Tag: आमदार किशोर जोरगेवार

  • Mata Mahakali Festival 2025 । आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते महाकाली महोत्सव मंडप पूजन

    Mata Mahakali Festival 2025

    Mata Mahakali Festival 2025 : चंद्रपूर १८ सप्टेंबर २०२५ – २७ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त आज श्री माता महाकाली महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मंडप पूजन करण्यात आले. माता महाकाली पटांगणात आयोजित या महोत्सवात पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    दिल्लीमध्ये राहुल गांधींची पत्रकार परिषद आणि खळबळ चंद्रपुरात

    या मंडप पूजन कार्यक्रमाला श्री माता महाकाली महोत्सवाचे उपाध्यक्ष सुनील महाकाले, सचिव अजय जैस्वाल, सहसचिव बलराम डोडानी, विश्वस्त मिलिंद गंपावार, संजय बुरघाटे, अजय वैरागडे, राजू शास्त्रकार, भारतीय जनता पार्टी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, दशरथ ठाकूर, तुषार सोम, सविता दंडारे, प्रदीप किरमे, अरुण तिखे, वंदना तिखे, दुर्गा वैरागडे, विमल काटकर, नीलिमा वणकर, चंद्रशेखर देशमुख, दिगंबर चिमुरकर, कल्पना शिंदे, ताहीर हुसैन, प्रवीण कुलटे आदीची उपस्थित होते.

    ३० सप्टेंबरला नगर प्रदक्षिणा व पालखी

    दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रात श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून ३० सप्टेंबरला नगर प्रदक्षिणा व पालखी काढण्यात येणार आहे. महोत्सवाची तयारी उत्साहात सुरू असून आज मंदिर परिसरात विधीवतरीत्या मंडप पूजन करण्यात आले. Mahakali festival schedule and programs

    शारदीय नवरात्राच्या पावन पर्वावर आयोजित श्री माता महाकाली महोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम ठरणार आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून येथील व्यवस्थेचा आढावा घेतला. दरवर्षी प्रशासनाकडून महोत्सवाला मोठे सहकार्य मिळत असते. यंदाही महोत्सव समितीसोबत समन्वय साधून उत्तम नियोजन करावे, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या. Chandrapur religious events 2025

    यावेळी प्रभारी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, अति. आयुक्त चंदन पाटील, अति. पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, शहर अभियंता रवींद्र हजारे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. अमोल शेळके, उपअभियंता (यांत्रिकी) रवींद्र कळंबे, उपअभियंता (विद्युत विभाग) प्रगती भुरे, सहायक अभियंता (स्थापत्य विभाग) आशिष भारती, सहायक अभियंता (स्थापत्य विभाग) वैष्णवी रिठे, सहायक अभियंता (स्थापत्य विभाग) अतुल भसारकर आदी अधिकारी उपस्थित होते.

  • Sewage treatment plant gas leak Chandrapur | चंद्रपुरात सांडपाणी प्रकल्पातून क्लोरीन गळती; नागरिकांचे स्थलांतर, मोठी दुर्घटना टळली

    Sewage treatment plant gas leak Chandrapur

    Sewage treatment plant gas leak Chandrapur : चंद्रपूर १७ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर महानगरपालिकेच्या सिव्हरेज सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट) मधून सायंकाळी ६ वाजेदरम्यान क्लोरीन गॅस ची गळती झाल्याने एकच खळबळ उडाली. चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसरात असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून क्लोरीन गळती मुळे प्रशासनाने परिसर खाली करीत नागरिकांना महानगरपालिका शाळेत हलविले. वेळेच्या आत परिस्थितीवर नियंत्रण मिळाल्याने मोठी घटना टळली.

    चंद्रपुरातील ह्या पोलीस निरीक्षकाच्या त्रासाने कंटाळले पोलीस कर्मचारी

    सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून चंद्रपूर औष्णिक वीज प्रकल्पाला पाणी पुरवठा केला जातो. सांडपाणी प्रकल्प हा चंद्रपूर मनपा चा आहे मात्र सध्या यावर संपूर्ण नियंत्रण औष्णिक वीज केंद्राचे आहे, क्लोरीन गळती मुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला होता, अचानक उदभवलेल्या या परिस्थितीमुळे अनेक महिला बेशुद्ध पडल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. Chandrapur chlorine gas leak news

    चंद्रपूर मनपाच्या नवनियुक्त प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांनी अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाचारण केले व परिस्थितीवर नियंत्रण आणले. 60 ते 70 घरातील लोकांना किदवाई शाळेत तसेच इतर महानगरपालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आलेले आहे परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती आयुक्त गायकवाड यांनी दिली. सोबतच अशी घटना पुन्हा होऊ नये याकरिता महाजेनको सोबत बैठक घेणार असल्याचे आयुक्त गायकवाड यांनी सांगितले. Emergency response chlorine leak Chandrapur

    चंद्रपूर शहराबाहेरील असलेल्या या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची एकूण क्षमता हि दररोज २५ दशलक्ष लिटर इतकी आहे.

    खासदार यांनी केली चौकशीची मागणी

    चंद्रपुरातील जल शुद्धीकरण केंद्रातून आज क्लोरीन गॅस गळती झालेल्या घटनेची चंद्रपूर मनपा व जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेत यामागील चौकशी करावी असे निर्देश खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले आहे. या घटनेमुळे मोठी दुर्घटना टळली पण पुन्हा अशी चूक होता कामा नये याकरिता यामागील पूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे.

    आमदाराची तत्परता

    रहमत नगर येथील सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट मधून क्लोरीन गॅस लिकेज झाल्याने नागरिकांना उलटीचा आणि श्वसनाचा त्रास झाला होता. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह प्लांटची पाहणी केली. आमदार जोरगेवार यांच्या सूचनेनंतर सदर लिकेज बंद करण्यात आले असून सावधगिरी म्हणून येथील नागरिकांना इतरत्र हलविण्यात आले आहे. स्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, मनपाच्या प्रभारी आयुक्त आयुक्त वर्षा गायकवाड, शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार रामटेके उपस्थित होते. Sewage treatment plant gas leak Chandrapur
    mla jorgewar on spot
               रहमत नगर येथे चंद्रपूर महानगरपालिकेचा सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट आहे. सदर प्लांटमधून क्लोरीन गॅस लिकेज झाल्याची घटना आज (बुधवार) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. गॅस गळतीमुळे परिसरातील अनेक नागरिकांना उलटी व श्वसनाचा त्रास सुरू झाला. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांसह घटनास्थळी भेट दिली. यावेळी तातडीने गळती बंद करण्यात आली असून जवळपासच्या नागरिकांना किदवई हायस्कूल येथे हलविण्यात आले आहे.सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले आहे.
  • Nazul land ownership rights scheme । आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश, नझूल जमिनीवरील घरपट्टे मिळणार कायमस्वरूपी

    Nazul land ownership rights scheme

    Nazul land ownership rights scheme : चंद्रपूर ८ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण मागणीला प्रतिसाद देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच मंत्रालयात बैठक घेऊन या प्रक्रियेला गती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आमदार किशोर जोरगेवार यांनी आढावा बैठक घेत महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

    राज्यातील ७५ हजार युवक -युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी

    या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी संजय पवार, मनपा उपायुक्त संदीप चिद्रावार, तहसीलदार विजय पवार, घुग्घुस नगरपरिषद कार्यकारी अधिकारी रांजनकर, नगररचना विभागाचे प्रतीक जिवतोडे, राहुल भोयर यांच्यासह भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्षा छबू वैरागडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, महामंत्री रवि गुरनुळे, श्याम कणकम, सविता दंढारे, मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, विनोद खेवले, माजी नगरसेवक देवानंद वाढई, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, शीतल गुरनुळे, कल्पना बबुलकर, राशिद हुसेन, विठ्ठल डुकरे, अरुण तिखे, प्रज्ञा बोरगमवार, हेमंत उरकुडे, संतोष नुने, राजकुमार गोडसेलवार, साजन गोहने, मुन्ना लोडे आदींची उपस्थिती होती. Nazul land lease allotment

    सर्वेक्षणाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करा

    आ. किशोर जोरगेवार यांनी बैठकीत म्हटले की,  सर्वेक्षणाची प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्वरित पूर्ण करावी. ठरविण्यात येणाऱ्या नवीन नियुक्त एजन्सींनी ठरविलेल्या वेळेत काम पूर्ण करणे आवश्यक असून प्रशासनाने या कामावर सातत्याने देखरेख ठेवावी. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला न्याय मिळावा यासाठी सर्वेक्षणाची प्रक्रिया पारदर्शक ठेवावी. नझूल जमिनीवरील घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या मूळ रहिवाशांची हक्काची नोंद होणे आवश्यक आहे.

    कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे. सर्वेक्षण व पट्टावाटपाची प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन प्रत्येक कुटुंबाला दिलासा मिळावा, हे आपले ध्येय असावे. पारदर्शकता व विश्वास निर्माण होण्यासाठी स्थानिक जनतेला प्रक्रियेची माहिती सतत देत राहावी, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. Nazul land survey and housing rights distribution

    चंद्रपूर शहरातील एकूण ३९ झोपडपट्ट्या नझूल जमिनीवर असल्याची नोंद मनपाकडे आहे. त्यापैकी दोन झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे. यासाठी नवीन एजन्सी नियुक्त करण्याचा कंत्राट महानगरपालिकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर ५२३ नागरिकांनी पट्ट्यासाठी प्रस्ताव सादर केल्याची माहिती यावेळी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. सदर नागरिकांना लवकर पट्टे वाटप करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत.

  • Chandrapur flood water enters 250 houses । अतिवृष्टीमुळे पडोली गावातील आमटा वॉर्डात 250 घरांना फटका, आमदार जोरगेवार यांचा दौरा

    Chandrapur flood water enters 250 houses

    Chandrapur flood water enters 250 houses : चंद्रपूर २ सप्टेंबर २०२५ – कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील पडोली येथील आमटा वॉर्ड परिसरात जवळपास 250 घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. या घटनेत नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने मदतकार्य सुरू असून नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत हलविण्यात आले आहे. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी आज मंगळवारी अधिकाऱ्यांसह सदर परिसराची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.

    जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे एकमेव पर्याय, चंद्रपुरात मनसेचा पक्षप्रवेशाचा धडाका

    यावेळी तहसीलदार विजय पवार, बीडीओ संगीता भांगडे, भाजप नेते नामदेव डाहुले, मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, नकुल वासमवार, राकेश पिंपळकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    नागरिकांचे नुकसान

    कालपासून चंद्रपूरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी शिरले असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह ग्रामीण भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पडोली येथील आमटा वॉर्डातील स्थितीचीही त्यांनी पाहणी केली. MLA Kishor Jorgewar Chandrapur flood relief efforts

    chandrapur flood relief efforts

    आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूलकित सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक सूचना केल्या. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या तसेच संबंधित अधिकारी व प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

    सध्या सर्व प्रभावित नागरिकांची तात्पुरती व्यवस्था जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आली असून त्यांना जेवण, पाणी व इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रभावित नागरिकांना शक्य तितकी मदत व दिलासा मिळावा, यासाठी मी सातत्याने प्रशासनाशी समन्वय साधत आहे, असे आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

  • Amma Ki Padhai competitive exam guidance । ‘अम्मा कि पढ़ाई’ उपक्रम पुन्हा सुरू—284 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत मार्गदर्शन!

    Amma Ki Padhai competitive exam guidance

    Amma Ki Padhai competitive exam guidance : चंद्रपूर ३१ ऑगस्ट २०२५ – आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला अम्मा कि पढाई उपक्रम पुन्हा नव्याने रेडक्रॉस भवन येथे सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत 284 प्रतिभावंत, गरीब व गरजूं विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी निशुल्क मार्गदर्शन मिळणार आहे. रविवारी या उपक्रमाचा शुभारंभ आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आला. अम्माच्या आशीर्वादाने हा उपक्रम पुन्हा सुरू होत असल्याचा मला आनंद आहे, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

    आरक्षण वाचविण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण

    या कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू विजय आईंचवार, रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप रामटेके, सचिव गण्यारपवार, अजय जयस्वाल, अम्मा कि पढाई फाऊंडेशनचे उपाध्यक्ष संजय बेले, सचिव सुमित बेले, विश्वस्त नायब तहसीलदार प्रतिक बोडे, चंदु वासाडे, प्रसाद जोरगेवार, पोलिस उपनिरीक्षक अनिल देरकर, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, तुषार सोम, विमल कातकर, कौसर खान आदी मान्यवर उपस्थित होते. Amma Ki Padhai relaunched at RedCross building

    free coaching amma ki padhai

    यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, काही काळ हा उपक्रम थांबला होता. तेव्हा खरंच अंतःकरणाला दुःख होत होतं. विद्यार्थ्यांची स्वप्नं, त्यांचा उत्साह आणि उर्मी यांना थोडा विराम मिळाल्यासारखं वाटलं. पण आज अम्मा कि पढाई पुन्हा सुरू होत आहे, हीच माझ्यासाठी खरी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. अम्माच्या आशीर्वादाने आणि समाजाच्या विश्वासाने हा प्रवास पुन्हा नव्या जोमानं पुढे नेण्याचा निर्धार केला आहे.

    हेच विद्यार्थी उद्या अधिकारी म्हणून जिल्ह्याचे आणि देशाचे नेतृत्व करतील

    ते पुढे म्हणाले, शिक्षण हेच व्यक्तीला आयुष्यातील खरी ताकद देणारे साधन आहे. कुटुंबाची, गावाची आणि समाजाची उन्नती शिक्षणाशिवाय शक्य नाही. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी होण्यासाठी मोफत मार्गदर्शनाची संधी मिळावी, या हेतूने या उपक्रमाची सुरुवात केली. आज 284 विद्यार्थी या उपक्रमाचा भाग होत आहेत. हेच विद्यार्थी उद्या अधिकारी म्हणून जिल्ह्याचे आणि देशाचे नेतृत्व करतील, ही खात्री आहे. Amma Ki Padhai competitive exam guidance

    या उपक्रमाचा उद्देश केवळ शिक्षण देणे नसून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, चिकाटी व समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा जागवणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा उपक्रम थांबवताना वेदना झाल्या; पण या काळात अनेकांनी प्रोत्साहन दिले. विशेषतः रोटरी क्लबने हॉल उपलब्ध करून मोठे सहकार्य केले. येथून पुन्हा नव्या जोमाने आम्ही हा उपक्रम पुढे नेणार आहोत. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, वेळेचे महत्त्व आणि मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करावे. विद्यार्थ्यांच्या पाठीशी पालक, शिक्षक आणि समाज आहे. की अम्मा कि पढाई उपक्रमाचा विस्तार करून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची ज्योत पोहोचवू, असे आमदार जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांची उपस्थिती होती. 

  • women and youth BJP joining । 🌟 आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत ४०० महिला व युवकांनी भाजपात घेतला प्रवेश

    women and youth BJP joining

    women and youth BJP joining : चंद्रपूर (३० ऑगस्ट २०२५) – आजचा कार्यक्रम हा फक्त प्रवेशाचा किंवा औपचारिक कार्यक्रमाचा क्षण नाही, तर समाजहितासाठी नवे वचन देण्याचा क्षण आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करून तुम्ही राष्ट्रसेवेच्या एका महान प्रवासाची सुरुवात केली आहे. भाजप हा केवळ सत्तेसाठीचा पक्ष नाही, तो समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणारा पक्ष आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ही घोषणा म्हणजेच आपली विचारधारा आहे. या विचारधारेचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत करणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    ग्रामीण भागात मनसेचा झंझावात, माजी सरपंचाचा मनसे मध्ये प्रवेश

    घुग्घुस येथे आज शनिवारी पक्ष प्रवेश आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते प्रा. हेमंत उरकुडे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सोबतच सय्यद इद्रीस, नीतू जायसवाल, सविता गोहणे, मनीषा मेश्राम, उज्वला उईके, रमन तांद्रा, गुरुदास तंग्रपवार, मल्लेश बल्ला, किशोर धनकमारे, लक्ष्मी चांदेकर, सय्यद हुसेन अली यांच्या नेतृत्वाखाली ४०० हून अधिक  महिला व युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. Kishor Jorgewar speech

    ghugus news

    या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, महामंत्री मनोज पाल, महामंत्री सविता दंढारे, तुषार सोम, नामदेव डाहुले, मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, आशिष मासिरकर, अमोल शेंडे, राशिद हुसेन, सायली येरणे, संतोष नुने, राजकुमार बोरचेलवार, मुन्ना रोडे, संजय भांगडे, श्याम अगदारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

    यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भाजप हा केवळ राजकीय पक्ष नाही तर तो एक राष्ट्रभक्तीची चळवळ आहे. या पक्षाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, विकासाभिमुख विचार आणि सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास ही घोषणा आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने जात आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केलेला तुमचा पक्षप्रवेश हा पक्षाला आणखी बळकट करणारा आहे. Ghugus BJP induction event leadership quotes

    कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच पक्ष बळकट

    भाजप कार्यकर्त्यांचे स्थान फार मोठे आहे. येथे कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच पक्ष बळकट होतो. तुम्ही ज्या ऊर्जेने आज प्रवेश केला आहे, तीच ऊर्जा पुढील काळात संघटनाच्या कार्यात वापरावी. भाजप सरकारने गरीब, शेतकरी, कामगार, महिला आणि युवकांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. उज्ज्वला योजनेतून घराघरात गॅस पोहोचला, प्रधानमंत्री आवास योजनेतून लाखो घरे उभी राहिली, जनधन योजनेतून गरिबांना बँकेत खाते मिळाले, शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी सुरु झाला, तर युवकांसाठी स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया सारख्या योजनांमधून संधी निर्माण झाल्या. women and youth BJP joining

    पक्षात प्रवेश करणे ही पहिली पायरी आहे. आज ४०० कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झालात, यामुळे संघटनाला नवसंजीवनी मिळाली आहे. तुमच्या ऊर्जेने आणि तुमच्या प्रामाणिकपणाने आपण येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित करू, असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

    यावेळी भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Nazul holders permanent patta order । आमदार जोरगेवारांचा पाठपुरावा – नझूल धारकांना अखेर घरपट्टे निश्चित

    Nazul holders permanent patta order

    Nazul holders permanent patta order : चंद्रपूर – (२६ ऑगस्ट २०२५) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई मंत्रालयात बैठक घेऊन चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची प्रक्रिया गतीशील करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठीच्या सर्वेक्षणाकरिता पाच एजन्सी नियुक्त करून त्याचा खर्च खनिज विकास निधीतून करण्याचे निर्देशही ना. बावनकुळे यांनी दिले असून सहा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

    मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला जोड्याचा प्रसाद

    चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावेत, तसेच विविध विषयांवर बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबई मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकर, अवर सचिव आश्विनी यमगर, चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा उपस्थित होते. तर महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डी. एस. कुंभार, तहसीलदार विजय पवार, मनपाचे अप्पर आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त चीद्रावार, संजय गांधी योजनेंतर्गत तहसीलदार सीमा गजभिये, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी गायकवाड आदी अधिकारी व्हिसीच्या माध्यमातून उपस्थिती होती. Nazul land permanent pattas process

    नागरिकांची सतत मागणी

    चंद्रपूर शहरात नझूल जागेवर मोठी लोकवस्ती असून या नागरिकांकडे कायमस्वरूपी पट्टे नसल्याने त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील ५० ते ७० वर्षांपासून वास्तव्यास असूनही पट्टे न मिळाल्याने येथील नागरिक सतत मागणी करत होते. याच मागणीसंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाशी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचे फलित स्वरूप महसूल मंत्री यांनी सदर विषयावर बैठक घेतली. या बैठकीत सर्वेक्षण पूर्ण झालेल्या ७०० नागरिकांना तात्काळ पट्टे वाटप करण्याचे आदेश देण्यात आले.

    सर्व्हेसाठी पाच एजन्सींची नियुक्ती करण्याचे आदेश

    चंद्रपूर शहरात 39 झोपडपट्टी नझुलच्या जागेवर असल्याची नोंद मनपाकडे आहे. यातील 14 झोडपट्टांचे सर्वेक्षण झाले आहे. तर उर्वरित झोडपट्टींचे सर्वेक्षण सुरु आहे. मात्र सध्या एकाच एजन्सीमार्फत सर्वेक्षण सुरू असल्याने काम संथ गतीने सुरू असल्याचे आमदार जोरगेवार यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी पाच एजन्सींची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. सर्वेक्षणाचा खर्च खनिज विकास निधीतून करण्याचेही निर्देशही यावेळी देण्यात आले. त्यामुळे आता शहरातील जवळपास १८ हजार घरांना पट्टे मिळणार आहेत. त्यासोबतच घुग्घुस येथील नझूल धारक नागरिकांनाही पट्टे देण्यात येणार आहेत.

    याशिवाय संजय गांधी योजनेंतर्गत तहसीलदारांची रिक्त पदे तातडीने भरून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले. तसेच नझूल प्रकरणांसाठी स्वतंत्र तलाठी नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. घुग्घुससाठी स्वतंत्र क्रीडांगणाची जुनी मागणी आमदार जोरगेवार यांनी बैठकीत मांडली. त्यानुसार जागेची अडचण दूर करून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. याशिवाय घुग्घुस परिसरात अप्पर तहसील कार्यालयासही मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी चंद्रपूरला जाण्याची गरज भासणार नाही. nazul land survey agencies

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारामुळेच या बैठकीत मतदार संघातील प्रश्न प्राधान्याने चर्चेत आले. त्यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांना गती मिळणार असून चंद्रपूर-घुग्घुस परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या बैठकीला चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ देवतळे, नामदेवभाऊ डाहुले, भाजपा महामंत्री रवींद्र गुरनुले, शाम कणकम, सविताताई दंडारे, घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, माजी नगरसेविका कल्पनाताई बगुलकर,  आदी मान्यवर उपस्थित होते. Nazul holders permanent patta order

  • Bail Pola festival Chandrapur । 🌾 चंद्रपूरमध्ये बैलपोळ्याचा जल्लोष! आमदार जोरगेवारांनी केली बैलजोडीची पूजा

    Bail Pola festival Chandrapur

    Bail Pola festival Chandrapur : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील साखरवाही येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार उपस्थित राहून सहभागी झाले. यावेळी त्यांनी बैलजोडीची पूजा करून सन्मान केला तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.

    स्पेलिंग चुकली, विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

    भावनिक संदेश

    यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, “बैलपोळा हा केवळ धार्मिक वा पारंपरिक सण नसून शेती संस्कृतीचा आत्मा आहे. शेतकरी आणि बैल यांची जोडी ही अन्नधान्य निर्मितीमागील खरी ताकद आहे. त्यांच्या श्रमांचा सन्मान करून आपण कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो. महाराष्ट्राची ही परंपरा बैलांप्रती असलेले प्रेम, आपुलकी, निष्ठा आणि निसर्गाशी असलेले घट्ट नाते अधोरेखित करते.”

    तसेच त्यांनी पुढे सांगितले की, बैलांचा सन्मान करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातील त्यांच्या महत्त्वाची कबुली देणे होय. त्यांच्या श्रमांशिवाय शेती अपूर्ण आहे, म्हणूनच बैलपोळा हा सण म्हणजे त्यांच्या त्याग, श्रम आणि निष्ठेला मानाचा मुजरा अर्पण करण्याचा सोहळा असल्याचे ते म्हणाले.



  • inspection Mahakali temple development । चंद्रपूर महाकाली मंदिरात नवरात्रीपूर्वी विकासकामांचा धडाका, आमदार जोरगेवार यांनी केली पाहणी

    inspection Mahakali temple development

    inspection Mahakali temple development : चंद्रपूर – चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिरपरिसरात भाविकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून येथील विविध विकासकामे सुरू असून, त्यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या गुणवत्तेची माहिती घेतली. यावेळी नवरात्रीपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

    आमदार जोरगेवार यांच्या सेवाभावी उपक्रमातून ३५ रुग्णांना मिळाली नवी दृष्टी

    या पाहणी वेळी चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे शहर अभियंता रवींद्र हजारे, अभियंता आशिष भारती, भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष सुभाष कासनागोट्टूवार, भाजप नेते नामदेव डाहुले, महामंत्री रवि गुरुनुले, सविता दंढारे, मंडळाध्यक्ष अॅड. सारिका संदुरकर, स्वप्निल डुकरे, सुभाष अदमाने, माजी नगरसेविका कल्पना बबुलकर, मुग्धा खाडे, संजीव सिंग, विमल कातकर, नकुल वासमवार, कोमल दाणव आदींची उपस्थिती होती. Chandrapur Mahakali temple devotional amenities upgrade

    भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्या

    सध्या मंदिर परिसरात सुरक्षा भिंतीचे बांधकाम, गुट्टू लावणे, परिसरातील स्वच्छता व सौंदर्यीकरणचे कामे सुरू आहेत. या कामांचा आढावा घेताना आमदार जोरगेवार म्हणाले कि, महाकाली माता ही चंद्रपूरची आराध्यदेवता असून, येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने त्यांना उत्तम सुविधा, सुरक्षित वातावरण आणि स्वच्छ परिसर मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मंदिर परिसरात स्वच्छता आणि सोयीसुविधा केंद्रस्थानी ठेवून उत्तम व्यवस्था उभारली जात असल्याचे ते म्हणाले.

    आमदार जोरगेवार यांच्या पुढाकाराने मंदिर परिसरात सुरू असलेली कामे लवकरच पूर्ण होऊन भाविकांच्या सेवेत उपलब्ध होतील. यामुळे मंदिर परिसर अधिक आकर्षक, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असून भाविकांच्या समाधानात भर पडणार आहे. पाहणीदरम्यान स्थानिक नागरिक व संबंधित अधिकारी संख्येने उपस्थित होते.

  • Kishor Jorgewar Charitable initiative । किशोर जोरगेवार यांच्या सेवाभावी उपक्रमातून 35 रुग्णांना नवी दृष्टी 👓✨

    Kishor Jorgewar Charitable initiative

    Kishor Jorgewar Charitable initiative : चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहात घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात ३५ रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आज या सर्व रुग्णांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात नि:शुल्क चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार जोरगेवार यांनी सर्व रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची व तेथील व्यवस्थेबाबत विचारपूस केली. Devabhau Janakalyan Seva Saptah free eye checkup camp

    चंद्रपूर मनपाने जप्त केले २८० किलो प्लास्टिक

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहच्या माध्यमातून विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. समाजातील सर्वसामान्य घटकांना मदतीचा हात देण्यासाठी हाती घेतलेल्या या उपक्रमांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

    ३५ रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

    या सेवा सप्ताहात आरोग्य हा महत्त्वाचा घटक मानून भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरादरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी तपासणी करून घेतली. विशेषतः डोळ्यांच्या तपासणीत अनेक ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदूची समस्या असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार या रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात तातडीने व्यवस्था करण्यात आली. या अंतर्गत ३५ रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. Free spectacles distribution Devabhau Janakalyan Seva Saptah

    बुधवारी या सर्व रुग्णांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात चष्म्यांचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी आमदार जोरगेवार यांनी स्वतः रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

    मोतीबिंदूच्या आजारामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात अडचणींना सामोरे जावे लागते. योग्य वेळी उपचार न झाल्यास दृष्टी गमावण्याची वेळ येते. मात्र, अशा शिबिरांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नवी दृष्टी मिळते. सेवाभावी कार्यातून समाजातील दुर्बल घटकांना आधार मिळवून देणे हेच खरे जनसेवेचे आणि मानवसेवेचे ध्येय असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते प्रकाश देवतळे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, मंडळ अध्यक्ष सुभाष आदमाने, देवा कुंटा यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.