Chandrapur Forest Academy GRIHA 3-star rating : चंद्रपूर, दि. १५ (News३४) : पर्यावरणपूरक उपक्रम आणि ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चंद्रपूर वन अकादमीला GRIHA कौन्सिल, टेरी (TERI), नवी दिल्ली यांच्याकडून थ्री स्टार मानांकन प्रदान करण्यात आले आहे. अकादमीने गेल्या काही वर्षापासून राबविलेल्या पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासावर आधारित उपाययोजनांमुळे पुढीलप्रमाणे बचत साध्य झाली आहे. यात वीज बचत 4597 मेगावॅट प्रति तास प्रति वर्ष, हरितगृह वायू उत्सर्जन घट 3769 मेट्रिक टन, कार्बन डॉयऑक्साईड समतुल्य प्रति वर्ष, पाणी बचत 199110 किलोलीटर प्रति वर्ष.
देशातील एकमेव वन प्रशिक्षण संस्था तसेच महाराष्ट्रातील एकमेव शासकीय प्रशिक्षण संस्था म्हणून या सन्मानाने चंद्रपूर वन अकादमीने इतिहास रचला आहे. हा सन्मान महाराष्ट्र वन विभागाच्या मुकुटातील आणखी एक मानाचा तुरा ठरला असून राज्यातील पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने हे एक प्रेरणादायी पाऊल मानले जात आहे.
या यशाचे श्रेय वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, अपर संचालक (प्रशिक्षण) उमेश वर्मा व इतर अधिकारी कर्मचारी यांना दिले जाते. संचालक रेड्डी त्यांच्या दूरदृष्टी, पर्यावरणाबद्दलची संवेदनशील दृष्टी व अथक प्रयत्न आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच ही अभूतपूर्व कामगिरी साध्य झाल्याचे अपर संचालक उमेश वर्मा यांनी कळविले आहे.
Bihar Assembly NDA victory celebration : चंद्रपूर १४ नोव्हेम्बर (News३४) – बिहार विधानसभेतील एन.डी.ए. गटबंधनच्या भव्य विजयानिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे शहरातील गांधी चौक येथे जल्लोष साजरा करण्यात आला. विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात लाडू वाटप करत संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून सोडला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताश्याच्या गजरात लाडू वाटप करत विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी घुग्घूस आणि पडोली येथे ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, वंदना हातगावकर, महामंत्री रवींद्र गुरुनुले, मनोज पाल, श्याम कनकम, सविता दंढारे, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर हेपट, मंडळ अध्यक्ष रवि जोगी, प्रदीप किरमे, स्वप्निल डुकरे, सुभाष अदमाने, अॅड. सारिका संदुरकर, युवा मोर्चा महिला महामंत्री सायली येरणे, पुष्पा उराडे, प्रज्ञा बोरगमवार, वंदना तिखे, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष राशिद हुसेन, कौसर खान, आदिवासी आघाडी अध्यक्ष जितेश कुळमेथे, अमोल शेंडे, माजी नगरसेवक संदीप आवारी, अरुण तिखे, देवानंद वाढई, विठ्ठल डुकरे, शितल आश्रम, राजेंद्र अडपेवार, भाग्यश्री हांडे, मुग्धा खांडे, राकेश बोमनवार, सुदामा यादव, उग्रसेन पांडे, रंजन ठाकुर, शेखर शेट्टी, जयश्री आश्रम यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. Bihar Assembly NDA victory celebration
यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, बिहारच्या जनतेने विकास, स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासन यांना प्राधान्य देत एन.डी.ए. आघाडीला मोठा जनादेश दिला आहे. आम्ही बिहारच्या जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. हा विजय बिहारच्या विकासयात्रेत नवा अध्याय ठरेल, असा पूर्ण विश्वास आहे. बिहारमध्ये मिळालेला हा ऐतिहासिक विजय म्हणजे केवळ एखाद्या राजकीय पक्षाचा विजय नाही, तर तो देशातील सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षांचा, विकासाच्या दिशेने जात असलेल्या राष्ट्राच्या सामूहिक इच्छाशक्तीचा विजय आहे.
