Blog

  • Chandrapur cha raja : चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाची वार्षिक कार्यकारणी गठीत

    Chandrapur cha raja : चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाची वार्षिक कार्यकारणी गठीत

    Chandrapur cha raja चंद्रपुरातील मानाचा गणपती म्हणून प्रख्यात असलेल्या चंद्रपूर चा राजा गणेश मंडळाची वर्ष 2024 ची कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे.

    अवश्य वाचा – 3 नागरिकांची शिकार करणारा वाघ जेरबंद

    Chandrapur cha raja विशेष म्हणजे चंद्रपूर चा राजा जटपूरा युवक गणेश मंडळ यंदा 50 व्या वर्षात पदार्पण करीत आहे, मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष यंदा मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे.

    महत्वाचे – चंद्रपुरातील होर्डिंग्ज चे ऑडिट करा

    वार्षिक कार्यकारिणीत यंदा संस्थेचे अध्यक्ष श्री दिपक बेले यांचा अध्यक्षतेखाली शनिवार दि.18/5/2024 रोजी झालेल्या मंडळाचा बैठकीत वार्षिक उत्सव कार्यकारिणी ची सर्वानुमते निवड करण्यात आली.

     

    Chandrapur cha raja अध्यक्षपदाचा मान यंदा अध्यक्ष: देवेंद्र बेले, उपाध्यक्ष:- श्री राहुल बेले व श्री चिराग नथवानी, सचिव:- श्री शैलेश जुमडे , सहसचिव:- श्री संकेत पुण्यप्रेड्डीवार, कोषाध्यक्ष:- श्री निश्चल बेले यांना मिळाला आहे.

    या नवीन उत्सव कार्यकारिणी च्या नेतृत्वात आणि सर्व सदस्यांचा सहकार्याने सुवर्ण महोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार आहे. मंडळाच्या सर्व सदस्यांनी नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

  • Marathi shala : तर मराठी शाळा डबघाईस येणार

    Marathi shala : तर मराठी शाळा डबघाईस येणार

    Marathi shala शाळांमधील संरचनात्‍मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष निश्चित केले असून या शासन निर्णयामधील प्रस्तावित बाबींमुळे व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करण्याबाबतच्‍या निर्णयामुळे राज्‍यातील मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्‍त होऊन मराठी माध्यमाच्या शाळा डबघाईस येईल, अशी टिका आमदार सुधाकर अडबाले यांनी केली.

    अवश्य वाचा : 3 नागरिकांची शिकार करणारा वाघ जेरबंद

    Marathi shala शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेचे सुधारित निकष व दर्जावाढ करण्याबाबतच्‍या दोन्‍ही शासन निर्णयावर राज्‍यातील शिक्षकवर्ग तीव्र संताप व्‍यक्‍त करीत आहेत. यामुळे शिक्षकहित लक्षात घेता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्‍वात विदर्भातील सर्व जिल्‍हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्यामार्फत शासनास निवेदन सादर करून निषेध नोंदविण्यात आला.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात कृषी विभागाची मोठी कारवाई

    आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्‍वात शुक्रवारी, १७ मे रोजी सदर शासन निर्णयाबाबत अति. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अतिशय घातक असणारा सुधारीत संच मान्यतेचा व दर्जावाढ करण्याबाबतचा १५ मार्च २०२४ रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याबाबत आपण येत्‍या पावसाळी अधिवेशनात सभागृहात प्रश्‍न लावून धरणार असल्‍याचे विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले. सोबतच विमाशि संघाच्या वतीने शासन निर्णय रद्द न झाल्‍यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

    महत्वाचे : तो शेतकरी सतत 3 दिवस वाघाचे तुकडे करत होता आणि…

    Marathi shala यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी पवार, मुख्य वित्त व लेखा अधिकारी गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्‍विनी सोनवणे, शिक्षण विस्‍तार अधिकारी चालखुरे, समाज कल्‍याण अधिकारी पेंदाम यांच्यासह खाजगी शिक्षणसंस्था संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनील शिंदे, जगदीश जुनगरी, विमाशी संघाचे जिल्‍हा अध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्‍हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, मारोतराव अतकरे, लक्ष्मण धोबे, विज्युक्टा अध्यक्ष डॉ. प्रविन चटप, महानगर अध्यक्ष जयंत टोंगे, कार्यवाह सुरेंद्र अडबाले, डॉ. विजय हेलवटे, शालीक ढोरे, कापसे, देवानंद चटप, सतीश अवताडे, शरद डांगे, शकील सर, देवेंद्र बलकी, सचिन मोहितकर, बलवंत विखार, प्रभाकर मते, प्रा. विधाते, प्रकाश कुंभारे, डॉ. धर्मा गावंडे, मोहन गंधारे, बंटी खटी, पेद्दीलवार व विमाशि संघाचे पदाधिकारी, सदस्‍य व शिक्षकवृंदांची उपस्‍थिती होती.

  • Bhanuskhindi tiger cub : 3 नागरिकांची शिकार करणाऱ्या केले जेरबंद

    Bhanuskhindi tiger cub : 3 नागरिकांची शिकार करणाऱ्या केले जेरबंद

    Bhanuskhindi tiger cub चंद्रपूर जिल्ह्यात 3 नागरिकांचा बळी घेणारा वाघ 18 मे रोजी वनविभागाच्या जाळ्यात अडकला, खडसंगी बफर परिक्षेत्रातील निमढेला येथे या वाघाने धुमाकूळ घातला होता.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील होर्डिंग्ज चे ऑडिट करा-भाजपची मागणी

    Bhanuskhindi tiger cub सदर वाघ हा भानुसखिंडी वाघिणीचा बछडा आहे. बेंबळा येथील सूर्यभान हजारे,नीमढेला येथील रामभाऊ हनवते व खाणगाव चिमूर तालुक्यातील अंकुश खोब्रागडे यांना वाघाने ठार केले होते.

    बातमी महत्वाची – वर्ग 10 व 12 विचा निकाल या दिवशी होणार जाहीर

    Bhanuskhindi tiger cub 18 मे रोजी सकाळी 11 वाजता खडसंगी परिक्षेत्रातील नियतक्षेत्र नीमढेला मधील कक्ष क्रमांक 59 मध्ये भानुसखिंडी वाघाच्या बछड्याला रेस्क्यू ऑपरेशन करीत पकडण्यात आले.

    अवश्य वाचा : शेतकऱ्यांने केले वाघाचा तुकडे

    या यशस्वी कारवाईत किरण धानकुटे वन परिक्षेत्र अधिकारी, डॉ.खोब्रागडे, पोलीस नाईक शूटर एसी मराठे, राकेश आहुजा यांनी केली असून पकडण्यात आलेल्या वाघाची प्रकृती बरी असल्याने त्याला गोरेवाडा येथे नेण्यात आले.

  • Cmc chandrapur : चंद्रपूरमधील होर्डिंग्जचे ऑडिट करा

    Cmc chandrapur : चंद्रपूरमधील होर्डिंग्जचे ऑडिट करा

    CMC chandrapur मुंबईत 13 मे रोजी विशाल होर्डीग्स कोसळले.,यात अनेकांची जीवित हानी झाली. अशी घटना चंद्रपूरात नाकारता येत नाही.म्हणून शहरातील सर्व होर्डिंग्जचे तात्काळ ऑडिट करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरने मनपा प्रशासनाकडे निवेदन देऊन केली आहे.

     

    यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, रामपाल सिंग,महामंत्री प्रज्वलंत कडू,मंडळ प्रमुख संदीप आगलावे,रवी लोणकर, चांद सैय्यद, रवी चाहरे, रुद्रनारायण तिवारी, पुरुषोत्तम सहारे यांची उपस्थिती होती.

     

    CMC chandrapur पावडे म्हणाले, चंद्रपूरमध्ये सुध्दा होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना होऊ शकतात, म्हणून दक्षता घेणे गरजेचे आहे. मुंबई येथील घडलेली दुर्घटना अत्यन्त दुखदायी आहे.

     

    प्रशासनाचा हलगर्जीपणा यास जवाबदार आहे. अनधिकृतपणे मुंबईत ते विशाल होर्डिंग लावण्यात आले.अशी स्थिती येथेही नाकारता येत नाही.करीता, शहरामध्ये ठिकठिकाणी लागलेल्या होर्डिंग्जचे सर्व्हे करून ऑडीट करण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली.

  • Pik vima yadi : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार? – दिनेश चोखारे

    Pik vima yadi : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार? – दिनेश चोखारे

    Pik vima yadi चंद्रपूर : शेतकऱ्यांना माहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये आलेल्या पुरामुळे, तसेच सततच्या पाऊस अतिवृष्टी पावसातील खंड अवकाळी पाऊस, इतर नुकसान  इत्यादी नैसर्गीक आपत्तीने शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाले आहे. अजून पर्यंत नुकसान भरपाई मिळालीच नाही या संदर्भात तात्काळ बैठका लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेश दादापाटील चोखारे यांनी निवेदनातून केली आहे.

    अवश्य वाचा : या दिवशी जाहीर होणार वर्ग 10 व 12 विचा निकाल

    Pik vima yadi सदर निवेदनात म्हटले आहे की, शासन व प्रशासनाच्या आवाहनावरुन खरीप हंगाम २०२३ मध्ये कापुस, सोयाबीन, तुर, ज्वारी इत्यादी पिकाचा विमा १ रु. प्रति हेक्टर योजनेत काढला.

     

    ही बातमी अवश्य वाचा : विद्युत प्रवाहाने वाघ मेला, आणि शेतकऱ्यांने त्या वाघाला कुऱ्हाडीने कापले

    Pik vima yadi चंद्रपूर तालुक्यातील  शेतकऱ्यांना यांना माहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये आलेल्या पुरामुळे, तसेच सततच्या पाऊस अतिवृष्टी पावसातील खंड अवकाळी पाऊस सोनबोनवर आलेले यलोमोझक किळ रोग इत्यादी नैसर्गीक आपत्तीने शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाले आहे.

    विमा नुकसान पुर्व सुचना नियमानुसार ७२ तासात कंपनी कडे ऑनलाईन केली. परंतु नुकसान भरपाई ४ महिने लोटुनहो अजुनही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. विमापिक संरक्षणाकरीता त्याला विलंब करून शेतकऱ्यांना मानसिक त्रास व तालुक्याच्या ठिकाणी विमा चौकशीसाठी हेलपाटा वारंवार चकरा मारुन माहीती मिळत नाही. त्यामुळे आर्थीक नुकसान ही बाब अतिशय गंभीर आहे.

     

    Pik vima yadi सोबतच अनेक शेतकऱ्यांना नुकसानीच्या अल्पमोबदला २००, ५००, १००० रु. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. शासन निर्णया नुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अत्यल्प विमा, दावा रद्द, विमा मिळण्यास विलंब इत्यादी बाबी करीता विमाकंपनी तालुका जिल्हा प्रतिनीधी करुन माहीती होण्याच्या दृष्टिने व शेतकऱ्यांला हक्काचा विमा संरक्षण मिळतांना अन्याय होणार नाही. या करीता अविलंब तक्रार निवारण बैठकित खालील मुद्यांचा समावेश करुन आयोजन करण्यात यावे.

    नदी काठावरील पुराने जुलै, आगष्ट, सप्टेंबर मधिल नुकसान सुचना दिलेल्या व पंचनामा झालेल्या शेतपिकाचा १००% नुकसान भरपाई मोबदला देणे.
    अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या तक्रारदार शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई १ महिण्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.
    चंद्रपूर तालुक्यातील पिकविमा पुर्वसुचना तक्रार जुलै, आगस्ट, सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाई माहीती देणे.

     

    Pik vima yadi पिकविमा पंचनामा सर्वे फार्म व कंपनीने नुकसान भरपाई काढलेली कॅलक्युलेशन शिट (भरपाई रक्कम) तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील पिकविमाधारक शेतकऱ्यांना पाहण्याकरीता उपलब्ध करुन देणे. आदी मागण्याचे निवेदन नुकतेच  चंद्रपूर , बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा, भद्रावती येथील तहसीलदार आणि तालुका पीक विमा तक्रार समिती  अध्यक्ष यांना निवेदन सदर केले आहे.
  • Maharashtra State Board Result Date : या दिवशी जाहीर होणार वर्ग 12 व 10 वीचा निकाल

    Maharashtra State Board Result Date : या दिवशी जाहीर होणार वर्ग 12 व 10 वीचा निकाल

    Maharashtra State Board Result date नुकताच केंद्रीय बोर्ड म्हणजेच सीबीएसई चा निकाल जाहीर झाला होता, त्यामध्ये अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गुणवंतांच्या यादीत स्थान मिळविले. अजूनही महाराष्ट्र राज्य बोर्डाचे निकाल मात्र अजून जाहीर झाले नाही.

    अवश्य वाचा : सतत 3 दिवस तो चंद्रपुरातील शेतकरी करीत होता वाघाचे तुकडे

    Maharashtra State Board Result date मंडळाने दिलेल्या माहितीनुसार इयत्ता दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार आहे.

     

    दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी…

    १. महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत https://mahresult.nic.in किंवा https://msbshse.co.in संकेतस्थळावर जावे.
    २. महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा.
    ३. SSC किंवा HSC निकाल लिंकवर क्लिक करा.
    ४. रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा.
    ५. दहावी किंवा बारावीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसेल.
    ६. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाऊनलोड करता येईल.

    वाचा अवश्य : अवकाळी पावसात पडणाऱ्या विजेपासून असा करा स्वतःचा बचाव

    Maharashtra State Board Result date तसेच शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या निकालाच्या तारखा जाहीर अजून केलेल्या नाहीत. फक्त निकाल कोणत्या आठवड्यात जाहिर होणार आहे हे सांगण्यात आलं आहे.

     

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तारखा या आपल्याला mahahsscboard.in येथे मिळतील.

  • Zilla Parishad High School : शिक्षकाची कायमस्वरूपी नियुक्ती करा – सचिन राजूरकर

    Zilla Parishad High School : शिक्षकाची कायमस्वरूपी नियुक्ती करा – सचिन राजूरकर

    Zilla Parishad High School चंद्रपूर जिल्ह्यातील चकनिंबाळा गावातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी ग्रामस्थ आणि पदाधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून कायम शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

    अवश्य वाचा : काय म्हणता ! चंद्रपुरात 79 लाखांचे चोर बीटी बियाणे जप्त

    Zilla Parishad High School चकनिंबाळा हायस्कूलमध्ये दोन शिक्षक निलंबित झाल्यामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण बिघडले आहे. यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत टाकण्याचा विचार करत आहेत. शाळा बंद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण होईल.

    अवश्य वाचा : यादिवशी होणार मान्सून चे आगमन

    Zilla Parishad High School सध्या तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेले शिक्षक प्रमोद बाभळीकर हे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत आणि त्यांना कायम शिक्षक बनवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शाळेसाठी तीन अतिरिक्त शिक्षकांचीही आवश्यकता आहे.
    गावकऱ्यांनी आणि पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती केली आहे.

     

    शाळेसाठी तीन अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती केली जावी, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद शिक्षण विभागालाही 17 मे रोजी देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, चेकनिंबाला गावातील,अंकुश कौरासे,अशोक बोबडे ,मारोती देवतळे,संजय ऊरकुडे,राम जुनघरे,सचिन आस्वले उपस्थित होते.

  • Chor BT Cotton Seeds : चंद्रपुरात 79 लाखांचे चोर बीटी बियाणे जप्त

    Chor BT Cotton Seeds : चंद्रपुरात 79 लाखांचे चोर बीटी बियाणे जप्त

    Chor BT Cotton Seeds कृषी विभागाच्या भरारी पथकाने चंद्रपूर जिल्ह्यात मोठी कारवाई करीत तब्बल 79 लाख 60 हजारांचे चोर बीटी कापूस बियाणे जप्त केले आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील या शेतकऱ्यांने तब्बल 3 दिवस वाघाचे तुकडे केले

    चंद्रपूर जिल्ह्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करीत लाखोंचे चोर बीटी बियाणे पकडले आहे.
    पहिल्या कारवाईत 15 मे रोजी रात्रीच्या सुमारास मौजा नवेगाव तालुका पोम्भूर्णा येथे गुप्त माहितीच्या आधारे संशयास्पद पक्क्या घरात धाड मारीत त्याठिकाणी चोर बीटी कापूस बियाणे एकूण 80.30 किलोग्राम किंमत एकूण 2 लाख तीन हजार सहाशे चाळीस रुपयांचे जप्त करण्यात आले.

    अवश्य वाचा : पावसात पडणाऱ्या विजेपासून असा करा स्वतःचा बचाव

    Chor BT Cotton Seeds दुसऱ्या कारवाईत 16 मे रोजी रात्री मौजा भीमनी येथे गुप्त माहितीच्या आधारे नीलकंठ गिरसावळे यांच्या शेतातील घरात चोर बीटी कापूस बियाणे एकूण 39.88 क्विंटल एकूण किंमत 76.57 लाख रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई 17 मे पहाटे पर्यंत सुरूच होती.

     

    दोन्ही कारवाई मध्ये एकूण 79 लाख 60 हजार सहाशे चाळीस रुपयांचे चोर बीटी कापूस बियाणे जप्त करण्यात आले, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, चंद्रशेखर कोल्हे, लकेश कटरे, श्रावण बोढे, महेंद्र डाखरे, विवेक उमरे, चंद्रकांत निमोड, जुमनाके आदींनी केली.

  • Risk of lightning in rain : पावसात पडणाऱ्या विजेपासून असा करा स्वतःचा बचाव

    Risk of lightning in rain : पावसात पडणाऱ्या विजेपासून असा करा स्वतःचा बचाव

    Risk of lightning in rain आजकाल हवामानात बदल सतत होत आहे, उन्हाळ्यात पावसाळा व हिवाळ्याचा अनुभव नागरिक घेत आहे, सतत होणारा हा बदल हवामान तज्ञांच्या मते धोक्याची घंटा होऊ शकतो, म्हणून आपणही या हवामानात आपली काळजी घ्यावी.

    अवश्य वाचा : राज्यात या दिवशी होणार मान्सून चे आगमन

    विजा कडाडणे आपण थांबवू शकत नाही. पण विजा कोसळून होणारी प्राणहानी मात्र योग्य ती खबरदारी बाळगल्यास आपण आवश्य थांबवू शकतो.

     

    आकाशात विजा चमकत असताना घ्यावयाची खबरदारी

     

    Risk of lightning in rain – शेतात काम करीत असताना शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्यावा.
    – शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा.
    – पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.
    – ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तत्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे.
    – पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर यावे.

     

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील या शेतकऱ्यांने कुऱ्हाडीने केले वाघाचे तुकडे

    Risk of lightning in rain झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे.
    – एखादे उंच झाड (जसे शेतातील बैठकीचे झाड) सुरक्षित ठेवायचे असल्यास, वृक्षाच्या उंच फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे.
    – पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपल्या घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी.
    – आपले घर, शेत इत्यादींच्या जवळपास कमी उंचीची झाडे लावावीत.
    – जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा.
    – वृक्ष, दलदलीचे ठिकाण तथा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहा.
    – मोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा एखाद्या छोट्या (कमी उंचीच्या) झाडाखाली आसरा घ्यावा.
    – असे शक्य नसल्यास जमिनीपासून खालील खोलगट ठिकाणी गुडघ्यात वाकून बसा. जर आधीच खोलगट भागात असाल तर वरती येवू नका.
    – चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच रहावे.

     

    आकाशात विजा चमकत असताना खालील गोष्टी टाळा

    – खुल्या मैदानात उभे राहू नका. विजा सर्वात जास्त खुल्या मैदानात पडतात.
    – झाडाखाली उभे राहू नका. उंच ठिकाणी, झाडावर चढू नका.
    – विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळ उभे राहू नका.

     

    Risk of lightning in rain  गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपण घालू नका, कारण ते विजेला आकर्षित करते.
    – दोन चाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा. अशावेळी वाहनातून प्रवास करू नका.
    – वाहनाच्या बाहेर थांबणे फारच आवश्यक असल्यास धातूचे कोणतेही उपकरण बाळगू नका.
    – एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तीमध्ये किमान १५ फूट अंतर राहील याची काळजी घ्या.
    – धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका.
    – पाण्याचा नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका, शिवाय त्यापासून दूर रहा.
    – विजेवर चालणारे यंत्र तसेच धातूपासून बनलेल्या वस्तू जसे कृषी यंत्र इत्यादीपासून दूर रहा.
    – प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनीचा वापर करू नका. मोबाईलचा वापर टाळा.

     

    आकाशात विजा चमकत असताना जीव वाचवणारा नियम

     

    Risk of lightning in rain विजेचा प्रकाश आणि आवाज यात ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर तुम्हाला विजेपासून धोका आहे. अशावेळी तुमच्यावर वीज पडण्याची शक्यता ८०% आहे. वीज तुमच्या आसपासच्या पाच किमी अंतरावर पडत आहे, अशा वेळेस सुरक्षित जागेचा आसरा घ्या. शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी ३० मिनिटांनी घराच्या बाहेर पडावे.

     

  • Lok Sabha Election Counting : अशी असणार चंद्रपूर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी

    Lok Sabha Election Counting : अशी असणार चंद्रपूर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी

    Lok Sabha Election Counting निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी हा अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा टप्पा आहे. किंचीतही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह लागू शकते. त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचा-यांनी अतिशय गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

    अवश्य वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील या शेतकऱ्यांने वाघाचे कुऱ्हाडीने तुकडे करीत जाळले

    नियोजन सभागृह येथे आज (दि.16) मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा घेतांना ते बोलत होते. मंचावर सहायक जिल्हाधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, शिवनंदा लंगडापुरे, नितीन हिंगोले आदी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : 17 मे पासून RTE अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

    Lok Sabha Election Counting 19 एप्रिल 2024 रोजी 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक घेण्यात आली असून मतदानाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, 4 जून रोजी तडाळी येथील वखार महामंडळाच्या गोडावून येथे मतमोजणी होणार आहे. हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणतीही चूक किंवा हलगर्जीपणा होता कामा नये. निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व इतर सर्वजणांचे अतिशय बारकाईने या प्रक्रियेवर लक्ष असते. तसेच उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींना विश्वासात घेऊन मतमोजणीची प्रक्रिया समजावून सांगणे / दाखविणे आवश्यक आहे.

     

    Lok Sabha Election Counting पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणेच आणि मॅन्युअलचा अभ्यास करून अतिशय पारदर्शक आणि अचूकपणे मतमोजणी करावयाची आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचा-याने गोपनीयता पाळणे आवश्यक असून कोणीही स्वत:चे मत व्यक्त करू नये तसेच प्रक्रियेची माहिती इतरांना देऊ नये. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अधिकारी – कर्मचा-यांनी तटस्थ असणे गरजेचे आहे. मतमोजणी केंद्रामध्ये अधिकारी – कर्मचारी व इतरांना मोबाईल, लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास परवानगी नाही. संपूर्ण प्रक्रियेसाठी तीनवेळा रँडमायझेशन होणार असून ईव्हीएम व्हीव्हीपॅट मतमोजणी बाबत सर्वांनीच तयारी करून ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

     

    यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांनी सादरीकरण केले. तसेच ईव्हीएम मतमोजणीकरीता प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबल, पोस्टल बॅलेटकरीता 9 टेबल आणि ईटीपीबीएस मतमोजणी करीता 8 टेबल राहणार आहे. 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेट च्या मतमोजणीला सुरवात होणार असून त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.