Blog

  • Road Encroachment : चंद्रपूर मनपा व वाहतूक पोलिसांची अतिक्रमण विरोधात संयुक्त कारवाई

    Road Encroachment : चंद्रपूर मनपा व वाहतूक पोलिसांची अतिक्रमण विरोधात संयुक्त कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून वाहने विक्री करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली असुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर जुनी वाहने विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची २० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. Traffic police

     

    जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महत्त्वाच्या मार्गावर अतिक्रमण, जुनी चार चाकी दुचाकी वाहने विक्री करण्याची दुकाने अवैधरित्या थाटण्यात येतात. दुकानासमोर पार्किंग करणाऱ्या नागरिकांची वाहने थोड्या वेळापुरती वाहने दुकानासमोर उभी राहतात मात्र विक्री करणाऱ्यांची वाहने पुर्ण वेळ रस्त्यावर उभी राहतात यामुळे या अतिक्रमणांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसेच फुटपाथवरही अतिक्रमण होत असल्याचे लक्षात घेऊन २० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. Chandrapur municipal corporation

     

    त्याचप्रमाणे काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर पत्र्याचे शेड लाऊन फुटपाथवर अतिक्रमण केले असल्याचे आढळुन आल्याने त्यांचे अतिक्रमण जेसीबी द्वारे काढण्यात आले असुन काही गाळेधारकांना गाळे सील करण्याबाबत अंतिम सूचना देण्यात आल्या आहेत. रोडवरील जे जुनी चार चाकी व दुचाकी विक्री करणारे स्थायी दुकानदार आहेत त्यांनी आपल्या दुकानासमोर कोणतेही वाहन विक्रीकरिता लावु देऊ नये,वाहन विक्री करावयाची असल्यास विक्रीकरिता स्वतः जागा उपलब्ध करून घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. Road encroachment

     

    सदर कारवाई उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात  सहायक आयुक्त सचिन माकोडे,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,वाहतुक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,अतिक्रमण निर्मुलन अधिकारी राहुल पंचबुद्धे तसेच मनीष शुक्ला, अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे विक्रम महातव, डोमा विजयकर,अमरदीप साखरकर यांनी केली. Vehicle seizure

  • Electrical Contract Workers : कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन

    Electrical Contract Workers : कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील सर्व कंत्राटी वीज कामगार हे अनुभवी व कुशल असून मात्र त्यांना स्थायी कामगार पेक्षा वेतन मिळत नाही. वीज कंत्राटी कामगारांच्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी आंदोलने झाली मात्र शासन दरबारी त्याचा निकाल लागला नाही. Mahavitran

     

     

    त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या 30 संघटना एकत्र येत कृती संघटना स्थापन केली. प्रलंबित मागणीविरोधात टप्प्या टप्प्याने आंदोलने झाली आता 28 व 29 फेब्रुवारीला 48 तासाचे कामबंद आंदोलन सुरु केले आहे. Contract worker

     

    यावेळी चंद्रपूर महावितरण बाबुपेठ येथे 28 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता वीज कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु केले यावेळी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने मिलींद गवई यांनी कामगारांच्या मागण्याबाबत माहिती दिली.

  • Chandrapur News : नगीनाबाग येथे मोबाईल स्नॅचिंगची घटना

    Chandrapur News : नगीनाबाग येथे मोबाईल स्नॅचिंगची घटना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 27 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वाजता चंद्रपूर शहरातील नगीना बाग मशिदीजवळ मोबाईल हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. फिर्यादी इशिका वाघमारे ही युवती मोबाईलवर बोलत असताना दोन अज्ञात तरुणांनी चालत्या दुचाकीवरून तिचा रियलमी कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला. Mobile snatching

     

     

    ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यातून या गुन्ह्याचा धडाकेबाजपणा समोर आला आहे. Chandrapur

     

    चंद्रपूरसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात अशी घटना प्रथमच घडल्याने या घटनेने चिंता वाढली आहे. इशिकाचा मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. धाडसाने इशिका ने त्यांचा पाठलाग केला. दुर्दैवाने, पाठलाग करताना, इशिका रस्त्यावर कोसळली, त्यामुळे गुन्हेगार पळून जाऊ शकले. या घटनेनंतर इशिकाने 27 फेब्रुवारी रोजी रामनगर पोलिस ठाण्यात तत्काळ तक्रार नोंदवली. Crime

     

    पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. अनेक शहरांमध्ये मोबाईल स्नॅचिंगच्या घटना वाढत्या चिंतेच्या बाबी आहेत आणि नागरिकांनी सतर्क राहणे आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेणे महत्वाचे आहे. Safety

     

    सार्वजनिक ठिकाणी, विशेषत: उशिरापर्यंत मोबाइल फोन वापरणे टाळणे आणि सभोवतालच्या सभोवतालच्या सदैव जागरुक राहण्याचा सल्ला दिला जातो. रहिवाशांना सुरक्षिततेची भावना निर्माण करून पोलीस दोषींना त्वरीत पकडतील आणि त्यांना न्याय मिळवून देतील, अशी चंद्रपूर समाजाची अपेक्षा आहे. Police investigation

  • Tadoba Festival : चंद्रपुरात 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन

    Tadoba Festival : चंद्रपुरात 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्व विक्रम व कुमार विश्वास यांचे कवी संमेलन आयोजित केले असल्याचे त्यांनी सांगितले. Tadoba andhari tiger project

     

    रामगावकर पुढे म्हणाले की, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना १९५५ साली झाली. ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. हा महोत्सव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध ठिकाणी होणार आहे. ताडोबा उत्सव शाश्वत विकासाला चालना देत आपला नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. Sustainable tourism

     

    हा कार्यक्रम केवळ वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत नाही तर वन्यजीवांसोबत स्थानिक समुदायांची भूमिका देखील अधोरेखित करतो. पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देऊन आणि संवर्धनाच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही केवळ आमच्या मौल्यवान परिसंस्थांचेच रक्षण करत नाही तर आर्थिक वाढ आणि स्थानिक समुदाय सशक्तीकरणाच्या संधीही निर्माण करत असल्याचे त्यांनी नमूद केले. Wildlife conservation

     

    पर्यटनाला चालना देणे, औद्योगिक विकासाला चालना देणे या सर्व बाबी वन्यजीवांच्या अधिवासांचे संरक्षण सुनिश्चित करते, असे ते म्हणाले. Tadoba tiger

     

    या तीन दिवसीय महोत्सवात दररोज विविध वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सकाळी संवादात्मक सत्रे, दुपारी पॅनेल चर्चा आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

     

    निसर्ग प्रश्नमंजुषा. पारंपरिक नृत्य सादरीकरण, लघुपट सादरीकरण आणि श्रेया घोषालचे गीत सादरीकरण उद्घाटनाच्या दिवशी असणार आहे.

     

    कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, फोटोग्राफी कार्यशाळा, चॅरिटी रन, चर्चासत्रे, आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. जगातील सर्वात जास्त वृक्षारोपण कार्यक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा या दिवशी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे. रिकी केज सारख्या नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाने आणि कवी संमेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाची या उत्सवात रेलचेल राहणार आहे.

     

    कार्यक्रमाच्या ३ ऱ्या दिवशी, सहभागींना ट्रेझर हंट स्पर्धा, सायक्लोथॉन, चित्रकला स्पर्धा, वन्यजीव प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि सीएसआर कॉन्क्लेव्ह यासह विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी यांच्या समूहाचा गंगा बॅले कार्यक्रम होणार असल्याची माहिती डॉ. रामगावकर यांनी दिली.
    आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी विनय गौडा यांची उपस्थिती होती.

  • Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पावर चंद्रपुरात संमिश्र प्रतिक्रिया

    Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पावर चंद्रपुरात संमिश्र प्रतिक्रिया

    News34 chandrapur

    राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार

    चंद्रपूर – राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी,  कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजग, व्यापारी अशा घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा अर्थसंकल्प राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा असल्याचे अर्थसकंल्पावर प्रतिक्रिया देतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. Mla kishor jorgewar

     

       सरकार सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करित आहे. याचाच प्रत्यय पुन्हा अर्थसंकल्पातून आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलांना स्वयंरोजागारातून आत्मनिर्भर बनविण्यासाठी मतदार संघात आपण  ग्रीन आटो संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्नशील होतो, आता या अर्थसंकल्पात 5 हजार  महिलांना पिंक रिक्षा उपक्रम राबविणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. State budget

     

    त्यामुळे हा उपक्रम महिलांच्या आर्थिक उन्नती सह महिला सुरक्षेसाठी महत्वपूर्ण योगदान देणारा ठरणार आहे. रोजगार हमी योजनेसाठी 2 हजार 205 कोटी रुपये, मराठी विभागासाठी 71 कोटी रुपये, जिल्हा वार्षीय योजनेसाठी 18 हजार 165 कोटी रुपयांची तरदुत अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.18 लघु-वस्त्रोद्योग संकुल स्थापन करुन सुमारे 36 हजार रोजगार निर्मिती करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात डायलसीस सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. एंकदरित विचार केल्यास समाजातील सर्व घटकाला स्पर्श करुन न्याय देणारा राज्यहिताचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. Finance minister ajit pawar

     

    शाळांचा विकास आणि शैक्षणिक क्षेत्राकडे दुर्लक्ष करणारा “बजेट”

    आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शैक्षणिक क्षेत्रासाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. शाळांचा विकास आणि शैक्षणिक सुविधांसाठीही या अर्थसंकल्पात अंतर्भाव दिसून येत नाही. अंशत: अनुदानित शाळांना टप्पा अनुदान वाढ देण्यात आले नाही. शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न असलेल्या जुन्या पेंशनबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. आय टी शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत कुठलीही तरतूद या अर्थ संकल्पात करण्यात आलेली नाही.

    – सुधाकर अडबाले, आमदार
    महाराष्ट्र विधान परिषद

     

    सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प

    राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, महिला, युवकांसाठी कोणतिही मोठी तरतूद केलेली नाही. युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ घोषणाबाजी अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प आहे.
    – रितेश (रामू) तिवारी,
    जिल्हाध्यक्ष
    चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर

     

    राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला. अंतरिम अर्थसंकल्पातही अर्थमंत्री अजित पवार यांनी शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकास साधण्याच्या राज्याच्या धोरणाला गती देण्यास प्राधान्य दिले. मात्र, चंद्रपूरसारख्या प्रदूषित जिल्ह्यासाठी शुद्ध हवा, पर्यावरण आणि इरई नदी खोलीकरण आणि पूरग्रस्त स्थिती कायमस्वरूपी दूर करण्यासाठी कोणतीही ठोस तरदूत करण्यात आली नाही. या शिवाय राज्यातील शासकीय शाळांच्या प्रगतीसाठी कोणतीही निधीची तरतूद नाही. त्यामुळे गरीब विद्यार्थ्याची पिळवणूक होईल.

    बहुजनांचे प्रतिनिधी
    श्री. राजेश वारलुजी बेले
    अध्यक्ष | संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था
    चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा निवडणूक 2024

  • Maha prasad : माँ.दुर्गा मंदिर मुल येथे वर्धापन (स्थापना दिवस) निमित्त मातेचा दुग्धाभिषेक व कुंकुम पूजन

    Maha prasad : माँ.दुर्गा मंदिर मुल येथे वर्धापन (स्थापना दिवस) निमित्त मातेचा दुग्धाभिषेक व कुंकुम पूजन

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – श्री. माँ दुर्गा मंदीर सेवा समिती मूलच्या वतीने मंदिराच्या आवारात जागृत माता श्री. माँ. दुर्गादेवी मंदीराचा आठवा वर्धापन दिन सोहळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवार दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ वा. समिती संचालक रुपलसिंह रावत व सौ. मोना रावत यांनी यांचे हस्ते मंदिराचे पुजारी मुकेशजी मिश्रा यांच्या मंत्रोपचार पद्धतीने पुजा अर्चा करण्यात आली.

     

    नंतर सकाळी ९ वा. पासुन मातेचा दुग्धाभिषेक सोहळा मंदिर समितीचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत व सौ. मामता रावत यांनी महाआरती असंख्य भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आली. दुपारी १ वा. पासुन महीलांकरीता कुंकुम पुजा आणि संध्याकाळी ७ वा. आरती नंतर महाप्रसाद (महाभोजन) आयोजित करण्यात आला.

     

    या महाप्रसादाचा आस्वाद तालुक्यातील व मुल शहरातील चार हजारांच्या वर भाविकांनी आस्वाद घेतला. माँ.दुर्गा मातेचा द्वीदिवसीय सोहळा आयोजनासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे मार्गदर्शनात समितीचे उपाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, सचिव संजय पडोळे, संचालक घनश्याम येनुरकर, राजेंद्र कन्नमवार , केदारनाथ कोटगले, गुरु गुरनुले, चतुर मोहुरले, सुरेश देशमुख, छोटू रावत, सुनील मंगर, यांनी सहकार्य केले. महाप्रसाद भोजन व्यवस्थेसाठी राकेश रत्नावार, घनश्याम येनरकर, संजय पडोळे, राजेंद्र कन्नमवार, रुपल रावत, सुनील मंगर, गुरु गुरनुले, केदारनाथ कोटगले, लोमेश नागापुरे, व्यंकटेश पुल्लकवार, तेजस महाडोळे व युवशक्तीची पूर्नटीम, यांनी परिश्रम घेतले. महिलांच्या गर्दीसाठी शामलता बेलसरे, राधिका बुक्कावार,संमता बनसोड,सीमा भसारकर यांनी मेहनत घेतली.

  • Congress Party : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुल तालुका सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान

    Congress Party : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुल तालुका सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या अध्यक्ष,श्रीमती सोनियाजी गांधी, राष्ट्रीय युवा नेते खासदार राहुल गांधी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार व काँग्रेसचे पॉवर फुल नेते विधान सभेचे विरोधी पक्ष नेते यांच्या नेतृत्वात व जिल्ह्यातील कांग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या प्रमुख मार्गदर्शनात, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व जिल्हा महासचिव राकेश रत्नावार, माजी सभापती, संचालक तथा जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, ग्रामीण नेते राजू पाटील मारकवार, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, जिल्हा किसान सेल अध्यक्ष दीपक पा. वाढई, ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस गुरुदास चौधरी, महासचिव दशरथ वाकुडकर, बंडू गुरनुले, सुमित आरेकर, यांचे सह अनेक ग्रामीण कांग्रेस पदाधिकारी यांचे उपस्थितीत नियुक्त करण्यात आलेल्या सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांची निवड त्या -त्या विभागाकडून करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे पत्र विधान सभेचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांचे शुभ हस्ते व मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. Congress party

     

    महाराष्ट्र ओबीसी विभागाच्या प्रदेश सचिव पदी कांतपेठ येथील राजेंद्र वाढई यांची नियुक्ती झाल्याने नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच मुल तालुका अनुसूचित जाती(एस.सी.) विभाग तालुका अध्यक्ष पदी चिखली येथील संजय गेडाम, अनुसूचित जमाती. (एस टी.)सेल तालुका अध्यक्षपदी दहेगाव येथील काँग्रेसच सक्रिय किशोर पेंदाम यांची नियुक्ती तर आदिवासी विभाग मुल शहर अध्यक्षपदी काँग्रेसचे निष्ठावान, होतकरू संगीत विशारद नेतृत्व असलेले अशोक येरमे, विमुक्त जाती भटकी जमाटी विभाग (एन. टी.) सेल तालुका अध्यक्षपदी गणेश गेडाम मुल यांची निवड झाली. तर मुल तालुका महिला कांग्रेस पदाधिकाऱ्यांनाही ना.वडेट्टीवार यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. Vijay wadettiwar

