शिक्षणार्थी विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच इतर जनसामान्य यांच्या प्रश्नांना घेऊन शासन दरबारी समर्थपणे लढा देऊन वेळीच निकाली काढणे अशी आमदार विजय वडेट्टीवार यांची ख्याती आहे. त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेतेपदी असताना विरोधी बाकावरून आपल्या क्षेत्रासाठी हिरीरीने समस्या मांडून  सिंदेवाही ते पाथरी तसेच ब्रह्मपुरी ते आरमोरी या मार्गावरील रेल्वे फाटकावर वाहतूकदारांना तसेच शाळकरी विद्यार्थी व इतर जनसामान्यांना होत असलेला त्रास बघून प्रयत्नांची पराकाष्टा केली. याचे फलित म्हणून सिंदेवाही – पाथरी रेल्वे मार्गावरील उडान पुलाकरिता (९० कोटी) व ब्रम्हपुरी ते आरमोरी रेल्वे मार्गावरील उडान पुलाकरिता (७५ कोटी) इतका भरघोस निधी मिळवून दिला. तत्पूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काळात माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विकासाचा झंजावात पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली होती. (Sindewahi Bramhapuri Road Projects)

    अशातच विरोधकांनी मतदार जनतेची दिशाभूल करण्यासाठी विविध अफवा पसरवून रेल्वे उडान पूल होणार नसल्याचे सांगत मतदारांना भ्रमिष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न चालविला. मात्र दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्नांची पराकाष्टा करणारे आ .विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेली सदर दोन्ही कामे प्रारंभ झाली असून नागरिकांमध्ये आनंद तर विरोधकांची बोलती बंद झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तत्पूर्वी सिंदेवाही – मूल मार्गावरील बेलघाटा व मूल ते चंद्रपूर मार्गावर प्रचंड वाहतूक असतानाही तद्वतच येथे उडानपुलांची नितांत गरज असतानाही येथील लोकप्रतिनिधी नागरिकांची तसेच वाहतूकदारांची समस्या सोडविण्यात आजवर असमर्थ ठरले आहे. (Government Road Projects India)

    मात्र माजी विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करून सर्वसामान्य नागरिक व वाहतूकदारांना होणारा नाहक त्रास या समस्याचे स्वबळावर निराकरण करण्यात यश प्राप्त केले आहे. निर्माणधीन सदर दोन्ही पुलाचे काम पूर्ण होताच सदर मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांच्या वेळेचा होणारा अपव्यय व वाहतुकीचा होणारा खोळंबा याला पूर्णविराम मिळणार असून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र विकासाचे आणखी एक पाऊल पुढे टाकणार असे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे.

    :

  • District Collector School Visit । जिल्हाधिकाऱ्यांची विजासन शाळेला भेट: विद्यार्थ्यांसोबत संवाद, शैक्षणिक सुविधांची पाहणी

    District Collector School Visit

    District Collector School Visit : 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत वरिष्ठ अधिका-यांनी गावात भेटी देऊन शाळा, आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी आदींची पाहणी करावी तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात, अशा सुचना राज्य शासनाच्या वतीने सर्व जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भद्रावती येथील विजासन शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

    चंद्रपूर ते मुंबई रेल्वे पुन्हा सुरु होणार, आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा

    यावेळी वरोराचे उपविभागीय अधिकारी जेनीथचंद्र दोन्तुला, भद्रावतीचे तहसीलदार श्री. भांडारकर, संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी शेळकी मॅडम, भद्रावती केंद्राचे केंद्रप्रमुख मोरेश्वर विद्ये आदी उपस्थित होते. (Government School Inspection)                                               

    यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी शाळेतील ऍस्ट्रॉनॉमी लॅबची विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करून जीवनात यश प्राप्त करावे. कठोर मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही. आता पुढील महिन्यापासून परीक्षा सुरू होतील. त्याची चांगली तयारी करावी. तसेच शिक्षणासोबतच आपल्यातील कलागुणसुध्दा विकसीत करावे. यावेळी जिल्हाधिका-यांनी शाळेतील परस बागेची पाहणी केली तसेच शाळा, शालेय परिसर या सर्व बाबीविषयी समाधान व्यक्त केले.  (Chandrapur District Administration)

    या भेटीच्या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ भाऊ दानव, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पेंदा, सहायक शिक्षक अमोल व-हाडे, जीवने मॅडम, चांदेकर मॅडम, डोंगरे मॅडम, सुरज उमाटे, दीपक कावटी व इतर मान्यवर उपस्थित होते.

  • Chandrapur to Mumbai train | चंद्रपूर-मुंबई, चंद्रपूर-पुणे दररोज जलदगती रेल्वेची मागणी; आमदार किशोर जोरगेवार यांचा पाठपुरावा

    Chandrapur to Mumbai train

    Chandrapur to Mumbai train : चंद्रपूरहून मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्यांची संख्या अधिक असतानाही आठवड्यातून एक सुपरफास्ट रेल्वे या मार्गाने धावत आहे. परिणामी, प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे चंद्रपूर-मुंबई, चंद्रपूर-पुणे दररोज जलदगती रेल्वे सुरू करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मध्य रेल्वेचे मुंबई महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा यांना केली आहे. (Chandrapur to Pune express train)

    चंद्रपुरातील ताज महल

    मध्य रेल्वेचे मुंबई महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा हे आज चंद्रपुरात असताना, रेल्वे स्थानक येथील मिटिंग हॉल येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची भेट घेऊन सदर मागणी केली आहे. यावेळी रेल्वे विभागाचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक कुशकुमार मिश्रा, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक  एस. एस. गुप्ता, मुख्य अभियांत्रिकी व्यवस्थापक रजनीश माथुर, मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल, नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल, वरिष्ठ विभागीय ऑपरेशन्स व्यवस्थापक कृष्णा जी पाटील, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त मनोजकुमार, चंद्रपूर स्थानक व्यवस्थापक आयाज खान, रेल्वे सुरक्षा दल प्रमुख कृष्णानंद राय, वरिष्ठ विभागीय नियंत्रण निरीक्षक केशव जैन चंद्रपूर रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे झोनल रेल्वे वापरकर्ता समन्वय समिती सदस्य दामोदर मंत्री, विभागीय रेल्वे वापरकर्ता समन्वय समिती सदस्य मिलिंद दाभेरे यांची उपस्थिती होती.

     चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी,  व्यापारी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना मुंबई आणि पुणे येथे नियमित प्रवास करावा लागतो. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे गाड्यांमुळे १६-१८ तासांचा कालावधी लागत आहे. तसेच प्रवाशांसाठी तिकिटांचीही कमतरता जाणवत आहे. (Superfast train from Chandrapur)

    परिणामी, अनेकांना नागपूरमार्गे प्रवास करावा लागतो, जो वेळखाऊ आणि खर्चिक ठरत आहे. सध्या चंद्रपूरहून मुंबई आणि पुण्यासाठी केवळ साप्ताहिक गाड्या उपलब्ध असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर-मुंबई आणि चंद्रपूर-पुणे दररोज धावणारी दूरोंतो किंवा सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर आलेल्या मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. धर्मवीर मीणा यांच्याकडे आमदार जोरगेवार यांनी मागणी करत या जलदगती रेल्वे सेवेच्या माध्यमातून मागास आणि नक्षलग्रस्त भागाच्या विकासाला चालना मिळेल, तसेच प्रवाशांची गैरसोय दूर होईल, असे सांगितले आहे.

    तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या (SECR) चांदा पोर्ट रेल्वे स्टेशनला मध्य रेल्वेच्या चंद्रपूर स्टेशनशी जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या कॉर्ड लाईनच्या कामाला तातडीने मंजुरी द्यावी आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

    कोलकाता साठी विशेष ट्रेनची मागणी

    चंद्रपुरात बंगाली समाज बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास असून, त्यांना कोलकाता जाण्यासाठी अडचणी येत असतात. अशा परिस्थितीत कोलकाता जाण्यासाठी ट्रेन सुरू करण्याची मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांनी मध्य रेल्वेचे मुंबई महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा यांना केली आहे. (Chandrapur to Kolkata train)

    श्री माता महाकाली दर्शन यात्रा स्पेशल ट्रेनची आमदार किशोर जोरगेवार यांची मागणी

    चंद्रपूरच्या प्रसिद्ध श्री माता महाकाली मंदिरात चैत्र नवरात्र आणि महोत्सव काळात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या यात्रेकरूंच्या सोयीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी “श्री माता महाकाली दर्शन यात्रा स्पेशल” (30 मार्च ते 13 एप्रिल 2025) आणि “श्री माता महाकाली महोत्सव स्पेशल” (27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025) या विशेष रेल्वे गाड्या जालना-चंद्रपूर मार्गावर चालवण्याची मागणी केली आहे. (Special train for Mahakali Temple)

    या विशेष गाड्यांमध्ये 10 स्लीपर आणि 10-12 जनरल डब्यांची व्यवस्था ठेवावी तसेच तिकीट दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.

  • Taj Mahal of Chandrapur | सलाम राणी हिराई: चंद्रपुरातील प्रेम आणि इतिहासाचा अनमोल ठेवा

    Taj Mahal of Chandrapur

    Taj Mahal of Chandrapur : चंद्रपूर: शहरातील प्रेमाचे प्रतीक असलेल्या गोंडराजे बिरशहा-राणी हिराई यांच्या समाधीवर इको-प्रो संस्था आणि एफईएस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून इतिहासाला उजाळा दिला. ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रमांतर्गत शेकडो विद्यार्थ्यांनी राणी हिराई यांच्या अजरामर प्रेमाचे आणि कर्तृत्वाचे स्मरण केले.


    आजच्या तरुणाईला प्रेमदिनाच्या निमित्ताने क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, नात्यांमधील प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्या समाधीस्थळावर हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

    प्रेमाला मर्यादा नाही, स्वीडिश दाम्पत्याने चंद्रपुरातील बाळाला घेतले दत्तक

    राणी हिराईने पतीच्या मृत्यूनंतर या समाधी-वास्तूचे बांधकाम केले. ताजमहलच्या तोडीची सुंदर आणि आकर्षक वास्तू बांधून त्यांनी पतीवरील आपले प्रेम व्यक्त केले. ताजमहल प्रमाणेच राणी हिराई ने सुद्धा एका दगडात आधी या वास्तूची प्रतिकृती तयार करवून घेतली होती, ही प्रतिकृती आजही मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर येथे सुरक्षित आहे. त्यानंतर त्यांनी राज्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळत अनेक विकासकामे केली. राणी हिराईचा हा आदर्श आजच्या तरुणाईने घेण्याची गरज आहे. (Rani Hirai love story)


    “चंद्रपूर शहरात असलेली ही प्राचीन वास्तू आपला ऐतिहासिक वारसा आहे. राणी हिराईने आपल्या कार्यांमधून गोंडराजे बिरशहा आणि राणी हिराई यांच्यातील प्रेम अजरामर केले,” असे मत प्राध्यापकांनी व्यक्त केले.
    “राणी हिराई आणि राजा बिरशहा यांचे प्रेम अमर आहे. त्यांच्या कार्यांमधून ते सतत जिवंत राहणार आहेत.

    आजच्या तरुणाईने अशा स्थळांना भेट देऊन आदर्श घेण्याची गरज आहे, क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, युवा पिढीने भारतीय संस्कृती मध्ये विविध नात्यातील प्रेम व्यक्त करण्यास विशिष्ट दिवसाची गरज नसून ते आपल्या कार्यातून व कृतीतून व्यक्त केले पाहिजे असा संदेश अनेक घटकांतुन सांगितले आहे.” असे मत इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी व्यक्त केले. (Eco-Pro Chandrapur event)

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र बारसागडे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. मेघमाला मेश्राम यांनी मानले. सलाम राणी हिराई कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडू धोतरे होते तर यावेळी मार्गदर्शन करणारे प्रभारी प्राचार्य डॉ राजेश चिमनकर, प्रा. डाॅ करुणा करकाडे, प्रा. सावधान उमक यांनी केले. यावेळी विविध प्राध्यापक, इको-प्रो सदस्य आणि शेकडो विद्यार्थी उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राजू काहिलकर, सुनील पाटील, सचिन धोतरे, सनी दुर्गे, चित्राक्ष धोतरे यांनी सहकार्य केले.

  • Chandrapur plastic raid news । चंद्रपुरात 10 खोके प्लास्टिक ग्लास जप्त

    Chandrapur plastic raid news

    Chandrapur plastic raid news : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई सुरू असुन उपद्रव शोध पथकाद्वारे रहमतनगर येथील सलीम यांच्या मालकीच्या गोडाऊन येथे कारवाई करून प्लास्टिकचे ग्लास असणारे 10 खोके जप्त करण्यात आले आहेत तसेच संबंधितांवर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

    प्रेमाला मर्यादा नाही, स्वीडिश दाम्पत्याने व्यंगत्व असलेल्या बाळाला घेतले दत्तक


        बंदी असलेल्या व एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार 8 टीम्स बनविण्यात आल्या आहेत. या सर्व चमूंद्वारे शहरात नियमित कारवाई करण्यात येते. यावेळेस सुद्धा या दुकानासंबंधी गुप्त माहिती मनपास प्राप्त झाली होती. प्लास्टीक साठा,पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येत असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास 5 हजारांचे बक्षिस दिल्या जात असल्याने अनेक सुजाण व्यक्तींकडुन अवैध साठ्यासंबंधी तक्रारी मनपास प्राप्त होत आहेत. (Single-use plastic fine and punishment)


         एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर 5 हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास 10 हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. (Chandrapur nuisance search squad action)


         सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भेलावे व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात प्रभारी सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,डॉ. अमोल शेळके,स्वच्छता अधिकारी भूपेश गोठे,स्वच्छता निरीक्षक महेंद्र हजारे ,स्वच्छता निरीक्षक शुभम खोटे,शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लिवर, प्रफुल पोतराजे यांनी केली. 

  • Special needs child adoption । प्रेमाला मर्यादा नाही : स्वीडिश दाम्पत्याने भारतीय बालकाला घेतले दत्तक”

    Special needs child adoption

    Special needs child adoption : आपल्या देशात दत्तक प्रक्रियेंतर्गत बालक दत्तक घेतले जाते. परंतु व्यंगत्व असलेले बालक दत्तक घेण्याचे धाडक सहसा कोणी करीत नाही. मात्र हे करून दाखविले आहे एका स्वीडीश दाम्पत्याने. स्पेशल नीड (व्यंगत्व) असलेल्या बालकाला त्याच्या जन्मदात्यांनी नाकारले, परंतु स्वीडन येथील निपुत्रिक दाम्पत्याने या बालकाला स्वीकारून थेट स्वीडन गाठण्याची तयारी केली आहे.

    केंद्रीय दत्तक नियमावली 2022 व बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 अंतर्गत प्रक्रिया करून जिल्हा न्यायालय चंद्रपूर येथून सदर बालकाला कायदेशीर दत्तक देण्यात आले. 11 फेब्रुवारी रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत यांच्या हस्ते असाच एक आगळा-वेगळा दत्तक निरोप समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमात सदर बालकाला स्वीडन येथील रिकार्ड टोबायस हेडबर्ग आणि मारिया एलिझाबेथ व्हिक्टोरिया एरिक्सन या परदेशातील पालकाकडे सुपूर्द करण्यात आले. (International adoption from India)

    कार्यक्रमाला किलबिल दत्तक संस्थेच्या संस्थापिका प्रभावती मुठाळ, उपाध्यक्ष वंदना खाडे, प्रा. डॉ विद्या बांगडे, हेमंत कोठारे तसेच आदी किलबिल दत्तक तथा प्राथमिक बालगृहाचे कर्मचारी उपस्थित होते.

    गडचिरोली विशेष दत्तक संस्थेतून पहिल्या बाळाला मिळाले पालक

    अनाथ, परित्याग केलेले आणि सोडून दिलेले बालकाचे संरक्षण, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईनच्या 1098 मोफत क्रमांक सेवा माध्यमातून केले जाते. अशा बालकांच्या पालन पोषणकरिता किलबिल दत्तक योजना संस्था कार्यरत असून बालकल्याण समिती चंद्रपुर, यांच्या आदेशाने दाखल करण्यात येते. यानंतर सदर बालकांना बालकल्याण समितीद्वारे दत्तक मुक्त केले जाते. दत्तक इच्छुक पालक महिला व बालविकास मंत्रालयाच्या CARA (Central Adoption Resource Authority) cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर जाऊन cara पोर्टलवर नोंदणी करून बालक दत्तक घेऊ शकतात. (Foreign adoption of Indian children)

    पालकत्व ही प्रत्येक विवाहित व्यक्तीसाठी महत्वाची बाब असते. परंतु निसर्गाने ती संधी काढून घेतल्याने काही जोडप्यांचे पालक बनण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. यावर आता शासनाने सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षला तसेच चंद्रपूर येथील किलबिल दत्तक संस्थेला भेट द्यायची आहे. अर्थात शासनाने पालकत्व मिळणे करीता तीन प्रकारे पालक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 1) अनाथ बालक दत्तक घेणे 2) नात्यातील बालक (रक्तातील नाती) दत्तक 3) प्रतिपालकत्व दत्तक घेणे. दत्तक प्रक्रियेविषयी अधिक माहिती घेण्याकरीता चाईल्ड हेल्पलाईनच्या 1098 क्रमांकावर फोनद्वारे माहिती मिळू शकते, असे महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

  • Tadoba Zero Waste Initiative । “ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गावांचा स्वच्छतेकडे प्रवास”

    Tadoba Zero Waste Initiative

    Tadoba Zero Waste Initiative : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील सर्व गावांमध्ये कचरा वर्गीकरण, कचरा विलगीकरण तसेच जबाबदारीने कचरा निर्मूलन इत्यादी मार्गाचा अवलंब करून गाव पातळीवरील घनकच-याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने ‘झिरो वेस्ट ताडोबा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिमेसाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे थेट भद्रावती तालुक्यातील आष्टा गावात सकाळीच दाखल झाले. यावेळी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी उपस्थित होते.

    स्वच्छता मोहिमेदरम्यान जिल्हाधिका-यांनी गावातील नागरिक व शाळकरी मुलांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले. तसेच शेतक-यांना ॲग्रीस्टॅक योजनेची माहिती दिली. सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करून घ्यावे. संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी, सीएससी सेंटर, महाऑनलाईन (सेतू) केंद्र या माध्यमातून मोफत फार्मर आयडी तयार करून मिळेल, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिका-यांनी गाव तिथे स्मशानभूमी, अंगणवाडी व गावातील इतर सर्व समस्या जाणून घेतल्या. (Tadoba Buffer Zone Waste Management)

    चंद्रपूर शहरासाठी स्वतंत्र जलस्रोत निर्माण करा – खासदार प्रतिभा धानोरकर

    दर मंगळवारी कोअर विभागातील पर्यटन बंद असल्याने सर्व जिप्सी वाहन चालक, मार्गदर्शक इत्यादी लोकांना समाविष्ट करून तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून हे अभियान राबविण्यात येते. प्रत्येक आठवड्याला वनविभागाद्वारे एका नवीन गावी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. आष्टा हे गाव या उपक्रमात सहभागी होणारे 13 वे गाव ठरले. ताडोबा प्रशासनाव्दारे ही स्वच्छता मोहीम आखण्यात आली होती. तहसीलदार, गटविकास अधिकारी, वन कर्मचारी तसेच गावकरी अशा जवळपास 100 लोकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विलगीकरण केलेला 96.6 किलो प्लास्टिकचा कचरा गोळा करून प्रक्रियेकरिता देवाडा येथील विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आला. (Tadoba Tiger Reserve Cleanliness Drive)

    दर मंगळवारी राबवण्यात येणा-या या उपक्रमाद्वारे आजपर्यंत तब्बल 75 हजार किलो पेक्षा जास्त वाळला कचरा प्रक्रियेसाठी पाठवण्यात आलेला आहे. तर एकट्या मोहर्ली गावात ओल्या कचऱ्यापासून 30 हजार किलो पेक्षा जास्त कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून अनेक गावकरी, महिला बचत गट, विविध समाजसेवी संस्था तसेच इतर समाज घटक स्वयंस्फूर्तीने वनविभागाने सुरू केलेल्या या उपक्रमात सहभागी होत आहेत, अशी माहिती उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी यांनी दिली.