Tag: मानव वन्यजीव संघर्ष

  • wildlife conflict । चंद्रपूर पुन्हा हादरलं! तीन दिवसांत वाघाचे ५ बळी

    wildlife conflict

    wildlife conflict : मूल – लग्न होऊन मुलगी सासरी गेली. त्यानंतर काही वर्षांनी ती वडिलांकडे घरी आली. वडिलांच्या घरी संसार सुरू असताना आज सोमवारी ( 12 मे) आई वडील काका काकू व पतीसह तेंदूपत्ता तोडण्यासाठी भादुर्णाच्या जंगलात गेली. तेंदुपत्ता तोडत असतानाच पतीच्या समोरच वाघाने अचानक विवाहितेवर हल्ला चढविला आणि ती जागीच ठार झाली. ही घटना आज सोमवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मूल तालुक्यातील भादुर्णा बिटातील 793 मध्ये घडली. भूमिका दिपक भेंडारे असे विवाहतेचे नाव आहे. घटनेनंतर मृतदेह उचलण्यास पुस्तकाच्या कुटुंबीयांनी नकार दिल्याने त्यांना पुढे स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मृतक महिलेच्या कुटुंबीयांची व नागरिकांनी समजून काढल्याने मृतदेह उचलण्यात आला. tiger kills woman in front of husband in chandrapur

    आमदार जोरगेवार उतरले रामबाग मैदानाच्या खड्ड्यात


    मूल तालुक्यातील भादुर्णा येथील भाऊजी गावतुरे यांची मुलगी भूमिका हिचा विवाह केवाडा (पेठ) येथील दिपक भेंडारे सोबत झाला होता. काही वर्ष सासरी राहीली. त्यानंतर ती वडीलाकडे भादुर्णा येथे राहायला आली होती. येथेच स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पती-पत्नी मिळेल ते काम करीत होते. latest tiger attack in buffer zone india

    पतीसमोर वाघाने भूमिका ला केले ठार


    आज सोमवारी सकाळी भादुर्णा जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी आई, वडील, काका, काकू आणि पत्तीसह बफर क्षेत्रातील भादुर्णा बिटातील 793 मध्ये विवाहिता सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास गेली होती. जंगलात तेंदुपत्ता तोडत असतानाच त्याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने विवाहितेवर अचानक हल्ला केला. हल्ल्यात ती जागीच ठार झाली. वाघाने हल्ला केला तेव्हा काही अंतरावर असलेल्या आई, वडील आणि पतीने आरडाओरड करून तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. वाघ पळन गेला,परंतु वाघाच्या हल्ल्यात पती समोरच विवाहितेचा जीव गेला.

    नागरिकांचा रोष

    सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. गावकरी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी वनविभागाचे आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले. कालच नागाळा येथे एका वृद्ध महिलेचा वाघाने जीव घेतल्याने प्रचंड दहशत पसरलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. जोपर्यंत वाघाचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही आणि मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. forest department fails to stop tiger attacks

    लगेच वरिष्ठांना पाचारण पाचारण करण्यात आले. मृतक कुटुंबियांच्या आणि नागरिकांची समजूत घातली. बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पावले उचलले जातील, अशी हमी दिली. तसेच पुस्तकाच्या कुटुंबीयांना तातडीने रोग पन्नास हजाराची आर्थिक मदत केली. एक तासापर्यंत घटनास्थळी तणाव होण्यासाठी निर्माण झाली होती. मात्र वरिष्ठांनी नागरिकांचे समजून घेतल्याने तनाव पूर्ण वातावरण निवळले. त्यानंतर पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर शव उत्तरीय तपासणीकरीता मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

    ३ दिवसात ५ महिलांची शिकार


    काल रविवारी याच मूल तालुक्यात नागाळा येथील एका वृद्ध महिला व शनिवारी मूल तालुक्याला लागून असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल गावातील एकाचवेळी तीन महिलांना वाघाने ठार केल्याची थरारक घटना ही ताजीच आहे. तीन दिवसातील वाघाच्या हल्ल्यातील आजचा पाचवा बळी आहे. मुल आणि सिंदेवाही तालुक्यात दोन दिवसात पाच जणांचा बळी गेल्याने वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिक जोरदार मागणी करीत आहेत, परंतु वन विभाग मात्र बंदोबस्त करण्यास अपयशी ठरत आहे.

