Blog

  • Accident news : चंद्रपूर-मूल मार्गावर भीषण अपघात

    Accident news : चंद्रपूर-मूल मार्गावर भीषण अपघात

    Accident news चंद्रपूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या गावाजवळ 23 जुलैला दुपारच्या सुमारास दोन एसटी बसेस चा आपसात समोरासमोर अपघात झाला, सुदैवाने या अपघातात कसलीही जीवितहानी झाली नसली तर बसेसचे मोठे नुकसान झाले आहे.

    अवश्य वाचा : इमर्जन्सी लाईट चा उजेड आणि राजकीय पदाधिकारी व सट्टा किंग गुंतले जुगारात


    Accident news दुपारच्या सुमारास चंद्रपूर वरून मूल कडे जाणारी बस व ब्रह्मपुरी वरून चंद्रपूर कडे येणाऱ्या राज्य परिवहन विभागाच्या बस मधील नियंत्रण सुटल्याने दोन्ही बसेसची समोरासमोर धडक झाली, या धडकेत बस चा समोरील भाग चक्काचूर झाला.


    या घटनेनंतर या मार्गावर वाहतूक व्यवस्था अक्षरशः खोळंबून गेली होती, घटनेची माहिती मिळाल्यावर रामनगर पोलीस निरीक्षक सुनील गाडे आपल्या चमुसहित दाखल झाले, त्याचवेळी माजी नगरसेवक पप्पू देशमुख सुद्धा घटनास्थळी आले, पोलीस व नागरिकांनी मिळून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.
    बसमध्ये 30 ते 40 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे, सुदैवाने कुणालाही या अपघातात कसलीही दुखापत झाली नाही.

  • online pik vima : ऑनलाइन पीक विम्याची पावती कांग्रेस कार्यालयात जमा करा – संतोष रावत

    online pik vima : ऑनलाइन पीक विम्याची पावती कांग्रेस कार्यालयात जमा करा – संतोष रावत

    Online pik vima गुरू गुरनुले मुल – मागील वर्षी सन – २०२३-२४ या वर्षात मुल तालुक्यातील ज्या शेतकत्यांनी पीक विमा काढलेला होता.परंतु आकस्मिक ओला दुष्काळ झाल्याने काही ठराविक शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे खात्यात जमा झाले. परंतु अजूनही हजारो शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, विमा काढला तरीसुद्धा वंचित राहिले आहेत.

    अवश्य वाचा : इमर्जन्सी लाईटच्या उजेडात राजकीय व अवैध धंदे व्यावसायिकाचा जुगार

    Online pik vima याबाबत विमा कंपनीकडे विचारणा केली असता कंपनी तुम्हाला मिळणार नाही म्हणून हात झटकत आहे. करीता विमा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करुन शेतकऱ्यांना न्याय मिळऊन द्यावयाचे असल्याने शेतकऱ्यांनी प्रधान मंत्री फसल विमा योजना आनलाईन फार्म भरल्याची पावती तालुका कांग्रेस कमिटी मुल कार्यालयात तात्काळ जमा करावी, असे आव्हान सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष श्री.संतोष सिंह रावत यांनी विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना केले आहे.

  • Chandrapur Gambler : इमर्जन्सी लाईटच्या उजेडात राजकीय पदाधिकारी व सट्टा व्यावसायिकाचा जुगार

    Chandrapur Gambler : इमर्जन्सी लाईटच्या उजेडात राजकीय पदाधिकारी व सट्टा व्यावसायिकाचा जुगार

    Chandrapur gambler चंद्रपूर जिल्ह्यात पुराने हाहाकार माजविला असून अनेक कुटुंबांना याचा तडाखा बसला आहे, प्रशासन सध्या नागरिकांच्या मदतकार्यात गुंतलेले आहे, या बाबीचा फायदा घेत चंद्रपूर जिल्ह्यात जुगार बहाद्दर सक्रिय झाले आहे, नुकताच दुर्गापूर पोलिसांनी माजी नगरसेवकसहित चौघांना ताब्यात घेतले होते, मात्र आता तर राजकीय पदाधिकारी व सट्टा क्षेत्रातील अग्रेसर नाव असलेल्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे.

    अवश्य वाचा : तृतीयपंथीयांसाठी सरकारने योजना राबवावी – राहुल बालमवार मनसे

    जिल्ह्यातील अधिकृत व अनधिकृत जुगार खेळण्यासाठी राजुरा शहराचे नाव पुढे आहे, विशेष म्हणजे या भागात जुगार खेळण्यासाठी वणी, तेलंगणा येथील जुगार खेळाडू सहज पोहचतात.
    Chandrapur gambler अश्यात 22 जुलैला रात्रीच्या सुमारास माणिकगड रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या पडीत क्वार्टर च्या भिंतीला लागून काही इसम हे इमर्जन्सी लाईटच्या उजेडात जुगार खेळत होते अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
    माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अचानक धाड मारली असता त्याठिकाणी काही इसमानी तिथून पळ काढला तर चौघे पोलिसांच्या तावडीत मिळाले.
    52 पत्त्यावर सदर ताब्यात घेतलेले इसम हे कट पत्ता खेळत होते, यामध्ये वणी येथील हाफिज रहमान खलील रहमान, 48 वर्षीय नरेश शामसुंदर मुंधळा रा.बालाजी वार्ड बल्लारशाह, 42 वर्षीय मतीन माबिन कुरेशी रा.गांधी चौक, राजुरा व सैफउद्दीन शाह रा.राजुरा यांना ताब्यात घेण्यात आले.

    पोलिसांनी यावेळी दुचाकी वाहन mh34 bu 7956, mh34 bj 0238, mh34 bx 2971, mh34 cb 3494, mh34 bp 0597, mh34 cc 7296 व नंबर नसलेली दुचाकी, 3 मोबाईल रोख रक्कम 2 लाख 33 हजार 800 रुपये असा एकूण 6 लाख 80 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
    सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, त्यानंतर आरोपी व जप्त मुद्देमाल राजुरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

  • Transgender scheme : तृतीयपंथीयांसाठी एखादी योजना आणा – मनसेची मागणी

    Transgender scheme : तृतीयपंथीयांसाठी एखादी योजना आणा – मनसेची मागणी

    Transgender scheme संपूर्ण राज्यभर माझी लाडकी बहीण, माझा लाडका भाऊ योजना सरकार राबवित असून योजनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यासाठी महिला व बेरोजगार तरुणांची लगबग ग्रामीण व शहरी भागात दिसत आहे. परंतु समाजातील दुर्लक्षित असलेले आर्थिक दुर्बल व वंचित घटक असलेल्या तृतीयपंथीयांना कोणत्याही योजना नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर तर्फे माझी लाडकी बहिण योजनेसारखी योजना तृतीयपंथीयासाठी ही राबवावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनमार्फत मुख्यमंत्र्यांना मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केली.

    अवश्य वाचा : मदत छोटीशी मी आपल्या सदैव पाठीशी – प्रतिभा धानोरकर


    Transgender scheme तसेच तृतीयपंथीयासाठी सरकार तर्फे राबविण्यात येणारी कल्याणकारी योजनेचा लाभ देखील पोहचत नसून यासाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नसून याच्या उपाययोजनेसाठी अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.


    यावेळी व्यापारी सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, रोजगार व स्वयंरोजगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, जील्हासाचिव किशोर मडगुलवार, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, महिला सेना शहरअध्यक्ष वर्षा भोमले, कामगार सेनेचे अक्षय चौधरी, मनविसचे करन नायर, सुयोग धनवलकर, मयूर मदनकर, निकी यादव, अनुप माथणकर, शुभम वांढरे व संबोधन संस्थेचे अधक्ष राज कचोरे उपस्थित होते.

  • Pratibha Dhanorkar : पूरग्रस्त चीचपल्ली येथे खासदार धानोरकर यांचा महत्वपूर्ण उपक्रम

    Pratibha Dhanorkar : पूरग्रस्त चीचपल्ली येथे खासदार धानोरकर यांचा महत्वपूर्ण उपक्रम

    Pratibha dhanorkar खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काल चिचपल्ली येथे झालेल्या पुरपरिस्थीतीचा आढावा घेत महसूल अधिकाऱ्याशी चर्चा करीत आज नुकसानग्रस्त नागरीकांच्या कुटूंबियांना जीवनापयोगी वस्तूंची किट देऊन ‘‘मदत छोटीशी, मी सदैव पाठीशी’’ हा उपक्रम कॉग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मदतीने राबविला.

    Pratibha dhanorkar चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांपासून सतत सुरू असणाऱ्या पावसामूळे काल चिचपल्ली येथील मामा तलाव फुटून अनेक नागरीकांच्या घरात पाणी गेले. त्यासोबतच पिंपळखुट गावाला देखील पुराने वेढले होते. या घटनेची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या शी चर्चा करुन पुरग्रस्त भागातील तात्काळ पंचनामे करण्याची विनंती केली होती. त्यासोबतच उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करुन नुकसानग्रस्त नागरीकांची माहिती घेतली.

    चंद्रपुरात वाढदिवसानिमित्त सुरू झाली वृक्षारोपणाची मोहीम

    आजपासून लोकसभेचे अधिवेशन सुरु असल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ‘‘मदत छोटीशी, मी सदैव पाठीशी’’ हा संदेश नागरीकांना देत जिवनापयोगी वस्तूंचे वाटप केले. यावेळी 200 कुटूंबीयांना मदतीचा हात देत मी सदैवा पाठीशी राहणार असल्याचा संदेश पदाधिकाऱ्यांच्या मार्फत पोहचविला. या उपरोक्त देखील मी मदतीसाठी तत्पर राहणार असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.

    अवश्य वाचा : सैनिक स्कुल चंद्रपूरचा तो प्रश्न निकाली लागणार

    यावेळी उपक्रमासाठी माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अहिरकर, कॉग्रेस नेते सुधाकर अंबोरे, माजी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सोहेर रजा, डॉ. गावतूरे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, कॉग्रेस नेते मधुभाऊ मेश्राम, सौरभ ठोंबरे यासह गावकऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

  • Lok Sabha Monsoon Session : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत रक्षामंत्री सिंह यांच्यासोबत चर्चा

    Lok Sabha Monsoon Session : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत रक्षामंत्री सिंह यांच्यासोबत चर्चा

    Lok Sabha Monsoon Session आज पासून लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील रक्षा विभागाच्या विविध समस्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज दिल्ली येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांच्या समवेत भेट घेऊन समस्या निकाली काढण्याची विनंती केली. यावेळी मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत समस्या लवकरच निकाली काढणार असल्याचे मान्य केले.

    अवश्य वाचा : पूर ओसरला, चंद्रपुरातील हा मार्ग सुरू

    Lok sabha monsoon session चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे असलेल्या आयुध निर्माणीतील 22 अनुकंपा धारकांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे तसेच आयुध निर्माणीतील अनुकंपा धारकांचा प्रश्न त्वरित निकाली काढावा. त्यासोबच बल्लारपूर रोड वरील सैनिकी शाळेत चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना 10 टक्के जागा राखीव ठेवण्यासंदर्भात आज दिल्ली येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वरील विषयासंदर्भात निवेदन देऊन वरील समस्यांसंदर्भात त्वरीत निर्णय घेण्याची विनंती केली. मा. रक्षा मंत्री यांनी वरील विषयासंदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन सदर विषय लवकरच निकाली काढणार असल्याचे सांगितले.

  • Flooding in rural areas : पुरामुळे मूल तालुक्यातील हजारो हेक्टर पिके पाण्याखाली

    Flooding in rural areas : पुरामुळे मूल तालुक्यातील हजारो हेक्टर पिके पाण्याखाली

    Flooding in rural areas गुरू गुरनुले मूल – गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मुल व चिमढा नदीला महापूर आल्याने दोन्ही तालुक्यातील हजारो हेक्टर शेतातील धान पीक व कापूस पीक बुडाले. यामधे शेतकऱ्यांचे फार मोठे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. सतत चार दिवसापासून शेतात पाणी तुडुंब भरल्याने धान पीक आवत्या पेरणी व पऱ्हे पूर्ण वाया गेले आहे. दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले. उमा नदी आणि नाले दुथडी भरुन वाहू लागले आहे. नदीचे आणि पावसाचे पाण्यामुळे तालुक्यातील धान शेती पाण्याखाली आली. उमा नदीच्या काठावरील धान उत्पादक शेतक-यांना याचा सर्वात जास्त फटका बसला आहे.

    अवश्य वाचा : एक वाढदिवस बनला वृक्षारोपणाची मोहीम

    Flooding in rural areas शेत बांध्यामध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. उमा नदी आणि अंधारी नदीच्या पुलावरुन पाणी असल्याने मूल वरून जाणारे मार्ग बंद झाले आहे. चंद्रपूर, सावली, गडचिरोली या मुख्य मार्गासह ग्रामिण भागातील मार्ग बंद झाले आहे. सर्वत्र आलेल्या पुरसदृश्य परिस्थिती मुळे तालुक्यात चोहीकडे पाणीच पाणी दिसत होते. उमा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने संततधार पावसामुळे धान उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. ज्या ठिकाणी रोवणी झाली त्याठिकाणचे धान रोपे वाहून गेले, धान आवत्या पीक खराब झाले वाहून गेले असल्याचे प्रत्यक्ष पाहणी करुन शेतक-यांनी सांगितले. अशा प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या कृषी विभागाने,महसूल विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यासमक्ष सर्व्हे करणाऱ्यांनी पाहणी करावी,पंचनामा करावा, नुकसानग्रस्तांना विश्वासात घ्यावे व पीक परिस्थितीचा अचूक अहवाल शासनाकडे त्वरित सादर करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच दुबार पेरणीसाठी व संपूर्ण येणाऱ्या खर्चासाठी शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषशिन्ह रावत यांनी केली आहे.

    मुल तालुक्यातील भादूर्णी, उसराला, रत्नापुर, राजोली, चिखली,डोंगरगाव, मऱ्हेगाव, टेकाडी, आकापुर, मोरवाही, मुल अंतर्गाव पारडवांही, ताडाळा, चीचळा,हळदी, भेजगाव, नागाळा,चीचपल्ली, बोरचांदली, वीरई, फिस्कूटी,येरगाव, नवेगाव (भूज) चुरुड तुकूम आणि सभोवतालचे अनेक गावे वैनगंगा नदीच्या पुराने बाधित झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठावरील अनेक गावातील शेती पाण्याखाली आली आहे. तसेच सावली तालुक्यातील सावली अनेक गावे, कुक्कुड चीमढा, खेडीतील शेकडो हेक्टर शेती अजूनही पाण्यात बुडून आहे. धान पीक पेरणी पूर्ण वाया गेली आहे.

    चिखली शिवारातील शेतातील पाईप,शेतीअवजारे,पुराने वाहून गेले आहे. येरगाव येथील शेतकरी संजय फुलझेले यांचे शेतातील मोटार पंप,पाईप,नांगर, वखर,शेती अवजारे वाहून गेल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. बोरचांदली येथील तीन शेतकर्यांच्या शेतातील शेकडो खताच्या बॅग पाण्याने खराब झाल्या. अजूनही पूर परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. ब्रम्हपुरी,गडचिरोली,चामोर्शी वाहतूक सुरु झालेली नाही. आजही किरकोळ स्वरूपाचा पाऊस पहाटे पासून सारखा सुरूच आहे. एकंदरीत मुल,सावली तालुका पूर्ण दुष्काळात सापडला असून दोन्ही तालुके दुष्काळ ग्रस्त जाहीर करावे.

    दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे,खते तात्काळ उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी सी.डी सी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष शिन्ह रावत यांनी केली आहे. पीक विण्याचे पैसे त्वरित मंजूर करावे. यावर्षी चालू हंगामात शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा प्रधानमंत्री फसल विमा योजना कृषी मंत्रालय यांचेकडून हंगाम सुरु होताच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाचा विमा काढला आहे. आणि लगेच पेरणी व रोवणी, आवत्या परल्याने संपूर्ण पीक पुरात वाहून गेले आहे.शेतकरी हवालदिल,कर्जबाजारी झाला आहे. करीता शासनाने संबंधित विमा कंपनीकडून शेतकऱ्यांनी काढलेल्या विम्याचे पैसे त्वरित मंजूर करावे,प्रसंगी दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी संतोष सिंह रावत यांनी केली आहे.

  • tree plantation : एक वाढदिवस ठरला चंद्रपुरात वृक्षारोपणाची मोहीम

    tree plantation : एक वाढदिवस ठरला चंद्रपुरात वृक्षारोपणाची मोहीम

    Tree plantation चंद्रपूर – वाढदिवस म्हणजे आपल्या जन्माचा दिवस यादिवशी उपक्रम, सामाजिक कार्य किंवा परिवार व मित्रांसोबत पार्टी करण्याचे काम होतात, मात्र याउलट एक आगळावेगळा उपक्रम चंद्रपू शहरातील भाजपच्या माजी नगरसेविका छबू वैरागडे यांनी केला.
    वाढदिवस 18 जुलै चा मात्र 1 जुलै पासून उत्कृष्ठ महिला मंच च्या माध्यमातून छबू वैरागडे यांनी शहरात वृक्षारोपणाचे अभियान सुरु केले.
    हे अभियान 100 ते 200 वृक्ष लावण्यापर्यंत नव्हते तर तब्बल 3 हजार वृक्षांची लागवड या 18 दिवसात झाली आहे.

    चंद्रपुरातील पूर ओसरतोय, हा मार्ग झाला सुरू


    यावर्षी उन्हाळ्यात शहर अतिउष्ण झाले, याचे कारण शहरात वृक्षाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे उत्कृष्ट महिला मंच अध्यक्ष माजी नगरसेविका छबू वैरागडे यांनी आपल्या वाढदिवसापर्यंत मनात चंग बांधला कि आपण शहरात विविध वृक्षाची लागवड करावी, यासाठी जनजागृती करण्यात आली, विशेष बाब म्हणजे वृक्षरोपण केल्यावर त्या रोपाला 6 महिने जपविणे व त्यासोबत नागरिकांनी आपला फोटो पाठविल्यास त्यांना प्रोत्साहनपर म्हणून पुरस्कार देणे.
    वैरागडे यांच्या या उपक्रमाला उत्कृष्ट महिला मंच सदस्य व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.


    Tree plantation 1 ते 18 जुलैपर्यंत नागरिकांनी शहरात 3 हजार वृक्षारोपण केले, यामध्ये विश्वकर्मा नगर अग्रसेन भवन च्या मागे राजेंद्र गुंडांवार यांच्या सहकार्याने 125 वृक्षारोपण, सोनचाफा मंदिर पठाणपुरा गेट बाहेरील माना रोड वर मंगला पवार यांच्या माध्यमातून 150 झाडे, इरई धरण मार्गावर संगीता पराते यांनी 50 झाडे लावली. जगन्नाथ बाबा मठ पठाणपुरा दीपाली मद्दीवार यांनी 60 झाडे लावली, हिवरपुरी हनुमान मंदिर पठाणपुरा माया खनके यांच्या माध्यमातून 65 झाडे, श्यामाप्रसाद मुखर्जी हॉल जवळ प्रतिभा रेगुंटवार यांनी 10 झाडे लावली.


    अश्याप्रकारे विविध ठिकाणी वृक्षारोपण व 18 जुलै रोजी छबू वैरागडे यांच्या वाढदिवशी उत्कृष्ट महिला मंडळ सदस्यांनी 600 झाडांचे वृक्षारोपण केले.
    दुपारी 10 भजन मंडळांना साउंड सिस्टीम भेट स्वरूपात देण्यात आले.
    सायंकाळी सर्व वृक्ष प्रेमींचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी साक्षी कार्लेकर, मनीषा कन्नमवार, सारिका भुते, किरण बल्की, पायल अन्नलदेवार, माया खनके, मंगला रुद्रपवार, जयश्री साखरकर, संगीता पराते, नीलिमा रघाताटे, दीपाली मद्दीवार, प्राची अंबाझरे, वैशाली पेडसेलवार, पूजा पडोळे, प्रणिता जुमडे, योगिता धनेवार, मनीषा भाके,सुवर्णा लोखंडे यांचे या वृक्षारोपण मोहिमेत सर्व सदस्य चे सहकार्य लाभले.

  • The flood is receding : चंद्रपुरातील हा मार्ग पुन्हा सुरू

    The flood is receding : चंद्रपुरातील हा मार्ग पुन्हा सुरू

    The flood is receding चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं, अनेक ठिकाणचे मार्ग पूर परिस्थितीमुळे बंद होत असल्याचे चित्र निर्माण झालं होतं, वर्धा नदीला पूर आल्याने चंद्रपूर, गडचांदूर, भोयेगाव या ठिकाणी वर्धा नदीवर असलेला पुल पाण्याखाली गेला होता हा मार्ग प्रवाशांसाठी बंद करण्यात आला होता. सध्या पुलावरून 4 फूट पाणी कमी झाले आहे, जर पाऊस परत आला तर पुन्हा हा मार्ग बंद होऊ शकतो.

    अवश्य वाचा : पूर बघायला जात आहे, तर ही सूचना आधी वाचा

    Chandrapur District Flood Updates 22 जुलै रोजी वर्धा नदीचे पाणी कमी झाल्याने चंद्रपूर-भोयेगाव मार्गावर असणाऱ्या पुलावर पाणी कमी झाल्याने, सदर मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. 22 जुलैला रेड अलर्ट असल्याने जिल्हा प्रशासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी घोषित केली आहे. पोलीस दलाच्या वतीने नागरिकांनी पूर बघायला जाऊ नये असे आवाहन केले आहे.

    पूर ओसरतोय

    पूर ओसरल्यावर त्याठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे, कसल्याही विद्युत वस्तूला स्पर्श करू नये, सापाबद्दल सावधगिरी बाळगा, पुराच्या पाण्यात सर्पदंशाचे प्रमाण जास्त असते.

  • Flood advisory : पूर बघायला जाण्यापूर्वी पोलीस अधिक्षकांची सूचना काय? जाणून घ्या

    Flood advisory : पूर बघायला जाण्यापूर्वी पोलीस अधिक्षकांची सूचना काय? जाणून घ्या

    Flood advisory चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होत असून जिल्ह्यातील मूल कडे जाणारे महामार्ग रस्ते पाण्याखाली आल्याने जड वाहतुकीचे आवागमन बंद झालेले आहेत. सध्या जिल्ह्यातील चंद्रपूर ते मूल मार्ग, पोम्भूर्णा ते मूलमार्ग, गोंड पिंपरी ते मुल मार्ग बंद, चंद्रपूर ते गडचांदूर भोयेगाव मार्ग बंद झाले आहे.

    अवश्य वाचा : अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय यांना सुट्टी घोषित

    Flood advisory यावर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, पूरस्थिती मार्गावर पूर पाहण्यासाठी जाऊ नये, जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सततधार सुरू असल्याने वर्धा, वैनगंगा, उमा, इरई, झरपट या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदी नाल्यांना पूर आला आहे.

    नुकतेच नागभीड तालुक्यातील पूर पाहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांसह दोन जण वाहून गेले त्यामुळे पूर पाहणाऱ्या हौशी नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी असे पूरस्थिती ठिकाणी जाऊन स्वतः व इतरांचे जीव धोक्यात टाकू नये असे आव्हान जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी नागरिकांना केले आहे.

    त्याचप्रमाणे सर्व ट्रान्स्पोर्टर्स यांना आवाहन करण्यात येते की, जिल्ह्यातील मार्गाचे परिस्थिती जाणून वाहने रस्त्यावर पाठवावे अन्यथा रस्त्याच्या कडेला वाहने लावून प्रशासनास सहकार्य करावे. आपातकालीन परिस्थितीत चंद्रपूर पोलीस दलाचा हेल्पलाइन क्रमांक 112 तसेच चंद्रपूर आपत्ती व्यवस्थापन पूर नियंत्रण कक्ष 07172-272480, 251597 वर अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीकरिता संपर्क करावे.