Tag: आमदार किशोर जोरगेवार

  • युवा काँग्रेस नेते भाजपात! जोरगेवारांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश

    Chandrapur political switches : चंद्रपूर ७ डिसेंबर (News३४) – युवक काँग्रेस विधानसभा महासचिव वैभव रघाताटे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा कार्यक्रम आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या गजानन निवासस्थानी उत्साहात पार पडला. (हे वाचा : रस्त्याचे दुरुस्तीकरण निकृष्ट दर्जाचे, नागरिकांचा एल्गार)

    यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी महानगर अध्यक्ष छबु वैरागडे, विधानसभा अध्यक्ष दशरथ सिंह ठाकुर, महामंत्री सविता दंढारे, अॅड. राहुल घोटेकर, देवानंद वाढई आदींची उपस्थिती होती.

    हा पक्षप्रवेश भाजपला ऊर्जा देणारा

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आजचा दिवस केवळ पक्ष प्रवेशाचा नाही, हा विश्वासाचा दिवस आहे. वैभव रघाताटे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाचा आपल्या कुटुंबात प्रवेश हा आपल्या संघटनेला नवी ऊर्जा देणारा आहे. राजकारण म्हणजे पदाचा अभिमान नव्हे, तर जबाबदारी आहे. जनता आपल्या पासून अपेक्षा ठेवते. या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद कार्यकर्त्यांत आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा या पक्षाचा आधारस्तंभ आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक भागात आपण काम केले आहे. अभ्यासिकांचा उभार, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा यासह प्रत्येक ठिकाणी आपण योजनाबद्ध काम केले आहे. लोकांच्या जीवनमानात बदल दिसायला लागला आहे. पक्षात येणाऱ्याचे आपण कौतुक करतो, जपतो आणि योग्य संधी देतो. पक्ष प्रवेश म्हणजे शेवट नाही, तर ती सुरुवात आहे, असे ते यावेळी म्हणाले. Chandrapur political switches

    यावेळी रघाताटे यांच्यासह आलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यात भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा घालून आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. वैभव रघाताटे यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितले की, आमदार किशोर जोरगेवार यांच्या विकासकामांनी प्रभावित होऊन आम्ही भाजपात आलो आहोत. चंद्रपूरात विकासाची नवी दिशा सुरू झाली आहे. आम्ही या प्रवासात सक्रिय सहभाग करणार, असे ते यावेळी म्हणाले.

  • घुग्घुस BJPची दमदार पदयात्रा! विकासाच्या बळावर विजयाचा आत्मविश्वास – आमदार जोरगेवार

    ठोस विकासकामांच्या आधारावर निवडणूक जिंकू  – आ. किशोर जोरगेवार

    MLA Kishor Jorgewar election rally Ghugghus : चंद्रपूर २८ नोव्हेम्बर (News३४) – घुग्घुस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, घुग्घुसतर्फे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमूख उपस्थितीत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. टिळक नगर येथून निघालेल्या पदयात्रेचे आठवडी बाजार चौक येथ सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी विकासाच्या मुद्यावर आपण निवडणुकीला समोर जात असुन नगराध्यक्ष पदासह सर्व नगर सेवकांना निवडणुन देण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

    राजकीय : भाजप उमेदवारावर महिलांचा संताप, भद्रावती नगरपरिषद निवडणूक

       यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदावार शारदा उर्फ पूजा दुर्गम, घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी, निवडणूक प्रमूख प्रकाश देवतळे, महामंत्री नामदेव डाहुले, विवेक बोडे, तालुका अध्यक्ष विनोद खेवले, चिन्ना नलभोगा यांच्यासह ईतर पदाधिका-यांची उपस्थिती होती.

    खोट्या आश्वासनावर नाही तर विकासावर निवडणूक

       सदर सभेत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, घुग्घुस मध्ये आम्ही जात-पात, भेदाभेद किंवा खोट्या आश्वासनांवर नाही, तर ठोस विकासकामांच्या आधारावर निवडणूक लढवत आहोत. आमदार म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर घुग्घुसमध्ये अनेक महत्त्वाची कामे पूर्ण केली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, क्रीडा सुविधा ते नागरिकांच्या दैनंदिन गरजांपर्यंत विकासाचा वेग वाढवण्याचे काम आम्ही केले आहे. MLA Kishor Jorgewar election rally Ghugghus

    bjp padyatra
    प्रचार सभेत उपस्थित जनसमुदाय

    घुग्घुसचा सर्वांगीण विकास हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. आजच्या पदयात्रेत नागरिकांनी जो प्रेम आणि विश्वास व्यक्त केला, तोच आम्हाला विजयाकडे घेऊन जाणार आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे सर्व भाजपा उमेदवार सक्षम, प्रामाणिक आणि कार्यक्षम आहेत. या विकासाच्या बळावरच ते निश्चित विजयी होतील, असा ठाम विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. वेकोलिच्या तलावामुळे घुग्घुस शहरातील नाल्यांना पूर येतो त्यामुळे या तलावाचे खोलीकरण करण्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर केला आहे.

    येथील रुग्णालय लवकर पुर्ण क्षमतेने सुरु होणार आहे. येथील अनेक विकासकामे मागील काही वर्षात आपण पुर्ण करु शकलो आहे. कॉंग्रेसकडे आज विकासाच्या नावावर सांगण्यासारखे काही नाही.  ते केवळ घुग्घूस वासियांची दिक्षाभुल करण्याचे काम करत त्यांच्या खोट्या प्रचाराला घुग्घुसवासी बळी पडणार नाही असे ते यावेळी बोलतांना म्हणाले. या सभेला घुग्घुस वासियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Ghughus Congress leaders join BJP । आमदार जोरगेवार यांचा राजकीय धक्का, कांग्रेस सेनेचे पदाधिकारी भाजपात

    Ghughus Congress leaders join BJP

    Ghughus Congress leaders join BJP : चंद्रपूर २५ नोव्हेम्बर (News३४) – घुग्घुसच्या कॉंग्रेसच्या माजी शहराध्यक्ष विजया बंडेवार तसेच उबाठाचे उपतालुका प्रमुख गणेश शेंडे यांनी आज मंगळवारी कार्यकर्त्यांसह आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत घुग्घुस येथे भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपाला स्थानिक पातळीवर अधिक बळकटी मिळणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी या दोन्ही नवनियुक्त सदस्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

    Read Also : आदर्श शिक्षकाचा प्रताप, अल्पवयीन मुलीसोबत नराधमी कृत्य

    देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्व आणि राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशल, पारदर्शक व जनहितैषी कामकाजावर विश्वास ठेवून कॉंग्रेसच्या माजी शहराध्यक्ष विजया बंडेवार, कॉंग्रेस नेते अशोक बंडेवार आणि गणेश शेंडे यांनी भाजपाचा विचार स्वीकारला आहे. Ghughus Congress leaders join BJP

    यावेळी नवनियुक्त सदस्यांचे पक्षात स्वागत करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रहित, विकास आणि सर्वसमावेशक प्रगतीचा मार्ग स्वीकारणारा पक्ष आहे. आज विजया बंडेवार आणि गणेश शेंडे यांनी आमच्या पक्षावर ठेवलेला विश्वास हा आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या अनुभवामुळे आणि नेतृत्वामुळे संघटना अधिक बळकट होईल आणि घुग्घूसमध्ये विकासाची नवी ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास आहे. पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान मौल्यवान असून त्यांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. विकासाच्या प्रवासात आम्ही एकजुटीने काम करत राहू आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू, असे यावेळी ते म्हणाले.

  • Matoshri Gram samruddhi rural road scheme । शेतकऱ्यांना दिलासा! 100+ पाणंद रस्त्यांना मोठी मंजुरी; जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश

    Matoshri Gram samruddhi rural road scheme

    Matoshri Gram samruddhi rural road scheme : चंद्रपूर २२ नोव्हेम्बर (News 34) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील 100 पेक्षा अधिक पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीची सोय मोठ्या प्रमाणात सुधारेल तसेच शेतीमाल वाहतूक आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे.

    Read Also : चारचाकी वाहनात दागिने ठेवणे पडले महागात, चोराने डाव साधला

    आतापर्यंत ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांना पावसाळ्यात चिखल, पाणथळ आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे शेतात जाणे कठीण व्हायचे. त्यामुळे शेती उत्पादन खर्च वाढत होता आणि वेळेवर शेतीकामे करण्यास अडथळे येत होते. मंजूर झालेल्या पाणंद रस्त्यांमुळे आता शेतकरी बांधवांचा श्रम व वेळ दोन्ही वाचणार असून पीक उत्पादन बाजारात नेण्याचे मार्गही सुकर होणार आहेत. या मंजुरीने ग्रामीण जनतेत मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे. Matoshri Gram samruddhi rural road scheme

    या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आभार व्यक्त केले आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील गावोगाव रस्ताविकासाचा प्रश्न जलद गतीने मार्गी लागत असून ग्रामीण भागात सर्वांगीण प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

    या मंजूर पाणंद रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचवण्याचा दृढ संकल्प यामधून दिसून येतो. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा, विकासाचे नवे दालन उघडणारा हा निर्णय कृषी आणि ग्रामविकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

    शेतकरी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या दैनंदिन श्रमांना मदत होणे आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी सुविधा मिळणे ही सरकारची जबाबदारी आहे. या पाणंद रस्त्यांच्या मंजुरीमुळे ग्रामीण भागातील विकासाला मोठी चालना मिळणार असून शेतकऱ्यांना वास्तविक दिलासा मिळेल. Matoshri Gram samruddhi rural road scheme

    माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचवण्याचा दृढ संकल्प आम्ही केला आहे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील. ही मंजुरी ही फक्त सुरुवात आहे. पुढील काळातही ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात अधिकाधिक विकासकामे होत राहतील,” अशी प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.

  • municipal corporation BJP planning meeting । ६६ जागेसाठी चंद्रपूर भाजपकडे तब्बल ४४० अर्ज; आमदार जोरगेवार म्हणाले पक्ष ज्याचे नाव पुढे करेल..

    municipal corporation BJP planning meeting

    municipal corporation BJP planning meeting : चंद्रपूर २१ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने अर्ज मागविण्यात आले आणि या अर्ज प्रक्रियेमध्ये 440 इच्छुकांनी आपली नोंदणी केली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल होणे हे आपल्या पक्षाची ताकद, जनतेतील वाढता विश्वास आणि आपल्यातील प्रत्येकाच्या मनात असलेली सेवा भावनेची जाणीव दर्शवते. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. तिकीट वाटपातही कार्यकर्त्यांना प्राधान्य असेल. कार्यकर्तेच भाजपचे शक्तिस्थान असल्याचे प्रतिपादन निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    Read Also : चंद्रपुरात अल्पवयीन मुलाची आत्महत्या, वसतिगृहातील कर्मचाऱ्याने केला मानसिक छळ

    चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. यात 440 इच्छुक उमेदवारांनी आवेदनपत्र सादर केले. आज (शुक्रवार) जैन भवन येथे सदर सर्व इच्छुकांच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. municipal corporation BJP planning meeting

     या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, ज्येष्ठ नेते विजय राऊत, नेते प्रकाश देवतळे, महिला आघाडी अध्यक्षा छबु वैरागडे, माजी महापौर राखी कंचार्लवार, अंजली घोटेकर, माजी उपमहापौर संदीप आवारी, बलराम डोडाणी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, वंदना हातगावकर, तुषार सोम, महामंत्री रविंद्र गुरनुले, मनोज पाल, श्याम कनकम, सविता दंढारे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, मंडळ अध्यक्ष रवी जोगी, प्रदीप किरमे, सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, माजी नगरसेवक संजय कंचार्लवार, अॅड. कुणाल घोटेकर, रवी आसवानी, बंटी चौधरी, अरुण तिखे, माजी नगरसेविका कल्पना बबूलकर, पुष्पा उराडे, वंदना तिखे, प्रवीण गिलबिले आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. municipal corporation BJP planning meeting

    chandrapur bjp election meeting

    यावेळी पुढे बोलताना निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आजची नियोजन बैठक उमेदवारीसाठीची चर्चा नाही, तर आपली एकता, संघटन आणि पक्षनिष्ठा दृढ करण्याचा क्षण आहे. भाजपा ही केवळ एक राजकीय संस्था नाही तर विचारांची, संस्कारांची आणि लोकसेवेची शाळा आहे. येथे येणारा प्रत्येक कार्यकर्ता तळागाळातील लोकांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या विकासाची स्वप्ने मनात ठेवून काम करतो. निवडणूक ही फक्त पदाची लढाई नसते, ती नागरिकांच्या विश्वासाची आणि भविष्यातील विकासाची जबाबदारी आहे. चंद्रपूर महापालिकेची निवडणूक ही शहराच्या भविष्याची निवडणूक आहे. नागरिकांना पारदर्शक प्रशासन, विकासाभिमुख धोरण, आणि लोकांसाठी सतत उपलब्ध राहणारी व्यवस्था हवी आहे. ही अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे ते यावेळी म्हणाले. municipal corporation BJP planning meeting

    उमेदवारी मिळणे हा निश्चितच सन्मान आहे, पण उमेदवारी न मिळाल्यानंतरदेखील पक्षासाठी मनापासून, निष्ठेने आणि त्याच जोमाने काम करणे हा त्याहून मोठा सन्मान आहे. उमेदवार एक असतो, पण त्यामागे उभे राहणारे शेकडो कार्यकर्तेच विजयाची खरी ताकद असतात. पक्ष ज्याचे नाव पुढे करेल, त्याच्यामागे सर्वांनी एकदिलाने, मतभेद दूर ठेवून, फक्त विजयाचे स्वप्न घेऊन उभे राहणे ही खरी संघटना आहे. भाजपा कधीही एखाद्याच्या व्यक्तीपूजनावर चालत नाही, भाजपा विचारांवर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    आपली एकजूट टिकवा, निष्ठेने काम करा, मतभेद विसरा आणि पक्षाचा विजय हेच सर्वोच्च ध्येय समजून पुढे चलण्याचे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी इच्छुक उमेदवारांसह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Congress workers joining BJP । नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घुग्गुस कांग्रेसला धक्का; आमदार जोरगेवारांच्या नेतृत्वावर विश्वास

    Congress workers joining BJP

    Congress workers joining BJP : घुग्गुस २१ नोव्हेम्बर (News३४) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वातील विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत घुग्घूस परिसरातील काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेशामुळे घुग्घूस व परिसरातील राजकारणात नवीन समीकरणे निर्माण झाली आहेत. पक्षाचा दुपट्टा टाकून सर्व नव्या सदस्यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी पक्षात स्वागत केले आहे.

    Read Also : चंद्रपुरात १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, गळफास घेत केली आत्महत्या

    यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, घुग्घूस शहर अध्यक्ष संजय तिवारी, विवेक बोढे, महामंत्री नामदेव डाहुले यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, घुग्घूस आणि चंद्रपूर शहराचा सर्वांगीण विकास हा आपला एकमेव ध्यास आहे. पक्षात प्रवेश करणे ही फक्त सदस्यता नव्हे, तर विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याची संधी आहे. Congress workers joining BJP

    ते पुढे म्हणाले, पक्ष कोणताही असो, प्रत्येक कार्यकर्ता सामाजिक बांधिलकी जपत काम करत असतो. पण विकासाची गती वाढवायची असेल, जनतेपर्यंत योजना पोहोचवायच्या असतील आणि प्रामाणिकपणे संघर्ष करायचा असेल तर भाजप हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे तुमच्या प्रवेशामुळे घुग्घूसमधील भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. नव्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेची माहिती देण्यात आली. घुग्घूस नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्ष प्रवेशाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

  • MLA vs ex corporator argument video । MLA विरुद्ध माजी नगरसेवक! रस्त्याच्या कामावरून रयतवारीत तुफान वाद

    MLA vs ex corporator argument video

    MLA vs ex corporator argument video : चंद्रपूर १८ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर शहरातील रयतवारी भागात रस्त्याच्या कामावरून आमदार जोरगेवार व कांग्रेसचे माजी नगरसेवक राजेश अडूर हे दोघे भिडल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमात सर्वत्र व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये राजेश अडूर यांनी २०० युनिट बाबत विचारले असता आमदार जोरगेवार यांचा चांगलाच पारा चढला.

    Read Also : प्रेम प्रकरण चिघळले, प्रियकराने केली प्रेयसीच्या पतीची हत्या, चंद्रपूर हादरले

    महाविकास आघाडी सरकारच्या काळात रयतवारी भागातील रस्ता मंजूर करण्यात आला होता, मात्र कामात विलंब झाला, काही महिन्यांनी सरकार कोसळले, शिंदे सरकार सत्तेवर आली आणि महाविकास आघाडी सरकारमधील कामे थांबविण्यात आली, त्याबाबत अडूर यांनी पाठपुरावा करीत रस्त्याचे काम सुरु केले, मात्र रस्त्याचे काम पूर्णत्वास येत असताना आमदार जोरगेवार कार्यकर्त्यांसह त्याच रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कामासाठी पोहचले.

    भूमिपूजन कार्यक्रम स्थळी जोरगेवार दाखल झाले असता अडूर आपल्या समर्थकांसह पोहोचले आणि भूमिपूजन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली, आधी जोरगेवार यांनी शांतपणे म्हणणे ऐकून घेतले. शासनाचे काम असल्याने व माझ्या विधानसभेतील विकासकाम असल्याने मी भूमिपूजन करण्यासाठी याठिकाणी आलो असे सांगितले. मात्र अडूर यांनी तटस्थ भूमिका घेत कार्यक्रम होऊ देणार नाही यावर ठाम राहिले. MLA vs ex corporator argument video

    वाद वाढत गेला आणि अडूर यांनी आमदार जोरगेवार यांच्या २०० युनिट बाबत प्रश्न उपस्थित करीत आधी ते आश्वासन पूर्ण करा असे म्हटले असता जोरगेवार यांचा पारा चढला, शाब्दिक चकमक वाढत गेली, २०० युनिट पाहिजे असेल तर न्यायालयात जाऊन केस कर मी माझे उत्तर देतो असे जोरगेवार म्हणाले. मी जाणार न्यायालयात आणि जाब विचारणार असे उत्तर अडूर यांनी दिले.

    वाद व शाब्दिक चकमकीत भूमिपूजन पार पडले मात्र रयतवारी मधील नागरिकांना रस्त्याच्या कामासाठी आमदार जोरगेवार व माजी नगरसेवक अडूर रस्त्यावर भिडल्याचे दृश्य मनोरंजक दृश्य म्हणून आनंद घेऊ लागले, शाब्दिक चकमकीचा हा व्हिडीओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

    ही राजकीय स्टंटबाजी – आमदार जोरगेवार

    सदर कार्यक्रम हा शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे होता, जेव्हा शासन काही कार्यक्रमाचे आयोजन करते त्यावेळी सर्व जनप्रतिनिधींना नियमाप्रमाणे आमंत्रण दिले जाते, माझ्या विधानसभा क्षेत्रातील कार्यक्रम असल्याने मला जावे लागले, मनपा निवडणूक असल्याने अडुर यांनी राजकीय स्टंटबाजी केली.

  • Ghugghus BJP Nomination Rally । भव्य शक्ती प्रदर्शनासह आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी दाखल केले नामांकन अर्ज

    Ghugghus BJP Nomination Rally

    Ghugghus BJP Nomination Rally : घुग्घूस १७ नोव्हेम्बर (News३४) : घुग्घूस नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षातर्फे आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत भाजपाच्या सर्व उमेदवारांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक काढली त्यानंतर  नगरपरिषद कार्यालयात पोहोचून सर्व उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी शारदा दुर्गम यांनी अधिकृतरीत्या भारतीय जनता पक्षा तर्फे अर्ज सादर केला.

    Read Also : ब्रह्मपुरीत कांग्रेस-वंचित आघाडीचे शक्तिप्रदर्शन, २४ उमेदवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

    सोमवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात झालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण घुग्घूस शहरात निवडणुकीचा रंग आणला. बँक ऑफ इंडिया चौक, गांधी चौक आणि पंचशील चौक मार्गे जात ही रॅली थेट नगरपरिषद कार्यालयात दाखल झाली. ढोल-ताशांचा दणदणाट, घोषणाबाजी आणि भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख भूमिकेचा जयघोष यामुळे परिसरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. पक्षाचे पदाधिकारी, महिला, युवक आणि विविध समाजघटकांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपरिषद कार्यालयात पोहोचल्यानंतर सर्व उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. Ghugghus BJP Nomination Rally

    यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, घुग्घूसची ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून शहराच्या भविष्याचा निर्णायक टप्पा आहे. घुग्घूसचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व रोजगारनिर्मिती या सर्व क्षेत्रांतील प्रगती हीच भारतीय जनता पक्षाची प्राथमिकता आहे.

    ते पुढे म्हणाले, घुग्घूसमध्ये आजवर झालेल्या कामांची यादी मोठी आहे. नागरिकांनी दाखविलेला विश्वास हा आमच्या विकासकार्यासाठी महत्त्वाचा प्रेरणास्रोत आहे. भाजपाच्या उमेदवारांमध्ये प्रामाणिकपणा, काम करण्याची क्षमता आणि जनतेशी असलेला आत्मीय संवाद हीच आमची ताकद आहे.

    शारदा दुर्गम या अभ्यासू, समर्पित आणि सर्व समाजमन जिंकणाऱ्या नेत्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात घुग्घूस शहर सर्वसमावेशक विकासाची नवीन उंची गाठेल, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला.

    यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, घुग्घूस शहर अध्यक्ष संजय तिवारी, विवेक बोढे, घुग्घूस निवडणूक प्रमुख प्रकाश देवतळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी, महिला मोर्चा व युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Ghugghus BJP Nomination Rally

    हे आहेत भाजपचे उमेदवार…

    नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार – शारदा मोहन दुर्गम, प्रभाग क्रमांक १ शास्त्रीनगर-आंबेडकर नगर प्रभाग – अ – प्रेमा तगरपवार, ब – विशाल दामेर, प्रभाग क्रमांक २ रामनगर – अ – राजकुमार गोडशेलवार, ब – सरिता इसारप, प्रभाग क्रमांक ३ अ – सुचिता लुटे, ब – शिवराजन गोहणे, प्रभाग क्रमांक ४ अ – विवेक बोढे, ब – चैताली सातपुते, प्रभाग क्रमांक ५ अ – रुपेश कोहळे, ब – पल्लवी सोदारी, प्रभाग क्रमांक ६ अ – कविता तकल्ला, ब – संतोष नुने, प्रभाग क्रमांक ७ अ – गणेश पिंपळकर, ब – मधू तिवारी, प्रभाग क्रमांक ८ अ – शीतल आत्राम, ब – प्रकाश बोबडे, प्रभाग क्रमांक ९ अ – मीना मोरपाका, ब – वैशाली ढवस, प्रभाग क्रमांक १० अ – हेमंत पाझारे, ब – नितु चौधरी, प्रभाग क्रमांक ११ अ – आशिष मासिरकर, ब – सुनीता पाटील.

  • BJP candidate post of Municipal President । नगराध्यक्षपदाच्या उमेदवार; घुग्घूस नगराध्यक्षपदाकरिता शारदा दुर्गम मैदानात

    BJP candidate post of Municipal President

    BJP candidate post of Municipal President : घुग्घूस 17 नोव्हेम्बर (News34) : घुग्घूस नगरपरिषद निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, अंतिम टप्प्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदासाठी आपल्या अधिकृत उमेदवार म्हणून शारदा उर्फ पूजा दुर्गम यांची निवड जाहीर केली आहे.

    Read Also : चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक, भाजपकडे इच्छुकांची गर्दी

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, घुघूस शहर अध्यक्ष संजय तिवारी यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शारदा दुर्गम या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व स्थानिक प्रश्नांवर सक्रिय असून, स्थानिक महिलांमध्ये त्यांचा चांगला संपर्क व कार्याचा ठसा असल्याने पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. BJP candidate post of Municipal President

    घुघूस शहरातील पाणीपुरवठा, रस्ते-विकास, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी अशा विविध प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी सक्षम व पारदर्शक नेतृत्व आवश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. घुघूसच्या सर्वांगीण विकासासाठी शारदा दुर्गम यांना नगराध्यक्षपदासाठी आम्ही अधिकृत उमेदवार म्हणून पुढे केले आहे. लोकांना विश्वास देणारे नेतृत्व देणे हाच उद्देश आहे, असेही ते म्हणाले.

    उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शारदा दुर्गम यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. घुघूस नगरपरिषद निवडणुकीत आता भाजपने उमेदवारी स्पष्ट केल्याने राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. इतर पक्ष आणि उमेदवारांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

  • village leaders joining BJP in Chandrapur । जोरगेवारांच्या नेतृत्वावर विश्वास; शेनगाव-सोनेगावातील महिला व युवकांचा भाजपात प्रवेश

    village leaders joining BJP in Chandrapur

    village leaders joining BJP in Chandrapur : चंद्रपूर १५ नोव्हेम्बर (News३४) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शेनगाव येथील सरपंच पुष्पाताई मालेकर, संभाजी ब्रिगेड आणि कॉंग्रसच्या कार्यकर्त्यांसह अनेक महिला व युवकांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले.

    Read Also : कांग्रेसने चंद्रपूर मनपा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराकडून मागविले अर्ज

    यावेळी विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, महामंत्री श्याम कनकम, सविता दंढारे, तालुका अध्यक्ष विनोद खेवले, युवा मोर्चा अध्यक्ष आशिष वाढई, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, गौरव गोहणे, गौरव ठावरी, मनोज जाधव यांची उपस्थिती होती.

    मोठ्या संख्येने झालेल्या या प्रवेशामुळे तालुक्यातील भाजपाची संघटनशक्ती आणखी बळकट झाल्याचे चित्र दिसून आले. शेनगाव येथील सरपंच पुष्पाताई मालेकर यांच्यासह सुवर्णा बोबडे, शिवानी मडावी, लता मालेकर, कमलाबाई ताजने, मीरा मासिरकर, सुनीता बादूरकर, मनिषा मासिरकर, कल्पना मेसेकर यांचा पक्षप्रवेश झाला. सोनेगाव येथील स्वप्नील बादुरकर, सोनाली वराट्रे, शुभांगी गोहणे, वैशाली बोबडे, रेखा चटकी, साधना गावडी, नमित गोहणे, स्वप्नील कोराशे, नामेश येरगुडे, गणेश काकडे, विकास गोहणे, गणेश बोबडे, अतुल पिंगे, स्वप्नील जोगी यांचा तसेच महाकुर्ला येथील रोशन भोयर, कुणाल भोयर, मनोज बोधे, हितेश वाटेकर, ओम भोयर व रजित बोबडे यांचा भाजपात प्रवेश झाला. village leaders joining BJP in Chandrapur

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आज शेनगाव, सोनेगाव आणि महाकुर्ला येथील मोठ्या संख्येने महिला, युवक आणि सरपंचांनी भारतीय जनता पक्षावर ठेवलेला विश्वास हा आमच्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. भाजपा हा केवळ राजकीय पक्ष नसून विकास, पारदर्शकता आणि सामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी लढणारी सशक्त लोकशाही चळवळ आहे.

    ते पुढे म्हणाले, आपल्या प्रत्येक गावाच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चंद्रपूर तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षांत आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले आणि पुढेही त्यात वाढ करत राहू. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि युवा वर्गाला संधी देण्यासाठी भाजपा योग्य ते निर्णय घेत आहे, असेही ते म्हणाले.

      पक्षाच्या विकासाभिमुख कामावर, तसेच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वासातून हा प्रवेश झाल्याचे जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांनी सांगितले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.