Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • कंत्राटी कर्मचारी, सुरक्षा रक्षक, अनुकंपाधारक यांची मागणी अधिवेशनात मांडणार

    Maharashtra contract employees : चंद्रपूर 9 December 2025 (News३४) – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. असून अधिवेशनात सदर विषय उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (हे हि वाचा – सुगंधित तंबाखूचा व्यापार करणाऱ्यांवर लागणार मकोका – मुख्यमंत्री फडणवीस)

    कंत्राटी कर्मचारी, सुरक्षा रक्षक, अनुकंपाधारक प्रकरणे तसेच शिक्षकांच्या समस्या याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक संघटना एकत्रितपणे उपोषणस्थळी बसल्या आहेत. नियुक्ती प्रक्रिया, वेतननिर्णय, सेवानिवृत्ती वय वाढ, अनुकंपाधारक नियुक्ती तसेच प्रलंबित भरती या प्रश्नावर तोडगा निघावा, या मागणीसाठी मोठ्या संख्येने कामगार आणि कर्मचारी उपस्थित होते.

    संघटनांचे निवेदन स्वीकारले

    उपोषणस्थळी पोहोचल्यावर आमदार जोरगेवार यांनी सर्व प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनी प्रत्येक संघटनेचे निवेदन स्वीकारले आणि त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. या समस्यांचे गांभीर्य समजून घेत त्यांनी सभागृहात हे प्रश्न दृढपणे मांडले जातील आणि सरकारच्या निदर्शनासही आणले जातील, असे आश्वस्त केले. Maharashtra contract employees

    या सर्व मागण्या जन जीवनाशी संबंधित आहेत. योग्य निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की अधिवेशनात या विषयांवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांशीही संवाद साधला जाणार आहे.

  • चंद्रपुरातील वाघीण निघाली सह्याद्रीला

    tiger breeding program : चंद्रपूर ९ डिसेंबर (News३४) : पश्चिम घाटातील वन्यजीव संवर्धन आणि अनुवंशिक विविधता (Genetic Diversity) वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण दिशेने पाऊल टाकत, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) प्रशासनाने (८ डिसेंबर) वाघिणीला पकडण्याची एक यशस्वी मोहीम पार पाडली. (हे हि वाचा _ बल्लारपुरात देशी कट्ट्याचा सुळसुळाट, पोलिसांची कारवाई, ३ देशी कट्टे जप्त)

    T7_f_S2_f नावाची ही उप-प्रौढ वाघीण, जी वाघीण T7 ची पिल्लू आहे, तिला सुरक्षितपणे आणि यशस्वीरित्या बेशुद्ध (Tranquilized) करण्यात आले.

    अनुवंशिक विविधता वाढवण्यावर भर

    या वाघिणीला पकडण्याची मोहीम तिच्या मोठ्या वास्तव्य क्षेत्रात (Home Range) पार पडली, जे ताडोबा आणि कोलारा या दोन्ही मुख्य क्षेत्रांमध्ये येते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात (STR) वाघांची सक्षम पैदास करणारी लोकसंख्या पुन्हा स्थापित करण्याच्या मोठ्या प्रकल्पाचा हा महत्त्वाचा भाग आहे.

    या वाघिणीचे स्थलांतर केल्यामुळे, तिच्या विशिष्ट अनुवंशिक वंशाच्या (Genetically Distinct Lineage) माध्यमातून अंतर्गत प्रजनन (Inbreeding) थांबवून महाराष्ट्रातील वाघांच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या लोकसंख्येला (Metapopulation) चालना देणे हे उद्दिष्ट आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठवलेली ही दुसरी वाघीण आहे.

    🔬 तपासणी आणि भविष्यातील योजना

    • आरोग्य तपासणी: वाघिणीला पकडल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी तिची संपूर्ण आरोग्य तपासणी केली, ज्यामध्ये तिचे आरोग्य उत्कृष्ट असल्याचे सिद्ध झाले.
    • रेडिओ कॉलर: यशस्वी अनुकूलन (Acclimatization) आणि पुढील ट्रॅकिंगसाठी तिला VHF/GPS रेडिओ कॉलर बसवण्यात आली आहे.
    • स्थलांतर: तिला खास तयार केलेल्या वाहतूक पेटीतून (Transit Crate) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठवण्यात येत आहे.
    • पुढील प्रक्रिया: सह्याद्रीत पोहोचल्यावर, वाघिणीला तात्पुरत्या जागेत (Enclosure) नियंत्रित पद्धतीने “सॉफ्ट रिलीज” केले जाईल.

    प्रभू नाथ शुक्ला (क्षेत्र संचालक, TATR) यांचे मत: “T7_f_S2_f हे एक मौल्यवान अनुवंशिक संसाधन आहे. सह्याद्रीच्या नैसर्गिक वातावरणात तिचे सुरक्षित स्थलांतरण करणे हे आमच्या देशव्यापी वाघ संवर्धन धोरणामध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.” tiger breeding program

    श्री. ए. रेड्डी येलू (उपसंचालक, कोअर, TATR) यांचे मत: “ही यशस्वी मोहीम आमच्या टीमच्या कठोर परिश्रमाचे आणि समर्पणाचे फलित आहे.” tiger breeding program

    🤝 मोहिमेतील टीम

    क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोअर) श्री आनंद रेड्डी येलू यांनी या विशेषज्ञ आणि बहु-शिस्तबद्ध टीमचे नेतृत्व केले.

    या यशस्वी मोहिमेत सहभागी असलेले प्रमुख अधिकारी आणि तज्ञांमध्ये श्री. विवेक रमेश नातू (सहाय्यक वनसंरक्षक), श्री. विशाल कलानू वैद्य (वन परिक्षेत्र अधिकारी, कोलारा), श्री. भाविक प्रभुनाथ चिवंडे (वन परिक्षेत्र अधिकारी, ताडोबा), डॉ. रविकांत खोब्रागडे (पशुवैद्यकीय अधिकारी), श्री. अजय सी. मराठे (शूटर, आरआरटी), आणि जीवशास्त्रज्ञ (Biologist) श्री. शैलेंद्र सिंग देवरा यांचा समावेश होता. या स्थलांतरासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून ए.सी.एफ. श्री. संदेश पाटील आणि इकोलॉजिस्ट श्री. आकाश पाटील हे देखील उपस्थित होते.

  • सात महिन्यांची प्रतीक्षा संपली! जोरगेवार यांच्या मागणीनंतर नियुक्ती प्रक्रिया वेगात

    MLA Jorgewar follow up : चंद्रपूर ८ डिसेंबर (News३४) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक पदासाठी नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नियुक्ती आदेश देण्यासंदर्भातील संबंधित पत्रे उमेदवारांना मिळण्यास सुरुवात झाली असून, या घडामोडीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. (हे हि वाचा – हिवाळी अधिवेशनात आमदार मुनगंटीवार करणार विक्रम)

                डिसेंबर 2024 मध्ये कार्यकारी सहाय्यक पदासाठी लेखी परीक्षा झाल्यानंतर 25 फेब्रुवारी 2025 रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. 5 ते 9 मे 2025 या कालावधीत पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली. त्यानंतर सात महिन्यांहून अधिक काळ उलटूनही अनेक निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळाली नव्हती.

    सततच्या पाठपुराव्याला यश

                खुला, एससी आणि एसटी संवर्गातील उमेदवारांना सप्टेंबर महिन्यात नियुक्ती देण्यात आली, मात्र ओबीसी, इ डब्लु. एस, एस.ई.बीसी माजी सैनिक व खेळाडू संवर्गातील उमेदवारांची नियुक्ती प्रलंबित राहिली. MLA Jorgewar follow up

        ही बाब गांभीर्याने घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत तातडीने प्रलंबित नियुक्त्या देण्याची मागणी केली होती. संबंधित विभागाशी सतत संपर्क, पाठपुरावा व चर्चा केल्यानंतर नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून आता उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे सुरू झाले आहे.

                आमदार जोरगेवार यांनी सांगितले की, योग्य पात्रतेने निवड झालेल्या कोणत्याही उमेदवारास अन्याय होणार नाही. शासन स्तरावर आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात आली असून नियुक्ती प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे. युवकांचे भविष्य सुरक्षित करणे ही आपली जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

  • रेल्वे समस्यांवर तोडगा? उपोषणकर्त्यांना MLA जोरगेवारांचे आश्वासन

    MLA Jorgewar rail protest visit : चंद्रपूर ७ डिसेंबर (News३४) – चंद्रपूर शहरातील रेल्वे संबंधित दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांची दखल घेण्यासाठी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला आज आमदार किशोर जोरगेवार यांनी आज रविवारी भेट दिली. यावेळी सदर प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे सांगत त्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.  (हे वाचा – युवक कांग्रेस महासचिवाचा भाजपात प्रवेश)

       यावेळी यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी महानगर अध्यक्ष छबु वैरागडे, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, महामंत्री सविता दंढारे, देवानंद वाढई आदींची उपस्थिती होती. 

    चंद्रपूर–मुंबई सुपरफास्ट ट्रेन तसेच चंद्रपूर–पुणे फास्ट ट्रेन रोज भुसावळ मार्गे सुरू करण्याच्या प्रमुख मागण्यांसह रेल्वे संबंधित इतर मागण्यांना घेऊन रेल्वे प्रवासी सेवा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ६ डिसेंबरपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. MLA Jorgewar rail protest visit

    आज रविवारी आमदार जोरगेवार उपोषणस्थळी पोहोचले आणि उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. आंदोलन कर्त्यांकडून त्यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन स्वीकारताना त्यांनी या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जात असल्याचे सांगितले. रेल्वेसंबंधी प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

    आमदार जोरगेवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याला रेल्वेच्या उत्तम आणि वेगवान सेवांची गरज आहे. या मागण्या न्याय्य असून, जनहिताच्या आहेत. या विषयावर हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चाही करणार आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असे ते यावेळी म्हणाले.

  • युवा काँग्रेस नेते भाजपात! जोरगेवारांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश

    Chandrapur political switches : चंद्रपूर ७ डिसेंबर (News३४) – युवक काँग्रेस विधानसभा महासचिव वैभव रघाताटे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा कार्यक्रम आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या गजानन निवासस्थानी उत्साहात पार पडला. (हे वाचा : रस्त्याचे दुरुस्तीकरण निकृष्ट दर्जाचे, नागरिकांचा एल्गार)

    यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी महानगर अध्यक्ष छबु वैरागडे, विधानसभा अध्यक्ष दशरथ सिंह ठाकुर, महामंत्री सविता दंढारे, अॅड. राहुल घोटेकर, देवानंद वाढई आदींची उपस्थिती होती.

    हा पक्षप्रवेश भाजपला ऊर्जा देणारा

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आजचा दिवस केवळ पक्ष प्रवेशाचा नाही, हा विश्वासाचा दिवस आहे. वैभव रघाताटे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाचा आपल्या कुटुंबात प्रवेश हा आपल्या संघटनेला नवी ऊर्जा देणारा आहे. राजकारण म्हणजे पदाचा अभिमान नव्हे, तर जबाबदारी आहे. जनता आपल्या पासून अपेक्षा ठेवते. या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद कार्यकर्त्यांत आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा या पक्षाचा आधारस्तंभ आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक भागात आपण काम केले आहे. अभ्यासिकांचा उभार, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा यासह प्रत्येक ठिकाणी आपण योजनाबद्ध काम केले आहे. लोकांच्या जीवनमानात बदल दिसायला लागला आहे. पक्षात येणाऱ्याचे आपण कौतुक करतो, जपतो आणि योग्य संधी देतो. पक्ष प्रवेश म्हणजे शेवट नाही, तर ती सुरुवात आहे, असे ते यावेळी म्हणाले. Chandrapur political switches

    यावेळी रघाताटे यांच्यासह आलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यात भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा घालून आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. वैभव रघाताटे यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितले की, आमदार किशोर जोरगेवार यांच्या विकासकामांनी प्रभावित होऊन आम्ही भाजपात आलो आहोत. चंद्रपूरात विकासाची नवी दिशा सुरू झाली आहे. आम्ही या प्रवासात सक्रिय सहभाग करणार, असे ते यावेळी म्हणाले.

  • धान उत्पादकांसाठी ₹२० हजार बोनस! मुनगंटीवारांचे मुख्यमंत्र्याना पत्र

    farmer bonus demands : चंद्रपूर ७ डिसेंबर (News३४) – अवकाळी पावसाने हादरलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगामात तात्काळ आर्थिक दिलासा मिळावा यासाठी प्रतिहेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर करावा, अशी आग्रही मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात झालेले पीकनुकसान आणि त्यातून शेतकऱ्यांवर आलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन ही मागणीचे अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (हे हि वाचा : चंद्रपुरातील रेल्वे समस्यांवर खासदार धानोरकर यांचा पाठपुरावा)

    मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहत असल्याने शेतकरी बांधव आपल्या सरकारकडून आशावादी आहे. मागील वर्षी नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २० हजार रूपये धान बोनस देण्याच्या माझ्या विनंतीस मान देत आपण धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी तात्काळ बोनस जाहीर करून त्यांच्या आर्थिक संकटातून मोठी मुक्तता केली. या संवेदनशील निर्णयाबद्दल आपले मनःपूर्वक आभार, असे आ. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे. farmer bonus demands

    धान उत्पादक शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान

    चालू वर्षातील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अनिश्चिततेचे संकट उभे राहिले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यंदाही बोनस जाहीर करणे अत्यावश्यक बनले आहे.

    नागपूर हिवाळी अधिवेशनात नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिहेक्टरी ₹२०,००० बोनस जाहीर करावा, अशी राज्यभरातून सातत्याने मागणी होत आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचा विचार करून शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी संबंधित विभागांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

  • चंद्रपूरच्या रेल्वे प्रश्नांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सातत्याने पाठपुरावा

    Chandrapur rail connectivity : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याच्या रेल्वे प्रश्नांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्लीच्या तख्तावर सातत्याने आवाज उठवला आहे. अशा परिस्थितीत, ‘रेल्वे सुविधांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करत नाही’ असे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित आरोप करणे, हे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. चंद्रपूर रेल प्रवासी संस्थेच्या उपोषणाला आमचा पूर्ण नैतिक पाठिंबा आहे, मात्र माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी, मी केलेल्या धडाडीच्या कामाचा पुरावा जनतेसमोर आहे. (हे हि वाचा – NASP पोर्टल मधील अडचणी दूर करा)

    खासदार प्रतिभा धानोरकर यांचा ‘रेल्वे’साठी सातत्यपूर्ण पाठपुरावा

    १५ जून २०२४ रोजी रेल्वेमंत्र्यांना पत्र: मी स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून (पत्र क्र. १०१२/२०२४), बल्लारपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल्स (LTT) ही ट्रेन दररोज चालवण्याची आणि काजीपेठ-पुणे ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. Chandrapur rail connectivity

    ४ जुलै २०२४ रोजी विद्यार्थ्यांसाठी विशेष पत्र:

    चंद्रपूर आणि परिसरातील हजारो विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी आहेत, हे लक्षात घेऊन काजीपेठ-पुणे एक्सप्रेस दररोज चालवण्यासाठी त्यांनी रेल्वे मंत्र्यांना पुन्हा स्वतंत्र पत्र (क्रमांक १०९८/२०२४) दिले.

    ०२ एप्रिल २०२५ रोजी संसदेत जाब:

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्न क्रमांक ५२११ द्वारे चंद्रपूर ते पुणे आणि मुंबईसाठी थेट रेल्वे गाड्यांची कमतरता असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि नियमित सुपरफास्ट गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती.

    कोरोना काळात बंद झालेली बल्लारशाह-मुंबई लिंक कोच सेवा (जी सेवाग्राम एक्सप्रेसला जोडली जात होती) ती पूर्ववत सुरू करण्यासाठी त्यांनी पत्र (क्रमांक ३९२३/२०२४) दिले आहे, जेणेकरून सामान्य प्रवाशांची सोय होईल.

