rotavator machine : रोटाव्हॅटर मशीन मध्ये अडकला मजूर आणि झाले तुकडे

rotavator machine
rotavator machine रोटाव्हेटर मध्ये अडकून मजुराचा जाग्यावर मृत्यू, शरीराचे झाले तुकडे, कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील घटना

rotavator machine 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात धक्कादायक घटना घडली, सकाळी चिखल साफ करण्यासाठी गेलेल्या मजुराचा रोटाव्हॅटर मशीन मध्ये अडकून मृत्यू झाला, यावेळी त्या मजुराच्या शरीराचे तुकडे झाले. 45 वर्षीय रमेश शामराव टेकाम असे मजुराचे नाव आहे.

महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यातील 51 हजार 393 नवे मतदार यंदा बजावणार मतदानाचा हक्क

गोठ्यात ठेवलेले ट्रॅक्टर सुरू करण्यासाठी ट्रॅक्टर चालक/मालक रवींद्र गोपळ वडस्कर व मजूर रमेश टेकाम गेले तेव्हा चालकांनी ट्रॅक्टर सुरू केलं आणि मजूर रमेश टेकाम रोटाव्हेटर मध्ये ओढला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला असे स्थानिककडून सांगण्यात येत आहे. गडचांदूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करीत आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *