Blog

  • Indian postal service IT 2.0 upgrade 2025 । 🔄 4 ऑगस्ट रोजी डाक सेवा बंद! काय आहे कारण?

    Indian postal service IT 2.0 upgrade 2025

    Indian postal service IT 2.0 upgrade 2025 : चंद्रपूर, दि. 23 :  डाक विभागाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये मोठे बदल घडवून आणण्याचे सरकारने ठरविले आहे. त्याकरीता डाक विभागात IT 2.0 या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. या प्रणालीमुळे डाक विभागाद्वारे पुरविण्यात येणारी सेवा ही अचुक, जलद व ग्राहकाभिमुख होईल.

    महावितरणचा नवा नियम, अशी होणार वीजबिलाची वसुली

    ४ ऑगस्ट रोजी कामकाज बंद

    सदर IT 2.0 प्रणालीची अंमलबजावणी 5 ऑगस्ट 2025 रोजी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व डाकघरात होणार आहे. याकरीता Data Transfer ही अत्यंत महत्वाची प्रक्रीया असते, जी  4 ऑगस्ट रोजी केल्या जाईल. या कारणामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील डाक विभागाशी संबंधीत सर्व कामे ही दिनांक 4 ऑगस्ट रोजी बंद राहतील. सर्व ग्राहकांना विनंती आहे की, त्यांचे डाक विभागाशी संबंधीत जी काही तातडीची कामे आहेत, ते कृपया 2 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करुन घ्यावे.

     ग्राहकांच्याच हितासाठी व त्यांना अचूक, जलद व ग्राहकाभिमुख सेवा मिळावी, याच उद्देशाने हे सर्व प्रयत्न केल्या जात आहेत. तरी सर्व ग्राहकांनी यांची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ डाक अधिक्षक एस. रामाक्रिष्णा यांनी केले आहे.

  • Vasundhara campaign tree planting । 💚 चंद्रपूर मनपाच्या वसुंधरा अभियानातून हरित क्रांतीची नांदी सुरू!

    Vasundhara campaign tree planting

    Vasundhara campaign tree planting : चंद्रपूर २३ जुलै – चंद्रपूर महानगरपालिके मार्फत पठाणपुरा गेट बाहेरील जमनजट्टी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम 22 जुलै रोजी सकाळी 9 वाजता आयुक्त विपीन पालीवाल यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला. याप्रसंगी रोपट्यांची लागवड करण्यात आली.

    केंद्र सरकारने केली जनतेची दिशाभूल, खासदार धानोरकर यांचा आरोप

      शासनातर्फे “एक पेड माँ के नाम 2.0” तसेच “माझी वसुंधरा” अभियान राबविले जात आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे रक्षण आणि हरित आवरणात वाढ करून भावी पिढ्यांसाठी सुदृढ पर्यावरणाची जपणूक करणे आहे.उपरोक्त उपक्रमाअंतर्गत महापालिका प्रशासन, अधिकारी, नागरिक, स्वयंसेवी संस्था व विद्यार्थी यांच्या सक्रिय सहभागाने वृक्षारोपण केले जाणार आहे. राष्ट्रीय मोहिमांच्या अनुषंगाने मनपातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जात असून जनजागृतीसह प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात येत आहे.

      एक विद्यार्थी एक वृक्ष अभियान

    याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल यांनी उपस्थितांना झाडे जगवण्याची जबाबदार ही परिसरातील नागरिकांची असल्याचे सांगितले.यापूर्वी बल्लारपूर रोडवर लावलेली झाडे नागरिकांच्या सहकार्याने जगली आहेत. शहराला जवळपास २ लक्ष वृक्षांची आवश्यकता आहे,यातील ५० हजार वृक्ष लावण्याचे मनपाचे उद्दिष्ट आहे. एक विद्यार्थी एक वृक्ष हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांकरिता मनपा राबवित असुन या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या परिसरात अधिकाधिक वृक्ष लागवड करून पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे. Ek Ped Maa Ke Naam 2.0 plantation drive

             
      कार्यक्रमात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,उपअभियंता रवींद्र कळंबे,चैतन्य चोरे,हुज्जाज ए इकरा मल्टिपर्पज सोसायटी,इको प्रो संस्था तसेच मनपा अधिकारी कर्मचारी व इतर सामाजिक संस्थेची प्रतिनिधी उपस्थीत होते.

  • MNS rural expansion in Chandrapur district । 🔥 बल्लारपूरसह गावागावात मनसेचा झेंडा! अमन अंधेवार यांच्या नेतृत्वाची कमाल

    MNS rural expansion in Chandrapur district

    MNS rural expansion in Chandrapur district : बल्लारपूर – महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागातून मनसे मधे भव्य पक्षप्रवेश करण्यात आला.मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक युवक आणि नागरिकांनी मनसे चा झेंडा हाती घेतला.

    विसापूर येथील चुना भट्टी वॉर्ड क्र.६ येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. या वेळी आर्यन कोढापे, मुकेश अढिल, अमर नाग, सनी गुप्ता, गणेश भुजबळ,सुकणे मुजा, मनीष यादव, इंदू यादव,संगीता अत्राम, जयदीप अझिल, सुभाष कश्यप, गीता गुप्ता,विजेता मेश्राम यासह अनेक कार्यकर्ते मनसेत दाखल झाले.

    दुचाकी पुलावर, व्यक्ती बेपत्ता, पैनगंगा नदीत रेस्क्यू ऑपरेशन

    ग्रामीण भागात मनसेला पाठिंबा

    या पक्षप्रवेशामुढे जिल्हात मनसेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून खासकरून ग्रामीण भागात मनसेला मिळणारा पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे. अमन अंधेवार यांच्या सक्रिय कार्यामुळे आणि जनतेशी थेट संपर्कामुळे मनसेकडे आकर्षण वाढले असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. Aman Andhewar MNS leadership Ballarpur

    या वेळी जनहित सेना जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे ,जनहित सेना तालुका सचिव राजू लांडगे, प्रतीक चिकाटे, राकेश जवादे, अमन थुल, आसिफ कुरेशी, सह आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पडले असून, येत्या काळात संपूर्ण जिल्हाभरात मनसेच्या कार्यात अधिक जोमाने भर पडेल, असा विश्वास मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

  • rescue operation for missing person in river । 💥 दुचाकी पुलावर, व्यक्ती बेपत्ता! पैनगंगेत पोलिसांचं रेस्क्यू ऑपरेशन

    rescue operation for missing person in river

    rescue operation for missing person in river : कोरपना – कोरपना तालुक्यातील कोडशी खू येथील पैनगंगा नदी पात्रात एका बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी बुधवारी (दि. २३ जुलै) मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, वृत्त लिहीपर्यंत संबंधित व्यक्तीचा थांगपत्ता लागलेला नव्हता.

    केंद्र सरकारने केली जनतेची दिशाभूल, खासदार धानोरकरांचा आरोप

    प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास कोडशी खू येथील पैनगंगा नदीवरील पुलाजवळ एक दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी कोरपना पोलीस दाखल झाले असून प्राथमिक चौकशीनंतर दुचाकी ही वनसडी येथील सतीश मारोती चिकराम यांची असल्याचे निष्पन्न झाले. search operation in river by local police

    दुचाकी पुलावर, सतीश बेपत्ता

    सदर दुचाकी पुलावरच उभी असून तिच्याजवळ अन्य कोणतेही सामान आढळले नाही.
    या घटनेची गंभीर दखल घेत चंद्रपूर येथून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले असून, बुधवारी दिवसभर नदीपात्रात शोधकार्य राबविण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी व गोताखोरांच्या मदतीने पैनगंगा नदीच्या विस्तृत परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, उशीरापर्यंत कुठलाही ठोस पुरावा किंवा व्यक्ती मिळू शकलेली नाही.


    सतीश मारोती चिकराम हे वनसडी गावातील रहिवासी असून, मंगळवारी दुपारी घरातून बाहेर पडल्यापासून त्यांचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे.

  • Central government misleads railway passengers । 🚨 रेल्वे प्रवाशांची फसवणूक? केंद्र सरकारच्या घोषणा आणि वास्तवात फरक!

    Central government misleads railway passengers

    Central government misleads railway passengers : चंद्रपूर – रेल्वे मंत्रालयाने 1 जुलै 2025 पासून रेल्वे भाड्यांमध्ये केलेल्या बदलांबाबत आणि प्रवासी सेवा सुधारण्यासाठी उचललेल्या पावलांबाबत दिलेल्या स्पष्टीकरणामुळे सामान्य जनतेमध्ये निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची केवळ असमाधानकारक उत्तरे देऊन केंद्र सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्न क्रमांक 656 च्या उत्तरात रेल्वे मंत्रालयाने सविस्तर माहिती दिली असली तरी, ही माहिती जनतेच्या मूळ मुद्द्यांना दूर करण्यात कमी पडली आहे. रेल्वे मंत्रालय प्रवाशांना परवडणारी आणि दर्जेदार वाहतूक सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळीच आहे.

    महावितरणचा नवा नियम, अशी होणार वीज बिल वसुली

    भारतीय रेल्वेचे भाडे जगातील सर्वात कमी भाड्यांपैकी एक असल्याचा आणि शेजारील देशांच्या तुलनेतही कमी असल्याचा मंत्र्यांचा दावा केवळ आकडेवारीचा खेळ वाटतो. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये प्रवाशांना ₹60,466 कोटींची अंदाजित सबसिडी देण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, वाढत्या भाड्यांचा सामान्य प्रवाशांवर होणारा आर्थिक भार दुर्लक्षित केला जात आहे. 1 जुलै 2025 पासून भाड्यांचे तर्कसंगतीकरण करण्यात आले असून, यात प्रति किलोमीटर अर्धा पैसा ते दोन पैसे प्रति किलोमीटर अशी किरकोळ वाढ करण्यात आल्याचे म्हटले असले तरी, या वाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर येणारा ताण मोठा आहे.

    वाढीव दरांचा फटका

    द्वितीय श्रेणी सामान्य, शयनयान श्रेणी सामान्य, प्रथम श्रेणी सामान्य, मेल एक्सप्रेसमधील गैर-वातानुकूलित श्रेणी आणि आरक्षित वातानुकूलित श्रेणींमध्ये ही वाढ लागू होईल. मासिक पास (MST) आणि उपनगरीय प्रवासाच्या भाड्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे सांगून कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न असला तरी, लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मात्र वाढीव दरांचा फटका बसणार आहे.

    अधिकृत एजंटना तिकिटे बुक करण्याची परवानगी नाही

    तत्काळ तिकीट बुकिंग प्रणालीमध्येही काही बदल करण्यात आले आहेत; 1 जुलै 2025 पासून, आधार-प्रमाणित वापरकर्त्यांनाच IRCTC वेबसाइट/ॲपद्वारे तत्काळ तिकिटे बुक करता येतील. अधिकृत एजंटना बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिले तीस मिनिटे तत्काळ तिकिटे बुक करण्याची परवानगी नसेल. (IRCTC agent restrictions tatkal booking) हे बदल प्रवाशांच्या सोयीसाठी नसून, अधिक कडक निर्बंध लादणारे आहेत, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना तत्काळ तिकिटे मिळवणे अधिक कठीण होणार आहे. IRCTC tatkal booking Aadhaar rules

    प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजना, वंदे भारत आणि अमृत भारत रेल्वेगाड्यांची सुरुवात, रेल मदतद्वारे उत्तम देखरेख, आणि डिजिटल उपक्रम जसे की रेल वन ॲप आणि यूटीएस ऑन मोबाईल ॲप यांसारख्या विविध उपाययोजना रेल्वे मंत्रालयाने केल्या असल्याचा दावा आहे. मात्र, या उपायांमुळे प्रवाशांच्या समाधानात वाढ झाली असल्याचे रेल्वे मंत्रालयाने नमूद केले असले तरी, अनेक मूलभूत समस्या आजही कायम आहेत. Central government misleads railway passengers

    भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट सेवांची गुणवत्ता सुधारणे आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासोबतच प्रवासी भाडे परवडणारे ठेवणे असल्याचे सांगितले जात असले तरी, सध्याची भाडेवाढ आणि सेवेतील कमतरता या दाव्यांशी विसंगत आहेत. केंद्र सरकार खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विचारलेल्या सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर निरुत्तर राहिले आहे.

  • MSEDCL security deposit deduction policy । 💥 महावितरणचा नवा दणका! तुमची जमा ठेवीच कापली जाणार?

    MSEDCL security deposit deduction policy

    MSEDCL security deposit deduction policy : चंद्रपूर :- 23 जुलै – दोन महिने ज्यांचे वीज देयक थकेल त्यांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाईल असा नवीन नियम महावितरणने 15 जुलैपासून लागू केला आहे. सर्व संवर्गातील ग्राहकांकडे वीज देयकाची थकबाकी प्रत्येक वर्षी वाढत आहे.

    अवैध बांधकामाची आता करा ऑनलाईन तक्रार

    यामुळे महावितरण ही वीज कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आता सलग दोन महिन्यांचे वीज देयक थकल्यास तिसऱ्या महिन्यात वीज ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाणार आहे. ही रक्कम एकदा कपात झाली की नंतर वीज ग्राहकाला प्रथम सुरक्षा ठेवीची रक्कम व त्यानंतर देयकातील इतर शिल्लक रक्कम भरणे बंधनकारक असेल. what happens if electricity bill is unpaid for 2 months

    महावितरणकडून प्रत्येक वर्षी वाढीव वीज देयकानुसार पाठवले जात असलेल्या सुरक्षा ठेवीची रक्कम ज्या ग्राहकांनी भरली नसेल त्याला ही संपूर्ण रक्कम भरावी लागेल. त्यानंतरच संबंधित ग्राहकाचे शिल्लक देयक भरता येईल ही रक्कम न भरल्यास ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. त्यानंतर ग्राहकाला पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी पूर्वीची सुरक्षा ठेव, देयकाची थकबाकी भरावी लागेल.

    विज जोडणी शुल्क भरूनच वीज जोडणी पूर्ववत करता येऊ शकेल.
    हा नियम लागू होण्यापूर्वी दोन महिन्यांचे देयक थकल्यास तिसऱ्या महिन्यात पंधरा दिवसांची नोटीस दिली जात होती. त्यानंतरही देयक न भरल्यास वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला जात होता. कायम विजपुरवठा खंडित झाल्यावर मात्र सुरक्षा ठेवीतील रक्कम थकबाकीतून वळती केली जात होती.

    नियम

    • 15 जुलैपासून महावितरणाचा नवा नियम लागू
    • दोन महिने वीज बिल न भरल्यास, तिसऱ्या महिन्यात ठेवीतून वसुली
    • नंतर सुरक्षा ठेव पुन्हा भरावी लागणार, अन्यथा सेवा प्रभावित होणार
    • महावितरणच्या कर्मचाऱ्यांची वीज खंडित करण्याची जबाबदारी होणार कमी
    • मोठ्या थकबाकीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न
    • कंपनीच्या आर्थिक स्थेर्याला बळकटी देण्यासाठी निर्णय
  • Nomadic Pardhi tribal children vaccination । लसीकरणाच्या विरोधात उभा समाज… पण आरोग्य यंत्रणेनं जिंकला विश्वास!

    Nomadic Pardhi tribal children vaccination

    Nomadic Pardhi tribal children vaccination : चंद्रपूर 22 जुलै – शिवमंदिर परिसर, अष्टभुजा वार्ड येथे झोपडी उभारून अगदी काही काळ वास्तव्यास असणाऱ्या, भटकी पारधी जमातीतील लसीकरणापासुन वंचित असलेल्या बालकांचे चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत लसीकरण करण्यात आले. लसीकरणाबाबत असलेला त्यांचा विरोध व गैरसमज दूर करतांना आलेल्या अडचणींचा सामना करून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात आली.

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपची सत्ता, शिंदेने कांग्रेसला केले गारद

      या समाजामध्ये लसीकरणाबाबत भीती होती की, “बाळ लसीकरण केल्यावर आजारी पडते,” म्हणून अनेक कुटुंबे लसीकरण टाळत होती. आरोग्य विभागामार्फत याआधी दोनदा प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या, मात्र संबंधित कुटुंबे घरी न सापडल्यामुळे प्रयत्न अपूर्ण राहिले. Chandrapur temporary shelter vaccination

      त्यामुळे मंगळवार 22 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता, आरोग्य विभागाच्या टीमने तात्काळ भेट देत, त्या ठिकाणी वसलेल्या 40-42 तात्पुरत्या झोपड्यांमध्ये जाऊन जनजागृती केली. प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधून, लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांच्या भीतीचे निरसन करण्यात आले. त्यानंतर लगेचच सुटलेली बालके ओळखून त्यांचे लसीकरण करण्यात आले.


       प्रतिकूल परिस्थितीत, समज-गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर योग्य समुपदेशनाद्वारे सकारात्मक बदल घडविणे हे आरोग्य यंत्रणेच्या तातडीच्या, सहानुभूतीपूर्ण आणि चिकाटीच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले.आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, लसीकरण क्षेत्र निरीक्षक सारिका गेडाम व बगडखिडकी येथील शहरी प्राथमीक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांद्वारे सदर मोहीम राबविण्यात आली.  

    आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी अभिनंदनास पात्र

    “हे काम म्हणजे आरोग्य यंत्रणेसाठी तारेवरच्या कसरतीसारखे होते. समाजाच्या विश्वासास पात्र ठरत, योग्य समुपदेशनाने लसीकरणासारखा संवेदनशील मुद्दा  सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्येही स्वीकारला गेला त्याबद्दल आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत ” – आयुक्त विपीन पालीवाल

  • Devabhau Jan Kalyan Seva Saptah Chandrapur । फडणवीसांचा वाढदिवस ठरला सेवाभावाचा सण! चंद्रपूरमध्ये 63 उपक्रमांची बहार!

    Devabhau Jan Kalyan Seva Saptah Chandrapur

    Devabhau Jan Kalyan Seva Saptah Chandrapur : चंद्रपूर – नागरिकांना थेट लाभ मिळेल असे सामाजिक उपक्रम आपण देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहात आयोजित केले आहेत. आज तब्बल ६३ सामाजिक, धार्मिक, आरोग्यविषयक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला आहे. युवकांसाठी रोजगार मेळावा, वक्तृत्व स्पर्धा यांसारखे उपक्रमदेखील यामध्ये समाविष्ट होते. हा केवळ एक आठवडा न राहता, कधी न संपणारी सामाजिक उपक्रमांची मालिका  ठरावी, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केले.

    मुख्यमंत्री सहायता निधी ठरतंय गरजू रुग्णांचा आधार

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘जनकल्याण सेवा सप्ताहा’च्या निमित्ताने चंद्रपूर शहरात आज ६३ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहर व परिसरातील विविध भागांमध्ये सामाजिक, धार्मिक, आरोग्यविषयक आणि शैक्षणिक स्वरूपाचे कार्यक्रम पार पडले. या उपक्रमांमुळे शहरात उत्सवाचे आणि सेवा भावनेचे वातावरण अनुभवायला मिळाले. Devendra Fadnavis birthday social service week 2025

    सेवा सप्ताहांतर्गत रक्तदान शिबिरांचे ६ कार्यक्रम, २२ ठिकाणी महाआरती, १७ योग शिबिरे, ६ वृक्षारोपण कार्यक्रम, ३ नोटबुक वाटप, २ फळवाटप उपक्रम, तसेच वक्तृत्व स्पर्धा, रोजगार मेळावा व इतर उपक्रम असे एकूण ६३ कार्यक्रम विविध भागांत आयोजित करण्यात आले. Empowering youth through Devabhau Seva Saptah Chandrapur

    विविध धार्मिक स्थळी महाआरती

    रक्तदान शिबिरांमध्ये शहरातील प्रतिष्ठित संस्था आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. माता महाकाली मंदिर, वढा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंचशील चौक, महादेव मंदिर, जय हिंद चौक, शिवाजी नगर, दुर्गा मंदिर, खंडोबा मंदिर, माता मंदिर अशा विविध धार्मिक स्थळांवर महाआरतीचे कार्यक्रम पार पडले. सकाळी व सायंकाळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी झाले.

    योग शिबिरांना महिलांचा विशेष प्रतिसाद मिळाला. सकाळी ७ वाजल्यापासून शहरातील विविध ठिकाणी शिबिरांना सुरुवात झाली. प्रशिक्षित योग शिक्षकांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. वॉर्डनिहाय महिला योग शिबिरे ही वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली.

    सरदार पटेल हायस्कूल येथे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शहरातील विविध झोपडपट्ट्या, शाळा, वसाहती व वॉर्डांमध्ये नोटबुक व फळ वाटपाचे उपक्रम पार पडले.

    या उपक्रमांपैकी अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, आज संपूर्ण चंद्रपूर मतदारसंघात ६३ ठिकाणी एकाच दिवशी विविध उपक्रम राबवले गेले. रक्तदान, योग शिबिरे, महाआरती, फळवाटप, वक्तृत्व स्पर्धा, रोजगार मेळावा – ही केवळ कार्यक्रमांची यादी नाही, तर समाजासाठी आणि नागरिकांसाठी आपली कृतिशील बांधिलकी व्यक्त करण्याची संधी असल्याचे ते म्हणाले. सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व विभागांनी परिश्रम घेतले, असेही त्यांनी नमूद केले.

    रोजगार मेळाव्यात दीड हजार युवकांची नोंदणी

    देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह निमित्त सरदार पटेल विद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नागपूर आणि चंद्रपूर येथील एकूण १७ कंपन्यांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात सुमारे १५०० युवकांनी नोंदणी केली असून, अनेकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत.

  • CM Medical Assistance Fund । 💥 6 महिन्यात 37 रुग्णांचे प्राण वाचले – मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीतून मिळाले लाखो रुपये!

    CM Medical Assistance Fund

    CM Medical Assistance Fund : चंद्रपूर, दि. 22 : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण तसेच उपचारासाठी पुरेसा आर्थिक आधार नसलेल्या कुटुंबाना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे मोठा दिलासा मिळत आहे. गत सहा महिन्यात जिल्ह्यातील 37 रुग्णांना 33 लाख 36 हजार रुपयांची मदत देण्यात आली असून या कुटुंबासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आशेचा नवा किरण ठरला आहे.

    रानभाजी आता थेट शहरात, रानभाजी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

    चंद्रपूर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये 1 मे 2025 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. 1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीत जिल्ह्यातील 37 रुग्णांना 33 लाख 36 हजाराची मदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांचे जीव वाचले आहेत. तसेच कॅन्सर व हृदयशस्त्रक्रिया केलेल्या अनेक रुग्णांवर वेळेवर उपचार होऊ शकले. Chief Minister Medical Assistance Fund help for critical illness

    या आजारांवरील उपचारासाठी मिळते मदत : 

    या निधीतून कॉकलियर इम्प्लांट/अंतस्त कर्ण रोपण शस्त्रक्रिया, हृदय प्रत्यारोपण (Heart Transplant), यकृत प्रत्यारोपण (Liver transplant), मूत्रपिंड प्रत्यारोपण (Kidney Transplant), फुप्फुस प्रत्यारोपण (lung transplant), अस्थीमज्जा प्रत्यारोपण ( Bone marrow Transplant), हाताचे प्रत्यारोपण ( Hand re- construction surgery), खुब्याचे प्रत्यारोपण ( Hip replacement), कॅन्सर शस्त्रक्रिया, कॅन्सर किमोथेरपी आणि रेडिओथेरपी, अस्थिबंधन, नवजात शिशुचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण (Knee replacement), दुचारीवरील अपघात, लहान बालकाच्या संबंधित शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस जळीत रुग्ण, विद्युत अपघात/ विद्युत जळीत रुग्ण अशा गंभीर व जीवघेण्या आजारांवरील उपचारासाठी मदत दिली जाते. याशिवाय, मदत न मिळाल्यास महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यासारख्या पर्यायी योजनांची माहितीसुध्दा रुग्णांना देण्यात येते. Maharashtra CM medical aid for low income families

    योजनेसाठी पात्रता  व निकष : 

    अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. त्याची आर्थिक परिस्थिती दुर्बल असावी. ( रुपये 1.60 लाख प्रती वर्ष पेक्षा कमी असणे आवश्यक आहे). रुग्ण सरकारी/धर्मादाय/मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेत असावा.

    अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :

     डॉक्टरांचे आजारावरील प्रमाणपत्र, हॉस्पिटलच्या खर्चाचे अंदाज पत्रक, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रुग्णाचे आधार कार्ड/ लहान बालकाच्या बाबतीत बालकाच्या मातेचे आधार कार्ड, रुग्णाचे रेशनकार्ड, संबंधित व्याधी विकार/ आजाराच्या संबंधी निदानात्मक तथा उपचारात्मक बाबींची कागदपत्रे, अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत एफ.आय.आर रिपोर्ट, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अपेक्षित असलेल्या रुग्णांसाठी विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले अधिवास प्रमाणपत्र आवश्यक. अर्जदारांनी ही कागदपत्रे प्रशासकीय इमारत, पहिला माळा मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात थेट जमा करावीत.  Chief Minister medical fund application procedure

    अर्ज करण्याची प्रक्रिया : 

    संबंधित रुग्णालयातून प्रस्ताव तयार केला जातो. तो वैद्यकीय अधिकारी जिल्हा मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंत्रालयात पाठवला जातो. समिती परीक्षण करून निधी मंजूर करते.

