Municipal office late staff : चंद्रपूर १५ डिसेंबर २०२५ (News३४) – वर्ष २०१२ रोजी चंद्रपूर महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर प्रथमच १३ वर्षांनी मनपाला IAS दर्जाचा अधिकारी लाभला, मनपा आयुक्त नरेश अकनूरी यांनी पदभार संभाळल्यावर कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा आतंक, एकाच दिवशी दोघांची शिकार)
१५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मनपा आयुक्त अकनूरी कार्यालयात दाखल झाले, मात्र यावेळी अनेक कर्मचारी कार्यालयात आले नव्हते, कर्मचाऱ्यांसह अधिकारी कार्यालयीन वेळेत मनपात येत नसल्याचे निदर्शनास आल्यावर मनपा आयुक्तांनी थेट मनपाचे प्रवेशद्वार बंद केले.
काही वेळानी कर्मचारी व अधिकारी मनपात दाखल झाले असता, प्रवेशद्वार बाहेरून बंद असल्याचे समजले, मनपात २ वर्षांपासून प्रशासक बसल्यावर अधिकारी व कर्मचारी पूर्णतः बेभान झाले होते, कार्यालयीन वेळेवर न पोहोचता अधिकारी आपल्या सोयीनुसार कार्यालयात येत होते. मात्र आजच्या प्रकारामुळे मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली असल्याचे चित्र दिसले. Municipal office late staff
नेहमी नागरिकांना बाहेर ताटकळत उभे ठेवणारे अधिकारी आज स्वतः बाहेर ताटकळत उभे होते. मनपा आयुक्त अकनूरी यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत असे वागणे व त्यांना शिस्त लावण्याचा हा प्रकार दिवसभर जनमानसात चर्चेत होता.
Chandrapur political situation : येत्या ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत निवडणूक कार्यक्रम जाहीर करा असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आजची राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने एकाच पक्षाचे झालेले २ भाग या निवडणुकीत रंगत आणणार आहे. मागील ३ वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील महानगरपालिका व जिल्हा परिषद व नगरपालिका मध्ये प्रशासक बसल्याने निवडणूका आरक्षण मुळे लांबणीवर गेली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. Political parties Chandrapur municipal corporation election
चंद्रपूर जिल्ह्यात १ महानगरपालिका, जिल्हा परिषद, ८ नगरपालिका व १५ पंचायत समित्या आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत पक्षीय बलाबल मध्ये भाजपची आघाडी होती, १७ प्रभागात ६६ नगरसेवकांची सदस्य संख्या असलेल्या महानगरपालिकेत भाजप ३६, कांग्रेस १२, राष्ट्रवादी कांग्रेस २, शिवसेना २ , बसपा ८, मनसे २ व अपक्ष ४ अशी सदस्यसंख्या होती. राज्यातील राजकीय उलथापूलथीमध्ये नगरसेवक विविध पक्षात दाखल झाले आहे. Chandrapur district council election political analysis
चंद्रपूर जिल्हा परिषद एकूण जागा ५६, पक्षीय बलाबल भाजप ३३, कांग्रेस २० इतर ३.
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण नगरपालिका ८ आहे ज्यामध्ये बल्लारपूर, राजुरा, वरोरा, भद्रावती, चिमूर,मूल,ब्रह्मपुरी व नव्याने घुग्गुस नगरपालिकेचा समावेश झाला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५ भाजप तर १ जागेवर कांग्रेसचे विजय झाला असून भाजपसाठी सध्याची परिस्थिती अनुकूल आहे. चंद्रपूर महानगरात नागरिक पाणी समस्येने त्रस्त असून यावर अजूनही तोडगा निघालेला नाही त्यामुळे चंद्रपुरात निवडणूक अटीतटीची होणार अशी चिन्हे आहे.
राजकीय स्थिती
चंद्रपूर शहरात भाजपची सध्याची परिस्थिती बिकट अवस्थेत आहे, भाजपच्या २ आमदारांमध्ये विधानसभा क्षेत्रावरून कोल्ड वार सुरु आहे, मात्र आमदार किशोर जोरगेवार भाजपची नैया पार लावणार अशी चित्रे आहे. चंद्रपुरात अमृत व भूमिगत गटार योजनेच्या खोदकामावरून नागरिक प्रचंड नाराज आहे. रस्ते बनल्यावर वारंवार ते खोदल्या जात असून वाहतुकीची समस्या बिकट परिस्थितीमध्ये जात आहे त्यामुळे धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस चे विभाजन झाल्यावर पाहल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना व राष्ट्रवादी आमने सामने येणार, विशेष बाब म्हणजे या दोन्ही पक्षाची परिस्थिती जिल्ह्यात पूर्णतः मजबूत नाही..परिस्थिती जैसे थे आहे.
Padyatra : राज्याचे हेविवेट नेते आणि भाजपाची मुलुख मैदानी तोफ सुधीर मुनगंटीवार यावेळी मंत्रिमंडळात नाहीत. भाजपची सत्ता आली आणि मुनगंटीवार मंत्रिमंडळात (cabinet expansion) नाहीत, असे आजवर कधी घडलेच नव्हते. पण यावेळी हे विपरीत घडले. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मुनगंटीवार स्वतः नाराज नाहीत. पण त्यांच्या समर्थकांनी नाराजी स्पष्ट बोलून दाखवली आहे. अनेक कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले आहेत.
चंद्रपुरातील अनेक लाडक्या बहिणींचे ऊर आपल्या भावाचं नाव नसल्यानं भरून आलं आहे. ज्यांच्यासाठी मुनगंटीवार धावून गेले असे अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक, निराधार माता-भगिनी, विद्यार्थी, शेतकरी यांचा कंठ दाटून आला आहे. मुनगंटीवार यांनी ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ अशी भूमिका घेतली असली तर आम्ही गप्प राहणार नाही, असं या सगळ्यांची ठरवलं आहे. त्यातूनच मुनगंटीवार यांचे चाहते चंद्रपुरातून पायीच निघाले,पुढे ते नागपूर नंतर दिल्लीकडे कूच करणारं आहे.
चंद्रपूरपासून दिल्ली गाठेपर्यंत आमचे पाय रक्तबंबाळ झाले तरी चालेल पण सुधीरभाऊंना मंत्रिपद मिळायलाच हवं, अशी भूमिका या सगळ्यांनी घेतली आहे. मुनगंटीवार यांचे चाहते एक एक करीत या अनोख्या पदयात्रा (padyatra) सत्याग्रहात सहभागी होत आहेत. त्यांना एकच उत्तर हवं आहे. का सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांना मंत्रिमंडळातून ऐनवेळी का वगळण्यात आलं. सुरुवातीला हे सगळे कार्यकर्ते नागपूर येथे पायी पोहोचणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीकडे कूच करणार आहेत.
मागणी रास्तच
‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे राज्यगित ज्यांनी दिलं त्या सुधीर मुनगंटीवार यांनाच दिल्ली मंत्रिपदापासून कशी काय वंचित ठेऊ शकते असा प्रश्न या सगळ्या कार्यकर्त्यांना भेडसावत आहे. कार्यकर्त्यांची चंद्रपूर ते नागपूर अशी पदयात्रा (padyatra) मंगळवारी दुपारी (17 डिसेंबर) सुरू झाली आहे. नागपूरमध्ये या कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर ठिक अन्यथा त्यांनी पुढचा प्रवास दिल्लीच्या दिशेने करण्याचा पक्का निर्धार केला आहे.
चंद्रपूरमधून निघालेले हे कार्यकर्ते या थंडीत तहान-भूक विसरून पायपीट करीत राहणार आहेत. पडोली, भद्रावती, वरोरा, खांबाळा या भागातून कार्यकर्ते या पदयात्रेत जुळले जाणार आहेत. नागपुरात पोहोचेपर्यंत या सत्याग्रह पदयात्रेतील कार्यकर्त्यांची संख्या मोठी होईल, असा विश्वास मुनगंटीवार यांच्या समर्थकांचा आहे.
कारवां बढता रहे..
‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’, अशी मुनगंटीवार यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. आपल्या 30 वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी माणसं जोडली. त्यामुळं त्यांच्यासाठीही आता चाहत्यांचा ‘कारवाँ’ तयार होत आहे. सद्य:स्थितीत फारुख शेख, हरीश व्यवहारे, सुरज पारखी, अमित तामटकर, अरविंद बोरकर, देवानंद थोरात, भोजराज शिंदे, मनोज ठेंगणे, दीपक सिंग आदी कार्यकर्ते चंद्रपुरातून निघाले आहेत. मात्र ही संख्या आता वाढत जाणार आहे. वाटेत लागणाऱ्या प्रत्येक गावातून सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते या सत्याग्रह पदयात्रेत जुळत जाणार आहेत.
मी नाराज नाही. नाराज होणारा मी माणूस नाही. पण मंत्रिमंडळात माझा समावेश आहे, हे निश्चित झाले होते. शपथविधीचा दिवस आल्यावरही मला फोन आला नाही. यामागचे कारण मला कळले नाही. मला ते कारण जाणून घ्यायचे आहे. बाकी मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती प्रामाणिकपणे पार पाडेल. पूर्ण शक्तीने जबाबदारी पार पाडणे, हे माझे कर्तव्य आहे. हे कर्तव्य मी आजपर्यंत निभावत आलो. यापुढेही निभावत राहणार आहे, असे मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. त्यामुळं कधीही न हरणाऱ्या मुनगंटीवार यांच्यासाठी लढवय्ये कार्यकर्तेही सज्ज झाले आहे.
सातव्यांदा आमदार
चंद्रपूर जिल्ह्यातून सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या जिल्ह्यात आतापर्यंत जी काही कामे दिसत आहेत, ती त्यांच्यामुळेच झालेली आहेत. सुधीर मुनगंटीवार नसते, तर चंद्रपूर जिल्हा 20 वर्ष मागे असता. त्यामुळे त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने आम्ही चांगलेच नाराज आहोत. आम्ही येथून पदयात्रेने नागपूरला जाणार आहोत. तेथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. येथे आमचे काम झाले तर ठीक. नाहीतर तेथूनच पुढे पदयात्रेने दिल्लीला जाऊ. दिल्लीत आमचं म्हणणं मांडू. जोपर्यंत सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळत नाही, तोपर्यंत आमची पावलं थांबणार नाहीत. पायांतून रक्ताच्या धारा निघाल्या तरी ही पावलं थांबणार नाही, अशा भावना चंद्रपूर येथून पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
Nyay mandir : चंद्रपूर -‘दिला शब्द केला पूर्ण’ यासाठी सुपरिचित असलेले आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे बल्लारपूरच्या नवीन न्यायालयीन इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी ३६ कोटी ७० लक्ष ७३ हजार रुपये निधीची राज्यसरकारने मान्यता दिली आहे.
एखादा विषय हाती घेतला की तो पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात आ.सुधीर मुनगंटीवार (sudhir Mungantiwar) यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या खास कार्यशैलीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
बल्लारपूर येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधण्यासाठी ३६ कोटी ७० लक्ष ७३ हजार रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.
ही नवीन न्यायालयीन इमारत बल्लारपूरच्या वैभवात भर पाडणारी असेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या इमारतीमध्ये तळमजला, त्यावर तीन मजले, पाच कोर्ट हॉलचा समावेश असेल. याशिवाय अग्नीशमन यंत्रणा, सीसीटीव्ही, वातानुकुलित व्यवस्था, लिफ्ट, पाणीपुरवठा, जलसंचय आदींचा समावेश असणार आहे.
बल्लारपूर येथे नवीन न्यायालयीन इमारत व्हावी, येथे अद्ययावत सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात, सुसज्ज अशा कोर्टरुम असाव्यात, यासाठी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर त्यांनी नियमित पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून इमारतीच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. Nyay Mandir
न्यायदान करणारी यंत्रणा आणि न्याय मागण्यासाठी येणारा सर्वसामान्य माणूस यांची मुलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत गैरसोय होणार नाही, याची पूर्ण काळजी बांधकामादरम्यान घेतली जाईल, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
sudhir mungantiwar on evm machine महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची दाणादाण उडवली. आता त्यांचे नेते ईव्हीएममध्ये गोंधळ केला असल्याचे कारण पुढे करत आहेत. जो तो कॅमेऱ्यासमोर येईन ईव्हीएमवर आणि निवडणूक आयोगावर आगपाखड करत आहे.
