Blog

  • Old Pension Scheme : राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा आमदार सुधाकर अडबाले यांची मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे मागणी

    Old Pension Scheme : राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा आमदार सुधाकर अडबाले यांची मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे मागणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – : राज्‍यातील सर्व शिक्षक व राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व पेंशन योजनेचे संरक्षण करावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा ‘व्होट फॉर ओपीएस’ नागपूर ते मुंबई संकल्प पदयात्रा काढण्यात येत आहे. राज्‍यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना तात्‍काळ लागू करावी, अशी आग्रही मागणी राज्‍याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी केली. Old pension scheme

     

    आतापर्यंत सहा राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात आली आहे. नुकतेच सिक्कीम या राज्यानेसुद्धा जुनी पेन्शन योजना लागू केली. मात्र, महाराष्ट्र सरकारने अजूनही जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. शासनाने जुनी पेंशन योजना लागू करण्यासंदर्भात गठीत करण्यात आलेल्‍या समितीचा अहवाल सुद्धा शासनास सादर करण्यात आलेला आहे. तो अहवाल अर्थसंकल्‍पीय अधिवेशन २०२४ मध्ये सभागृहात सादर करून राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, असेही निवदेनात म्‍हटले आहे. Retirement plan

     

    नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्‍यान १२ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा पेंशन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात लाखोंच्या संख्येने राज्‍यातील कर्मचारी सहभागी झाले होते. हिवाळी अधिवेशनादरम्‍यान सरकार जुनी पेंशन योजना लागू करण्यासंदर्भात सकारात्‍मक असल्‍याचे सभागृहात म्‍हटले होते. मात्र, अजूनही यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. यामुळे नागपूर ते मुंबई काढण्यात येत असलेल्‍या संकल्प पदयात्रेत मोठ्या संख्येने शिक्षक-कर्मचारी सहभागी झालेले असून मुंबईच्या दिशेने निघालेले आहे. या यात्रेचा समारोप मुंबई येथील आझाद मैदानावर २८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. financial security

    कर्मचाऱ्यांत वाढता असंतोष बघता सरकारने राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना तात्‍काळ जुनी पेन्शन योजना लागू करावी व राज्यातील १६ लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज्‍याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी केली.  Government employee

  • Vijay Wadettiwar : मातेच्या आशीर्वादाने पुन्हा मंत्री होण्याची संधी मिळाली तर मातेचा परिसर अतिशय देखणा करु – विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार

    Vijay Wadettiwar : मातेच्या आशीर्वादाने पुन्हा मंत्री होण्याची संधी मिळाली तर मातेचा परिसर अतिशय देखणा करु – विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – जिल्हा खनिज विकास निधी व खासदार स्थानिक विकास निधी मधून बांधकाम करण्यात आलेल्या माॕ दुर्गा मंदिर सामाजिक सभागृहाचा लोकार्पण करतांना विधान सभेचे विरोधी पक्ष नेते नाम. विजय वडेट्टीवार यांनी अभिवचन दिले.

     

    लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, प्रमुख अतिथी गडचिरोली माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, डाँ. नामदेव किरसान, ज्येष्ठ कार्यकर्ते हसन जिलानी, प्राचार्य देविदास जगनाडे, कृषी उत्पन्न बाजार सभापती राकेश रत्नावार, सिदेंवाहीचे नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, माजी सभापती व संचालक घनश्याम येनुरकर, माजी नगरसेवक नंदुजी नागरकर, माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, सा.बां. उपविभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले, माजी महापौर वसंता देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

     

    जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर मंदिरात सामाजिक सभागृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावे. अशी विनंती ना. विजय वडेट्टीवार यांना केली असता तात्काळ निधी उपलब्ध करुन दिल्यानेच हे सभागृह साकारल्याचे मत मंदिर समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती राकेश रत्नावार यांनी मंदिर बांधत असताना अनेक अडचणी आल्या परंतु मातेच्या आशीर्वादाने व विजयभाऊच्या सहकार्याने अडचणी दूर झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मंदिर समितीचे सचिव संजय पडोळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन मंदिर समितीचे सदस्य गुरु गुरनुले यांनी मानले.

     

    कार्यक्रमानंतर विजय वडेट्टीवार यांचे हस्ते मुल तालुका कांग्रेस, महिला काँग्रेसच्या वतीने नियुक्त केलेल्या सर्व सेलच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सहसचिव यांना नियुक्ती पत्र देवुन सन्मानित करण्यात आले.

  • Mahila Morcha Bjp : चंद्रपूर भाजपा महानगर महिला मोर्चा कार्यकारिणी जाहीर

    Mahila Morcha Bjp : चंद्रपूर भाजपा महानगर महिला मोर्चा कार्यकारिणी जाहीर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुर महानगर भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सविता कांबळे यांनी नवनियुक्त चंद्रपूर महानगर भाजपा महिला मोर्चा कार्यकारिणीची नावे जाहीर केली आहे. यामध्ये सरचिटणीस, उपाध्यक्ष, सचिव,यांचा समावेश आहे. Chandrapur mahanagar bjp

     

    भाजपा चंद्रपूर महानगर महिला मोर्चाच्या
    महामंत्रीपदी शीला चव्हाण,सुषमा नागोसे कल्पना बगुलकर,याची नियुक्ती करण्यात आली असून उपाध्यक्षपदी चंद्रकला सोयाम,संगीता खांडेकर, जयश्री जुमडे,माया उईके, कविता जाधव, मंजुश्री कासंगोट्टूवार, वंदना तिखे,शितल गुरुनूले,माया मांदाडे,वंदना संतोषवार,कोणीका सरकार, पुष्पा शेंडे, उषा मेश्राम, प्रियंका चिताडे,आशा अबोजवार, सिंधू राजगुरे यांची नियुक्ती करण्यात आली. Mahila morcha bjp

    सचिवपदी वनिता डुकरे, ज्योती गेडाम, शितल आत्राम, पुष्पा उराडे,कविता सरकार, कल्पना गिरडकर, वंदना राधारपवार, स्मिता रेभनकर, वंदना जांभूळकर, सुवर्णा लोखंडे,वर्षा सोमलकर, रेखा चन्ने, सुनिता जयस्वाल, भावना नागोसे,लीलावती रविदास यांच्या नावाची घोषणा चंद्रपुर महानगर भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता कांबळे यांनी केली आहे. Executive members

     

    नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री
    सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीयआयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष हरिश शर्मा, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर,माजी आमदार प्रा. अतुल देशकर,माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, प्रमोदभाऊ कडू,चंद्रपूर जिल्हा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार,रामपाल सिंग, किरण बुटले, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस,प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपा नेते अशोक जीवतोडे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, तुषार सोम विशाल निंबाळकर, मनोज पोतराजे, धम्मप्रकाश भस्मे, धनराज कोवे, चाँद पाशा सय्यद, रवी चहारे, संदिप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, रवी लोनकर, पुरुषोत्तम सहारे, आदींनी अभिनंदन केले आहे.

  • Healthcare Infrastructure : चंद्रपुरातील या वास्तूचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण

    Healthcare Infrastructure : चंद्रपुरातील या वास्तूचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभागाच्या जिल्हा औषधी भांडार नवीन इमारतीचे तसेच तडाली (ता. चंद्रपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचा-यांच्या नवीन वसाहतीचे लोकार्पण रविवार दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. Pradhan Mantri Ayushman Bharat Health Infrastructure Mission

     

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील. national health mission

     

    दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी राजकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पाच एम्सचे लोकापर्ण करण्यात येणार आहे. healthcare infrastructure

     

    यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान व प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर अभियानांतर्गत विविध कामांचे डीजीटल पध्दतीने लोकार्पण व भुमिपूजन करण्यात येणार आहे. medical services

     

    या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा औषध भांडार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नवीन इमारत जवळ, चंद्रपूर तसेच तडाली येथील अधिकारी कर्मचारी नवीन वसाहतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. inauguration ceremony

  • Bullock Traders Suicide : ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव येथे बैल व्यापाऱ्याची आत्महत्या

    Bullock Traders Suicide : ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव येथे बैल व्यापाऱ्याची आत्महत्या

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव येथे राजेश्वर तुकाराम या बैल व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. 22 फेब्रुवारी रोजी राजेश्वर आपल्या दुचाकीवरून नागपूरला जाणार असून संध्याकाळी परतणार असल्याचे कुटुंबीयांना सांगून सकाळी घरून निघून गेला. Tragic event

     

    मात्र, संध्याकाळ झाली तरी राजेश्वर घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबियांची चिंता वाढली. कुटुंबीयांनी राजेश्वरचा शोध सुरू केला, परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले कारण तो कोणताही मागमूस न घेता गायब झाल्याचे दिसत होते. दुसऱ्या दिवशी 23 फेब्रुवारी रोजी सकाळी राजेश्वरची दुचाकी तोरगाव ते मौशी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापडली. दुर्दैवाने राजेश्वरचा निर्जीव मृतदेह दुचकीजवळील सागवान नर्सरी येथे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. Bullock traders suicide

     

    राजेश्वरने स्वतःचा जीव घेण्याच्या निर्णयामागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे. ब्रह्मपुरी पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दुःखद घटनेला कारणीभूत असलेल्या परिस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी तपास सुरू केला आहे. राजेश्वरच्या वैयक्तिक जीवनाभोवतीचा तपशील आणि त्याच्या मानसिक स्थितीत योगदान देणारे कोणतेही संभाव्य घटक चालू तपासाचा भाग म्हणून कसून तपासले जातील.  तपासावरील पुढील अद्यतने उपलब्ध होताच सामायिक केली जातील. Torgaon incident

  • Mla Pratibha Dhanorkar : संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाजाने एकत्रीत यावे – आमदार प्रतिभाताई धानोरकर

    Mla Pratibha Dhanorkar : संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाजाने एकत्रीत यावे – आमदार प्रतिभाताई धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सध्या देशातली परिस्थिती अत्यंत भयावह असुन केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येत आहे. अनेक ED,CBI सारख्या स्वायत्त संस्थांना हाताशी धरुन विरोधी पक्षांना कमकुवत करुन आपला राजकीय स्वार्थ साधत असल्याचे चित्र देशात निर्माण झाले आहे. Unity राज्यातील व केंद्रातील सरकार हे समाजा समाजात द्वेष निर्माण करुन लोकशाहीचा अपमान करीत आहे. त्यामुळे आज संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाजाने एकत्रीत येणे गरजेचे असल्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी बहुजन विचार मंच द्वारा आयोजित ‘लढा विचारांचा-सन्मान संविधानाचा’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. Constitution

     

    बहुजन विचार मंच चंद्रपूर द्वारा आयोजित ‘लढा विचारांचा-सन्मान संविधानाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे पटांगणावर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महात्मा ज्योतीबा फुले लिखित तृतीयरत्न या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी प्रतिभा धानोरकर उद्घाटन प्रसंगी म्हणाल्या कि, आजची राजकीय परिस्थिती भयावह असून देश हुकुमशाही कडे वळत आहे. Democracy

     

    आपल्याला आज संविधान रक्षणाची गरज असुन त्यासाठी बहुजन समाजाने एकत्रीत येणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकशाही बळकट होईल. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाने बहुजन समाजाचा वारसा जोपासला जाऊन कला व गीतांमधून प्रबोधन होणार आहे तसेच डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या माध्यमातून देशातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे मत देखील यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. Mla pratibha dhanorkar

     

    तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचे आस्वाद घेण्याचे आव्हान करण्यात आले. यावेळी चंद्रपूरातील विविध समाजातील प्रतिनिधीत्व करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार देखील आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आला. Political climate

     

    उद्घाटन प्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. सूर्यकांत खनके हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. अनिरुध्द वनकर यांच्यासह विनोद दत्तात्रय, रितेश तिवारी, नम्रता ठेमस्कर, चंदा वैरागडे, अनिल नरुले, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, बापू अन्सारी, सकिना अन्सारी, विना खनके, रमजान अली, अनुताई दहेगांवकर, शालिनी भगत, सचिन राजुरकर यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन श्री. गोपाल अमृतकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड. प्रितिशा साधना, राहुल सुर्यवंशी, रामचंद्र कोंद्रा, स्वप्नील शेंडे, मोनु रामटेके, श्याम राजुरकर यांनी विशेष प्रयत्न केले.

  • Corruption In Municipality : चंद्रपूर मनपातील कर लिपिकाला 15 हजारांची लाच घेताना अटक

    Corruption In Municipality : चंद्रपूर मनपातील कर लिपिकाला 15 हजारांची लाच घेताना अटक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 23 फेब्रुवारीला चंद्रपूर मनपाच्या झोन क्रमांक 1 मधील कर लिपिक 52 वर्षीय फारुख अहमद मुस्ताक शेख यांना 15 हजारांची लाच स्वीकारताना अटक केली. Anti corruption agency

     

     

    फिर्यादी यांनी स्वतः व मुलांच्या नावाने फ्लॅट घेतले होते, त्या मालमत्तेवर भोगवटदार यांचे नावे समाविष्ट करण्यासाठी मनपा झोन क्रमांक 1 मध्ये अर्ज दिला होता. Bribery in government

     

    मात्र कर लिपिक फारुख शेख यांनी फिर्यादीला काम करून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागितली, फिर्यादी यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दिली. Transparency and accountability

     

    23 फेब्रुवारीला तक्रारीची पडताळणी केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत सापळा रचला, महानगरपालिका झोन क्रमांक 1 मध्ये 23 फेब्रुवारीला कर लिपिक फारुख शेख यांना 15 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. Bribe case

     

    याबाबत सध्या पुढील तपास सुरू आहे, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे व पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, कार्यालयीन स्टाफ रमेश दुपारे, अरुण हटवार, नरेश ननावरे, राज नेवारे, संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे व सतीश सिडाम यांनी केली. Corruption in municipality

     

    फेब्रुवारी महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सलग 3 कारवाया केल्या, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन करीत कोणतेही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम काम करून देण्यासाठी पैसे मागत असेल तर त्याबाबत चंद्रपूर कार्यालय क्रमांक 07172-250251 वर सम्पर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

  • Jivati Taluka : भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र शासनाला दाखविले चप्पल, जोडे

    Jivati Taluka : भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र शासनाला दाखविले चप्पल, जोडे

    News34 chandrapur

    चंद्रपूर :- भारत राष्ट्र समिती जिवतीच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आहे. जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट जमिनीचे पट्टे देण्यात यावे व इतर मूलभूत सुविधा पुरविण्यात यावी याकरिता भारत राष्ट्र समितीतर्फे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस असून आतापर्यंत महाराष्ट्र शासन व प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे भारत राष्ट्र समितीने आज महाराष्ट्र शासन व प्रशासनाचा निषेध करण्याकरिता तहसील कार्यालय जिवती येथे चप्पल व जोडे दाखवीत निषेध व्यक्त केला. bharat rashtra samiti

     

    12 ऑक्टोबर 2023 रोजी जिवती तालुक्यातील प्रश्नांना घेऊन बीआरएसने भुषण फुसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य जनआक्रोश मोर्चा काढला होता. मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. Jivati taluka

     

    महाराष्ट्राचा शेवटचा टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्हातील जिवती तालुक्याची निर्मिती 21 वर्षांपूर्वी झाली, मात्र अद्यापही विकासाचा मुख्य प्रवाहात तालुका आलेला नाही. मागासलेपणाची चादर ओढून हा तालुका उभा आहे. अनेक गावात मूलभूत सुविधांच्या अभाव आहे. तालुक्यात धड रस्ते नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत, पिण्याचा पाण्यासाठी येथे सारखी वनवन करावी लागते, इथली शिक्षण व्यवस्था पार कोडमलेली आहे. शेत जमिनीचे पट्टे द्या, ही येथील जनतेची मुख्य मागणी आहे. Farmer protests

     

    तालुक्यातील जमिनीचे अद्याप फेरफार सुरू झालेले नाही. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट शेत जमिनीचे पट्टे देण्यात यावे, शेत जमिनीचे फेरफार त्वरीत सुरू करावे, सिंचनाचे प्रकल्प, युवकांना रोजगार उपलब्ध करूण देण्यात यावा, गावात पाण्यासाठी नळ, घरकुल, ग्रामीण रुग्णालय, बसस्थानक, न्यायालय, वसतिगृह, बीएसएनएलचे मोबाईल टावर, पटांगण, व्यायाम शाळा व वाचनालय सुरू करण्यात यावे. जिवती तालुक्यातील वन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी, स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा उघडण्यात यावी अशा अनेक महत्त्वपूर्ण व रास्त मागण्यांसाठी भारत राष्ट्र समितीतर्फे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पासून जिवती तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. Maharashtra government

     

    आंदोलनाच्या चौथ्या दिवस लोटूनही शासन व प्रशासनाने दखल घेतली नसल्याने बीआरएस आंदोलनकर्त्यांच्या वतीने शासनाला चप्पल – जोडे दाखवीत निषेध नोंदवला. Agricultural sector

    शासन व प्रशासनाने आंदोलनाची दखल घ्यावी आणि जिवती तालूका वासीयांना योग्य न्याय द्यावा असे आवाहन बि आर एस नेते भूषण फुसे यांनी केले आहे.

  • IPS Status : राज्यातील 5 पोलीस उपायुक्तांना IPS दर्जा बहाल

    IPS Status : राज्यातील 5 पोलीस उपायुक्तांना IPS दर्जा बहाल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – भारत सरकारने अलीकडेच राज्यातील पाच पोलीस उपायुक्तांच्या अपवादात्मक समर्पण आणि सेवेची दखल घेऊन त्यांना प्रतिष्ठित भारतीय पोलीस सेवा (IPS) दर्जा प्रदान केला आहे. 22 फेब्रुवारी रोजी सरकारने जारी केलेल्या अधिकृत आदेशाद्वारे ही प्रशंसनीय कामगिरी जाहीर करण्यात आली. Indian police service

     

    पूर्णिमा गायकवाड, पराग मणेरे, एन.जी. पाटील, आर.ए.शिंदे आणि संजय जाधव या पाच पोलीस अधिकाऱ्यांना आयपीएस दर्जा बहाल करण्यात आला आहे. या प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या कर्तव्याप्रती अनुकरणीय वचनबद्धता दर्शविली आहे आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. Deputy commissioner of police

     

    पाच प्रतिष्ठित पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पराग मणेरे यांचे विशेष स्थान आहे कारण त्यांनी यापूर्वी चंद्रपूर पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले होते. गेल्या काही वर्षांमध्ये, मानेरे यांनी अपवादात्मक नेतृत्व कौशल्ये दाखवली आहेत आणि अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणण्यात आणि त्यांचे निराकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या समर्पण आणि अथक प्रयत्नांमुळे त्यांना एक विश्वासू कायदा अंमलबजावणी अधिकारी म्हणून प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. Ips status

     

    या पोलीस अधिकाऱ्यांना सरकारने दिलेली मान्यता ही त्यांच्या कठोर परिश्रम, व्यावसायिकता आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी अटूट बांधिलकीचा पुरावा आहे. IPS दर्जा हा अशा व्यक्तींसाठी राखीव असलेला एक प्रतिष्ठित सन्मान आहे ज्यांनी कायद्याची अंमलबजावणी अधिकारी म्हणून त्यांच्या भूमिकांमध्ये अपवादात्मक क्षमता आणि सचोटीचे प्रदर्शन केले आहे. Law enforcement officers

     

    भारतीय पोलीस सेवा ही भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि भारतीय वन सेवा (IFS) सह तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे. आयपीएस अधिकारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्ह्यांचा प्रतिबंध आणि तपास आणि नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. Public safety

     

    पाच पोलीस उपायुक्तांना आयपीएस दर्जा प्रदान करणे हा त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि राज्यभरातील इतर पोलीस अधिकाऱ्यांसाठी ते प्रेरणास्त्रोत आहे. हे कायद्याच्या अंमलबजावणीच्या क्षेत्रात समर्पण, व्यावसायिकता आणि नैतिक वर्तनाचे महत्त्व अधोरेखित करते.

     

    पूर्णिमा गायकवाड, पराग मणेरे, एन.जी. पाटील, आर.ए.शिंदे आणि संजय जाधव यांचे त्यांच्या योग्य ओळखीबद्दल संपूर्ण समुदायासह पोलीस विभाग मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचे यश केवळ त्यांच्या वैयक्तिक उत्कृष्टतेलाच प्रतिबिंबित करत नाही तर राज्यातील पोलिस दलाच्या सर्वांगीण प्रगती आणि परिणामकारकतेमध्ये योगदान देते.

     

     

    लोकांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांची कबुली देणे आणि त्यांचे कौतुक करणे महत्वाचे आहे. IPS दर्जा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या प्रयत्नात न्याय, निष्पक्षता आणि अखंडता या तत्त्वांचे पालन करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो.

  • Manohar joshi : राजकारणातल आदर्श व्यक्तिमत्व हरपल – आमदार प्रतिभा धानोरकर

    Manohar joshi : राजकारणातल आदर्श व्यक्तिमत्व हरपल – आमदार प्रतिभा धानोरकर

    Manohar joshi चंद्रपूर – मुंबईत महानगरपालिकेत नोकरी ते मुख्यमंत्री अशा सर्वच पदांवर विराजमान झालेले माननीय डॉक्टर मनोहर जोशी यांच्या आज निधनाने राजकीय आदर्श हरपला असल्याची भावना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली. 

    राजकीय ; भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला कांग्रेसने मारले जोडे

    Manohar joshi शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून लढलेला हा नेता काळाच्या पडद्याआड जाणे हा आम्हा सर्व लोकप्रतिनिधीं साठी मोठी दुःखद घटना आहे. भविष्यात त्यांच्या कर्तुत्वाचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन वाटचाल करणार आहोत ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांतीप्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

    कोण होते मनोहर जोशी?

    मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. घरची आर्थिक परिस्थिती खूप वाईट. त्यामुळे त्यांचं आयुष्याचा प्रवास खडतर राहिला. वडील भिक्षुकी मागायचे. मनोहर जोशी यांनीही भिक्षुकीतून मागून कुटुंबाला हातभार लावला.

    माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं चौथीपर्यंतच शिक्षण नांदवीला झालं. पाचवीचं शिक्षण महाड, तर सहावीनंतर ते मामाकडे पनवेलला आले. मामाची बदली झाल्यानंतर ते गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करू लागले. या काळात ते मित्राच्या खोलीत राहत होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्था महाजन बाईंकडे होती.

    पुढे मनोहर जोशी ११ वीच्या शिक्षणासाठी मुंबईतील बहिणीकडे आले. सहस्त्रबुद्धे क्लासमध्ये त्यांनी शिपायाची नोकरी केली आणि शिक्षण घेतले. नंतर किर्ती कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली. शिक्षण सुरू असतानाच मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेत लिपिक म्हणून काम सुरू केले. पुढे वयाच्या २७व्या वर्षी एम.ए, एल.एल.बीची पदवी घेतली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोहर जोशी यांनी वयाच्या ७२व्या वर्षी पीएच.डी पूर्ण केली.  शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरूप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर त्यांनी संशोधन करून पीएच.डी मिळवली होती. पुढे डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून त्यांना डी.लिट ही मानद पदवीही प्रदान करण्यात आली होती.

    बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मनोहर जोशी हे शिवसेनेकडे खेचले गेले. 1967 पासून त्यांनी अधिकृतपणे शिवसैनिक म्हणून काम सुरू केले. पक्षाचे काम करत असताना ते पहिल्यांदा मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले. दोन वेळा ते नगरसेवक राहिले.

    नंतर सलग तीन वेळा ते विधान परिषदचे आमदार राहिले. पुढे १९७६ मध्ये ते मुंबई महापालिकेचे महापौर झाले. पुन्हा त्यांची पाऊले राज्याच्या राजकारणात पडली आणि ते आमदार म्हणून विधानसभेत गेले. पुढे ते १९९०-९१ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.