Tag: मराठी बातम्या

  • आदिवासी विकास विभागाच्या Tribal Sports Science Exhibition 2025 चे भव्य उद्घाटन

    Tribal Sports Science Exhibition : चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) – आदिवासी विकास विभाग, नागपूर यांच्या वतीने आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा–2025 व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे भव्य उद्घाटन अपर आयुक्त आयुषी सिंह यांच्या हस्ते आज जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे  पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह,  अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीचे सहाय्यक आयुक्त रामचंद्र सोनकवडे, आदिवासी विकास विभाग नागपूरचे  उपायुक्त दिगांबर चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड,  यांच्यासह विविध जिल्ह्यांतील प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. (हे हि वाचा – आरोग्य उपक्रमात चंद्रपूर जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक) Nagpur Division

    या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भामरागड, अहेरी, देवरी, भंडारा व चिमूर या 9 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतील सुमारे 3000 विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले आहेत. स्पर्धांचा कालावधी 13 ते 15 डिसेंबर 2025 असा असून कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल तसेच ॲथलेटिक्समधील विविध प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. उद्घाटन समारंभात खेळाडूंनी संचलन, क्रीडा शपथ व क्रीडा ध्वज फडकावून क्रीडावृत्तीचे दर्शन घडविले. ढोल पथकाच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच बिरसा मुंडा, राणी दुर्गावती व बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची विधीवत सुरुवात करण्यात आली. Tribal Sports Science Exhibition

    उद्घाटनप्रसंगी बोलताना आयुषी सिंह यांनी शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, समन्वय व कार्यक्षमता वाढते, तसेच विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले. संचालन  सपना पिंपळकर यांनी तर आभार श्री. बोंगिरवार यांनी मानले. या विभागीय क्रीडा स्पर्धांचा समारोप 15 डिसेंबर 2025 रोजी होणार असून, विजेत्या व उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.

  • चंद्रपुरात ८०० मेगावॉटचा वीज प्रकल्प प्रस्तावित

    New Power Plant Project : चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर शहरात कार्यरत असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रात कालबाह्य व जुनी युनिट्स अद्याप सुरू असल्याने प्रदुषणाचे प्रमाण वाढत असून प्रस्तावित 800 मेगाव्हॅट क्षमतेचा नवीन प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असावा अशी मागणी हिवाळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. (हे वाचा – नायलॉन मांजा विक्रेते चंद्रपूर पोलिसांच्या रडारवर)

    नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राशी संबंधित महत्त्वाचा व गंभीर मुद्दा सभागृहासमोर मांडला. चंद्रपूर शहरात कार्यरत असलेल्या सध्याच्या औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. चंद्रपूर सीटीपीएसमध्ये ८०० मेगाव्हॅट क्षमतेचे नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत का, असा थेट प्रश्न यावेळी त्यांनी शासनाला विचारला. यावर शासनाने सकारात्मक उत्तर देत नवीन संच उभारण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट केले. Thermal Power Plant

    चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

     चंद्रपूर हे मुंबई भद्रावती एचव्हीडीसी डीसी ग्रीड लाईनजवळ असल्याने वीज वहनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. यासोबतच रेल्वे कनेक्टिव्हिटी, मुबलक पाण्याची उपलब्धता आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून कोळशाचा नियमित पुरवठा या सर्व बाबी चंद्रपूरच्या बाजूने अनुकूल असल्याचे त्यांनी यावेळी सभागृहाला सांगितले. मात्र, जुन्या व प्रदूषण वाढवणार्या युनिट्समुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणुन दिले. या जुन्या युनिट्सऐवजी अल्ट्रा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित ८०० मेगाव्हॅट क्षमतेचे नवीन प्रकल्प टप्प्याटप्प्याने उभारावेत आणि अशी ठाम मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केली. New Power Plant Project

    जुन्या युनिट्समुळे वाढते प्रदूषण, नवीन औष्णिक प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हवा – आ. किशोर जोरगेवार

    या मागणीला उत्तर देताना मंत्री मेघना बोर्डीकर यांनी भविष्यात उभारण्यात येणारे प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असतील, ज्यामुळे प्रदूषणात लक्षणीय घट होईल आणि कमी कोळशातून अधिक वीज निर्मिती शक्य होईल, असे सांगितले आहे. तसेच ८०० मेगाव्हॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी अंदाजे ९ हजार ८९२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.

    चंद्रपूर शहरातील वाढते प्रदूषण कमी करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठीच ही मागणी करण्यात आल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. या चर्चेमुळे चंद्रपूरच्या पर्यावरणीय प्रश्नांवर शासनाचे लक्ष केंद्रित झाले असून, भविष्यात प्रदूषणमुक्त आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वीज प्रकल्प उभारल्या जाणार आहे.

  • आयटीआय निदेशकांच्या समस्यांबाबत सकारात्मक बैठक

    ITI Directors Association : चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) : महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी विविध मागण्यांसंदर्भात पुकारलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी नागपूर विभागाचे शिक्षक आमदार श्री. सुधाकरजी अडबाले यांच्या विशेष प्रयत्नांनी व प्रमुख उपस्थितीत खात्याच्या अप्पर मुख्य सचिव सन्माननीय श्रीमती मनिषा वर्मा मॅडम यांनी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेसोबत विविध मुद्द्यांवर बैठक आयोजित केलेली होती. (हे हि वाचा – प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश, उमेदवारांना मिळाला दिलासा)

    आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने अपर मुख्य सचिव यांच्यासोबत बैठक

    सदर बैठक प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे संध्याकाळी ५ ते ६.३० या वेळेत यशस्वीरित्या पार पडली. यावेळी नागपूर विभागाचे पदवीधर आमदार सन्माननीय श्री अभिजितजी वंजारी सुद्धा पूर्णवेळ उपस्थित होते.

    बैठकीला संचालक श्रीमती माधवी सरदेशमुख तसेच उपसचिव श्री मठपती, सहसंचालक श्री. सूर्यवंशी, श्री गावित साहेब (ऑनलाइन) हे चर्चेत उपस्थित होते. ITI Directors Association

    कालमर्यादेत प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत

    हिवाळी अधिवेशनावरील एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेने शासनास दिलेल्या पत्रात असलेल्या सर्वच तेराही मुद्द्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. मा. अप्पर मुख्य सचिव मनिषा वर्मा मॅडम यांनी सर्व मुद्दे एक – एक करून संघटना, संचालनालय आणि मंत्रालय स्तर यामध्ये नेमके कुठे समस्या निवारणार्थ उपाययोजना आवश्यक आहे आणि किती कालावधीत उपाययोजना व्हावी, याबाबत कालमर्यादेत प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने योग्य ते निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दोन्ही सन्माननीय आमदार महोदयांनी सुद्धा संघटनेची न्यायिक बाजू मांडली.

    यावेळी सन्माननीय अप्पर सचिव मॅडम यांची प्रशिक्षण योजनेमधील सुधारणा आणि प्रशिक्षणार्थी कल्याण याविषयीची कळकळ वेळोवेळी जाणवून आली. त्यांनी यावर आवाहन करताच संघटना केवळ प्रशिक्षण याविषयावरच समर्पित एक बैठक आपणासोबत घेण्यास इच्छुक असल्याचे सांगताच त्यांनी लवकरच ही बैठक आपण आयोजित करू असे आश्वस्त केले. एकंदरीतच दीड तास चाललेल्या या बैठकीत अनेक समस्या निवारणार्थ निर्णय घेण्यात आलेले असून त्यादृष्टीने गतीने पावले उचलण्यात येतील याबद्दल अपर मुख्य सचिव यांनी आश्वस्त केले. Skill Development Maharashtra

    बैठकीनंतर आमदार सुधाकर अडबाले यांनी मागील वर्षभरातील सभागृहातील कार्याची आढावा घेणारे “सुधाकरपर्व” पुस्तक अपर मुख्य सचिव वर्मा मॅडम यांना भेट दिले.

    महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने संघटनेचे मार्गदर्शक, माजी सरचिटणीस तसेच नॅशनल फेडरेशनच्या Advisory Board चे अध्यक्ष श्री भोजराजजी काळे, माजी सरचिटणीस श्री दुर्गपुरोहित, अमरावती शिक्षक मतदार संघाचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार श्री दिलीपजी कडू, राज्य अध्यक्ष श्री विनोदजी पाटील, राज्य सरचिटणीस श्री राजेशजी खडबडे, राज्य उपाध्यक्ष श्री संजयकुमार खर्चे, राज्य सहचिटणीस श्री शिवाजी ढुमने, राज्य सहचिटणीस श्री मंगेश पुंडकर, राज्य खजिनदार श्री प्रवीणजी वाइनदेशकर, राज्य कार्यकारिणी सदस्य साहेबराव गुडधे, राज्याच्या महिला सदस्य श्रीमती शर्मिला कळमकर, नागपूर विभागाचे श्री प्रेमकुमारजी भैसारे, पुणे विभागाचे अध्यक्ष श्री नेताजी दिसले, अमरावती विभागाचे श्री राहुल चौधरी, नागपूर विभागाचे सचिव श्री सचिन मालिचकर, सचिव श्री सिद्धार्थ मेहरे, श्री धीरज सव्वालाखे आदींची उपस्थिती होती.

  • प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश, उमेदवारांना दिलासा

    Municipal Election Expense Relief : चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेली निवडणूक खर्चाबाबतची महत्त्वपूर्ण मागणी पूर्ण झाली आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांनी नवीन वेळापत्रकानुसार निवडणूक चिन्हे वाटप झाल्यानंतरच (दिनांक ११ डिसेंबर रोजी) केलेला खर्च निवडणूक खर्च म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. यापूर्वी केलेला सर्व खर्च ग्राह्य धरू नये, अशी स्पष्ट मागणी त्यांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी पत्राद्वारे केली होती. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे उमेदवारांवरील अतिरिक्त खर्चाचा ताण कमी झाला असून, निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा वाढल्याने उमेदवारांनी समाधान व्यक्त केले आहे. Municipal Elections (हे हि वाचा – लोकसभेत प्रतिभा धानोरकरांचा प्रश्न आणि धक्कादायक वास्तव समोर)

    या मागणीनुसार निवडणूक आयोगाने सकारात्मक कार्यवाही केली असून, उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे आणि आयोगाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने उमेदवारांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडू नये, या उद्देशाने ही मागणी केली होती. Municipal Election Expense Relief

    उमेदवारांना मोठा दिलासा

    मा. उच्च न्यायालयाने देखील निवडणुकीच्या विलंबामुळे उमेदवारांच्या खर्चात झालेली वाढ मान्य करून, खर्चाची मर्यादा वाढवण्यासाठी मागणी केली होती, ज्यामुळे उमेदवारांच्या खर्चीक वाढीव मागणीला बळ मिळाले होते. या परिस्थितीत, चिन्हे वाटप झाल्यानंतरच झालेला खर्च ग्राह्य धरण्याचा निर्णय झाल्यामुळे, उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. Election Expenses

    या निर्णयामुळे अनेक नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीतील उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली होती की, या महत्त्वाच्या बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, संबंधित जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि उमेदवारांना या संदर्भात स्पष्ट आणि त्वरित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात. त्यांच्या या सकारात्मक पाठपुराव्यामुळे, निवडणुकीतील खर्चाबाबत उमेदवारांमध्ये असलेल्या अनिश्चिततेवर पडदा पडला आहे,व निवडणुकीतील खर्चाच्या संदर्भात मर्यादा वाढविण्यात येणार असल्याने आधी केलेल्या खर्चाच्या देखील समावेश होऊन निवडणूक लढविणे उमेदवारांना सोईचे होणार आहे. या निर्णयामुळे खासदार प्रतिभा धानोरकरांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहेत

  • भिसी पोलिसांची कारवाई: ६.५ लक्षांचा गौण खनिज मुद्देमाल जप्त

    Bhişi Police Action : चंद्रपूर/भिसी – १३ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत भिसी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांवर कारवाई करीत २ आरोपींवर गुन्हे दाखल केले असून या कारवाईत ६ लक्ष ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (हे हि वाचा – चंद्रपुरात नायलॉन मांजा विक्रेते पोलिसांच्या रडारवर)

    ११ डिसेंबर रोजी भिसी पोलिसांना गौण खनिजाची चोरी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी भिसी ते जांभुळघाट जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी केली. यावेळी विना क्रमांकाची एक ट्रॅक्टर ट्रॉली येताना पोलिसांना दिसली, वाहनाला थांबत झडती घेतली असता १ ब्रास गौण खनिज रेती आढळून आली.

    भिसी पोलिसांनी यावेळी २९ वर्षीय वैभव प्रकाश कुंभरे राहणार बोळधा व ५२ वर्षीय लक्ष्मण मारोती शिवरकर राहणार पारडपार यांच्या विरुद्ध विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत एकूण ६ लक्ष ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Bhişi Police Action

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमोल बारापात्रे यांच्या नेतृत्वात पोउपनि रविंद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, पोलीस कर्मचारी अजय बगडे, बाळकृष्ण जिभकाटे, सतीश झिलपे व वैभव गोहणे यांनी केली.

  • चंद्रपूर जिल्ह्यात ‘Plug and Play’ Industrial Model राबविणार; मुनगंटीवारांचा पाठपुरावा

    tribal industrial area : चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्‍हयातील पोंभुर्णा आणि गोंडपिपरी तालुक्‍यातील करंजी येथील एमआयडीसी  मध्‍ये प्‍लग अॅन्‍ड प्‍ले या धर्तीवर आदिवासी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्‍यासाठी शासन निश्‍चीतपणे सकारात्‍मक विचार करेल. यापूर्वी नाशिक येथे अशा यशस्‍वी प्रयोग करण्‍यात आला आहे. तोच प्रयोग चंद्रपूर जिल्‍हयातील या दोन एमआयडीसी मध्‍ये करण्‍यात येईल असे आश्‍वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभे दिले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्‍या अर्धा तास चर्चेदरम्‍यान उद्योग मंत्र्यांनी वरील आश्‍वासन दिले. (हे हि वाचा – मुनगंटीवार यांच्या मागणीवर घरकुल साठी ८८ कोटींचा निधी मंजूर)

    या अर्धा तास चर्चेदरम्‍यान बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, आपण स्‍वातंत्र्यांचा अमृत महोत्‍सव साजरा केला. मात्र आदिवासी युवकांच्‍या सर्वांगिण विकासासाठी जलदगतीने प्रयत्‍न होताना दिसत नाहीत. चंद्रपूर जिल्‍हयातील आदिवासी तरूण तरूणींना उद्योजक बनविण्‍यासाठी आदिवासी औद्योगिक क्षेत्र निर्माण करणे आवश्‍यक आहे. आदिवासींचे उत्‍थान करण्‍यासाठी आपण विविध योजना राबवितो. मात्र आदिवासी तरूणांमधून उद्योजक तयार होताना दिसत नाहीत.

    आदिवासी तरुणांना संधीची गरज

    चंद्रपूर जिल्‍हयाचे आदिवासी सुपुत्र क्रांतीवीर बाबुराव पुलेश्‍वर शेडमाके हे ब्रिटीशांविरूध्‍द संघर्ष करताना शहीद झाल्‍याचा जाज्‍वल्‍य इतिहास आहे. मी अर्थमंत्री असताना चंद्रपूर जिल्‍हयातील आदिवासी तरूण-तरूणी आठ महिन्‍यांच्‍या प्रशिक्षणात मिशन शौर्य या अभियानाअंतर्गत माऊंट एव्‍हरेस्‍ट सारख्‍या शिखरावर चढले. देशाच्‍या पंतप्रधानांनी या युवकांचे आपल्‍या भाषणात कौतुक केले. आदिवासी तरूण प्रामाणिक आहेत, शूर आहेत मग त्‍यांना संधी का दिली जात नाहीत, असा सवाल करत आदिवासी वसतीगृहांमध्‍ये लागणारे गणवेश व इतर वस्‍तु पुरविण्‍यासाठी आदिवासी संस्‍था, आदिवासी व्‍यक्‍ती यांना संधी देण्‍याची मागणी त्‍यांनी यावेळी केली. tribal industrial area

     बल्‍लारपूर येथे रू.१२.५० कोटी निधी खर्चुन सुषमा स्‍वराज महिला सक्षमीकरण केंद्र तयार करण्‍यात आले आहे. अशाच पध्‍दतीने आदिवासींना कौशल्‍य विकासाची संधी उपलब्‍ध करण्‍यासाठी केंद्र सरकारच्‍या योजनांशी इंटीग्रेट करण्‍याची आवश्‍यकता त्‍यांनी प्रतिपादीत केली. ट्रायबल को-ऑपरेटीव्‍ह मार्केटींग फेडरेशन च्‍या माध्‍यमातुन कृषी आधारित, वनआधारित उद्योग चंद्रपूर जिल्‍हयातील एमआयडीसी मध्‍ये स्‍थापन करण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचेही ते म्‍हणाले. चंद्रपूर जिल्‍हा हा आदिवासी बहुल जिल्‍हा असल्‍यामुळे हा प्रयोग चंद्रपूर जिल्‍हयातील पोंभुर्णा आणि करंजी या एमआयडीसीमध्‍ये राबवावा व त्‍यासाठी आवश्‍यक निधी उपलब्‍ध करावा, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यासंदर्भात लवकरच दोन्‍ही विभागांच्‍या सचिवांसह उच्‍चस्‍तरीय बैठक घेवून पुढील कार्यवाही करण्‍यात येईल, असे आश्‍वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.

  • तुमच्या whatsapp ग्रुप मध्ये ही लिंक आली तर नाही ना?

    WhatsApp scam link : चंद्रपूर दि. १३ डिसेंबर २०२५ (News३४) : अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन इत्यादी सेवा संदर्भात बनावट वेबसाइट्स, फसवे मोबाईल अॅप्स (APK) तसेच SMS/WhatsApp द्वारे खोट्या लिंक पाठवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आली आहे. यामुळे वाहनचालक व वाहनमालक यांची व्यक्तिगत माहिती चोरी, बँकिंग तपशीलांची गळती आणि ओळखीचा गैरवापर होत आहे. (हे वाचा – चंद्रपुरातील बसपाचे माजी नगरसेवक भाजपात दाखल)

     फक्त खालील अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा वापर करा :

    * वाहन नोंदणी सेवा (VAHAN) – https://vahan.parivahan.gov.in

    * ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) – https://sarathi.parivahan.gov.in

    * परिवहन सेवा – https://www.parivahan.gov.in

    * ई-चलन पोर्टल – https://echallan.parivahan.gov.in

    वरील सर्व संकेतस्थळे नेहमी “.gov.in” नेच समाप्त होतात.“.com”, “.online”, “.site”, “.in” अशा इतर डोमेनवरील कोणतीही वेबसाइट उघडू नये. WhatsApp scam link

    असे असतात फसवणूक करणाऱ्यांचे संदेश  :

    * “आपल्या वाहनाचे चलन बाकी आहे, त्वरित पैसे भरा” असे धमकीवजा संदेश

    * बनावट पेमेंट लिंक पाठवून त्वरित दंड भरण्याची जबरदस्ती

    * “तुमचा DL सस्पेंड होणार आहे, लिंकवर क्लिक करून तपासा” असे संदेश. परिवहन विभाग किंवा प्रादेशिक परिवहन  कार्यालय कधीही WhatsApp वर पेमेंट लिंक पाठवत नाही.

    खालीलप्रमाणे अनधिकृत APK अॅप्स डाउनलोड करू नयेत :

    * RTO Services.apk

    * mParivahan Update.apk

    * eChallan Pay.apk

    तसे केल्यास तुमचा OTP, बँकिंग माहिती, वैयक्तिक डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते.

    संशयास्पद लिंक/संदेश आल्यास त्वरित तक्रार करा :

    * National Cyber Crime Portal – https://www.cybercrime.gov.in

    * सायबर फसवणूक हेल्पलाइन – १९३०

    * जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन. असे सह परिवहन आयुक्त शैलेश कामत मुंबई यांनी कळविले आहे.

  • नायलॉन मांजा विक्रेते रडारवर! LCB ची चंद्रपुरात छापेमारी; ५० हजारांचा मांजा जप्त

    Nylon Manja Raid Chandrapur : चंद्रपूर १२ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा प्रतिबंधित नायलॉन मांजा विरोधात कारवाई मोहीम राबवित आहे, १२ डिसेंबर रोजी चंद्रपूर शहरातील बॉम्बे प्लॉट राजीव गांधीनगर व इंदिरानगर भागात छापेमारी करीत प्रतिबंधित नायलॉन मांजाचा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (हे हि वाचा – मूल शहरात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर गुन्हे शाखेची कारवाई)

    अवैध धंदे, जुगार व नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरोधात गस्तीवर असताना पोलिसांना नायलॉन मांजा बाबत गोपनीय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बॉम्बे प्लॉट, राजीव गांधी नगर मध्ये मनीष सुरेश राऊत यांच्या कडे धाड मारली असता विविध रंगाच्या एकूण २४ नग किंमत २४ हजार रुपये विविध रंगाच्या प्लास्टिक चक्रीत गुंडाळलेला प्रतिबंधित मांजा जप्त करण्यात आला.

    ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

    दुसऱ्या कारवाईत बॉम्बे प्लॉट इंदिरानगर मधील ५२ वर्षीय एकनाथ केशव चवरे यांच्याकडून २६ नग प्लास्टिक चक्रीवर गुंडाळलेला प्रतिबंधित नायलॉन मांजा किंमत २६ हजार रुपये जप्त करण्यात आला. दोन्ही कारवाईत एकूण ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपनवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, हिरालाल गुप्ता व छाया निकोडे यांनी केली.

  • सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीवर 15,058 घरांसाठी ८८ कोटींचा निधी मंजूर

    Yashwantrao Chavan Mukt Vasahat : नागपूर 12 डिसेंबर २०२५ (News३४) – हिवाळी अधिवेशनात आज चंद्रपूरसह राज्यातील भटक्या-विमुक्त, गरीब आणि ग्रामीण कुटुंबांच्या घरकुल समस्येवर सविस्तर व गांभीर्यपूर्ण चर्चा झाली. मंजूर घरांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने ही घरे रखडत असल्याचे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधून, चंद्रपूर जिल्ह्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत निधीची तातडीची गरज व्यक्त केली. यावर सकारात्मक उत्तर देत मंत्री अतुल सावे यांनी तात्काळ 88 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी आश्वस्त केले. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील यशवंतराव घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (हे वाचा – हि व्हाट्सअप लिंक तुमच्या ग्रुपवर आल्यास होणार मोठी फसवणूक)

    मुनगंटीवार यांनी अधिवेशनात मागणी रेटून धरली

    हिवाळी अधिवेशनात आज चंद्रपूर जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेतील भटक्या-विमुक्त, गरीब आणि ग्रामीण रहिवाशांच्या घरकुल समस्येला विशेष महत्त्व देत अर्धा तास चर्चा घेण्यात आली. यावेळी माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांच्या प्रत्यक्ष अडचणी सभागृहापुढे ठामपणे मांडल्या.

    आ.मुनगंटीवार म्हणाले की, 2011 पासून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत घरकुल मंजुरी दिली जाते. योजना रक्कम वाढवून 1 लाख 20 हजार रुपये करण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष निधी वेळेवर न मिळाल्याने अनेक लाभार्थ्यांची घरे अपूर्ण राहिली आहेत. “एक हप्ता मिळाल्यानंतर पुढील हप्त्यासाठी लाभार्थी दीर्घ प्रतीक्षा करत आहेत. मंजुरी असूनही निधी लांबणीवर पडल्याने अडचणी वाढत आहेत,” असे त्यांनी सांगितले. Yashwantrao Chavan Mukt Vasahat

    चंद्रपूर जिल्ह्यात मंजूर 15,058 घरांसाठी निधी तातडीने आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, यवतमाळ, बीड, जालना आदी जिल्ह्यांतील घरकुल स्थितीचा उल्लेखही त्यांनी सभागृहात केला. मंजुरी दिल्यानंतरही निधी वेळेवर न मिळाल्याने घरे पूर्णत्वास येत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

    चर्चेला उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक भूमिका मांडली. “आवश्यक 88 कोटी निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. शंभर टक्के निधी देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” असे त्यांनी सांगितले. पुढील घरकुल वाटप पंतप्रधान आवास योजना (PMAY) अंतर्गत ग्रामविकास विभागामार्फत केल्याने प्रक्रिया आणखी गतिमान होईल, असेही त्यांनी नमूद केले.

    या चर्चेत घरकुल प्रश्नाच्या संवेदनशीलतेवर सर्वांनीच लक्ष केंद्रित केले. एकीकडे नागरिकांच्या अडचणी मांडल्या गेल्या, तर दुसरीकडे सरकारकडून निधी वितरणाबाबत तातडीच्या निर्णयाचे आश्वासन देण्यात आल्याने समाधानाची भावना व्यक्त झाली.

  • लोकसभेत खासदार धानोरकरांच्या प्रश्नावर धक्कादायक वास्तव समोर

    lung cancer in women : चंद्रपूर : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय कर्करोग पंजीकरण कार्यक्रमाच्या अभ्यासामध्ये देशातील महिलांमधील फुफ्फुसांच्या कर्करोगाशी संबंधित महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर आली आहे. या अभ्यासानुसार, महिलांमधील फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी जवळपास ५३% प्रकरणे ‘एडेनोकार्सिनोमा’ या प्रकाराची आहेत, जो “गैर-धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळणारा सर्वात सामान्य हिस्टोपॅथोलॉजिक प्रकार” आहे. (हे हि वाचा – खासदार धानोरकरांचा पाठपुरावा यशस्वी, चंद्रपूर मनपात आता IAS दर्जाचा अधिकारी आयुक्त)

    १९८२ ते २०१६ या दीर्घ कालावधीत महानगरांमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये लक्षणीय वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. या गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी लोकसभेत अतारांकित प्रश्न संख्या २२८२ अंतर्गत केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला होता. त्यात हि गंभीर आकडेवारी समोर आली आहे. 

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी फुफ्फुसांच्या कर्करोगाची लक्षणे क्षयरोगाशी (टीबी) मिळतीजुळती असल्याने निदानात होणाऱ्या विलंबाचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. यावर शासनाने स्पष्ट केले की, ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत, क्षय रोगाच्या तपासणीदरम्यान कर्करोगाची शंका आल्यास, रुग्णांना त्वरित पुढील निदान व उपचारांसाठी विशिष्ट केंद्रांमध्ये पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, कर्करोगाच्या रुग्णांना टीबीसाठी संवेदनशील मानले जाऊन त्यांच्या नियमित तपासणीवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. कर्करोगाच्या उपचारांसाठी देशभरात ३९ संस्थांना मंजुरी देण्यात आली असल्याची आकडेवारीही सभागृहात सादर करण्यात आली. lung cancer in women

    फुफ्फुसांच्या कर्करोगाचे एक अप्रत्यक्ष कारण म्हणून वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जानेवारी २०१९ मध्ये राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम लागू केला आहे. हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सध्या २४ राज्ये/संघ राज्य क्षेत्रांमधील १३० शहरांमध्ये वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्यरत आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत उपस्थित केलेला हा गंभीर सार्वजनिक आरोग्य विषय आणि त्यावरील शासनाच्या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. संबंधित समस्या सोडविण्यासाठी शहर, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छ वायू कृती योजनांच्या माध्यमातून अंमलात आनंत असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.