wildlife railway conflict in Chandrapur । 🔥 १०० मीटरपर्यंत फेकले गेले शरीराचे तुकडे! चंद्रपूर रेल्वे अपघाताने हादरले जंगल

wildlife railway conflict in Chandrapur

wildlife railway conflict in Chandrapur : चंद्रपूर: बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावरील लोहारा-जुनोना जंगलातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका हृदयद्रावक घटनेत गर्भवती सांबरीचा आणि तिच्या पोटातील पूर्ण वाढ झालेल्या पिल्लाचा रकसोल एक्सप्रेसच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला.

धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

हा अपघात इतका भीषण होता की, सांबरीच्या पोटातील पिल्लू बाहेर पडून रेल्वे रुळाच्या बाजूला पडले होते. त्या पिल्लाचे गुलाबीसर कोवळे खूर विदारक दृश्य निर्माण करत होते. अपघातानंतर सांबरीच्या पोटाचा कटलेला भाग सुमारे १०० मीटर दूर, तर मागील पाय ५० मीटर दूर फेकले गेले होते. सांबरीचा पोटाचा भाग पूर्णपणे छिन्नविछिन्न अवस्थेत रुळावर पडलेला होता. wildlife accidents

वन्यजीवांसाठी कर्दनकाळ ठरलेला रेल्वे मार्ग:

बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून जातो, ज्यामुळे वन्यजीवांसाठी तो एक मोठा धोका बनला आहे. विशेषतः लोहारा ते मूल दरम्यान सर्वाधिक रेल्वे अपघात घडतात. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी (Habitat Conservation Society) या मार्गावरील प्रत्येक प्राण्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून असते आणि रेल्वे अपघातात मृत वन्यप्राण्यांच्या नोंदी शास्त्रीय पद्धतीने करते.

या रेल्वे मार्गाला वन्यजीवांसाठी ‘कर्दनकाळ’ असे म्हटले जात आहे. अलीकडेच, याच मार्गावर दुसरी रेल्वे लाईन टाकण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडून चर्चेत आहे. सध्या एकाच रेल्वे रुळावरून असंख्य वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत आणि जर दुसरी लाईन टाकली, तर वन्यजीवांसाठी रेल्वे रूळ ओलांडणे जवळजवळ अशक्य होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. pregnant deer hit by train

अशास्त्रीय उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह:

वन्यजीवांचा भ्रमण मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी शास्त्रीय उपाययोजनांवर भर देण्याऐवजी, सध्या अशास्त्रीय पद्धतीने ५ फुटांची कुंपणे तयार करण्यात आली आहेत. सांबर, हरीण, वाघ, बिबट यांसारखे प्राणी ५ फुटांवरून सहज उडी मारून पलीकडे जाऊ शकतात. त्यामुळे अशा तुटपुंज्या योजनांचा काय उपयोग, असा प्रश्न हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीने उपस्थित केला आहे.

सोसायटीने वनविभाग आणि रेल्वे प्रशासनाला शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, परंतु त्याकडे अद्याप लक्ष दिले जात नसल्याचे दिसत आहे. आणखी किती वन्यजीवांना रेल्वे अपघातात जीव गमवावे लागणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

घटनास्थळी उपस्थित अधिकारी व प्रतिनिधी:

या अपघाताची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जुनोना श्री. मेश्राम साहेब, वनपाल श्री. डी. जी. कांबळे, वनरक्षक श्री. आर. दि. पायपरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे आणि त्यांचे सहकारी अमित देशमुख, किरण बावस्कर, नाजिश अली हे देखील उपस्थित होते.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *