Tag: आमदार किशोर जोरगेवार

  • BJP entry local coal labor union leaders । भारतीय कोळसा मजदूर संघाचे क्षेत्रीय अध्यक्ष व कांग्रेसचे जेष्ठ नेते भाजपात

    BJP entry local coal labor union leaders

    BJP entry local coal labor union leaders : चंद्रपूर २८ नोव्हेम्बर (News३४ वृत्तसेवा) – भारतीय कोळसा मजदूर संघ वणी क्षेत्राचे क्षेत्रीय अध्यक्ष तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते लखन मारोती हिकरे आणि सूरज हिकरे यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. आमदार किशोर जोरगेवार यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले.

    Also Read : ११ नोव्हेम्बरला चंद्रपूर महानगरपालिकेची आरक्षण सोडत

    यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, घुग्घूस शहर अध्यक्ष संजय तिवारी, विधानसभा अध्यक्ष दशरथ सिंह ठाकूर, बलराम डोडाणी, महामंत्री रवी गुरनुले, घुग्घूस शहर उपाध्यक्ष अनिल बाम, घुग्घूस युवा मोर्चा अध्यक्ष संतोष नुने, घुग्घूस महामंत्री साजन गोने, युवा मोर्चा महामंत्री स्वप्निल वाढई, हेमंत उरकुडे, गणेश पिंपळकर आदींची उपस्थिती होती. BJP party expansion Chandrapur

    जनहिताचे कार्य होणार

    प्रवेशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की,भारतीय कोळसा मजदूर संघाचे क्षेत्रीय अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते लखन हिकरे तसेच सूरज हिकरे यांनी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाच्या जनविकास आणि राष्ट्रहिताच्या विचारधारेवर चालत ते जनहितासाठी कार्य करतील,असे ते म्हणाले.

    भाजपमध्ये प्रवेशानंतर लखन हिकरे म्हणाले की,भारतीय जनता पक्ष ही विकास आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी पक्ष संस्था आहे. या विचारधारेत सहभागी होत मी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा संकल्प घेतला आहे. त्यांच्या सोबत सूरज हिकरे यांच्या प्रवेशामुळे स्थानिक युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, घुग्घूस परिसरातील पक्षसंघटन अधिक मजबूत होण्यास हातभार लागणार आहे.

  • Diwali Pahat festival Ganesh Nagar Chandrapur | दिवाळी पहाटने रंगली चंद्रपुरातील सकाळ; दिवाळी पहाट’ने भरली आनंद, स्नेहाची मैफल

    Diwali Pahat festival Ganesh Nagar Chandrapur

    Diwali Pahat festival Ganesh Nagar Chandrapur : चंद्रपूर 26 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – दिवाळी म्हणजे केवळ प्रकाशाचा नव्हे, तर आनंद, एकात्मता आणि स्नेहाचा उत्सव आहे. या उत्सवात जेव्हा संगीताचा सहवास मिळतो, तेव्हा ती सकाळ अधिक मंगलमय बनते. स्वरांच्या माधुर्याने मन प्रफुल्लित होते, विचारांना नवीन दिशा मिळते आणि समाजात सकारात्मकतेचा संदेश पोहोचतो. आजच्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाने हाच सुंदर अनुभव दिला आहे. कलाकारांच्या सुरेल सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर आनंदाच्या लहरींनी भारला आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    Also Read : त्या हल्लेखोर वाघाचा शोध सुरू

    श्री गणेश नगर सार्वजनिक कल्याणकारी समिती तर्फे श्री गणेश नगर सार्वजनिक कल्याण मंदिराच्या प्रांगणात ‘दिवाळी पहाट’ या सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेवक रमेश देशमुख, सुरेश धानोरकर, वझलवार, झाडे, अशा बेले, येगींलवार, सुमीत बेले यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळच्या मंद वाऱ्यासह सुरेल गीतांच्या लहरींनी वातावरण भारले होते. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या गाण्यांनी श्रोत्यांच्या मनात दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. BJP leader at Diwali Pahat Chandrapur news

    या कार्यक्रमात पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, संगीत ही आत्म्याची भाषा आहे. ती माणसाला माणसाशी जोडते, विचारांना उंची देते आणि मनाला प्रसन्न करते. आपल्या समाजात अशा सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे.

    सर्वांगीण विकास करणार – आमदार जोरगेवार

                ते पुढे म्हणाले की, श्री गणेश नगर सार्वजनिक कल्याणकारी समितीने असा सुंदर उपक्रम राबवून समाजात आनंद, स्नेह आणि संस्कृतीचा संदेश दिला आहे. येथील हणुमान मंदिर परिसरासाठी सुरक्षाभिंत उभारण्याची मागणी करण्यात आली होती, ती आपण पूर्ण केली आहे. आज संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक आणि सुशोभित झाला आहे. येत्या काळातही या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले प्रयत्न असणार आहे.

    आमदार जोरगेवार यांनी समितीतील कार्यकर्त्यांचे कौतुक करत सांगितले की, येथील नागरिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत नेहमीच सक्रियपणे सहभागी होतात. दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम समाजातील एकोपा वाढवतात, विचारांची देवाणघेवाण घडवतात आणि नव्या उर्जेचा संचार करतात. कार्यक्रमाच्या शेवटी कलाकारांना व आयोजकांना आमदार जोरगेवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

  • BJP Govardhan Puja celebration Chandrapur | भव्य गोवर्धन पूजा उत्साहात साजरी; आ. किशोर जोरगेवार यांनी दिला समाज ऐक्याचा संदेश

    BJP Govardhan Puja celebration Chandrapur

    BJP Govardhan Puja celebration Chandrapur : चंद्रपूर 22 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – भारतीय जनता पार्टी नेहमीच समाजाशी जोडलेली आहे. समाजातील प्रत्येक घटक आनंदी, समृद्ध आणि आत्मनिर्भर व्हावा, हा आमचा प्रयत्न आहे. गोवर्धन पूजा ही शेती, गोसंवर्धन आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याची जाणीव करून देते. या परंपरेत आपल्या संस्कृतीचे मूळ दडले आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Kishor Jorgewar Nehru Nagar Govardhan Puja

    Also Read : बल्लारपुरात शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी

    दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी शास्त्रीनगर प्रभाग आणि कानिफनाथ बहुउद्देशीय संस्था, नेहरू नगर यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू नगर येथे भव्य गोवर्धन पूजा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

    या कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला मोर्चा शहराध्यक्षा छबु वैरागडे, माजी महापौर अनिल फुलझेले, भाजप नेते प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट,  महामंत्री रवी गुरुनुळे, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, अॅड. सारिका संदुरकर, प्रदीप किरमे, रवी जोगी, सुभाष अदमाने, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेडकी, माजी नगरसेविका वनिता डुकरे, पुष्पा उराडे, शीतल गुरुनुले, माजी नगरसेवक विठ्ठलराव डुकरे, कानिफनाथ बहुउद्देशीय संस्थेचे उमेश साळुंखे, जनार्धन भुजाडे, राजू सांळुखे, राजकुमार भगाडे, सागर वाजेकर, श्रावण गदई आदी मान्यवर उपस्थित होते. unity and faith message by Kishor Jorgewar

    पारंपरिक सणांमुळे आपल्यात प्रेम, सद्भावना आणि भक्तीचा भाव निर्माण होतो

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, गोवर्धन पूजा म्हणजे श्रद्धा, एकोपा आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपला समाज एकत्र राहिला तर कोणतीही अडचण मोठी ठरत नाही. आज आपल्या देशात आणि राज्यात विकासाच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. पण त्याचबरोबर सामाजिक एकोपा, धार्मिक सौहार्द आणि सांस्कृतिक जपणूकही तितकीच आवश्यक आहे. अशा पारंपरिक सणांमुळे आपल्यात प्रेम, सद्भावना आणि भक्तीचा भाव निर्माण होतो.

    आज या पूजेत इतक्या मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते, महिला व युवा सहभागी झाले, हे पाहून आनंद होत आहे. या आयोजनाने समाजात ऐक्य, भक्ती आणि सेवा भाव निर्माण केला आहे. आपण सर्वांनी दीपावलीच्या या शुभ पर्वावर मनातील अंधार दूर करून ज्ञान, प्रेम आणि एकतेचा प्रकाश पसरवून समाजातील प्रत्येक माणूस आनंदी राहावा, यासाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजे असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

    या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोवर्धन पूजन करण्यात आले.

  • Diwali bonus sanitation workers | आंदोलनाचा तिढा सुटला; आमदार किशोर जोरगेवारांच्या मध्यस्थीने सफाई कामगारांच्या मागण्या मान्य

    Diwali bonus sanitation workers

    Diwali bonus sanitation workers : चंद्रपूर 17 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत नाली सफाई कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यात आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून, कामगारांनी आंदोलन मागे घेतले आहे.

    Also Read : घुग्गुस वेकोली मधून चक्क ओव्हरबर्डन ची चोरी

    वेतनवाढ, प्रलंबित वेतन तातडीने देणे, कायमस्वरूपी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करणे, दिवाळी बोनस तसेच कामाच्या अटी सुधाराव्यात या प्रमुख मागण्या घेऊन कामगारांनी कष्टकरी जनसंघ संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे दोन दिवस नाले सफाईचे काम बंद पडले होते. municipal workers protest resolution

    आमदार जोरगेवार मुळे सुटला तिढा

    सदर प्रकरणात आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्या सफाई कामगारांच्या प्रतिनिधींशी आणि महानगरपालिका प्रशासनाशी चर्चा केली. चर्चेदरम्यान सर्व मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात आला. आमदार जोरगेवार यांनी प्रशासनाला तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले. आजच कामगारांना दिवाळी बोनस देण्याचे मनपा प्रशासनाने मान्य केले आहे.

    या चर्चेनंतर कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून, आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन सफाई कामगारांशी संवाद साधला. त्यांच्या आश्वासनानंतर कामगारांनी आनंदाने आंदोलन मागे घेतले.

    या प्रसंगी मनपा अधिकारी, भारतीय कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी, कामगार नेते आणि कामगार उपस्थित होते. यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले, “सफाई कामगार हे शहराच्या स्वच्छतेचे खरे रक्षक आहेत. त्यांच्या न्याय्य मागण्यांना न्याय मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे.” प्रशासनाने त्यांच्या सर्व मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, असे आदेशही आमदार जोरगेवार यांनी दिले.

  • BJP Chandrapur appointments 2025 । चंद्रपूर महानगरात BJP पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या – संघटनेला बळ

    BJP Chandrapur appointments 2025

    BJP Chandrapur appointments 2025 : चंद्रपूर १२ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) –  भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरात  विविध आघाड्यांवरील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि समाजघटकांमध्ये अधिक प्रभावी संपर्कासाठी या नियुक्त्या महत्त्वपूर्ण ठरत आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्व नवनियुक्त पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

    Also Readराजुरा शहरातील मतदार यादीतील घोळ कायम

      यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, महामंत्री रवि गुरुनुले, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, वंदना हातगावकर मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, सुमित बेले यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

    विविध आघाडी प्रमुखाच्या नियुक्त्या

     या वेळी मुक्ता खांडे यांची अध्यक्षा, ओबीसी महिला आघाडी, चंद्रपूर महानगर,  प्रियंका चितोडे यांची युवती प्रमुख, चंद्रपूर महानगर,  ओमेशजी आयलू यांची अध्यक्ष तेलगू आघाडी, चंद्रपूर जिल्हा महानगर, कौसर खान यांची अध्यक्ष अल्पसंख्यांक महिला आघाडी, चंद्रपूर जिल्हा महानगर, सुजाता कापसे यांची अध्यक्षा तेलगू आघाडी, आणि रामकुमार आकापल्लीवार यांची अध्यक्ष झोपडपट्टी आघाडी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