     

    यात ग्रामीण मुल तालुका आदिवासी सेल विभाग तालुका अध्यक्षपदी मरेगाव सरपंच सौ. जोत्सना पेंदोर, मुल शहर महिला कांग्रेस अध्यक्षपदी संयमी निगर्वी संघटन नतृत्वगुन संपन्न असलेल्या व्यक्तिमत्व सौ. नलिनी आडपवार , मुल शहर उपाध्यक्षपदी माजी नगर सेविका सौ.लीना फुलझेले, मुल शहर महिला सचिव पदी, कांग्रेस निष्ठावान धडाडीच्या पुढाकार घेणाऱ्या वक्तृत्व गुण असलेल्या सौ. शामला बेलसरे यांनी निवड झाली.

     

    तर शहर महिला कोषाध्यक्ष पदी नियमित सक्रिय कार्यरत असलेल्या सौ.राधिका बुक्कावार, शहर उपाध्यक्षपदी धडाडीच्या सौ.समता बनसोड, यांची निवड, तर मुल शहर सचिव पदी सौ. अल्का कामडे, सहसचिव सौ. फर्जना शेख, इत्यादींची निवड करण्यात आली असून महिला तालुका व शहर महासचिव पदावर काही होतकरू सक्रिय नियमित येणाऱ्या महिलांची नियुक्ती तातडीने करण्यात येणार आहे. यांच्या नियुक्तीचे वर्तमान काळात काँग्रेस मोठ्या प्रमाणात व संख्येने उभी करावी व कांग्रेस संघटन मजबूत करावे. आपली जबाबदारी प्रामाणिकपणे सर्वांनी पार पाडवी अशी अपेक्षा व्यक्त केले असून उपस्थित सर्व कांग्रेस नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती पत्र देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

  • Maharashtra State Budget : केंद्राच्या स्तुतीतून साकारलेला दिशाहीन अर्थसंकल्प – आमदार प्रतिभा धानोरकर

    Maharashtra State Budget : केंद्राच्या स्तुतीतून साकारलेला दिशाहीन अर्थसंकल्प – आमदार प्रतिभा धानोरकर

    Maharashtra state budget चंद्रपूर – आज महाराष्ट्र राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला मात्र हा अर्थसंकल्प केवळ केंद्रावर स्तुतीसुमने उधळण्याचा एक प्रयत्न असल्याची टीका आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. 

    अवश्य वाचा : डेंग्यू चा बाजार सुरू होण्यापूर्वी मनपाने केली कारवाई

    Maharashtra state budget आज राज्याचा अर्थसंकल्प माननीय अजित दादा पवार यांच्याकडून मांडण्यात आला. या अर्थसंकल्पात, अर्थसंकल्पातील तरतुदी कमी व मोदींची स्तुती जास्त असा हा अर्थसंकल्प दिसून येत आहे. समोरच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला फसविण्याचा महायुतीचा डाव यातून दिसून येत आहे. बेरोजगारी शेतकरी, महिला याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे.

    आगामी लोकसभा निवडणुकीवर महायुती सरकार सामान्य नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करणार असल्याचे मत आमदार धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक आहे, त्यापूर्वी घोषणांचा बाजार या अर्थसंकल्पातून समोर आलेला आहे. महायुती सरकारने कितीही घोषणा केल्या तरी जनता यांना लोकसभा निवडणुकीत घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, राज्यातील व देशातील जनता भाजप व महायुती सरकारला मोठा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही, चांगल्या दिवसाचे स्वप्न नागरिकांना दाखवीत वाईट दिवसांची वाटचाल भाजपने नागरिकांना दाखवली,  त्याच उत्तर सामान्य जनता निवडणुकीच्या वेळी दाखवून देणार हे नक्की आहे.

    निवडणुकीपूर्वी कितीही घोषणा केल्या तरी त्या सर्व योजना जनता पायदळी नक्कीच तुडविणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रतिभा धानोरकर यांनी अंतरिम अर्थसंकल्प बाबत दिली आहे.

  • BJP Executive : चंद्रपूर महानगर भाजपा अनुसूचित जमाती (आदिवासी) मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

    BJP Executive : चंद्रपूर महानगर भाजपा अनुसूचित जमाती (आदिवासी) मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर अंतर्गत असलेल्या अनुसूचित जमाती (आदिवासी) मोर्चाची कार्यकारिणी नुकतीच मोर्चाचे जिल्‍हाअध्यक्ष धनराज कोवे यांनी जाहीर केली आहे. कार्यकारिणीत महामंत्रीपदी शुभम गेडाम, अरविंद मडावी, किशोर आत्राम, यशवंत सिडाम, अनिल सुरपाम, विक्‍की  मेश्राम यांना संधी मिळाली आहे. Scheduled tribe

     

    उपाध्‍यक्ष म्‍हणून नविन चांदेकर, धिरज बोरीकर, अनिल सिडाम, माणिक सोयाम, प्रकाश आत्राम, सोमाजी कातलाम, नागेश्‍वर कुळमेथे, नकुल उईके, तर सचिव पदी रामु मसराम, सतिश  मेश्राम, अरविंद नन्‍नावरे, अरविंद तुमराम, ईश्‍वर शेडमाके, विशाल मरस्‍कोल्‍हे  यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. Bjp chandrapur

     

    नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष हरिश शर्मा, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, प्रमोदभाऊ कडू, चंद्रपूर जिल्हा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार, रामपाल सिंग, किरण बुटले, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपा नेते अशोक जीवतोडे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, तुषार सोम, सविता कांबळे, विशाल निंबाळकर, मनोज पोतराजे, धम्‍मप्रकाश भस्‍मे, चाँद पाशा सय्यद, रवी चहारे, संदिप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, रवी लोनकर, पुरुषोत्तम सहारे, आदींनी अभिनंदन केले आहे.

  • Marathi Language : गौरव दिन मराठी भाषेचा

    Marathi Language : गौरव दिन मराठी भाषेचा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मराठी, महाराष्ट्राची चैतन्यशील आणि भावपूर्ण भाषा, तिच्या मूळ भाषिकांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी, मराठी रसिक एकत्र येऊन गौरव दिन साजरा करतात, हा दिवस भाषेचा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व यांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. गौरव दिनाची उत्पत्ती. Gaurav din

     

    प्रख्यात मराठी कवी आणि नाटककार व्ही.व्ही. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त 1987 मध्ये गौरव दिन, म्हणजे “Day Of Pride” पहिल्यांदा साजरा करण्यात आला. शिरवाडकर, कुसुमाग्रज म्हणून प्रसिद्ध. कुसुमाग्रज हे केवळ विपुल लेखकच नव्हते तर ते समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिकही होते. मराठी साहित्यातील त्यांचे योगदान आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना प्रचंड आदर आणि प्रशंसा मिळाली. Marathi literature

     

    कुसुमाग्रजांच्या अमूल्य योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस गौरव दिन म्हणून घोषित केला. हा दिवस मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेबद्दल असलेल्या अपार अभिमानाची आणि प्रेमाची आठवण करून देतो. Linguistic diversity

     

    मराठी भाषेचा उत्सव साजरा करणे

    गौरव दिन हा विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक कार्यक्रम आणि मराठी भाषेचे सौंदर्य आणि वैविध्य दर्शविणारे संमेलन यांनी भरलेला दिवस आहे. मराठी भाषिक समुदायांनी एकत्र येऊन त्यांची भाषिक आणि सांस्कृतिक ओळख साजरी करण्याचा हा एक प्रसंग आहे. Cultural heritage

     

    या दिवशी, शाळा, महाविद्यालये आणि सांस्कृतिक संस्था स्पर्धा, वादविवाद आणि कविता वाचन आयोजित करतात, तरुण प्रतिभांना त्यांचे भाषिक कौशल्य आणि सर्जनशीलता प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करतात. हे कार्यक्रम केवळ अभिमानाची भावनाच वाढवत नाहीत तर तरुण पिढीला त्यांचा भाषिक वारसा आत्मसात करण्यास आणि जतन करण्यास प्रोत्साहित करतात.

     

    शतकानुशतके जुना समृद्ध इतिहास असलेले मराठी साहित्य या उत्सवांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. मराठी साहित्याच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करण्यासाठी पुस्तक मेळावे, काव्यवाचन आणि साहित्यिक चर्चा आयोजित केल्या जातात. शब्दांच्या सामर्थ्यावर आणि समाजाला आकार देण्यावर त्यांचा काय प्रभाव पडतो यावर विचार करण्याची ही वेळ आहे.

     

    गौरव दिनाचे महत्व

    गौरव दिन आपल्या वाढत्या जागतिकीकरणाच्या जगात प्रादेशिक भाषांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो. हे भाषिक विविधतेची जोपासना आणि पालनपोषण करण्याची गरज अधोरेखित करते, कारण भाषा हे केवळ संवादाचे साधन नसून संस्कृती, इतिहास आणि ओळख यांचे भांडार देखील आहेत.

     

    आपल्या अभिव्यक्त स्वभावासाठी आणि भावनांचे बारकावे टिपण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी भाषेने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिदृश्याला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. गौरव दिन हा भाषिक समृद्धीचा उत्सव साजरा करतो आणि लोकांना त्यांच्या भाषेचा आणि वारशाचा अभिमान बाळगण्यास प्रोत्साहित करतो.

     

    शिवाय, गौरव दिन हा मराठी भाषिक समुदायांच्या साहित्य, कला, संगीत, नाट्य आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रांतील योगदानाची कबुली देण्याची संधी आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या मराठी प्रतिकांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा हा दिवस आहे.

     

    वारसा जतन करणे

    गौरव दिन हा उत्सवाचा दिवस असला तरी तो मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या जबाबदारीची आठवण करून देतो. जागतिक स्तरावर इंग्रजीचे वर्चस्व असलेल्या युगात मराठीसारख्या प्रादेशिक भाषांचा विकास होत राहील याची खात्री करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

     

    शाळा, महाविद्यालये आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही मराठी भाषा शिकण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संसाधने विकसित करण्यासाठी, कार्यशाळा आयोजित करण्यासाठी आणि मराठी भाषेचे सौंदर्य आणि महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भाषाप्रेमी, संस्था आणि सरकार एकत्र काम करत आहेत.

     

    मराठीबद्दलचे प्रेम वाढवून आणि विविध क्षेत्रांमध्ये तिचा वापर करण्यास प्रोत्साहन देऊन, भावी पिढ्या या भाषेचे कौतुक आणि कदर करत राहतील याची आम्ही खात्री करू शकतो. Marathi Bhasha Gaurav din

     

    निष्कर्ष

    गौरव दिन हा जगभरातील मराठी भाषिक समुदायांसाठी अभिमानाचा, उत्सवाचा आणि चिंतनाचा दिवस आहे. मराठी भाषेत अंतर्भूत असलेल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आणि भाषिक विविधतेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या गरजेचे हे स्मरण आहे. या खास दिवशी आपण एकत्र येऊ या, मराठी भाषेचे सौंदर्य साजरे करूया आणि तिचा वारसा पुढच्या पिढ्यांसाठी टिकून राहू या.