black money in politics महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन आयकर विभागाने केले असून माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.
black money in politics निवडणुकी दरम्यान काळा पैसा वापरण्यात येत असलेली माहिती, रोख रकमेचे वाटप, रोख रकमेची हालचाल या बाबत विश्वसनीय माहिती असल्यास नागरिकांनी आयकर विभागाला नक्की कळवावे. माहिती देणा-याची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असे नागपूर येथील उप आयकर निदेशक (अन्वेषण) अनिल खडसे यांनी कळविले आहे.
माहिती देण्यासाठी येथे करा संपर्क : 1. टोल फ्री क्रमांक : 1800-233-0355 / 1800-233-0356
2. व्हॉटस्ॲप क्रमांक : छायाचित्रे, व्हीडीओ इत्यादी पाठविण्यासाठी व्हॉटस्ॲप क्रमांक 9403390980
Chandrapur mahanagar palika जिल्हा प्रशासन,पोलीस प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त नियोजनाने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. चांदा क्लब वर स्टॉल उभारल्याने गर्दीचे योग्य नियोजन व सुविधा होण्यास त्याचप्रमाणे सोहळ्यादरम्यान व सोहळ्यानंतर मनपा स्वच्छता विभागाने उत्कृष्ट कार्य केल्याने परिसर सातत्याने स्वच्छ राखण्यास मदत मिळाली.
Chandrapur mahanagar palika सोहळ्यादरम्यान दीक्षाभुमी परिसर पुर्णवेळ स्वच्छ राहतील यासाठी मनपा स्वच्छता विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात आले. १५० स्वच्छता कर्मचारी २ शिफ्ट मध्ये परिसरात पुर्णवेळ कार्यरत होते. प्रत्येक कर्मचाऱ्याला परिसर विभागुन देण्यात आल्याने ठराविक वेळाने परिसर स्वच्छ केला जात होता. जागोजागी असे १०० डस्टबिन उभारण्यात आले होते तसेच हा जमा झालेला कचरा नेण्यास १० मोठे कंटेनर उभे करण्यात आले होते.तसेच रात्रीसाठी ३ ऑटो टिप्परद्वारे कचरा वाहुन नेण्याचे काम सातत्याने करण्यात आल्याने परिसरात कुठेही अस्वच्छता निर्माण होऊ शकली नाही.
दीक्षाभुमी सोहळ्यास जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठया संख्येने येत असल्याने वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात वाहतुकीत बदल करण्यात आला होता. अवजड वाहनाकरीता रहदारीचा मार्ग वेगळा, शहरातील दुचाकी व चारचाकी (हलकी) वाहनाकरीता रहदारी व्यवस्था वेगळ्या मार्गाने व दीक्षाभूमी सोळयास येणाऱ्या नागरिकांकरीता वाहन पार्किंग स्थळांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व व्यवस्थेची दिशादर्शक फलक मनपातर्फे लावण्यात आले होते.
परिसरात येणार जनसागर पाहता नागरिकांचा प्रवेश हा चांदा क्लब मार्गे ठेवण्यात आला होता.कार्यक्रमाच्या २ दिवस आधीच मनपातर्फे अन्नदानाचे व इतर स्टॉल्स हे चांदा क्लब ग्राउंडवरच लावण्यात येणार असल्याची जनजागृती केल्याने सर्व स्टॉल्स हे ग्राउंडच्या आतच लागले त्यामुळे सर्व नागरिकांना शांततेत अन्नदानाचा लाभ घेता आला. Chandrapur mahanagar palika
हायमास्ट लाईट उपलब्ध करून देण्यात आले असल्याने परिसरात अंधूक प्रकाशाचा त्रास जाणविला नाही. दीक्षाभुमी परिसरात तथा चांदा क्लब ग्राऊंडवर पाणी पुरवठा, मोबाईल टॉयलेट, वीज पुरवठा, कार्यक्रमाच्या ठिकाणी वैद्यकीय मदत केंद्र, अग्निशमन वाहने सुद्धा मनपातर्फे उपलब्ध करून देण्यात आली होती.संपूर्ण परिसर लाकडी कठड्यांनी विभागून ठेवण्यात आला जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच पोलिस विभागाचे मदत केंद्र आदी सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही.
List of Assembly Candidates राज्यात विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झाला असून राजकीय पक्ष जिंकणाऱ्या उमेदवाराचा शोध घेऊ लागले आहे, मात्र अद्यापही अनेक राजकीय पक्षांना योग्य उमेदवार सापडत नाही आहे.
List of Assembly Candidates मात्र अश्यात सर्व पक्ष जागावाटप मध्य गुंतलेले असताना वंचित बहुजन आघाडीने उमेदवाराची यादी जाहीर केली आहे.
या यादीत चंद्रपू जिल्ह्यातील बल्लारपूर व चिमुर विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांचा समावेश आहे. बल्लारपूर विधानसभा मतदार संघातून सतीश मुरलीधर मालेकर व चिमूर मतदार संघातून अरविंद आत्माराम सांदेकर यांचा समावेश असून या दोन उमेदवारांपैकी चिमुर विधानसभा क्षेत्रातून वंचित बहुजन आघाडीतर्फे वर्ष 2019 च्या विधान निवडणुकीत अरविंद सांदेकर निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी सांदेकर यांना 24 हजार 474 मते मिळाली, पराभव झाला असला तरी सांदेकर तिसऱ्या क्रमांकावर होते हे विशेष.
वंचित बहुजन आघाडीने अद्यापही चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी जाहीर केली नाही. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली होती, आता विधानसभा निवडणुकीत काय परिस्थिती असणार हे येणार काळ सांगेलचं.
Election process in maharashtra महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 ची घोषणा होताच जिल्ह्यात सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करून अधिका-यांनी निवडणूक प्रक्रिया जबाबदारीने पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे.
Election process in maharashtra नियोजन सभागृह येथे नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी संजय पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्णा बासुर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक प्रक्रिया अतिशय जबाबदारीने पार पाडावी. त्यासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून योग्य नियोजन करावे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रामध्ये किमान मूलभूत सुविधा पुरवणे आवश्यक आहे. यात फर्निचर, लाईट व्यवस्था, शौचालय आणि त्याची स्वच्छता, प्रतीक्षालय, शेडची व्यवस्था, मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या असल्यास ठराविक अंतरावर खुर्च्यांची व्यवस्था, आदी बाबी सज्ज ठेवाव्यात.
तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर स्थानिक स्तरावरील एन.सी.सी. आणि एन.एस.एस. च्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून नियुक्त करावे. शहरी भागात जेथे तीन पेक्षा जास्त मतदान केंद्र एकाच ठिकाणी आहे, अशा ठिकाणी पार्किंग व्यवस्था योग्य ठेवावी. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही अधिकारी -कर्मचाऱ्यांनी विनापरवानगी मुख्यालय सोडू नये. मुक्त आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी आंतरराज्यीय चेकपोस्ट वर अधिकारी कर्मचाऱ्यांची तात्काळ ड्युटी लावावी. या चेक पोस्टवर पोलिस विभागासह राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि वनविभागाचे अधिकारी -कर्मचारी सुद्धा तैनात ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. Election process in maharashtra
यावेळी सादरीकरण करताना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी नोडल अधिकाऱ्यांनी करावयाची कारवाई, आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व शासकीय विभागाने करावयाची कामे, तसेच आचारसंहितेच्या काळात काय करावे आणि काय करू नये, याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. General Election
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली राजकीय पक्षांची बैठक : जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांनी दोन सहाय्यक नियुक्त करावेत. विधानसभा मतदारसंघ स्तरावर मदतीसाठी हेल्पडेस्क राहणार आहे. तसेच सर्व परवानगीसाठी सिंगल विंडो सिस्टीम सुद्धा कार्यान्वित केली जाईल. निवडणूक प्रचाराकरीता महत्त्वाचे, अति महत्त्वाचे व्यक्ती येत असल्यास याबाबत राजकीय पक्षांनी प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी. राजकीय पक्षांनी प्रत्येक सभेसाठी परवानगी घ्यावी. वाहनांच्या वापरावर निर्बंध असून एका ताफ्यामध्ये जास्तीत जास्त 10 वाहने वापरण्याची परवानगी राहील, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरणे, अनामत रक्कम, निवडणुकीचा कार्यक्रम आदीबाबत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना अवगत केले. General Election
राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची उपस्थिती : बैठकीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पाटी, शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), स्वतंत्र भारत पक्ष, जय विदर्भ पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Model Code of Conduct जिल्ह्यात महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 ची आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. संपूर्ण निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन करण्याचे दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
Model Code of Conduct तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता अंमलात असेपर्यंतच्या कालावधीकरिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 मधील तरतुदीनुसार खालील बाबींवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसे आदेश जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमीत केले आहेत.
1. शासकीय कार्यालये/विश्रामगृहे इत्यादी परिसरात मिरवणुका काढण्यास, घोषणा देणे/सभा घेणे इत्यादीवर निर्बंध राहतील. 2. शासकीय/निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपीकरण करण्यास निर्बंध, 3. उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करतेवेळीस ताफ्यामध्ये 3 पेक्षा जास्त मोटारगाडया/वाहने तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100 मिटर परिसरात व दालनात 5 व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश करण्यास निर्बंध राहतील. Model Code of Conduct
4. निवडणुक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत इतर उमेदवाराचे नाव व चिन्ह वापरणे, आयोगाने निश्चीत केल्याप्रमाणे कागद वापरणे तसेच निश्चीत केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रीका छपाईस निर्बंध राहतील. 5. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत इतर उमेदवारांचे नाव व चिन्ह वापरणे, आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे तसेच निश्चित केलेल्या कागदपत्राच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छपाईस निर्बंध,6. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 200 मी. परिसरात धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषणे करण्यावर निर्बंध राहतील.
6. धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरते पक्ष कार्यालय स्थापन करण्यास निर्बंध, 7. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जात/धर्म/भाषावार शिबिरांचे आयोजन करण्यावर निर्बंध, 8. निवडणुकीचे प्रचाराकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इत्यादी बाबींवर निर्बंध, Model Code of Conduct
9. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खाजगी व्यक्तींच्या जागेवर/सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके जागा मालकाच्या व संबंधीत प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय लावण्यास निर्बंध राहतील. 10. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रचार/रॅली/रोड-शो याकरीता वाहनाच्या ताफ्यात 10 पेक्षा अधिक मोटार गाडया/वाहने वापरण्यास निर्बंध राहतील.
सदर आदेश जिल्हाधिकारी यांच्या सहीनिशी कोर्टाच्या शिक्कानिशी 15 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आला आहे.
Mahila Bachat Gat बाबूपेठ महिला बचत गटांची आढावा बैठक – महिलांचे आर्थिक सक्षमीकरण सोबतच, वैचारिक पातळी उंचावणे काळाची गरज-सौ चंदाताई वैरागडे
Mahila bachat gat बाबूपेठ प्रभागातील एकूण बारा महिला बचत गटाची आढावा बैठक बचत गटाच्या संस्थापक अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांचे अध्यक्षतेखाली, सर्व बचत गटाचे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
बैठकीत वर्षभरात बचत गटांनी राबविलेले उपक्रम,आर्थिक देवाण घेवाण,बचत गटात विशेष योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान ,पुढे राबविण्यात येणार उपक्रम यावर सविस्तर मार्गदर्शन करताना अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांनी बचत गटाची स्थापना केवळ आर्थिक देवाण घेवणीसाठीच केलेली नसून महिलांचे सक्षमीकरण करून महिलांना स्वावलंबी करून प्रत्येक महिलांचे इतरांविषयीचे विचार सुद्धा सकारात्मक असले पाहिजे.
या प्रत्येक महिलांच्या विश्वासानेच हेवेदावे नसल्याने बचतगटाच्या माध्यमातून महाराष्ट्रत पहिली रणरागिणी महिला नागरी पतसंस्था स्थापन सुद्धा केली.महिलांनी एकमेकांसोबत सलोख्याचे संबंध जोपासले पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण झाले अस म्हणता येईल,असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
दोन सत्रात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत रणरागिणी महिला बचत गट,राजराजेश्वर, गायत्री,सखी माऊली, सहेली,महाकाली,परिवार, सावित्रीबाई फुले, जिजाऊ, रणरागिणी, हिरकणी दामीनी इत्यादी महिला बचत गटाच्या अध्यक्षा ,वैशाली ऐसेकर, शुभांगी कंदलवार,प्रणिता हजारे स्नेहल अंबागडे, प्रियंका खणके, रजनी सातपुते, लीला बुटले, रजनी मडावी, सुवर्णा मत्ते, रेखा वैरागडे, स्नेहल बावणे,वर्षा साखरकर तसेच सर्व पदाधिकारी आणि एकूण 400 वरील महिला सदस्य उपस्थित होते.
Political childishness 15 ऑक्टोबर पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, मात्र आचारसंहिता लागू होण्यापूर्वी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात राजकीय बालिशपणाचे उदाहरण बघायला मिळाले.
Political childishness विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरात अनेक विकासकामे करण्यासाठी निधी खेचून आणला, वाचनालय असो की बाबूपेठ उड्डाणपूल, तसेच दिक्षाभूमि व वढा तीर्थक्षेत्र यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करीत भूमिपूजन व काम पूर्णत्वास नेले.
मात्र आचारसंहिता लागण्यापूर्वी विधानसभा क्षेत्रात भाजप विरुद्ध जोरगेवार असा सामना पुन्हा रंगला आहे, त्याच उदाहरण म्हणजे बाबूपेठ उड्डाणपूल नागरिकांसाठी वाहतुकीसाठी सुरू करणे, एकदिवस आधी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी आमदार जोरगेवार हे बाबूपेठ उड्डाणपुलाची पाहणी करण्याकरिता गेले आणि दुसऱ्या दिवशी हा उड्डाणपूल नागरिकांसाठी सुरू करू अशी घोषणा करीत ते निघून गेले होते. Political childishness
मात्र 9 ऑक्टोबर रोजी भाजपचे ब्रिजभूषण पाझारे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह बाबूपेठ उड्डाणपूलावर बँड बाजा लावत सदर उड्डाणपूल नागरिकांसाठी सुरू केला, मात्र दुसऱ्या दिवशी आमदार जोरगेवार हजारो नागरिकांसह उड्डाणपूलावर पोहचत म्हणण्याप्रमाणे उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू केला, 15 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उड्डाणपूलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच अधिकृतपणे नाव दिलं.
15 ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागणार होती, तत्पूर्वी विधानसभा क्षेत्रातील भूमिपूजन काम संपन्न होत होते, त्यामध्ये 25 कोटी निधी हा वढा तीर्थक्षेत्र साठी आमदार जोरगेवार यांनी मंजूर केला होता, 15 ऑक्टोबर रोजी त्याबाबत भूमिपूजन कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला, मात्र त्याठिकाणी सकाळी भाजपचे ब्रिजभूषण पाझारे आपल्या समर्थकासह तिथं पोहचत भूमिपूजन उरकून टाकले, त्यांनतर नियोजित वेळेत आमदार जोरगेवार यांनी अधिकृतपणे भूमिपूजन कार्यक्रम पार पाडला. Political childishness
दोन्ही ठिकाणी भाजप नेते पाझारे यांनी हा प्रकार करीत स्वतःवर अनेकांची नाराजगी ओढवून घेतली, चंद्रपूर जिल्हा व संपूर्ण राज्यात सुधीर मुनगंटीवार यांची मातब्बर राजकारणी म्हणून ओळख आहे, अनेकदा ते मुख्यमंत्री पदाचे दावेदारी म्हणून त्यांचं नाव चर्चेत आलं होतं, लोकसभा निवडणुकीत त्यांचा 2 लाख 60 हजार मतांनी पराभव झाला. सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते असे तत्पर असते तर मुनगंटीवार यांना पराभवाचे तोंड बघावे लागले नसते, जर मुनगंटीवार लोकसभेत खासदार म्हणून विराजमान झाले असते तर जिल्ह्यात विकासाची लाट नक्कीचं आली असती. Political childishness
मुनगंटीवार यांचं राजकीय क्षेत्रात मोठं नाव असताना त्यांचे कार्यकर्ते म्हणून पाझारे यांनी केलेला प्रकार राजकीय पोरकटपणाचे एक लक्षण आहे अशी चर्चा सध्या विधानसभा क्षेत्रात रंगली आहे, आज किशोर जोरगेवार हे सामान्य नागरिकांचे आधार बनले आहे, त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे पूर्णत्वास आली.
आज भाजप तर्फे ब्रिजभूषण पाझारे हे विधानसभा निवडणुकीत जोरगेवार यांच्यापुढे आव्हान निर्माण करतील अशी चिन्हे आहे, पण पाझारे हे अजूनही नागरिकांच्या मनात घर करू शकले नाही आहे.
ऑक्टोबर महिन्यांतच विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, तत्पूर्वी चंद्रपुरात अनेक राजकीय भूकंप आपल्याला बघायला मिळणार आहे, मात्र सध्यातरी आचारसंहिता लागण्यापूर्वीचा राजकीय बालिशपणा नागरिकांनी आधीच बघितला आहे.
rotavator machine रोटाव्हेटर मध्ये अडकून मजुराचा जाग्यावर मृत्यू, शरीराचे झाले तुकडे, कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील घटना
rotavator machine 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात धक्कादायक घटना घडली, सकाळी चिखल साफ करण्यासाठी गेलेल्या मजुराचा रोटाव्हॅटर मशीन मध्ये अडकून मृत्यू झाला, यावेळी त्या मजुराच्या शरीराचे तुकडे झाले. 45 वर्षीय रमेश शामराव टेकाम असे मजुराचे नाव आहे.
गोठ्यात ठेवलेले ट्रॅक्टर सुरू करण्यासाठी ट्रॅक्टर चालक/मालक रवींद्र गोपळ वडस्कर व मजूर रमेश टेकाम गेले तेव्हा चालकांनी ट्रॅक्टर सुरू केलं आणि मजूर रमेश टेकाम रोटाव्हेटर मध्ये ओढला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला असे स्थानिककडून सांगण्यात येत आहे. गडचांदूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करीत आहे.
chandrapur development आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मतदारसंघातील १०१ कोटी ९० लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये दीक्षाभूमी विकासकाम आणि वढा तीर्थक्षेत्राच्या विकासकामाचाही समावेश आहे.
chandrapur development मागील पाच वर्षांत आ. किशोर जोरगेवार यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी शासनाकडून मोठा निधी खेचून आणला आहे. या निधीतून शहरी भागासह ग्रामीण भागाचा विकास केला जात आहे. दरम्यान, आज आ. किशोर जोरगेवार यांनी मतदारसंघातील तब्बल १०१ कोटी ९० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन केले आहे.
आ. किशोर जोरगेवार यांचा चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासाचा संकल्पही पूर्ण झाला असून ५६ कोटी ९० लाख रुपयांतून होणाऱ्या दीक्षाभूमीच्या विकासकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तसेच वढा येथील २५ कोटी रुपयांच्या विकासकामाचेही भूमिपूजन करण्यात आले आहे. Chandrapur development
विदर्भाचे पंढरपूर मानल्या जाणाऱ्या वढा तीर्थक्षेत्राचा व्यापक विकास करण्याचा संकल्प आ. किशोर जोरगेवार यांनी केला होता. या कामासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, आणि त्याचेही आज भूमिपूजन करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख मार्गासाठी मंजूर २० कोटी रुपयांच्या कामाचेही आ. जोरगेवार यांनी भूमिपूजन केले असून, या मार्गाचे कामही तातडीने सुरू होणार आहे.
आ. किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर धानोरा बॅरेजला प्रशासकीय मान्यता
चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा गावाजवळील वर्धा नदीवर बॅरेज बांधण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी चंद्रपूर मतदारसंघाचे अपक्ष आ. किशोर जोरगेवार यांनी सातत्याने लावून धरली होती. त्यांच्या या मागणीला यश मिळाले असून, या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्यात ५ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
new voters मतदानाच्या हक्कापासून कोणीही वंचित राहू नये, मतदारांची नावे योग्यरीत्या मतदार यादीत समाविष्ट व्हावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच याबाबत जनजागृती सुद्धा करण्यात आली. त्याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यात 51393 नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली.
New voters महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वीप अंतर्गत विविध उपक्रम सुरू केले आहेत. यात युवा मतदारांमध्ये जनजागृती, प्रत्येक आठवड्यात स्पर्धा, लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस स्पर्धा, प्रभात फेरी, विविध रॅलींचे आयोजन तसेच शाळा – महाविद्यालयामध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहे. New voters
जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या :चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ असून यात 70- राजुरा, 71 –चंद्रपूर, 72 –बल्लारपूर, 73 –ब्रह्मपुरी, 74 -चिमूर आणि 75 वरोरा या मतदारसंघाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 18 लक्ष 43 हजार 540 मतदार असून यात पुरुष मतदार 9 लक्ष 36 हजार 418, स्त्री मतदार 9 लक्ष 7 हजार 74, इतर मतदार 48 यांचा समावेश आहे. राजूरा विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 167427, स्त्री मतदार – 156780, एकूण – 324209),
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 188140, स्त्री मतदार – 184280, एकूण – 372455), बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 158071, स्त्री मतदार – 153017, एकूण – 311094), ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 137589, स्त्री मतदार – 137632 एकूण – 275221), चिमूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 140670, स्त्री मतदार – 138911, एकूण – 279581), आणि राजूरा विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 144521, स्त्री मतदार – 136454, एकूण – 280980) new voters
जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्र तसेच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची संख्या : राजूरा विधानसभा मतदार केंद्रात 344 अधिक 1 मतदान केंद्र, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 390, बल्लारपूर 366, ब्रम्हपुरी 319, चिमूर 314 आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात 343 असे एकूण संपूर्ण जिल्ह्यात 2076 अधिक 1 मतदान केंद्र आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण 4636 बॅलेट युनीट, 2620 कंट्रोल युनीट आणि 2787 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. New voters
नामनिर्देशन : विधानसभा सार्वत्रिक निवडणूककरिता इच्छुक उमेदवारास नाम निर्देशन पत्र (नमुना ब) व त्यासोबत शपथपत्र (नमुना 26) परिपूर्ण भरून देणे अनिवार्य आहे. एका उमेदवारास जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र सादर करता येईल. तसेच उमेदवारास एका वेळेस जास्तीत जास्त दोन मतदारसंघातून निवडणूक लढवता येऊ शकेल. सर्वसाधारण उमेदवारास नामनिर्देशन पत्रासोबत 10 हजार रुपये रोख आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारास 5 हजार रुपये रोख जमा करणे बंधनकारक आहे.
उमेदवारास खर्चाची मर्यादा : उमेदवारास निवडणूक कालावधीत जास्तीत जास्त 40 लक्ष रुपये खर्चाची मर्यादा राखणे बंधनकारक आहे. निवडणूक कालावधीत दैनंदिन झालेल्या खर्चाचा हिशोब दररोज देणे आवश्यक असून निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संपूर्ण खर्चाचा हिशोब शपथपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे.
बाबूपेठ उड्डाणपूल
जिल्ह्यात विविध कक्ष कार्यान्वित : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर तसेच सर्व विधानसभा मतदारसंघ स्तरावर तक्रार निवारण /मतदार मदत केंद्र, एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष तसेच मतदार हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आले आहे. Election news
सी-व्हीजीलचा उपयोग करण्याचे आवाहन : निवडणूक प्रक्रियादरम्यान आचारसंहिता उल्लंघन संबंधाने कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवायची झाल्यास त्याकरिता नागरिकास सी-व्हीजील या ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविता येऊ शकेल. अशा तक्रारी प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटांच्या आत निकाली काढण्यात येईल. तसेच चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत विविध पथकांकडून /यंत्रणांकडून जप्त करण्यात येणाऱ्या अवैध रोख रक्कम, मद्य, मादक पदार्थ, फ्रीबीज इत्यादीसाठी ऑनलाईन ई.एस.एम.एस. या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.