Blog

  • Water Tax Chandrapur | चंद्रपूर शहरात 44 नागरिकांवर नळ कपातीची कारवाई

    Water Tax Chandrapur

    Water Tax Chandrapur : चंद्रपुर महानगरपालिकेतर्फे जलमापक यंत्र ( मीटर ) काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या ४४ नळ धारकांवर नळ कपातीची कारवाई करण्यात आली असुन २४ जलमापक यंत्र जप्त करण्यात आले आहे.

       
        शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक (मीटर) लावण्यात आले असुन जानेवारी महिन्यापासुन याचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. मात्र घरपोच पाणी मिळत असूनही अनेक नागरिकांद्वारे पाण्याचे देयक (water tax payment) भरण्यात कुचराई करण्यात येत असल्याने मोठया प्रमाणात थकबाकी निर्माण होत आहे.

    मीटर लावण्यात आलेल्या घरांपैकी केवळ १४ टक्के इतक्याच नळजोडणी धारकांनी देयकाचा भरणा केलेला आहे. यामुळे प्रामाणिकपणे करभरणा (water tax chandrapur) करणाऱ्या नागरिकांचे नुकसान होत असुन अप्राप्त देयकांमुळे संपुर्ण पाणी पुरवठा योजना तोट्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    चंद्रपुरात बंगाली समाजाचा मोर्चा


        काही नळ ग्राहक हे पाणी वापराचा खर्च टाळण्याच्या दृष्टीने पाईपलाइनवर बसविण्यात आलेले जलमापक यंत्र काढुन पाणी भरत असतात. त्यामुळे अनेकदा  नागरिकांचे देयक हे शून्य रुपये येते.

    सदरची बाब नियमबाहा असल्याने असे प्रकार थांबविण्याच्या दृष्टीने येत्या १५ दिवसांत पाणी पुरवठा कार्यालयात प्रत्यक्ष अथवा भ्रमणध्वनी व्दारे संपर्क करून नळ जोडणी करून घेण्याच्या सूचनाही व्हॉल्वमनमार्फत सदर नळ धारकांना देण्यात आल्या होत्या, परंतु अजुनही काही नळ धारकांनी नळ जोडणी न केल्याने अश्या ग्राहकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.

    water tax payment


          सुचनांचे पालन न करणाऱ्या नळ धारकांची नळ जोडणी कपात करण्याकरीता महानगरपालिकेमार्फत पथक तयार करण्यात आले आहे. आजपावेतो ०६ पथकाव्दारे कारवाई करण्यात आली असुन जे नळ धारक जलमापक काढुन पाणी भरत आहे अश्या १२५ नळ ग्राहकांची नोंद घेण्यात आली आहे.

    ४४ नळ धारकांवर नळ कपातीची करून २४ जलमापक यंत्र जप्त करण्यात आले आहे. ज्या नळ ग्राहकांची नळ कपात करण्यात आलेली आहे अश्या नळ ग्राहकांच्या पुनश्चः नळ जोडणीकरिता १ हजार रुपये शुल्क आकारणीचा भरणा केल्यावरच पुनश्चः नळ जोडणी करण्यात येणार असल्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • save bangladeshi hindu : चंद्रपुरात बंगाली समाजाचा मोर्चा

    save bangladeshi hindu

    save bangladeshi hindu चंद्रपूर : बांग्लादेशातील हिंदूवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ बंगाली समाज एकता संघर्ष समिती, चंद्रपूरच्या वतीने सोमवार १६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

    शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील बंगाली समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाच्या पंतप्रधानांना निवेदन पाठविले आहे.

    पंतप्रधान मोदी यांनी घेतली दखल, पण मंत्रिमंडळात दखल नाही

    निवेदनातून त्यांनी बांग्लादेशातील हिंदू बांधवांवर होणारे अत्याचार तातडीने थांबविण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे.

    chandrapur bengali samaj


    गेल्या काही महिन्यांपासून बांग्लादेशातील हिंदू बांधवांवर सातत्याने हल्ले होत आहेत. या अत्याचारामुळे हिंदू बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत हा बहुसंख्य हिंदू बांधवांचा देश आहे.

