Tag: चंद्रपूर मराठी बातम्या

  • पोम्भूर्ण्यातील या ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व

    पोम्भूर्ण्यातील या ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व

    News34 chandrapur

    पोंभूर्णा :- वेळवा माल ग्रामपंचायतीवर शिवसेना (उबाठा)ची सत्ता असून ठल्याप्रमाणे अडीच- अडीच वर्षासाठी सरपंचपदाची वाटाघाटी करून आज झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जितेंद्र मानकर यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली.शिवसेना कार्यकर्त्यांनी मानकर यांची बिनविरोध निवड जाहीर करताच फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.

     

    वेळवा गट ग्राम पंचायतीच्या सरपंच सिमा निमसकार यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी बुधवारी ग्राम पंचायत वेळवा माल कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

     

    यावेळी सरपंच पदासाठी जितेंद्र मानकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अमरदिप खोडके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक विकास तेलमासरे यांनी जितेंद्र मानकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.यावेळी सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरपंच पदी निवड झाल्यानंतर नवनियुक्त सरपंच यांनी शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे व शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार,गणेश वासलवार निलेश लोणारे यांच्या नेतृत्वाखाली व गावकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच जितेंद्र मानकर यांनी दिली आहे.

     

    यावेळी शिवसेना उबाठा चे तालुका प्रमुख आशिष कावटवार,शहर प्रमुख गणेश वासलवार ,नगरसेवक बालाजी मेश्राम,माजी सरपंच सीमा निमसकार, सदस्य अतुल जाधव, सुरेखा कुडमेथे, निता येरमे, ममता जाधव,रमेश कुडमेथे, समीर लोणारे, मुना लोणारे, वनवासू येरमे माजी सरपंच, मधुकर मेश्राम,विलास कामिडवार,अनिल निमसकार,भाऊजी कुडमेथे प्रशांत कावटवार,अनिल मडावी,सतीश लोणारे,विनोद खोब्रागडे,प्रशिक मानकरयांची उपस्थिती होती.

  • चंद्रभागा चौधरी यांचं निधन

    चंद्रभागा चौधरी यांचं निधन

    Sad news : निधन वार्ता – नवभारत विद्यालयाचे शिक्षक, न.भा.कर्मचारी पस्थसंस्थेचे संचालक, महाराष्ट्र राज्य ओबीसी काँग्रेस सेलचे राज्य सरचिटणीस, क्रांती ज्योती नागरी सह.पथसंस्थेचे उपाध्यक्ष, माळी महासंघाचे पदाधिकारी श्री.गुरुदास ऋषीदेव चौधरी यांची आई श्रीमती, चंद्रभागा ऋषिदेव चौधरी (८६) यांचे आज दिनांक २७/१२/२०२३ रोजी सायंकाळी ६-०० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. (हे वाचा – चंद्रपुरात दोघांना एमडी पावडर सह अटक)

    त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक २८/१२/२०२३ ला दुपारी १२-०० वाजता निघून उमा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. समस्त माळी समाज बांधव, माळी महासंघ,सावित्रीबाई फुले महिला मंडळ,बचतगट, महात्मा फुले समता परिषद, माळी समाजाच्या सर्व संघटनेकडून मृतात्म्यास चिरशांती मिळो अशी भावपूर्ण श्रद्धांजली.

  • मरेगाव ग्राम पंचायत सरपंच पदी ज्योत्स्ना पेंदोर तर उपसरपंच निलेश धोटे

    मरेगाव ग्राम पंचायत सरपंच पदी ज्योत्स्ना पेंदोर तर उपसरपंच निलेश धोटे

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – मुल तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मरेगाव ग्राम पंचायत येथील निवडणुकीच्या वेळेस निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने परत दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी परत सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यामधे सरपंच पदासाठी ज्योत्स्ना पेंदोर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.सरपंच पदासाठी दुसरा अर्ज न आल्याने ज्योत्स्ना पेंदोर यांची सरपंच म्हणून अविरोध झाल्याचे घोषित केले. तर उपसरपंच पदासाठी निलेश धोटे व माजी सरपंच लक्ष्मी लाडवे आणि मंगला घाटे या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

     

    यामधे कांग्रेस पक्षाच्या लक्ष्मी लाडवे यांनी आपसी सामंजस्याने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी यांनी उपस्थित सहा सदस्यांना उपसरपंच पदासाठी हात वर करून मतदान घेतले असता निलेश धोटे यांचे बाजूने पाच तर मंगला घाटे यांचे बाजूने फक्त एक हात वर झाल्याने निलेश धोटे यांना उपसरपंच म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. आणि भाजपच्या मंगला घाटे यांना केवळ एक मत मिळाल्याने त्यांना हार मानवी लागली. निवडणुकीला ज्योत्स्ना पेदोर,निलेश धोटे,मारोती वेलके,लक्ष्मी लाडवे,आकाश वाकुडकर, मंगला घाटे उपस्थित होते.

     

    अखेर मरेगाव ग्राम पंच्यायत काँग्रेसच्या ताब्यात व कांग्रेस नेते सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात विजयी झाले असून सरपंच,उपसरपंच यांचे तालुका कांग्रेस कमिटी कार्यालयात पेढा चारून सरपंच,उपसरपंच व उपस्थित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी कांग्रेस नेते संतोषसिंह रावत, माजी तालुका अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, यांनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

  • आमदार निधीचा वापर नागरिकांच्या हितासाठी, मोठ्या इमारती व बगीचे बांधण्यात नाही – आमदार किशोर जोरगेवार

    आमदार निधीचा वापर नागरिकांच्या हितासाठी, मोठ्या इमारती व बगीचे बांधण्यात नाही – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूरातील विद्यार्थी प्रतिभाशाली आहे. प्रत्येक क्षेत्रात त्याने भरारी घेतली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. आपण मतदार संघात ११ अभ्यासिका तयार करत आहोत. यातील आज दुस-या अभ्यासिकेच्या इमारतीचे लोकार्पण झाले आहे. अभ्यासा बरोबरच त्यांना विचारांची देवाण – घेवाण करता यावी, आपले अनुभव दुस-या विद्यार्थ्यांपर्यत्न पोहचविता यावेत. अभ्यासासाठी पूरक असे उत्तम वातावरण निर्माण व्हावे यासाठी आपण चंद्रपूरात ५० लक्ष रुपयातून खुली अभ्यासिका तयार करणार असुन हा चंद्रपूरातील पहिला प्रयोग असणार आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     

    आमदार निधीतून वडगाव येथील नानाजी नगर येथे अभ्यासिकीचे इमारत बांधकाम करण्यात आले आहे. आज सदर ईमारतीचे आमदार किशोर जोरगेवर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी नगर सेवक पप्पू देशमूख यांची तर प्रमुख अतिथी म्हणून नवदत्त क्रीडा मंडळाचे अध्यक्ष हरिचंद्र येरगुडे, विनोद निखाडे, जनविकास युवा आघाडीचे अक्षय येरगुडे, जनविकास महिला आघाडी प्रमुख मनीषा बोबडे, सार्वजनिक दत्त मंदिराचे सचिव व्यंकटेश उपगन्लावार, बाळू पारखी, मनोज भैसारे आदींची उपस्थिती होती.
    यावेळी बोलताना ते पूढे म्हणाले की, केलेल्या संकल्पाची पुर्तता होते. तो आनंद मोठा असतो.

     

    आमदार होताच चंद्रपूर मतदार संघात गरिब – गरजु विद्यार्थ्यांना निशुल्क अभ्यास करता यावा याकरिता 11 अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प केला होता. तो पूर्ण होउ लागला आहे. आज आपण मतदार संघातील दुस-या अभ्यासिकेच्या इमारतीचे लोकार्पण करत आहोत. ही दत्त मंदिर येथील लोकार्पीत झालेली अभ्यासिकेची ईमारत शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात नक्कीच योगदान देणारी ठरेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     

    जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर मतदार संघाचा विकास होत आहे. हा विकास होत असताना समाजातील सर्व घटकांना स्पर्श करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. मतदारसंघातील ग्रामीण भागात आपण विकास पोहचवू शकलो आहे. महाविकास आघाडी सरकार आणि आता शिंदे- फडणविस सकरकार या दोनही काळात आपण विविध विभागातून मोठा निधी खेचून आणला आहे. या निधीतून विकासकामे करत असतांना मोठ्या इमारती, बगीचे बांधण्यावर आपण भर न देता लोकउपयोगी वास्तु उभारण्यावर लक्ष केंद्रीत केले. समाजाचे प्रबोधन व्हावे यासाठी आपण सामाजिक भवन उभारले आहे. हे सामाजिक भवन भविष्यात सांस्कृतीक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमासाठी उपलब्ध असणार आहे.

