Blog

  • Online Voter Registration : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदार आले कुठून?

    Online Voter Registration : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदार आले कुठून?

    Online Voter Registration राजुरा विधानसभा मतदार संघात अज्ञात व्यक्तिंकडून ऑनलाईन पध्दतीने मतदारांची नोंदणी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच चुकीच्या पध्दतीने नोंदणी केलेल्या 6853 मतदारांच्या नावांचा समावेश मतदार यादीत करण्यात आला नाही. दरम्यान या प्रकरणाची योग्य तपासणी करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पोलिस विभागाला दिले आहे.

    मानव वन्यजीव संघर्ष : वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

    Online Voter Registration 70-राजुरा विधानसभा मतदार संघातील मतदार यादीचा निरंतर कार्यक्रम भारत  निवडणूक आयोगाद्वारे सुरू आहे. यापुर्वी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला व राजकीय पक्षाची बैठक घेऊन 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रारुप मतदार यादी व 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी राजुरा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिध्द करण्यात आली.

    याअंतर्गत 70- राजुरा विधानसभा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यांमधून 3 ऑक्टोबर 2024 पासून मोठया प्रमाणात ऑनलाईन स्वरुपात नवीन मतदार नोंदणी करीता अर्ज प्राप्त झाले होते. सदर नोंदणी अर्जाची सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरीच्या तहसीलदारांमार्फत सखोल तपासणी करण्यात आली.

    राजकीय : विजय वडेट्टीवार यांचं पारडं जड

    त्यापैकी 6853 अर्जांमध्ये अर्जदाराचा फोटो नसणे, अर्जासोबत जन्मतारीख व  रहिवासीचा पुरावा नसणे, अर्जामध्ये नमूद नाव व पुरावा हा वेगवेगळया व्यक्तीचा असणे, एकच फोटो एकापेक्षा अधिक अर्जावर असणे, वेगवेगळया नावाने अर्ज करणे, अशा स्वरुपाचे अर्ज निदर्शनास आले.

    या सर्व अर्जांची बीएलओ मार्फत पडताळणी करून सदरचे सर्व अर्ज नाकारण्यात आले असून त्यांचा समावेश मतदार यादीमध्ये करण्यात आलेला नाही. सदरचे सर्व अर्ज हे Voter Helpline App किंवा  NVSP Portal याद्वारे Online स्वरुपात करण्यात आले होते. वास्तविकपणे वयाचे 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांकरीता मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणे, नाव कमी करणे, त्यामध्ये बदल करणे याकरीता भारत निवडणूक आयोगामार्फत ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. Online Voter Registration

    परंतु या सुविधेचा गैरफायदा घेवून काही अज्ञात व्यक्तींनी चुकीचे फॉर्म ऑनलाईन भरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन संबंधित व्यक्तिंवर कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. Online Voter Registration

    मतदार नोंदणी करीता ऑनलाईन प्राप्त झालेले 6853 अपात्र अर्ज विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून नामंजुर करण्यात आले आहेत व अशा अर्जदारांचा मतदार म्हणून मतदार यादीत समावेश करण्यात आला नसल्याचे राजुराचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी रविंद्र माने यांनी कळविले आहे.

  • sindewahi tiger attack : वाघाचा हल्ला, पुन्हा बळी

    sindewahi tiger attack : वाघाचा हल्ला, पुन्हा बळी

    sindewahi tiger attack वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर जागीच ठार, सिंदेवाही तालुक्यातील डोंगरगाव बिटातील घटना

    sindewahi tiger attack वर्षभरापासून चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, मूल, सिंदेवाही या भागात गावकरी वाघाच्या दहशतीमध्ये आले आहे. सिंदेवाही येथे वाघाच्या हल्ल्यात एकाचा बळी गेल्याची घटना आज घडली.

    राजकीय : विकासक्रांती आणि ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात विजय वडेट्टीवार यांचं पारडं जड

    ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बीट, राखीव वन कक्ष क्रमांक २५२ मध्ये एका शेतमजुरावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवारी (दि. १९) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. विलास तुळशीराम मडावी (४७, रा. डोंगरगाव) असे मृतकाचे नाव आहे.


    सध्या धान कापणी सुरू असल्यामुळे धान कापल्यानंतर त्याचे गठ्ठे बांधण्यासाठी शेतमजूर हे जंगलामधून जाऊन सिंधी कापून गोळा करतात. त्याची दोरी बनवितात. यासाठी आज डोंगरगाव येथील चार-पाच इसम जंगलामध्ये सिंधी आणायला गेले होते. गावालगत सिंधीची झुडपे असतानासुद्धा कमी वेळात जास्तीत जास्त सिंधी मिळाव्या म्हणून घनदाट जंगलात हे सर्वजण गेले. Sindewahi tiger attack

    गुन्हेगारी : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    कक्ष क्रमांक २५२ मध्ये अचानक विलास मडावी यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात विलास जागीच ठार झाला. घटनेची माहिती तत्काळ सिंदेवाही पोलिस कर्मचारी व सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांना देण्यात आली. त्यांनी वन कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. मृतदेह सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला. वनविभागाकडून तात्काळ मदत म्हणून मृतकाच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली.


    घटनास्थळी लावले कॅमेरे

    विलास मडावी याला वाघाने ज्या ठिकाणी ठार केले, त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. अशा घटना घडू नये म्हणून परिसरातील लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे, तर परिसरातील लोकांनी तात्काळ त्या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

  • Brahmapuri Assembly Constituency : विकासक्रांती मुळे विजय वडेट्टीवार यांचं पारडं जड

    Brahmapuri Assembly Constituency : विकासक्रांती मुळे विजय वडेट्टीवार यांचं पारडं जड

    Brahmapuri Assembly Constituency ब्रम्हपुरी मतदारसंघात केलेल्या “विकासक्रांतीमुळे’ वडेट्टीवारांचे पारडे जड

    Brahmapuri Assembly Constituency २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे नुकतेच बिगुल वाजले. सर्व राजकीय पक्ष होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागून उमेदवार चाचपणीत व्यस्त झाले आहे. अशातच संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात राज्याचे विरोधी पक्षनेते,काँग्रेस पक्षनेते तथा महाविकास आघाडीचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विकास क्रांतीमुळे त्यांचे पारडे जड असुन भाजप व अन्य पक्षाला या विधानसभा क्षेत्र निवडणूकीत तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवली आहे.

    महत्त्वाचे : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले हे महत्वाचे आवाहन

    राज्याच्या राजकारणात राज्याचे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून विजय वडेट्टीवार हे नाव कानाकोपऱ्यात पोहचले आहे. वनविकास महामंडळ अध्यक्ष ते राज्याचे विरोधी पक्षनेते पदापर्यंत मजल मारतांना अनेक कठीण परिश्रम घेणाऱ्या वडेट्टीवारांनी जनतेच्या मूलभूत गरजा, क्षेत्राच्या अडचणी, क्षेत्रात सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती, व सामजिक गरजा लक्षात घेत सर्व धर्म, सर्व समाज यांना न्याय देऊन मतदारांची मने जिंकली. (Brahmapuri Assembly Constituency)

    चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यांतील करंजी हि त्यांची जन्म भूमी असली तरी वडिलांचे छत्र हरपल्या नंतर गडचिरोली येथे त्यांच्या कुटुंबाचे स्थानांतर झाले. अगदी कमी वयात लोकसेवा करण्यासाठी दुर्गम गडचिरोली जिल्हा पिंजून काढून अनेक प्रश्नांना घेऊन त्यांनीं आंदोलने केली. व जनतेसाठी तुरुंगवास देखील भोगला. यानंतर त्यांनीं चिमूर विधानसभेवर विजय मिळवला. तर मागील दहा वर्षापासून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे ते प्रतिनिधित्व करीत आहे. (Brahmapuri Assembly Constituency)

    झुडपात खेळ सुरू, 7 जणांना अटक


    राजकारणा पुरते राजकरण मात्र उर्वरित वेळेत क्षेत्राचा सर्वांगिण विकास , जनतेच्या मूलभूत समस्या, आरोग्याच्या समस्या, शुद्ध पेयजल, उच्च प्रतीचे प्रवास मार्ग, सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांच्या हाती काम, आरोग्य शिबिरे,शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वाचनालये, क्रीडा पट्टू साठी क्रीडा मैदाने व ईतर गरजा पूर्ण करीत क्षेत्राचा विकास साधण्यात त्यांनीं कुठलीही कसर सोडली नाही.

    २०१४ च्या निवडणुकांमध्ये संपूर्ण देशात मोदी लाट असताना व खुद्द मोदी हे ब्रम्हपुरी येथे प्रचार सभेसाठी आले असतांनाही जनतेनी पुर्ण ताकदीनिशी वडेट्टीवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विजयश्रीची माळ त्यांच्याच गळ्यात घातली. आज घडीला काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात कुठला उमेदवार द्यावा असा पेच विरोधकांपुढे उभा ठाकला आहे.

    गेल्या १० वर्षात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात गोसेखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यातून मुबलक पाणी क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिले. यामुळें ब्रम्हपुरी मतदार संघातील सावली, ब्रम्हपुरी, व सिंदेवाही या तीनही तालुक्यांतील ८० टक्के शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली येऊन समृद्ध शेती कडे वाटचाल सुरू आहे. या सर्व विकासात्मक दूर दृष्टिकोना मुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात विजय वडेट्टीवार यांचेच पारडे जड असुन विरोधी पक्षांच्या उमेदवारांना येथे आगामी निवडणुकांमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. हे तेवढेच सत्य…!

  • Election campaign 2024 : वरोरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आवाहन

    Election campaign 2024 : वरोरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आवाहन

    Election campaign 2024 भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. त्याकरीता 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघांतर्गत निवडणूक प्रक्रियेत प्रचार रॅली, मिरवणुका व सभेकरिता परवानगी मिळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षेत स्थापन करण्यात आलेल्या एक खिडकी परवानगी कक्षामध्ये अर्ज सादर करण्यात येतो, परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शन पुस्तिकेनुसार नमूद केलेल्या अटीच्या अधीन राहून परवानगी प्रदान करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.

    चंद्रपूर मनपाने 2 हजार 60 किलो प्लॅस्टिक केले जप्त

    Election campaign 2024 परवानगी मागणारा राजकीय पक्ष / उमेदवार निर्धारित नमुन्यात जोडपत्र ड -एक खर्च योजनांच्या तपशीलासह 48 तास आधी संबंधित निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात परवानगीसाठी कक्ष प्रभारीकडे अर्ज करेल. कोणत्याही राजकीय पक्षास / /उमेदवारास अर्ज केल्याच्या सात दिवसाच्या आत आयोजित करावयाचे कार्यक्रम / प्रचार यात्रा / मिरवणुका यासंदर्भात परवानगीसाठी अर्ज करता येईल. एका विशिष्ट दिवसासाठी एकापेक्षा जास्त कार्यक्रमासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

    जंगलातील झुडपात जुगार, स्थानिक गुन्हे शाखेने मारली धाड

    त्यानुसार 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शन पुस्तिकेतील नमूद अटींच्या अधीन राहून निवडणूक प्रक्रियेत प्रचार रॅली, मिरवणुका व सभेबाबत परवानगी अर्ज सादर करण्यात यावा, असे आवाहन वरोराच्या उपविभागीय अधिकारी तथा वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी दोन्तुला जेनित चंदा यांनी केले आहे.

    आवाहन

  • Nuisance Investigation Team : चंद्रपूर मनपाची मोठी कारवाई

    Nuisance Investigation Team : चंद्रपूर मनपाची मोठी कारवाई

    Nuisance Investigation Team चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर धडक कारवाई सुरूच असुन उपद्रव शोध पथकाद्वारे शहरात २ जागी कारवाई करून सुमारे २ हजार ६० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदारांच्या नोंदणी

    Nuisance Investigation Team  बंदी असलेल्या व एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार ८ टीम्स बनविण्यात आल्या आहेत. या सर्व चमूंनी काल शहरात एकाच वेळी कारवाई सुरु केली. यात पठाणपुरा येथील वाडी गोल्ड ट्रान्सपोर्ट तसेच बिनबा गेट येथील कुमार ट्रान्सपोर्ट या दोन्ही गोडाऊनवर संध्याकाळच्या सुमारास उपायुक्त रवींद्र भेलावे व सहायक आयुक्त अक्षय गडलिंग यांच्या वेगवेगळ्या चमुने धाड टाकत वाडी गोल्ड ट्रान्सपोर्ट येथुन २ हजार १० किलो तर कुमार ट्रान्सपोर्ट येथुन ५० किलो असे एकुण २ हजार ६० किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त केले. 

    गुन्हेगारी : चंद्रपूर मेडिकल कॉलेज च्या मागील झुडपात सुरू होता हा खेळ  

    यावेळेस सुद्धा या गोडाऊन संबंधी गुप्त माहिती मनपास प्राप्त झाली होती. प्लास्टीक साठा,पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येत असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जात असल्याने अनेक सुजाण व्यक्तींकडुन अवैध साठ्यासंबंधी तक्रारी मनपास प्राप्त होत आहेत. Nuisance Investigation Team

         एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.


         सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भेलावे व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त अक्षय गडलिंग,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, डॉ. अमोल शेळके,राहुल पंचबुद्धे,स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, जगदीश शेंद्रे,मनीष शुक्ला,अनिल खोटे, भरत बिरिया,डोमा रंगारी, बंडू चहारे, विक्रम महातव,डोमा विजयकर,अमरदीप साखरकर यांनी केली.

  • Bogus Matdar : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदारांच्या नोंदणी

    Bogus Matdar : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदारांच्या नोंदणी

    bogus matdar चंद्रपूर – नुकतेच जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 51 हजार 393 नव्या मतदारांची नोंदणी झाल्याचा गवगवा केला मात्र यामध्ये काही बोगस मतदारांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.


    Bogus matdar कोरपना तालुक्यात शहरात व ग्रामीण भागातील 52 गावातील एकूण 62 बुथवर हजारो बोगस मतदारांची ऑनलाइन नोंदणी झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे बोगस ऑनलाईन नोंदणी झालेले सर्व मतदार हे परप्रांतीय असल्याचे आडनावावरून दिसून येते. यात यादव, परमार, पांडे अशी नावे आहेत.

    गुन्हेगारी : चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या मागे सुरू होता हा खेळ, 7 जणांना अटक


    निवडणूक आयोगाच्या प्राथमिक चौकशीदरम्यान या मतदार नोंदणीतील अनियमितता उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे आगामी निवडणुकीच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Bogus matdar

    आदर्श आचारसंहिता : बनावट दारू व ट्रॅव्हल्स ची चौकशी करा

    यात तालुक्यातील गडचांदूर, कोरपना, लखमापूर, नांदा, बिबी, बाखर्डी, आवाळपूर, उपरवाही या मोठ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावांची नोंद झालेली आहे. तर गेल्या 10 ऑक्टोंबर पर्यंत कोरपना तालुक्यात 3 हजार बोगस मतदार असल्याचं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं असून हा आकडा निश्चितच वाढणार आहे.

    बोगस नोंदणी कशी उघड झाली?

    मतदार यादीतील नावे आणि नोंदणीकृत माहितीची सखोल छाननी सुरू असताना काही स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर प्रशासनाने मतदार यादी तपासली असता, अनेक बोगस मतदारांची नोंदणी आढळली. हजारो परप्रांतीयांची नावे, खोटा मोबाईल क्रमांक व बनावट पत्ते आणि जन्मतारीख या नोंदवलेल्या मतदार यादीत आढळल्या आहेत. विशेष म्हणजे बहुतांश ऑनलाईन अर्ज रात्री 12.00 वाजताच्या नंतर भरण्यात आल्याचे दिसून आले.

    मी दोनदा लखमापूर ग्राम पंचायत उपसरपंच आहे मात्र 328 नवे मतदार एकच वेळेस नोंदणी झालेली ही पहिली वेळ आहे. आणि ते मतदार माझ्या गावात राहत नाही हे सर्व बोगस मतदार आहे याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आहे.

    प्रतिक्रिया – मोरेश्वर आस्वले उपसरपंच (लखमापूर)

  • Confiscation of banned plastic : अवैध प्लॅस्टिक ची वाहतूक मनपाने केली कारवाई

    Confiscation of banned plastic : अवैध प्लॅस्टिक ची वाहतूक मनपाने केली कारवाई

    Confiscation of banned plastic चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास रामाळा तलावाजवळ ४०७ या वाहनाद्वारे अवैध प्लास्टीकची वाहतुक करणाऱ्या प्रवीण काशिनाथ कांबळे यांच्यावर कारवाई करून ३७४ किलो प्लास्टीक जप्त केले आहे.

    बनावट दारू आणि ट्रॅव्हल्स ची चौकशी करा – जिल्हाधिकारी गौडा


      Confiscation of banned plastic आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार प्लास्टीक निर्मुलन कारवाईसाठी ८ पथक तयार करण्यात आले होते. यातील सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणातील पथकास ४०७ या गाडीतुन मोठ्या प्रमाणात प्लास्टीकची वाहतुक केली जात असल्याची गुप्त माहीती मिळाली. माहितीच्या आधारे पाहणी केली असता २२ किलो वजनाचे १७ पोते या गाडीत आढळुन आले. बंदी असलेल्या प्लास्टीकचा साठा केल्याने सदर माल जप्त करण्यात आला असुन साठा मालकास ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.


        एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.


         सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भेलावे  व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, डॉ. अमोल शेळके,राहुल पंचबुद्धे,स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, जगदीश शेंद्रे,मनीष शुक्ला,अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे, विक्रम महातव, डोमा विजयकर,अमरदीप साखरकर यांनी केली.

  • spurious liquor : बनावट दारू व ट्रॅव्हल्स ची चौकशी करा – जिल्हाधिकारी गौडा

    spurious liquor : बनावट दारू व ट्रॅव्हल्स ची चौकशी करा – जिल्हाधिकारी गौडा

    spurious liquor महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – 2024 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी नियोमी साटम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जीएसटीचे सहायक आयुक्त मोहन खोब्रागडे, आयकर अधिकारी सुरेश चौधरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : त्या दोघांसाठी आमदार जोरगेवार ठरले देवदूत

    spurious liquor यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मुक्त आणि पारदर्शक वातावरणात सदर निवडणुका घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या सुचना आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अतिशय चोख असणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आयकर विभाग, केंद्रीय व राज्य जीएसटी विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, रेल्वे पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस विभाग, वन विभाग व इतर यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेच्या नोडल अधिका-यांशी नियमित संपर्क ठेवावा तसेच समन्वयातून काम करावे.

    अवैध रक्कम, दारूचा पुरवठा, संशयित बाबी, ड्रग्ज आदी बाबींच्या जप्तीबाबत निवडणूक आयोगाच्या अतिशय सक्त सुचना आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजाणी करावी. महाराष्ट्र हे प्रगत राज्य असल्यामुळे इकडून तिकडे पैशाची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांनी दक्ष असावे. आपापल्या सुत्रांच्या माध्यमातून गोपनीय माहिती मिळविण्यावर भर द्यावा व योग्य कारवाई करावी. जिल्ह्याच्या सीमेलगतच्या चेक पोस्टवर त्वरीत अधिकारी – कर्मचा-यांची नियुक्ती करावी. तपासणी दरम्यान एखादे वाहन पकडले तर त्याचा पुर्वइतिहास तपासावा. जिल्ह्यात येणारे पार्सल तसेच बस आणि ट्रॅव्हल्समधून होणारी पार्सल वाहतूकीची तपासणी करावी. spurious liquor

    गुन्हेगारी : स्थानिक गुन्हे शाखेने पकडला 20 लाखांचा सुगंधित तंबाखू

    विविध विभागांनी करावयाची कारवाई : निवडणूक प्रक्रियेदरम्यान संशयीत बाबींची जप्ती प्रकरणे वाढविणे आवश्यक आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोपनीय माहिती गोळा करावी. अवैध व बनावट दारुवर गांभिर्याने लक्ष ठेवावे. गुटखा, ड्रग्ज प्रतिबंधित वस्तुंची तपासणी करावी. जिल्ह्यात अचानक एखाद्या वस्तुची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असल्यास जीएसटी विभागाने सदर बाब प्रशासनाला कळवावी. आयकर विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाने नागपूर, हैद्राबाद, छत्तीसगड मधून येणा-या ट्रॅव्हल्स चेक कराव्यात. सर्व बँकांनी संशयास्पद व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावे. अचानक मोठ्या प्रमाणात पैशांचे व्यवहार होत असेल तर निवडणूक खर्च पथकाला माहिती द्यावी. पैसे ट्रान्सफर करतांना संबंधितांची कागदपत्रे अधिकृत असल्याची खात्री करावी. (spurious liquor)

    उपविभागीय पोलिस अधिका-यांसाठी विशेष सुचना : मतदान यंत्र व स्ट्राँग रुमच्या सुरक्षाकवचाला सर्वोच्च प्राधान्य असावे. पोलिसांनी आवश्यक सुरक्षाव्यवस्था पुरवावी. यात कोणताही निष्काळजीपणा होऊ देऊ नये. नामांकन प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात केवळ 3 वाहनांना परवानगी द्यावी तसेच उमेदवारांसह एकूण पाच व्यक्तिंनाच आतमध्ये प्रवेश द्यावा. स्ट्राँग रुमला दिवसातून दोन वेळा नियमित भेट देऊन पाहणी करावी. प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही चेक करावे. मतदान केंद्रावर तैनात असलेल्या पोलिस अधिका-यांना सर्व सुचनांबाबत अवगत करावे व प्रशिक्षण द्यावे.

  • Popular Devdoot : त्या दोघांसाठी आमदार जोरगेवार ठरले देवदूत

    Popular Devdoot : त्या दोघांसाठी आमदार जोरगेवार ठरले देवदूत

    Devdoot आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन रुग्णांना एकूण 2 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. हिप रिप्लेसमेंट आणि अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांवर आता नागपूर येथे उपचार होणार आहेत. मदत मिळालेल्या रुग्णांमध्ये घुग्घूस येथील चिराग बेले (18) आणि चंद्रपूर येथील सुनिता कुंटावार यांचा समावेश आहे.

    महत्त्वाचे : 30 नोव्हेंबर रोजी विशेष लोक अदालत चे आयोजन

      Devdoot चिराग बेले या 18 वर्षीय युवकाला हिप रिप्लेसमेंट करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते, परंतु आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्याच्या कुटुंबाने आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे मदतीची मागणी केली. आमदार जोरगेवार यांनी तातडीने पुढाकार घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीतून चिरागच्या शस्त्रक्रियेसाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली.

    तसेच, चंद्रपूरच्या सुनिता कुंटावार यांचा अपघात झाल्याने त्यांना गंभीर दुखापतींचा सामना करावा लागत होता. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठीही आमदार जोरगेवार यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे.

    आता दोन्ही रुग्णांवर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात योग्य उपचार होणार असून, त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहेत. यापूर्वीही आमदार जोरगेवार यांनी मतदारसंघातील अनेक गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून दिली आहे, ज्यामुळे त्यांना उपचार घेण्यासाठी आवश्यक आर्थिक आधार मिळाला आहे.

  • Special Lok Adalat : 30 नोव्हेंबर रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन

    Special Lok Adalat : 30 नोव्हेंबर रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन

    Lok Adalat महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या  निर्देशानुसार उच्च न्यायालय,  खंडपीठ नागपूर येथे 30 नोव्हेंबर 2024 रोजी तसेच औरंगाबाद खंडपीठ येथे 1 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

    महत्त्वाचे : विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर, तक्रार करा

    Lok Adalat विशेष लोक अदालतीमध्ये उच्च  न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले जाणार आहेत. चंद्रपूर जिल्हयातील पक्षकारांची प्रकरणे उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे प्रलंबित असल्यास व ती तडजोडीने मिटावी, अशी इच्छा असल्यास ते प्रकरण विशेष लोक अदालतीमध्ये ठेवता येऊ शकते. विशेष लोक अदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने  सहभाग घेवू शकतात.

    विशेष लोक अदालतीचे फायदे :  साध्या व सोप्या पद्धतीने वाद मिटवता येतो. झालेल्या तडजोडीचा निवाडा अंतिम व अंमलबजावणी होऊ शकणारा असतो. वेळेची व पैशाची बचत होते. तडजोड झाल्यास न्यायालयीन शुल्क परत मिळते.

    चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, विशेष लोक अदालतीमध्ये प्रकरणे ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहिती  हवी असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर किंवा संबंधीत तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भीष्म यांनी केले आहे.