Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Chandrapur whether alert : चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा यलो व ऑरेंज अलर्ट

    Chandrapur whether alert : चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा यलो व ऑरेंज अलर्ट

    Chandrapur whether alert नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 11 ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 11 ते 12 एप्रिल या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केला असून या कालावधीत जिल्‍ह्यात एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (ताशी 50-60 किमी वेगाने) गडगडाटी वादळासह गारपीट ची शक्यता वर्तवली आहे.

    तसेच 13 व 14 एप्रिल, 2024 या कालावधीकरीता यलो अलर्ट असून एक-दोन ठिकाणी विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्‍यता वर्तविली आहे.

    हे ही वाचा – बहीण भावाच्या नात्यावर चिखलफेक, जागा दाखवा – प्रतिभा धानोरकर

    खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी घ्यावयाची : संरक्षणात्‍मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्‍या. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्‍यापासून दूर रहा. रोडवे, अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातून जाणे टाळा. खराब दृश्‍यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा. पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्‍या तारांपासून दूर रहा. फ्लॅश पूर चेतावणी किंवा विजेच्‍या तारांपासून दूर रहा. Chandrapur whether alert

    वादळ, मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये

    विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल, तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. Chandrapur whether alert

    हे अवश्य वाचा – चंद्रपुरात बाल विवाह, कुटुंब ताब्यात

    पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. Chandrapur whether alert

    जिल्‍ह्यातील नागरिकांनी उचित काळजी घ्‍यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.

  • Pratibha Dhanorkar : बहीण-भावाच्या नात्यावर चिखलफेक, ही खरी वेळ आहे – प्रतिभा धानोरकर

    Pratibha Dhanorkar : बहीण-भावाच्या नात्यावर चिखलफेक, ही खरी वेळ आहे – प्रतिभा धानोरकर

    Pratibha dhanorkar चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी राजुरा विधानसभा मतदार संघात आज झंझावाती दौरा केला. या दरम्यान झालेल्या सभाना प्रचंड प्रतिसाद मिळाला. आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी जनतेशी संवाद साधला.

    हे अवश्य वाचा – चंद्रपुरात भाजपला बीआरएस पक्षाचे समर्थन नाही चं – भूषण फुसे

    सभेला पदाधिकारी,कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी उपस्थिती होती. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यावर चिखलफेक करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची हीच खरी वेळ असल्याची गर्जना राजुरा येथे झालेल्या सभेत धानोरकर यांनी केली. Pratibha dhanorkar

    हे ही वाचा – सुधीर मुनगंटीवार यांच्या आरतीमध्ये पोलिसांनी टाकला विघ्न

    काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, महाविकास आघाडीचा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी राजुरा विधानसभा मतदार संघाचा मंगळवारला दौरा केला. मतदार संघातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या करंजी, वढोली, विठ्ठलवाडा, भंगाराम तळोधी, लाठी, सकमुर, तोहोगाव,चक तळोधी या गावांना भेट दिली. Pratibha dhanorkar

    Chandrapur pratibha dhanorkar

    राजुरा शहरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. विरूर गावातील ग्रामस्थांची संवाद साधण्यात आला. राजुरा येथे भव्य अशी सभा झाली. ही लढाई माझी व्यक्तिगत नाही. ही लढाई आपल्या सर्वांची आहे. हुकूमशाहीच्या विरोधात एकमताने आवाज बुलंद करायला हवा. मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातून हा आवाज बुलंद होत आहे. या आवाजात तुमचा आवाज मिळाला तर हुकूमशाहीचे तक्त थरथर कापायला लागेल, असे आव्हान धानोरकर यांनी केले. Pratibha dhanorkar

     

    पुढे त्या म्हणाल्यात, बहिणीसाठी भाऊ जीव ओवाळून टाकत असते. आई-वडिलांनंतर भाऊ हाच बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. मात्र भाऊ बहिणीच्या या पवित्र नात्यावर मुनगंटीवार यांनी चिखलफेक केली. प्रत्येक बहिणीचं मन दुखावल आहे. ज्यांनी भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा अनादर केला त्यांना त्यांची खरी जागा दाखवण्याची हीच खरी वेळ आहे, अशी गर्जना धानोरकर यांनी केली.यावेळी राजुरा मतदार संघातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने जनता उपस्थित होती.

  • First voter in Chandrapur district : चंद्रपूर जिल्ह्यातील पहिल्या मतदाराने केले मतदान

    First voter in Chandrapur district : चंद्रपूर जिल्ह्यातील पहिल्या मतदाराने केले मतदान

    First voter in Chandrapur district चंद्रपूरच्याच नव्हे तर राज्याच्या टोकावर असलेला जिवती तालुका…. त्यातच दुर्गम भाग आणि महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेले महाराजगुडा गाव….गावातील एकूण मतदार 281…..आणि यात एक दिव्यांग मतदार. होय, या एका दिव्यांग व्यक्तिच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा गावात पोहचते आणि गृह मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीसाठी अमूल्य असलेले मत नोंदविते. हीच लोकशाहीची खरी ताकद.

     

                सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याचा शुभारंभ सोमवारी (दि.8) अतिदुर्गम असलेल्या जीवती तालुक्यात झाला. First voter in Chandrapur district

    Chandrapur first voter

    महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराजगुडा येथील सुरेखा तुकाराम राठोड (वय 40) या एकमेव दिव्यांग असलेल्या महिलेने गृह मतदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रशासनाने त्यांच्याकडून नमुना 12 – डी भरून घेतला होता. सुरेखा यांचे गृह मतदान घेण्यासाठी सोमवारी (दि. 8) जीवती तालुक्यातील टीम क्रमांक 10, महाराजगुडा येथे सुरेखा यांच्या घरी पोहचली. गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर सुरेखा यांनी आपले अमुल्य मत नोंदविले. सुरेखा ह्या पूर्णपणे दिव्यांग असून त्या एका क्षणासाठीसुध्दा उभ्या राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आपले मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदविले आणि मतपत्रिका लिफाफ्यामध्ये टाकून अधिका-यांकडे सुपूर्द केली. First voter in Chandrapur district

    हे ही वाचा – आणि महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा व्हिडीओ व्हायरल झाला

     

    यासेाबतच सदर टीमने राज्याच्या सीमेवरील नारपठार (विजयगुडा) येथील जमुनाबाई दुर्गे आत्राम (वय 90), संग्राम किसन कोरपल्लीवार (वय 89) आणि मुद्रीकाबाई संग्राम कोरपल्लीवार (85) या वयोवृध्द नागरिकांचेही गृह मतदानाद्वारे मत नोंदविले. या टीममध्ये मतदान अधिकारी नंदकिशोर उपासणी, नागेश उरकुडे, सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्जर्झव्हर) शिवशंकर उपरे, क्षेत्रीय अधिकारी संदीप लंगडे, विलास वानखेडे, पोलिस अंमलदार कौमुद मडावी आणि छायाचित्रकार प्रफुल गिरसावडे उपस्थित होते. First voter in Chandrapur district

     

    मतदानाची गोपनीयता : गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 – ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये सदर मतदारांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करतांना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्याजवळपास नव्हता. मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.

  • Sudhir mungantiwar offensive statement : भाऊ काय ही भाषा? महिला कांग्रेसने केला मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा निषेध

    Sudhir mungantiwar offensive statement : भाऊ काय ही भाषा? महिला कांग्रेसने केला मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा निषेध

    Sudhir mungantiwar offensive statement 8 एप्रिलला पंतप्रधान मोदी यांच्या जाहिरसभेत बहीण भावाच्या नात्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होत, सदर वक्तव्याची क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

     

    हे अवश्य वाचा : पंतप्रधान मोदी यांची सभा आणि अचानक सुधीर मुनगंटीवार झाले ट्रोल

    9 एप्रिलला महिला कांग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर व शहर अध्यक्ष चंदा वैरागडे यांनी गिरणार चौकात मुनगंटीवार यांचा जाहीर निषेध नोंदविला. Sudhir mungantiwar offensive statement

    Sudhir mungantiwar

    संपूर्ण राज्य तुम्हाला भाऊ म्हणून हाक मारत आणी तुम्ही असे वक्तव्य करीत आहे, हे अशोभनीय आहे, भाजप सारख्या सुसंस्कृत पक्षाच्या आमदाराने याबाबत वक्तव्य करणं हे निषेधार्ह आहे अशी टीका महिला कांग्रेसने केली आहे. Sudhir mungantiwar offensive statement

     

    मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा सकाळपासून समाजमाध्यमावर निषेध होत आहे, अनेकांनी त्याबाबत आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शन पूर्वी मुनगंटीवार यांनी असे आक्षेपार्ह विधान केले आहे. Sudhir mungantiwar offensive statement

     

    जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही अशी टीका महिला कांग्रेसने केली आहे, मात्र दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनी व्हायरल होत असलेली क्लिप अर्धवट आहे, मी जे स्टेटमेंट दिलं ते कांग्रेस च्या कार्यकाळात लागलेल्या आणीबाणी बाबत होती. कांग्रेस पक्षाच्या हुकूमशाही विरुद्ध मी बोलत राहणार.

  • AAP officials detained : चंद्रपुरात आप पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

    AAP officials detained : चंद्रपुरात आप पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

    AAP officials detained चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी मोदी सरकारकडून आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अनावश्यकरित्या ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असून जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, ज्येष्ठ नेते सुनिल मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहर उपाध्यक्ष सुनिल सदाभ्य्यया यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे.

    हे ही वाचा – एकनाथ शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

    या प्रकारामुळे लोकशाहीची गळचेपी होत असून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे. जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आणि ज्येष्ठ नेते सुनिल मुसळे यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला असून मोदी सरकारकडून होणाऱ्या या दडपशाहीचा निषेध केला आहे. AAP officials detained

     

    आम आदमी पार्टी लोकशाहीची रक्षण करीत राहील आणि नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी लढत राहील. सर्वसामान्य जनतेने या घटनेचा बळी पडणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती आहे. AAP officials detained

  • Bharat Rashtra Samiti supports BJP : चंद्रपुरात बीआरएस चा सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा

    Bharat Rashtra Samiti supports BJP : चंद्रपुरात बीआरएस चा सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा

    Bharat Rashtra Samiti supports BJP
    चंद्रपूर : भारत राष्ट्रीय पार्टीने (बीआरएस) आज भारतीय जनता पार्टी-शिवसेना राष्ट्रवादी-रिपाई महायुतीचे चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा घोषित केला असून त्यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे. बिआरएस चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष वमशिक्रिष्णा अरकिल्ला यासंदर्भातील समर्थनपत्र श्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे. तेलंगनाचे माजी मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव हे बिआरएस चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

     

    हे अवश्य वाचा : माझ्यात दोन वाघांची शक्ती, असं का म्हणाले मुनगंटीवार?

    ही निवडणूक चंद्रपूर जिल्ह्याच्या आणि लोकसभा मतदारसंघाच्या विकास आणि प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, समाजातील गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि बेरोजगारांच्या कल्याणासाठी काम करणारा लोकप्रतिनिधी संसदेत जावा ही बीआरएसची भूमिका असून, सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा लेखाजोखा बघितल्यास चंद्रपूरच्या विकासाकरिता दुसरा पर्याय नाही अशी पक्षाची भूमिका असल्याने हे समर्थन जाहीर करण्यात आल्याचे बी आर एस चे जिल्हा अध्यक्ष श्री. वमशिक्रिष्णा अरकिल्ला यांनी म्हटले आहे. बीआरएस चे पदाधिकारी, भाजपा तेलगू आघाडीचे अध्यक्ष श्री. शेखर रेड्डी यांच्या उपस्थितीत जिल्यातील बिआएरस च्या प्रमुख नेत्यांनी रविवारी श्री सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूर येथे भेट घेऊन समर्थन पत्र दिले. Bharat Rashtra Samiti supports BJP

     

    हे ही अवश्य वाचा : ज्या सरपंचाने महायुती उमेदवार मुनगंटीवार यांचा प्रचार रथ हाकलून लावला, त्या सरपंचावर गुन्हा दाखल

    लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ श्री सुधीर मुनगंटीवार थेट जनतेत जात असताना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध संस्था संघटनांचे समर्थन, भारतीय जनता पार्टीच्या विजयाची खात्री पटवून देणारा असून बीआरएस च्या समर्थनामुळे त्यात भर पडली आहे. Bharat Rashtra Samiti supports BJP

     

    हे अवश्य वाचा : 8 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरात, 2 किलोमीटर आधीच नो पार्किंग झोन

    या समर्थनाबद्दल श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बीआरएस पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून, त्याच्या जीवनातील अंध:कार दूर करण्यासाठी, चंद्रपूर जिल्ह्यातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अधिक गतीने काम करण्यासाठी पंतप्रधान विश्व गौरव नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. बीआरएसचा विश्वास सार्थ ठरवून विकासाच्या मार्गाने चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा यापुढे बुलेट ट्रेन च्या वेगाने धावेल असे आश्वासन दिले. Bharat Rashtra Samiti supports BJP

    बीआरएस पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन प्रचाराची दिशा ठराविण्यात येईल असे श्री श्री. वमशिक्रिष्णा यांनी सांगितले

  • Electoral Roll Published : चंद्रपुरातील या संकेतस्थळावर इलेक्टोरल रोल प्रसिध्द

    Electoral Roll Published : चंद्रपुरातील या संकेतस्थळावर इलेक्टोरल रोल प्रसिध्द

    Electoral Roll Published मतदान करण्यासाठी पात्र व्यक्तिचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे.  जिल्ह्यातील मतदारांचे नाव असलेली इलेक्टोरल रोल चंद्रपूर जिल्ह्याच्या chanda.nic.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे.