    वरोरा येथील प्रवाशांच्या सोयीसाठी कोरोना काळापासून बंद असलेल्या गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्याची मागणीही त्यांनी १५ जून २०२४ च्या पत्राद्वारे केली आहे

    आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, आम्ही सातत्याने मागणी करत असतानाही रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकार आमच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आंदोलकांनी आपला रोष काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीवर न काढता, निर्णयाचा अधिकार असलेल्या प्रशासनावर व्यक्त करावा.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे की, यापुढेही चंद्रपूरकरांना हक्काची रेल्वे मिळेपर्यंत माझा लढा सुरूच राहणार असून, जनहिताच्या कामात राजकीय अडथळे आणणाऱ्या शक्तींचा त्यांनी तीव्र निषेध त्यांनी केला आहे.

  • ताडोबा कोर झोनमध्ये ड्रोन उडवला: नियमभंग प्रकरण

    चंद्रपूर/ताडोबा ५ डिसेंबर (News३४) : Tadoba rule violation प्रकरणात गोविंदा असोपा नावाच्या तरुणाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये वाहन थांबवून खाली उतरला. ड्रोन उडवून रील शूट केली. अधिकाऱ्याच्या गाडीचा वापर झाल्याची चर्चा सुरु असून अद्यापही वनविभागाने त्या युवकावर कारवाई केली नाही.

    कोर झोनमध्ये सर्रास नियमभंग: काय घडले?

    ताडोबा कोर झोनमध्ये वाहनातून खाली उतरण्यास सक्त मनाई. असे असताना सुद्धा
    गोविंदा असोपा याने परवानगी नसताना गाडी थांबवली.
    फोटो, व्हिडिओ रील शूट + ड्रोन उडवले आणि अपलोडही केले.

    अधिकाऱ्याच्या गाडीचा वापर? वरदहस्ताचा संशय

    बफर झोनमध्येही उतरण्यास बंदी, कोर झोनमध्ये हा प्रकार.
    ताडोबा अधिकाऱ्याची गाडी वापरल्याची चर्चा.
    वन्यजीवप्रेमींकडून चौकशीची मागणी, असोपा याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे पाठबळ तर नाही अशी चर्चा आता बाहेर आली आहे.

    दुर्दैवी : कौटुंबिक वाद, युवकाने स्वतःला पेटवले

    वन विभागाची कारवाई कधी? ताडोबा सुरक्षेला धोका

    अद्याप गोविंदा असोपा यांच्यावर कोणतीही कारवाई नाही.
    Tadoba rule violation मुळे वन्यजीवांना धोका निर्माण झालं आहे.
     ताडोबा नियम पहा.

    वन्यजीव सुरक्षेसाठी कडक चौकशी आवश्यक

    गोविंद असोपा यांच्या विरुद्ध वनविभागाला तक्रार देण्यात आली आहे, वन्यजीवांच्या या क्षेत्रात असोपा यांनी नियमांचे भंग करीत वन्यजीवांची सुरक्षा धोक्यात टाकली आहे, उलट तक्रारदाराला असोपा यांनी धमकी सुद्धा दिली असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

  • hospital pollution case WCL Chandrapur । फौजदारी गुन्हे दाखल करा

    hospital pollution case WCL Chandrapur : चंद्रपूर ४ डिसेंबर (News३४) – रुग्णालय परिसरात कालबाह्य झालेल्या औषधी जाळल्याने संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले आक्रमक झाले असून याला जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी बेले यांनी केली आहे.

    संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थ्या, संस्थापक अध्यक्ष. श्री. राजेश वारलुजी बेले यांनी क्षेत्रिय महाप्रबंधक मुख्य चिकित्सा सेवाये, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी. क्षेत्रिय नोडल अधिकारी, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, चंद्रपूर क्षेत्र यांच्या विरोधात चंद्रपूर शहर पोलीस निरिक्षक यांच्याकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरीता लेखी तक्रार केली आहे.

    गुन्हेगारी माफिया : चंद्रपुरात शिंदेसेनेने पकडला १२ लक्ष रुपयांचा सुगंधित तंबाखू

    क्षेत्रिय चिकित्सालय, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, लालपेठ चंद्रपूर आवारात कालबाहय झालेल्या औषधी व काही वैद्यकीय साहित्य उघडपणे जाळल्याने वातावरणामध्ये घातक रासायनिक वायू मिश्रीत झाल्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला, मानवाला तसेच मानवी जीव, वन्य प्राणी, पाळीव प्राणी, जलजन्य प्राणी व पक्षी यांच्या संरक्षण कायद्याचे उल्लघन झालेले आहे. त्याकरीता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, चंदपूर यांनी कारणे दाखवा नोटीसमध्ये कठोरपणे वेकोली रूग्णालय, लालपेठ का बंद करण्यात येवू नये अशा प्रकारे नोटीस बजावली आहे व रूग्णालय परिसरात कालबाहय औषधी व वैद्यकीय साहित्य उघडपणे जाळले असल्यामुळे वातावरणात घातक वायु प्रदुषण निर्माण झालेले आहे व 15 दिवसाच्या आत उत्तर मागविण्यात आलेले आहे. hospital pollution case WCL Chandrapur

    ४८ तासांच्या आत उत्तर द्या

    तसेच चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांनी वेकोली रूग्णालय, लालपेठ चंद्रपूर क्षेत्र यांना कालबाहय औषधी व वैद्यकीय साहित्य जाळले असल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत नोटीस बजावलेली आहे, त्या नोटीसचे उत्तर 48 तासाच्या आत वेकोली वरिष्ठ अधिका-यांना मागितलेली आहे.

    संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थ्या संस्थापक अध्यक्ष, श्री. राजेश वारलुजी बेले यांनी क्षेत्रिय महाप्रबंधक. मुख्य चिकित्सा सेवाये, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रिय नोडल अधिकारी, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, चंद्रपूर क्षेत्र यांच्याद्वारे वायो मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, नियमानुसार समिती अधिकृत जल प्रदुषणाची तरतुद आणि नियंत्रण कायदा 1974 च्या कलम 25/26 अंतर्गत स्थापित चलीत हवा प्रदुषणाची तरतुद आणि नियंत्रण कायदा 1981 आणि धोकादायक वेस्ट व्यवस्थापन आणि हाताळणी नियम 1989 आणि सुधारीत नियम 2016 च्या पर्यावरण कायद्याचे उल्लंघन झाले त्यामुळे याच्यावर कायदेशीर चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी चंद्रपूर शहर, पोलीस निरिक्षक यांच्याकडे करण्यात आली. त्यावेळी इटकचे सचिव के. के. सिंग उपस्थित होते.

  • SC ST atrocity victims heir job । SC/ST अत्याचार पीडित कुटुंबीयांसाठी मोठी घोषणा!

    सरकारी नोकरी देण्यासाठी जिल्हा समिती सक्रिय

    SC ST atrocity victims heir job : चंद्रपूर, दि. 04 डिसेंबर (News३४) : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत नोंदविण्यात आलेल्या खुन किंवा अत्याचाराच्या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शैक्षणिक अर्हतेनुसार गट-क व गट-ड संवर्गातील शासकीय/निमशासकीय सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 20 नोव्हेंबर 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

    गुन्हा : चंद्रपुरात कांग्रेस नेत्यावर खंडणी चा गुन्हा दाखल

    या निर्णयाच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक आज (दि. 04 ) जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत नोंदविण्यात आलेल्या मृत्यू प्रकरणातील पात्र वारसांना शासनाने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार तात्काळ सेवा नियुक्त्या देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

    संबंधित विभागांनी प्रकरणांची छाननी करुन आवश्यक कागदपत्रे त्वरित सादर करावीत, तसेच योग्य पात्र वारसांची निवड करुन शासनाच्या निर्णयानुसार नियुक्ती प्रस्ताव तात्काळ पाठवावेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. समितीने या प्रकरणातील विलंब टाळण्यासाठी सर्व विभागांना वेळबद्ध कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून, अत्याचारग्रस्त कुटुंबीयांना दिलासा मिळावा, यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. SC ST atrocity victims heir job

    बैठकीला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे व इतर अधिकारी उपस्थित होते.