save bangladeshi hindu
save bangladeshi hindu चंद्रपूर : बांग्लादेशातील हिंदूवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ बंगाली समाज एकता संघर्ष समिती, चंद्रपूरच्या वतीने सोमवार १६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील बंगाली समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाच्या पंतप्रधानांना निवेदन पाठविले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी घेतली दखल, पण मंत्रिमंडळात दखल नाही
निवेदनातून त्यांनी बांग्लादेशातील हिंदू बांधवांवर होणारे अत्याचार तातडीने थांबविण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बांग्लादेशातील हिंदू बांधवांवर सातत्याने हल्ले होत आहेत. या अत्याचारामुळे हिंदू बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत हा बहुसंख्य हिंदू बांधवांचा देश आहे.
त्यामुळे भारत सरकारने हस्तक्षेप करून होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबवाव्या, अशी बांग्लादेशातील हिंदू बांधवांकडून आर्त हाक दिली जात आहे. चंद्रपूर शहरात बंगाली समाजबांधव (chandrapur Bengali samaj) मोठ्या संख्येने राहतात. या समाजबांधवांच्यावतीने बांग्लादेशातील हिंदू बांधवांवरील हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे.
बंगाली समाज एकता संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला दुपारी १२ वाजता श्री श्री मॉ दुर्गा काली माता मंदिर येथून सुरवात करण्यात आली. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

मोर्चात भाजपचे नेते मनोज पाल, ज्येष्ठ नेते तुषार समो, अॅड. पारोमिता गोस्वामी, डॉ. अमल पोद्दार, राधेश्याम शहा, मदन शहा, बलराम शहा, सविता पाल, प्रकाश अधिकारी, विश्वजित शहा, कृष्ण कुंडू, तापोष डे, बिमल शहा, गुरुदास मंडल, मनोरंजन राय, कविता सरकार, विश्वजित डेबनाथ, रमेश सरकार, इतिका शहा, अमित अधिकारी, बलाई चक्रवर्ती, राबिन बिश्वास, बाबुलाल शहा, गौतम शहा, मनीष दास यांच्यासह हजारोच्या संख्येने बंगाली समाजबांधव सहभागी झाले होते.
Leave a Reply