breaking Tiger Attack : चंद्रपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून शनिवारी १३ डिसेंबर रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी शेतात काम करणारी महिला व गुराख्याची वाघाने शिकार केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकूण ४४ नागरिक ठार झाले असून यामध्ये वाघाच्या हल्ल्यात ४०, बिबटच्या हल्ल्यात २ आणि अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. (हे हि वाचा – अंगणात काम करणाऱ्या महिलेवर रानडुकराचा हल्ला)
शेतात काम करताना झाला हल्ला
सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावात राहणाऱ्या ४९ वर्षीय अरुणा उर्फ छाया अरुण राऊत हि महिला शेतात कामाला गेली होती, सायंकाळ झाल्यावर अरुणा घरी परतली नाही, महिलेचे पती अरुण घरी आले असता त्यांनी पत्नीची गावात इतरत्र चौकशी केली मात्र त्याबाबत काही माहिती मिळाली नाही. त्यानंतर गावातील नागरिकांना एकत्र करीत शेतात गेले असता त्याठिकाणी सुद्धा अरुणा मिळाली नाही. लगतच्या जंगल परिसरात गावकर्यांनी शोधाशोध केली असता काही अंतरावरील नाल्याजवळ अरुणा चा मृतदेह आढळून आला.
मृतक अरुणाच्या गळ्याला व दोन्ही पायांना आणि पाठीला गंभीर जखमा होत्या. तसेच त्यांचे दोन्ही हात पूर्णतः तुटलेले होते. यावरून वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याची खात्री झाली. या घटनेची माहिती वनविभाग, पोलिसांना देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. breaking Tiger Attack
दुसऱ्या घटनेत १३ डिसेंबर ला मूल तालुक्यातील वन संरक्षित क्षेत्रात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले. हि घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. राख्याचे नाव पीतांबर गुलाबराव सोयाम,वय 36,रा.बेलघाटा असे आहे. पीतांबर हा नेहमी प्रमाणे शनिवारी गावातील गुरे चराईसाठी जंगलाच्या दिशेने गेलेेला होता.संरक्षित वन क्षेत्रात कम्पार्टमंेट नंबर 1765 मध्ये गुर चरत असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने पीतांबर वर हल्ला करून त्यास जागीच ठार केले.जंगलात फरफटत नेल्याने त्याचा मृतदेह इतरांच्या निदर्शनास आला नाही.मात्र, सांयकाळी गावात गुरे परत आली.पीतांबर न दिसल्याने कुटुंबीयाना शंका आली.याची माहिती सावली वनविभागाला देण्यात आली.रविवारी सकाळी वनविभागाच्या चमूंनी शोधाशोध घेतली असता जंगलालगतच्या शेतात पीतांबरचा मृतदेह आढळून आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून ग्रामीण भागातील जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात कामावर जायचं कि नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.
Chandrapur Wild boarAttack : चंद्रपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून आतापर्यंत ४२ नागरिकांचा या संघर्षात बळी गेला आहे. १४ डिसेंबर रोजी चंद्रपूर शहरातील बाबुपेठ आंबेडकर नगर भागात अंगणात काम करणाऱ्या महिलेवर रान डुकराने हल्ला करीत जखमी केले. (हे हि वाचा – नायलॉन मांजा विक्रेते चंद्रपूर पोलिसांच्या रडारवर)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग १७ मधील दुर्गा नगर मध्ये सकाळी ६ वाजता भारती विश्वनाथ शेंडे हि महिला अंगणात काम करीत होती, त्यावेळी रान डुक्कराने भारती शेंडे वर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे भारती शेंडे यांनी आरडाओरडा केल्याने शेजारी नागरिक जमा झाले व रानडुकरांना तिथून हुसकावून लावले.
विशेष म्हणजे या भागात काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले होते, याची माहिती वनविभागाला सुद्धा दिली मात्र वनविभागाने यावर काही पाऊल न उचलल्याने आज हि घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आप युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी दुर्गा नगर भागात धाव घेतली. Chandrapur Wild boarAttack
वनविभागाला या हल्ल्याची माहिती देत, जखमी भारती शेंडे या महिलेला तात्काळ उपचाराकरिता रुग्णालयात पाठविण्यात आले. राजू कुडे यांनी यावेळी वनविभागावर ताशेरे ओढत, या घटनेला जबाबदार वनविभाग असून त्यांनी तात्काळ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ जंगल परिसरात तारांची सुरक्षा जाळी लावावी. यावेळी राजू कुडे सह वाहतूक अध्यक्ष जय देवगडे उपस्थित होते.
tiger attack fatalities : चंद्रपूर १० डिसेंबर २०२५ (News३४) : चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कवडशी देश गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शंकरपूर-कवडशी रस्त्यालगत शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी (दि. ९) उघडकीस आले. शेषराव नथु झाडे (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरातील वाघीण निघाली सह्याद्रीला)
🔍 शोधानंतर लागला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, शेषराव झाडे हे सोमवारी (दि. ८) सायंकाळी शंकरपूर येथे बाजारहाट करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यानंतर ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. त्यांचा संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी मंगळवारी सकाळी शोध घेण्यास सुरुवात केली. दिवसभर शोध घेऊनही ते न सापडल्याने, मंगळवारी सायंकाळी गावकऱ्यांनी शेतशिवारात संयुक्त शोध मोहीम सुरू केली.
शोध मोहिमेदरम्यान, शंकरपूर आणि कवडशीला जोडणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एमएसईबी (महावितरण) कार्यालयाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावरील जखमा आणि परिसरातील परिस्थितीवरून त्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. tiger attack fatalities
📈 मानव-वन्यजीव संघर्षाचा वाढता धोका
शेषराव झाडे यांच्या मृत्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्षातील बळींचा आकडा पुन्हा वाढला आहे. चंद्रपूर जिल्हा हा मोठ्या प्रमाणात वनसंपदा आणि वन्यजीव (विशेषतः वाघ) असलेली संवेदनशील जागा आहे.
आजवर जिल्ह्यात झालेल्या या संघर्षामध्ये एकूण ४२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सर्वाधिक बळी वाघाच्या हल्ल्यात झाले आहेत, ज्यांची संख्या ३८ आहे. याव्यतिरिक्त, बिबट्याच्या हल्ल्यात २ तर अस्वल आणि हत्ती यांच्या हल्ल्यात प्रत्येकी १ अशा एकूण ४२ नागरिकांचा बळी गेला आहे. वन्यजीव लोकवस्तीत येत असल्याने आणि शेतकरी व मजूर शेतीच्या कामासाठी जंगलात जात असल्याने हा संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. वन विभागाने या वाढत्या धोक्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Pratibha Dhanorkar on human-wildlife conflict : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून, गेल्या सात महिन्यांत २५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १०८ लोक जखमी झाले आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दिलेल्या उत्तरातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध उपाययोजना केल्याचा दावा केला आहे. यात मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एआय (AI) युक्त कॅमेरे बसवणे, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील गावांमध्ये तातडीच्या मदतीसाठी प्राथमिक प्रतिसाद गट (Quick Response Teams) तयार करणे, तसेच जंगली जनावरांच्या हल्ल्यातील पीडितांना वेळेवर आर्थिक सहाय्य देणे यांचा समावेश आहे. मात्र, या उपाययोजना सुरू असतानाही मृतांचा आणि जखमींचा वाढता आकडा पाहता, या उपाययोजना किती प्रभावी ठरत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केवळ कागदोपत्री उपाययोजनांची माहिती
या गंभीर समस्येवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनीही ठोस आणि परिणामकारक पाऊले उचलणे अपेक्षित असताना, केवळ कागदोपत्री उपाययोजनांची माहिती देऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा सूर उमटत आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत, मानवी जीवनासाठी धोकादायक ठरलेल्या वन्य प्राण्यांच्या शिकारीची परवानगी देण्याचा अधिकार राज्याच्या मुख्य वन्यजीव रक्षकांना असला, तरी या अधिकाराचा वापर करून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी तातडीने कठोर निर्णय घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे.
केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा उपयोग सौर कुंपणे आणि भौतिक अडथळे उभारण्यासाठी होत असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष परिस्थितीत हे अडथळे वन्यप्राण्यांना रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
two elephants kill 60 year old in Sindewahi : चंद्रपूर / सिंदेवाही – चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सैरावैरा फिरणाऱ्या दोन हत्तींनी अखेर एका वृद्धाचा बळी घेतला आहे. सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर गावालगत रविवारी (१५ जून) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही थरारक घटना घडली. मारोती कवडू मसराम (वय ६०, रा. जाटलापूर) असे मृतकाचे नाव असून, पॅरालिसिसमुळे मसराम यांना पळता न आल्यामुळे हत्तींनी त्यांच्यावर हल्ला केला.
एकाने त्यांना पायाने चिरडले, तर दुसऱ्याने सोंडेने उचलून जमिनीवर आदळले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज रविवारी जाटलापूर गावातील काही शेतकरी धान पेरणीसाठी शेताकडे जात असताना गावालगतच्या जंगलातून अचानक हे दोन्ही हत्ती बाहेर आले. त्यांनी शेतकऱ्यांचा पाठलाग करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी पळून गेले आणि त्यांचा जीव वाचला. याच दरम्यान मारोती मसराम हे शौचासाठी घराबाहेर पडले होते. अपंगत्वामुळे ते पळू शकले नाहीत. हत्तींनी त्यांच्याकडे धाव घेत एकाने चिरडले, तर दुसऱ्याने सोंडेत उचलून आदळले. ही दुर्दैवी घटना पाहून शेतकरी हादरले. wild elephant attack on disabled man Maharashtra
हत्तीचा शोध सुरु
घटनेनंतर काही शेतकऱ्यांनी गावात धाव घेत ही माहिती दिली. गावकरी घटनास्थळी पोहोचले. पोलिस पाटलांनी तत्काळ सिंदेवाही पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक राठोड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर वनविभागाचे अधिकारीही दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सिंदेवाही येथे पाठवण्यात आला. मसराम यांच्या पश्चात पत्नी आणि पाच मुलांचा परिवार आहे. घटनेनंतर वन विभागाने दोन्ही हत्तींचा शोध घेणे सुरू केले आहे. हत्ती घटनास्थळावरून इतरत्र पळाले आहेत. वन विभागाचे अधिकारी त्यांच्या मागावर आहेत. वृत्तलिहीपर्यंत हत्तींच्या शोध लागलेला नव्हता. elephant herd enters farmland Chandrapur rural
सदर दोन हत्ती गडचिरोली जिल्ह्यातून उमा नदी पार करत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात आले आहेत. तेव्हापासून सिंदेवाही व सावली तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांची सतत हालचाल सुरू आहे. काही गावांत ते शिरले असून,नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे जाटलापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थांत तीव्र संताप आणि भीती आहे. गावकऱ्यांनी वनविभागाकडून तत्काळ हत्ती नियंत्रणात घेण्याची आणि मानवहानी थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे..
tiger attack in forest areas : मूल (चंद्रपूर) : समाजसेवक बाबा आमटे यांच्या सोमनाथ प्रकल्पात गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्यात असलेले जयदेव पोतलू करनेकर (६०) रा. विसोरा ता. वडसा जिल्हा गडचिरोली यांना वाघाने ठार केले. ते सोमनाथ प्रकल्पात नेहमीप्रमाणे आंबे तोडण्यासाठी गेले होते. अशातच वाघाने हल्ला चढविल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. सततच्या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जयदेव हे आंबे तोडण्यासाठी सोमनाथ प्रकल्पात रविवारी दुपारी ३ वाजता गेले होते. दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवून ठार केले. घरच्या मंडळींनी जयदेव परत आला नसल्याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने शोध घेतला मात्र उपयोग झाला नाही. human wildlife conflict in Maharashtra
जयदेवच्या मृतदेहाचे तुकडे आढळले
सोमवारी सकाळी वाघाने जयदेवला ओढत वन विभाग कक्ष क्रमांक ७९२ येथे नेले होते. सोमवारी सकाळी ८:३० वाजता मूल वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, क्षेत्र सहाय्यक आर.सी. पेदापल्लीवार यांनी कर्मचाऱ्यांना घेवून जंगलात शोध मोहीम सुरू राबविली असता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कक्ष क्रमांक ७९२ जयदेवच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले.
रात्रभरात वाघाने मृतदेहाचा बराच भाग खाल्ल्याचे दिसून आले. जयदेव हा आपल्या पत्नीसह सोमनाथ प्रकल्पात राहत होता. वनविभागाने मृतकाच्या नातेवाईकाला २० हजार रुपये सानुग्रह म्हणून मदत दिली आहे. वनविभागाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. चालू वर्षात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यन्त एकूण २४ नागरिकांच्या बळी गेला आहे.
Sudhir Mungantiwar on tiger attacks : चंद्रपूर – जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दीड महिन्यात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरत चालला आहे. या वाढत्या हल्ल्यांमुळे नाहक जीवितहानी होत असल्याने ही बैठक आयोजित करण्यात आली. ग्रामस्थ तसेच जनावरांच्या जीवित नुकसानीची गंभीरता लक्षात घेऊन, वनविभागाने वाघांच्या होणाऱ्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले. Sudhir Mungantiwar on tiger attacks
मुल तालुक्यातील वाघांच्या हल्ल्यांत ठार झालेल्या नागरिकांसंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत रामबाग विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, वनसंरक्षक तथा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला, उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, मूलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार मृदुला मोरे, विभागीय वनअधिकारी (प्रोटेक्शन) निकिता चौरे, सहाय्यक वनसंरक्षक (बफर) संकेत वाठोरे, आदेश शेडंगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकार, प्रियंका वेलमे आदींची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना बांबू उपलब्ध करून द्या
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भगवानपूर गावातील वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तातडीने कुंपण मंजूर करून घेणे. मुल तालुक्यातील शेतकऱ्यांना जंगलामध्ये पडून असणारे बांबू कुंपणासाठी उपलब्ध करून द्यावेत.या साठी वनविभागाने गावात जाऊन शेतकऱ्यांची नोंदणी करावी व शेतकऱ्यांना बांबूचा पुरवठा करावा. एफडीसीएमसह वनविभागाने कुंपणासाठी लागणारे अंदाजपत्रक तयार करावे. भगवानपूर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 20 मीटर अंतरावरील झुडपे कापण्यात यावीत. bamboo fencing to stop wildlife
वाघाचे होणारे हल्ले टाळण्यासाठी सरपनासाठी कोणीही जंगलात जाऊ नये. गावकऱ्यांना सरपन आवश्यक असल्यास त्यांनी वनविभागाशी संपर्क साधावा. यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येऊन त्यांना वनविभागाकडून सरपन उपलब्ध करून देण्यात यावे.
२२ वाघ जेरबंद
गत दीड महिन्यात वाघाच्या हल्ल्यांमध्ये नऊ ग्रामस्थांचा मृत्यू झाला असून, याबाबत वनविभागाने वाघांची अचूक माहिती घ्यावी. मागील दोन वर्षांत 22 वाघांना पकडण्यात आले आहे. जिल्ह्यातील वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाचा विचार करता, अशा घटना टाळण्यासाठी आणि प्रसंगी तातडीने प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये प्राथमिक बचाव दल (PRT) तैनात करण्यात आले असून, त्यात एकूण 917 सदस्य कार्यरत आहेत. increasing tiger attacks in villages
शेतकऱ्यांसाठी ई-पिक पाहणीद्वारे जशी पिकांची माहिती संगणकीकृत प्रणालीतून गोळा केली जाते, तशीच एक सुसंगत प्रणाली वनविभागासाठीही तयार करता येईल. सोलर कुंपणाच्या बाबतीत तांत्रिक माहिती घेऊन स्वतंत्र माहितीपत्रक तयार करावे.
दुर्गापूर परिसरात बिबट्याचा वावर अधिक असल्याने दुर्गापुर, वनअकॅडमी पासून ते सिनाळा गावापर्यंत ॲडव्हान्स सोलर फेंसिंग करण्यासाठी कॅम्पाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. निधीस मंजूरी मिळालेली असली तरी अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. याबाबत पाठपुरावा करावा. ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून वाईल्डलाईफ क्लिअरन्स घेण्याची आवश्यकता असल्याचेही आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले.
पिपरी दीक्षित येथील स्मशानभूमीची जागा महसूल विभागाच्या अखत्यारीतील असून त्याला लागूनच वनविभागाची जागा आहे; मात्र, वनविभागाकडून चुकीची मोजणी करण्यात आली असून चुकीचा नकाशा तयार करण्यात आला आहे. याबाबत मुल तहसीलदारांनी विशेष लक्ष देवून पाठपुरावा करावा.
वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी समन्वय साधून मूल बायपासचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावावा.
नागरिक वनविभागाच्या नियमांचे पालन करीत नाही
तेंदूपत्ता हंगामात 50 ते 60 हजार लोक जंगलात जातात, मात्र ते वनविभागाच्या नियमांचे पालन करत नाहीत तसेच ठरावीक समूहांमध्ये राहत नाहीत, त्यामुळे वनविभागाला जंगलावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. परिणामी, वाघांचे हल्ले वाढून मनुष्यहानी होते. अशी माहिती मुख्य वनसंरक्षक डाॅ.जितेंद्र रामगावकर यांनी दिली.
❓ प्रश्न 1: चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांमध्ये वाढ का झाली आहे?
शेतीसाठी जंगलालगत जाणाऱ्या नागरिकांची वाढती वर्दळ, सरपणासाठी जंगलात जाणे, तसेच तेंदूपत्ता हंगामात हजारो लोकांचा जंगलात वावर वाढल्याने वाघ व माणसांमध्ये थेट संपर्क होतो. परिणामी वाघांच्या हल्ल्यांत वाढ झाली आहे.
❓ प्रश्न 2: वाघांच्या हल्ल्यांपासून गावकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत?
राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुंपण (बांबू व सोलर) उभारणे, सरपणासाठी स्वतंत्र यंत्रणा, आणि प्राथमिक बचाव पथक (PRT) तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
❓ प्रश्न 4: वाघ किंवा इतर वन्य प्राणी गावाजवळ दिसल्यास काय करावे?
गावकऱ्यांनी वनविभागाशी तात्काळ संपर्क साधावा. वन्य प्राण्यांपासून दूर राहावे, आवाज करून त्यांना चिडवू नये. अशा प्राण्यांच्या हालचालीबाबत वनविभागाला त्वरित माहिती द्यावी.
Frequency of tiger attacks in Chandrapur region : चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला असून २७ मे रोजी वाघाने मूल तालुक्यात दोघांना ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मागील १७ दिवसात वाघाने ११ नागरिकांची शिकार केली असून ५ महिन्यात २३ नागरिकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
पहिल्या घटनेत मूल तालुक्यातील कांतापेठ गावातील ५२ वर्षीय सुरेश मुंगरु सोपानकार हा मंगळवारी चिरोली मार्गावरील जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेला होता, दुपारच्या सुमारास बकऱ्याचा कळप गावात परतला मात्र सुरेश हा न परतल्याने गावातील नागरिकांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. गावकरी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चिरोली मार्गावरील जंगलात शोधमोहीम राबवली असता सुरेश चा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला, सुरेशचा पूर्ण पाय वाघाने खाऊन टाकला होता. Wildlife conservation and human conflict in Chandrapur
पतीसमोर पत्नीला नेले फरफटत
दुसऱ्या घटनेत मूल तालुक्यातील भगवानपूर मधील जंगल परिसरात बांबूच्या बारीक काड्या, सरपण आणि कुड्याची फुले आणण्याकरिता चिरोली गावातील ४५ वर्षीयसंजीवनी मैकलवार हि महिला पती संजय मैकलवार, नातेवाईक कवडू बोमनवार, शांताबाई कवडू बोमनवार हे चौघे वनविकास महामंडळाच्या कंपार्टमेंट क्रमांक ५२४ मध्ये सकाळी ९ वाजताच्या सुमारास गेले होते. अचानक झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने संजीवनी वर हल्ला केला, संजीवनी ला पती व नातेवाइकांसमोर वाघाने फरफटत नेले, पती व त्यांच्या नातेवाईकांनी आरडाओरडा करीत वाघाला हुसकावून लावले मात्र तोपर्यंत संजीवनीचा मृत्यू झाला होता. Tiger attacks in villages near Chandrapur forests
या घटनेनंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, यावेळी वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.बोथे,वनपाल शिंदे, कर्मचारी गव्हारे,अशोक सिंघण, टोलेवाही येथिल पोलिस पाटिल संगिता चल्लावार,चिरोली येथील पोलिस पाटिल गोकूळ मोहूर्ले,चिरोली येथील वनरक्षक सविता गेडाम,प्राणीमित्र उमेश झिरे आणि मूल येथील प्रभारी पोलिस निरिक्षक सुबोध वंजारी घटनास्थळी दाखल झाले.
हल्ल्याचे सत्र
मे महिन्यात तेंदूपत्ता हंगाम सुरु झाल्यापासून वाघाने आपला आतंक सुरु केला आहे, १० मे पासून वाघाने सतत हल्ले करीत आतापर्यंत ११ नागरिकांची शिकार केली आहे, वाघाचे हल्ले नियंत्रणात यावे यासाठी वनविभागाने ठोस पाऊले उचलली नसल्याने नागरिकांचे बळी जात आहे. मागील ५ महिन्यात २३ नागरिक वाघाच्या हल्ल्यात बळी पडले आहे.
tendu leaves season danger : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरात ८ नागरिकांची वाघाने शिकार केल्याची घटना घडली असून आतापर्यंत मानव वन्यजीव संघर्षात २१ नागरिकांचा बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक जंगलाकडे कूच करू लागले मात्र वाघाचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला आहे. मे महिन्यात ८ नागरिकांची वाघाने शिकार केल्याने ग्रामीण भागात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. tiger attack in chandrapur today
१८ मे रोजी जिल्ह्यातील नागभीड व मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पहिल्या घटनेत नागभीड तालुक्यातील ६३ वर्षीय मारुती नक्तू शेंडे हे पत्नीसोबत तळोधी रेंजमधील आलेवाही बीटमधील वनक्षेत्रात कंम्पार्टमेन्ट क्रमांक ६५७ मध्ये तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मारुतीवर हल्ला चढविला अचानक झालेल्या या हल्ल्यात मारुती यांच्या पत्नीने गाव गाठत नागरिकांना माहिती दिली, नागरिक घटनास्थळी दाखल झाले असता मारुतीच्या डोक्यावर वाघाने गंभीर घाव केले होते. गावकर्यांनी तात्काळ मारुतीला सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान मारुतीचा मृत्यू झाला. tiger attack in chandrapur today
दुसऱ्या घटनेत मूल तालुक्यातील भांदुर्णी गावातील ७० वर्षीय ऋषी झुंगाजी पेंदोर हे जंगलात बकऱ्यासाठी चारा आणायला शनिवारी १७ मे रोजी जंगलात गेले होते, रात्र झाल्यावर ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली, १८ मे रोजी वनविभागाने जंगलात पेंदोर यांचा शोध घेतला असता वनविभागाच्या कंपार्टमेंट क्रमांक १००८ मध्ये ऋषी पेंदोर यांच्या शरीराचे अवयव आढळून आले, संपूर्ण शरीर वाघाने खाल्ल्याने डोक्याचा भाग व हात शिल्लक होता. ऋषी हा मानसिक रोगी असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी १२ मे रोजी भांदुर्णी मध्ये भूमिका दीपक भेंडारे या महिलेवर वाघाने हल्ला करीत ठार केले होते. tiger conflict in rural india
५ दिवसात ६ महिलांचा मृत्यू
१० मे रोजी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा माल मध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय कांताजी बुधाजी चौधरी, ३० वर्षीय शुभांगी मनोज चौधरी व ५० वर्षीय रेखा शालिक शेंडे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. ११ मे रोजी मूल तालुक्यातील नागाळा गावात ६५ वर्षीय विमल बुधाजी शेंडे, १२ मे रोजी मूल तालुक्यातील भांदुर्णी गावातील भूमेश्वरी दीपक भेंडारे, १४ मे रोजी चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रात ५४ वर्षीय कचराबाई अरुण भरडे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सदर सर्व महिला तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. villager killed by tiger in forest
वाघ तुमच्यामुळे वाढले तर बंदोबस्त करा – आमदार विजय वडेट्टीवार
चंद्रपूर जिल्ह्यात ८ दिवसात ८ नागरिकांना वाघाने हल्ला करीत ठार केले, मात्र वनविभाग यावर अजूनही उपाययोजना करताना दिसत नाही, जिल्ह्याचे पालकमंत्री व वनमंत्री यांनी यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना त्यांनी वारंवार वाघांची संख्या वाढल्याने आमच्यामुळे वाघ वाढले असा गवगवा केला मात्र आज वाघामुळे नागरिक दहशतीमध्ये आहे तर त्यांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, वाघांना अधिवास कमी पडत आहे, ताडोबा बफर व कोर झोन मध्ये वाघांची संख्या वाढल्याने उर्वरित वाघांचा वनविभागाने बंदोबस्त करायला हवा. जर वनविभागाने वाघांचा बंदोबस्त केला नाहीतर आता वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांचे मृतदेह वनविभागाच्या कार्यालयापुढे ठेवणार, जोपर्यंत वाघांचा बंदोबस्त होणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह उचलणार नाही हा आमचा वनविभागाला इशारा आहे. tiger attack in chandrapur today
वनविभागाने केले आवाहन
जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. यंदा जिल्ह्यात एकूण 75 तेंदूपत्ता घटकांपैकी 70 घटकांमध्ये संकलनाचे कार्य सुरू आहे. या कार्यातून दरवर्षी सुमारे 35 हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार मिळतो.
