Blog

  • Big news Firing in Chandrapur । चंद्रपुरात गोळीबार! काय घडलं?

    Big news Firing in Chandrapur

    Big news Firing in Chandrapur : चंद्रपूर : गुन्हेगारी प्रवृत्तीचे असलेल्या दोन भावात झालेल्या आपसी वादातून लहान भावाने मोठ्या भावाची गोळी घालून हत्या केल्याची घटना बुधवार दि. ३० जुलै रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास जुनोना येथील विकतुबाबा मंदिराच्या मागील परिसरात घडली.

    कुख्यात गुंडांवर MPDA कायद्यान्तर्गत केले स्थानबद्ध

    बुद्दासिंग टाक (५०) रा. जुनोना असे मृत मोठ्या भावाचे नाव आहे तर लहान भाऊ सोनुसिंग टाक हा फरार आहे.
    सोनुसिंग व बुद्दासिंग या दोन भावात मागील काही दिवसापासून घरगुती कारणावरून वाद सुरू आहेत.
    बुधवारी सायंकाळी दोघात आपसी वाद झाला. वाद ऐवढ्या विकोपाला गेला की लहान भावाने मोठ्या भावाला गोळी मारून जागीच ठार केले.

    आरोपीवर अनेक गुन्हे

    मृतक व आरोपी यांच्या चंद्रपुर जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असून आरोपी सोनुसिंग टाक यांचेवर चंद्रपूर जिल्ह्यातुन तडीपाराचा आदेश नुकताच निर्गमीत करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस अधिक्षक सुर्दशन मुमक्का, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, रामनगर पोलिस निरीक्षक आसीफ राजा यांनी भेट देत घटनेचा तपास करीत आहे.

  • repeat offender jailed under MPDA Chandrapur । चंद्रपूर पोलिसांचा मोठा दणका – दहशत माजवणाऱ्या गुंडावर MPDA अंतर्गत कारवाई

    repeat offender jailed under MPDA Chandrapur

    repeat offender jailed under MPDA Chandrapur : चंद्रपूर – ९ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारावर चंद्रपूर पोलिसांनी MPDA कायदा अंतर्गत कारवाई करीत त्या गुन्हेगाराला वर्षभरासाठी मध्यवर्ती कारागृह चंद्रपूरमध्ये स्थानबद्ध करण्यात आल्याचा आदेश २४ जुलै रोजी पारित करण्यात आला.

    चंद्रपूर पोलिसांच्या रेकॉर्डवरील धोकादायक व्यक्ती कुख्यात गुंड, जबरी चोरी, अंमली पदार्थाची विक्री करणारा, विनयभंग असे तब्बल ९ गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार २९ वर्षीय शारुख शेरखान पठाण राहणार रवींद्र नगर वॉर्ड बल्लारपूर याची परिसरात सामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली होती. Chandrapur criminal profile nine serious offences

    महाराष्ट्र औद्योगिक संस्थांमध्ये क्रांतिकारी बदल

    वर्षभरासाठी स्थानबद्ध

    गुन्हेगार शारुख पठाण याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधित कारवाई पोलिसांनी केली मात्र तो कायद्याला जुमानत नव्हते. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्हेगारावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती दृक्श्राव्य कलाकृती, विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तूचा काळाबाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याविषयीचा अधिनियम सण १९८१ सुधारणा २००९, २०१५ अनव्ये प्रस्ताव तयार करून जिल्हादंडाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्याकडे सादर केला असता त्यांनी प्रस्तावाची दखल घेत शारुख शेरखान पठाण ला १ वर्षाकरिता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश २४ जुलै रोजी पारित केला. शारुख पठाण ला मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव ,, अमोल काचोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक विपीन इंगळे, सपोनि पठाण, पोलीस कर्मचारी मिलिंद आत्राम, स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सपोनि योगेश खरसाण, अरुण खारकर, सुधीर मत्ते, परिवरीश शेख, संजय वाढई, महिला पोलीस छाया निकोडे, उषा लेडांगे व अपर्णा मानकर यांनी केली.

  • new skill development courses in ITI Maharashtra । महाराष्ट्रातील ITI मध्ये नवा क्रांतीकारी बदल – जाणून घ्या टॉप 5 अभ्यासक्रम!

    new skill development courses in ITI Maharashtra

    new skill development courses in ITI Maharashtra : मुंबई, दि. ३० जुलै (News३४) : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी राज्यातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.) नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. तसेच चेंबूर येथे शासकीय उच्चस्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी मान्यता देण्यात आली आहे. काळानुरूप बदलत्या अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होवून यामुळे महाराष्ट्रातील आय.टी.आय मध्ये क्रांती घडणार आहे, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. upcoming ITI courses 2025 Maharashtra

    रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांची लूट, खासदार धानोरकरांचा संताप

    महाराष्ट्रातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिक), ईव्ही मेकॅनिक (इलेक्ट्रिक व्हेईकल) हे नवीन अभ्यासक्रम  शिकविण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धनावर आधारित योजना राबविण्यार राज्य शासनाचा भर असून राज्यात सौर ऊर्जाशी निगडीत तंत्रज्ञानांची व सोलर टेक्निशियन तसेच मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेईकलची गरज लक्षात घेवून या क्षेत्रातील टेक्निशियन मागणी वाढणार आहे. त्यानुषंगाने दोन नवीन अभ्यासक्रमाची मागणी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने केंद्रीय कौशल्य  विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक  यांच्याकडे केली आहे. Maharashtra skill development new initiatives

    राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नवा अभ्यासक्रम

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या सूचना व सल्ल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये काळानुरूप अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. सध्या राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. ज्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रमांची मागणी करतील त्यांना मंजूरी देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री श्री.लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांनी सांगितले.

    केंद्रीय कौशल्य  विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी  अनसूचित जातीतील व नवबौध्द घटकातील प्रशिक्षणार्थ्यींचे सामाजिक सक्षमीकरण व उन्नतीसाठी चेंबूर  येथे शासकीय उच्चस्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी मान्यता देण्यात दिली आहे.  या संस्थेत सन २०२५-२६ साठी रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग टेक्निशीयन, इलेक्ट्रिशियन, वायरमन, आय. ओ. टी. टेक्निशियन (स्मार्ट सिटी), इलेक्ट्रीक मेकॅनिक हे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत.

    मंत्री श्री.लोढा म्हणाले की, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना काळानुरूप शिक्षण देवून जास्तीत जास्त  कुशल मनुष्यबळ तयार करणे  हा कौशल्य विकास विभागाचा उद्देश आहे. आय.टी.आय हा एक उच्च कौशल्य गुणवत्ता ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्यासाठी खाजगी औद्योगिक आस्थापनांच्या सहाय्याने राज्यातील ३६ जिल्हास्तरीय आद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दर्जावाढ करण्यात येत आहे. औद्योगिक आस्थापनाच्या सहायाने प्रशिक्षण व प्रशिक्षण सुविधा वृध्दींगत करणे, राज्यात दरवर्षी अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.

    आय.टी.आय मध्ये नविन कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे. उद्योग जगताला आवश्यक असे अधिक मागणीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. तंत्रप्रदर्शन व युवा शक्ती करिअर मार्गदर्शन शिबीरांच्या माध्यमातून अधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करून रोजगाराच्या संधी अधिकाधिक निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे, असेही  मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

    मंत्री लोढा यांच्या या नव्या निर्णयामुळे राज्यातील आयटीआय धारकांसाठी रोजगाराचे नवे दालन उघडणार हे नक्कीच आहे. कारण ईव्ही वाहन मेकॅनिक व सोलर मेकॅनिक यांची कमतरता आजही मोठ्या प्रमाणात भासत आहे. या नव्या अभ्यासक्रमामुळे आयटीआय क्षेत्रात नवी कर्णाती घडेल हे नक्कीच.

  • Pratibha Dhanorkar vs railway food policy । 🧾 फक्त ४ प्रकरणांवर दंड? धानोरकर म्हणतात – शेकडो प्रवासी लुटले जातात रोज!

    Pratibha Dhanorkar vs railway food policy

    Pratibha Dhanorkar vs railway food policy : चंद्रपूर: बल्लारशाह रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थांची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्याचा मुद्दा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत उपस्थित केला. यावर रेल्वे मंत्रालयाने दिलेले उत्तर प्रवाशांची दिशाभूल करणारे आणि वास्तवापासून दूर असल्याचे खासदार धानोरकर यांनी म्हटले आहे. त्यांनी या गंभीर समस्येकडे अधिक गांभीर्याने पाहण्याचे आवाहन सरकारला केले आहे. overpricing of food at Ballarshah railway station

    चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने केली इरई धरणातील पाण्याच्या पातळीची पाहणी

    खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी सांगितले की, रेल्वे स्थानकांवर मंजूर दरानुसार उच्च दर्जाचे आणि आरोग्यदायी अन्न उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जास्त किंमत आकारल्याच्या 4 प्रकरणांमध्ये 35,500 रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, FSSAI मंजूर वस्तू विकल्या जात असून, नियमित तपासणी केली जात असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.

    रेल्वे मंत्र्याचे कागदी घोडे

    मंत्र्यांच्या या उत्तरावर तीव्र आक्षेप नोंदवताना खासदार धानोरकर म्हणाल्या की, “रेल्वे मंत्रालय केवळ कागदी घोडे नाचवत आहे.” फक्त 4 प्रकरणांवर कारवाई करणे ही ‘हिमनगाची फक्त एक टीप’ आहे, प्रत्यक्षात शेकडो प्रवाशांना दररोज वाढीव दराने खाद्यपदार्थ खरेदी करावे लागतात. ‘नियमित आणि आकस्मिक तपासणी’ केवळ कागदावरच असून, ‘रेलमदद’ सारख्या तक्रार यंत्रणा कुचकामी असल्याचे त्यांनी म्हटले. बिलिंग, डिजिटल पेमेंट आणि आरपीएफ मोहिम हे केवळ दिखाव्याचे उपाय असून, प्रवाशांना अजूनही शुद्ध आणि परवडणारे भोजन मिळत नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी नसून, प्रभावी अंमलबजावणी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी आणि हक्काशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या गंभीर आरोपांवर रेल्वे मंत्रालय कोणती पुढील पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Water level of Irai Dam । इरई धरणातील पाण्याची पातळी वाढली, प्रशासनाने केली पाहणी

    Water level of Irai Dam

    Water level of Irai Dam : चंद्रपूर, दि. 30 : गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली.  तसेच इरई धरणाच्या पाणी पातळीमध्ये सुध्दा वाढ झाली असून  इरई धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे चंद्रपूर शहरातील नदीलगत असलेल्या वस्तीला पुराच्या पाण्याचा तडाखा बसतो. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार विजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांनी इरई धरणाच्या पाणी पातळीची पाहणी केली.

    दारू पिणाऱ्यांनो सावधान, तुमच्या पोटात दुसऱ्या राज्याची दारू

    चंद्रपूर जिल्ह्याला 24 जुलै रोजी ऑरेंज आणि 25 व 26 जुलै रोजी रेड अलर्ट होता. त्याअनुषंगाने जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती.  यावेळी इरई धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. सध्या पाणी पातळी ही 206.35 मीटर एवढी आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ही पाणी पातळी 206.08 मीटर एवढी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. धरणाची पाणी पातळी ही एस.ओ.पी. नुसार मेंटन ठेवावी तसेच एक तांत्रिक अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करावा, जेणेकरून त्यांच्या ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये किंवा धरणाच्या पातळीतील नोंदी अचूक असाव्यात. कोणत्याही निष्काळजीपणाचा फटका नदीकाठावरील वस्त्यांना होऊ नये, अशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी दिल्या. Irai Dam water level today Chandrapur

    Somayya institute of technology

    धरणाचे पाणी पुन्हा सोडणार

    त्या अनुषंगाने 28 जुलै पासून धरणाचे दोन दरवाजे 0.25 मीटर ने उघडून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येईल किंवा पाण्याचा विसर्ग थांबण्यात येईल, अशी माहिती धरण व्यवस्थापन अधिकारी श्री. राजूरकर यांनी दिली. यावेळी जलसंपदा विभागाचे विजय यादव, नायब तहसीलदार राजू धांडे आदी उपस्थित होते

  • LCB action on illegal liquor storage । चंद्रपुरात आली मध्यप्रदेश राज्यातील दारू, स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई

    LCB action on illegal liquor storage

    LCB action on illegal liquor storage : चंद्रपूर – सध्या जिल्ह्यात डुप्लिकेट दारूचा व्यापार मोठ्या प्रमाणात सुरु आहे, दारू असली कि नकली हे फक्त पिणारा सांगू शकतो, व्यापारी फक्त पैश्यासाठी जिल्ह्यात डुप्लिकेट दारूचा पुरवठा करीत आहे. या दारूमुळे जिल्ह्यात एकदिवस मोठी जीवितहानी होऊ शकते अशी शक्यता आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील दारूचा साठा बाबुपेठ मधील एका इसमाने आपल्या घरी विक्री करीता साठवून ठेवला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने छापामार कारवाई करीत अवैध दारू साठवून ठेवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या.

    चंद्रपूर – घुग्गुस मार्गाची दयनीय अवस्था

    जिल्ह्यात सध्या अंमली पदार्थ तस्करी, सुगंधित तंबाखू व इतर अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मोहीम सुरु आहे, याबाबत पोलीस पथकाला दारूच्या साठ्याबाबत माहिती मिळाली, माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने बाबुपेठ आंबेडकर नगर येथे धाड मारीत कारवाई केली. या कारवाईत देशी विदेशी दारू साठ्यासह एकूण १० लक्ष ७४ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. police raid on illegal liquor in Chandrapur

    मध्यप्रदेश राज्यातील दारू

    आंबेडकर नगर बाबुपेठ मध्ये राहणारा श्रीनिवास नरहरी याने आपल्या घरी विक्रीकरिता महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यातील दारूसाठा साठवून ठेवला होता, स्थानिक गुन्हे शाखेने माहितीच्या आधारे नरहरी यांच्या घरी धाड मारली. या धाडीत देशी विदेशी दारूच्या ४९ पेट्या किंमत ४ लाख ७६ हजार ९२० रुपये, दारू विक्रीतून मिळालेली रक्कम ९७ हजार रुपये, दारू वाहतुकीकरिता वापरलेले चार चाकी वाहन क्रमांक एमएच ३२ वाय ०९२६ किंमत ५ लाख व एक धारदार लोखंडी तलवार किंमत ५०० रुपये असा एकूण १० लाख ७४ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी श्रीनिवास नरहरी वर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दारूबंदी कायदा व भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. liquor smuggling from Madhya Pradesh to Maharashtra

    Somayya institute of technology

    सदरची कारवाई पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता व अपर्णा मानकर यांनी केली.

  • chital hit by speeding vehicle । चितळाला भरधाव गाडीची धडक!

    chital hit by speeding vehicle

    chital hit by speeding vehicle : जुनोना, [२९ जुलै, २०२५]: जुनोना गावाजवळच्या मार्गावर भरधाव वाहनाने धडक दिल्याने एका चितळाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी उघडकीस आली. ही घटना रविवारी (दि. २७) रात्रीच्या सुमारास घडली असावी, जेव्हा चितळ रस्ता ओलांडत होते.

    चंद्रपुरातील जेष्ठ पत्रकार कर्मवीर पुरस्काराचे ठरले मानकरी

    या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडसेलवार, तसेच दिनेश खाटे आणि किरण बावस्कर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली.

    चितळावर अंत्यसंस्कार

    मृत चितळाचे शवविच्छेदन वनविकास महामंडळाच्या बांबू डेपोमध्ये करण्यात आले. त्यानंतर, त्याच परिसरात चितळावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महामार्गांवरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा वन्यजीव अपघातांना बळी पडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी रस्त्यावरून जाताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

  • karmaveer award for senior journalists । वरोरा-बल्लारपूरचे पत्रकार ठरले कर्मवीर पुरस्काराचे मानकरी

    karmaveer award for senior journalists

    karmaveer award for senior journalists : चंद्रपूर – चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूरच्या वतीने शुक्रवार 01 ऑगस्ट 2025 ला सकाळी 11 वाजता पत्रकार दिन व कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

    या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात

    १ ऑगस्ट रोजी होणार सन्मान

    वरोरा नाका पत्रकार संघाचे कार्यालय येथे आयोजित सोहळ्यात वरोरा येथील जेष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी व बल्लारपूर येथील जेष्ठ पत्रकार मंगल जीवने यांना कर्मवीर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह,उ‌द्घाटक व मार्गदर्शक म्हणून दैनिक नवराष्ट्रचे वृत्त संपादक डॉ.प्रा.गणेश खवसे व प्रमुख अतिथी म्हणून सिडीसीसी बँक
    चंद्रपूरचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केले आहे.

  • Maharashtra Government Social Media Circular । 🛑 “शासकीय कर्मचाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात?”, खासदार धानोरकर आक्रमक!

    Maharashtra Government Social Media Circular

    Maharashtra Government Social Media Circular : चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या २८ जुलै २०२५ रोजीच्या सोशल मीडिया वापरासंदर्भातील परिपत्रकामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. हे ‘जुलमी’ परिपत्रक तात्काळ रद्द करावे, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हे परिपत्रक शासकीय कर्मचाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट गदा आणणारे असून, लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. freedom of speech for government employees maharashtra

    चंद्रपुरातील या मार्गाची दयनीय अवस्था

    खासदार धानोरकर यांनी यातील ‘प्रतिकूल टीका करू नये’ किंवा ‘स्वयं-प्रशंसा होणार नाही’ यांसारख्या अटी अत्यंत जाचक असल्याचे म्हटले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर अनावश्यक दबाव येईल आणि त्यांची सर्जनशीलता मारली जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. गोपनीय माहितीचा प्रसार रोखणे आवश्यक असले तरी, त्याचा अर्थ अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “हे केवळ एक परिपत्रक नसून, संविधानाने दिलेल्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार आहे,” असे नमूद करत, कर्मचाऱ्यांच्या घटनात्मक अधिकारांसाठी आपण लढा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. maharashtra social media rules for government employees

    परिपत्रक रद्द करा

    महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९७९’ च्या आधारावर हे परिपत्रक काढले आहे. गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती पसरवणे आणि राजकीय,शासकीय धोरणांवर प्रतिकूल अभिप्राय व्यक्त करण्याच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवणे हा यामागील उद्देश आहे. यात प्रतिकूल टीका टाळणे, वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते स्वतंत्र ठेवणे, बंदी घातलेल्या ॲप्सचा वापर न करणे आणि गोपनीय दस्तऐवज शेअर न करणे अशा अनेक अटींचा समावेश आहे. या सूचनांचा भंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही नमूद आहे.

    Somayya institute of technology

    खासदार धानोरकरांनी हे परिपत्रक तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून शासकीय कर्मचाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहील आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण होईल. या मागणीवर राज्य सरकारची भूमिका काय राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Kishor Jorgewar cycle distribution । चंद्रपुरातील २०५५ मुलींना मिळाल्या सायकली, देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाचा समारोप

    Kishor Jorgewar cycle distribution

    Kishor Jorgewar cycle distribution : चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूरात सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाचा समारोप विद्यार्थिनींना सायकल वाटप आणि ५५ पारंपरिक गुरूंच्या सन्मान सोहळ्याने संपन्न झाला. शकुंतला लॉन येथे पार पडलेल्या या भव्य समारोप कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वी वर्गातील २,०५५ विद्यार्थिनींना सायकलीचे वितरण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील ५५ गुरूजनांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सदर उपक्रमासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले. cycle empowerment initiative for school girls

    चंद्रपुरात रेड रन मॅरेथॉन

    या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त संजय चिद्रावार, भाजप महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, अमेरिकेतील भारतीय वैद्यानिक अनुप वाघ, संदिप बांटिया, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, रामनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार आसिफ रझा शेख, तुषार सोम, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, नामदेव डाहुळे, मंडळ अध्यक्ष रवी जोगी, सुभाष आदमाने, रवी गुरनुले, वंदना हातगावकर, सविता दंढारे, आदी मान्यवर उपस्थित होते.

    या प्रसंगी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि ,एकूण १०,००० सायकली वाटप करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. मुलींच्या चेहऱ्यावरचे हसू हेच या उपक्रमाच्या यशाचे प्रतीक आहे. शिक्षण हा तुमच्या आयुष्याचा पाया आहे. आज तुमच्या हातात सायकल आहे, ती केवळ वाहन नाही, तर शिक्षणाच्या दिशेने वेग देणारे साधन आहे. मनापासून शिक्षण घ्या, आई-वडिलांचे आणि शिक्षकांचे ऐका. सोशल मीडियाच्या आहारी न जाता ज्ञानाच्या जवळ रहा. स्वप्न मोठी ठेवात प्रामाणिक मेहनत ठेवा असे ते म्हणाले. girls bicycle distribution event Chandrapur students

                पडोली, संजय नगर या टोकावरच्या भागातून मुली शहरात पायदळ शाळेत जाताना पाहून मी गरजू विद्यार्थिनींसाठी सायकल वाटपाचा संकल्प केला होता. आज तो पूर्ण करताना समाधान वाटते. मतदारसंघातील सुमारे ८८ शाळांमधून २,०५५ पात्र विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. पण यातच थांबायचं नाही – १० हजार सायकली वाटण्याचे आपले उद्दिष्ट आहे. परिस्थितीमुळे शिक्षण थांबू नये म्हणून अम्मा की पढ़ाई या उपक्रमातून आम्ही २८४ विद्यार्थ्यांना निशुल्क दर्जेदार शिक्षण देत आहोत असेही त्यांनी सांगितले. Kishor Jorgewar cycle distribution

    सेवा सप्ताहाच्या निमित्ताने गेल्या आठवडाभरात आपण विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवले. मात्र, आजच्या कार्यक्रमातील विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे हास्य आणि नव्या आशेचा प्रकाश पाहून आमचाही सारा थकवा दूर झाला असून, अशा सामाजिक उपक्रमांना अधिक जोमाने गती देण्याची उर्जा मिळाली असे ते म्हणाले. कार्यक्रमात मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विद्यार्थिनींसह पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Kishor Jorgewar cycle distribution

    ४०० पेक्षा अधिक उपक्रमांतून साजरा झाला सेवा सप्ताह; ३ हजार रक्तदात्यांचे योगदान

    सेवा सप्ताह अंतर्गत ४०० हून अधिक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मतदारसंघात घेण्यात आलेल्या ५५ रक्तदान शिबिरांमध्ये ३ हजारांहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी दाखवली. हे चंद्रपूरातील आजवरचे सर्वात मोठे रक्तदान अभियान ठरले.

    तसेच, ७५ मंदिरांमध्ये महाआरती, ७९ ठिकाणी योग शिबिर, ६८ ठिकाणी वृक्षारोपण, १७ ठिकाणी शालेय साहित्य वाटप, रोजगार मेळावे, कर्तव्य सेतूचे उद्घाटन, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता अभियान, सामूहिक सूर्यनमस्कार, महाआरोग्य शिबिरे, राज्यातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंगाचा रुद्राभिषेक, कावड यात्रा, डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन, अम्मा संस्कार केंद्र, कार्यकर्ता मेळावे, पक्षप्रवेश कार्यक्रम, तसेच विविध धार्मिक स्थळी सामाजिक उपक्रम अशा अनेक सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. Kishor Jorgewar cycle distribution

    ५५ पारंपरिक गुरूंचा सन्मान..

    समारोपाच्या दिवशी मंगळवारी, विविध पारंपरिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतील ५५ गुरूजनांचा सत्कार आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार प्राप्त गुरूंमध्ये वकिली क्षेत्रातील रविंद्रजी भागवत, गायनिक डॉ. उषा अरोरा, योगगुरु शशिकांत मस्के, कथ्थक गुरू चारुशिला फेकडे, गरबा शिक्षक गुरुरूप मसराम, भरतनाट्यम शिक्षक प्रशांत कत्तूरवार, शिल्पकार सुहास ताटकंटीवार, शिंपी वर्गातील उबाळकर, आदर्श शिक्षिका विजया मुलकावार, दाई अरुणा सामंतपल्लीवार, लाठी-काठी शिक्षिका खोब्रागडे, हॉकी प्रशिक्षक जनक खान पठाण, इलेक्ट्रिशियन नरेश वानखेडे, ग्रामगीताचार्य अण्णाजी ढवस, हरिपाठ गुरू सिंधु चौधरी, स्वामी समर्थ संस्कार केंद्राचे सुधाकर टिपले, टायपिंग शिक्षिका विजया कोटकर, वेल्डर राजू वाहाडे, योग शिक्षिका सुवर्णा लोखंडे, वेटलिफ्टिंग प्रशिक्षक नरेश भुते, न्हावी शंकर चावके यांच्यासह इतर गुरूंचा समावेश होता.

    Somayya institute of technology

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, कोणत्याही समाजाची खरी प्रगती ही रस्ते, इमारती, सुविधा यावर नव्हे, तर संस्कार, शिक्षण, मूल्य आणि मार्गदर्शनावर अवलंबून असते. हे कार्य पार पाडणारे गुरू केवळ शाळांपुरते मर्यादित नाहीत. कला, क्रीडा, आरोग्य, अध्यात्म, शेती, समाजसेवा यांसारख्या सर्वच क्षेत्रातील मार्गदर्शक हेही समाजाचे ‘गुरू’ आहेत. आजचा हा सन्मान म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा आणि आदराचा मुजरा असल्याचे ते यावेळी म्हणाले.  55 traditional gurus honor ceremony Chandrapur