Home Minister Amit Shah : किशोर जोरगेवार यांच्या विजयी रॅली मध्ये मी नक्की येणार – अमित शाह

Home Minister Amit Shah 31 मार्च 2026 पर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करणार असे वक्तव्य देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी चंद्रपुरात आयोजित महायुती उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत केले.

Home Minister Amit Shah विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा काही दिवसांनी थंडावणार आहे, तत्पूर्वी विविध पक्षाचे स्टार प्रचारक आपल्या उमेदवारांचा प्रचार करीत आहे.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील लढत आता चुरशीची

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार, राजुरा देवराव भोंगळे व वरोरा करन देवतळे आणि ब्रह्मपुरी कृष्णा सहारे या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह चंद्रपुरात दाखल झाले होते. मात्र अवघ्या 6 मिनिटात त्यांनी आपले भाषण गुंडाळल्याने हजारोच्या संख्येत एकत्र झालेल्या नागरिकांनी इतरांचे मार्गदर्शन ऐकणे टाळले, आणि हळूहळू कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घेतला. Home Minister Amit Shah

आपल्या 6 मिनिटांच्या संबोधनात शाह म्हणाले की राज्यातील महायुती सरकारला आपण पुन्हा निवडून द्यावे.

ग्रामीण भागात आमदार जोरगेवार यांची पदयात्रा

आपल्याला राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गावर चालणारी महायुती सरकार हवी की औरंगजेब फॅन क्लब च्या अध्यक्षांची सरकार हवी आहे, देशातील भाजप सरकारने राम मंदिराचे निर्माण केले, कलम 370 हटविली, तिहेरी तलाक, caa कायदा आणला आता आम्ही वक्फ बोर्डाचा कायदा बदलविणार आहो. Home Minister Amit Shah

शाह पुढे म्हणाले की आम्ही नागरिकांच्या हिताचे कायदे आणतो मात्र त्याला कांग्रेस, शरद पवार व उद्धव ठाकरे यांचा नेहमी विरोध असतो, आम्ही राज्यातील अनेक जिल्ह्याचे नाव बदलविले त्याला सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला.

चंद्रपूर जिल्ह्याला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद मोदी जी यांनी संपुष्टात आणला आणि पुढे 31 मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देश नक्षलवाद मुक्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

केंद्राने महाराष्ट्र राज्याच्या 15 लाख कोटी दिले, असंख्य प्रकल्प महायुती सरकारने राज्यात आणले, त्यामुळे भविष्यात रोजगाराच्या संधी वाढतील यात काही शंका नाही. महाराष्ट्र राज्याचा गौरव महाविकास आघाडीने बुडविला तो गौरव पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपण पुन्हा महायुती सरकारला निवडून द्यावे, आज मला लवकर जायचे असल्याने मी काही बोलणार नाही मात्र चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील उमेदवार किशोर जोरगेवार यांना आपण पुन्हा निवडून दिल्यास त्यांच्या विजयी रॅलीत मी नक्की चंद्रपुरात येणार.

भाषण आटोपल्यावर अमित शाह सभास्थळावरून निघून गेले त्यानंतर स्थानिक नेत्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी नागरिकांनी आवड दाखविली नाही आणि हळूहळू सभेतून काढता पाय घेतला.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *