Blog

  • chandrapur local news | चंद्रपुरात महिला व मुलींवर हल्ला

    chandrapur local news

    chandrapur local news : आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या सतर्कतेमुळे आणि पुढाकारातून बाबूपेठ परिसरात दहशत निर्माण करणारा एक अज्ञात मनोरुग्ण (अंदाजे 30-32 वर्ष) स्थानिक युवकांनी पकडून सिटी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

    बाबूपेठ परिसरात काही दिवसांपासून एका 30-32 वयोगटातील मनोरुग्णाने नागरिकांमध्ये दहशत पसरवली होती. हा मनोरुग्ण महिलांवर, विशेषतः शाळकरी मुलींवर पाळत ठेऊन अचानक हल्ला करत होता. हातात दांडके घेऊन अश्लील शिवीगाळ करणाऱ्या या व्यक्तीविरुद्ध स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

    चंद्रपुरात अमित शाह यांच्या प्रतिमेला आंबेडकरी जनतेने हाणल्या चपला


    या घटनेची माहिती आप पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ रामनगर पोलिस स्टेशनला माहिती दिली. मात्र, सदर व्यक्ती रोड क्रॉस करून सिटी पोलिस स्टेशन हद्दीत गेल्यामुळे रामनगर पोलिसांनी कारवाई करण्यास नकार दिला. Chandrapur local news

    परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजू कुडे यांनी वॉर्डातील तरुणांच्या मदतीने त्या मनोरुग्णाला पकडले आणि सिटी पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणाला सदर व्यक्तीची ओळख पटत असेल तर त्यांनी सिटी पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा.

    या प्रसंगी राजू कुडे यांनी भविष्यातील संभाव्य दुर्घटना टळल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि सिटी पोलिस स्टेशनच्या पी. आय. प्रभावती एकुरके मॅडम यांचे आभार मानले.

    हा प्रकार पोलिस आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे निकाली निघाला असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये दिलासा मिळाला आहे.

  • chandrapur on amit shah | चंद्रपुरात अमित शाह यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन

    chandrapur on amit shah

    chandrapur on amit shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद चंद्रपूर शहरात बघायला मिळाले.

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांबाबत क्रेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण तापलं आहे. दिल्लीतील हिवाळी अधिवेशनात अमित शहांविरोधात विरोधकांनी रान उठवल्याचं दिसल्यानंतर राज्यभर या वक्तव्यावरून वातावरण तापलं असून ठिकठिकाणी आक्रमकपणे या वक्तव्याचा विरोध करण्यात येतोय.

    चंद्रपुरात दुचाकी चोरी, पोलिसांनी लावला छडा

    आज शुक्रवारी चंद्रपूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अमित शहा यांच्या विरोधात आंबेडकरी समाज संघटना संयुक्त समितीतर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. अमित शहा यांच्या प्रतिमेला आंबेडकरी जनतेने चपला मारत आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात करीत अमित शाह यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. Amit shah ambedkar controversy


    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रपुरात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

    यावेळी प्रविण खोब्रागडे,रोहिदास राऊत,बंडू नगराळे, प्रतीक डोर्लीकर,सुरेश नारनवरे, राजस खोब्रागडे,अशोक फुलझेले,निर्मला नगराळे,गीता रामटेके, पंचफुला वेल्हेकर,प्रेरणा करमरकर,ज्योती रंगारी, वर्षा घडसे,अंजली नीमगडे,निर्मला पाटील,संघमित्रा खोब्रागडे,अंकुश वाघमारे,केशव रामटेके,हरिदास देवगडे,हर्षल खोब्रागडे, भय्या मानकर,नामदेव पिंपळे,अंकुश वाघमारे सुरेंद्र रायपूरे,राजकुमार जवादे,अवरसिंह गोथरा,पप्पू देशमुख, अनिल डहाके,रवींद्र मोटघरे,किशोर सवाने,अझहर शेख,इरफान शेख,बुद्धप्रकाश वाघमारे,किशोर तेलतुमडे दिलीप वावरे,राजेश वणकर,राजू किर्तक,आनंद शेंडे, सचिन पाटील व अशोक सागोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  • Chandrapur City | चंद्रपूर शहरातील या भागात दुचाकी चोरी, पोलिसांनी लावला छडा

    chandrapur city

    chandrapur city : चंद्रपूर शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ होत आहे, घडणाऱ्या या गुन्हेगारीवर आळा व कारवाई करण्यास चंद्रपूर पोलीसही मागे नाही.

    शहरातील झाडे हॉस्पिटल ते पंचशील चौक या मार्गावर 38 वर्षीय मंजुल जैन यांनी आपली दुचाकी क्रमांक एमएच 34 सिके 3210 ही हँडल लॉक करीत ठेवली होती.

    15 डिसेंम्बर ला सदर दुचाकी वाहन हे त्याठिकाणी आढळून आले नाही, मंजुल ने आपल्या दुचाकी वाहनाचा इतरत्र शोध घेतला मात्र वाहन कुठेही आढळून आले नसल्याने मंजुल यांनी शहर पोलीस (chandrapur city police) स्टेशनमध्ये दुचाकी चोरी बाबत फिर्याद नोंदवली.

    चंद्रपूर शहर पोलिसांनी (chandrapur police) गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला, झाडे हॉस्पिटल ते पंचशील चौक या मार्गावर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, गुन्हे शोध पथकाने या गुन्ह्यात कौशल्यपूर्ण तपास करीत मुखबिर द्वारे माहिती घेत आरोपीचा शोध घेतला.

    सिस्टर कॉलोनी बिनबा गेटजवळ राहणारा 23 वर्षीय शाकिर नबी शेख या युवकाला पोलिसांनी अटक केली, चोरी गेलेल्या दुचाकी बाबत पोलिसांनी विचारणा केली असता सदर दुचाकी आपण चोरली असल्याची कबुली शाकिर ने पोलिसांजवळ दिली.

    विविध मागण्यांसाठी शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

    पोलिसांनी अधिक विचारपूस करीत आरोपीच्या घराजवळ झडती घेतली असता पोलिसांना पुन्हा एक दुचाकी आरोपी जवळून जप्त करण्यात आली. चंद्रपूर शहर पोलिसांनी आरोपी शाकिर जवळून 2 दुचाकी सहित एकूण 1 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची यशस्वी कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. प्रभावती एकुरके चंद्रपुर शहर, पो.उप.नि. संदिप बच्छीरे, कपुरचंद खरवार, सचिन बोरकर, संतोष कनकम, भावना रामटेके, इम्रान खान, दिलीप कुसराम, ईरशाद खान, रूपेश रणदिवे, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केली आहे. पुढील तपास म.पो.हवा. भावना रामटेके हे करित आहेत.

  • Nagpur winter session | शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : आमदार सुधाकर अडबाले

    Nagpur winter session

    Nagpur winter session : शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सभागृहात मांडून सोडविण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून, प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले (mla sudhakar adbale) यांनी आंदोलनाप्रसंगी दिली.

    मुलांना लागलं मोबाईलचं व्यसन, असं सोडवा

    राज्यातील खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व खाजगी अनुदानित विजाभज / आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्‍या शासनदरबारी प्रलंबित आहेत. Nagpur winter session

    प्रलंबित समस्या सोडविण्याकरीता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने माजी आमदार श्री. व्‍ही. यू. डायगव्‍हाणे यांच्या मार्गदर्शनात व विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार श्री. सुधाकर अडबाले, (mla sudhakar sabale) अध्यक्ष श्री. अरविंद देशमुख यांच्या नेतृत्‍वात (nagpur winter session) हिवाळी अधिवेशनादरम्यान यशवंत स्टेडियम, नागपूर येथे १९ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात आले.

    या आंदोलनात राज्यातील सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर व राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेंशन योजना लागू करावी, विना अनुदानित/अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार १००% अनुदान मंजूर करण्यात यावे, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय, दि. १५ मार्च २०२४ यातील संचमान्‍यतेबाबत जाचक अटी रद्द करण्यात याव्या, राज्यातील अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीव तुकडयांना अनुदानास पात्र घोषित करून आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी.

    न्यायालयीन आदेशाप्रमाणे नागपूर विभागातील आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करणाऱ्या विजाभज आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता व एकस्तर वेतनश्रेणी योजनेचे लाभ पूर्ववत सुरू करण्यात यावे, न्यायालयीन आदेशाप्रमानुसार आदिवासी विकास विभागाअंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आलेल्या ११५५ शिक्षकांना मानधन वेतनाची थकबाकी अदा करण्यात यावी, दत्तक शाळा योजना राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा शासन निर्णय दिनांक २३ ऑगष्ट २०२४ नुसार शिक्षकांची अशैक्षणिक कामांतून मुक्तता करण्यात यावी. तसेच सदर शासन निर्णयाची अमंलबजावणी करण्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावे यासह अन्‍य मागण्यांचा समावेश आहे.

    या धरणे आंदोलनात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय पदाधिकारी, जिल्हा, तालुका पदाधिकारी व विदर्भातील विविध विभागाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येेने सहभागी झाले होते.

    सदर आंदोलनातील मागण्यांचे निवेदन मंत्री नाम. अतुल सावे यांना प्रांतीय अध्यक्ष श्री. अरविंद देशमुख, प्रांतीय उपाध्यक्ष श्री. रमेश काकडे यांनी विधानभवनात दिले.

  • Mobile addiction in child | असं सोडवा मुलांचं मोबाईल व्यसन

    Mobile addiction in child

    Mobile addiction in child : मुलांमध्ये जास्त फोन वापरल्याने त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे त्यांचा शारीरिक विकास मंदावतो कारण मुले मोबाईलवर गेम खेळण्यात किंवा टीव्हीवर कार्टून पाहण्यात तासनतास घालवतात, त्यामुळे ते मैदानी खेळांकडे कमी लक्ष देतात, जे त्यांचे शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढवण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

    Prime व्हिडीओ चे स्वस्त रिचार्ज प्लॅन…

    अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही प्रभावी टिप्स सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मुलाला फोनकडे पाहण्याच्या व्यसनापासून मुक्त करू शकता.

    मुलांमधील फोनचे व्यसन कसे दूर करावे?
    स्क्रीन वेळ निश्चित करा

    सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्क्रीन टाइम निश्चित करून तुम्ही तुमच्या मुलाच्या फोनच्या व्यसनापासून मुक्त होऊ शकता. तुमच्या मुलांना ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ फोनकडे पाहू देऊ नका. त्याच वेळी, आपण फोनवर शैक्षणिक ॲप्स डाउनलोड करून ठेवाव्यात, जेणेकरून मुलाला ज्ञानाच्या गोष्टी फोनवर पाहता येतील.

    संगीत कला शिकवा

    मुलांचे लक्ष मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी शारीरिक हालचालींमध्ये व्यस्त ठेवा. त्याला बॅडमिंटन, क्रिकेट खेळण्यासाठी उद्यानात पाठवा आणि त्याला संगीत, चित्रकला यासारख्या सर्जनशील कामात सहभागी करून घ्या.

    ठराविक वेळी फोन द्या

    आपल्या मुलांना संध्याकाळी ठराविक वेळी मोबाइल पाहू द्या. सकाळी अजिबात फोन देऊ नका. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलाचा फोन वापर (phone addiction) नियंत्रित करू शकता.
    ऑफलाइन मनोरंजनावर जोर द्या.

    याशिवाय, जर मुलाने फोनचा वापर कमी करायचा असेल, तर तुम्ही त्याच्यासमोर मोबाइलचा वापर मर्यादित केला पाहिजे.

    मुलांना ऑफलाइन मनोरंजनाचा पर्याय द्या, जे त्यांना फोनपासून दूर ठेवू शकतात. आजपासून एक-एक करून या टिप्स फॉलो करायला सुरुवात करा, लवकरच तुमचे मूल फोनचे व्यसन सोडून देईल.

  • Prime Video Subscription Plan | Amazon Prime Video वर नवीन चित्रपट आणि वेब सिरीज पाहू इच्छिता? या स्वस्त प्लॅनसह रिचार्ज करा

    Prime Video Subscription Plan

    Prime Video Subscription Plan : हिवाळा ऋतू आला आहे आणि जर तुम्हाला घरी बसून कंटाळा आला असेल तर OTT प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. हिवाळ्याच्या थंड ऋतूत कुठेही न जाता घरी बसून मनोरंजन करता येते.

    पुष्पा 2 ott वर येणार

    OTT प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कोणताही चित्रपट किंवा टीव्ही शो पाहण्याची परवानगी देतात. आज आम्ही तुमच्यासाठी प्राइम व्हिडिओ प्लॅन्सची माहिती घेऊन आलो आहोत जेणेकरून तुम्ही तुमच्या बजेटनुसार मनोरंजनाची निवड करू शकता.

    प्राइम व्हिडिओच्या प्लानची किंमत किती आहे?

    तुमच्याकडे Amazon Prime Video वर चित्रपट, टीव्ही शो आणि वेब सिरीज पाहण्यासाठी तीन प्रकारचे प्लॅन पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा सबस्क्रिप्शन प्लॅन दरमहा ६७ रुपयांपासून सुरू होतो आणि दरमहा २९९ रुपयांपर्यंत जातो.

    प्राइम लाइट वार्षिक – या प्लॅनमध्ये तुम्हाला वार्षिक ७९९ रुपये द्यावे लागतील. अशा प्रकारे तुम्हाला दरमहा 67 रुपये मोजावे लागतील. यामध्ये तुम्ही मोबाईल किंवा टीव्ही सारख्या एका डिव्हाइसवर महिनाभर कंटेंट पाहू शकता. तथापि, तुम्हाला त्यात जाहिरातमुक्त सामग्री मिळणार नाही. याशिवाय, तुम्हाला या प्लॅनमध्ये अमर्यादित मोफत प्राइम डिलिव्हरी, त्याच दिवशी आणि एक दिवसाची डिलिव्हरी, Amazon Pay क्रेडिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅक आणि काही खास डील मिळतील. Prime video subscription plan

    प्राइम एनुअल – या प्लॅनसाठी तुम्हाला वार्षिक १४९९ रुपये द्यावे लागतील. यामुळे तुम्हाला एका महिन्यात 125 रुपये मोजावे लागतील. यामध्ये तुम्ही मोबाईल आणि टीव्ही तसेच लॅपटॉप आणि 5 उपकरणांवर एकाच वेळी कंटेंट पाहू शकाल. ही सामग्री पूर्णपणे जाहिरातमुक्त असेल. यामध्ये तुम्हाला प्राइम लाइटच्या सर्व फायद्यांसह प्राइम म्युझिकमध्ये प्रवेश मिळेल. याशिवाय तुम्हाला प्राइम रीडिंग आणि प्राइम गेमिंगचाही प्रवेश मिळेल.

    प्राइम मंथली – प्राइम मंथलीमध्ये तुम्हाला दरमहा २९९ रुपये द्यावे लागतील. हे एक मासिक पॅकेज आहे, याचा अर्थ तुम्हाला दर महिन्याला योजनेचे सदस्यत्व घ्यावे लागेल. प्राइम ॲन्युअलचे सर्व फायदे या प्लॅनमध्येही उपलब्ध आहेत. तुम्ही एकाच वेळी 5 उपकरणांवर जाहिरातमुक्त सामग्री पाहू शकता.

  • kesh shilpi karj yojana | नाभिक समाजासाठी सुरू करण्यात आलेल्या केश शिल्पी कर्ज योजनेबद्दल जाणून घ्या

    kesh shilpi karj yojana

    kesh shilpi karj yojana : नाभिक समाजासाठी संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाच्या माध्यमातून केशशिल्पी कर्ज योजना (kesh shilpi karj yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नाभिक समाजाने घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामडंळ, चंद्रपूरचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

    ओबीसी मंत्रालयाची स्थापना करा : खासदार प्रतिभा धानोरकर

    महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामडंळाकडे संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाची स्थापना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या 5 जानेवारी, 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे. या महामंडळाचे कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामडंळामार्फत कार्यान्वीत करण्यात आले आहे.

    या आहेत कर्ज योजना:

    1 लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना:

    शासनाने इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजातील (nabhik samaj yojana) व्यक्तींना स्वयंरोजगार व लघुउद्योग सुरू करण्याकरिता 1 लक्ष रुपयाची निरंक व्याजदर असलेली थेट कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे. कर्ज परतफेडीचा कालावधी 4 वर्षापर्यंतचा असून नियमित 48 समान मासिक हप्त्यामध्ये मुद्दल रु. 2,085 परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकीत झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याज आकारण्यात येईल. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत असावे.

    वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना:

    उद्देश: महाराष्ट्र राज्यातील नाभिक समाजातील गरजू व कुशल व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघुउद्योग व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री, सेवा क्षेत्र आदी व्यवसायाकरिता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करून देणे.

    योजनेचे स्वरूप:बँकेमार्फत लाभार्थींना रु. 10 लाखापर्यंत कर्ज (loan scheme) वितरीत केले जाईल. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) व्याजपरतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. या योजनेमध्ये अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे तसेच कुटुंबातील उत्पन्नाची वार्षिक मर्यादा रु. 8 लाखापर्यंत आहे. ही योजना संपूर्णपणे संगणीकृत असून महामंडळाचे वेब पोर्टल www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी व अर्ज सादर करणे अनिवार्य राहील.

    शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना:

    उद्देश: इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजातील विद्यार्थ्यांकरीता उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता नाभिक समाजातील विद्यार्थ्यांना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करणे.

    योजनेचे स्वरूप: राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 10 लाखापर्यंत असेल. परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 20 लाखापर्यंत राहील.

    लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती:

    अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्ष असावे. अर्जदार इतर मागास प्रवर्गातील तसेच महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरिता रु. 8 लाखापर्यंत असावे. अर्जदार 12 वीत 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. तसेच पदवीच्या द्वितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणासह पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोर 0-1, (म्हणजेच यापूर्वी कर्ज घेतलेले नसावे) किंवा 500 पेक्षा अधिक असावा. हि योजना पूर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जाऊन भरावे.

    5 लक्षपर्यंतची 20 टक्के बीज भांडवल योजना:

    बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत कमाल मर्यादा रु. 5 लाखापर्यंतच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात येते. कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तसेच पारंपारिक लघु व सेवा उद्योगासाठी महामंडळामार्फत कर्ज देण्यात येते. नाविन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येईल. मंजूर कर्ज रकमेच्या 5 टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ व 75 टक्के बँकेचा सहभाग आहे. महामंडळाच्या कर्ज रकमेवर 6 टक्के व्याजदर असून बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याजदर लागू राहील. कर्जाची परतफेड 5 वर्षापर्यंत करता येईल. सदर योजनेत अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे व कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1 लाखापर्यंत असावी.

  • Ministry of OBC | ओबीसी मंत्रालयाची स्थापना करा : खासदार प्रतिभा धानोरकर

    Ministry of OBC

    Ministry of OBC : इतर मागासवर्गीय कल्याण समितीची बैठक दि. 17 डिसेंबर 2024 रोजी दिल्ली येथे आयोजित आली होती. या सभेत ओबीसी कल्याण समितीच्या सदस्या तथा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी संदर्भात अनेक मागण्या लावून धरल्या.

    या बैठकीत प्रामुख्याने देशात संख्येने सर्वात जास्त असणाऱ्या ओबीसी समाजाचे प्रश्न कायमस्वरूपी सुटावे याकरिता त्यांनी केंद्रात ओबीसी मंत्रालयाची (Ministry of OBC) स्थापना करावी, हि मागणी खासदार धानोरकर यांनी लावून धरली.

    चंद्रपूर जिल्ह्यात 11 महिन्यात 194 नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू

    त्यासोबतच देशात जातनिहाय जनगणना होण्याकरीता इतर मागासवर्ग कल्याण समिती (obc kalyan samiti) द्वारा सरकार कडे प्रस्ताव पाठविण्यात यावा अशी देखील मागणी केली. तसेच क्रिमीलेअर च्या उत्पन्नाची मर्यादा दि. 13 सप्टेंबर  2017 पासून अद्यापही वाढविण्यात आलेली नाही, त्यामुळे ओबीसींचा नौकरीतील अनुषेश बघण्यास अडचण निर्माण होत आहे.

    तरी क्रिमीलेअर च्या उत्पन्नाची मर्यादा वाढवावी अशी मागणी देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी कल्याण समितीच्या अध्यक्षांकडे केली. त्यासोबतच, ओबीसी (obc) प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना पुर्ण व जलद गतीने शिष्यवृत्ती मिळावी याकरिता सरकार ने पुढाकार घेण्याकरीता समितीने प्रस्ताव पाठवावा अशी देखील खासदार धानोरकर यांनी मागणी केली.

    यावेळी समितीच्या बैठकीत इतर मागासवर्गीय कल्याण समितीचे संचालक श्री महेश्वर यांच्यासह इतर मागासवर्गीय कल्याण समितीच्या सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

  • Wear a helmet | धक्कादायक माहिती चंद्रपूर जिल्ह्यात 11 महिन्यात 194 नागरिकांचा मृत्यू

    Wear a helmet

    Wear a helmet : जिल्ह्यात दुचाकी वाहन चालकांच्या अपघाताचे प्रमाण वाढत असून मृत्यूमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायदा 1988 कलम 129 अन्वये सक्तीचे आहे. जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर 2024 पर्यत दुचाकीचे एकुण 384 अपघात झाले असुन त्यात 194 नागरिकांचा मृत्यु झाला आहे. त्यापैकी 166 दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले आहेत.

    हेल्मेटबाबत सर्वोच्च न्यायालयाने कडक धोरण अवलंबले असून चंद्रपूर पोलीस दलाच्यावतीने हेल्मेट न परीधान करणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई करण्याचा उद्देश अपघातामध्ये मृत्युदराचे प्रमाण कमी करणे हे आहे.

    चंद्रपुरात राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन

    दि. 10 ते 17 डिसेंबर 2024 या कालावधीत वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपूर व सर्व पोलीस स्टेशनतर्फे हेल्मेटबाबत विशेष मोहिम राबवून 4 हजार 300 विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली.

    यामध्ये वाहतुक नियंत्रण शाखेतर्फे 3 हजार 493 तर पोलीस स्टेशनतर्फे 807 विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली आहे.  दि. 17 डिसेंबर 2024 रोजी विसापुर येथील टोलनाक्याजवळ वाहतुक शाखेतर्फे एकुण 1 हजार 97 विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. Wear a helmet

    बरेचसे नागरीक हे हेल्मेट परीधान न करता दुचाकी चालवितात. त्यामुळे मोठया प्रमाणात अपघात होतात. नागरीकांच्या सुरक्षेकरीता सदर मोहिम संपुर्ण जिल्हयात राबविण्यात येत आहे. तरी, नागरीकांनी यापुढे दुचाकी चालवितांना हेल्मेट परीधान (traffic rules) करावे. जिल्हयातील वाढते अपघाताचे प्रमाण पाहता सर्व वाहन चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी केले आहे.

  • chandrapur wall painting : चंद्रपूर मनपातर्फे ” भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव “

    chandrapur wall painting

    chandrapur wall painting : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे (chandrapur mahanagar palika) भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन संपुर्ण राज्यातील हरहुन्नरी कलावंतांचा यात समावेश असावे यादृष्टीने प्रयत्न केले जात आहे.


      नववर्षातील 03 जानेवारी ते 06 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग, क्रीएटीव्ह पेंटींग या ३ स्पर्धा घेण्यात येणार आहे. शहरातील मुख्य दर्शनी भागातील भिंतींवर,वृक्षांवर विविध विषयांवर चित्र रेखाटण्यात येणार असुन महाराष्ट्र राज्याच्या कुठल्याही शहरातील रहिवासी नागरीक यात सहभागी होऊ शकतो. वयाचे बंधन नसल्याने व्यावसायिक तसेच हौशी चित्रकारांना सुद्धा भाग घेता येणार असुन उत्कृष्ट चित्रनिर्मिती करणाऱ्या कलाकारांना पारितोषिक देण्यात येणार आहे.

    गडचांदुरात लालपरीचा अपघात, एकाचा मृत्यू


        त्याचप्रमाणे वृक्ष पेंटींग स्पर्धेत नेमून दिलेल्या झाडांचे सौंदर्यीकरण करणे अपेक्षित आहे. क्रीएटीव्ह पेंटींग स्पर्धेत सार्वजनिक ठिकाणी सभोवताली उपलब्ध असलेल्या वस्तु / झाडी इत्यादींचा वापर करून कलात्मक पेंटींग करणे अपेक्षित आहे. क्रिएटिव्ह पेंटिंग (Creative painting ) करतांना शहरातील सार्वजनिक स्थळांच्या आजूबाजूचा परिसराचा वापर करता येणार आहे उत्कृष्ट संकल्पनेला गौरवान्वित केले जाणार आहे.  

    भाग कसा घ्यावा – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScJ5a7bq6mLd7MTc-yT4o4UWgI7oD3j6BXJdVhNvNmjTEj_tg/viewform या गुगल लिंकद्वारे स्पर्धेत भाग घेता येईल.सदर लिंक ही मनपाच्या फेसबुकवर सुद्धा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 8329169743, 9881585846, 7089839525 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल.    

    बक्षिसे –   भिंतीचित्र पेंटींग स्पर्धेत व्यावसायिक चित्रकारांसाठी वैयक्तीक गट व समुह गट ठेवण्यात आला आहे.
    व्यावसायिक चित्रकार ग्रुप –
    1.  प्रथम – 1 लक्ष 51 हजार रुपये
    2. द्वितीय – 1 लक्ष रुपये
    3. तृतीय – 51 हजार रुपये
    4. प्रोत्साहनपर – 10  बक्षिसे
    व्यावसायिक चित्रकार व्यक्तिगत –
    १. प्रथम – 71 हजार रुपये
    २. द्वितीय – 51 हजार
    ३. तृतीय – 31 हजार रुपये
    ४. प्रोत्साहनपर – 10 बक्षिसे
    वृक्ष पेंटिंग –
    १. प्रथम – 21 हजार रुपये
    २. द्वितीय – 15 हजार
    ३. तृतीय – 11 हजार रुपये  
    क्रिएटिव्ह पेंटिंग –
    १. प्रथम – 21 हजार
    २. द्वितीय – 15 हजार
    ३. तृतीय – 11 हजार

    भाग घेण्यास पात्रता :  स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे चित्रकलेत पारंगत असावे या दृष्टीने स्पर्धकांसाठी पात्रता निकष ठेवण्यात आले आहेत.
    १. चित्रकला शिक्षक
    २. ललित चित्रकला
    ३. आर्ट डिप्लोमा /एटीडी धारक किंवा प्रवेश घेतलेला  / शिक्षण घेत असणारे ( शिकाऊ विद्यार्थी )
    ४. भिंती चित्रकला / स्पर्धांमधे विजेते असल्याचे प्रमाणपत्र असणारे
    ५. कला किंवा चित्रकला दुकान किंवा तसा पुरावा हवा
    ६. रेखाचित्र मास्टर ( ATD )          

    स्पर्धेचे विषय :
    1. स्वच्छ चंद्रपूर
    2. स्वच्छ भारत
    3.पर्यावरण संरक्षण  
    4. प्लास्टीक बंदी
    5. स्वच्छ हवा
    6. स्वच्छ पाणी
    7. रेन वॉटर हार्वेस्टींग  
    8. माझी वसुंधरा
    9. सौर ऊर्जेचा वापर
    10. बॅटरीचलित वाहनाचा वापर
    11. चंद्रपूरचे ऐतिहासिक वैभव
    12. मलेरिया व डेंग्यू प्रतिबंध
    13. अमृत महोत्सव
    14. 3R reducing, reusing and recycling Waste
    15. रस्ता स रक्षा
    16. वाहतूक नियमांचे पालन