Blog

  • Ssc 10th result maharashtra state board : या वेबसाईटवर बघा वर्ग 10वी चा निकाल

    Ssc 10th result maharashtra state board : या वेबसाईटवर बघा वर्ग 10वी चा निकाल

    Ssc 10th result maharashtra state board 27 मे सोमवारी दुपारी 1 वाजता वर्ग 10वी चा निकाल जाहीर होणार आहे, आज निकाल जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे.

    अवश्य वाचा : पर्यटकांच्या गराड्यात अडकला वाघ

    मागील उच्च माध्यमिक बोर्डाच्या वर्ग 12 वी च्या निकालात मुलींनी बाजी मारली होती, आता वर्ग 10वी च्या निकालात सुद्धा मुलींनीच बाजी मारली आहे.

     

    तरी सर्व विद्यार्थ्यांना सदर निकाल आपल्या मोबाईल वर बघायला मिळणार तो ही एका क्लिकवर..

    महत्वाचे : पाण्याच्या शोधात रानगवा चक्क शहरात

    Ssc 10th result maharashtra state board महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

     

    Ssc 10th result maharashtra state board राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी या संदर्भातील घोषणा परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यानुसार 27 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाणार आहे.

     

    या वेबसाईटवर पाहा निकाल :

    👉 https://mahresult.nic.in

    👉 http://sscresult.mkcl.org

    👉https://sscresult.mahahsscboard.in

     

  • IPL Final Match : KKR तिसऱ्यांदा विजेता

    IPL Final Match : KKR तिसऱ्यांदा विजेता

     

     

  • Maharashtra tourism tadoba : पर्यटकांच्या गराड्यात अडकला ताडोब्याचा वाघ

    Maharashtra tourism tadoba : पर्यटकांच्या गराड्यात अडकला ताडोब्याचा वाघ

    Maharashtra tourism tadoba राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटन दरम्यान पर्यटक व जिप्सी चालकांचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे, सकाळी सफारी दरम्यान पर्यटकांच्या गराड्यात वाघ फसलेला दिसला, यावर ताडोबा दंडात्मक कारवाई करीत वाहन चालकांना कायमची बंदी करण्यात आली आहे.

    अवश्य वाचा : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात प्राणी गणना

    Maharashtra tourism tadoba 26 मे रोजी वृत्तपत्रात सदर वाघाचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता, त्यानंतर ताडोबा व्यवस्थापनाणे दखल घेतली, सदर फोटो हा 17 मे रोजी ताडोबा कोअर क्षेत्रातील खातोडा ते ताडोबा मार्गावरील सकाळ फेरी दरम्यानचा होता, ताडोबा प्रशासनाने 10 जिप्सी वाहन व जिप्सी चालक यांच्यावर 3 हजार दंड ठोठावीत त्यांना 1 महिन्याच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे, काही पर्यटन चालक हे हंगामी असल्याने त्यांना कायमचे बंद करीत मार्गदर्शक यांच्यावर 1 महिण्याकरिता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात 1 कोटीचे चोर बीटी बियाणे जप्त

    भविष्यात अश्या घटना जिप्सी वाहन चालकांकडून होणार नाही यासाठी त्यांना सूचना देण्यात आल्या असून पावसाळ्याच्या सुट्टीत त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी दिली.

  • Bison in city : रानगवा जेव्हा शहरात आला

    Bison in city : रानगवा जेव्हा शहरात आला

    Bison in city मुल – मुल शहराला लागूनच अगदी एक की.मी. अंतरावर जंगल लागून असल्याने २५ मे ला रात्री ११:४५ च्या दरम्यान जंगलातील एक रानगवा भटकुन मूल शहरातील चौखुंडे हेटी व बाजार समितीच्या आवारात फीरतांना तेथील रहिवासी यांना दीसला.

    अवश्य वाचा : आज रेमल चक्रीवादळ धडकणार

    याची माहीती स्थानीक नागरिक विक्की कोहळे यांनी संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मयसिंह झिरे, मनोज रणदिवे व योगेश गावंडे यांना दीली. माहीती मिळतात संस्थेच्या सदस्यांनी घटणा स्थळी जाऊन तो रानगवा आहे याची खात्री करून वन कर्मचारी यांना मोबाईल द्वारे माहिती दिली.

     

    Bison in city वनविभागाचे कर्मचारी, संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य व स्थानिक नागरिकांनी त्या रानगव्याला सुरक्षित पणे जंगलाच्या दिशेने परतविले यावेळी मूल प्रादेशिक चे क्षेत्र सहाय्यक एम.जे. मस्के, एफ डी सी एमचे क्षेत्र सहाय्यक आर.जी.कुमरे वनरक्षक एस.आर. ठाकुर उपस्थित होते.

    वर्ग 12 वी नंतर काय? हा कोर्स करा, नक्की यशस्वी व्हाल

    यापूर्वीही याच लागून असलेल्या जंगलातील अस्वल व तिचे तीन पिले उन्हाळ्याच्या दिवसात कर्मवीर महाविद्यालय परिसरात फिरताना विद्यार्थ्यांना दिसले. त्याही वेळेला वनविभागाने गस्त लावले होते.

  • Jagrut Muslim vikas manch : निराधारांना आधार ठरलं जागृत मुस्लिम विकास मंचाचा उपक्रम

    Jagrut Muslim vikas manch : निराधारांना आधार ठरलं जागृत मुस्लिम विकास मंचाचा उपक्रम

    Jagrut Muslim vikas manch चंद्रपूर – हाजी सैय्यद हरून संस्थापक अध्यक्ष जागृत मुस्लिम विकास मंच द्वारे 26 शिलाई मशीन गरीब निराधार महिलांना वाटप करण्यात आले. जागृत विकास मंच द्वारे मागील अनेक वर्षापासून समाजातील निराधार अधिकारी लोकांना आधार देण्याचे चे काम केले जात आहे.

    अवश्य वाचा : रेमल चक्रीवादळ कोसळणार

    याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 25 मे 2024 ला स्थानिक केजीएन लॉन या ठिकाणी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील मुस्लिम समाजातील निराधार विधवा परितक्त्या घटकातील महिलांना शिलाई मशीन वितरित करण्यात आले.

    प्राणी गणना : ताडोबा अभयारण्यात प्राणी गणना संपन्न

    Jagrut Muslim vikas manch तसेच यावेळी मुस्लिम समाजातील खतना धार्मिक परंपरा सुद्धा पार पाडण्यात आली जवळपास 50 मुलांचे खतना निशुल्क संस्थेच्या मार्फत करण्यात आली.

     

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सय्यद हाजी हारून व प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता हैदर सेठ यांची उपस्थिती होती एवढी मंचावर अधिवक्ता मोहम्मद रफी शेख सामाजिक कार्यकर्ता मोहम्मद इरफान शेख एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमान भाई खवातिने इस्लाम संस्थापक अध्यक्ष शाही बाजी शेख शिरेन कुरेशी मॅडम रफी अहमद की दवाई शाळेचे मुख्याध्यापिका नियाज खान शिफा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौसर खान यांची यांची प्रमुखतेने उपस्थिती होती.

    महत्वाचे : घरबसल्या एका क्लिकवर मिळणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र

    Jagrut Muslim vikas manch कार्यक्रमाची सुरुवात अतिथी सत्कार करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता हैदर शेठ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच राष्ट्रीय उसकी महत्त्व संघर्ष समितीचे प्रवक्ते रफिक शेख यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन उपस्थितांना केले.

     

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खान यांनी यशस्वीरित्या पार पाडले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आमिर खान अयुब भाई शरीफ खान सलीम खान जाकिरभाई जाफरभाई आदींनी अथक परिश्रम घेतले.

  • Cyclone Remal : I.M.D.कडून ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

    Cyclone Remal : I.M.D.कडून ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

    Cyclone Remal बंगालच्या उपसागरात वादळ निर्माण होत असून त्यामुळे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. या भीषण वादळामुळे २६ मे २०२४ रोजी पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशात प्रचंड विध्वंस होऊ शकतो. हवामान खात्यानुसार, बंगालच्या उपसागरातून निर्माण होणारे हे या मोसमातील पहिले वादळ असेल.

    अवश्य वाचा : ताडोबा अभयारण्यात प्राणी गणना संपन्न

    Cyclone Remal हिंद महासागरातील चक्रीवादळांचे नाव देण्याच्या प्रणालीअंतर्गत याला ‘रेमल’ असे नाव देण्यात आले आहे. अशी सूचना ओमानने केली आहे.
    हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार शुक्रवार पर्यंत बंगालच्या उपसागरातून ते ईशान्येकडे सरकू शकते.

    अवश्य वाचा : महाराष्ट्र राज्यात लवकर होणार मान्सूनचे आगमन

    वादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
    हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार,
    २४ मे २०२४ रोजी मध्य आणि लगतच्या दक्षिण बंगालच्या उपसागरातील समुद्राची स्थिती खराब ते अत्यंत खराब होण्याची शक्यता आहे.

     

    Cyclone Remal २५ मे आणि २६ मे २०२४ रोजी मध्य बंगालच्या उपसागरात ते उच्च ते खूप उंच होईल.
    २५ मे २०२४ च्या संध्याकाळपासून ओडिशा, बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर सुमारे १.५ मिटर उंचीच्या लाटा उसळतील.

     

    ताशी १०२ किलोमिटर वेगाने वाहतील वारे

    हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, वादळामुळे पश्चिम बंगाल, उत्तर २४ परगना, दक्षिण २४ परगणा आणि पूर्व मिदनापूरच्या किनारी जिल्ह्यांतील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूर येऊ शकतो.

     

    Cyclone Remal आय.एम.डी.( I.M.D.) च्या म्हणण्यानुसार या काळात ताशी १०२ किलोमिटर वेगाने वारे वाहू शकतात. यासोबतच हवामान खात्याने मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मच्छिमारांना २४ मे २०२४ पर्यंत मध्य बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

     

    २५ ते २७ मे २०२४ या कालावधीत मच्छिमारांनी उत्तर बंगालच्या उपसागरात जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

     

    समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सतत वाढतेय

    आय.एम.डी.(I.M.D.) ने २६ आणि २७ मे २०२४ रोजी उत्तर ओरिसा, बंगाल, त्रिपुरा, दक्षिण मणिपूर आणि मिझोराममध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
    हवामान शास्त्रज्ञांच्या मते, हरितगृह वायू आणि उष्णतेच्या वाढत्या उत्सर्जनामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे.

     

    केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २७ अंश आणि त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. सध्या बंगालच्या उपसागरात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंशांच्या आसपास आहे.

  • Wildlife census tadoba : ताडोबा अभयारण्यात वन्यप्राण्यांची गणना संपन्न

    Wildlife census tadoba : ताडोबा अभयारण्यात वन्यप्राण्यांची गणना संपन्न

    Wildlife census tadoba ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने बुद्धपौर्णिमेला (दिनांक २३/०५/२०२४ दुपारनंतर ते २४/०५/२०२४ सकाळपर्यंत) आयोजित निसर्गानुभव उपक्रम यशस्वीपणे सपंन्न झाला.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात एकाच दिवशी 2 मृतदेह आढळल्याने खळबळ

    व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात भारतातील विविध राज्यांतील निसर्गप्रेमींनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. बफर क्षेत्रातील एकूण ६ वनपरिक्षेत्रांतील ७९ मचाणी उभारल्या होत्या आणि या मचाणींवर एकूण १६० निसर्गप्रेमींनी क्षेत्रीय वन कर्मचा-यांच्या सोबत बसून प्राणी गणना केली. याशिवाय कोर विभागातील ५ वनपरिक्षेत्रांतील एकूण ७६ मचाणींवर बसून वन अधिकारी व क्षेत्रीय वन कर्मचा-यांनी प्राणी गणना केली.

     

    आनंदाची बातमी : राज्यातील मुलींना मिळणार उच्चशिक्षण अगदी मोफत

    Wildlife census tadoba या निसर्गानुभव उपक्रमादरम्यान बफर क्षेत्रात २६ वाघांची व ८ बिबट्यांची नोंद झाली तर कोर क्षेत्रात २९ वाघांची व ९ बिबट्यांची नोंद करण्यात आली. याशिवाय बफर क्षेत्रात १७ रानकुत्रे, ३२ अस्वल, ४०३ चितळ, १६६ सांबर, ३४४ गवे असे सर्व मांसभक्षी व तृणभक्षी प्राणी मिळून एकूण १,९७७ प्राण्यांची नोंद झाली आहे. कोर क्षेत्रात २९ वाघ, ९ बिबट, ६९ रानकुत्रे, ३३ अस्वल, २१५ गवा, १०५५ चितळ, ३२२ सांबर असे सर्व मिळून ३,०९२ प्राण्यांची नोंद झाली आहे.

    महत्त्वाचे : वर्ग 12 वी नंतर हे कोर्स कराल तर आयुष्यात यशस्वी व्हालं

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये कोर व बफर क्षेत्र मिळून ५५ वाघ, १७ बिबट, ८६ रानकुत्रे, ६५ अस्वल, १४५८ चितळ, ४८८ सांबर, ५५९ गवे अशा एकूण ५,०६९ मांसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांची नोंद झाली आहे.
    बफर क्षेत्रात निसर्गप्रेमींच्या सहभागातून, तर वन कर्मचा-यांच्या सहभागातून कोर क्षेत्रात निसर्गानुभव कार्यक्रम सपंन्न झाला.

     

    Wildlife census tadoba सदर उपक्रम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली तर उपसंचालक कोर व बफर यांच्या सूचनेनुसार पार पडला.

     

    ताडोबा प्रशासनाला उशिरा जाग

    राज्यातील विविध अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला मचान पर्यटन पार पडले, दुसऱ्या दिवशी वनविभागाने पत्रकारांना प्राणी गणनेबाबत सविस्तर माहिती दिली, मात्र यामध्ये ताडोबा प्रशासन नेहमीप्रमाणे मागे राहिले. प्राणी गणनेबाबत माहिती घेण्यासाठी वन अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी वरून सम्पर्क साधला मात्र त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मे रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ताडोबा ग्रुप मध्ये पत्रकारांच्या रोषाला सामोरे जावे लागले, त्यानंतर वनप्रशासनाने याबाबत माहिती दिली.

     

    ताडोबा अभयारण्य हे जगप्रसिद्ध आहे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्हा चंद्रपूर, मात्र वनमंत्री मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यातच वन विभागाचे अधिकारी प्रसार माध्यमांना माहिती देण्यापासून टाळाटाळ करतात हे विशेष.

  • Chandrapur police appeal : चंद्रपूर-नागपूर मुख्य मार्ग 25 मे रोजी राहणार बंद

    Chandrapur police appeal : चंद्रपूर-नागपूर मुख्य मार्ग 25 मे रोजी राहणार बंद

    Chandrapur police appeal 25 मे रोजी चंद्रपुरातील मुख्य मार्ग हा तब्बल 3 तास(दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत) बंद असणार आहे अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे.

    अवश्य वाचा : निराधार महिलेला अम्माचा आधार

    Chandrapur police appeal इरई नदीच्या पुलावरील mseb मार्फत इलेक्टरीक वायरींग दुरुस्तीचे काम करणे असल्याने यासाठी चंद्रपूर कडून नागपूर जाणारा व नागपूर मार्गाने चंद्रपूर येणारा मार्ग हा पूर्णतः बंद राहणार आहे.

    अवश्य वाचा : मुलींना आता उच्चशिक्षण मिळणार मोफत

    वायरिंग दुरुस्तीचे काम सुरु असतेवेळी जनतेला त्रास होऊ नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक विभाग व पोलीस अधीक्षकांनी पर्यायी मार्ग सुचविला आहे.

     

    Chandrapur police appeal मूल,बल्लारपूर व चंद्रपूर कडून नागपूर कडे जाणारे सर्व वाहन धारकांनी आपली वाहने बंगाली कॅम्प चौक, नेहरू नगर भटाळी, छोटा नागपूर मार्गाने जावे.

    तर नागपूर कडून मूल व गडचांदूर जाण्याकरिता छोटा नागपूर,भटाळी, नेहरू नगर, बंगाली कॅम्प या मार्गाचा वापर करावा. दुचाकी व चारचाकी वाहनांनी नागपूर जाण्यासाठी व येण्यासाठी पडोली – दाताला मार्गाचा वापर करावा.

    महत्वाचे : वर्ग 12 वी नंतर काय करावे? वाचा सविस्तर

    Chandrapur police appeal नागरिकांनी सदर आदेशाचा अवलंब करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर वाहतूक विभाग व पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.

  • Chor bt seeds : चंद्रपूर जिल्ह्यात महिनाभरात 1 कोटीचे चोर बीटी बियाणे जप्त

    Chor bt seeds : चंद्रपूर जिल्ह्यात महिनाभरात 1 कोटीचे चोर बीटी बियाणे जप्त

    Chor bt seeds गोंडपिपरी – गोंडपिंपरी येथे गोंडपिपरी पोलिसांनी व कृषी विभागाच्या भरारी पथकाने दि 23 गुरुवारी रात्री बारा वाजता दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील एका आरोपीला २५ लाखाचे चोर बिटी बियाणे वाहतूक करताना बियाणे जप्त केले.

    अवश्य वाचा : निराधार महिलेला पुन्हा दिला अम्माने आधार

    अनाधिकृत चोर बेटी कापूस बियाण्यास शासनाची परवानगी नाही .कृषी विभागाने अनाधिकृत बियाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. मात्र गोंडपिंपरी तालुका हा तेलंगणा सीमेवर असल्याने व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा तालुका असल्याने तालुक्यातून मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने चोरबीटी बियाणे वाहतूक होत असते.

    महत्वाची बातमी : मुलींना उच्चशिक्षण मिळणार मोफत

    Chor bt seeds शेतकऱ्यांना चोर बिटि विक्री करून फसवणूक केली जात आहे.या सगळ्या प्रकरणावर आळा घालण्यासाठी कृषी विभाग,पोलीस विभाग हे अलर्ट आहेत.ठाणेदार रमेश हत्तिगोटे, मणोहर मत्ते व पोलिस कर्मचारी गस्तीवर असताना दि.२३ रात्री १२ वाजता दरम्यान गुप्त माहितीच्या आधारावर गोंडपिपरी पोलिसांनी आकाश गणेश राऊत वय (24) रा.अहेरी, जिल्हा गडचिरोली यांचे गाडी क्रमांक MH 34 एम 8635 वाहनाची तहसिल कार्यालय गोंडपीपरी समोर वाहन थांबवून झडती घेतली असता वाहनात अनधिकृत कापूस बियाणे 12.90 क्विंटल 25.80 लक्ष रुपये किमतीचे बियाणे सापडले.

     

    Chor bt seeds संबंधित बीटी वाहतूक करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. दि. (24)शुक्रवारी पहाटे पाच वाजेपर्यंत चौकशी व कारवाई प्रक्रिया पार पडली. ही कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का,पोलीस उपपविभागीय अधिकारी शिवलाल भगत,विकास पाटील संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण आयुक्तालय, जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार,मुख्य गुणवंत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख,कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत,उपविभाग कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, ठाणेदार रमेश हत्तीगोटे,पंचायत समिती कृषिअधिकरी महेंद्र डाखरे, मोहीम अधिकारी लंकेश कटरे,श्रावण बोढे,विवेक उमरे,पोहवा देविदास सुरपाम,मनोहर मत्ते,शांताराम पाल, प्रशांत नैताम,पूनेश्वर कुळमेथे यांनी कार्यवाही केली. चोरबीटी बियाणे, युरिया खत व पिकप वाहन असा एकूण 30 लाख 86 हजार 290 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    12 वी नंतर हे अभ्यासक्रम निवडाल तर मिळेल भरघोस पगार

    Chor bt seeds आपल्या परिसरात संशयास्पद अनधिकृत बियाणे साठवणूक व विक्री होत असेल तर याची माहिती कृषी विभागाला द्यावी शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे रासायनिक खते व कीटकनाशक खरेदी करावे .खरेदी केल्याचे पक्की बिल शेतकऱ्यांनी जपून ठेवावे.

    -सचिन पानसरे ,तालुका कृषी अधिकारी गोंडपिंपरी

     

    Chor bt seeds 15 मे रोजी कृषी विभागाने पोम्भूर्णा तालुक्यातील मौजा नवेगाव मोरे येथे धाड टाकून अनधिकृत कपाशी बियाणे 80.30 किलोग्राम किंमत 2 लाख 3 हजार 640 रुपये, तर दुसऱ्या दिवशी 16 मे रोजी पोम्भूर्णा भीमणी येथे 39.88 क्विंटल अनधिकृत कपाशी बियाणे किंमत 76 लाख 57 हजार असा 2 दिवसात 78 लाख 60 हजार 640 रुपयांचे कापूस बियाणे जप्त केले, 23 मे मध्यरात्री गोंडपीपरी पोलिसांनी एकूण 12.90 क्विंटल कापूस बियाणे किंमत 25.80 लाख रुपये जप्त केला

    आतापर्यंत पोलीस व कृषी विभागाच्या कारवाईत एकूण 1 कोटी 4 लाख 640 रुपयांचे कापूस बियाणे पकडले आहे.

  • Amma Ki Dukan : निराधार महिलांचा आधार, अम्मा की दुकान

    Amma Ki Dukan : निराधार महिलांचा आधार, अम्मा की दुकान

    Amma ki dukan निराधार महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून स्व. प्रभाताई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अम्मा कि दुकान उपक्रम राबविल्या जात असून सदर उपक्रमा अंतर्गत जलनगर येथील प्रिती मसराम या महिलेला दुकान उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात एकाच दिवशी 2 मृतदेह आढळले

    गंगुबाई उर्फ अम्मा यांच्या हस्ते सदर अम्मा कि दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर,  आशा देशमुख, निलिमा वनकर, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, रुबीना शेख, वनिता गाताडे, संगीता धुर्वे, चंद्रशेखर देशमुख, सतनाम सिंह मिरधा, अनिल गाताडे आदींची उपस्थिती.

    महत्वाचे : मुलींना उच्चशिक्षण मिळणार मोफत

    Amma ki dukan आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून अम्मा का टिफिन हा उपक्रम राबविल्या जात आहे. सदर उपक्रमाअंतर्गत निराधार गरजुंना दररोज जेवणाचा टिफिन पोहोचविले जात आहे. हा उपक्रम चालवत असतांना अनेक निराधार महिलांमध्ये व्यवसाय करण्याची जिद्द आहे. मात्र भांडवल नसल्याने त्यांना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अम्मा कि दुकान हा उपक्रम सुरु करण्याचा निर्धार आमदार किशोर जोरगेवार यांनी केला होता. या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगारासाठी अम्मा कि दुकान देण्यात आली आहे. तर शहरात निराधार महिलांना सदर दुकान दिल्या जात आहे.

    अत्यन्त महत्त्वाचे : यशस्वी व्हायचंय तर हे कोर्स नक्की करा

    Amma ki dukan या अगोदर सदर उपक्रमाअंतर्गत बंगाली कॅम्प येथील मालती देवनाथ या निराधार महिलेला अम्मा का दुकान उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तर आज शहरातील दुस-या अम्मा कि दुकानचे उद्घाटन अम्माच्या हस्ते करण्यात आले आहे. प्रिती मसराम या महिलेला हे दुकान देण्यात आले असून जलनगर परिसरात हे दुकान सुरु करण्यात आले आहे.

     

    आपण दुकान उपलब्ध करुन देत आहोत. आता प्रामाणिक पणे कष्ट करुन यातुन आर्थिक उत्पन्न मिळवा, मी सुध्दा आजही टोपल्या विकते. मेहनतीने मिळविलेल्या कमाईचा आनंद अधिक आहे. हिच खरी श्रीमंती आहे. या दुकानाच्या माध्यमातून आणखी एक दोन जनांना आपण रोजगार द्यावा. सुखी संसार करावा असे यावेळी अम्मा म्हणाल्या.