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष हा चंद्रपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक भास्कर झळके यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेल्या या कक्षाचा जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कुंभलकर यांनी केले आहे.

  • Pandit Deendayal Upadhyay Employment Fair । 📢 मोबाईलपेक्षा करिअर महत्वाचं! चंद्रपूरातील रोजगार मेळाव्यात हजारो तरुणांचा सहभाग

    Pandit Deendayal Upadhyay Employment Fair

    Pandit Deendayal Upadhyay Employment Fair : चंद्रपूर, दि. 22 : चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. औष्णिक विद्युत केंद्र, पेपर मील, कोळसा खाणी, सिमेंट, बांबु  व इतर उद्योग येथे मोठ्या प्रमाणात आहे. वैशिष्ट्य म्हणजे येथील युवा वर्गाला रोजगार देण्याचा संकल्प उद्योगांनी केला आहे. त्यामुळे युवक – युवतींनीसुध्दा आपल्या गुणवत्तेच्या आधारावर रोजगार मिळवून देशाच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले. Chandrapur youth job fair 2025

    कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, सरदार पटेल महाविद्यालय आणि मॉडेल करीअर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरदार पटेल महाविद्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटन करतांना डॉ. व्यवहारे बोलत होते. मंचावर प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर, डॉ. जयेश चक्रवर्ती, उपप्राचार्य स्वप्नील माधवशेट्टीवार, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी वैभव बोंगिरवार, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी, कौशल्य विकास अधिकारी रोशन गबाले उपस्थित होते.

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवशी अनोखे आंदोलन

    आजच्या युवा वर्गाला रोजगार देणे, हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य आहे, असे सांगून प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा व इतर सोयीसुविधा प्राप्त करायच्या असेल आणि चांगले जीवन जगायचे असेल तर रोजगाराची आवश्यकता आहे. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आला आहे. येथील कंपन्यानी युवकांना रोजगार देण्याचा केलेला संकल्प हा अभिनंदनीय आहे. उद्योगांनी आपली निवड केली पाहिजे, ही जबाबदारी आता आपली आहे. त्यासाठी उत्कृष्ट सादरीकरण करा, जेणेकरून कंपन्यांना वाटले पाहिजे की, या तरुण-तरुणीची आपल्या कंपनीला गरज आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपली प्रगती झाली तर, आपले कुटुंब, समाज व देशाच्या प्रगतीत आपलेही योगदान राहील, असेही डॉ. नितीन व्यवहारे यांनी सांगितले. First stage selection 637 candidates job fair Chandrapur

    प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. मोबाईलचा उपयोग केवळ वेळ वाया घालविण्यासाठी करू नये तर करीअर घडविण्यासाठी करा. प्रत्येकच आई-वडीलांना मुलांकडून चांगल्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. तर प्राचार्य डॉ. काटकर म्हणाले, महाविद्यालयात अनेक उपक्रम सुरू असतात. मात्र पदवी मिळाल्यानंतर रोजगाराचा प्रश्न आजच्या पिढीसमोर उभा आहे. त्यासाठीच  या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सर्व तरुण – तरुणींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. Career fair collaboration with Sardar Patel College Chandrapur

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास अधिकारी रोशन गबाळे यांनी केले. संचालन डॉ. अनिता मत्ते यांनी तर आभार डॉ. स्वप्नील माधवशेट्टीवार यांनी मानले. कार्यक्रमाला विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, रोजगार इच्छुक तरुण – तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    637 उमेदवारांची प्राथमिक निवड :

     पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात एकूण 1107 उमेदवारांनी सहभाग नोंदविला. तसेच सहभागी कंपन्यांनी 1030 रिक्त पदे कळविली होती. यापैकी 637 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.