Blog

  • Chandrapur police station : शहरात एकाच दिवशी 2 मृतदेह आढळल्याने खळबळ

    Chandrapur police station : शहरात एकाच दिवशी 2 मृतदेह आढळल्याने खळबळ

    Chandrapur police station चंद्रपूर शहरात 24 मे रोजी एकाच दिवशी दोन विविध ठिकाणी अज्ञात इसमांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली असून सध्या पोलीस विभाग मृतदेहाची ओळख पटवित आहे.

    यशस्वी व्हायचंय तर 12 वी नंतर हे कोर्स करा

    मिळून आलेल्या मृतदेहाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे : वय अंदाजे 30 ते 35 वर्ष, रंग काळा सावळा, चौकड्याचा शर्ट अंगात परिधान, निळ्या रंगाचा फुल पॅन्ट, उंची 5 फूट 4 इंच, उजव्या हातावर नागाचे चित्र गोदवले आहे, याबाबत कुणाला काही माहिती मिळताच त्यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय मुके मोबाईल क्रमांक 9923401065 व रमेश मेश्राम – 8459107310 यांच्या संपर्क करावा.

    अवश्य वाचा : राज्यातील मुलींना मिळणार उच्चशिक्षण अगदी मोफत

    Chandrapur police station दुसऱ्या मृतदेहाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : वय अंदाजे 50 ते 55 वर्ष, रंग काळा सावळा, चौकड्याचा फुल शर्ट, काळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट, उंची 5 फूट 3 इंच, पांढरे केस या वर्णानाच्या व्यक्ती बाबत काही माहिती मिळाल्यास त्यांनी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे ASI महेश केळझरकर 8329873064 वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • Sewer Line cleaning : ती गटार लाईन कधी साफ होणार?

    Sewer Line cleaning : ती गटार लाईन कधी साफ होणार?

    गुरू गुरनुले

    Sewer Line cleaning मूल – यावर्षीचा पावसाळा तोंडावर आला आहे. यंदा मान्सून लवकरच बरसणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. हे लक्षात घेता मूल नगरपरिषद प्रशासन मान्सूनपूर्व तयारीला लागायला पाहिजे होते. कारण मागील वर्षी नगरात आलेली परिस्थिती पाहता यंदा मात्र शहरातून धावणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासोबत् धावणाऱ्या गटरलाईनची सफाई हा विषय तेवढाच महत्वाचा असून पावसाळ्यातील अडगळ थाबविणारा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

    अवश्य वाचा : राज्यातील मुलींना मिळणार उच्चशिक्षण अगदी मोफत

    Sewer Line cleaning गत अनेक वर्षांपासून सफाईसाठी तरसलेल्या मूल शहरातुन धावणाऱ्या चंद्रपूर- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाचे दोन्ही कडेला बांधण्यात आलेल्या या मोठया गटरलाईनला आजवर दुर्लक्षीत ठेवण्यात आले आहे. व याचा मोठा फटका अनेकदा निवासी घरांना बसला आहे. अनेक घरात पाणी घुसले काही कुटुंबीयांना तीन दिवस घराच्या बाहेर कुटुंब हलवावे लागले. मूल शहरातून महामार्गासोबत् धावणारी गटरलाईन अंदाजे एक चतुर्थांस माती व केरकचऱ्याने भरलेली आढळते.

     

    या गटरलाईन मधून संपुर्ण शहरातील सांडपाण्याचा निचरा तलावांमध्ये होतो. पावसाळ्यातील शहराच्या चहूबाजूने येणाऱ्या पावसाच्या पाण्याला सामावून घेण्याचे महत्वाचे काम ही गटरलाईन करते. आधीच ही गटरलाईन पावसाचे पाणी वाहून नेण्यास तांत्रिकदृष्टया सक्षम नसल्याची ओरड आहे. अशा स्थितीत गटरलाईन तुडूंब भरून जोडलेल्या नाल्यांचे पाणी थोपून शहरातील मोठया परिसरात पसरण्याची भिती निर्माण होत असते.

    महत्वाची माहिती : 12 वी चा निकाल लागला, आता कोणता अभ्यासक्रम निवडणार? 

    Sewer Line cleaning गेल्या २०२०, व २०२१ मध्ये शहरातील शेकडो घरांमध्ये जमा झालेले पुराचे घाण पाणी घुसून सतत तीन दिवस पाणी जमा होऊन जिवघेणी परीस्थिती निर्माण झाली होती. अखेर शहराबाहेरून वन विकास महामंडळाचे क्षेत्रातून भरमसाठ अतिरीक्त पाणी अर्धा कि.मी. नाला काढून परस्पर बाहेर काढावे लागले होते. हे विसरता येणार नाही.

     

    मूल शहरातून अंदाजे एक ते दिड कि.मी. लांबींची ही गटरलाईन असून यावर संपुर्ण अतिक़मण झाले आहे. यावर हाटेल्स,खानावळ,हार्डवेअर,फर्नीचर वर्क्स, पानठेले,बियरबार बसलेले असून दररोज मोठया प्रमाणात जमा झालेला केरकचरा या गटरलाईन मध्ये टाकला जातो. तसेच महामागांवरील बांधकामासाठी वापरण्यात येणारे रेती,माती,विटांचे तुकडे या गटरलाईन मध्येच साठवले जात आहे. अशा स्थितीत पावसाळ्यापूर्वी या गटरलाईनची सफाई मोहीम नगर परिषद प्रशासनाने तात्काळ राबविली नाही तर पावसाळ्यात पाणी चौफेर पसरून जिवघेणी स्थिती निर्माण होईल हे निश्चित असल्याची भिती व्यक्त होताना दिसते.

     

    Sewer Line cleaning न.प. मूल चा आरोग्य व स्वच्छता विभाग मान्सूनपूर्व कामे नेटाने करीत असला तरी यंदा मात्रं या गटरलाईनची पूर्ण सफाई अगत्याने करावी लागणार आहे.
    मूल न.प.प्रशासक व न.प. मुख्याधिकारी यांनी हा विषय गंभिरतेने घेतल्यास येणारा पावसाळा शहर वासियांना अडचणीत टाकणारा ठरणार नाही असे जाणकारांनी बोलून दाखविले आहे.

  • Animal census in tadoba : ताडोब्यात सुरू झाली प्राणी गणना

    Animal census in tadoba : ताडोब्यात सुरू झाली प्राणी गणना

    Animal census in tadoba चंद्रपूर – आज 23 मे ला बुध्द पौर्णिच्या रात्री लखलत्या चंद्रप्रकाशात ताडोबातील बफर व कोअर झोनमध्ये वन्यप्राणी गणना होणार आहे. दोन्ही झोनमध्ये वनविभागाने तयारी पूर्ण केली असून पर्यटक व अधिकारी सज्ज झाले आहेत. बफर मध्ये 75 मचाणी वरून 150 पर्यटक प्राणी गणना निसर्गानुभव घेणार आहेत. तर कोअर मध्ये एकूण 76 मचाणीवरून अधिकारी स्वत:च प्राणी गणना करणार असल्याची माहिती ताडोबाच्या सुत्रांनी दिली आहे.

    महत्वाची माहिती – आता राज्यातील सर्व मुलींना मिळणार उच्चशिक्षण मोफत

     

    Animal census in tadoba बुध्द पौर्णिमेला रात्री चंद्र हा पूर्ण निघतो. लख्ख स्पष्ट प्रकाश देतो. ह्या प्रकाशात वन्यप्राण्यांच्या हालचाली स्पष्टपणे टिता येतात. त्यामुळेच परंपरागत काळापासून वन्यप्राणी गणनेची चालत गणना बुध्द पौर्णिमेच्या रात्री न चुकता केली जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प देशभरात व्याघ्र दर्शनाकरीता प्रसिध्द असे ठिकाण आहे.

    अवश्य वाचा : 12 वी नंतर हे कोर्स करा, मिळेल भरघोस पगार

    आज गुरूवारी (23 मे) ला सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ताडोबातील बफर व कोअर झोनमध्ये प्राणी गणना पार पडणार आहे. बुध्द पौर्णिमेच्या रात्री होणारी वन्यप्राणी गणना हा एक निसर्गानुभवाचा कार्यक्रम आहे. बफर झोनमध्ये वन्यप्राणी गणना हि निसर्ग,पर्यटनप्रेमी किंवा अशासकीय संस्था यांचे माध्यमातून केली जाते. यानिसर्गानुभवाकरीता ऑनलाईन व ऑफलाईन प्रवेश देण्यात आले. त्यामध्ये 295 पर्यटनप्रेमींनी बुकींग केली असून त्यापैकी 150 पर्यटनप्रेमींना प्रत्यक्ष प्राणी गणनेची संधी मिळाली आहे.

     

    Animal census in tadoba ही प्राणी गणना पाणवट्याजवळ किंवा पाण्याच्या ठिकाणी केली जाते. बफर झोनमध्ये 75 मचानी उभारण्यात आल्या आहेत. मचानी ह्या लोखंडी तयार करण्यात आलेल्याआहेत. एका मचानीवर दोन व्यक्ती बसून त्यामध्ये एक पर्यटनप्रेमी व एक वनविभागाचे गाईड राहतील. प्रगणनेकरीता आवश्यक साहित्य वनविभागाचे वतीने पुरविले आहे.

     

    ताडोबातील बफर झोनमध्ये मोहूर्ली, मुल, चंद्रपूर, शिवणी, पळसगाव व खडसंगी आदी 6 रेंज मध्ये ही प्रगणना होईल. आज गुरूवारी सायंकाळी 6 वाजता गणना सुरू होईल. उद्या शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 12 तास ही प्रगणना चालेल. त्यानंतर निसर्गप्रेमींना त्या ठिकाणावरून परत जावे लागेल. तत्पूर्वी या ठिकाणी 16 प्रवेशद्वारावरून निसर्गानुभवाचा आनंद घेणाऱ्या 160 पर्यटनप्रेमींना वनविभाग आज सायंकाळी साडेपाचवाजेपर्यंत गणना होणाऱ्या मचाणीच्या ठिकाणापर्यंत पोहचविणार आहे.

     

    Animal census in tadoba बुध्द पौर्णिमेच्या रात्री होणारी वन्यप्राण्यांच्या गणनेतील माहिती फक्त डाटा सकंलन म्हणून करण्यात येते, त्या माहितीच्या आधारे वन्यप्राण्यांची आकडेवारी घोषीत केली जात अशी माहिती ताडोबा प्रशासनाने दिली आहे. गणना करणाऱ्या निसर्गप्रेमींच्या सुरक्षेकरीता वनाधिकारी उपस्थित राहतील. निसर्गप्रेमींना भोजन व अन्य सुविधा स्वत: करावी लागणार आहे.

     

    कडक उन्हाळ्याचे दिवस आहे. चंद्रपूरचा पारा 42 अंशापार गेला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती पाणी पिण्यासाठी पाणवट्याकडे होणार असून निसर्गप्रेमींना हा अनुभव प्रत्यक्षात पाहता येणार आहे. पाणवट्याशिवाय नैसर्गीक पाण्याच्या स्त्रोतांकडेही वन्यप्राणी भटकंती करणार असल्याने पर्यटनप्रेमींना रात्रभर जागून निसर्गानुभवाचा आनंद घेऊन वन्यप्राण्यांची गणना करण्याची संधी मिळाली आहे. या निसर्गानुभवाचा खरा उदेश्य म्हणजे वन्यप्राण्यांबद्दल आत्मीयता निर्माण करणे, वन्यप्राण्यांबाबत जनजागृती करणे हा आहे.

     

     

    Animal census in tadoba ताडोबातील कोअर झोन हा अतीसंवेदनशील भाग आहे. त्यामुळे कोअर झोनमध्ये वन्यप्राण्यांची गणना ही ताडोबातील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीच स्वत: करणार आहे. याकरीता कोअर झोन मध्येही मचानी उभारण्यात आल्या बसून अधिकारी कर्मचारी सज्ज झाले आहेत. दोन्ही झोनमध्ये एकाच वेळी आज सायंकाळी 6 ते उद्या सकाळी 6 वाजतापासून वन्यप्राण्यांची गणना होईल.

  • Free higher education for girls : मुलींना आता उच्चशिक्षण मिळणार अगदी मोफत

    Free higher education for girls : मुलींना आता उच्चशिक्षण मिळणार अगदी मोफत

    Free higher education for girls 12 वी चा निकाल लागल्यावर पालकांची पुढच्या प्रवेशासाठी लगबग सुरू होते, कोणता कोर्स करायचा? खर्च किती? याबाबत पालक जणू कचाट्यात पडतात, शिक्षणाचे शुल्क जास्त असले की पालक कमी खर्च असलेल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतात, मात्र आता पालकांना ही चिंता सोडावी लागणार आहे, कारण आता मुलींना उच्चशिक्षण अगदी मोफत मिळणार आहे, कसं सविस्तर वाचा.

    अवश्य वाचा : विज्ञान शाखेच्या मुलांनी या कोर्स ची करावी निवड, मिळेल भरघोस पगार

    Free higher education for girls बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील २० लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे. त्यात अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह तब्बल ६४२ कोर्सेसचा समावेश असून त्यासाठी राज्य शासन दरवर्षी १८०० कोटी रुपयांचा भार उचलणार असून या निर्णयाची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) होणार आहे.

    महत्वाची माहिती : घरी बसून क्लिक करा, आणि मिळवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र

    बारावीनंतर पुढील उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या कमी होत असल्याने राज्य सरकारने उच्चशिक्षणातील तब्बल ६४२ कोर्सेसचे शुल्क शासन भरणार आहे.

     

    लक्षात ठेवा..! राज्य शासनाचा हा निर्णय केवळ मुलींसाठीच लागू असणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित उच्च महाविद्यालयांमधील तब्बल २० लाख मुलींसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. हुशार असूनही आर्थिक अडचणींमुळे उच्चशिक्षण घेता येत नव्हते ही अडचण आता कायमचीच दूर होणार आहे.

     

    निकालानंतर प्रवेशावेळी फी भरावी लागणार का?

     

    Free higher education for girls इयत्ता बारावीनंतर प्रवेश घेतानाच शैक्षणिक शुल्क भरावे लागते. पण, आचारसंहितेनंतर होणाऱ्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये “मुलींना उच्चशिक्षण मोफत’चा अंतिम निर्णय होणार असल्याने मुलींना प्रवेश देखील मोफच मिळेल हे निश्चित आहे. पण, हा निर्णय कोणत्या मुलींसाठी (जात संवर्ग) लागू असेल व त्यासाठी उत्पन्नाची अट किती असेल, यासंबंधीचा निर्णय त्या कॅबिनेटमध्येच होणार आहे.

  • Ab chai pe charcha : चंद्रपुरात ऑटो चालकांसोबत चाय पे चर्चा

    Ab chai pe charcha : चंद्रपुरात ऑटो चालकांसोबत चाय पे चर्चा

    Ab chai pe charcha चंद्रपूर : बुद्ध पौर्णिमा यानिमित्त चंद्रपूरात प्रियदर्शनी चौक पाणी टाकी चौक येथे अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने महेश मेढे यांचे कडून ऑटो संघटनेचे चालक मालक यांना छत्री वाटप करण्यात आले.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात मनसेने दिला खळखळखट्याक चा इशारा

    त्यानतंर त्याच्यासोबत चहाचा आस्वाद घेत पदाधिकार्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

    Ab chai pe charcha    जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला.

    महत्वाची बातमी : यशस्वी व्हायचंय तर 12 वी नंतर हे कोर्स करा

    Ab chai pe charcha हा दिवस बुद्ध जयंती म्हणून देखील साजरा केला जातो, बुद्ध पौर्णिमा यानिमित्त चंद्रपूरात पाणी टाकी चौक येथे महेश मेढे यांचे कडून छत्री वाटप करण्यात आले. त्यानतंर त्याच्यासोबत चहाचा आस्वाद घेत पदाधिकार्यासोबत चर्चा करताना विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

    यावेळी अवंती – अंबर  सामाजिक प्रतिष्ठानचे महेश मेंढे यांचे सह ऑटो संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

  • Western coalfields limited tenders : चंद्रपूर मनसे कामगार सेनेचा कामगारांचे शोषण करणाऱ्या कंपन्यांना इशारा

    Western coalfields limited tenders : चंद्रपूर मनसे कामगार सेनेचा कामगारांचे शोषण करणाऱ्या कंपन्यांना इशारा

    Western coalfields limited tenders चंद्रपूर : घुग्घूस-वणी एरियाअंतर्गत वेकोलितील ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडून चालक, वाहकांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात आहे. अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्या स्थानिकांना डावलून परप्रांतीय कामगारांना रोजगार देत असल्याने या कंपन्यांची चौकशी करून संंबंधित कंत्राटी कंपन्याचे कंत्राट रद्द करण्याची मागणी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

    ही बातमी सविस्तर वाचा : 12 वी पास झाल्यावर पुढे काय? यशस्वी व्हायचंय तर हे कोर्स करा

    Western coalfields limited tenders वेकोलितील कोळसा वाहतुकीचे कंत्राट अनेक लहानमोठ्या कंपन्यांना देण्यात आले आहे. बहुतांश कंपन्या या बाहेर राज्यातील आहेत. त्यामुळे या कंपन्या स्थानिकांना डावलून परप्रांतीय चालक, वाहकांना काम देत आहेत. स्थानिकांना रोजगार देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शिवाय कामगारांना वेतनपत्र दिले जात नाही. पीएफ कपात करून वेतन दिले जाते. परंतु, अद्याप कामगारांना त्यांचे पीएफ खातेक्रमांक माहिती नाही.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील अपघात प्रवन स्थळ, वरोरा नाका चौक

    Western coalfields limited tenders कंपन्यांनी पीएफ खाते क्रमांकच दिले नाहीत, अशी माहिती यावेळी उपस्थित कामगारांनी दिली. आठ तासांची ड्युटी असताना १२ तास ड्युटी करून घेतली जाते. मात्र, अतिरिक्त कामाचे वेतन दिले जात नाही. वकोलिकडून पूर्ण वेतन उचलून कामगारांना पूर्ण वेतन दिले जात नाही. एका मजुराने जाब विचारल्यास त्याला कामावरून काढले जाते किंवा कामावरून कमी करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे कामगारांमध्ये भीती आहे.

    वेकोलिने सरविजय लॉजिस्टिक प्रा.लि., हरिराम गोदरा, हाशमी प्रा. लिमिटेड, कौशलसिंग ट्रान्सपोर्ट कंपनी, चड्डा ट्रान्सपोर्ट, बीकेके ट्रान्सपोर्ट, शिवशंभू ट्रान्सपोर्ट कंपनी या कंपन्यांकडे कोळसा वाहतुकीचे कंत्राट आहे. या कंपन्यांमध्ये शेकडो चालक काम करीत आहेत. मात्र, या कंपन्यांकडून चालकांचे शोषण होत असल्याचा आरोप अमन अंधेवार यांच्यासह चालक कामगारांनी केला आहे. पत्रकार परिषदेला नरेश वासनिक, ॲड. अजित पांडे, ॲड. महेंद्र विरोजवार, राजू शेट्टी आदींसह शेकडो चालक कामगार उपस्थित होते.

  • data science course after 12th : विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे

    data science course after 12th : विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे

    data science course after 12th 12 वी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सच्या शोधात असतात. तुम्हाला टेक्नॉलॉजीची आवड असेल आणि तुम्ही जर कॉम्प्युटर सायन्स कोर्सेसच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील खुनी पुलिया जवळ पुन्हा अपघात

    संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी मध्ये B.Tech (B.Tech in Computer Science and Engineering)

    हा कोर्स केल्यानंतर तुम्ही सिस्टीम, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रोग्रॅमिंगचे विस्तृत ज्ञान मिळवू शकता. यामध्ये पदवीधरांना वार्षिक 10 लाख रुपयांपर्यंत पगार मिळण्याची शक्यता आहे; तसेच आयटी, स्टार्टअप्स आणि रिसर्चमध्येही प्रचंड वाव आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर मनपा झाली ऑनलाइन

    बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग इन कॉम्प्युटर सायन्स

    B.E. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सिस्टीम शिकवते. नेटवर्क इंजिनीअर, सॉफ्टवेअर इंजिनीअर किंवा डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर अशा पदांवर पदवीधरांना वार्षिक ४ ते ८ लाख रुपये सुरुवातीचे वेतन मिळू शकते. या कोर्समध्ये आयटी, मॅन्युफॅक्चरिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत.

    महत्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यातील 200 बिअर बार बंद होणार

    B.Sc संगणक विज्ञान (B.Sc in Computer Science)

    data science course after 12th प्रोग्रामिंग हे अल्गोरिदम आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित करतात. ग्रॅज्युएट सॉफ्टवेअर / सॉफ्टवेअर डेटा ॲनालिस्ट म्हणून भूमिका बजावणारे वेब डेव्हलपर्स वर्षाला ३ ते ६ लाख रुपये कमावतात. येथे आयटी आणि संशोधनात अफाट वाव आहे.

    महत्वाची माहिती : मुलींना उच्चशिक्षण मिळणार अगदी मोफत

    B.Tech माहिती तंत्रज्ञान (B.Tech in Information Technology)

    आयटीमध्ये संगणक प्रणाली, सॉफ्टवेअर विकास आणि नेटवर्क प्रशासन यांचा समावेश आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर किंवा सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट म्हणून पदवीधरांना वार्षिक ४ ते ९ लाख रुपये पगार मिळू शकतो. आयटी, फायनान्स आणि सरकारी क्षेत्रात हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करीअरच्या भरपूर संधी आहेत.

     

    बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स (Bachelor of Computer Applications (BCA)

    data science course after 12th या शिक्षणात BCA कंप्यूटर ॲप्लिकेशन्स आणि प्रोग्रामिंग भाषांवर जोर देते. सॉफ्टवेअर टेस्टिंग, वेब डेव्हलपमेंट किंवा सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन सारख्या पदांवर पदवीधरांना वार्षिक अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. यामध्ये आयटी कंपन्या, सरकारी संस्था आणि ई-कॉमर्स कंपन्यांचा समावेश आहे.

     

    B.Sc माहिती तंत्रज्ञान (B.Sc in Information Technology)

    आयटीमध्ये बीएस्सी संगणक नेटवर्क, प्रोग्रामिंग आणि सिस्टम विश्लेषणावर लक्ष केंद्रित करते. आयटी कन्सल्टंट, सिस्टीम ॲनालिस्ट किंवा डेटा मॅनेजर म्हणून पदवीधरांना वार्षिक ३ ते ६ लाख रुपये सुरुवातीचे वेतन मिळू शकते. आयटी, फायनान्स आणि कन्सल्टन्सी इंडस्ट्रीमध्ये या कोर्सला भरपूर वाव आहे.

     

    B.Sc डेटा सायन्स (B.Sc in Data Science)

    B.Sc डेटा विश्लेषण, एमएल आणि सांख्यिकीय मॉडेलिंगवर लक्ष केंद्रित (Career After 12th) करतात. डेटा ॲनालिस्ट, सायंटिस्ट किंवा बीआय ॲनालिस्ट म्हणून पदवीधरांना वर्षाला ५ ते १० लाख रुपये मिळतात. ॲनालिटिक्स आणि एआय उद्योगांमध्ये प्रचंड क्षमता आहे.

     

    आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence)

    data science course after 12th AI मध्ये B.Sc मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि रोबोटिक्सवर भर दिला जातो. एआय इंजिनीअर, रोबोटिक्स स्पेशालिस्ट किंवा डेटा ॲनालिस्ट म्हणून पदवीधरांना वार्षिक ५ ते १२ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. एआय रिसर्च, ऑटोमेशन आणि टेक कंपन्यांमध्ये या कोर्सला अधिक वाव आहे.

     

    B.Sc सॉफ्टवेअर(B.Sc. Software)

    हा अभ्यासक्रम अभियांत्रिकी पद्धती, कोडिंग आणि प्रकल्प व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतात. सॉफ्टवेअर इंजिनीअर, डेव्हलपर्स किंवा टेस्टर म्हणून पदवीधरांना वर्षाला साडेतीन ते सात लाख रुपये मिळतात.

     

    सायबर सिक्युरिटीमध्ये B.Sc (B.Sc in Cyber Security)

    या अभ्यासक्रमात नेटवर्क सिक्युरिटी, एथिकल हॅकिंग आणि मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित केले जाते. सायबर सुरक्षा तज्ज्ञ, अधिकारी किंवा प्रवेश परीक्षक म्हणून पदवीधरांना वर्षाकाठी चार ते आठ लाख रुपये मिळतात. सायबर सिक्युरिटी कंपन्या, सरकार आणि फायनान्समध्ये उमेदवारांना चांगल्या संधी आहेत.

  • Warora Naka Chowk Chandrapur : चंद्रपुरातील अपघातप्रवण स्थळी पुन्हा अपघात

    Warora Naka Chowk Chandrapur : चंद्रपुरातील अपघातप्रवण स्थळी पुन्हा अपघात

    Warora Naka Chowk Chandrapur 3 दिवसांपूर्वी वरोरा नाका चौकात मालवाहू ट्रक थेट डिव्हायडर वर चढला होता, आता 22 मे ला रात्री 9.15 वाजता एक हायवा ट्रक पुन्हा रस्त्याच्या मध्ये असलेल्या डिव्हायडर वर चढला, यामध्ये सुदैवाने काही जीवित हानी झाली नाही, जोपर्यंत याठिकाणी कुणाचा जीव जाणार नाही तोपर्यंत प्रशासन मुकदर्शक बनून राहणार असे चित्र निर्माण झाले आहे.

    महत्वाची बातमी : दारू सोडवण्यासाठी युवक गेले मात्र औषध पिल्यावर त्यांचा मृत्यू झाला

    Warora Naka Chowk Chandrapur वरोरा नाका उड्डाणपूलावर आधी अनेक अपघात झाले, अपघातात मृत नागरिकांचा आकड्याने पन्नाशी गाठली त्यानंतर त्रुटीपूर्ण पुलाची दुरुस्ती करण्यात आली, अपघात आता कमी झाले मात्र पुलाच्या खाली मात्र ट्रक पलटी, होणे डिव्हायडर चढणे हे प्रकार आता वाढत आहे.

    घरबसल्या चंद्रपूर मनपाच्या या सेवांचा लाभ घ्या

    Warora Naka Chowk Chandrapur Mh34AB9126 हा हायवा ट्रक चंद्रपूरच्या दिशेने जात होता, मात्र आज वादळी वारा व पाऊस सुरू असल्याने वाहन चालकाला रस्त्याच्या मध्ये असलेला डिव्हायडर न दिसल्याने ट्रक थेट अतिवेगात डिव्हायडर वर चढला.

    विवाह प्रमाणपत्र काढा ऑनलाइन, या स्टेप्स करा फॉलो

    वरोरा नाका चौकात मागील अनेक दिवसांपूर्वी सिग्नल लावण्यात आले मात्र अद्याप ते सुरू झाले नाही, बंद अवस्थेत असलेला सिग्नल उदघटनाच्या प्रतीक्षेत आहे.

     

    मे महिन्यात तब्बल 3 अपघात या पुलाखाली झाले असून ते आजही सतत सुरूच आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक विभाग यावर काही ठोस उपाययोजना करताना दिसून येत नाही आहे.

    मोठा अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येणार काय? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे.

  • overcoming alcohol addiction : दारू सोडायची आहे? आधी हे वाचा

    overcoming alcohol addiction : दारू सोडायची आहे? आधी हे वाचा

    overcoming alcohol addiction
    आजची तरुणपिढी विविध व्यसनाच्या आहारी जात असल्याने त्यांचं आयुष्य उध्वस्त होत आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात व्यसन सोडण्यासाठी गेलेल्या युवकांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

    अवश्य वाचा : तर चंद्रपूर जिल्ह्यातील 200 बिअर बार बंद होणार

    overcoming alcohol addiction भद्रावती तालुक्यातील वडेगाव(गुळगाव) येथील तरुणांनी दारू सोडण्याची औषध घेतली असता काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागले व त्याचदिवशी त्यांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे.

    महत्वाची : घरबसल्या काढा विवाह नोंदणी प्रमाणपत्र

    गावातील 19 वर्षीय सहयोग सदाशिव जीवतोडे, 26 वर्षीय प्रतीक घनश्याम दडमल ही मृतकाची नावे आहे तर 45 वर्षीय सदाशिव पुंजाराम जीवतोडे व 35 वर्षीय सोमेश्वर उद्धव वाकडे हे सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

    लवकरचं होणार मान्सूनचे आगमन

    सदाशिव जीवतोडे व त्यांच्या 19 वर्षीय सहयोग या मुलाला दारूचे अतिव्यसन जडले होते, घरातील दोघे दारूच्या आहारी गेल्याने कुटुंबातील वातावरण बिघडले होते.

     

    overcoming alcohol addiction त्यासाठी सदाशिव जीवतोडे, सहयोग जीवतोडे यांच्यासह प्रतीक दडमल व सोमेश्वर वाकडे यांनी दारू सोडण्याचा निर्णय घेतला, 21 मे रोजी चौघे वर्धा जिल्ह्यातील शेडेगाव येथे शेळके नामक वैद्याकडे गेले असता त्यांनी चौघांना दारू सोडण्याचे औषध दिले, चौघांनी ते औषध तिथे घेत आपल्या गावाची वाट धरली, मात्र काही वेळात औषध घेतल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
    चौघेही त्याच अवस्थेत आपल्या स्वगावी सायंकाळी दाखल झाले, मात्र त्यांची अस्वस्थता वाढल्याने त्यांना भद्रावती येथील खाजगी रुग्णालयात नेत असताना सहयोग व प्रतीक चा वाटेतच मृत्यू झाला.

     

    overcoming alcohol addiction विशेष म्हणजे दोघांचा मृत्यू झाल्यावर गावातील नागरिकांनी दोघांचे मृतदेह गावात नेत अंत्यसंस्काराची तयारी केली, दोघांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची बाब भद्रावती पोलिसांना कळल्यावर ते सरळ वडेगाव येथे दाखल झाली, व दोघांचे मृतदेह शवविच्छेदन साठी रुग्णालयात पाठविण्यात आले, शवविच्छेदन चा अहवाल आल्यावर पोलीस पुढची कारवाई करणार आहे.

    पोलीस भरती मध्ये हा नियम ठरणार अडसर

    याबाबत अधिक माहिती पोलिसांनी दिली असता त्यांनी सांगितले की आम्हाला ज्यावेळी दोघांचा मृत्यू झाला असल्याची बाब कळली त्यावेळी आम्ही चौकशी केली असता गावातील चार जण दारू सोडण्याचे औषध घेण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेडेगाव येथे गेले त्यांनी त्याठिकाणी औषध घेत गावाची वाट धरली मात्र त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने, रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला, सध्या संपूर्ण चौकशी करीत याबाबत वर्धा पोलिसांसोबत चर्चा करून त्या औषधामुळे पुन्हा अश्या काही घटना घडल्या का याबाबत सुद्धा तपास करणार अशी माहिती दिली.

  • interrupted Power supply : तर वीज देयकांची करणार होळी, युवक कांग्रेसचा महावितरणला इशारा

    interrupted Power supply : तर वीज देयकांची करणार होळी, युवक कांग्रेसचा महावितरणला इशारा

    गुरू गुरनुले interrupted Power supply मुल:- तालुक्यातील बेंबाळ परिसरातील विद्युत पुरवठा ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वारंवार खंडित होत असल्याने या परिसरातील जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच या परिसरातील उद्योगधंद्यावरही याचा मोठा परिणाम पडत आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर मनपाच्या 58 सेवा ऑनलाइन

    interrupted Power supply मागील कित्येक वर्षापासून विद्युत पुरवठा खंडित होण्याचा त्रास या परिसरातील जनतेला सहण करावा लागत आहे. याबाबत युवक काँग्रेसने तक्रार ,निवदने दिलेले असूनसुद्धा याकडे संबंधित विद्युत विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.

    कामाची माहिती : घरबसल्या काढा विवाह नोंदणी प्रमाणपत्र

    interrupted Power supply या क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारीही आपल्या कर्तव्यात कसूर करताना आढळून येत असून ही बाब अतिशय गंभीर असून सामान्य जनतेसाठी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीची आहे. वारंवार खंडित होणारा पुरवठा सुरळीत करून ग्राहकांना सर्वसामान्य जनतेला सततच्या होणाऱ्या त्रासापासून दिलासा द्यावा करिता युवक काँग्रेस कडून निवेदन देण्यात आले.

    पाऊस कधी येणार? मान्सूनचे आगमन कधी?

    जर एका आठवड्याच्या आत सदर विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही तर या विरोधात युवक काँग्रेस विद्युत कार्यालयासमोर विद्युत बिले जाळुन तीव्र आंदोलन करणार असा इशारा युवक काँग्रेसकडून देण्यात आला.

     

    interrupted Power supply निवेदन देताना युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे,पवन निलमवार, कांग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील वाढई,बेंबाळचे सरपंच चांगदेवजी केमेकार, उपसरपंच देवाजी ध्यानबोईवार, किशोर नंदिग्रामवार, माजी सरपंच विजय बोम्मावार, संदिप मस्के, निलेश बांगरे, गणेश निलमवार, विनोद वाढई,दिपक कोटगले तथा काँग्रेसचे कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.