    त्यामुळे भारत सरकारने हस्तक्षेप करून होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबवाव्या, अशी बांग्लादेशातील हिंदू बांधवांकडून आर्त हाक दिली जात आहे. चंद्रपूर शहरात बंगाली समाजबांधव (chandrapur Bengali samaj) मोठ्या संख्येने राहतात. या समाजबांधवांच्यावतीने बांग्लादेशातील हिंदू बांधवांवरील हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे.


    बंगाली समाज एकता संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला दुपारी १२ वाजता श्री श्री मॉ दुर्गा काली माता मंदिर येथून सुरवात करण्यात आली. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

    bengali samaj morcha


    मोर्चात भाजपचे नेते मनोज पाल, ज्येष्ठ नेते तुषार समो, अॅड. पारोमिता गोस्वामी, डॉ. अमल पोद्दार, राधेश्याम शहा, मदन शहा, बलराम शहा, सविता पाल, प्रकाश अधिकारी, विश्वजित शहा, कृष्ण कुंडू, तापोष डे, बिमल शहा, गुरुदास मंडल, मनोरंजन राय, कविता सरकार, विश्वजित डेबनाथ, रमेश सरकार, इतिका शहा, अमित अधिकारी, बलाई चक्रवर्ती, राबिन बिश्वास, बाबुलाल शहा, गौतम शहा, मनीष दास यांच्यासह हजारोच्या संख्येने बंगाली समाजबांधव सहभागी झाले होते.

  • nylon manja | चंद्रपुरात नायलॉन मांजाचा साठा आढळल्यास 1 लाखांचा दंड

    nylon manja

    nylon manja राष्ट्रीय हरित लवादाने ( National Green Tribunal) पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही शहरातील पतंगबाजी करणारे काहीजण नायलॉन मांजाच्या शोधात असतात.

    त्यामुळे पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयात करणारे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.

    सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद नाहीच, जिल्ह्यात संताप


          मनपा भरारी पथकांद्वारे नियमित पतंग,मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत असुन दर दिवसाच्या कारवाईचा अहवाल आयुक्तांद्वारे मागविण्यात येत आहे. दरवर्षी तीळ संक्रांतीच्या उत्सवाला पतंग उडविण्याची परंपरा आहे. त्यासाठी महिनाभर आधीपासूनच पतंग आणि दोरा यांची विक्री सुरु होते.

    नायलॉन धागा वापरण्यास बंदी असतांना शहरात हा धागा वापरला जात असल्याचे आढळुन येते. याच्या वापराने पशु – पक्षी तसेच नागरिकांना सुद्धा गंभीर इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत.  


          महापालिकेचे उपद्रव शोधपथक यावर कारवाई करत असुन नायलॉन मांजा (nylon manja) बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.

    बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर विक्री केल्यास १० हजारांचा दंड आणि साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई आणि साहित्य जप्त केले जाणार आहे. त्यामुळे कुणीही नायलॉन मांजाची विक्री करू नये व नागरीकांनी सुद्धा या मांजाचा वापर करू नये असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • cabinet expansion : पंतप्रधान मोदी यांनी घेतली कार्याची दखल पण….

    cabinet expansion

    cabinet expansion : महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्मला आता सुरुवात झाली आहे. 33 वर्षानंतर नागपूर येथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यामध्ये सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाकडे. 30 वर्ष सलग आमदार असलेले सुधीर मुनगंटीवार यांना यावेळी मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेले नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा मंत्री पदाला पोरका झाल्याचा संताप जिल्हावासियांकडून व्यक्त होत आहे.

    राजकीय कारकीर्द सुरू केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मतदारसंघासह चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विकासाचा झंझावात निर्माण केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतरचे पहिले ‘सरप्लस’ बजेट महाराष्ट्राला दिले. याशिवाय 50 कोटी वृक्षारोपण करीत त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. Maharashtra cabinet

    चंद्रपुरात गांजा व सुरा जप्त

    चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालटच सुधीर मुनगंटीवार यांनी करून टाकला. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘मन की बात’मध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल घेतली होती.

    हा तर अन्याय आहे

    महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा आवर्जून समावेश असेल, असे चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेलाही वाटत होते. त्यामुळे सलग सात टर्म विधानसभा जिंकणारे सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांना काय मिळणार? याची उत्सुकता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होती.

    मात्र सुधीर मुनगंटीवार यांचे नाव मंत्री पदाच्या यादीत न आल्यामुळे बल्लारपूरसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

    विधानसभा निवडणुकीमध्ये बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला. चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत, हे विशेष.

    मंत्रिपद मिळणे होते गरजेचे

    2019 मधील विधानसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांना 86 हजारांवर मतं मिळाली होती. त्यावेळी मुनगंटीवार यांनी 33 हजार 440 मतांनी विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत त्यांना मिळालेली आघाडी मोठी आहे.

    25 हजार 985 मतांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या आघाडीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपमधील त्यांची ज्येष्ठता आणि जनसंपर्क पाहता त्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्रिपद मिळणे गरजेचे होते. मात्र असे न झाल्याने चंद्रपूर जिल्हातील भाजपा कार्यकर्ते व नागरिक कमालीचे नाराज झाले आहेत.

    जिल्ह्याच्या प्रगतीत मुनगंटीवारांचे योगदान

    सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांमुळेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचं रोपटं आता वटवृक्ष झालं आहे. भारतीय जनता पार्टीला चंद्रपूरमध्ये अभेद्य किल्ला बांधण्यामध्ये मुनगंटीवार यांचे अमूल्य योगदान आहे. त्यामुळे देखील चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना यंदा भाजपकडून मोठी अपेक्षा होती.

    मात्र मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. भारतीय जनता पार्टी आता सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे कोणती जबाबदारी देणार, याची उत्सुकता सर्वांना आहे.

  • ganja seized |चंद्रपुरात गांजा आणि सुरा जप्त

    ganja seized

    ganja seized चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी गुन्हेगारीने डोके वर काढले, अनेक हत्येचे प्रकरण झाले, गोळीबाराच्या घटना घडल्या, आता या घटना घडू नये यासाठी चंद्रपूर शहर पोलिसांनी कंबर कसली आहे.

    15 डिसेंबर रोजी शहर पोलिसांनी गांजा, लोखंडी सुरा एका आरोपिकडून जप्त करीत एकूण 5 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.

    त्यांना पोलीस बनायचं होत पण आधी काळ आला, चंद्रपुरात दुर्दैवी घटना

    चंद्रपूर शहर पोलिसांचे गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करीत असताना मुखबिर द्वारे शहरात गांजा विक्री (ganja seized) एका इसमाद्वारे होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. Chandrapur city police

    माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी बिनबा चौक, दर्गा वार्डात 35 वर्षीय शारीक जलील कुरेशी यांच्या घरी धाड मारली.

    मंत्रिमंडळातून भाजप जेष्ठ नेते मुनगंटीवार यांना डच्चू

    या धाडीत शहर पोलिसांना 93.05 ग्राम गांजा, रोख 3 हजार 900 रुपये, क्यू आर कोड स्टॅण्ड, एक मोबाईल व लोखंडी सुरा असा एकूण 5 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी शारीक कुरेशी वर विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली.

    सदरची यशस्वी कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रभावती एकुरके चंद्रपुर शहर, सपोनि. राहुल ठेंगणे, पोउपनि. संदिप बच्छीरे, पोउपनि. दत्तात्रय कोलते, पोहवा. कपुरचंद खरवार, म.पो.हवा. भावना रामटेके, पो हवा. इम्रान शेख, सचिन राठोड, पो.अं. इम्रान खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केली असून पुढील तपास पो. उप. नि. पल्लवी काकडे करीत आहे.

  • Chandrapur death | त्यांना पोलीस व्हायचे होते पण नदीत असं घडलं की…..

    Chandrapur death

    Chandrapur death : ग्रामीण व शहरी भागातील मुले-मुली शासकीय नोकरीत लागावी यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. सोबतच अनेक मुली व मुलांना आपल्या अंगावर खाकी वर्दी यावी यासाठी पोलीस भरती चा सराव करीत आहे.

    भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून मिळाला डच्चू

    हा सराव करताना आज 15 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 10 वाजताच्या सुमारास पोलीस भरतीचा सराव करताना भोयेगाव मार्गावरील वर्धा नदीत दोघे बुडाले यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

    जिल्ह्यातील धानोरा भोयगाव मार्गावरील वर्धा नदीत तीन जण बुडाल्याची माहिती पुढे आली आहे, यात दोन तरुणी एक तरुणाचा समावेश आहे यातील एका मुलीला वाचविण्यात यश आले असून दोन जणांचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. Chandrapur death

    सदर घटना धानोरा भोयगाव मार्गांवरील नदीच्या पत्रात आज सकाळी घडली असून संध्या शिंदे वय २० वर्ष रा. जिवती (पहाड वणी), युगल नागापुरे वय १९ वर्ष रा.सोनापूर गोंडपिपरी असे मृत्तकांची नावे असून समीक्षा शेंडे वय २० वर्ष बाबुपेठ चंद्रपूर या तरुणीला पाण्यात बुडाली असता वाचविण्यात यश आले आहे.

    ग्रामीण भागासह शहरी भागात पोलीस भरतीसाठी (police bharti) विद्यार्थी तसेच तरुण तरुणी मेहनत घेत सकाळी रनिंग व्यायाम करताना दिसत आहेत अश्याच आदर्श फिजिकल ग्रुप चंद्रपूर चे संचालक आदर्श चिवंडे यांनी आपल्या एकूण ३६ विद्यार्थ्यांना व्यायाम करण्यासाठी धानोरा भोयगाव मार्गांवरील वर्धा नदीवर आणले होते.

    व्यायाम झाल्यानतर काही मूल मुली नदीच्या पाण्यात उतरले पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन मुली नदीच्या पात्रात बुडाल्या त्यातल्या एका तरुणाने मुलीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र तो ही पाण्यात बुडाला तर आणखी काही विद्यार्थ्यांच्या मदतीने एका मुलीला वाचविण्यात यश आले तर एका मुलीचा मृतदेह पाण्यातुन बाहेर काढण्यात आला तर वाचविण्यासाठी उडी मारलेल्या मुलाचा मृत्तदेह अजूनही पाण्यात बुडून असल्याची माहिती आहेत.

    घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घुग्गुस व गडचांदूर पोलिसांनी धाव घेतली असून युगल नागापुरे या तरुणाचा शोध सुरु असून अधिक तपास घुग्गुस पोलीस करीत आहेत.

  • Devendra Fadnavis Cabinet Expansion : कोण होणार मंत्री?

    Devendra Fadnavis Cabinet Expansion

    Devendra Fadnavis Cabinet Expansion महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवीत महायुतीने 200 च्या वर जागा जिंकल्या, बहुमतचे सरकार आल्यावर आता मंत्रिमंडळात कुणाला सामील करायचे व कुणाला डच्चू द्यायचा याबाबत महायुती पुढे मोठा पेच उभा आहे.

    आज नागपुरातील राज भवनात दुपारनंतर मंत्री मंडळाचा विस्तार करीत मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे, अनेक आमदारांना मंत्रीपदासाठी फोन करण्यात आला असला तरी अनेक जेष्ठ आमदारांना फोन न आल्याने धाकधूक वाढली आहे.

    ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात रोजगाराची संधी, मिळेल 50 हजार पगार

    भाजपने आधीच नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार असल्याची माहिती दिली होती, तसेचं महायुती मधील घटकपक्षांनी सुद्धा हाच फॉर्म्युला वापरला असल्याची माहिती आहे.

    ज्यांना मंत्रीपदासाठी कॉल आला नाही त्यामध्ये राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना फोन आलेले नाही. भाजपकडून सुधीर मुनंगटीवार (sudhir mungantiwar), रवींद्र चव्हाण तसेच शिंदे सेनेचे दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांनाही फोन आलेले नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. ज्यांना मंत्री पदासाठी फोन आले त्यांची संभाव्य यादी सुद्धा पुढे आली आहे.

    मंत्रिमंडळात या नावांची शक्यता


    भाजप – देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, जयकुमार रावल, नितेश राणे, शिवेंद्रसिंह भोसले, पंकज भोईर गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, अतुल सावे, संजय सावकारे, आकाश फंडकर, अशोक उईके जयकुमार गोरे

    शिवसेना – एकनाथ शिंदे, संजय शिरसाठ, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, योगेश कदम, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक, आशिष जैस्वाल

    राष्ट्रवादी – अजित पवार, नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, सना मलिक – राज्य, इंद्रनील नाईक – राज्य

    चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 7 वेळा जिंकणारे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना अजूनही फोन आला नसल्याची माहिती आहे.

    चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया (bunty bhangdiya) यांनी विजयाची हॅट्रिक मारली असून त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे.


  • Tadoba Jobs 2024 | ताडोब्यात नोकरी, पगार 50 हजार

    Tadoba Jobs 2024

    Tadoba jobs 2024 जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान येथे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर 10 पदांची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांना 13 ते 50 हजार पगार मिळणार आहे.

    यामध्ये संप्रेषण व्यवस्थापक 1, सीएसआर व्यवस्थापन अधिकारी 1, लेखापाल (सेवानिवृत्त) 1, डेटा एंट्री ऑपरेटर 3, कॉल सेंटर सहायक 3, मल्टी परपज स्टाफ 1 अश्या एकूण 10 पदांची पदभरती करायची आहे. Tadoba national park


    जाहिरात बाबत अधिकृत माहिती www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
    या पदभरती मध्ये उमेदवारांनी ऑनलाईन स्वरूपात 20 डिसेम्बर 2024 सायंकाळी 5 स्वीकारण्यात येणार आहे. Tadoba jobs 2024

    अर्ज प्रक्रिया पार पडल्यावर अर्जाची छाननी करण्यात येईल, छाननी नंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीची वेळ, तारीख व स्थळ दूरध्वनी व ईमेल द्वारे कळविण्यात येईल.
    पदासाठी मुलाखत प्रक्रिया पार पडल्यावर आवश्यकतेनुसार स्किल टेस्ट घेण्यात येणार, त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

    कांदा राखणार तुमच्या केसांची निगा

    पदासाठी पात्रता काय?


    संप्रेषण व्यवस्थापक – वयोमर्यादा 18 त 60 वर्षे, मानधन – 50 हजार
    शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/पदव्युत्तर व जनसंचार /जाहिरात/जनसंपर्क या क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा.

    सीएसआर व्यवस्थापण अधिकारी – वयोमर्यादा 18 त 40 वर्षे, मानधन – 50 हजार, शैक्षणिक पात्रता – Business Administration/social sciences/environmental studies या विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

    लेखापाल (सेवानिवृत्त) – वयोमर्यादा 58 ते 62 वर्षापेक्षा जास्त नसावे. मानधन – 20 हजार. शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, टंकलेखन वेग इंग्रजी – 40 आणि मराठी 30, MS CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)

    डेटा एंट्री ऑपरेटर – वयोमर्यादा – 18 ते 40 वर्ष. मानधन – 18 हजार. शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन वेग इंग्रजी 40 आणि मराठी 30, MSCIT संगणक परीक्षा पास (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)

    कॉल सेंटर सहायक – वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे. मानधन – 13 हजार 500
    शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर, MSCIT व तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक )

    मल्टी परपज स्टाफ – वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे. मानधन – 15 हजार शैक्षणिक पात्रता – 12 वी पास (hsc बोर्डाचे मार्कशीट आवश्यक)

    जाहिरात बघा – क्लिक करा

    ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

  • Nyay Mandir | बल्लारपूर मध्ये होणार न्यायाची नवीन इमारत

    Nyay Mandir

    Nyay mandir : चंद्रपूर -‘दिला शब्द केला पूर्ण’ यासाठी सुपरिचित असलेले आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे बल्लारपूरच्या नवीन न्यायालयीन इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी ३६ कोटी ७० लक्ष ७३ हजार रुपये निधीची राज्यसरकारने मान्यता दिली आहे.