अशा विरोधकांच्या बाबतीत बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार कडाडले. विरोधकांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांनी विरोधकांवर केली.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुनगंटीवार म्हणाले, विरोधकांचे जे आमदार निवडून आले आहेत, त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे. त्यांचीही वर्तणूक संशयास्पद आहे. ते काय आमच्यासोबत मॅच फिक्सींग करून निवडून आलेत का? ‘ये अंदर की बात है और काँग्रेस के प्रदेशाध्यक्ष हमारे साथ है’, असं काही आहे का, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कसे निवडून आले, लोकसभेमध्ये त्यांना आमच्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या, तेव्हा ईव्हीएमवर कुणीच का नाही बोललं नाही, अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती मुनगंटीवार यांनी विरोधकांवर केली. sudhir mungantiwar on evm machine
1951 आणि 1961 मध्ये दोन्ही कायदे कुणी बदलवले. ते काँग्रेसचे कोण नेते होते, ज्यांनी संसदेत लांबलचक भाषण दिलं होतं की, ‘कागदी मतपत्रिका छापल्यानं गोंधळ निर्माण होतो, बिहार राज्यासारखं बुथ कॅप्चरींग होतं..’ हे कोण बोललं होतं? 2010 मध्ये मनमोहन सिंह यांनी समिती नेमली होती. त्या समिताचा अहवाल कुणाच्या राज्यात आला? तो कुणी स्विकारला, असे म्हणत मुनगंटीवार यांनी विरोधकांवर पुन्हा प्रश्नांची बरसात केली. कर्नाटकमध्ये विजय होतो, तेव्हा काँग्रेस जिंकते आणि हारते तेव्हा ईव्हीएम मशीन हारवते, हा काँग्रेसचा बालिशपणा आहे.असे मुनगंटीवार म्हणाले. sudhir mungantiwar on evm machine
..तर कर्नाटकने त्यांना निवडून देऊ नये
तेलंगणामध्ये ते जिंकले तर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे जिंकले. अन् महाराष्ट्रात हारले तर ईव्हीएममुळे हारले, अशी दुटप्पी भूमिका घेता येणार नाही. ईव्हीएमवर जर आक्षेप असेल तर निवडून आलेल्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे. कारण त्यांच्यावर हा आरोप नसला पाहिजे की, आम्हाला महायुतीच्या नेत्यांनी निवडून आणलं. छोट्या राज्यामध्ये आम्ही त्यांना निवडून आणतो, हा त्यांचा दुसरा हास्यास्पद आरोप आहे. कारण हा आरोप करून ते कर्नाटकचा अपमान करत आहेत. कारण कर्नाटक हे छोटे राज्य नाही. तर पर कॅपिटा इनकममध्ये पहिल्या पाच राज्यात कर्नाटक पुढे आहे. कर्नाटकबद्दल हे लोक असं बोलत असतील तर कर्नाटकच्या जनतेने त्यांना पुढचे 100 वर्ष निवडून देऊ नये, असे आवाहनही सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटकच्या जनतेला केले.
Flying club राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या चंद्रपूरच्या ‘फ्लाईंग क्लब’ने आता उड्डाण घेतले आहे.
नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी ना. श्री. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करण्यात येत आहे. त्यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार दिल्लीमध्ये पाठपुरावा करत आहेत. महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन लवकरच या प्रकल्पाला गती मिळण्यासाठी त्यांनी पाऊल टाकले आहे. Flying club
पहिल्या टप्प्यात 10 प्रशिक्षणार्थ्यांना येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2023 रोजी नागपूर फ्लाईंग क्लबच्या ‘सेस्ना – 172 आर’ या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिकसुध्दा घेण्यात आले. तसेच मोरवा येथे धावपट्टी, संरक्षण भिंत व इतर अनुषंगीक कामेसुध्दा करण्यात आली आहे.
आता अंतिम टप्प्यात असलेल्या फ्लाईंग क्लबच्या कामाला गती मिळावी, तसेच लवकरात लवकर येथे वैमानिकाचे प्रशिक्षण सुरू व्हावे, यासाठी ना. मुनगंटीवार यांनी नुकतीच दिल्ली येथे ऐरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय उड्डाण मंत्री राजीव प्रताप रुडी यांच्याशी चर्चा केली.
डीजीसीने काढलेल्या तांत्रिक मुद्द्यांची तातडीने पूर्तता करण्यासंदर्भात तसेच एरो क्लब ऑफ इंडिया यांनी नागपूर फ्लाईंग क्लबला लीजने दिलेल्या 2 विमानाची लीज वाढवून देण्यासंदर्भात राजीव प्रताप रुडी यांच्यासोबत मुंबई येथे बैठक घेण्यात येणार आहे. Flying club
एखाद्या विद्यार्थ्याला वैमानिक होण्यासाठी 200 तास फ्लाईंग अवर्स पूर्ण करणे आवश्यक आहेत. मात्र नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मोठ्या संख्येने होत असलेल्या विमानांच्या आवागमनामुळे वैमानिक प्रशिक्षणासाठी फ्लाईंग अवर्स पूर्ण होण्यास विलंब होतो. त्यामुळे नागपूर येथील फ्लाईंग क्लबसाठी पर्यायी ऑपरेशनल बेस म्हणून वेगळ्या धावपट्टीची गरज आहे.
याबाबत चंद्रपूरातील मोरवा विमानतळाचा पर्याय शोधण्यात आला असून विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक बाबींची मोरवा येथे पूर्तता करण्यात येत आहे.
याच अनुषंगाने ऑक्टोबर 2023 मध्ये मोरवा विमानतळ येथे विमानाची प्राथमिक चाचणी करण्यात आली होती. फ्लाईंग क्लब संदर्भात अनुषंगिक कामांच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 10 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथे बैठक घेतली होती. Flying club
मोरवा विमानतळावर ज्या तांत्रिक बाबींची पूर्तता अद्याप बाकी आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र विमान प्राधिकरण, विभागीय आयुक्तालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद या यंत्रणांनी त्यांना सोपविलेली कामे वेळेत मार्गी लावावीत.
भारतीय विमान प्राधिकरणाची ज्या बाबींना परवानगी आवश्यक आहे, ती मिळण्याबाबत तात्काळ पाठपुरावा करावा. तांत्रिक मान्यतेच्या अनुषंगाने ज्या बाबींची पूर्तता करण्याबाबत भारतीय विमान प्राधिकरणाने कळविले आहे, त्या बाबी पूर्ण कराव्यात, अशा सुचना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या.
कैलास गायकवाड यांच्यासोबत चर्चा करताना सुधीर मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar started work चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने काढणीच्या वेळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने, पुढे सर्वेक्षण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी विभाग प्रधान सचिव जयश्री भोज तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांच्या सोबत बैठक घेत याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेशही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिले.
जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी लष्करी अळी तसेच इतर किडींच्या प्रादुर्भावामुळे हवालदिल झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. Sudhir Mungantiwar started work
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता असून सदर नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांची निकड लक्षात घेता तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देखील ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालय येथे बैठकीत संबधित अधिकारी यांना दिले.
प्रचाराच्या रणधुमाळीतही पाठपुरावा
नुकतीच विधानसभा निवडणूक आटोपली. ना. सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूर विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार होते. प्रचार, जाहिरसभा, प्रत्यक्ष भेटीमध्ये व्यस्त असतानाही त्यांनी प्रधान सचिव यांना पत्र लिहून नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अवगत केली होती. आता या संदर्भात आढावा घेत ताबडतोब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात निर्देश दिले. Sudhir Mungantiwar started work
शेतकऱ्यांप्रती संवेदनशील
ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची विक्रमी 202 कोटीची रक्कम मिळू शकली. शेतकऱ्याच्या धानाला 20 हजार रुपये हेक्टरी बोनस देऊन भात उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. सदैव शेतकऱ्यांप्रती ना. मुनगंटीवार संवेदनशील असतात, हे विशेष.
Bhagwan Birsa Munda समाजातील शोषित, वंचित आणि आदिवासींचा जगण्याचा संघर्ष दूर करण्याचा संकल्प भगवान क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी केला.
Bhagwan Birsa Munda आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देत भगवान बिरसा मुंडा संपुर्ण आयुष्य जगले. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा पाईक म्हणून त्यांचा संकल्प मी निश्चितपणे पुढे नेईल आणि समाजातील उपेक्षितांच्या आयुष्यातील अंधःकार दूर करण्याचा प्रयत्न करेन, असा निर्धार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
बल्लारपूर येथे भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ना. श्री. मुनगंटीवार सहभागी झाले. त्यावेळी ते बोलत होते. ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘भगवान वीर बिरसा मुंडा यांनी लहान वयातच इंग्रजाच्या अन्याय, अत्याचार, शोषणाविरुद्ध लढा पुकारला. आमचा देश, आमचा अधिकार हा विचार त्यांनी मांडला. इंग्रजांना चले जाव म्हणत एल्गार केला. Bhagwan Birsa Munda
आदिवासीचे शोषण करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, एक-एक आदिवासी हजार वाघांची ताकद ठेवतो, हे सांगण्याचे काम भगवान वीर बिरसा मुंडा यांनी केले. आदिवासी व इतर समाजासाठी वीर बिरसा मुंडा यांनी संघर्षाचा शंखनाद केला. आज त्यांच्या जयंती निमित्त स्मरण करीत असताना भयमुक्त महाराष्ट्राचा संकल्प करायचा आहे.’
‘मी आदिवासी बांधवांसाठी अनेक कामे केलीत. शबरी आवास योजना शहरी भागासाठी लागू करण्याचा निर्णय केला. वनजमिनीचे पट्टे देण्याच्या कायद्यात बदल करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांना शेतजमिनीचे केवळ पट्टेच नव्हे तर या भागामध्ये घर बांधकामासाठी पट्टे उपलब्ध करून देण्यात येईल. वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाचे पोस्ट तिकीट काढले. Bhagwan Birsa Munda
या जिल्ह्यात मिशन ऑलिम्पिकसाठी 137 कोटी रुपये खर्चून वातानुकूलित स्टेडियम उभारण्यात येत आहे. या स्टेडियमला वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्याचा निर्णय केला आहे. स्पर्धा परीक्षांसाठी वाचनालय, समाज मंदिर, सभागृहाचे जिम, या परिसराचे सौंदर्यीकरण, भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा आदी कामे पूर्णत्वास नेईल,’ असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला.
आदिवासी समाजाचा एखादा आमदार आदिवासी समाजासाठी जेवढे काम करेल त्यापेक्षा चार कामे जास्तीच करेल, अशी ग्वाही देखील ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
75 वर्षात काँग्रेसच्या राज्यामध्ये एकदाही आदिवासी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकली नाही. विश्वगौरव नरेंद्रजी मोदीजी यांनी आदिवासी समाजातील सामान्य व्यक्तीला राष्ट्रपती करीत आदिवासी समाजाला सन्मान मिळवून दिला. Bhagwan Birsa Munda
बल्लारपूरमध्ये आदिवासी समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रपती महोदयांना निश्चितपणे निमंत्रीत करेन, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
Fake narrative of Congress माझा बूथप्रमुख असो, पेजप्रमुख असो, शक्ती केंद्र प्रमुख असो, पक्षाचा पदाधिकारी असो वा सामान्य कार्यकर्ता प्रत्येक व्यक्ती पक्षाचा आत्मा आहे. आपण आजवर केलेला विकास व लोक कल्याणाची कामे हीच आपली शक्ती आहे.
Fake narrative of Congress ही शक्ती घेऊनच आपल्याला जनतेसमोर जायचे आहे. विरोधकांचे फेक नरेटिव्ह हाणून पाडा. महायुती सरकारच्या लोक हिताच्या योजना जनतेपर्यंत पोचवा व विजयश्री खेचून आणा, असे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
भाजपा पदाधिकारी, बूथ प्रमुख, पेज प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख यांच्याशी संवाद सेतूच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, लोकसभेत खोटं बोलत त्यांनी नरेटीव्ह सेट केला, कॉंग्रेसने लोकसभा निवडणूकीत जाती-पातीचा आधार घेतला, संविधान बदलणार आहे असं खोटं रेटुन बोललेत मात्र त्यांनीच आज मध्यवर्ती बॅंकेच्या नोकर भरती मध्ये आता आरक्षण ठेवले नाही, हा कॉंग्रेसचा खरा चेहरा आहे, तो आपल्याला जनतेसमोर आणायचा आहे. Fake narrative of Congress
आपसामध्ये प्रेमभाव ठेवत, अथक परिश्रम घेत, सुक्ष्म नियोजनाच्या माध्यमातुन मतदार बंधू-भगिनींना मतदान केंद्रावर नेण्याची आपली जबाबदारी आहे, यासाठी आपल्याला गावातील बुथचे राजकीय विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या घटकांशी योग्य समनव्य राखण्याची आवश्यकता आहे, अडीच वर्ष काँग्रेसचा पालकमंत्री होता, पाच वर्षे काँग्रेसचा खासदार होता त्यांनी काय केले याचा जाब काँग्रेस कार्यकर्त्यांना विचारा असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. Fake narrative of Congress
अनेक काँग्रेसी माळी समाजासाठी तुम्ही काय केले म्हणून विचारणा करतात. खरतर आपण महात्मा ज्योतीबा फुलेंच्या वंशजांना न्याय दिला, क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला देण्यामध्ये माझा पुढाकार होता. पुण्यातील भिडे वाडयाचा काम व्हावे, भिडेवाड्यात स्मारक व्हावे यासाठी मी विधानसभेत चर्चा उपस्थित केली.
महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वाड्याचे नूतनीकरणाचे काम मी सुरू केले. हे सर्व काम जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोचवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना आपण बारा हजारावरून पंधरा हजाराची मदत करणार आहोत, लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रु देणार आहोत ही माहिती जनतेला सांगा.
बूथचे सूक्ष्म नियोजन करणे, स्लिप मतदारांपर्यंत पोचवणे, जाहीरनामा, प्रसिद्धी पत्रके मतदारांपर्यंत पोचवण्याचे काम गतीने करावे असे आवाहन करत विजयासाठी सर्वशक्तीनिशी परिश्रम घ्यावे अशी विनंती त्यांनी केली.
sudhir mungantiwar speech राजकारणात अपघाती मित्र व मित्रातील अनेक शत्रू असतात मात्र या सर्व शत्रू-मित्रांच्या पलीकडे अवलिया राजकारणी म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचं नाव आहे.
Sudhir mungantiwar speech आमदार व त्यानंतर मंत्री पदी विराजमान झालेले भाऊ यांनी कधीही कसल्याही जाती-पातीत भेदभाव केला नाही, उलट सर्व समाजाच्या व्यक्तींच्या मूलभूत गरजा कश्या पूर्ण होतील याकडे विशेष लक्ष दिले. याचाचं आशीर्वाद म्हणून जनतेने तब्बल 6 वेळा मुनगंटीवार यांना विधानसभेत पाठविले, आज बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून ते 7 व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
सध्या प्रचारसभा अंतिम टप्प्यात असून स्टार प्रचारकांच्या जिल्ह्यात फेऱ्या वाढल्या आहे, आपल्या प्रचार दौऱ्यात व्यस्त असलेले मुनगंटीवार यांचं दुर्गापुरातील भाषण चांगलेच गाजलं असून त्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे. Sudhir mungantiwar speech
13 नोव्हेंबर रोजी दुर्गापुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती, या सभेत मुनगंटीवार यांनी आम्हीच फक्त विकासाचे राजकारण करणारे आहो, मग तो कसल्याही जाती-पातीचा असू दे त्यांचं काम पूर्णत्वास यायला हवं यासाठी मी प्रयत्नशील असतो. Sudhir mungantiwar speech
आज चंद्रपूर जिल्ह्यात असंख्य विकासाची कामे झाली आहे, आज विरोधी पक्ष विचारतो मुनगंटीवार यांनी कसला विकास केला? कांग्रेस वाल्यांनो आपण माझ्या मतदारसंघातील ज्या विश्रामगृहात बसता ते माझ्या कार्यकाळात निर्माण झालं, आपण ज्या रस्त्यावरून पायी चालताना प्रचार रॅली काढत आहे, तो सुद्धा आम्ही निर्माण केला आहे.
ज्या तहसील कार्यालयात आपण उमेदवारी अर्ज भरला ते कार्यालय सुद्धा आमच्या काळात निर्माण झालं, आम्ही विकासाला चालना दिली आणि तुम्ही जातीचे विष पाजण्याचे काम केले.
आपल्या भाषण दरम्यान मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात केलेल्या विकासकामांची आपल्या शैलीत यादी वाचली, मी केलेलं काम म्हणजे विकास नाही का? असा प्रश्न उपस्थित करीत दारूचं दुकान काढणं याला कांग्रेस पक्ष विकास म्हणतो. अशी टीका मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे, मात्र त्यापूर्वी सत्ताधारी व विरोधीपक्ष एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसत आहे, या राजकीय युद्धात मुनगंटीवार यांचं भाषण म्हणजेच विरोधकांना चारही मुंड्या चित करणारं आहे हे मात्र नक्कीचं.