Blog

  • Irai Dam chandrapur : आज इरई धरणाचे दरवाजे उघडणार

    Irai Dam chandrapur : आज इरई धरणाचे दरवाजे उघडणार

    Irai dam chandrapur चंद्रपूर जिल्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने बळीराजा चिंतीत झाला होता, मात्र जुलै महिन्याच्या मध्यभागात पावसाने जोरदार मुसंडी मारली. मागील आठवड्यात शहरात आलेल्या पावसाने मनपाची पोल खोल केली, नाल्या जाम झाल्याने नाल्याचे पाणी शहरातील विविध भागात तब्बल 1 ते 2 फूट जमा झाले होते.

    मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या

    18 जुलै पासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने जोरदार मुसंडी मारली असून सध्या जिल्ह्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे.
    अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे इरई धरण धोक्याची पातळी गाठत असल्याने प्रशासन 20 जुलै ला दुपारी 1 वाजता धरणाचे दरवाजे उघडणार असल्याने नदीजवळ राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील या गावाचा पाणीपुरवठा ठप्प

    Irai dam chandrapur इरई नदी भरून वाहत असल्याने नदी लगतच्या भागात पाणी शिरू शकते तरी आवश्यकता भासल्यास नागरिकांनी जवळच्या मनपा शाळेत आश्रय घ्यावा.
    आपत्ती प्रसंगी खालीलक्रमांकावर संपर्क करावा फायर ऑफिस लैंडलाइन नंबर
    101, (07172-259406), 9823107101, 8975994277, 07172-254614 असे आवाहन करण्यात आले आहे.

    भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात पुढील 3 तासात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटसह अतिमूसळधार पावसाचा इशारा दिला आहे, करीता नागरिकांनी सतर्क रहावे, आवश्यक काम असल्यास घराबाहेर पळावे.

    धरणाचे दरवाजे उघडल्यावर धोका कुणाला?

    इराई धरणाने 205.750 मी पातळी गाठलेली असून 20 जुलैला दुपारी 1 वाजता धरणाचे दरवाजे उघडणार आहे. त्यामुळे पद्मापुर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंत नगर, दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिंचोली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुरला, विचोडा बुजुर्ग, अंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा, हडस्ती, चारवट, कवठी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराला, हिंगनाळा, चिंचोळी, मिणगाव, वडगाव, चंद्रपूर आणि माणा आणि नदीजवळ असलेल्या गावांना धोका आहे. नागरिकांनी नदीच्या पात्रापासून दूर रहावे, तसेच आपली जनावरे व इतर मालमत्ता, नदी पात्रापासून दूर ठेवावी, अन्यथा होणाऱ्या कोणत्याही जीवित किंवा वित्त हाणीला महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी जबाबदार राहणार नाही.

  • Tirtha Darshan Yojana : काय आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना? जाणून घ्या

    Tirtha Darshan Yojana : काय आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना? जाणून घ्या

    Tirtha darshan yojana महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतू गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील जेष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि पुरेशी माहिती  नसल्याने तीर्थक्षेत्राच्या दर्शनाला जाऊ शकत  नाही. ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळी जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिकतेचे दर्शन व्हावे, यासाठी राज्यातील सर्वधर्मातील 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना आता राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची /दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

    चंद्रपूर शहरात सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्राची सुरुवात

     लाभ मिळविण्याकरिता कागदपत्रे आवश्यक : 1) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. 2) लाभार्थ्याचे आधार कार्ड/ रेशनकार्ड 3) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र /महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला 4) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 5). सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पनाचा दाखला किंवा पिवळे/  केशरी  रेशनकार्ड  6) वैद्यकीय प्रमाणपत्र 7) पासपोर्ट आकाराचा फोटो 8) जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक 9) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

    योजनेचे उद्दिष्ट : राज्यामधील जेष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा उपलब्ध करून देणे. या योजनमध्ये महाराष्ट्र राज्य व भारतातील प्रमुख तीर्थस्थळाचा समावेश राहील. सदर योजनेंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबीचा समावेश राहील.

    Tirtha Darshan Yojana सदर योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया पोर्टल/ मोबाईल अपद्वारे /सेतू सुविधा केंद्राद्वारेऑनलाईन भरले जाऊ  शकतात. अधिक माहितीकरीता सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे संपर्क करावा, असे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.

  • water supply : 12 लाख रुपये थकले, वीज वितरणने केली कारवाई

    water supply : 12 लाख रुपये थकले, वीज वितरणने केली कारवाई

    Water supply 12 लाख रुपयांचे वीज बिल थकल्याने महावितरण ने पाणीपुरवठा विभागाची वीज कापली त्यामुळे नजीकच्या गावातील पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाला. सदर पाणीपुरवठा सुरू करावा ही मागणी घेऊन डॉ.गावतुरे यांनी वीज वितरण च्या अभियंत्यासोबत चर्चा केली.

    Water supply डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी ग्रामपंचायत बेंबाळ येथे भेट दिली असता बेंबाळ व लगतच्या सहा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे विज बिल थकीत असल्याच्या कारणाने वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा विभागाची वीज कापली अशी माहिती मिळाली.


    गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठा विभागाची 12 लाखाची वीज बिल थकीत आहे अशी माहिती वीज वितरण विभागाच्या अभियंत्यांनी डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांना दिली पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोबत चर्चा केली असता ती जबाबदारी पाणीपुरवठा विभागाची नसून संबंधित ग्रामपंचायतीचे आहे आणि म्हणून ती जबाबदारी त्यांनी पार पाडावी अशी माहिती त्यांनी दिली.

    अवश्य वाचा : गावाच्या मध्यभागी बिबट्याचा धुमाकूळ, 6 जणांना केले जखमी


    पण एन पावसाळ्यामध्ये जेव्हा साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता खूप जास्ती असते आणि अशावेळी । शुद्ध पाणीपुरवठा नागरिकांना झाला नाही तर साथीच्या रोगाची लागण, कालरा टायफाईड होण्याची खूप जास्त शक्यता असते आणि म्हणून डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी अशा अटीतटीच्या वेळी प्रशासनाने या प्रकरणी तोडगा काढावा आणि लवकरात लवकर नागरिकांना शुद्ध पाणी कसे मिळेल याची तजवीज करावी अशी मागणी केली आहे अन्यथा नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यास आणि जीवित हानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असेही त्या म्हणाल्या.


    प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची शिक्षा सामान्य नागरिकांना आणि मुलांना का आणि त्यांचे आरोग्य धोक्यात का असा सवालही त्यांनी केला महोत्सवाच्या नावावर करोडो रुपयाची उधळपट्टी करणारं शासन नागरिकांना आणि लहान मुलांना शुद्ध पाणी देऊ शकत नाही ही या देशाची फार मोठी शोकांतिका आहे म्हणून संबंधित विभागांनी त्वरित पाणीपुरवठा सुरू करावा आणि यावर प्रशासकीय पातळीवर तोडगा काढावा अशी विनंती वजा सूचना ही डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांनी केली आहे.

  • Sudhir Mungantiwar : शहरातील बंगाली कॅम्प येथे सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्राचे उदघाटन

    Sudhir Mungantiwar : शहरातील बंगाली कॅम्प येथे सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्राचे उदघाटन

    Sudhir mungantiwar चंद्रपूर : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत करणे आणि नियमित मासिक उत्पन्न देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे या उद्देशातून राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसोबतच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सोयीचे व्हावे या उद्देशातून भाजप नेते मनोज पाल यांच्या पुढाकारातून सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रातून गरजुंना आधार देण्याचे काम केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    चंद्रपूर जिल्ह्यातील एका घरात शिरले 3 बिबट आणि घडलं असं


    Sudhir mungantiwar भाजप नेते मनोज पाल यांच्या पुढाकारातून सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील या केंद्राचे उद्घाटन १७ जुलैला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर अध्यक्ष राहुल पावडे, मनोज पाल, मंगेश गुलवाडे, संदीप आवारी, संजय कंचर्लावार, सुभाष कासनगोट्टूवार, भारती दुधानी, छबू वैरागडे, रुद्रनारायण तिवारी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


    राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. परंतु, शासकीय योजनांची माहिती अनेकांना नसते. बरेचदा माहिती असूनही त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा, हे कळत नाही. त्यामुळे मनोज पाल यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेले सेवा केंद्र गरजुंच्या पाठिशी उभे राहण्याचे काम करणार असल्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरवातीला मनोज पाल यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार केला. त्यानंतर मुनगंटीवार यांच्या हस्ते केंद्राचे रितसर उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत निःशुल्क सेवा दिली जाणार आहे. याचा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन मनोज पाल यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Leopard Attacks : सिंदेवाही तालुक्यात 3 बिबट्याचा धुमाकूळ

    Leopard Attacks : सिंदेवाही तालुक्यात 3 बिबट्याचा धुमाकूळ

    19 जुलैला सकाळी 10 वाजताच्या सुमारास 3 बिबट्यानी मोहाडी गावात धुमाकूळ घातला.
    चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात असलेल्या मोहाडी नलेश्वर गावातिल एका घरात 3 बिबट शिरले.
    गावात बिबट्याचा शिरकाव झाल्यावर त्यांनी 6 जणांना जखमी करीत राजेश्वर दांडेकर यांच्या घरात शिरले.
    सध्या चंद्रपूरातून रेस्क्यू टीम गावी पोहचली आहे.


    Leopard attacks जखमी मध्ये 35 वर्षीय विजय देवगिरकर, 50 वर्षीय मनोहर दांडेकर , 30 वर्षीय जितेंद्र दांडेकर, 25 वर्षीय सुभाष दांडेकर, 18 वर्षीय रितिक वाघमारे व 32 वर्षीय पांडुरंग नन्नावारे यांचा समावेश आहे.

    अवश्य वाचा : खासदार धानोरकरांच्या या कृतीची होत आहे चर्चा


    रेस्क्यू पथक बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होते, अथक प्रयत्नांनंतर वन विभागाच्या चमुला यश मिळाले असून सध्या 1 मादा बिबट वनविभागाने जेरबंद केली आहे.

  • Vidhansabha Nivadnuk : चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभेत “झाडू” स्वबळावर

    Vidhansabha Nivadnuk : चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभेत “झाडू” स्वबळावर

    Vidhansabha nivadnuk चंद्रपूर – आम आदमी पार्टी (आप) महाराष्ट्रातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सहभागी होणार असून, चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात येत आहे. या निमित्ताने, पक्षाकडून उमेदवारी इच्छुकांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पार्टीच्या उमेदवारांसाठी अनुकूल वातावरण आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत, पक्षाचे प्रतीक असलेले ‘झाडू’ चिन्ह जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचले होते. त्या निवडणुकीत झाडू चिन्हावर 2 लाखांहून अधिक मतदान झाले होते, जे पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेचे द्योतक आहे.

    व्हाट्सएपच्या माध्यमातून खासदार धानोरकर यांच्या मोबाईल वर आला संदेश आणि घडलं असं..

    आम आदमी पार्टी हा शिक्षण, आरोग्य, वीज पुरवठा आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसह मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणारा एक मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    उमेदवारी नोंदणीसाठी पात्र व्यक्ती:

    • आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते
    • सामाजिक कार्यकर्ते
    • इतर पक्षांमधून येऊ इच्छिणारे कार्यकर्ते
    • चंद्रपूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडवू इच्छिणारे सर्व नागरिक

    सर्व इच्छुकांनी उमेदवारी नोंदणीसाठी खालील लिंकवर ऑनलाइन फॉर्म भरावा:
    aapmaharashtra.com/app

    Vidhansabha nivadnuk “चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. 2014 च्या निकालांवरून स्पष्ट होते की जिल्ह्यात आमच्या पक्षाला मोठा पाठिंबा आहे. आम्ही जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या ऐतिहासिक संधीचा लाभ घ्यावा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आम आदमी पार्टीमध्ये सामील व्हावे,” असे आवाहन मयूर राईकवार, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांनी केले आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट

    जिल्ह्यात आप पक्षाची ताकद कमकुवत असली तरी आजही आप चे कार्यकर्ते तळागाळात आहे, जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आम आदमी पक्षाने केले आहे, आप ची स्वबळाची घोषणा प्रस्थापित पक्षांना बुचकळ्यात नक्कीचं आणू शकते.

    आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली आहे, सध्या आप ने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. आप च्या माध्यमातून तरुणांना राजकारणात येण्याची संधी मात्र नक्की उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे राजकारणाची दिशा अवश्य बदलेल.

  • Pratibha Dhanorkar : त्या आईच्या भावनिक हाकेला खासदार धानोरकरांची साद

    Pratibha Dhanorkar : त्या आईच्या भावनिक हाकेला खासदार धानोरकरांची साद

    Pratibha Dhanorkar खासदार प्रतिभा धानोरकर ह्या नेहमी सामाजिक कार्यासाठी चर्चेत असतात. अशाच एका विद्यार्थ्याच्या पालकांनी मोबाईल वरुन खासदार प्रतिभा धानोरकर यांना संपर्क साधला. वडील नसलेल्या या विद्यार्थ्याच्या आईचे वॉट्सअॅप वरील निवेदन बघून खासदार प्रतिभा धानोरकर भारावून गेल्या व लगेच त्यांनी त्या मुलाचे संपूर्ण शुल्क भरुन शिक्षणासाठी मदतीचा हात दिला.

    चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट

    Pratibha dhanorkar अलीकडे अनेक राजकारणी स्वतः चा स्वार्थ बघत असतांना स्वतः च्या लोकसभा क्षेत्राबाहेरील उस्मानाबाद येथील एका विद्यार्थ्याच्या आईचे निवेदन वॉट्सअॅपवर प्राप्त झाले. त्यांनी सदर निवेदनात खासदार धानोरकरांना भावनीक साद घालत विद्यार्थ्याच्या वडिलाचे निधन झाले असून मुलगा सैनिकी शाळा बल्लारपूर येथे 10वी शिकत असल्याचे सांगितले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने चालू वर्षाचे शैक्षणिक शुल्क भरु शकत नसल्याचे खंत व्यक्त केली. शैक्षणिक शुल्क न भरल्यास वर्ष वाया जाण्याची भिती व्यक्त केली. सदर निवेदनाची दखल घेत सामाजिक भान राखत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सैनिकी शाळेच्या प्राचार्यांशी संपर्क करुन संपूर्ण शुल्क स्वतः भरणार असल्याचे सांगितले व आज  दि. 18 जुलै रोजी आपल्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून शाळेची संपुर्ण शुल्क कुठलेही राजकीय स्वार्थ न ठेवता लोकसभा क्षेत्रा बाहेरच्या एका आईची भावनिक हाक म्हणून भरले. या प्रसंगाने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण ही व्याख्या सार्थ ठरविली. उस्मानाबाद येथील त्या विद्यार्थ्याच्या आईने खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार व्यक्त करीत लवकरच चंद्रपूर येथे येऊन भेट घेणार असल्याचे सांगितले.

    अवश्य वाचा : ती मृत्यूशी लढत होती आणि नागरिक तिचा व्हिडीओ काढत होते, धक्कादायक घटना

    Pratibha dhanorkarआजच्या व्यस्त कार्यात जनप्रतिनिधी यांना मोबाईल बघण्यासही वेळ नसतो, आमदार नंतर प्रतिभा धानोरकर ह्या खासदार बनल्या, त्यामुळे कामाचा व्याप वाढला, दररोज त्यांच्या मोबाईल वर हजारो कॉल येतात, त्यामधून सुद्धा खासदार धानोरकर यांनी अनोळखी नंबरवरून आलेल्या संदेशाचे वाचन केले आणि त्या काही काळ स्तब्ध राहिल्या.

    मुलांच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं व पत्नीच्या आयुष्यातून पतीचे अचानक जाणे हे त्या संदेशातून व्यक्त झाले होते, ती परिस्थिती व अनुभव खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वाट्याला आला होता, मात्र त्या प्रसंगातून जाणाऱ्या आईचं दुःख खासदार धानोरकर यांना समजलं, त्यांनी त्या आईसोबत याबाबत चर्चा करीत पूर्ण माहिती घेतली. संपूर्ण माहितीची खातरजमा केल्यावर त्यांनी आपल्या स्वीय सहायकाला निर्देश दिले व त्या आईच्या भावनिक हाकेला त्यांनी साद दिली.

    खासदार धानोरकर यांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा आता लोकसभा क्षेत्रात होत आहे.

  • chandrapur whether : चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

    chandrapur whether : चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

    chandrapur whether नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 18ते 22जुलै 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 19 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याकरीता रेड अलर्ट, 20 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट तर 21 आणि 22 जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनमार्फत करण्यात आले आहे.

    जिल्ह्यासाठी 20 जुलै 2024 रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला असून या कालावधीत चंद्रपूर जिल्‍ह्यात एक दोन ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वारा (तासी 50-60 किमी वेगाने) आणि गडगडाटी वादळाची शक्यता तसेच 21 व 22 जुलै 2024 या कालावधीकरीता चंद्रपूर जिल्‍ह्याकरीता यलो अलर्ट असून या  कालावधीत एक-दोन ठिकाणी विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्‍यता वर्तविली आहे.  खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी.

    ती बुडत होती आणि नागरिक व्हिडीओ बनवत राहिले, आणि तिचा अंत झाला

    chandrapur whether संरक्षणात्‍मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्‍या. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्‍यापासून दूर रहा. रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातुन जाणे टाळा. खराब दृश्‍यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा. पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्‍या तारांपासून दूर रहा. फ्लॅश पूर चेतावणी किंवा विजेच्‍या तारोपासून दूर रहा.

    वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये

    विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.           

    तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

    जिल्‍ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घ्‍यावी, असे  आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.

  • Shikshan Prasarak mandal : शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या अध्यक्षपदी अॅड. अनिल वैरागडे अविरोध

    Shikshan Prasarak mandal : शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या अध्यक्षपदी अॅड. अनिल वैरागडे अविरोध

    Shikshan Prasarak mandal गुरू गुरनुले मूल – चंद्रपूर जिल्ह्यातील नामांकीत शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी मंडळाच्या निवडणुकीत अॅड. अनिल वैरागडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड झाली. तर सचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत निवृत्त मुख्याध्यापक शशिकांत धर्माधिकारी यांनी अजय वासाडे यांचा चार मतांनी पराभव करीत विजय मिळविला. दरम्यान, कार्याध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाला नसल्याने हे पद सध्या रिक्त आहे.

    Shikshan Prasarak mandal शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या अध्यक्ष पदासाठी अॅड. अनिल वैरागडे, उपाध्यक्ष पदाकरिता अॅड. प्रणव वैरागडे आणि अजय वासाडे, सहसचिव पदाकरीता प्राचार्य ते. क. कापगते यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी दाखल न केल्याने ही सर्व पदे अविरोध निर्वाचित झाली होती. कार्यकारी सदस्य म्हणून यशवंत पुल्लकवार, वैशाली वासाडे यांचीही अविरोध निवड करण्यात आली. सचिव पदासाठी शशिकांत धर्माधिकारी व अजय वासाडे यांचे दोन उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक घेण्यात आली.

    डॉक्टर मुलीची आत्महत्या, लोक बनले मुकदर्शक

    १४ पैकी १२ सदस्यांनी मतदान केले, यामध्ये शशिकांत धर्माधिकारी यांना ८ तर अजय वासाडे यांना ४ मते मिळाली. दरम्यान, मागील २६ वर्षांपासून शिक्षण प्रसारक मंडळात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर या निवडणुकीने कायमचा पडदा पडला आहे. संस्थेच्या वतीने मूल तालुक्यात शैक्षणिक विकास आता जोमाने करण्यात येईल, असा विश्वास नवनिवर्वाचित अध्यक्ष अॅड. अनिल वैरागडे यांनी व्यक्त केला.

    शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या वतीने मूल व सावली तालुक्यात विविध विद्यालय, महाविद्यालये व छात्रालये चालविली जातात. या संस्थेत १९९८ पासून अंतर्गत वाद होते. हे वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने २३ जानेवारी २०२४ रोजी अंतिम निर्णय देत, २००२ ते २००७ ची कार्यकारिणी वैध ठरवित सहा महिन्याच्या आत सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी नवीन कार्यकारीणीसाठी निवडणूक घ्यावी, असे आदेश दिले. या आदेशानुसार बुधवारी पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल येथे निवडणूक घेण्यात आली. अखेर मूलच्या पदाधिकाऱ्यांनी उभी केलेली संस्था २६ वर्षानंतर मूलच्या पदाधिकाऱ्यांच्या हातात आल्याने मुल नागरिकात आनंद व्यक्त केल्या जात आहे.

  • negative news : या नागरिकांच्या माणुसकीला भावपूर्ण श्रद्धांजली

    negative news : या नागरिकांच्या माणुसकीला भावपूर्ण श्रद्धांजली

    Negative News ब्रह्मपुरी येथील रहिवासी डॉक्टर घनश्याम बिंजवे यांची मुलगी कु. ईशा घनश्याम बिंजवे वय २४ हिने मंगळवार दिनांक 16 जुलै ला सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान आपल्या एक्टिवा एम. एच. ४९ झेड ४१७६ ने वडसा येथील वैनगंगा नदीच्या पुलावर येऊन गाडीवर आपली चप्पल ठेवली आणि नदीच्या पुलावरून उडी घेतली.

    विद्यार्थ्यांच्या संघर्षामुळे गावात आली लालपरी

    नदीच्या पात्रात जास्त पाणी नसल्याने ती बचावली मात्र त्यानंतर त्या मुलीने वाहत्या पाण्याच्या प्रवाहात पुन्हा डुबकी घेतली ती त्या प्रवाहात वाहून गेली. हि घटना 16 जुलैला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली, विशेष म्हणजे यावेळी वैनगंगा नदीच्या पुलावरील लोकांची गर्दी उमडलेली होती, त्या गर्दीने बघ्याची भूमिका घेत तिला वाचविण्याऐवजी त्या मुलीचे व्हिडिओ बनवीत सोशल मीडिया वॉट्सप ग्रुप वर टाकले, या प्रकाराने व्हिडीओ बनविण्याची धडपड दाखविणाऱ्या नागरिकांची माणुसकी अगोदर मरण पावली.

    https://ads.timesdiginews.com/2024/07/shivsena-shinde-our-officers-are-not-listening-appoint-3-district-heads/

    negative news वैनगंगा नदी ही वडसा तहसीलच्या हद्दीत येत असल्यामुळे वडसा पोलीस पथक वैनगंगा नदीच्या पात्रात मुलीचा शोध घेत होते. दुसऱ्या दिवशी नदीच्या पात्रा जवळ असणाऱ्या निलज गावाजवळ ईशा चा मृतदेह आढळून आला.ईशा ने MBBS ची पदवी घेतली होती, तिचे वडील डॉक्टर आहे. सध्या तरी आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.