Blog

  • Chandrapur Tadoba Festival concludes : नागरिकांचे सहकार्य आणि शुभेच्छांनी ताडोबा महोत्सव यशस्वी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Chandrapur Tadoba Festival concludes : नागरिकांचे सहकार्य आणि शुभेच्छांनी ताडोबा महोत्सव यशस्वी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर – Chandrapur Tadoba Festival concludes महाराष्ट्राचे वर्णन ‘चांदा ते बांदा’ असे केले जाते. त्यामुळे प्रगतीच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा नेहमी अग्रेसर असावा, असा आपला प्रयत्न आहे. जगप्रसिद्ध असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा, म्हणून येथे तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

     

    या महोत्सवाला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहकार्यामुळे हा महोत्सव यशस्वी झाला. ताडोबा महोत्सवामुळे चंद्रपूरची ख्याती संपूर्ण जगात गेली, असे मनोगत राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

     

    चांदा क्लब ग्राउंड येथे राज्य शासन व वन विभागाच्या वतीने पहिला वनभूषण पुरस्कार धुळे जिल्ह्यातील चैतराम पवार यांना देण्यात आला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाला उत्तराखंडचे वनमंत्री सुबोध उन्नीयाल, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उत्तराखंडचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुप मलिक, जिल्हाधिकारी विनय गौडा, सीआयडी फेम शिवाजी साटम आदी उपस्थित होते.

     

    वाघाची भूमी असलेल्या चंद्रपूर जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जगाचे केंद्र व्हावे, या उद्देशाने ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा आपला प्रयत्न आहे. गत तीन दिवसांपासून ताडोबा महोत्सव हा सोशल माध्यमांमध्ये सर्वोच्च ट्रेंडवर पोहोचला आहे. तसेच या महोत्सवाकरिता उपस्थित असलेल्या विश्वसुंदरी स्पर्धेतील स्पर्धकांनी त्यांच्या देशातसुद्धा समाज माध्यमातून ताडोबा महोत्सवाचा प्रचार आणि प्रसार केला, ही चंद्रपूरकरांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.

     

    पुढे श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरचा वाघ आता जगात पोहोचला आहे, हे आपले यश आहे. वनांचे संरक्षण करणाऱ्यांना आजपासून वनभूषण पुरस्कार देण्यात येत आहे. आदिवासी क्षेत्रात काम करणारे चैतराम पवार यांना २० लक्ष रुपयांचा पहिला वन भूषण पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे. या महोत्सवाच्या प्रेमापोटी एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे जगप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. रमाकांत पांडा, सीआयडी फेम अभिनेते शिवाजी साटम, विश्वसुंदरी स्पर्धेतील स्पर्धक आदींनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे येथील नागरिकांनी ताडोबा महोत्सवाला केलेले सहकार्य हे अभूतपूर्व आहे. त्यामुळेच हा उत्सव यशस्वी होऊ शकला, असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

     

    चैतराम पवार यांना पहिला वन भूषण पुरस्कार

    आदिवासी कल्याण वनवासी आश्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरच्या १०० गावांमध्ये वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावचे चैत्राम पवार यांना पहिला वनभूषण पुरस्कार ताडोबा महोत्सवात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी त्यांना २० लक्ष रुपयांचा धनादेश व मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

    Maharashtra vanbhushan award

    पुरस्कार मिळाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना चैतराम पवार म्हणाले, राज्य सरकारने या पुरस्कारासाठी तळागाळातील माणसाला शोधले. या पुरस्कारामुळे काम करण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे. वनवासी कल्याण आश्रम तसेच वनविभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कामासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. १५-१६ गावांचे क्लस्टर करून सामुदायिक वन विकसित करण्याचे आमचे प्रयत्न आहे. जल, जंगल, जमीन, पशुधन या माध्यमातून शाश्वत विकास शक्य असून हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नव्हे तर खानदेशाचा गौरव असल्याचे श्री. पवार म्हणाले.

     

    विविध क्षेत्रातील मान्यवरांना / संस्थांना पुरस्कार वितरण

    ताडोबा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात विविध संस्था तसेच मान्यवरांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट ग्राम पर्यावरण विकास समिती अंतर्गत चेकबोर्डा, मारूडा, देवाडा, सातारा या गावांना पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट प्राथमिक कृतीदल पुरस्कार वायगाव, मोकासा, करवल, खातेदा, कोंडेगाव, गोंडमोहळी या गावांना, आदर्श वणवा व्यवस्थापन पुरस्कार आडेगाव, डोनी, दुधाळा, वासेरा, रानतळोदी या गावांना, ग्रामपरिस्थितीय पर्यावरणाचा उत्कृष्ट पुरस्कार मामला, आगरझरी, निंबाळा, बोर्डा या गावांना, उत्कृष्ट निसर्ग मार्गदर्शक पुरस्कार विनोद उईके, कृष्णा पाटील, मनोज भलावी, विराज राऊत यांना शाश्वत पर्यटन आणि सेवा देणारे उत्कृष्ट पुरस्कार ससारा जंगल लॉज, ताडोबा होम स्टे कॉटेज, ताडोबा टायगर व्हॅली रिसॉर्ट यांना, वन्यजीव संवर्धनासाठी सामाजिक दायित्व पुरस्कार मिटकॉन कन्सल्टन्सी, आयसीआयसीआय फाउंडेशन, हेमेंद्र कोठारी फाउंडेशन, सनफ्लॅग फाउंडेशन यांना, वन्यजीव अधिवास विकास पुरस्कार डॉ. गजानन मुरदकर, डॉ. पी.डी. कडूकर, ट्री फाउंडेशन, तरुण पर्यावरणवादी मंडळ, आणि इको – प्रो यांना, शीघ्रबचाव दल पुरस्कार डॉ. रविकांत खोब्रागडे, डॉ. कुंदन पोल, अभय मराठे, अमोल कोरपे यांना तर उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार गोलू बाराहाते, देवानंद साखरकर आणि कमलेश ठाकूर यांना देण्यात आला. तसेच यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्रीय संचालक वीरेंद्र तिवारी, नितीन काकोडकर, एस.एच. पाटील यांना सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

    प्रश्न – चंद्रपुरात पहिला ताडोबा महोत्सव कधी आयोजित करण्यात आला होता?

    उत्तर – 1 मार्च 2024 रोजी चंद्रपुरात पहिला ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

    प्रश्न 2 – महाराष्ट्रात पहिला वनभूषण पुरस्कार कुणाला मिळाला?

    उत्तर – महाराष्ट्र राज्यात पहिला वनभूषण पुरस्कार हा चैतराम पवार, धुळे यांना मिळाला.

  • Chandrapur Lok Sabha Congress Candidate : चंद्रपूर लोकसभा जागेवर कांग्रेस पक्षातून आता यांचा दावा

    Chandrapur Lok Sabha Congress Candidate : चंद्रपूर लोकसभा जागेवर कांग्रेस पक्षातून आता यांचा दावा

    Chandrapur Lok Sabha Congress Candidate – देशात कांग्रेस पक्षाला कुणीही हरवू शकत नाही, कारण कांग्रेसला फक्त कांग्रेसच हरवू शकते, असंच काही चंद्रपूर लोकसभेत घडताना दिसत आहे.

     

    खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनांनंतर लोकसभा क्षेत्र मागील वर्षभरापासून खासदार विना आहे, वर्ष 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे, मात्र त्याआधी या जागेवर कांग्रेस पक्षातून दावेदारी करणारे नाव पुढे येत आहे.

     

    आमदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा निवडणुक (Chandrapur Lok Sabha Congress Candidate) लढण्याची तयारी दर्शवित जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात सुद्धा केली आहे, काही दिवसांनी विरोधीपक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्यास आपली तयारी दर्शविली. वडिलांच्या इच्छेनंतर आता त्यांच्या कन्येने चंद्रपूर लोकसभेवर दावा केलाय.

     

    राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार यांनी पक्षश्रेष्ठींकडे चंद्रपूर लोकसभेचे तिकीट मागितले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या तिकिटासाठी येत्या काळात मोठी चुरस बघायला मिळणार आहे.चंद्रपूर लोकसभा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, मागील काही निवडणुकीत भाजपने आपली पकड या क्षेत्रावर घट्ट केली होती. भाजपचे हंसराज अहिर या क्षेत्रातून तब्बल तीनवेळा विजयी झाले होते. मात्र, २०१९ मध्ये राज्यात मोदी लाट असताना शिवसेनेचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला होता. Chandrapur Lok Sabha Congress Candidate

     

    या विजयात ओबीसी समाजाची गठ्ठा मते धानोरकर यांच्या पारड्यात पडली होती मात्र, बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा लढविण्याची तयारी सुरू केली आहे.

     

    सोबत विजय वडेट्टीवार यांनीही पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढू, असे म्हटले आहे. अशात शिवानी वडेट्टीवार यांनी आता पक्षाकडे तिकीट मागितल्याचे सांगितले. एवढेच नाही, तर काँग्रेसच्या वतीने आणि विजय क्रांती संघटनेच्या माध्यमातून मागील पाच वर्षांपासून या क्षेत्रात काम करीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लोकसभेच्या तिकीटा वरुन कांग्रेसमधे मोठी चुरस निर्मान झाली आहे. एकंदरीत, काँग्रेस पक्षश्रेष्ठी तिकीट नेमकी कुणाला देतात, हे येणाऱ्या काळातच कळणार आहे.

  • Old Pension Yojana in Maharashtra : जुनी पेंशन योजना लागू करा – आमदार सुधाकर अडबाले

    Old Pension Yojana in Maharashtra : जुनी पेंशन योजना लागू करा – आमदार सुधाकर अडबाले

     

    चंद्रपूर – Old Pension Yojana in Maharashtra – नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी जुनी पेंशन योजना लागू व्हावी यासाठी सतत पाठपुरावा करीत आहे, मात्र अश्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची घोषणा विधानसभेत केली, सदर योजना ही फसवी असल्याची टीका आमदार अडबाले यांनी केली आहे.

     

    राज्‍यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्‍यानंतर नियुक्‍त कर्मचारी – अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. ही घोषणा शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्‍याय करणारी असून निवडणूकीच्या तोंडावर केलेली ही घोषणा फसवी असल्‍याची टीका आमदार सुधाकर अडबाले यांनी केली.

    शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी गेल्‍या अनेक वर्षांपासून Old Pension Yojana in Maharashtra लागू करण्याच्‍या मागणीला घेऊन सरकारशी लढा देत आहेत. या लढ्यामुळे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्‍मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत वित्त विभागाचा १४ मार्च २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. समितीचा अहवाल येण्यास आठ महिन्‍यांचा कालावधी लागला. समितीने सरकारला सादर केलेला अहवाल सभागृहात सादर करून Old Pension Yojana in Maharashtra लागू करावी, अशी मागणी सातत्‍याने आमदार सुधाकर अडबाले सरकारकडे करीत होते.

    अर्थसंकल्‍पीय अधिवेशन २०२४ मधील शेवटच्या दिवशी राज्‍यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्‍यानंतर नियुक्‍त कर्मचारी – अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. या योजनेत नियत वयोमानानुसार (३० वर्ष सेवा पूर्ण झाल्‍यास) निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्‍तावित योजनेचा विकल्‍प दिल्‍यास त्‍यांना त्‍यांच्या शेवटच्या वेतनाच्या ५० टक्‍के इतके निवृत्तीवेतन व त्‍यावरील महागाई वाढ तसेच निवृत्तीवेतनाच्या ६० टक्‍के कुटूंब निवृत्तीवेतन व त्‍यावरील महागाई वाढ मिळेल. जुन्‍या पेंशन योजनेत पेंशन मिळण्यासाठी कोणतीही कपात होत नाही.

     

    मात्र, या योजनेत एनपीएस प्रमाणे १० टक्‍के अंशदानाची कपात नापरतावा सूरूच राहणार आहे. जुन्‍या पेंशन योजनेत नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या ५० टक्‍के पेंशन मिळण्यासाठी केवळ १० वर्ष सेवा पुरेशी होती. या योजनेत ३० वर्ष सेवेची अट असणार आहे. जुन्‍या पेंशन योजनेत स्‍वेच्‍छा सेवानिवृत्तीसाठी २० वर्ष सेवा पुरेशी होती. तर या योजनेत तसा कोणताच नियम नाही. १९८२ च्या जुन्या पेन्शन योजनेंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होतात, दर १० वर्षात नवीन वेतन अायोगानुसार पेंशन पुनर्रचना करण्यात येते, ज्यात पेन्शन बेसिक जवळपास दुप्पट वाढत असते. तर या योजनेत नवीन वेतन आयोगानुसार पेंशन पुनर्रचना होण्याचा काही संबंध नसणार आहे. ज्या पेंशन बेसिकवर कर्मचारी निवृत्त झाला असेल, तो आजीवन त्याच बेसिकवर पेंशन घेईल. यामुळे जुन्‍या पेंशन धारकांच्या पेंशनच्या तुलनेत चार-पाच पट मागे राहील. जुन्या पेंशन योजनेत दर ६ महिन्याला पेंशनवर महागाई ५ ते ६ टक्‍के भत्ता वाढत असतो तर या योजनेत डीए वाढ नसणार आहे.

    सोबतच जुन्‍या पेंशन योजनेत अंशराशीकरण पेंशन विक्री करता येते. जीपीएफची रक्‍कम व्‍याजासह मिळत होती. या नवीन योजनेत अशी कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही. तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्‍त व त्‍यानंतर टप्‍याटप्‍याने १०० टक्‍के अनुदानावर आलेल्‍या राज्‍यभरातील शाळांवर कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुद्धा या योजनेत समावेश करण्यात आलेला नाही. समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असमान पेंशन देण्याचे धाेरण सरकार आखत असून कर्मचाऱ्यांत तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करीत आहेत. यामुळे राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांत सरकारप्रती तीव्र असंतोष पसरला आहे.

    जुन्या पेन्शन योजनेची मागणी होत असताना सुधारीत पेंशन योजनेची मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा फसवी असून कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात टाकणारी आहे. निवडणुकीच्या ताेंडावर सरकारने दिलेले हे गाजर असून शिक्षक – राज्‍य कर्मचारी यास बळी पडणार नाहीत. नकारात्‍मक असणारे सरकार आज शिक्षक- राज्‍य कर्मचाऱ्यांच्‍या लढ्यामुळे सकारात्‍मक होताना दिसत आहे. यामुळे सरकारने विनाअट १९८२-८४ ची जुनी पेंशन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आपला हा लढा असा सुरू राहील, अशी माहिती आमदार सुधाकर अडबाले यांनी दिली.

  • Advantage Chandrapur 2024 – Industrial Expo & Business Conclave : निवडणुकीच्या तोंडावर केलेली स्टंटबाजी – शिवानी वडेट्टीवार

    Advantage Chandrapur 2024 – Industrial Expo & Business Conclave : निवडणुकीच्या तोंडावर केलेली स्टंटबाजी – शिवानी वडेट्टीवार

    Advantage Chandrapur 2024 – Industrial Expo & Business Conclave

    चंद्रपूर – Advantage Chandrapur 2024 – Industrial Expo & Business Conclave चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून राज्यात प्रचलित आहे, मात्र जिल्ह्यात आज स्थानिकांना रोजगार मिळत नाही आहे, मात्र या धर्तीवर जिल्ह्यातील नेते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी 4 मार्च रोजी चंद्रपुरात दोन दिवसीय ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 – इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह‘ चे आयोजन करण्यात आले आहे अशी टीका युवक कांग्रेसच्या प्रदेश सचिव, विजयक्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार यांनी केली आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात आज भूमिपुत्र रोजगार नसल्यामुळे घरी बसला आहे, त्यांना आधी रोजगार मिळावा मात्र आजच्या विपरीत परिस्थितीत बाहेरच्यांना रोजगार देण्याचे काम सुरू आहे, आज ज्या पद्धतीने कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे, तो भूमिपुत्र यांना रोजगार कसा मिळेल यावर खर्च करायला हवा असा प्रश्न शिवानी वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

    वाचा – ताडोबा महोत्सवातील VIP कोण?

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून Advantage Chandrapur 2024 – Industrial Expo & Business Conclave चे आयोजन करण्यात आले आहे, मात्र आज त्यांना सुद्धा युवा नेत्याच्या टिकेला समोर जावे लागत आहे.

     

    लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेली ही स्टंटबाजी आता बंद करावी अशी टीका शिवानी वडेट्टीवार यांनी केली आहे. चंद्रपुरात असलेले उद्योग यामध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा मग नवे उद्योग आणावे, कार्यक्रमात कोणते उद्योग येणार आहे त्याबाबत सुद्धा काही सांगण्यात आले नाही हे विशेष.

     

    4 मार्च पासून चंद्रपुरात कार्यक्रम

    महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘Advantage Chandrapur 2024 – Industrial Expo & Business Conclave’ चे उद्घाटन सोमवार दि. 4 मार्च रोजी होणार आहे.

    चंद्रपूर वन अकादमी येथे सकाळी 11 वाजता होणा-या या कार्यक्रमाला केंद्रीय रस्‍ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार आहे.

     

    विविध सत्रांचे आयोजन : दि.4 मार्च रोजी वन अकादमी येथील प्रभा सभागृहात  दुपारी 2.30 वाजता ‘आर्यन अँड स्‍टील’ विषयावर तर दुपारी 4.30 वाजता ‘मायनिंग अँड कोल’ विषयावर तसेच सिद्धांत हॉलमध्‍ये दुपारी 2.30 वाजता ‘अल्‍टरनेटीव्‍ह एनर्जी सोर्सेस’ या विषयावर आणि दुपारी 4.30 वाजता होणा-या ‘अॅग्रीकल्‍चर अँड अलाइड सेक्‍टर्स’ या विषयावर चर्चासत्र आयोजित आहे.

     

    5 तारखेला प्रभा हॉलमध्‍ये सकाळी 10.30 वाजता ‘एफआयडीसी अँड बांबू’ व दुपारी 12.30 वाजताच्‍या ‘बांबू इंडस्‍ट्री’ या विषयावर, दुपारी 3.00 वाजता ‘एज्‍युकेशन अँड स्‍कील डेव्‍हलपमेंट’ या विषयावर, सिद्धांत हॉलमध्‍ये सकाळी 10.30 वाजता ‘फायनान्‍स अँड स्‍टार्टअप’ दुपारी 12.30 वाजता ‘सर्क्‍युलन इकॉनॉमी’ वर तर दुपारी 3.00 वाजता होणा-या ‘सिमेंट अँड लाईमस्‍टोन’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता विपिन पालिवाल यांचे मोटिव्‍हेशनल टॉक होईल.

     

    या मेगा एक्स्पोला महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातून तसेच परदेशातील व्यापारी, उद्योगपती, उद्योजक, नोकरी-उत्सुक, एमएसएमई, व्यवसाय, उद्योग तज्ञ आदींची उपस्‍थ‍िती राहणार आहे.

  • Hema malini : चंद्रपुरातील ताडोबा महोत्सवात हेमा मालिनीचे आगमन

    Hema malini : चंद्रपुरातील ताडोबा महोत्सवात हेमा मालिनीचे आगमन

    Hema malini चंद्रपूर – चंद्रपुरात सुरू असलेल्या 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सिनेअभिनेत्री हेमा मालिनी यांचे गंगा नृत्य नाटिका सादरीकरणासाठी 3 मार्चला चंद्रपुरात आगमन झाले.

    Hema malini 1 मार्चपासून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आयोजित ताडोबा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

    पालकांनो लक्ष द्या : 8 महिन्याच्या बाळाने गिळली काजळ ची डबी

    यावेळी हेमा मालिनी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करीत वनाचे संरक्षण हे आपले कर्तव्य आहे अशी बाब त्यांनी यावेळी व्यक्त केली.

    सोबतच त्यांना लोकसभा निवडणुकीची मथुरा येथून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहे. 3 दिवस चालणाऱ्या ताडोबा महोत्सवात बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी या गंगा नृत्य करणार आहे, नदीचे रक्षण कसे करावे, त्यासाठी काय उपाययोजना असाव्या याबाबत गंगा नाटिका मध्ये नृत्याद्वारे संपूर्ण विश्लेषण प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 3 दिवसीय ताडोबा महोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानीचा आस्वाद चंद्रपूर वासीयांना मिळणार आहे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूरच्या वाघांची विशेषतः व त्यांची ओळख जगाला व्हावी हा या कार्यक्रमा मागचा उद्देश्य आहे, ताडोबा महोत्सवाचा प्रचार प्रसार सध्या जोमात सुरू असून यासाठी सौंदर्य स्पर्धा विजेत्यांनी आपल्या देशात ताडोबा अभयारण्याचा प्रचार सुरू केला असून त्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात ताडोबाचा वाघ काय आहे? किती संख्या वाघांची आहे याबाबत परदेशी पर्यटकांना सुद्धा संखोल माहिती मिळणार.

  • VIP Festival : ताडोबा महोत्सवातील VVIP, VIP व प्रीमियम प्रेक्षक कोण?

    VIP Festival : ताडोबा महोत्सवातील VVIP, VIP व प्रीमियम प्रेक्षक कोण?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील चांदा क्लब मैदानावर 1 ते 3 मार्च दरम्यान ताडोबा महोत्सवाचे भव्य आयोजन वनविभागातर्फे करण्यात आले आहे. Vip culture

     

    1 मार्च ला सिनेअभिनेत्री रविना टंडन यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले मात्र पहिल्याच दिवशी ढिसाळ नियोजनाचा अनुभव नागरिकांना बघायला मिळाला. Poor planning

     

    उदघाटन कार्यक्रमात नागरिकांची तुडुंब गर्दी झाली, मात्र वनविभागाच्या कोट्यवधीच्या कार्यक्रमात नियोजनाचा अभाव दिसला, नागरिकांना बसायला जागा नसल्याने त्यांनी जमिनीवर आपले बस्तान मांडत कार्यक्रम बघितला. Tadoba Festival

     

    ताडोबा महोत्सव कार्यक्रमात VVIP, VIP, GOLD व PREMIUM असे पासेस बनविण्यात आले होते मात्र ते पास सामान्य नागरिकांपर्यंत पोहचलेचं नाही. Tadoba mahotsav

     

    याबाबत माहिती काढली असता VVIP रांगेत राजकीय पक्षाचे पुढारी बसलेले होते, VIP रांगेत नागरिक सह पत्रकार हे उभे होते, खुर्ची न मिळाल्याने अनेकजण vip रांगेत खालीच बसले. Vip Member

     

    चंद्रपूर मनपाच्या महापौर पदाचे स्वप्न बघणाऱ्या नेत्याने VVIP पासेसचा गठ्ठा जवळ ठेवला होता, त्यांनी ते vvip पासेस आपले कार्यकर्ते व प्रभागातील श्रीमंत नागरिकांमध्ये वितरण केले. भावी महापौर यांच्या या कृत्याने सामान्य नागरिकांना पासेस मिळाले नाही त्यामुळे अनेकांना कार्यक्रम बघण्यापासून मुकावे लागले. Political vip

     

    नागरिकांच्या तोंडातून यावेळी एकच उदगार निघाले “हा कार्यक्रम प्रायव्हेट लिमिटेड आहे की शासकीय?” 3 दिवस चालणाऱ्या का कार्यक्रमाचे एकूण बजेट 9 कोटी रुपये म्हणजे दर दिवसाला 3 कोटींचा खर्च, इतके वर्ष ताडोब्यात असे कार्यक्रम झाले नाही तर मग यावर्षीचं हा इव्हेंट का आयोजित करण्यात आला, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

     

    जनतेच्या करातून केल्या जाणारी कोट्यवधी रुपयांची ही मोठी उधळण सध्या चंद्रपुरात सुरू आहे. विशेष म्हणजे जनविकास सेना व्यतिरिक्त या इव्हेंट ला कुणी ही विरोध दर्शविला नाही.

     

    जनतेच्या हक्कासाठी लढणारे पक्ष आज तोंडात मृग गिळून गप्प बसले आहे, निवडणुकीच्या वेळी याना जनता आठवते मात्र नागरिकांचा काहीएक फायदा नसलेल्या भव्य आयोजनाला यांचा विरोध दिसत नाही.

     

    पोलीस विभागाने चंद्रपूर-नागपूर मार्गावरील एक रस्ताचं महोत्सवासाठी बंद केला, एकंदरीत कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी प्रशासनाने केलेला हा अयशस्वी प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी सुद्धा झाला, मात्र त्याचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागत आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षीपासून सुरू झालेल्या या इव्हेंट्मुळे शासकीय कर्मचारी सुद्धा वैतागला आहे, कार्यालयातील कामे सोडून त्यांना इव्हेंट्स मध्ये आपली हजेरी लावावी लागत आहे.

  • Tragic Incident : राजुरा येथे दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

    Tragic Incident : राजुरा येथे दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

    news34 chandrapur

    चंद्रपूर/राजुरा – सास्ती गावात एका हृदयद्रावक घटनेत एका विहिरीजवळ पाणी आणि गाळ साचल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. वेकोलिच्या चड्डा या ठेकेदार कंपनीने विहिरीजवळील माती टाकल्याने अनावधानाने तलावासारखा पाण्याचा तलाव तयार झाल्याची घटना घडली. tragic incident

     

    दोन्ही विद्यार्थी, एक इयत्ता 11वी आणि दुसरा 9वीतला, या तलावासारख्या पाण्यात पोहायला गेले आणि त्यामुळे होणाऱ्या धोक्यांची कल्पना नव्हती. दुर्दैवाने, ते पाण्यात आणि गाळात अडकले, त्यामुळे मित्रांचा अकाली मृत्यू झाला. accident prevantion

     

    राजुरा तालुक्यातील सास्ती या गावी आज 2 मार्च ला सकाळी शाळा सुटल्यानंतर पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोन्ही मुलांचे प्रेत पाण्याबाहेर काढले आहे. या मृत मुलांची नावे पियुष राकेश सिडाम, वय17 व साहिल रमेश कुंदलवार, वय 15 अशी आहेत. chandrapur district

     

    घटनेची माहिती मिळताच तातडीने गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि राजुरा पोलिसांना माहिती दिली. यानंतर प्रेत बाहेर काढण्यात आले. मात्र यानंतर कंपनीने नाला रोखून अनाठायी तलाव निर्माण केला, त्यामुळे कंपनीने तातडीने आर्थीक सहायता द्यावी अन्यथा तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. आता या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथुन जमावाने प्रेत उचलु दिले नाही. chadda contractor

  • Bharat Mata : चंद्रपुरात पुन्हा विश्वविक्रम, 65 हजार 724 वृक्षांनी साकारलं भारत माता

    Bharat Mata : चंद्रपुरात पुन्हा विश्वविक्रम, 65 हजार 724 वृक्षांनी साकारलं भारत माता

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 2 मार्च रोजी ताडोबा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूर वनविभागाने प्रतिष्ठेच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली. वनविभागाने स्थानिक समुदायाच्या सहकार्याने रामबाग येथे 26 विविध प्रजातींची तब्बल 65,724 झाडे वापरून “भारत माता” हे नाव यशस्वीपणे तयार केले. Bharat Mata

     

    यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, या कार्यक्रमात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त करताना ताडोबा अभयारण्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करण्यासाठी ताडोबा महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. Guinness book of world record

     

    झाडांचा वापर करून “भारत माता” नावाची निर्मिती केवळ राष्ट्रीय अभिमानाचेच नव्हे तर पर्यावरण संवर्धनासाठी भारताच्या वचनबद्धतेचा दाखलाही आहे. मंत्री मुनगंटीवार यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देत भविष्यात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पार्कची स्थापना करण्याचा मनोदय व्यक्त केला. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या शब्दसंग्रहातून “ग्लोबल वॉर्मिंग” हा शब्द काढून टाकण्यासाठी भारताचे समर्पण प्रदर्शित करणे हे अंतिम ध्येय आहे. ताडोबा अभयारण्य आणि त्याच्या समृद्ध जैवविविधतेबद्दल जागरुकता वाढवणे हा ताडोबा महोत्सवाचा उद्देश आहे. Tadoba sanctuary

     

    हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करून, वनविभाग आणि स्थानिक समुदायाने चंद्रपूरला पर्यावरण संवर्धनाचा चॅम्पियन म्हणून नकाशावर यशस्वीरित्या आणले आहे. भविष्यात, या प्रदेशातून उड्डाण करणारे कोणीही “भारत माता” या नावाच्या भव्य दर्शनाने स्वागत केले जाईल, जे भारताच्या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्याच्या वचनबद्धतेचे एक शक्तिशाली स्मरण म्हणून काम करेल. अशा उपक्रमांद्वारे, भारत हवामान बदलाशी मुकाबला करण्यासाठी आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्याच्या प्रयत्नांसह जगाला प्रेरणा देत आहे. ताडोबा महोत्सवाची विक्रमी कामगिरी ही पुढील पिढ्यांसाठी आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वनविभाग, स्थानिक समुदाय आणि संपूर्ण देशाच्या सामूहिक निर्धाराचा पुरावा आहे. Tadoba festival chandrapur

  • Tadoba Mahotsav : सिनेअभिनेत्री, वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते ताडोबा महोत्सवाचे भव्य उदघाटन

    Tadoba Mahotsav : सिनेअभिनेत्री, वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते ताडोबा महोत्सवाचे भव्य उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 1 मार्चपासून चंद्रपुरात ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, 3 मार्च पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उदघाटन सिनेअभिनेत्री व वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते करण्यात आले. Tadoba festival

     

    आयोजित कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आदींची उपस्थिती होती. Chandrapur

     

    प्रसार माध्यमांशी यावेळी रविना टंडन यांनी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की असे आयोजन भविष्यात सुद्धा व्हायला पाहिजे. Sustainable tourism

     

    चंद्रपुरात ताडोबा सारखे अभयारण्य संपूर्ण जगात प्रख्यात आहे, आज उदघाटन कार्यक्रमात मिस वर्ल्ड स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी सुद्धा भाग घेतला त्यांच्या माध्यमातून आपल्या देशातील प्रकृती व ताडोबा ची प्रसिद्धी होणार. Tadoba tiger

     

    महाराष्ट्र आपल्या वन संपदेसाठी किती जागरूक आहे हा या माध्यमातून जगात संदेश जाणार. उदघाटन कार्यक्रम नंतर sand artist सुदर्शन पटनायक यांनी मातीच्या साहाय्याने वाघाची कलाकृतीची तयार केली, त्यानंतर प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. Tadoba mahotsav

     

    उदघाटन कार्यक्रमात नागरिकांची असंख्य संख्येत उपस्थिती होती.

  • Tadoba Tiger Reserve : ताडोबा महोत्सवात यांचा सन्मान करा – आमदार किशोर जोरगेवार

    Tadoba Tiger Reserve : ताडोबा महोत्सवात यांचा सन्मान करा – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जागतिक स्तरावर पोहचविण्यास वन्यप्राणी छायाचित्रकार,  पत्रकार, वन्यजीव संरक्षण संस्था, वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व जंगलांचे संरक्षण करणारे स्थानिक नागरिकांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे चंद्रपूरात आयोजित ताडोबा महोत्सवात त्यांचा सत्कार करण्यात यावा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी वनसंरक्षक तथा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांना केल्या आहे. सदर पत्रही त्यांनी पाठवले आहे.  Tadoba mahotsav

     

          वन विभागाच्या वतीने ताडोबा महोत्सव २०२४ चे आयोजन १ मार्च ते ३ मार्च २०२४ दरम्यान करण्यात आले आहे. ताडोबा महोत्सव 2024 चे उद्दिष्ट ताडोबाची यशोगाथा साजरी करणे आणि ती जागतिक मंचावर प्रकाशित करणे हि आहे. मात्र सदर महोत्सव साजरा करत असतांना ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील प्राण्यांचे छायाचित्र आपल्या कॅमेर्यात टिपून येथील सौंदर्य जगात पोहोचविणार्या वन्यजीव छायाचित्रकरांचा विसर पडता कामा नये. त्यासोबतच अनेक पत्रकार वृतांकनच्या माध्यमातून ताडोब्याच्या प्रसिद्धीसाठी काम करीत आहे. Forest conservation

     

    तसेच वन्यजीव संस्था वन विभागातील कर्मचारी – अधिकारी यांच्या खांद्याला खांदा लावून वन्य प्राणी संरक्षणाचे ईश्वरीय कार्य करीत आहे. येथील स्थानिक नागरिकांनी या वनसंपत्तीचे संरक्षण केले आहे. यांच्या एकत्रित योगदानामुळेच आज ताडोबा व्याघ्रप्रकल्प जागतिक स्तरावर पोहचले आहे. Wildlife conservation

     

    या सर्वांच्या सामुहिक योगदानाशिवाय ताडोबा महोत्सवाची संकल्पनाच अपुरी राहील त्यामुळे अश्या आयोजनात ताडोबाच्या प्रसिद्धीत, संरक्षणात उल्लेखनीय योगदान असलेल्या या सर्व घटकांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या सेवाकार्याची पावती देण्यात यावी अशा सूचना त्यांनी क्षेत्र संचालक डाॅ जितेंद्र रामगावकर यांना पाठविलेल्या पत्रातुन केल्या आहे.