    हे ही वाचा – 7 एप्रिलला चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्याने पाऊस झोडपणार

    मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही, ते तपासून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. Electoral Roll Published

     

    13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर आणि वरोरा हे चार विधानसभा मतदार संघ तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णि विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. Electoral Roll Published

    हे ही वाचा : चंद्रपुरात शिलाजीत चे राजकारण

    तर ब्रम्हपूरी आणि चिमूर हे चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार संघ गडचिरोली लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघनिहाय सदर इलेक्टोरल रोल संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून सदर यादी संबंधित मतदान केंद्र, तहसील कार्यालय, मतदान नोंदणी अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुध्दा प्रसिध्द करण्यात आली आहे.

  • Orange alert for thunderstorms : चंद्रपूर जिल्ह्याला पाऊस झोडपणार

    Orange alert for thunderstorms : चंद्रपूर जिल्ह्याला पाऊस झोडपणार

    Orange alert for thunderstorms मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान उच्चांक गाठत आहे, 6 एप्रिलला हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार 7 एप्रिलला जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा पाऊस येणार असा अंदाज वर्तविला आहे.

    हे ही वाचा : तर पॉवरफुल शिलाजीत देणार – नितीन गडकरी यांचं राजुरा येथील जाहीर सभेत वक्तव्य

    नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसार 7 एप्रिल 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची तसेच गारपीटची शक्यता वर्तविण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कळविले आहे. नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सुचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. Orange alert for thunderstorms

    हे अवश्य वाचा : आपण ही मानवी साखळी बघितली काय?

  • Voting awareness campaign : मतदान करा, चंद्रपुरात मानवी साखळी

    Voting awareness campaign : मतदान करा, चंद्रपुरात मानवी साखळी

    Voting awareness campaign निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला हक्क बजावणे आवश्‍यक आहे. लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून “सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पारर्टीसिपेशन’ (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

     

    आज चंद्रपुरातील श्री महर्षी विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांनी मतदानाची जनजागृती करण्यासाठी ‘मतदान करा’ हे शब्द ड्रोन द्वारे प्रदर्शित करत मानवी साखळी तयार केली होती. Voting awareness campaign

     

    या कार्यक्रमात उपस्थित असलेले जिल्हा अधिकारी विनय गौडा म्हणाले असे उपक्रम जिल्ह्यात राबविले तर मतदानाची टक्केवारी या माध्यमातून नक्की वाढु शकेल, कारण विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे त्यांच्या माध्यमातून हि जनजागृती राबवली तर ते आपल्या आई वडिलांना मतदान नक्की करावे यासाठी ते प्रोत्साहित करतील. Voting awareness campaign

  • No Parking Zone : चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षकांचा नवा आदेश

    No Parking Zone : चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षकांचा नवा आदेश

    No Parking Zone पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 8 एप्रिलला चंद्रपुरात दाखल होत आहे.

     

    महायुतिचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी हे मोरवा येथे सभा घेणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आगमननिमित्त पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. No Parking Zone

    हे ही वाचा : जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा नवा आदेश

    आयोजित सभेकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33-1 ब नुसार सार्वजनिक ठिकाणी रहदारी सुरळीत राहत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवत जनतेला त्रास होऊ नये यासाठी 7 एप्रिल दुपारी 2 वाजता ते 8 एप्रिल चे रात्री 8 वाजेपर्यंत मोरवा विमानतळ पासून मोरवा टी-पॉईंट, पडोली चौक ते वरोरा नाकापर्यंत तसेच मोरवा टी पॉईंट ते साखरवाही फाटा हे दोन्ही मार्ग नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. No Parking Zone

     

    या दोन्ही मार्गावर नागरिकांनी आपली वाहने पार्क करू नये व मार्गावर कुणी दुकाने हात ठेले लावू नये याबाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आदेश निर्गमित केला आहे.