भारतामध्ये विकास, सुशासन आणि पारदर्शक नेतृत्वालाच जनतेचा आशीर्वाद मिळतो, हे बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. आज चंद्रपूरमध्ये आपण जल्लोष करत असलो तरी हा जल्लोष आपल्या विचारांचा, आपल्या राष्ट्रनिष्ठेचा आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या समर्पित परिश्रमांचा सुद्धा आहे. बिहारमधील विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर असलेल्या जनतेच्या अपार विश्वासाचा पुरावा आहे. Bihar Assembly NDA victory celebration
मोदीजींनी देशाला विकासाच्या नवीन वाटा दाखवल्या, गरीब कल्याणाच्या योजना घराघरात पोहोचवल्या आणि देशात नवी ऊर्जा निर्माण केली. त्या ऊर्जेचे प्रतिबिंब बिहारमध्ये स्पष्टपणे दिसून आले.ना. अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकार्यातील दृढनिश्चयी नेतृत्वाचे हे प्रतीक असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी घुग्घूस आणि पडोली येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने फटाके फोडून, ढोल-ताश्याच्या गजरात मिठाई वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला.
Gadchandur crime news updates : चंद्रपूर १४ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातील शेतशिवारात गांजा विक्री सुरु होती, पोलिसांना याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यावर २ आरोपीना अटक करीत २ किलो ११ ग्राम गांजा जप्त करण्यात आला.
गडचांदूरातील बैलमपूर मार्गावरील वरझडी शेतशिवारात गांजा विक्री सिरी आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी पथकासह त्याठिकाणी धाड मारली, त्याठिकाणी २ इसम पोलिसांना आढळले, त्यांची चौकशी केली मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, पोलिसांनी शेतशिवारात शोधमोहीम राबवली असता एक गाठोडं पोलिसांच्या हाती लागले, त्यामध्ये हिरवट रंगाची पाने, फुले व बोन्डे असलेल्या गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळले.
ताब्यात घेतलेल्या इरफान सय्यद इस्माईल राहणार गडचांदूर व अनिल जगेराव आडे राहणार बैलमपूर यांनी सदर वनस्पती हि गांजा असल्याचे सांगत ती विक्री करण्यासाठी आणले असल्याची कबुली दिली. आरोपींवर गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सण १९८५ चे कलम ८ (क), २० (ब)(ii)(ब) अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गडचांदूर पोलिसांनी २० हजार ११० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त केला. Gadchandur crime news updates
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोउपनि पंकज हेडाऊ, पोलीस कर्मचारी शीतल बोरकर, बळवंत शर्मा, प्रकाश बाजगीर, सूरज ढोले, मनोहर जाधव व साईनाथ उपरे यांनी केली.
Heavy rainfall crop damage assistance : चंद्रपूर १४ नोव्हेम्बर (News३४) : अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने चंद्रपूर जिल्हात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या नेतृत्वात निवासी जिल्हाधिकारी कुंभार साहेब यांचे कडे निवेदन सादर केले आहे. चंद्रपुर तालुक्यातील १२६५ नुसकानग्रस्त शेतकऱ्यांचे अतीवृष्टीची मदत निधी प्रलंबित आहे. त्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज काढण्याची वेळ आली आहे.
चंद्रपूर जिल्हात अतिवृष्टी मुळे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपुर तालुक्यातील नुकसान झालेल्या १२६५ शेतकऱ्यांना अजुन पर्यंत शेतकऱ्याला अतीवृष्टी ची रक्कम खात्यात आली नाही आहे. महसुल व वन विभागा अतंर्गत दि. १० ऑक्टोंबर २०२५ च्या महाराष्ट्र शासन निर्णयात ज्या शेतकऱ्याची अग्रीस्टॅक मध्ये नोदणीं नाही, अशाना सुद्धा नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे, असे शासन निणर्यात नमुद आहे. मात्र त्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही.
शेतकऱ्यांना त्वरीत अतिवृष्टीची रक्कम देण्यात यावी ही मागणी गणेश आवारी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर, गिरीश मुसळे,देविदास येरगुडे,योगेश्वर पिपंळकर, बंडू बेरड विनोद पिंपळकर, नामदेव पिंपळकर, रंगराव पवार, रामकिसन पाचभाई, देविदास येरगुडे, गणेश येरगुडे, आशिष मुसळे, विठ्ठल पिपळकर रामराव देवतळे यांचेसह नुसकानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
Ramala Lake conservation project Chandrapur : चंद्रपूर: शहराचा प्राचीन वारसा आणि पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला रामाळा तलाव संवर्धनाच्या दृष्टीने शासनाने सुरू केलेल्या कामाला त्वरित गती देण्याची मागणी इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात रामाळा तलाव संवर्धनाच्या मागणी करिता संस्थेने अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन केले होते, ज्यानंतर प्रशासनातर्फे तलाव संवर्धनाच्या कामास सुरुवात झाली होती.
रामाळा तलाव संवर्धनाचा पहिला टप्पा: कामाचा दर्जा आणि गती राखणे आवश्यक इको-प्रो संस्थेने निवेदनात नमूद केले आहे की, जनआंदोलनाची दखल घेत रामाळा तलावाच्या संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यातील कामे मंजूर होऊन सुरूवात झाली आहेत. यामध्ये एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) आणि रिटेनिंग वॉल (संरक्षक भिंत) बांधकामाचा समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या या कामांना आता पावसाळ्यानंतर तातडीने गती देणे आणि कामाचा दर्जा राखणे अत्यंत आवश्यक आहे. या कामाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना योग्य निर्देश देण्याची मागणी संस्थेने केली आहे. Ramala Lake conservation project Chandrapur
रामाळा तलाव संवर्धन दुसरा टप्पा – रामाळा उद्यानाचे पुनरुज्जीवन अत्यावश्यक
पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर रामाळा उद्यानाचे पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणाचा दुसरा टप्पाचे नियोजन करणे त्वरित सुरू करण्याची आवश्यकता इको-प्रोने व्यक्त केली आहे. सध्या शहराच्या मध्यवर्ती भागातील हे उद्यान अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत असून, येथील सुविधांची संरचना खंडहर स्वरूपात असल्याने नागरिकांसाठी ते निरुपयोगी ठरत आहे. यासाठी इको-प्रोने खालीलप्रमाणे प्रमुख मागण्या केल्या आहेत.
रामाळा उद्यान सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव आणि आराखडा
रामाळा उद्यान सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याच्या प्रशासनाच्या नियोजनाला गती देण्यासाठी आणि सुधारित आराखडा त्वरित तयार करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश द्यावेत.
फुट ब्रिज बांधकाम
रामाळा तलावाच्या दक्षिणेकडील बाजूस उद्यानात जाण्यासाठी मंजूर असलेल्या फुट ब्रिजचे बांधकाम पुरातत्व विभागाशी समन्वय साधून आणि आवश्यक सुधारणा करून तातडीने सुरू करावे. Ramala Lake conservation project Chandrapur
अतिक्रमण नियंत्रण आणि पर्यावरणीय उपाययोजना
तलावाचे दीर्घकाळ संवर्धन करण्यासाठी संस्थेने काही महत्त्वाच्या पर्यावरणीय आणि अतिक्रमण नियंत्रण उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे:
मियावाकी वन – वृक्षारोपण
तलावाच्या उत्तरेकडील, पूर्वी तलावाचाच भाग असलेल्या मोकळ्या जागेचा वापर ‘मियावाकी’ पद्धतीने वृक्षारोपण करून ही जागा अतिक्रमणापासून वाचवावी. यावर मागील अनेक बैठकांमध्ये चर्चा झालेली होती, त्याचा पुढील नियोजनात समावेश करावा.
अतिक्रमण रोखण्यासाठी रिटेनिंग वॉल तलावाच्या पूर्व दिशेस असलेल्या वस्तीकडून होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी रिटेनिंग वॉलचे बांधकाम करावे.
मच्छी नाल्याचे बांधकाम रामाळा तलावात येणारा मच्छी नाला झरपट नदीकडे वळविण्यासाठी नाला बांधकामाचा प्रस्ताव तयार करावा. या उपायामुळे तलावाचे संवर्धन होईल आणि पावसाळ्यात जलनगर परिसरात होणारी पाणी तुंबण्याची समस्या दूर होईल.
ऐतिहासिक वारसा जतन तलावाला लागून असलेली किल्ला भिंत आणि तलावाची पार म्हणून असलेली भिंत याची दुरुस्ती अत्यावश्यक असून, पुरातत्व विभागाकडून पाऊले उचलली गेली नसल्याने याबाबत पाठपुरावा करावा. Ramala Lake conservation project Chandrapur
रेल्वे स्टेशनवरील प्रदूषणावर नियंत्रण रेल्वे स्टेशनवर उतरवल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे लोडिंग-अनलोडिंग दरम्यान जमिनीवर पडणारे आणि पावसाळ्यात तलावात वाहून येणारे प्रदूषण थांबवण्यासाठी रेल्वेच्या साईडिंग बांधकामासोबतच त्यांच्याकडून योग्य उपाययोजना करण्यात यावी यासाठी योग्य निर्देश देण्यात यावे.
इको-प्रो संस्थेच्या या मागण्यांमुळे चंद्रपूर शहरातील या ऐतिहासिक जलस्रोताचे संवर्धन होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडेल, तसेच शहराच्या मधोमध नागरिकांना एक सुंदर आणि सुरक्षित वारसास्थळ उपलब्ध होईल.
municipal polls BJP candidate shortage : भद्रावती : राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या भारतीय जनता पक्षाला भद्रावती नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीवरून मोठी अडचण (गोची) निर्माण झाली आहे. शिवसेनेतून आलेल्या अनिल धानोरकर यांना पक्षात घेतल्यानंतर स्थानिक पातळीवर भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीवरून मोठा संभ्रम आणि नाराजी पसरल्याचे चित्र आहे. या ‘आयारामां’च्या राजकारणामुळे मूळ भाजप कार्यकर्त्यांना डावलले जाण्याची भीती असल्याने अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचे वृत्त आहे.
परिणामी, भाजपसमोर नगरसेवक पदाकरिता तिकीट देण्यासाठी उमेदवारांची मोठी वानवा निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे भाजपला आता आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या, म्हणजेच काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांना पक्षाचे तिकीट देण्यासाठी थेट गळ घालावी लागत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या उमेदवारीची ही बिकट स्थिती दूर करण्यासाठी खुद्द आमदार करण देवतळे आणि माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे नवनिर्वाचित नेते अनिल धानोरकर यांना एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरी जावे लागले. या नेत्यांनी त्या नगरसेवकाला भाजपचे तिकीट घेण्यासाठी विनंती केल्याचे चित्र सध्या भद्रावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. अनिल धानोरकर यांच्या प्रवेशानंतर भाजपला स्थानिक पातळीवर ताकद मिळेल अशी अपेक्षा होती, पण आता उमेदवारी वाटपात झालेले हे नाट्य भाजपसाठी ‘गोची’ (अडचण) ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. municipal polls BJP candidate shortage
भाजपच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह
एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेचे आकडे गाठण्यासाठी भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना, भद्रावतीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत तिकीट वाटपासाठी त्यांना ‘स्थापित’ चेहऱ्यांची ‘भीक’ मागावी लागणे, हे भाजपच्या स्थानिक संघटनेतील कमजोरीचे स्पष्ट संकेत देत आहे. भाजपच्या या रणनीतीवर आता राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या सगळ्या प्रकारामुळे भद्रावती शहरातील निवडणुकीची रंगत वाढणार असून, काँग्रेसचे ते नगरसेवक भाजपच्या विनंतीला मान देतात की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
याउलट परिस्थिती हि चंद्रपूर शहरात आहे, भाजप कडे उमेदवार आहे मात्र तो समर्थक कुणाचा हे महत्वाचे आहे, कारण यंदाची निवडणूक हि जोरगेवार यांच्या नेतृत्वात लढणार आहे, सुधीर मुनगंटीवार यांचे संस्थक माजी नगरसेवक यांना तिकीट मिळणार कि नाही यामध्ये सध्या तरी मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
constitutional discussion event Lord Buddha TV : चंद्रपूर १३ नोव्हेम्बर (News३४) : भारतातील एकमेव आंबेडकराईट बुद्धिस्ट टेलिव्हिजन चैनल लॉर्ड बुद्धा टिवी या वर्षी आपल्या गौरवशाली प्रवासाची १५ वर्षे पूर्ण करत आहे. विशेष म्हणजे, भारतीय संविधानालाही या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असून, या दुहेरी सोहळ्याचे औचित्य साधत लॉर्ड बुद्धा टिवी आणि राजकुमार बड़ोले फाउंडेशन एक भव्य प्रबोधनात्मक उपक्रम हाती घेतला आहे.
१५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सन्मान बाबासाहेबांचा, जागर संविधानाचा हा वैचारिक महोत्सव महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. दररोज सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत होणाऱ्या या चंद्रपूर येथील महाचर्चेत प्रख्यात बहुजन विचारवंत मराठा सेवा संघाचे आयु प्रा.दिलीप चौधरी,ॲड. वैशाली टोंगे ओबीसी अभ्यासक, ॲड.राजस प्रवीण खोब्रागडे चंद्रपूर, ॲड. सत्यपाल कातकर पत्रकार,संविधान तज्ञ ॲड.पुनम वाघमारे /उमरे अधिवक्ता हे भारतीय संविधान- समतेचा पाया आणी डाॅ.बाबासाहेबांचा दृष्टिकोण या विषयावर सहभाग घेत असून सामाजिक कार्यकर्ते ,संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर प्रकाश टाकणार आहेत. constitutional discussion event Lord Buddha TV
या वैचारिक प्रवासाचा शुभारंभ १५ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे होणार असून त्यानंतर हा कार्यक्रम चंद्रपूर,येथे दि.16 नोव्हेंबर 2025 रोज रविवार ला सिद्धार्थ बुद्ध विहार तुकूम चंद्रपूर येथे सायं 6 ते 9 वा. विषय – भारतीय संविधान – समतेचा पाया आणि डॉ. बाबासाहेबांचा दृष्टिकोण या विषयावर महाचर्चा आयोजित करण्यात आली आहे असून अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, पुणे, कोल्हापूर अशा प्रमुख जिल्ह्यांत पार पडणार आहे. समारोपाचा भव्य कार्यक्रम २६ नोव्हेंबर संविधान दिनी छाया-आकांक्षा (लाइव इन कॉन्सर्ट) भीम गीतांचा सुपरहीट कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मंत्रालयाजवळ) आयोजित करण्यात आला आहे. constitutional discussion event Lord Buddha TV
लॉर्ड बुद्धा टिवीचे प्रक्षेपण सध्या भारतातील २२ राज्यांमध्ये विविध केबल नेटवर्कच्या माध्यमातून २४ तास सुरू आहे. तसेच हा चैनल ओटीटी वर, मोबाइल अॅप वर, स्मार्ट टीव्ही आणि यूट्यूबवर देखील जगभरात उपलब्ध आहे. लॉर्ड बुद्धा टिवीची सुरुवात २६ नोव्हेंबर २०१० रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून झाली होती — आणि तेव्हापासूनच हे चैनल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बौद्ध धम्म आणि सामाजिक परिवर्तनाचे कार्य सातत्याने जनतेपर्यंत पोहोचवत आहे.
“भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महान योगदानाचा जागर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविणे हेच या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे, असे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्कचे मुख्य संचालक सचिन मून यांनी सांगितले. constitutional discussion event Lord Buddha TV
चंद्रपूरातील सर्व नागरिकांनी या लाईव्ह महाचर्चेत प्रबोधनात्मक प्रवासात सहभागी होऊन लॉर्ड बुद्धा टिवीच्या माध्यमातून संविधानाच्या मूल्यांचा जागर अनुभवावा, असे आवाहन मनोज मोडक,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधि लाॅर्ड बुद्धा टि.व्ही.चॅनल व सिद्धार्थ बुद्ध विहार समितीचे सचिव मारोतराव रायपुरे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.या पत्रकार परिषदेत मनोज मोडक, मारोतराव रायपुरे,बाळकृष्ण जिवणे,सतिश रामटेके,सुनिल साव,जनार्दन वाघमारे सह कपिला मेश्राम, जयंती वनकर, वंदना जिवणे, छाया गडलिंग उपस्थित होते.
Gondpipri development projects inspection : चंद्रपूर, दि. 13 (News३४) : जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी बुधवारी गोंडपिपरी तालुक्यातील विविध विकासकामांना क्षेत्रीय भेट देत आढावा घेतला. या दौऱ्यात जिल्हाधिका-यांनी गोंडपिपरी येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीला भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. इमारतीचे बांधकाम पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिल्या.
यानंतर मौजा भंगाराम तळोधी येथील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. या वेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून रुग्णालयातील वॉर्ड, यंत्रसामग्री, औषधसाठा तसेच इतर आवश्यक सुविधांची माहिती घेतली आणि आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मौजा वढोली येथे स्थापन करण्यात आलेल्या 40 केडब्ल्यूपी सोलरायझेशनसह पाणीपुरवठा योजना स्थळाची पाहणी करताना त्यांनी कामाची गुणवत्ता सुनिश्चित करण्याचे आदेश दिले.
या दरम्यान गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, तहसीलदार शुभम बाहेकर, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, कार्यकारी अभियंता (जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग), गटविकास अधिकारी श्री. पुप्पलवार तसेच नायब तहसीलदार चंद्रशेखर वेटे आदी अधिकारी उपस्थित होते.
district infrastructure review meeting state secretary : चंद्रपूर, दि. 13 (News३४) : जिल्ह्यातील पायाभुत कामे आणि प्रमुख प्रकल्पांची सद्यस्थिती तसेच शासनाकडे प्रलंबित असलेल्या उपक्रमांची सोडवणूक करण्यासाठी अपर मुख्य सचिव तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकसचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी जिल्हास्तरीय यंत्रणेचा आढावा घेऊन सुचना दिल्या.
नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा स्तरावरील प्रलंबित मुद्दे शासनाकडे मांडणे व त्याची सोडवणूक करण्यासाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे सांगून पालकसचिव श्री. रेड्डी म्हणाले, सेवा हमी कायद्याअंतर्गत नागरिकांना ठराविक वेळेत उत्कृष्ट सेवा देणे बंधनकारक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा प्रशासनाने नियमित आढावा घ्यावा. चंद्रपूर जिल्ह्यात आयुष्यमान भारत कार्ड वाटपासाठी प्रत्येक गाव स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करावे. ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई -पीक पाहणी करिता विद्यार्थ्यांची मदत घेता येते का, याची पडताळणी करावी. झुडपी जंगलाबाबत आढावा घेऊन शासन स्तरावरून काय मदत पाहिजे, त्याची माहिती द्यावी. शेतकऱ्यांच्या उत्पादकतेसाठी महत्त्वपूर्ण असलेली जमिनीची आरोग्यपत्रिका जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करावी. district infrastructure review meeting
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची उपलब्धता असल्यामुळे येथे मत्स्यव्यवसायाला चालना द्यावी. चंद्रपूरचे कॅन्सर हॉस्पीटल नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. त्यामुळे टाटा कॅन्सर हॉस्पिटल सारखी यंत्रणा या हॉस्पिटलमध्ये विकसित करून रुग्णांना उत्कृष्ट सेवा द्यावी. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या नागरिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध होईल, याबाबत नियोजन करावे. त्यासाठी उद्योगांची कार्यशाळा आयोजित कराव्यात. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष प्रभावीपणे उपयोगात आणावा. वन्य प्राण्यांचे लोकेशन ट्रेस करण्यासाठी ऑनलाईन सिस्टीमचा वापर करावा. विविध विभागांनी शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या विषयांचा अभ्यास करून सुटसुटीत टिपणी सादर करावी, अशा सूचना पालकसचिव श्री. रेड्डी दिल्या. district infrastructure review meeting
या विषयांचे झाले सादरीकरण :
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सादरीकरणात 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम, 150 दिवसांच्या कृती आराखड्याबाबत ई गव्हर्नन्स सुधारणा, फ्लॅगशीप उपक्रमांतर्गत् जलजीवन मिशन, नळ जोडणीची सद्यस्थिती, आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री किसान सन्माननिधी, ॲग्रीस्टॅक नोंदणी, स्वामित्व योजना, भारत नेट प्रकल्प, जमिनीची आरोग्य पत्रिका, किसान क्रेडिट कार्ड, पीक कर्ज वाटपाची सद्यस्थिती, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण), प्रस्तावित समृद्धी महामार्ग, 10 कोटी वृक्ष लागवड मोहीम, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप आदींची माहिती दिली.
जिल्ह्यातील पायाभूत कामे आणि प्रमुख प्रकल्प :
चंद्रपूर जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेले जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत, नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत, चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल, बाबुराव शेडमाके स्टेडियम, पोलीस स्टेशनचे बांधकाम, नवीन चंद्रपूर विकास आराखडा, बॉटनिकल गार्डन प्रकल्प, बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, मानव वन्यजीव संघर्षासाठी उपाययोजना, आदर्श शाळा, महिला बचत गट भवन निर्माण करणे, वाचनालय, जिल्ह्यातील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, मोबाईल कॅन्सर व्हॅन, 20 ग्रामीण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर रूपांतरित करणे, मॉडेल अंगणवाडी बांधकाम आदी बाबींचे जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सादरीकरण केले. district infrastructure review meeting
Maharashtra SMART solar scheme 1 kW rooftop : चंद्रपूर १३ नोव्हेंबर २०२५ (News३४): दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना २५ वर्षे मोफत विजेची सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थी ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरावा लागणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने स्मार्ट योजना सुरू केली आहे. दारिद्र्य रेषेखालील १.५४ लाख तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल ३.४५ लाख अशा महिना १०० युनिटपेक्षा कमी वीज वापणाऱ्या पाच लाख घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी ६५५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर राबविण्यात येणार आहे. Maharashtra SMART solar scheme 1 kW rooftop
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. त्यामध्ये ग्राहकांना एक किलोवॅटचा छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी ३० हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळते. स्मार्ट योजनेत या अनुदानाखेरीज राज्य सरकारकडूनही अनुदान मिळणार असल्याने वीज ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरून प्रकल्प बसविता येईल. अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली. पीएम आवास योजनेसाठीही लागू अनेक नागरिक शासनाच्या पीएम आवास योजनेचा लाभ घेऊन घरे बांधतात. अशा वीज ग्राहकांना देखील या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे.
पीएम आवास योजनेसाठीही लागू
अनेक नागरिक शासनाच्या पीएम आवास योजनेचा लाभ घेऊन घरे बांधतात. अशा वीज ग्राहकांना देखील या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारकडून ३० हजारांचे अनुदान
स्मार्ट योजनेनुसार दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना एक किलोवॅटचा सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ३० हजार रुपये तर राज्य सरकारकडून १७,५०० रुपये अनुदान मिळेल. सौर ऊर्जा प्रकल्पाची ऊर्वरित रक्कम भरून ग्राहक २५ वर्षे मोफत विजेचा लाभ घेऊ शकतो. Maharashtra SMART solar scheme 1 kW rooftop
राज्य सरकारचाही लागणार हातभार
शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांनाही केंद्र सरकारच्या ३० हजार रुपये अनुदानाखेरीज राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे. या गटातील सर्वसाधारण ग्राहकांना दहा हजार रुपये राज्य सरकारकडून मिळतील. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना राज्य सरकार १५ हजार रुपये अनुदान देणार आहे.
वीज विकून पैसेही कमवा
एक किलोवॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीजनिर्मिती होते. त्यामुळे शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना स्वतःची गरज भागवून अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते. या प्रकल्पातून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ लाभ होतो.