     

    तर कोरोणा काळात विद्यार्थ्यांवर कोसळलेल्या संकटात आपण विद्यार्थ्यांसाठी मतदार संघात 11 अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प केला होता. यासाठी मोठ्या निधीची गरज होती. ती पूर्ण करतांना अनेक अडचणी आल्यात मात्र केलेला संकल्प पुर्ण करण्याचा निर्धार आपण केला होता. याचेच परिणाम स्वरुप आज आपण मतदार संघातील दुस-या अभ्यासिकेच्या ईमारतीचे लोकार्पण करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. आज इमारतीचे लोकार्पण झाले आहे. येथे पुस्तक व ईतर साहित्य खरेदीसाठी आपण आणखी निधी देणार असल्याचेही ते यावेळी बोलताना ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन संचालन रमा देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    किशोर जोरगेवार हे समाज उपयोगी सुचनांची तात्काळ दखल घेणारे आमदार – पप्पू देशमूख

    आमदार किशोर जोरगेवार हे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असतात. त्यांना एखादी मागणी केली व ती लोकउपयोगी असली कि ते ती पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. आज येथे लोकार्पित झालेली अभ्यासिका याचाच प्रत्यय देणारी आहे. आपण त्यांना खुल्या अभ्यासिकेची मागणी केली ती ही समजून घेत त्यांनी यासाठी ५० लक्ष रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. एकंदरीतच किशोर जोरगेवार हे समाज उपयोगी सुचनांची तात्काळ दखल घेणारे कार्यक्षम आमदार असल्याचे यावेळी माजी नगरसेवक पप्पू देशमूख म्हणाले.

  • चंद्रपूर मनपाचा अजब कारभार

    चंद्रपूर मनपाचा अजब कारभार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त लागणाऱ्या एलईडी स्क्रीनसाठी चंद्रपूर महानगरपालिकेने निविदा काढली आहे. बल्लारपूर शहरात हा कार्यक्रम होत असतानाही चंद्रपूर महानगरपालिकेने निविदा काढून आपली हद्दपार केली आहे.

    दुसऱ्या शहरातील एल.ई.डी. स्क्रिनसाठी चंद्रपूर मनपाने निविदा कशी काढली, असा प्रश्न आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी उपस्थित केला आहे. हि निविदा काढण्यास आम आदमी पार्टीने विरोध दर्शवला असून, चंद्रपूरच्या जनतेचा पैसा इतर ठिकाणी खर्च करण्याचा अधिकार आयुक्त विपीन पालीवाल यांना कोणी दिला, असा सवाल आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी विचारला आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मर्जी राखण्यासाठी ही निविदा काढण्यात आली, असा आरोप केला आहे.

    चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांनी जावक क्रमांक: चंशमनपा/विद्युत्त/२०२३/३१० दिनांक : २२/१२/२०२३ नुसार ई-निविदा सुचना काढली आहे. आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका, जि. चंद्रपूर यांचे वतीने खालील कामासाठी दोन लिफाफा पद्धतीने ई निविदा पद्धतीच्या पंजीबद्ध कंत्राटदाराकडून/फर्मकडुन ई निवीदा मागविण्यात आल्या. निवीदेच्या विस्तृत नमुना महाराष्ट्र शासनाच्या http://www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक २२/१२/२०२३ पासून पाहण्यास उपलब्ध आहे. ई-निविदा प्रसिद्धीचा तपशील कामाचे नाव चंद्रपुर व बल्लारपूर शहरात ४ एल.ई.डि. स्क्रिन उभारणीचे काम असे दाखविण्यात आले आहे. ऑनलाईन निविदा विक्री व स्वीकृती दिनांक दिनांक २२/१२/२०२३ ते २७/१२/२०२३ ला दु. १२.०० वाजेपर्यंत आणि ऑनलाईन निविदा उघडणी दिनांक दिनांक २८/१२/२०२३ ला दु. ३.०० वाजता असे नमूद आहे. ही जाहिरात एका स्थानिक दैनिकांत देण्यात आली आहे.

     

    राईकवार यांनी सांगितले कि, चंद्रपूर महानगरपालिका आणि बल्लारपूर नगरपालिका या दोन स्वतंत्र संस्था आहेत. कोणतेही काम करताना सीमेच्या बाहेर जाऊन काम करता येत नाही. परंतु, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी यांनी केवळ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मर्जी राखण्यासाठी हा निविदा काढली. या निविदामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या तिजोरीवर वाढीव खर्च होणार आहे. त्यामुळे अवास्तव खर्च टाळण्यासाठी ही निविदा रद्द करण्यात यावी, अशी मागणी राईकवार यांनी केली आहे.

  • चंद्रपुरात आज रात्री 12 वाजेपर्यंत “ध्वनिक्षेपक वाजणार””

    चंद्रपुरात आज रात्री 12 वाजेपर्यंत “ध्वनिक्षेपक वाजणार””

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त दिनांक 27 डिसेंबर रोजी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी एका आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्याकरिता सवलत देण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्याकरीता सन-2023 मधील राखीव सवलतीच्या दिवसातून ही सवलत मंजूर करण्यात आली आहे. निश्चित करण्यात आलेल्या सवलतीच्या दिवशी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन व त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर करता येईल, असेही जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेशात नमूद आहे.

  • चंद्रपूर पोलीस दलातील श्वान ग्रेसी आणि सिम्बा झाले सेवानिवृत्त

    चंद्रपूर पोलीस दलातील श्वान ग्रेसी आणि सिम्बा झाले सेवानिवृत्त

    News34 chandrapur

    चंद्रपूर – पोलीस दलात नेहमी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना सेवानिवृत्तीचा निरोप दिला जातो परंतु चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने आपल्या श्वान पथकातील निवृत्त झालेल्या श्वानांचा निरोप समारंभ आयोजित करीत या मुक्या शिलेदारांना मानाची सलामी दिली आहे.

     

    दिनांक 25 डिसेंबर रोजी चंद्रपूर शहर पोलीस दलातील बॉम्बशोधक पदकाचे श्वान ग्रेसी आणि सिंबा हे आपली सेवा कार्यकाल निभावून यशस्वीपणे पूर्ण करून सेवेतून निवृत्त झाले.

     

    त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेला होता यासाठी त्यांचे सर्व मित्र म्हणजेच पोलीस दलातील श्वान पथकाचे(डॉग Squad) सदस्य श्वान पवन, हरी ,अर्जुन, मंगल ,बोल्ट ,मेरी ,व्हिक्टर ,मेस्सी , आणि नुकतेच चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या शानपथकात दाखल झालेले रियो आणि कोको हे हजर होते.

     

    त्यांचे हँडलर देखील विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होते त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी गृह पोलीस उपाधीक्षक गृह श्रीमती राधिका फडके राखीव पोलीस निरीक्षक श्री नवघरे श्वान पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील हे यावेळी उपस्थित होते.

     

    यावेळी निवृत्त होणाऱ्या ग्रेसी आणि सिंबा या सत्कारमूर्तींचा शाल आणि पुष्पहार घालून त्याचप्रमाणे मानाची झूल घालून सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.

    त्याच त्याच वेळी सर्व श्वान दोस्ताना मेजवानी देखील देण्यात आली, या समारंभात उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार हे भावुक झालेले होते.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 27 डिसेंबर रोजी चंद्रपूर शहरात आगमन होणार असून ते 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहे.

     

    मुख्यमंत्री शिंदे यांचे सायंकाळी 4.45 वाजता मोरवा विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे ते उपस्थित राहतील. सायंकाळी 6.30 वाजता बल्लारपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

  • शाळा परिसरातील तंबाखू विक्री,  सक्त कारवाई करा – जिल्हाधिकारी गौडा

    शाळा परिसरातील तंबाखू विक्री, सक्त कारवाई करा – जिल्हाधिकारी गौडा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या आहेत. तसेच विक्रीस मनाई करण्यात आलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करून संबंधीतांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.

     

    राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी गौडा यांनी वरील आदेश दिले.  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, पोलिस उपअधिक्षक राधिका फडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, शिक्षणाधिकारी (प्राथमीक) राजकुमार हीवरे, आरोग्य विभागाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर उपस्थित होते.

     

     जिल्हाधिकारी यांनी यावेळी सिगरेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्यांतर्गत विविध बांबींचा आढावा घेतला. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी विशेष मोहिमेंतर्गत पोलिस व शिक्षण विभागाची मदत घेण्याचे त्यांनी सांगितले.

     

    यावेळी मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वनिता गर्गेलवार, डॉ.नयना उत्तरवार, शिक्षण विभाग समग्रचे समन्वयक सुर्यकांत भडके, उपशिक्षणाधिकारी निखीता ठाकरे, अन्न सुरक्षा अधिकारी जी. शी. सातकर, स्थानिक गुन्हे शाखेच्या अपर्णा मानकर व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

  • १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर ‘नाट्यकलेचा जागर’ कार्यक्रम

    १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर ‘नाट्यकलेचा जागर’ कार्यक्रम

    News34 chandrapur

    चंद्रपूर – रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित, नाट्य संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात मानाचे शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जानेवारी २०२४ ते मे २०२४ याकालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मोठ्या स्वरूपात आणि धुमधडाक्यात साजरे होणार आहे. या संमेलनाचा महत्वाचा भाग महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव दिनांक १५ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.

     

    ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, ठाणे, नवीमुंबई , मुंबई येथे होणार आहे.

     

    यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा प्राथमिक, उपांत्य व अंतिम फेरी अश्या तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे. १५ जानेवारी पासून प्राथमिक फेरी सुरू होऊन यातील निवडक कलाकृतींची उपांत्य फेरी घेण्यात येणार आहे व त्यानंतर मुंबई येथे अंतिम फेरी होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी ४ दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे.

     

    व्यावसायिक कलावंतांबरोबर प्रथमच महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना १०० व्या नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या नाट्यकलेचा जागरमधून मिळणार आहे.

     

    स्पर्धेची रोख पारितोषिके

    एकांकिका स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. २,००,०००/- (खास स्पर्धेसाठी लिखाण केलेल्या एकांकिकेस) अथवा सर्वोत्कृष्ट १,००,०००/-, उत्कृष्ट रू. ७५,०००/-, उत्तम रू. ५०,०००/-, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके रू. २५,०००/-

     

    बालनाट्य स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. ७५,०००/-, उत्कृष्ट रू. ५०,०००/-, उत्तम रू. २५,०००/-, तर तीन उत्तेजनार्थ रू. १०,०००/-

     

    नाट्य अभिवाचन स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. २५,०००/-, उत्कृष्ट रू. १५,०००/-, उत्तम रू. १०,०००/-, दोन उत्तेजनार्थ रू. ५,०००/-

    नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. २५,०००/-, उत्कृष्ट रू. १५,०००/-, उत्तम रू. १०,०००/-, दोन उत्तेजनार्थ रू. ५,०००/-

     

    एकपात्री / नाट्यछटा स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. १५,०००/-, उत्कृष्ट रू. १०,०००/-, उत्तम रू. ५,०००/-, दोन उत्तेजनार्थ रू. २,५००/-, लेखन/दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/स्त्री अभिनय/पुरूष अभिनय वैयक्तिक रोख पारितोषिके (एकांकिका स्पर्धेसाठी) रु. १५,०००/-, रु. १०,०००/- , रु. ५०००/- व स्मृतीचिन्ह. बालनाट्य स्पर्धेसाठी रु. ७५००/-, रु. ५०००/-, २५००/- देण्यात येणार आहेत.

     

    तसेच या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस देखील भरघोस अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी कलावंत , तंत्रज्ञ यांना सहभाग पत्र देण्यात येणार आहे. एकांकिकेसाठी प्रवेश फी रू. १०००/- तर बालनाट्यासाठी रू. ५००/- व इतर सर्व स्पर्धांसाठी रू. १००/- राहील.

     

    नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवाचा मान मिळालेल्या विभागाचे नाव, केंद्र प्रमुख आणि सहयोगी प्रमुख यांची नावे आणि संपर्क खालीलप्रमाणे :

    विभाग चन्द्रपुर केंद्र प्रमुख डॉ जयश्री कापसे गावंडे ,सहयोगी इरफ़ान शेख़ , जगदीश नंदूरकर असून या सर्व स्पर्धांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विविध स्पर्धांची माहिती, नियामवली www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ दिनांक ३१ डिसेंबर २०२३ सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. त्यानंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या चंद्रपूर केंद्राची प्राथमिक फेरी दिनांक २४ जानेवारी ते २६ जानेवारी या दरम्यान नाट्य संगीत पद गायन स्पर्धा, नाट्यछटा व नाट्य वाचन स्पर्धा, एकांकिका, बालनाट्य इत्यादी स्पर्धा होणार आहेत.

     

    स्पर्धकांनी इरफान शेख संपर्क क्रमांक
    9665413821, जगदीश नन्दुरकर संपर्क क्रमांक
    9545501940, स्वप्निल मेश्राम 8766545955
    यांचेशी संपर्क साधावा.

    जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी, शाळा, संगीत विद्यालय, महाविद्यालय, हौशी संस्थां, विद्यापीठाच्या व इतर महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.