जिल्ह्यातील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे तेंदूपत्ता संकलन दरम्यान खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. वनविभागामार्फत यासाठी विशेष जनजागृती मोहिमा, विशेष पथकांची नियुक्ती व विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
दूपत्ता हंगाम – 2025 दरम्यान मे महिन्यात वाघाच्या हल्ल्यांमध्ये ८ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे वनविभागाकडून तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या ग्रामस्थांना खालील सुरक्षा उपाय काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. tiger attack in chandrapur today
1. वाघाच्या अधिवास असलेल्या वनक्षेत्रात प्रवेश टाळावा.
2. संकलनासाठी केवळ नजीकच्या गावातील व्यक्तींनाच परवानगी द्यावी.
3. सकाळी 8 वाजता पूर्वी जंगलात प्रवेश करू नये व संध्याकाळी 5 वाजता पूर्वीच जंगलातून बाहेर पडावे.
4. एकट्याने जंगलात जाऊ नये. समूहानेच वनविभागाच्या देखरेखीखाली संकलन करावे.
5. प्राथमिक बचाव दल, कंत्राटदारांचे अग्निशमन कर्मचारी व वनक्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी संकलन करणाऱ्यांवर लक्ष ठेवावे व वाघाचा वावर आढळल्यास तत्काळ सतर्क करावे.
6. संकलन दरम्यान पुरवण्यात आलेला मानवी मुखवटा डोक्याच्या मागील भागात घालावा.
7. वाघाची चाहूल लागल्यास त्वरित मागे फिरावे व वनविभागाला माहिती द्यावी.
वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या सहकाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहन चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे..
tigress tranquilized after deadly attack : चंद्रपूर – देशात प्रथमच एकावेळी ३ महिलांना वाघाने ठार केल्याची घटना १० मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात घडली. मेंढामाल मध्ये राहणाऱ्या ६६ वर्षीय कांताबाई बुधाजी चौधरी, ४९ वर्षीय सारिका शालिक शेंडे व ३० वर्षीय शुभांगी मनोज चौधरी या महिला सिंदेवाही उपक्षेत्रातील नियतक्षेत्र डोंगरगाव मध्ये तेंदूपत्ता गोळा करायला गेल्या होत्या. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला या हल्ल्यात ३ महिला ठार झाल्या. 3 women killed by tiger in forest
एकावेळी ३ महिलांची वाघाने शिकार केली हे प्रकरण प्रथमच घडले, तेंदूचा हंगाम असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात महिला व पुरुष तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जातात आणि त्याठिकाणी वन्यप्राण्यांचे हल्ले होतात. हि घटना घडल्यावर घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप व लाईव्ह कॅमेरे लावण्यात आले होते. tiger human conflict in chandrapur
६२ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा
त्या घटनेला जबाबदार असणाऱ्या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाने कम्बर कसली, त्या वाघिणीला पकडण्यासाठी ६२ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा कार्यरत होता,सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या नेतृत्वात डोंगरगाव नियतक्षेत्रात कक्ष क्रमांक १३६० मध्ये पोलीस दलाचे शुटर अजय मराठे यांनी अचूक निशाणा साधत वाघिणीला डार्ट मारीत बेशुद्ध करून जेरबंद केले.
सध्या वाघिणीच्या बछड्याचा शोध वनविभाग करीत आहे. सदर वाघिणीला पकडण्यासाठी ब्रह्मपुरी वनविभागाचे राकेश सेपट, एमबी चोपडे, डॉ , रविकांत खोब्रागडे, अजय मराठे, राकेश आहुजा, विशाल सालकर, एनटी गडपायले, एसबी उसेंडी, पीएस मानकर, केडी मसराम, वाय एम चौके, डीआर पेंदोर, ओव्ही चहांदे यांनी अथक परिश्रम केले.