    या नव्या नियुक्त्यांमुळे भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बळकटीत आणखी वाढ होणार असून, समाजाच्या विविध घटकांमध्ये पक्षाचा विस्तार अधिक वेगाने होईल, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला. नव नियुक्त पदाधिकार्यांना त्यांनी संघटन अधिक मजबूत करण्याचे, समाजहिताचे कार्य जोमाने पुढे नेण्याचे मार्गदर्शन केले. तसेच सर्वांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, समाजसेवा आणि जनसंपर्काच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा जनमानसात पोहोचविण्याचे आवाहनही आमदार जोरगेवार यांनी केले.

  • Kishor Jorgewar Ghugus infrastructure directives । घुग्घुसच्या विकासकामांचा आढावा; शुद्ध पाणी आणि स्वच्छ रस्त्यांसाठी आमदार जोरगेवारांचा पुढाकार

    Kishor Jorgewar Ghugus infrastructure directives

    Kishor Jorgewar Ghugus infrastructure directives : चंद्रपूर ११ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – आज शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घुस नगरपरिषदेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाचा सखोल आढावा घेत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

    Also Read : २० कोटी रुपयांच्या निधीतून चंद्रपुरातील मार्गाचा होणार कायापालट

    यावेळी घुग्घुस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर, नगर अभियंता मनीष जुनघरे, कार्यालय अधीक्षक निलेश तुरानकर, भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी, भाजप नेते प्रकाश देवतळे, संतोष नुने, आशिष मासिरकर, हेमंत उरकुडे, स्वप्निल वाढई, साजन गोहणे, महेश लठ्ठा, श्याम आगदारी, मयूर कलवल, राजेश मोरपाका, मल्लेश बल्ला, विजय माथनकर, मुन्ना लोडे, गुरुदास तगरपवार, विनोद लाटेवार आदींची उपस्थिती होती. Ghugus development meeting

    नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे अत्यावश्यक

    बैठकीदरम्यान आमदार जोरगेवार म्हणाले की, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत आणि स्वच्छ ठेवणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे अत्यावश्यक असून त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये. तसेच शहरातील बंद पडलेले वीज दिवे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देत रस्त्यांची डागडुजी करून नागरिकांना सुलभ वाहतुकीची सुविधा मिळावी, यावर त्यांनी भर दिला.

    यावेळी त्यांनी नगरपरिषदेच्या नव्या विकास आराखड्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच अलीकडील भूस्खलनात बाधित झालेल्या १६५ घरांतील नागरिकांचे तात्काळ पुनर्वसन करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. नगरपरिषदेच्या निधीचा वापर करताना शहराच्या सर्वसमावेशक आणि संतुलित विकासाचे ध्येय ठेवावे, कोणताही भाग विकासापासून वंचित राहू नये, असेही आमदार जोरगेवार यांनी सांगितले. या बैठकीला संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

  • Chandrapur road widening project । २० कोटींच्या निधीतून चंद्रपूरच्या मुख्य मार्गांचा कायापालट! रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

    Chandrapur road widening project

    Chandrapur road widening project : चंद्रपूर – शहरातील वाढता वाहतूक भार, ट्रॅफिकची समस्या, पाणीपुरवठ्याची गळती आणि रस्त्याच्या कडेला उभे असलेले वीज खांब यामुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणींचा विचार करून, रस्ता रुंदीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागांची एकत्रित बैठक घेतली. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांसह शहरातील मुख्य मार्गाची पाहणी केली.

    Also Read : ग्रामीण भागात पत्रकाराने केली महिलांची फसवणूक

    या बैठकीस महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग , वेकोली आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी या विभागांचा समावेश होता. यावेळी मनपा आयुक्त विद्या गायकवाड, महावितरणचे अधीक्षक अभियंता चिवंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अक्षय पगारे, मनपा शहर अभियंता रविंद्र हजारे, तसेच भाजप महानगर अध्यक्ष  सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष  छबू वैरागडे, संघटन महामंत्री नामदेव डाहुले,  माजी महापौर राखी कंचार्लावार, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, माजी नगर सेवक संजय कंचार्लावार, करणसिंह बैस आदी उपस्थित होते.

    road expansion

    बैठकीनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह शहरातील कस्तुरबा आणि महात्मा गांधी या दोन मुख्य मार्गांची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, २० कोटी रुपयांतून या दोन्ही मार्गांचे काम सुरू असून आता अंतिम टप्प्यात शेवटच्या आवरणाचे काम सुरू होणार आहे. मात्र, हे काम होत असताना रस्त्यावर असलेले अतिरिक्त विद्युत खांब काढून रस्ते रुंद करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. road widening project in Chandrapur city challenges

    रस्ते प्रशस्त करा

    यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, रस्त्याकडेला उभे असलेले वीज खांब व गटारे यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना सतत धोका निर्माण होतो. म्हणूनच हे खांब तातडीने हलवून रस्ते प्रशस्त करावेत. अनेक ठिकाणी पाणी गळतीमुळे रस्त्यांचे नुकसान होत आहे आणि नागरिकांच्या घरासमोर चिखल व घाण साचते. संबंधित विभागांनी त्वरित तपासणी करून यांची दुरुस्ती करावी. municipal authority road expansion plans

    केवळ रस्ते बनवणे हे आपले उद्दिष्ट नाही, तर नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुखदायी प्रवासाचा अनुभव देणे हे आपले ध्येय आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वयाने काम करून गुणवत्तापूर्ण आणि वेळेत काम पूर्ण करावे, असेही आमदार जोरगेवार यांनी सांगितले.वेकोली अंतर्गत येणाऱ्या मार्गांचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आणि महावितरणने रस्त्यावर केलेले खोदकाम दुरुस्त करून उर्वरित काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

  • Kishor Jorgewar graduate voter initiative । पदवीधर मतदार नोंदणी मोहिमेत चंद्रपूर अव्वल ठेवण्याचा आमदार किशोर जोरगेवारांचा निर्धार!

    Kishor Jorgewar graduate voter initiative

    Kishor Jorgewar graduate voter initiative : चंद्रपूर ४ ऑक्टोबर २०२५ – पदवीधर हा समाजातील सुशिक्षित घटक आहे. त्याचे मत केवळ मतदानापुरते मर्यादित नसते, तर ते समाजाला दिशा देणारे असते. त्यामुळे प्रत्येक पदवीधर मतदार म्हणजे लोकशाहीचा बळकट दुवा आहे. या दुव्यांना जोडल्याशिवाय लोकशाहीची साखळी मजबूत होणार नाही. त्यामुळे उत्तम नियोजन करत प्रत्येक पदवीधर मतदारांची नोंदणी करून नोंदणी प्रक्रियेत चंद्रपूर मतदार संघ अव्वल ठेवा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    Also Read : चंद्रपुरात २८५ जणांना शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र वाटप

    भारतीय जनता पार्टीच्या वतीने पदवीधर निवडणुकीसाठी नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून, शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी उपमहापौर अनिल फुलझले, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, दशरथसिंह ठाकुर, महामंत्री सविता दंढारे, अरुण तिखे, मंडळ अध्यक्ष अॅड. सरिता संदुरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. Chandrapur BJP graduate voter enrollment campaign

    भारतीय जनता पार्टीच्या भविष्यातील राजकीय प्रवासाचा पाया

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, पदवीधर मतदार नोंदणी अभियान ही केवळ औपचारिकता नसून, भारतीय जनता पार्टीच्या भविष्यातील राजकीय प्रवासाचा पाया आहे. पदवीधर मतदार नोंदणीमध्ये आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला पाहिजे. आजच्या या बैठकीत आपण उत्तम नियोजन करून पुढे जाण्याचा निर्धार करा. नोंदणी मोहिमेत दैनंदिन आढावा घेणे आवश्यक आहे. प्रत्येक दिवसाची आपली प्रगती, आलेल्या अडचणी यांचा दैनंदिन आढावा घ्यावा, संघटित नियोजन करावे, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर बैठकीत कार्यकर्त्यांना केल्या.

    प्रत्येक पदवीधर मतदाराचा सहभाग ही लोकशाहीची ताकद आहे. आपण संघटित नियोजन, सातत्यपूर्ण प्रगती आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाने ही मोहीम यशस्वी करू. पदवीधर म्हणजे केवळ शिक्षणाची पदवी मिळालेली व्यक्ती नव्हे, तर समाजाला मार्गदर्शन करण्याची क्षमता असलेला नागरिक आहे. त्यामुळे पदवीधर मतदार संघासाठीच्या निवडणुकीत पदवीधरांचा सक्रिय सहभाग गरजेचा आहे, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Shri Mata Mahakali festival Chandrapur । माता महाकाली मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध – ना. उईके

    Shri Mata Mahakali festival Chandrapur

    श्री माता महाकाली महोत्सवात पलक मुच्छल यांच्या भक्तिरसात भाविक मंत्रमुग्ध!

    Shri Mata Mahakali festival Chandrapur : चंद्रपूर (२८ सप्टेंबर २०२५) – भक्तिरसाच्या अखंड झऱ्याने ओथंबलेल्या श्री माता महाकाली महोत्सवात सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छल यांच्या गोड सुरांनी वातावरण भारावून गेले. त्यांच्या स्वरातून उमटलेली प्रत्येक ओळ भक्तांच्या अंतःकरणातील प्रार्थना ठरली. यावेळी पलक मुच्छल यांनी ही आपल्या भक्तिसंगीताने भाविकांना मंत्रमुग्ध केले. तर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांनी महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते 999 ज्येष्ठ मायमाऊलींचा सन्मान करण्यात आला.

    एसटी बस मध्ये दिव्यांगांना राखीव जागेवर जागा न दिल्यास होणार कारवाई

    या कार्यक्रमाला श्री माता महाकाली महोत्सवाचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, डॉ. विजय देवतळे,माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, कोषाध्यक्ष पवन सराफ, विश्वस्त जयश्री कापसे, बलराम डोडाणी, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजपचे जेष्ट नेते प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, दशरथसिंह ठाकूर, तुषार सोम, वंदना हातगावकर, रवी गुरुनले, अरुण तिखे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. Mahakali festival cultural programs

      महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रात्री आठ वाजता सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छल यांच्या सुरेल भक्तीगीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. तत्पूर्वी माता महाकालीची महाआरती पार पडली. मंद वार्यात हेलकावणाऱ्या पताकांप्रमाणे शेकडो भाविकांचे मन पलक मुच्छल यांच्या गाण्यांच्या लयीवर झुलत होते. जय माता दी च्या घोषणांनी महोत्सवाचे वातावरण अधिकाधिक पवित्र झाले. संगीताच्या दरबारात स्वरांच्या आरतीने मातेचे  पूजन भाविकांना घडले.

    palak muchhal bhakti songs live

    महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या आरतीनंतर ११ वाजता महिलांचे जागर कवितेचे कवी संमेलन पार पडले. यात कवयित्रींनी कवितांच्या माध्यमातून जनजागृती करत मातेची भक्ती केली. दुपारी २ वाजता ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित ९९९ ज्येष्ठ मायमाऊलींचा पालकमंत्री डॉ.प्रा अशोक उईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी ना. उईक यांनी चित्र प्रदर्शनिचे उद्घाटन केले. त्यानंतर ना. उईक आणि आमदार करण देवतळे यांच्या हस्ते माता महाकालीची आरती करण्यात आली.  दुपारी ३ वाजता स्थानिक कलावंतांचा नृत्यजल्लोष कार्यक्रम पार पडला. Palak Muchhal bhakti songs live

    माता महाकाली मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध – ना. उईके

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून महाकाली महोत्सवाला सुरुवात झाली आहे. यंदाचे हे चौथे वर्ष असून सदर महोत्सवाच्या माध्यमातून येथील संस्कृती देशभरात पोहोचवली जात आहे. महोत्सवात भक्तीसह सामाजिक उपक्रमांना देखील मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात आले आहे.राजकारणात समाजकार्य करणारे नेते म्हणून किशोर जोरगेवार यांची ओळख असून मंदिर परिसराच्या विकासासाठी आमदार जोरगेवार प्रयत्न करत आहे. मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत, असे या कार्यक्रमात बोलताना आदिवासी विकासमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके म्हणाले.

      आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास सांगणारे हे मातेचे मंदिर आहे. मातेच्या आशीर्वादामुळे आम्ही आज सक्षम आहोत. नवरात्र हा नारीशक्तीचा उत्सव असून या महोत्सवाच्या माध्यमातून नारीशक्तीचा सन्मान होत असल्याचे त्यांनी सांगितले. महाकाली महोत्सव ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा श्वास आणि समाजाची ताकद आहे. देवीची आराधना ही स्त्रीशक्तीचे, मातृत्वाचे आणि धैर्याचे प्रतीक आहे. महाकाली म्हणजे अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि सत्यासाठीची निष्ठा आहे. Mata Mahakali festival cultural & devotional events

    या महोत्सवाच्या निमित्ताने आपण एकत्र येतो; विविध जात, धर्म, भाषा असलेले लोक एका मातेच्या छत्राखाली नतमस्तक होतात हीच खरी भारतीय संस्कृती आहे. महोत्सवाच्या काळात आयोजित होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तिगीतांचे गायन, धार्मिक विधी आणि सामाजिक उपक्रम हे आपल्या समाजाला नवचैतन्य देणारे आहेत. या परंपरेतून आपल्या पिढ्यांना श्रद्धा, शिस्त आणि सामूहिकतेचा धडा मिळतो, असे सांगत त्यांनी महाकाली महोत्सवातील विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे कौतुक केले. Shri Mata Mahakali festival Chandrapur

    उद्याचे कार्यक्रम

    संध्याकाळी आरतीनंतर रात्री ७ वाजता फिल्मफेअर पुरस्कृत, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका साधना सरगम यांचा भक्ती संगीत कार्यक्रम

    सकाळी ९ वाजता श्री माता महाकाली आरती व महेश भजन मंडळाचे भजन

    दुपारी लखमापूर हनुमान मंदिर यांच्या वतीने सुंदरकांडाचे आयोजन

  • Chandrapur BJP news । महाराष्ट्रात विकासाचे सरकार; भाजप कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ – चंद्रशेखर बावनकुळे

    घरपट्ट्यांपासून वीजदर कपात पर्यंत सर्व वचने पूर्ण करू – ना. चंद्रशेखर बावणकुळे

    Chandrapur BJP news

    Chandrapur BJP news : चंद्रपूर २१ सप्टेंबर २०२५ – कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रम आणि जनतेच्या विश्वासामुळेच महाराष्ट्रात विकासाचे सरकार स्थापन झाले. आपल्या एका मताने विकसित भारताचा संकल्प पूर्ण होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने आगामी सर्व निवडणुकांत विजय मिळवून कमळ फुलवावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार घरपट्ट्यांपासून वीजदर कपातीपर्यंत सर्व वचने पूर्ण करणार असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावणकुळे यांनी केले.

    गटबाजीमुळे चंद्रपूर भाजपची डोकेदुखी वाढणार

    भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरतर्फे जैन भवन येथे कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार सुधाकर कोहळे, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, जिल्हा मध्य वर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, ज्येष्ठ नेते विजय राऊत, माजी महापौर राखी कंचर्लावार, महिला आघाडी अध्यक्ष छबु वैरागडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, नामदेव डाहुले, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, महामंत्री रवी गुरुनुळे, श्याम कनकम, मनोज पाल, सविता दंढारे, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, महिला अध्यक्ष वंदना हजारे, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, विनोद खेवले, सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, अरुण तिखे यांच्यासह माजी नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांची मंचावर उपस्थिती होती. Chandrapur BJP news

    बावणकुळे म्हणाले की, तीन कोटी सतर लाख मतांची ताकद घेऊन आणि ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. हे यश इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनाही शक्य झाले नाही, मात्र कार्यकर्त्यांच्या जोरावर आपण ते घडवून आणले.”

    ५० हजार नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात येणार

    ते पुढे म्हणाले की,  या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे शेतकऱ्यांकडून वीजबिल न घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेता आला. घरपट्ट्यांसह ३६ महत्त्वाच्या विषयांवर निर्णय झाले असून ५० हजार नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात येणार आहेत. विजेचे दर कमी करून साडे पाच रुपये प्रति युनिट एवढीच वसुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. महाराष्ट्राला देशातील सर्वात विकसित राज्य करण्याचा त्यांचा संकल्प आहे. Maharashtra electricity tariff reduction 2025

    chandrapur bjp

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत बावणकुळे म्हणाले की, “नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या सर्व निवडणुका आपण जिंकल्या पाहिजेत. आपले सरकार हे वचनपूर्ती करणारे, विकासाच्या माध्यमातून काम करणारे सरकार आहे. ओबीसींवर अन्याय होणार नाही, त्यांच्या हक्काच्या एका टक्यालाही कुणाचा हात लागणार नाही. प्रत्येक समाजाला समान न्याय देणे हीच आमची भूमिका आहे. चंद्रपूरातील प्रत्येक घराला आखीव प्रपत्रिका देण्यात येणार असून गरिबांना घरासाठी अडीच लाख रुपयांची मदत मिळणार आहे. या सर्व योजना कार्यकर्त्यांनी प्रत्येक घराघरात पोहोचवल्या पाहिजेत. chandrapur house patta scheme 2025

    पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा कार्यक्षम

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरात उत्तम कार्यकारिणी तयार झाली आहे. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा कार्यक्षम आहे. जोरगेवार यांचे नेतृत्व आणि हंसराज अहिर यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले आहे. मतदारसंघातील कामे करण्यासाठी जोरगेवार यांची धडपड आम्ही पाहिली आहे. उत्तम काम करणाऱ्या दहा आमदारांमध्ये त्यांचे नाव आहे. त्यांच्या कामामुळे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असून मुख्यमंत्री त्यांना कधीच खाली हाताने पाठवत नाहीत. त्यामुळे आपल्या प्रभागातील परिसरातील कामे आपण करून घ्यावीत, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, असे ते कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

    या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ मंत्रीमंडळ कार्यरत आहे. नागरिकांना घरे देण्याचा घेतलेला निर्णय हा मोठा असून यामुळे नागरिकांची जुनी मागणी पूर्ण होणार आहे. या सरकारमुळे राज्याच्या विकासाला गती मिळत आहे. bjp karykarta sanman

    यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, घरपट्ट्याच्या मागणीसंदर्भात मंत्री बावणकुळे यांनी तात्काळ मुंबईत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला. सत्तेचा लाभ शेवटच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून सुरू आहे.चंद्रपूरमध्ये आयोजित माता महाकाली महोत्सवादरम्यान निघणारी पालखी ही विदर्भातील सर्वात मोठी पालखी असून या मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करत असून चंद्रपूर मतदारसंघाचाही विकास होत आहे. येणाऱ्या सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष जिंकणार असल्याचा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. Chandrapur BJP news

    या वेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ना. चंद्रशेखर बावणकुळे यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यकर्ता मेळाव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, येणाऱ्या निवडणुकांत विजयाची पताका फडकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.