  • wildlife danger during tendu leaf season । तेंदुपत्ता गोळा करताना वृद्धेवर वाघाचा हल्ला, दोन दिवसांत चार बळी!

    wildlife danger during tendu leaf season

    wildlife danger during tendu leaf season : तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेलेली वृद्ध महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज रविवारी (११ मे) मूल तालुक्यातील नागाळा गावात घडली. विमल बुद्धाजी शेंडे (वय 65) असे मृत महिलेचे नाव आहे. चालू वर्षातील मानव वन्यजीव संघर्षातील हा १७ वा बळी आहे. Chandrapur tiger attack latest

    आमदाराचा आक्रमकपणा आणि रामबाग वाचलं


    जिल्हाभरात तेंदुपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला पुरुष पहाटेपासून तेंदुपत्ता तोडण्याकरता जंगलात जातात. वर्षात एकदाच येणाऱ्या या हंगामातून गरीब कुटुंबीयांना थोड्याफार आर्थिक मदतीचा पाठबळ मिळतो. tiger attack tendu leaf collectors


    मूल तालुक्यातील नागाळा गावातील विमल बुद्धाजी शेंडे ही महिला आज रविवारी चिचप्पली वनपरिक्षेत्रातील 537 कंपार्टमेंटमध्ये तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेली होती. दबा धरून बसलेल्या वाघाने वृद्ध महिलेवर अचानक हल्लाकेला त्या मध्ये ती ठार झाली. ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. परंतु ती आढळून आली नाही. चिचपल्ली वन विभाग व पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येत कुटुंबीयांनी भेट घेतली. माहिती घेऊन चिचपल्ली वनपरिक्षेत्रात शोधाशोध सुरू केली. Tendu Leaf Season Turns Deadly

    कंपार्टमेंट नंबर 537 मध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आलेला आहे. त्यामुळे या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वन व पोलीस विभागाने मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठविले असून मृतक महिलेच्या कुटुंबीयांना पंचवीस हजाराची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

    २ दिवसात ४ महिलांचा मृत्यू


    काल शनिवारी मूल तालुक्याला लागूनच असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल गावातील तीन महिला तेंदू पत्ता तोडण्यासाठी गेल्या असत्या त्यांचेवर वाघाने हल्ला करून एकापाठोपाठ तिघींनाही ठार केले. ही घटना ताजी असतानाच लागून असलेल्या मूल तालुक्यात पुन्हा वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना समोर आल्याने सिंदेवाही व मूल तालुक्यात भीतीमुळे वातावरण पसरलेला आहे. सपकाळ वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी दोन्ही तालुक्यातील नागरिकांनी केली.

  • Chandrapur district shocking incident | चंद्रपूरमध्ये एकाच दिवशी दोन भयंकर घटना

    Chandrapur district shocking incident

    Chandrapur district shocking incident : १० मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली, पहिल्या घटनेत वाघाच्या हल्ल्यात प्रथमच ३ महिलांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत प्रशिक्षणार्थी ३ डॉक्टर तरुणांचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला.

    जिल्ह्यातील पहिलीच घटना, १६ नागरिकांचा बळी

    तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची थरारक घटना आज शनिवारी (१०मे)दुपारी चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यात मेंढा माल या गावी उघडकीस आली आहे. रेखा शेंडे( वय 55), कांता बुद्धाची चौधरी (वय ६०), शुभांगी मनोज चौधरी (वय 31) असे मृतांचे नावे आहेत. तिघीही सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल या गावातील रहिवासी होत्या. मृतांमध्ये सासूचा समावेश आहे. सिंदेवाही तालुक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे तर मेंढा माल या गावात शोककळा निर्माण झाली आहे. Chandrapur tiger attack kills 3 women

    चंद्रपूर जिल्हा लोक अदालतीमध्ये जलद न्याय


    सिंदेवाही तालुक्यात सध्या तेंदुपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू झाला आहे. आज शनिवारी मेंढामाल गावातील रेखा शेंडे( वय 55), कांता बुद्धाची चौधरी (वय ६०), शुभांगी मनोज चौधरी (वय 31) ह्या महिला तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या परंतु दुपार पर्यंत या तीन महिला घरी परत आल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी काळजी करीत त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. आणि वन व पोलीस विभागाला माहिती देण्यात आली. लगेच वन व पोलीस विभागाचे अधिकारी मेंढामाल या गावात दाखल झाले. त्यांनी तत्काळ पत्ता तोडाई सुरू असलेल्या जंगलात शोध मोहीम राबविली. दुपारी तीन वाजताच्या सुमारास डोंगरगाव बीटातील 1355 कंपार्टमेंट मध्ये मृतदेह आढळून आला. विशेष बाब म्हणजे महिलांचे मृतदेह हे १० ते १५ मीटर अंतरावर होते. Chandrapur human-wildlife conflict


    घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदना करता पाठविण्यात आले. या घटनेमुळे शिंदेवाही परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे तसेच मेंढा माल गावात या घटनेची माहिती होताच शोककळा पसरली.
    डोंगरगाव बीटात एक वाघीण बछड्यांसह भ्रमंती करीत असल्याचे काही नागरिकांना आढळून आले आहे. त्यामुळे या तिघींनाही वाघिणीनेच ठार केल्याची चर्चा आहे.

    चारगाव वडगे परिसरात एक महिला जखमी

    सिंदेवाही तालुक्यातील चारगाव बडगे परिसरात वंदना विनायक गजभिये ही महिलाही चंदू पत्ता तोडणसाठी जंगलात गेले होते. आज शनिवारी या महिलेवर वाघाने हल्ला केला यामध्ये ती जखमी झाली. तिला प्राथमिक उपकेंद्रात उपचार करता भरती करण्यात आले आहे. Chandrapur human-wildlife conflict

    २ महिन्यांनी पुन्हा तीच जागा, तिघेजण बुडाले

    व्याहाड खुर्द : चंद्रपूर गडचिरोली सीमेवरील नदीच्या पुलाखाली वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या गडचिरोली येथील रुग्णालयातील आठ पैकी तीन शिकावू डॉक्टर हे बुडाल्याची माहिती प्राप्त झाली असून घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलरवार हे आपल्या चमूसह घटनास्थळी पोहोचले होते मात्र सायंकाळ झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली आहे. Wainganga river drowning 3 trainee doctors Chandrapur

    सदर तीनही युवक हे गडचिरोली येथे MBBS चे प्रथम वर्गात शिक्षण घेत आहे. आज सुट्टी असल्याने हे सर्व जण नदीमध्ये अंघोळीसाठी गेले होते.यावेळी ऐकून 8 जण होते मात्र त्यापैकी 20 वर्षीय गोपाळ गणेश साखरे, राहणार चिखली जिल्हा बुलढाणा, 20 वर्षीय पार्थ बाळासाहेब जाधव राहणार शिर्डी, जिल्हा अहमदनगर,20 वर्षीय स्वप्नील उद्धवसिंग शिरे राहणार छत्रपती संभाजी नगर, हे बुडाले. Wainganga river

    सुट्टीचा दिवस असल्याने 8 शिकावू डॉक्टर तरुण पोहण्यासाठी वैनगंगा नदी पात्रात गेले होते, मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण बुडाले, विशेष बाब म्हणजे 26 फेब्रुवारीला याच ठिकाणी चंद्रपुरातील 3 सख्ख्या बहिणीचा बुडून मृत्यू झाला होता. सदर घटनेबाबत सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुरुलवार म्हणाले कि सदर घटना हि सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान घडली, रात्र झाल्याने शोधमोहिम थांबविण्यात आली आहे सकाळी पुनः शोधमोहीम सुरु करण्यात येईल.

  • Chandrapur tiger attack update । चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा थरार; वर्षातील 13 वा बळी

    Chandrapur tiger attack update

    Chandrapur tiger attack update : चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून, या संघर्षाने काल गुरुवारी (1 मे) पुन्हा एक जीव घेतला. शौचासाठी गेलेल्या एका 30 वर्षीय युवकावर वाघाने अचानक हल्ला करून त्याचा जागीच बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. मृतकाचे नाव दिवाकर बाबुराव जुमनाके असून तो चंद्रपूर तालुक्यातील चक पिंपळखुट येथील रहिवासी होता. man killed by tiger in forest

    इरई नदी खोलीकरणावर खासदार धानोरकर यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न

    🔍 घटनास्थळाची माहिती:

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाकर जुमनाके हे रात्री सुमारे 10 वाजता चक पिंपळखुट गावालगतच्या चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील चंद्रपूर वनविभागाच्या कक्ष क्रमांक 1005 मध्ये शौचासाठी गेले होते. अंधार व वनक्षेत्राच्या सीमेवर वावरत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. वाघाच्या हल्ल्यात दिवाकर यांचा जागीच मृत्यू झाला. tiger kills man near forest

    🛑 प्रशासनाची कारवाई:

    या घटनेची माहिती मिळताच पोलिस व वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व पुढील कारवाईसाठी तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

    🧓 कुटुंबावर दुःखाचा डोंगर:

    या अनपेक्षित घटनेने दिवाकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वनविभागाच्या वतीने तत्काळ मदतीच्या स्वरूपात ३० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थांनि वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

    🐅 वाघाच्या हल्ल्याचा १३ वा बळी:

    ही घटना चालू वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाच्या हल्ल्यातील १३ वा बळी ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात वाघांचा वावर वाढल्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. मागील काही महिन्यांपासून वाघांचे मानववस्तीत व मानवांचे जंगलात घुसण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे वनविभागावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक वाढली आहे.

    🗣️ स्थानिकांची मागणी:

    चक पिंपळखुट व परिसरातील ग्रामस्थांनी या घटनेनंतर वनविभागाकडे संतप्त भावना व्यक्त केल्या असून, या भागात वाघाचा वावर रोखण्यासाठी तत्काळ पिंजरा लावणे, नाईट पेट्रोलिंग वाढवणे आणि लोकजागृती करणे यासारख्या उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.

  • tiger human conflict । वाघाचं तांडव थांबेना, चंद्रपूरमध्ये वाघाचा बारावा बळी

    tiger human conflict

    “Gangsagar Heti Incident: Another Victim of Tiger-Human Conflict”

    tiger human conflict : चंद्रपूर: वाघांच्या हल्यात नागरिकांचा जीव जाण्याच्या घटना काही थांबता थांबेनात. आज सकाळी गावालगतच्या जंगलात मोहफुले वेचायला गेलेला वृध्द वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना आज मंगळवारी (15 एप्रिल) ला पुन्हा सकाळी उघडकीस आली आहे. मारोती सखाराम बोरकर (वय 60) असे मृतकाचे नाव असून तो गंगासागर हेटी येथील रहिवासी होता. ब्रम्हपुरी, नागभीड व सिंदेवाही तालुक्यात आठवडाभरात चौघंचा मृत्यू झाल्याने प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात हा 12 वा बळी आहे. tiger attack Maharashtra

    २ अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराने चिमूर हादरलं, आरोपीना अटक

    मोहफूल वेचायला गेला आणि परतलाच नाही
    सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत तळोधी (बा.) वन परिक्षेत्रातील गंगासागर हेटी येथील मारोती सखाराम बोरकर हा वृध्द अन्य काही व्यक्तींसोबत नेहमीप्रमाणे गावालगतच्या जंगलात सकाळी सहाच्या सुमारास मोहफुले वेचायला गेला. दररोज तो साडेआठ वाजेपर्यंत मोहफुले वेचून घरी परत यायचा. परंतु आज तो घरी परत आला नाही. त्यामुळे घरचे व शेजाऱ्यांनी गावालगतच्या जंगलात शोधाशोध केली असता, लगतच्या पांदनरस्त्यावर त्याची चप्पल व टोपली पडलेली आढळून आली. मोहफुले वेचून त्याचे सोबती जंगलाबाहेर निघाले परंतु सदर इसम निघाला नाही. tiger attack recent

    ➡️ मोहफुलं वेचणं आता फुलांपेक्षा जीवावर उठलंय

    त्यामुळे शंका निर्माण झाली. काही वेळातच त्याच परिसरात सहकाऱ्यांना वाघ आढळून आला. त्यामुळे सदर व्यक्तीचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाल्याचा संशय निर्माण झाला. काही अंतरावर जावून पाहिले असता त्याचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेची माहिती तळोधी (बा.) वन परिक्षेत्राधिकारी व पोलिसांना देण्यात आली. काही वेळातच वनविभागाचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. व शवविच्छेदनाकरीता नागभीड येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला. त्याचे पश्चात पत्नी, मुलगा,सुन व 2 नातवंडे असा परिवार आहे. या घटनेने गंगासागर हेटी परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. Chandrapur tiger news

    वनविभागाने नागरिकांना जंगलात मोहफुले वेचण्याकरीता एकदम सकाळीच व एकट्याने जावू नये आवाहन केले आहे. गंगासागर हेटी परिसरात ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला असून गस्त वाढविण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील आठवडाभरात नागभीड तालुक्याला लागून असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव व चिचखेडा येथील मोहफुले वेचायला गेल्या दोघांना वाघाने ठार केले. सिंदेवाही येथे एक तर आज नागभीड तालुक्यातील तळोधी बा.परिसरात पुन्हा एकाचा बळी घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. मुल, सिंदेवाही, ब्रम्हपुरी व नागभीड तालुक्यातील व्यक्तींचे वाघ जीव घेत असल्याने वनविभागाविषयी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

  • tiger attack in Brahmapuri forest । मोहफुलात मृत्यूची छाया! वाघाच्या हल्ल्यात ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

    tiger attack in Brahmapuri forest

    What started as a peaceful morning in the forest turned into a deadly encounter. ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचखेडा गावातील ६० वर्षीय विनायक जांभुळे यांच्यावर आज रविवारी मोहफुले वेचत असताना वाघाने sudden and fatal attack केला. कालच नांदगाव-जानी भागात बिबट्याने तीन शेतकऱ्यांवर हल्ला केला होता.

    tiger attack in Brahmapuri forest : मोहफूले वेचायला गेलेल्या एका साठ वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी (13 एप्रिल) ला ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचखेडा येथे उघडली झाली आहे. विनायक विठोबा जांभुळे मृतकाचे नाव आहे. काल शनिवारी याच तालुक्यातील नांदगाव जानी शेतशिवारात एका बिबट्याने तीन शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असताना आज साठ वर्षीय व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. चालू वर्षातील वाघाच्या हल्ल्यातील हा ११ वा बळी आहे. man killed by tiger

    चंद्रपुरात बंदोबस्तात असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण


    दरवर्षी मोहा फुले वेचणीचा हंगामी सीजन येतो या योजनांमध्ये गोर गरीब व्यक्ती गावालगत च्या जंगलामध्ये जाऊन मोहबोल मोह फुले गोळा करतात त्यापासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर संसाराचा उदरनिर्वाह करतात. याच उद्देशाने आज रविवारी चिचखेडा येथील 60 वर्षीय विनायक जांभळे हा व्यक्ती परिसरातील जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेला होता. मोहफुले वेचत असताना जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला.

    या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तो घरी परत न आल्यामुळे कुटुंबियांना शंका आली. त्यांनी शोधाशोध केली असता सदर वृद्धाचा मृतदेह कक्ष क्रमांक 1006 मधील जंगलात आढळून आला. या घटनेची माहिती वन व पोलीस विभागाला देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणी करिता ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला. चिचखेडा गाव मेंडकी पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे मृतक हा चिचखेडा येथील होता. chandrapur tiger attack

    या घटनेने चिचखेडा परिसरात पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. काल शनिवारी याच तालुक्यात नांदगाव जानी शेत शिवारात तीन शेतकऱ्यांना बिबट्याने जखमी केले आहे. या परिसरात कर यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली. धानपिकाला पाणी देण्यासाठी तीन शेतकरी शिवारात गेले होते. तरस वन्य प्राण्यापासून स्वतःचा जीव वाचवीत पळतसुटलेल्या बिबट्याने या तीन शेतकऱ्यांना शेत शिवारात जखमी केले. ही घटना ताजी असताना आज पुन्हा 60 वर्षीय वृद्धाला वाघाने ठार केले. दिवसागणिक वाघ बिबट्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू होत आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोरात सुरू असतानाही वनविभाग बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहे.

  • Chandrapur Forest Department : वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, भूमिपुत्र ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन

    Chandrapur Forest Department : वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, भूमिपुत्र ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन

    वनमंत्र्याच्या जिल्ह्यातच जात आहेत दिवसाआड मनुष्यबळी

    Chandrapur Forest Department 19 सप्टेंबर 2024 रोजी चिंचोली मुल येथे वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. देवाजी बाबुराव राऊत वय वर्ष 62 या इसमाची बकरी चराई करताना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू मुखी पडल्याची दुःखद घटना घडली आहे. या महिन्यातील टाडाळा जाणारा मरेगाव येथील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याच्या बातम्या ताज्या असतानाच ही घटना घडली.

    मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा


    Chandrapur Forest Department गत कित्येक वर्षांमध्ये विशेष करून मागच्या सहा महिन्यांमध्ये वाघ व बिबट च्या हल्ल्यामध्ये गुराखी व शेतकरी यांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. घरचा कमवता व्यक्ती गमवल्या मुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.


    काँग्रेस नेत्या तथा भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी वाघाच्या बंदोबस्ता करिता अनेक वेळा निवेदन देऊन व मागण्या करून वनविभागाचे लक्ष या गंभीर बाबी कडे वेधले आहे परंतू मानवी जिवा पेक्षा डुक्कर, बिबट, वाघ महत्वाचा असलेल्या वनविभागाने या मागण्या कडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे परिसरातील जनता वाघाचा बळी ठरत असल्याचे दिसून येत आहे. (Chandrapur Forest Department)


    विशेष करून गाय, बकरी, म्हैस यांच्या चराई करिता चरण कुरणे उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाला अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहे परंतु सद्यास्थीती पर्यंत वनविभागाने चराई कूरणा करिता ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात सामान्य नागरिकाचे जीव जात असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे वन्यप्राण्याच्या बंदोबस्ता मध्ये वनविभाग व प्रशासन सपेशल अपयशी ठरले आहे.


    जिल्ह्यामध्ये वनविभागाचे प्रमुख पद असलेले मुख्य वनसंरक्षण चंद्रपुर हे पद गेल्या कितेक महिन्या पासून रिक्त असून ताडोबाचे मुख्य वनसंरक्षक यांच्या कडे वनप्रशासनाने या पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. त्यामुळे त्याच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आला आहे. त्यात ताडोबा महोत्सव, वनमहोत्सव, कास्ट रवानगी महोत्सव आदी कार्यक्रमा मध्ये ते व्यस्त झाले आहे. तर हे सर्व कार्यक्रम करून घेण्यात वनविभागाचे प्रधान सचिव पासून ते वनविभागाचे सर्व छोटे मोठे अधिकारी कामाला लागले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सामान्य नागरिक, शेतकरी व गुराखी यांच्या मुख्य प्रश्नाला बगल दिल्या जात आहे. (Chandrapur Forest Department)

    अवश्य वाचा : महिलांनी केला निर्धार, संदीप गिर्हे आमचा निर्धार

    त्यामुळे सामान्य माणूस वाघाचा बळी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यात वनविभाग शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजने अंतर्गत सौर झटका मशीन वाटप सारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर जाहिरात व प्रसिद्धी करून राजकीय पक्षाच्या प्रचार सारखे करून वाघाच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या इसमाच्या परिवाराच्या दुखाःवर मिठ चोळण्याचा प्रकार करत असल्याची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री हे वनमंत्री असून देखील याविषयी ब्र काढायला तयार नाही.
    सामान्य शेतकरी व गुराखी यांच्या जीविताची किंमत काही हजार आणि लाख ठरवली आहे आणि वनविभाग एक ठराविक रक्कम देऊन आपल्या मूळ जबाबदारी पार पाडण्यात अपयशी झाले आहेत.


    सरकार आणि वनविभागाच्या या असंवेदनशील वागणुकीचा भूमिपुत्र ब्रिगेडने जाहीर निषेध केला असून वन महोत्सव यांच्या प्रचार, प्रसिध्दी व जाहिरातीमध्ये अखंड बुडालेल्या वनविभाग व सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पाळीव जनावराच्या चराईच्या प्रश्नावर निष्काळजी करणाऱ्या या घटलेला जबाबदार असलेल्या वनविभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची व मुख्यवनसंरक्षक चंद्रपुर हे पद तात्काळ भरण्याची मागणी केली आहे. (Chandrapur Forest Department)


    चराई क्षेत्र निर्माण करणे, दोषी वनाधीकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणे, वाघाचा बंदोबस्त करणे याकरिता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहीती यावेळी काँग्रेस नेत्या आणि भूमिपुत्र ब्रिग्रेडच्या मार्गदर्शिका डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी सांगितले
    आणि म्हणून वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेंढपाळांचा आणि शेतकऱ्यांचा बळी वाघाने घेतल्या नसून वनविभागाने घेतलेला आहे आणि म्हणून वनविभागावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार आज पोलीस स्टेशन मुल येथे काँग्रेस नेत्या आणि भूमिपुत्र ब्रिगेड मार्गदर्शिका डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी केली आहे.


    यावेळी मुल तालुक्याचे काँग्रेस सेवा दलाचे माजी अध्यक्ष
    अध्यक्ष जेष्ठ नागरिक नामदेवरावजी गावतुरे, समता परिषदेच्या कार्याध्यक्ष शशिकलाताई गावतुरे, छायाताई सोनुले, सीमाताई लोणबुले, विक्रम गुरनुले, नितेश म्याकलवार, राकेश मोहूर्ले, संतोष चिताळे, कालिदास गायकवाड, दिवाकर चौधरी, दामोदर किनाके, सुखदेव मगरे, वामन सोनवणे, संतोष गायकवाड, समीर उमरकर, विश्वनाथ चचाटे, कोंडू घरत, भोजराज कोवे, रामदास सीडाम, संजय नागपुरे, दिलीप चौधरी, भाऊजी नेवारे, बंडू बावनवाडे, दीपक राऊत, सचिन मुंडवार, जोगेश्वर ठाकरे, मारुती मगरे, करण ठाकरे यांच्यासह शेकडो चिंचोलीवासी उपस्थित होते.

  • Tiger attack : मूल तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच

    Tiger attack : मूल तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच

    Tiger attack (गुरू गुरनुले) चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच आहे, आज पुन्हा एका गुराख्यावर हल्ला करीत वाघाने ठार केले, मागील 2 वर्षातील ही 23 वि घटना आहे.


    Tiger attack बैल चराईसाठी घेवुन गेलेल्या गुराख्यावर दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना सावली वनविभागाच्या राजोली क्षेत्रातील मरेगांव मुल येथील सर्व्हे नं. १११ च्या बाजुला असलेल्या गुरुदास कवडु वाकडे यांच्या शेतात मंगळवारी दुपारी १ वाजता दरम्यान घडली. वासुदेव झिवरु पेंदोर वय (६०) वर्षे रा. मरेगांव असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या गुराख्याचे नांव आहे.


    मूल तालुक्यातील मौजा मरेगांव एम.आय.डी.सी. येथील वासुदेव झिवरु पेंदोर वय ६० वर्षे हे गुरे घेवुन चराईसाठी सावली वनविभागाच्या राजोली क्षेत्रातील मरेगांव येथील सर्व्हे नं. १११ च्या बाजुला असलेल्या शेतकरी गुरुदास कवडु वाकडे यांच्या शेतात नेले होते. चराई करीत असताना दरम्यान बाजुला असलेल्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करुन ठार केले. सोबत असलेल्या इतर गुराख्यांनी सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना व वनविभागाला दिली.

    अवश्य वाचा : तान्हा पोळ्याला महागाईचे ग्रहण


    सावली येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला सावली आणि मूल पोलीस स्टेशनचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. (Tiger attack) व मृतदेह शवविच्येदन करण्यासाठी मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

    महावितरणची अभय योजना


    सावली वनविभागाच्या वतीने वाघाच्या हल्यात ठार झालेल्या वासुदेव पेंदोर यांच्या कुटुंबियांना तात्काळ २५ हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. मुल तालुक्यात वाघाच्या हल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकरी,गुराखी व गावकरी भयभीत झाले असून अजूनही वनविभाग व शासन यावर काहीही उपाय योजना केल्याचे दिसत नाही.अशी ओरड शेतकरी बांधवांनी केली आहे. अशीच अवस्था शासनाची राहिली तर मात्र मुल व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वतःची शेती करणे सोडावे लागेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.

    वनविभागाच्या वतीने तातडीची मदत

    वासुदेव झींगरु पेंदोर वय ६० वर्षं राहनार मरेगाव , तालुका मूल याला गुरे चारत असतांना गुरुदास वाकडे यांचे शेताच्या बाजुला असलेल्या नाल्याजवळ वाघाने हल्ला करून ठार केले.माहीती मिळताच घटणास्थळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री विनोद धुर्वे, क्षेत्र सहाय्यक वाकडोत, वनरक्षक धनविजय, वनरक्षक गुरनुले, वनरक्षक आखाडे, वनरक्षक बोनलवार, वनरक्षक नागोसे हे त्वरित हजर होऊन घटणास्थळाचा पंचनामा केला व मृतकाला शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे पाठविण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी सावली श्री विनोद धुर्वे यांचे हस्ते मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत म्हणून २५ हजार रुपये रोख देण्यात आले यावेळी संदिप भाऊ कारमवार, उमेशसिंह झिरे, मरेगाव चे पोलीस पाटील व गावकरी उपस्थित होते.

  • Human Wildlife Conflict : मूल तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला

    Human Wildlife Conflict : मूल तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला

    Human Wildlife Conflict (गुरू गुरनुले) चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वन्यजीव यांची दहशत अद्यापही कायम आहे.

    जाणाळा येथील गुराखी वाघाच्या हल्यात ठार मूल- मुल तालुक्यातील जाणाळा येथील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार जखमी झाल्याची घटना आज दिनांक 1 रोजी दुपारी घडली. गुलाब वेळमे वय वर्ष 50 राहणार जाणाळा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराखीचे नाव आहे.
    जाणाळा येथून जवळच असलेल्या डोनी फाट्याजवळ सराईत गाई, गुन्हे चरायला नेला होता. दबा धरून बसलेल्या वाघाने गुराखीवर हल्ला करून ठार केले. ही घटना गावात माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात महिला सुरक्षेची पेटली मशाल


    Human Wildlife Conflict मूल तालुक्यात वाघाचे हल्ले मानवावर वाढल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेची बाब झाली आहे. वन्य प्राण्यांचे असे हल्ले आम्ही किती सहन करायचे असे गावकऱ्यात बोलल्या जात आहे. माणूस महत्त्वाचा की वाघ अशी ही चर्चा होत आहे. गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मागील पंधर वाड्यातील वाघाच्या हल्यात गुराखी ठार झाल्याची तिसरी घटना आहे.

    चंद्रपुरात निघाली भव्य मशाल रॅली
  • Tiger Attack : वाघाने केली गुराख्याची शिकार

    Tiger Attack : वाघाने केली गुराख्याची शिकार

    tiger attack गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील मौजा चीचाळ! येथील गुराखी मुनिम रतीराम गोलावार वय (४१) हे काल दिनांक १८/८/२०२४ रोजी सकाळी नेहमीच्या वेळेला बकरी चराईसाठी नेले असता वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक ७५२ या जंगल परिसरात वाघाने हल्ला करुन गुराखी मुनिम रतीराम गोलावार यांना ठार केले.

    अवश्य वाचा : कुख्यात गुन्हेगार हाजी हत्याकांडात पुन्हा 7 आरोपीना अटक, राजकीय कनेक्शन पुढे येणार?

    Tiger attack ही घटना सायंकाळी ५-३० च्या दरम्यान घडली असावी असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. या घटनेची माहिती प्राप्त होताच विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, व वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी चीचपल्ली(प्रादेशिक) प्रियंका वेलमे यांना मिळताच त्यांनी दिलेल्या आदेशान्वये क्षेत्र सहाय्यक एम.जे. मस्के व वनरक्षक सुधीर ठाकूर, राकेश गुरनुले, संजीवनी पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झीरे व त्यांची टीम सकाळी ६-०० वाजता यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन शोध घेतला असता सदर इसमाचा मृतदेह सापडला.

    घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविल्याचे सांगितले. गुराखी मुनिम गोलावार याला पत्नी दोन लहान मेले असा परिवार असून कमवता व्यक्ती गेल्याने कुटुंब निराधार झाला. पुढील तपास मुल पोलिस व वनविभाग करीत आहे.

    मूल तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे, वाघाचे हल्ले या भागात आता नियमित वाढत आहे, काही दिवसांपूर्वी वनविभागाने नागरिकांना मानव वन्यजीव संघर्षाबाबत जनजागृती करण्याचे काम केले होते, मात्र त्यानंतर सुद्धा असे हल्ले वाढणे ही चिंताजनक बाब आहे.

    कसा उदभवतो हा संघर्ष?

    • अधिवासाचे नुकसान:   मानवी लोकसंख्या वाढत असताना आणि शहरी भागांचा विस्तार होत असताना, नैसर्गिक अधिवास अभूतपूर्व दराने नष्ट होत आहेत. अधिवासाची ही हानी प्राण्यांना अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वसाहतींमध्ये जाण्यास भाग पाडत आहे, ज्यामुळे अनेकदा मानवांशी संघर्ष होतो.
    • हवामान बदल:  जसजसे तापमान वाढते, पाण्याचे स्त्रोत कोरडे होतात आणि अन्न कमी होते, प्राण्यांना संसाधनांच्या शोधात त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून पुढे जाण्यास भाग पाडले जाते. हे त्यांना मानवांच्या जवळच्या संपर्कात आणते, संघर्षाची शक्यता वाढवते. 
    • मानवी अतिक्रमण: लोक पूर्वीच्या अविकसित भागात जात असताना, ते पर्यावरणातील नैसर्गिक समतोल बिघडवतात, अनेकदा प्राण्यांना स्थलांतर करण्यास किंवा नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यास भाग पाडतात. शेती, जंगलतोड, अत्याधिक चराई, शिकार इत्यादीमुळे मानवी हस्तक्षेप वाढला आहे. प्राणी त्यांच्या बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी संघर्ष करत असल्याने यामुळे संघर्ष होऊ शकतो.