    एखादा विषय हाती घेतला की तो पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात आ.सुधीर मुनगंटीवार (sudhir Mungantiwar) यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या खास कार्यशैलीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

    रोजगार ही गार्ड बोर्ड ची जबाबदारी – आमदार जोरगेवार

    बल्लारपूर येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधण्यासाठी ३६ कोटी ७० लक्ष ७३ हजार रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

    ही नवीन न्यायालयीन इमारत बल्लारपूरच्या वैभवात भर पाडणारी असेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या इमारतीमध्ये तळमजला, त्यावर तीन मजले, पाच कोर्ट हॉलचा समावेश असेल. याशिवाय अग्नीशमन यंत्रणा, सीसीटीव्ही, वातानुकुलित व्यवस्था, लिफ्ट, पाणीपुरवठा, जलसंचय आदींचा समावेश असणार आहे.

    बल्लारपूर येथे नवीन न्यायालयीन इमारत व्हावी, येथे अद्ययावत सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात, सुसज्ज अशा कोर्टरुम असाव्यात, यासाठी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर त्यांनी नियमित पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून इमारतीच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. Nyay Mandir

    न्यायदान करणारी यंत्रणा आणि न्याय मागण्यासाठी येणारा सर्वसामान्य माणूस यांची मुलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत गैरसोय होणार नाही, याची पूर्ण काळजी बांधकामादरम्यान घेतली जाईल, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

  • security guard board | ही गार्ड बोर्ड ची जबाबदारी – आमदार किशोर जोरगेवार

    security guard board

    Security guard board चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्याने येथे उद्योगांमध्ये कामगारांची आणि सुरक्षारक्षकांची नेहमी मागणी असते. मात्र, या जागा भरताना गार्ड बोर्डच्या माध्यमातून रोजगार देण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत.

    यामुळे शासन स्तरावरील अडचणी आमच्या माध्यमातून सोडवून घेत रोजगार प्रक्रियेची गती वाढवावी आणि ती योग्य पद्धतीने राबवावी, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांना दिले आहेत.

      आ. किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी गार्ड बोर्डच्या कार्यप्रणालीत सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या कार्यालयात कामगार संघटनांचे नेते, कामगार प्रतिनिधी आणि संबंधित अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षारक्षकांच्या भरती प्रक्रियेसह इतर कामगारांच्या रोजगार समस्यांवर चर्चा करण्यात आली.

    आमदार जोरगेवार यांचा अनोखा सत्कार

      बैठकीत बोलताना आ. जोरगेवार म्हणाले, ‘‘गार्ड बोर्डमध्ये नोंदणीकृत असलेल्या कामगारांना रोजगार मिळवून देणे ही गार्ड बोर्डची जबाबदारी आहे. कामगारांच्या अडचणींना समजून घेत त्यांना न्याय देण्यासाठी आपण  प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण मागणी नंतर सिएटीपीएस येथील सुरक्षारक्षकांच्या भरती (employment) प्रक्रियेबाबत कामगार मंत्री हसन मुशरिफ यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी गतीने व्हावी, यासाठी आमदार जोरगेवार यांनी पुढाकार घेत बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी गार्ड बोर्डकडून होणार्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली आणि ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

    सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या नोंदणी प्रक्रियेसाठी दोन ते तीन दिवसांत संबंधित कंत्राटदारांशी संपर्क साधून नोंदणी लिंक सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. लिंक सुरू झाल्यानंतर कामगारांनी त्वरित नोंदणी करून आपली शारीरिक चाचणी पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

    बैठकीदरम्यान, आ. जोरगेवार यांनी स्पष्ट केले की, गार्ड बोर्डच्या माध्यमातून रोजगाराच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये. शासन पातळीवरील अडचणी दूर करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, पण कामगारांच्या हक्कांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.