Tag: मराठी बातम्या

  • चंद्रपूर शहरात घरफोडीची मालिका! कायद्याचे तीनतेरा

    Chandrapur burglary incident : चंद्रपूर ११ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर शहरातील विविध भागात घरफोडीच्या घटनेत वाढ होत असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले दिसत आहे. शहरातील जटपुरा भागात एकाचवेळी दोन ठिकाणी घरफोडी झाल्या, यानंतर रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नगिनाबाग मध्ये ९ डिसेंबर रोजी घरफोडीची घटना उघडकीस आली यामध्ये लाखोंच्या मुद्देमालावर अज्ञाताने हात साफ केला आहे.

    ३३ वर्षीय मयूर खोब्रागडे यांच्या सिस्टर कॉलोनी, नगिनाबाग येथील घरी घरफोडी झाली, ज्यावेळी हि घटना घडली तेव्हा घरी कुणी नव्हते. मयूर खोब्रागडे हे नागपुरात नोकरी करीत असून सध्या ते नागपुरात राहतात, त्यांच्या चंद्रपुरातील घरी आई व भाऊ सह वहिनी राहते. (हे वाचा – जटपुरा गेट भागात एकाच दिवशी दोन घरफोड्या)

    ७ डिसेंबर ला मयूर यांचा भाऊ अश्रूत हा घराला कुलूप लावून नागपूरला गेला होता, तेव्हापासून तो नागपुरात होता, ९ डिसेंबर रोजी शेजारी यांचा कॉल आला कि मुख्य दारावरील कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आहे अशी माहिती दिली. Chandrapur burglary incident

    आपल्या घरी चोरी झाली असा अंदाज व्यक्त करीत मयूर चंद्रपूरला कुटुंबासह आले असता, घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले होते, बेडरूम मधील कपाट बघितले असता त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लक्ष १३ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.

    ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान अज्ञाताने घरी कुणी नसल्याचा फायदा घेत दरवाजाचा कोयंडा तोडून घरी प्रवेश करीत चोरी केली. याबाबत मयूर यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीवर कलम ३०५, ३३१ (२) व ३३१ (४) अनव्ये गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे.

  • EVM हॅकिंगभीती पुन्हा चर्चेत; चंद्रपुरात काँग्रेसची प्रशासनाला मागणी

    EVM hacking fear : राजुरा ११ डिसेंबर २०२५ (News34) :– राज्यात नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, मतमोजणी पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे (EVM) मशीनच्या सुरक्षिततेविषयी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडले असले तरी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यामुळे या दीर्घकाळात स्ट्राँग रूम सुरक्षिततेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर मनपा निवडणूक, आप ला संधी द्या, मोफत शिक्षण, पाणी, रुग्णालय यासारख्या अत्याधुनिक सुविधा)

    देशभरात मत चोरी आणि EVM हॅकिंगचे दावे गाजत असताना सर्वसामान्य मतदारांमध्ये EVM विषयी अविश्वासाचे वातावरण दिसून येत आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्र असल्याने सॅटेलाइट किंवा मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून EVM हॅकिंगची भीती जनतेत व्यक्त होत आहे.

    या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्ट्राँग रूम परिसर पूर्णपणे सुरक्षित राहावा, कोणताही बाह्य नेटवर्क सिग्नल किंवा इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप होऊ नये यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना निवेदन सादर करून स्ट्राँग रूम परिसरात जॅमर बसवण्याची तातडीची मागणी केली आहे. धोटे यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, नागरिकांचा EVM व मतदान प्रक्रियेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने अत्याधुनिक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असून त्यात जॅमर स्थापनेला प्राधान्य द्यावे.

  • चंद्रपूर मनपा निवडणुकीत आपचा झंझावात; मोफत पाणी, आरोग्य आणि शिक्षणाची घोषणा

    AAP development model : चंद्रपूर ११ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर नगरपरिषद नंतर वर्ष २०१२ मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली मात्र या काळात चंद्रपूर महानगरातील नागरिकांनी कांग्रेस व भाजपची सत्ता भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुंतलेली बघितली मात्र आता नागरिकांनी आगामी मनपा निवडणुकीत आम आदमी पक्षाला साथ द्यावी असे आवाहन आपचे जिल्हाअध्यक्ष मयूर राईकवार यांनी पत्रकारी परिषदेद्वारे केले आहे. (हे हि वाचा – दारू दुकानाला परवाना देताना लोकसंमती बंधनकारक करा – आमदार जोरगेवार)

    नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात चंद्रपूर मनपाच्या निवडणुका होणार आहे, यासाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे, मात्र यंदा आम आदमी पक्षाने प्रस्थापित पक्षांना आव्हान देण्याची तयारी केली असून त्यांनी पत्रकार परिषदेत चंद्रपूर मनपा मध्ये आप ची सत्ता आल्यावर नागरिकांनी कधी न बघितलेला चंद्रपूर निर्माण करण्याचा संकल्प म्हणजेच विकासाची गॅरंटी जाहीर केली आहे. AAP development model

    चंद्रपूर मनपाचे बजट ४५० कोटी रुपये आहेत मात्र त्यामानाने शहराचा विकास झालाच नाही, कांग्रेस भाजपच्या काळात शासकीय शाळांची संख्या कमी झाली, खासगी शाळांचे जाळे वाढले. आरोग्यासाठी खासगी रुग्णालयावर नागरिक अवलंबून आहे, रस्ते व नाले निकृष्ट दर्जाचे, आजही पाणी पुरवठा नियमित होत नाही. मात्र आप ने सत्ता आल्यावर शहरात मूलभूत गरज लक्षात घेत विकास करणार असल्याची ग्वाही दिली.

    महानगरात अशी असणार शिक्षण क्रांती

    शहरातील प्रत्येक झोनमध्ये जागतिक दर्जाच्या शाळेची उभारणी, शिक्षण पूर्णतः मोफत आणि जागतिक दर्जाचे, AI तंत्रज्ञान युक्त अत्याधुनिक शाळा, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांना परदेशी प्रशिक्षण दौरे.

    आरोग्याची संजीवनी

    चंद्रपूर मनपाच्या प्रत्येक झोनमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन रुग्णालयाची निर्मिती. मनपाच्या वतीने मोफत तपासणी, उपचार आणि औषधे. गरज भासल्यास खासगी रुग्णालयात मनपाच्या खर्चाने उपचार. मनपा क्षेत्रातील नागरिकांना उपचारासाठी पैसे लागणार नाहीत.

    चंद्रपूर महानगरात जलसमृद्धी

    पाणी पूर्णतः मोफत मिळणार, जुन्या थकीत पाणी बिलांची संपूर्ण माफी, प्रत्येक घरात स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा पुरवठा.

    शहरात येणार विकास क्रांती

    रस्ते नाल्याना २० वर्षाची लेखी हमी, एकदा रस्ता पूर्ण झाला तर पुढील २० वर्षे त्या रस्त्यावर खोदकाम होणार नाही. खड्डेमुक्त, टिकाऊ व दर्जेदार रस्त्यांची हमी, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई व काळ्या यादीत समावेश करणार.

    भाजप व कांग्रेसने चंद्रपूर मनपामध्ये सत्तेत आल्यावर फक्त भ्रष्टाचार करण्याला प्रथम प्राधान्य दिले मात्र नागरिकांच्या हिताचे काम केले नाही, याकरिता जनतेने आम्हाला संधी द्यावी असे आवाहन मयूर राईकवार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. सध्या आम आदमी पक्षाचे २२ उमेदवार मनपा निवडणुकीसाठी सज्ज आहे. महानगरातील आमच्या विकास व्हिजन वर जे पक्ष सहमत असतील आम्ही त्यांच्यासोबत युती करू अशी माहिती राईकवार यांनी दिली.

    आयोकीत पत्रकार परिषदेत आपचे राज्य पदाधिकारी सुनील मुसळे, राजू कुडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • अंधाराचा फायदा घेत तो घरात शिरला आणि…

    crime against women : भद्रावती १० डिसेंबर २०२५ (News३४) – २९ वर्षीय विवाहित महिलेच्या घरी प्रवेश करून मला तुझ्यासोबत बोलायचे आहे असे म्हणत त्या महिलेचा हात पकडत महिलेच्या अंगाला स्पर्श करण्याच्या प्रयत्न करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा भद्रावती पोलिसांनी दाखल केला आहे. (हे वाचा – जटपुरा गेट परिसरात एकाच दिवशी दोन घरफोड्या)

    ९ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता महिला घरी एकटी होती महिलेचा पती कामानिमित्त बाहेर गेल्याने संधीचा फायदा घेत भाऊराव उरकांडे ने सदर महिलेच्या घरी प्रवेश करीत दाराची कडी आतून लावली. मला तुझ्यासोबत बोलायचे आहे असे म्हणत त्या महिलेचा भाऊराव ने हात पकडला. त्याने तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न सुद्धा केला. crime against women

    इतक्यात पीडित महिलेचा पती घरी आला, पटीने दार ठोठावले असता भाऊराव ने घाबरत पळ काढला. या सर्व प्रकाराबाबत महिलेने भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली. पोलिसांनी भाऊराव उरकांडे यांच्यावर कलम ३२९ (४) व ७५ (१) (i) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

  • पशुपालकांसाठी सुवर्णसंधी! चंद्रपूरसह विदर्भातील 19 जिल्ह्यांत दुग्धविकास प्रकल्प राबवला जाणार

    Maharashtra dairy scheme : चंद्रपूर, दि. 10 डिसेंबर २०२५ (News३४) : महाराष्ट्र शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये सन 2024-25 ते 2028-29 या कालावधीत दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असून ग्रामीण भागातील पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा एकंदरीत दुध उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत. (हे वाचा – लोकसंमती शिवाय दारू दुकाने नकोच – आमदार जोरगेवार)

    यात 1) 50 टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेली एक गाय किंवा म्हैस वाटप 2) 75 टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या प्रत्यारोपण केलेली गाभण कालवड वाटप 3) 25 टक्के अनुदानावर प्रजनन पूरक खाद्य पुरवठा 3) 25 टक्के अनुदानावर फैट व एसएमएस वर्धक खाद्य पुरवठा 5) 50 टक्के अनुदानावर कडबा कुट्टी यंत्र वाटप 6) 100 टक्के अनुदानावर बहुवार्षिक चारा पिके व ठोंबेवाटप 7) 3 रुपये प्रती किलो अनुदानावर मुरघास पुरवठा. Maharashtra dairy scheme

    तरी सदर योजनांचा लाभ घेण्याकरिता जास्तीत  जास्त पशुपालकांनी www.vimddp.com या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. सदर अर्ज भरण्याचा कालावधी वर्षभर व २४ तास खुले असणार आहे. पशुपालक आपल्या घरून किवा ग्राम पंचायत किंवा दूध संकलन केंद्रावरून ऑनलाइन पध्दतीने अर्ज करू शकतील.

    अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे : 1) अर्जदाराचे आधारकार्ड २) भ्रमणध्वनी क्रमांक, ३) राशन कार्ड, 4) 7/12उत्तारा, 5) बँकपासबुक, 6) कुटुंबातील इतर सदस्यांचे  आधारकार्डचे  क्रमांक,  8) दुधाळ जनावरांचे बिल्ला क्रमांक लागणार आहेत.

    तसेच योजना संबंधी अधिक माहिती करिता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा दुध संकलन केंद्र किंवा डॉ.जिशांत नंदेश्वर जिल्हा प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांना 9158869208 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे डॉ. ह. सो. वरठी, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय चंद्रपूर यांनी कळविले आहे..

  • दारू दुकानांना नागरिकांचा विरोध वाढतोय; परवान्यांसाठी ‘लोकसंमती’ बंधनकारक करा – जोरगेवार

    Chandrapur liquor shop licenses : चंद्रपूर/नागपूर १० डिसेंबर २०२५ (News३४) –  चंद्रपूरात मोठ्या प्रमाणात मध्य परवाणे दिल्या जात आहे. मात्र नागरिवस्तीत दारु दुकाने सुरु करण्यासाठी दिल्या जात असलेल्या परवण्याला स्थानिकांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे लोकसमंतीशिवाय दारुचे दुकाने मंजुर करु नका अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रश्नोउत्तराच्या तासात बोलतांना सभागृहात केली आहे.

    नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज मध्य परवाना विषयावर चर्चा दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेल्या दारूच्या दुकानांबाबत ठाम मत मांडले. दारूबंदी उठवल्यानंतर चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर बीअर शॉपी, वाईन शॉप, आणि बीअर बार सुरू होत असल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी निर्माण होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. (हे वाचा – चंद्रपूर जिल्हा परिषदेमधील १२ कर्मचारी निलंबित)

                आमदार जोरगेवार म्हणाले की, ज्या भागात अशी दुकाने सुरू केली जात आहेत, त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोधाची लाट दिसून येत आहे. समाजजीवन, विद्यार्थी, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि सामाजिक वातावरण या सर्वांचा विचार करून दारू दुकान मंजुरीला लोक संमती आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. Chandrapur liquor shop licenses

                जनतेच्या भावना न विचारता परवाना दिला जाऊ नये. परवाना देतांना संबंधित वॉर्डातील नागरिकांची संमती घेणे अनिवार्य केले पाहिजे. लोकशाहीत लोकांची मते सर्वात महत्त्वाची आहेत, असे मत व्यक्त करत त्यांनी सरकारने या विषयावर तातडीने ठोस धोरण आणण्याची मागणी केली आहे.

  • यूडीआयडी न सादर केल्याने चंद्रपूर जिल्हा परिषदेतील १२ दिव्यांग कर्मचारी निलंबित

    UDID card verification : चंद्रपूर १० डिसेंबर २०२५ : दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्हा परिषद प्रशासनाने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी प्रक्रिया कठोरपणे राबवली आहे. या तपासणी मोहिमेअंतर्गत, आवश्यक असलेले यूडीआयडी (UDID – Unique Disability ID) अर्थात वैश्विक ओळखपत्र सादर न करणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे.

    सोमवारी (दि. ८) झालेल्या या कारवाईमध्ये पंचायत समितीतील काही कर्मचारी तसेच कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेने या कर्मचाऱ्यांना त्यांची आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरेशी संधी दिली होती, मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने ही कारवाई करण्यात आली. (हे हि वाचा – मूल तालुक्यातील सोमनाथ मंदिराला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा)

    ♿ प्रमाणपत्रांच्या तपासणीची गरज काय?

    दिव्यांग विभागाने ही विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यामागे अनेक महत्त्वाचे कारणे आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या शासकीय योजनांचा आणि आरक्षणाचा लाभ केवळ खऱ्या व पात्र कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर करून नोकऱ्या मिळवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच, काही कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची सत्यता संशयास्पद असल्याने, संपूर्ण राज्यात प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी यूडीआयडी क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. यूडीआयडी हे केंद्र सरकारद्वारे जारी केलेले ओळखपत्र असल्याने, ते प्रमाणपत्राची सत्यता आणि अचूकता सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे मानक ठरते. UDID card verification

    जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने ही कारवाई करून शासकीय नियमांचे पालन आणि पारदर्शकता राखण्यासंदर्भात कठोर संदेश दिला आहे. यूडीआयडी सादर करण्यास टाळाटाळ करणे म्हणजे त्यांच्या प्रमाणपत्रांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, ज्यामुळे प्रशासनाला निलंबनाचा निर्णय घेणे भाग पडले. पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत हे कर्मचारी निलंबित राहतील.

  • वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी; चंद्रपूर जिल्ह्यातील ‘बळी’चा आकडा ४२ वर

    tiger attack fatalities : चंद्रपूर १० डिसेंबर २०२५ (News३४) : चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कवडशी देश गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शंकरपूर-कवडशी रस्त्यालगत शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी (दि. ९) उघडकीस आले. शेषराव नथु झाडे (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरातील वाघीण निघाली सह्याद्रीला)

    🔍 शोधानंतर लागला मृतदेह

    मिळालेल्या माहितीनुसार, शेषराव झाडे हे सोमवारी (दि. ८) सायंकाळी शंकरपूर येथे बाजारहाट करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यानंतर ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. त्यांचा संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी मंगळवारी सकाळी शोध घेण्यास सुरुवात केली. दिवसभर शोध घेऊनही ते न सापडल्याने, मंगळवारी सायंकाळी गावकऱ्यांनी शेतशिवारात संयुक्त शोध मोहीम सुरू केली.

    शोध मोहिमेदरम्यान, शंकरपूर आणि कवडशीला जोडणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एमएसईबी (महावितरण) कार्यालयाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावरील जखमा आणि परिसरातील परिस्थितीवरून त्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. tiger attack fatalities

    📈 मानव-वन्यजीव संघर्षाचा वाढता धोका

    शेषराव झाडे यांच्या मृत्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्षातील बळींचा आकडा पुन्हा वाढला आहे. चंद्रपूर जिल्हा हा मोठ्या प्रमाणात वनसंपदा आणि वन्यजीव (विशेषतः वाघ) असलेली संवेदनशील जागा आहे.

    आजवर जिल्ह्यात झालेल्या या संघर्षामध्ये एकूण ४२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सर्वाधिक बळी वाघाच्या हल्ल्यात झाले आहेत, ज्यांची संख्या ३८ आहे. याव्यतिरिक्त, बिबट्याच्या हल्ल्यात २ तर अस्वल आणि हत्ती यांच्या हल्ल्यात प्रत्येकी अशा एकूण ४२ नागरिकांचा बळी गेला आहे. वन्यजीव लोकवस्तीत येत असल्याने आणि शेतकरी व मजूर शेतीच्या कामासाठी जंगलात जात असल्याने हा संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. वन विभागाने या वाढत्या धोक्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

  • सराई वॉर्डात यादव अहिर समाज कृष्ण मंदिराचे भूमिपूजन

    Krishna Mandir foundation : चंद्रपूर १० डिसेंबर २०२५ (News३४): चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून आणि नगरसेविका सौ. छबुताई वैरागडे यांच्या अथक परिश्रमातून जटपूरा प्रभाग क्रमांक ०७ मधील सराई वार्ड येथे यादव अहिर समाज कृष्ण मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच उत्साहात पार पडले.

    दिनांक ०९ डिसेंबर २०२५ रोजी हा शुभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ कासनगोट्टूवार यांच्या शुभहस्ते मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षातील बळीचा आकडा ४२ वर)

    🌟 प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

    या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने भाजपा जिल्हा महामंत्री रविंद्र गुरनुले, माजी नगरसेवक ऍड. राहुल घोटेकर, भाजपा महामंत्री, महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ. छबूताई वैरागडे, युवा मोर्चा सचिन प्रताप यादव, चेतन यादव, आमीत वैरागडे, अरुण वैरागडे, कपिल वैरागडे, अमजत भाई, प्रदीप यादव, बबलूजी यादव, हर्षदजी मटाले, अक्षय गुंडे, सागर नसरे यांचा समावेश होता. Krishna Mandir foundation

    यासोबतच लता गुंडे, तृप्ति यादव, पदमिनी सदभयै, नीलम यादव, रश्मिताई बिलसे, श्वेता यादव, निलिमा खोखले, वंदना सदभयै, अमिता यादव, राजजी गुंडे, सतीशजी गुंडे, सुभाषजी चौहान, प्रलोक यादव, प्रताप यादव, संदीप सदभये, सोनाली गुंडे, रोशनी गुंडे, सारिका यादव आणि वार्डातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    🗣️ मार्गदर्शन व सूत्रसंचालन

    भूमिपूजन समारंभानंतर मान्यवर पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगराचे अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक ऍड. राहुल घोटेकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. उपस्थितांचे आभार श्री. चेतन यादव यांनी मानले.

    या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहिर यादव समाजाच्या समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले. या भूमिपूजनामुळे सराई वार्डात धार्मिक आणि सामाजिक एकजुटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • कत्तलीसाठी नेणारी २० जनावरे वाचली; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

    animal cruelty Transport : ब्रह्मपुरी ९ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने ८ डिसेंबर रोजी कत्तलीसाठी नेणारे व बांधून ठेवलेल्या २० जनावरांची सुटका करीत तब्बल २४ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली, माहितीच्या आधारे दोन पिकअप वाहने थांबवित झडती घेतली असता वाहनात ६ गोवंशीय जनावरे मिळून आले. (हे हि वाचा – तंबाखू माफियांवर होणार मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री फडणवीस)

    कत्तलीसाठी नेत होते जनावरे

    सदर गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे चालकांनी सांगितले, व अजून काही जनावरे असल्याची त्यांनी माहिती दिली, चालकांनी सांगितलेल्या ठिकाणी गुन्हे शाखेचे पथक पोहचले असता तिथे १४ गोवंशीय जनावरे बांधलेल्या अवस्थेत होते. animal cruelty Transport

    ३ आरोपींवर गुन्हा दाखल

    आरोपीच्या ताब्यातून २० गोवंशीय जनावरे सहित दोन पिकअप वाहने असा एकूण २४ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी २० वर्षीय मिलिंद जितेंद्र कोवे राहणार उदापूर ब्रह्मपुरी, ३३ वर्षीय अफसर अली सय्यद ब्रह्मपुरी व पाहिजे असलेला आरोपी पहेलवार राहणार ब्रह्मपुरी यांच्या विरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० व कलम ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम ४९ अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी जयंत चुनारकर, अजित शेंडे व नितेश महात्मे यांनी केली. घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.