Blog

  • wildlife railway conflict in Chandrapur । 🔥 १०० मीटरपर्यंत फेकले गेले शरीराचे तुकडे! चंद्रपूर रेल्वे अपघाताने हादरले जंगल

    wildlife railway conflict in Chandrapur

    wildlife railway conflict in Chandrapur : चंद्रपूर: बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावरील लोहारा-जुनोना जंगलातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका हृदयद्रावक घटनेत गर्भवती सांबरीचा आणि तिच्या पोटातील पूर्ण वाढ झालेल्या पिल्लाचा रकसोल एक्सप्रेसच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला.

    धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    हा अपघात इतका भीषण होता की, सांबरीच्या पोटातील पिल्लू बाहेर पडून रेल्वे रुळाच्या बाजूला पडले होते. त्या पिल्लाचे गुलाबीसर कोवळे खूर विदारक दृश्य निर्माण करत होते. अपघातानंतर सांबरीच्या पोटाचा कटलेला भाग सुमारे १०० मीटर दूर, तर मागील पाय ५० मीटर दूर फेकले गेले होते. सांबरीचा पोटाचा भाग पूर्णपणे छिन्नविछिन्न अवस्थेत रुळावर पडलेला होता. wildlife accidents

    वन्यजीवांसाठी कर्दनकाळ ठरलेला रेल्वे मार्ग:

    बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून जातो, ज्यामुळे वन्यजीवांसाठी तो एक मोठा धोका बनला आहे. विशेषतः लोहारा ते मूल दरम्यान सर्वाधिक रेल्वे अपघात घडतात. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी (Habitat Conservation Society) या मार्गावरील प्रत्येक प्राण्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून असते आणि रेल्वे अपघातात मृत वन्यप्राण्यांच्या नोंदी शास्त्रीय पद्धतीने करते.

    या रेल्वे मार्गाला वन्यजीवांसाठी ‘कर्दनकाळ’ असे म्हटले जात आहे. अलीकडेच, याच मार्गावर दुसरी रेल्वे लाईन टाकण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडून चर्चेत आहे. सध्या एकाच रेल्वे रुळावरून असंख्य वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत आणि जर दुसरी लाईन टाकली, तर वन्यजीवांसाठी रेल्वे रूळ ओलांडणे जवळजवळ अशक्य होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. pregnant deer hit by train

    अशास्त्रीय उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह:

    वन्यजीवांचा भ्रमण मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी शास्त्रीय उपाययोजनांवर भर देण्याऐवजी, सध्या अशास्त्रीय पद्धतीने ५ फुटांची कुंपणे तयार करण्यात आली आहेत. सांबर, हरीण, वाघ, बिबट यांसारखे प्राणी ५ फुटांवरून सहज उडी मारून पलीकडे जाऊ शकतात. त्यामुळे अशा तुटपुंज्या योजनांचा काय उपयोग, असा प्रश्न हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीने उपस्थित केला आहे.

    सोसायटीने वनविभाग आणि रेल्वे प्रशासनाला शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, परंतु त्याकडे अद्याप लक्ष दिले जात नसल्याचे दिसत आहे. आणखी किती वन्यजीवांना रेल्वे अपघातात जीव गमवावे लागणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

    घटनास्थळी उपस्थित अधिकारी व प्रतिनिधी:

    या अपघाताची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जुनोना श्री. मेश्राम साहेब, वनपाल श्री. डी. जी. कांबळे, वनरक्षक श्री. आर. दि. पायपरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे आणि त्यांचे सहकारी अमित देशमुख, किरण बावस्कर, नाजिश अली हे देखील उपस्थित होते.


  • Sudhir Mungantiwar farmer bonus news । 💸 बोनस थेट खात्यात! मुनगंटीवारांनी केलं जे कुणी करू शकलं नाही

    Sudhir Mungantiwar farmer bonus news

    Sudhir Mungantiwar farmer bonus news : चंद्रपूर – शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव अग्रेसर असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे,चंद्रपूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

    कांग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

    खरीप हंगाम 2024-25 अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत सहभागी झालेल्या नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील पणन अधिकारी विभागाकडे 69 कोटी रूपये तर आदिवासी विकास महामंडळाकडे 25 कोटी रूपये धान बोनस जमा झालेला असुन पाहिल्या टप्प्यातील एकूण 94 कोटी रूपये शेतकऱ्यांच्या थेट पैसे खात्यात धानाच बोनस जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांना लवकरच बोनस मिळणार आहे.यासाठी चंद्रपूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

    राज्य शासनाने धान लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रानुसार, प्रती हेक्टर वीस हजार रुपयांचा प्रोत्साहनपर बोनस देण्याचा शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत रेटून धरली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने यासंदर्भात निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. direct bonus to farmers bank account

    विशेष म्हणजे, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो वा नसो, तरीही शेतकऱ्यांना ही प्रोत्साहनपर रक्कम दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जावी, अशी मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली होती. ती देखील राज्य शासनाने मान्य करून तसा निर्णय जाहीर केला होता. government bonus scheme for paddy farmers

    या निर्णयामागे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विधानसभेतील मागणी महत्त्वाची ठरली. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अन्न व नागरी पुरवठा विभागाने 25 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात हा बोनस जमा होण्याची सुरुवात झाली आहे. राज्यभरातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत. How to check paddy bonus status

    कायम शेतकऱ्यांप्रती संवेदनशील

    आ.मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची विक्रमी 202 कोटीची रक्कम मिळू शकली होती. यापूर्वीही धानाच्या बोनससाठी पाठपुरावा करत बोनस मिळवून दिला होता. शेतकऱ्यांप्रती आ. मुनगंटीवार सदैव संवेदनशील असतात, हे विशेष.

    मुख्यमंत्र्यांसोबत केली होती चर्चा

    राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा केली होती. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळाला तर शेतकऱ्यांचे मनोबल वाढेल, याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष बोनस देखील जमा होण्याची सुरूवात झाली आहे.

  • AMRUT scheme corruption case Chandrapur | AMRUT योजनेचा वापर की भ्रष्टाचाराचा महास्फोट? पप्पू देशमुखांचा मोठा आरोप!

    AMRUT scheme corruption case Chandrapur

    AMRUT scheme corruption case Chandrapur : चंद्रपूर : २३४ कोटी रूपयांची अमृत-१ व २७० कोटी रूपयांची अमृत-२ पाणीपुरवठा योजना, ५०६ कोटी रूपयांची अमृत मलनिस्सारण योजना तसेच शहरात विविध ठिकाणी फाउंटेन लावणे, रामाळा तलाव पुनर्जीवन व सौंदर्यीकरण,१०० कोटी रूपयांचे कचरा संकलन व वाहतुकीचे काम, मालमत्ता कर मुल्यांकन प्रसिद्धीचे कंत्राट, कोरोना काळात भोजन पुरविणे, मालमत्तेचे फेर मुल्यांकन अशा कोट्यावधी रुपयांच्या विविध कामांमध्ये गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार मनपाचे माजी नगरसेवक व जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव यांना केली होती.

    अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू, आता आयोग उतरले मैदानात

    विविध कामातील घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी दिनांक 12 जुलै 2024 रोजी देशमुख यांनी मंत्रालयातील नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव कार्यालयात पत्र दिले. मात्र मनपातील घोटाळ्यांची चौकशी करण्याऐवजी नगर विकास विभागाने मनपाचे भ्रष्ट आयुक्त विपिन पालीवाल यांना पदोन्नती दिली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या देशमुख यांनी दिनांक 24 जून 2025 ला प्रधान सचिवांना पत्र देऊन न्यायालयात फौजदारी याचिका टाकण्याचा इशारा दिला. एवढेच नव्हे तर फौजदारी याचिकेमध्ये थेट प्रधान सचिवांना गैरअर्जदार करण्यात लेखी इशारा सुद्धा त्यांनी दिला. promotion of corrupt municipal commissioner case


    चंद्रपूर महानगरपालिकेत आतापर्यंत झालेल्या सर्व घोटाळ्यांना तसेच भ्रष्ट आयुक्त विपिन पालीवाल यांना मंत्रालयातील नगर विकास विभागाचे संरक्षण असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.भ्रष्ट आयुक्त पालीवाल यांना पदोन्नतीचे बक्षीस देणाऱ्या नगर विकास विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे देशमुख यांनी लेखी तक्रार केली.

    आमदार सुधाकर अडबाले ‘हक्कभंग’ प्रस्ताव मांडणार

    माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी मनपातील भ्रष्टाचाराबाबत नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांना पत्र दिले होते. आमदार अडबाले यांनी 12 जुलै 2024 रोजी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र देऊन मनपातील सर्व घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. SIT investigation demand in urban development scams

    मात्र आजपावेतो प्रधान सचिव कार्यालयाने या प्रकरणाबाबत आमदार अडबाले यांना कोणतीही माहिती पुरविली नाही.त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडणार व चंद्रपूर मनपा तसेच नगर विकास विभागाच्या सर्व भ्रष्ट अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करण्याकरिता पाठपुरावा करणार असे आश्वासन आमदार अडबाले यांनी माजी नगरसेवक देशमुख यांच्याशी चर्चा करतांना दिले.

  • justice for minor girl murder case । 🚨 14 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू! आता न्यायासाठी थेट आयोग उतरले मैदानात

    justice for minor girl murder case

    justice for minor girl murder case : चंद्रपूर, दि. 27 : भद्रावती तालुक्यातील चोरा येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू हा अतिशय दुर्दैवी असून संशयास्पद सुद्धा आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मृतक मुलीच्या आई-वडीलांकडून तसेच संबंधित यंत्रणांकडून घेतली आहे. मृतक मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अतिशय गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करावा, असे निर्देश अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲङ धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

    तृतीयपंथीयांसाठी सर्व समावेशक कार्यक्रम


    विश्रामगृह येथे आयोजित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पुढे ॲङ मेश्राम म्हणाले, 20 मार्च 2025 रोजी चोरा येथील अश्विनी आसुटकर या अल्पवयीन मुलीची हत्या की आत्महत्या, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आरोपी हा 22 वर्षाचा असून त्या मुलाने तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दुर्दैव म्हणजे याच गावात पोक्सोची दुसरी घटना घडल्याचे सुध्दा निदर्शनास आले आहे. जिल्हा प्रशासनाने अशा घटनांना तात्काळ आळा घालावा. जिल्हा प्रशासन, पोलिस विभागासह सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग या विभागाने सुद्धा अशा घटकांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. pocso act justice for minor victims


    आयोग म्हणून या घटनेत दिरंगाई झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. ज्या डॉक्टरांच्या टीमने मृतक मुलीचे पोस्टमार्टम केले आहे, त्या डॉक्टरांना सुद्धा तात्काळ प्रभावाने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच वरोराच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नियोमी साटम यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने तपास करावा. मृतक मुलीच्या आई-वडिलांची शंका नऊ जणांवर असून या सर्व नऊ जणांचे फोनचे चाट, सीडीआर, सोशल मीडिया आदींची तपासणी करावी.


    अशा प्रकरणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कडून 3 लक्ष ते 10 लक्ष रुपये मदतीची तरतूद आहे. ही तरतूद संबंधित कुटुंबाला मिळवून देण्यासाठी विभागाने प्रयत्न करावे. जिल्ह्यात एकूण पोक्सोच्या घटना किती, ॲट्रॉसिटीच्या घटना किती, याचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाबद्दल प्रशासनाने 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देशही ॲङ धर्मपाल मेश्राम यांनी दिले. victim family compensation under pocso act

    चोरा येथे मृतक मुलीच्या घरी भेट


    अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲङ धर्मपाल मेश्राम यांनी भद्रावती तालुक्यातील चोरा येथे मृतक मुलीच्या घरी भेट दिली. तसेच आई-वडिलांसोबत व आजी सोबत चर्चा करून संपूर्ण प्रकरण जाणून घेतले.


    यावेळी वरोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी नियोमी साटम, वरोराचे उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे, तहसीलदार श्री. भांडारकर, पोलिस निरीक्षक श्री. पारधी, आयोगाचे कायदेशीर सल्लागार ॲङ राहुल झामरे आदी उपस्थित होते.

  • campus placement after iti course । 🎯 ITI नंतर थेट नोकरी! कॅम्पस प्लेसमेंटमध्ये अनेकांची निवड

    campus placement after iti course

    campus placement after iti course : चंद्रपूर (२७ जून) – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे गुरुवारी घेण्यात आलेल्या शिकाऊ उमेदवारी रोजगार भरती मेळाव्यात 70 विद्यार्थ्यांची निवड झाली असून 20 जणांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले.

    शहरात निकृष्ठ दर्जाचे रस्ते, आप ने केली कारवाईची मागणी


    कार्यक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच प्राचार्य वैभव बोंगीरवार यांच्या मार्गदर्शनात मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषांगिक सूचना केंद्र, चंद्रपूर द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकावू उमेदवारी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या भरती मेळाव्याकरिता व्हेरॉक इंजिनिअरिंग, धूत ट्रान्समिशन, पटले प्लेसमेंट सर्विसेस, स्पीक अँड स्पेन एज्युकेशन सोल्युशन्स लिमिटेड, ब्रह्मा इंजीनियरिंग अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, वैभव एंटरप्राइजेस अँड प्लेसमेंट सर्विसेस इत्यादी आस्थापनांनी सहभाग नोंदविला. या रोजगार भरती मेळाव्यात एकूण 260 विद्यर्थ्यांनी सहभाग नोंदविला. iti apprenticeship benefits for students

    विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा

    यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुख्य अधिकारी तथा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप करण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच मेळाव्याद्वारे मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन यशस्वी होण्याचे आवाहन केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

    शिकाऊ उमेदवार रोजगार भरती मेळाव्याकरिता अप्रेंटिसशिप सेल तथा राईट वॉक फाउंडेशन चंद्रपूर व गडचिरोली विभागाचे समन्वयक कपिल बांबोडे यांनी अप्रेंटिसशिप, त्याचे फायदे, निवड प्रक्रिया आणि सॉफ्ट स्किल याची माहिती दिली.


    कार्यक्रमाचे संचालन योगेश धवणे यांनी केले. यावेळी कंपनी कोऑर्डीनेटर म्हणून विजय तांदळे, मनोज पाटील, श्री. खोब्रागडे तसेच इतर समन्वयक, बीटीआरआयच्या श्रीमती लोखंडे, श्री. महातो तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनदेशक श्री. नंदेश्वर, निमसरकार, चांदेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

  • social inclusion programs for transgender । 👏 तृतीयपंथीयांसाठी समानतेचा नवा अध्याय – काय आहेत हे समावेश कार्यक्रम?

    social inclusion programs for transgender

    social inclusion programs for transgender : चंद्रपूर – तृतीयपंथीय हे समाजाचा अविभाज्य घटक असून काही गैरसमजुती पोटी आपण त्यांना आपल्यापासून दूर केले आहे. याचा परिणाम म्हणून त्यांना संघर्षांला सामोरे जावे लागत आहे. मात्र यापूढे ते आपला समाज घटक आहेत, आपले बांधव आहेत, असे समजुन आपण सर्वांनी त्यांच्यासोबत चांगला व्यवहार करावा व शासनाच्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहोचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी नितिन व्यवहारे यांनी केले. government schemes for transgender people

    चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्षाला जबर धक्का, जेष्ठ नेत्याचा भाजप प्रवेश


    सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा जात पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेव आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, समतादुत प्रकल्प व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक न्याय व तृतीयपंथीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदु आवारे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहायक आयुक्त विनोद मोहतुरे आदी उपस्थित होते.

    तृतीयपंथीयांना साडी चोळी वाटप

    यावेळी शासकीय निवासी शाळा व वसतीगृहात राहून 85 ते 100 टक्के गुण प्राप्त 12 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच संबोधन ट्रस्टचे राज काचोळे व प्रशिक मेश्राम यांना व कार्यक्रमाला उपस्थित सर्व तृतीयपंथीय लाभार्थ्यांना साडीचोळी देवून सन्मानित करण्यात आले. transgender empowerment government programs

    तृतीयपंथीय कार्यशाळेत हमसफर ट्रस्टचे आशु गोयल यांनी व निलोफर मॅडम यांनी तृतीयपंथीय कसा ओळखावा, त्यांची भावनिक, मानसिक गरजा काय आहे, त्या आळखून समाजातल्या सर्वसामान्य लोकांनी त्यांच्याशी कसा व्यवहार करावा, त्यांना काय अपेक्षित आहे. याबद्दल महत्व समजावून सांगितले.

    कार्यक्रमाचे संचालन बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांनी तर आभार समाज कल्याण निरीक्षक पुनम आसेगावकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनात समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे, स्मिता बहिरमवार, श्वेता लक्कावार, गणेश खोटे, संदिप वाढई. सूरज डांगे, संजय बन्सोड, सजल कांबळे, राबीया अली, चेतना खाडीलकर, अमोल गोहणे, राहुल आकुलवार, उर्मिला केरझरकर, संतोष सिडाम, ठाकरे मॅडम, बार्टी चे सर्व समतादूत सर्व क्रिस्टल कर्मचारी शासकीय निवासी शाळा व वसतीगृहाचे गृहपाल व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बहुसंख्येने तृतीयपंथीय लाभार्थी वृद्ध नागरिक, शाळा, महाविद्यालय व वसतिगृहाचे विद्यार्थी उपस्थित होते.

  • senior congress leaders joining BJP । चंद्रपूरच्या राजकारणात उलथापालथ!, कांग्रेसला मोठा धक्का

    senior congress leaders joining BJP

    senior congress leaders joining BJP : चंद्रपूर – कॉंग्रेसच्या माजी महिला जिल्हा अध्यक्षा नंदा अल्लुरवार यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या विवेक नगर येथील गजानन निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार किर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या उपस्थितीत नंदा अल्लुरवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

    यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश निमंत्रित विशेष सदस्य तुषार सोम, दशरथ सिंह ठाकूर, भाजप नेते प्रकाश देवतळे, भाजप नेते रवी गुरनुले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, संचालक आवेश पठाण, संजय डांगरे, गणेश तडवेकर, ब्रम्हपुरी नगर परिषदेचे सदस्य विलास निखार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजू बोरकर, अमोल शेंडे, करणसिंह बैस, कार्तिक बोरेवार यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी अल्लुरवार यांच्या गळ्यात भारतीय जनता पक्षाच्या दुपट्टा टाकून त्यांचा प्रवेश करवून घेतला. women leaders joining BJP

    आयुक्त पालीवाल यांना निलंबित करा – राजेश बेले

    नंदा अल्लुरवार या माजी मंत्री स्व. वामनराव गड्डमवार यांची कन्या असून त्यांच्या घराण्याचा जिल्ह्यातील राजकारणात ठसा आहे. त्या तीस वर्षांहून अधिक काळ चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक राहिल्या असून सहकार क्षेत्रात, महिला विकासात आणि सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कार्यरत असताना त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. how BJP is gaining ground in Chandrapur politics

    भाजपमध्ये प्रवेश करताना नंदा अल्लुरवार म्हणाल्या, “आज मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना मला समाधान वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नेतृत्व, विकासाचा दृष्टिकोन, सामान्य माणसासाठी चालवलेले विविध उपक्रम, महिला सक्षमीकरणाचे धोरण मला भावते. चंद्रपूर जिल्ह्यात आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार किर्तिकुमार भांगडीया यांनी विकासाचे काम केले आहे. मला त्यांच्या सोबत काम करून लोकांसाठी अधिक चांगले योगदान देता येईल असा विश्वास व्यक्त केला.

    या प्रवेशामुळे राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नंदा अल्लुरवार यांचा काँग्रेसमध्ये दीर्घकाळाचा अनुभव, त्यांचा सहकार क्षेत्रातील दबदबा, महिलांमध्ये असलेली लोकप्रियता भाजपच्या संघटनाला अधिक बळकटी देईल, असे मानले जात आहे. senior congress leaders joining BJP

    पक्षाला मिळेल ताकद

    या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, नंदा अल्लुरवार या अनुभवी, कणखर नेतृत्वाच्या आणि सामाजिक कामात रुजलेल्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सहकार चळवळीसाठी केलेले योगदान मोठे आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला ताकद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    आमदार किर्तिकुमार (बंटी) भांगडीया म्हणाले, भाजपमध्ये नंदा अल्लुरवार या प्रवेश करून आपल्या कुटुंबात सामील झाल्या आहेत. त्यांनी दीर्घकाळ सहकार क्षेत्रात लोकांशी जवळचा संपर्क ठेवला आहे. त्यांचा अनुभव, लोकांशी असलेली जवळीक पक्ष संघटनेसाठी आणि विकासासाठी मोलाची ठरेल. चंद्रपूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करू,” असे ते म्हणाले.

    नंदा अल्लुरवार यांच्या भाजप प्रवेशामुळे चंद्रपूरातील राजकारणात नवीन घडामोडींना चालना मिळेल, असे मानले जाते. काँग्रेसच्या जुन्या नेतृत्वातील मोठे नाव भाजपमध्ये सामील झाल्याने भाजपच्या स्थानिक पातळीवरील रणनीतीला मजबुती मिळेल आणि येत्या काळातील स्थानिक निवडणुकांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही मानले जाते.

  • poor quality road construction । तुकूममध्ये निकृष्ट रस्ता! आमदार निधीचा गैरवापर? आप ने केली कारवाईची मागणी

    poor quality road construction

    poor quality road construction : चंद्रपूर, २७ जून २०२५: चंद्रपूर महानगरपालिकेच्या तुकूम प्रभाग क्रमांक १ मधील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचा वापर झाल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टी (आप) चंद्रपूर महानगरने केला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (PWD) तयार करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी ‘आप’ने केली आहे. action against low quality public works

    अपघातग्रस्त आई आणि मुलगा व खासदाराची माणुसकी

    आम आदमी पार्टीचे महानगर अध्यक्ष श्री. योगेश देवराव गोखरे यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबत अधिकृत निवेदन सादर केले. महाडोळे यांच्या दुकानापासून श्रद्धा नगर बोर्डपर्यंतच्या या सिमेंट रस्त्यात M30 ऐवजी केवळ M15 ग्रेडचा सिमेंट वापरल्याचा दावा ‘आप’ने केला आहे. फेसबुक लाईव्हद्वारे रस्त्याची पाहणी करताना, ‘आप’ने स्वतःच्या स्तरावर केलेल्या प्राथमिक चाचणीत ही बाब समोर आल्याचे गोखरे यांनी सांगितले.

    कायदेशीर कारवाई करा

    या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत गोखरे यांनी PWD च्या अधिकृत टेस्टिंग टीम, संबंधित कंत्राटदार आणि आम आदमी पार्टीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत रस्त्याची पुन्हा एकदा चाचणी करण्याची मागणी केली आहे. या चाचणीत रस्त्याचा दर्जा निकृष्ट आढळल्यास संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. public accountability in road development

    या निवेदनाची दखल घेत PWD विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी यावर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

    यावेळी निवेदन सादर करताना मयूर राईकवार (जिल्हाध्यक्ष, आप, चंद्रपूर), राजू कुडे (युवा जिल्हाध्यक्ष), संतोष बोपचे (महानगर संघटन मंत्री), विशाल भाऊ, जितेंद्र भाटिया यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

    “जनतेच्या पैशातून तयार होणाऱ्या विकासकामांमध्ये दर्जा महत्त्वाचा आहे. रस्त्याच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. गरज पडल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा योगेश गोखरे यांनी दिला. या आरोपामुळे चंद्रपूर शहरातील विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता या प्रकरणाची पुढील चौकशी आणि कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • financial help for accident victim । अपघातग्रस्त आई, गरीब मुलगा आणि खासदाराची माणुसकी – हृदयाला भिडणारी कहाणी!

    financial help for accident victim

    financial help for accident victim : चंद्रपूर: चंद्रपूर येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात रामकला रामचंद्र सिडाम रा. मुधोली ता. भद्रावती ही महिला गंभीर जखमी झाली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, मेंदूत रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे. ही माहिती मिळताच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तात्काळ रामकलाला मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या माध्यमातून सुयोग भोयर यांनी तिच्या मुलगा धर्माला आर्थिक मदत दिली आहे.

    चंद्रपुरात बायपास मार्गाची गरज – खासदार धानोरकर

    अपघातग्रस्त रामकला यांचा मुलगा धर्मा याची कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तो सध्या चंद्रपूर येथे BSW च्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे आणि शासकीय वसतिगृह क्रमांक २ मध्ये राहून शिक्षण घेत आहे. त्याच्या कुटुंबाकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही.

    संघर्ष आणि अपघात

    २०१७ मध्ये धर्माचे वडील वारले असून, रामकला स्वतः मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. एकीकडे स्वतःचे शिक्षण आणि दुसरीकडे आपल्या आईच्या उपचाराची आणि कुटुंबाची जबाबदारी, अशा दुहेरी परिस्थितीत धर्मा संघर्ष करत असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला आहे.

    सध्या रामकलावर दीक्षित हॉस्पिटल, चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत. तिच्या उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने मदत करून माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. 

  • police caught suspects with sword in car । स्विफ्ट गाडीतून काय चाललं होतं? पोलिसांनी उघड केलं रहस्य!

    police caught suspects with sword in car

    police caught suspects with sword in car : बल्लारपूर, २७ जून २०२५: चंद्रपूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धारदार तलवारीसह तीन इसमांना अटक केली आहे. आरोपींमध्ये चंद्रभूषण राजदेव चव्हाण, रवी प्रभाकर दोडके (दोघे रा. चंद्रपूर) आणि योगेश बंडूजी कुडकेलवार (रा. बामणी, बल्लारपूर) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. sharp weapon recovered during police raid

    हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला अटक

    आरडाओरड आणि गुन्हा उघड

    मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२६ जून २०२५) बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना खबर मिळाली की, पेपर मिलच्या तीन नंबर गेटजवळ एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीमध्ये तीन अज्ञात इसम आरडाओरडा करत आहेत. या माहितीच्या आधारे, तात्काळ पोलीस पथक पंचांसह घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना तीन व्यक्ती आरडाओरडा करताना आढळले. त्यांची नावे विचारली असता त्यांनी वरीलप्रमाणे आपली ओळख सांगितली. आरडाओरडा करण्याचे कारण विचारले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

    पोलिसांना संशय आल्याने, पंचांच्या उपस्थितीत त्यांच्या गाडीची झडती घेण्यात आली. त्यावेळी गाडीमध्ये एक धारदार लोखंडी तलवार आढळून आली. पोलिसांनी तात्काळ तलवार आणि पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी (क्र. MH 34 AM 0134) ताब्यात घेतली. तिन्ही आरोपींविरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. ४४५/२०२५, कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास पोहेकॉ सुनील कामतकर हे करत आहेत. Indian arms act section 25 explained

    सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, राजूरा श्री. सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पडली. या कारवाईत सपोनि मदन दिवटे, पोउपनि अभिषेक जंगमवार, सफौ आनंद परचाके, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सुनील कामतकर, पो. अंमलदार विकास जुमनाके, शरदचंद्र कारूष, वशिष्ठ रंगारी, मिलिंद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, गुरु शिंदे, सचिन राठोड, भास्कर चिचवलकर, म.पो. अंमलदार अनिता नायडू, चापोअं विना येलपुलवार इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

    या घटनेमुळे बल्लारपूर परिसरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.