Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • राजकीय वरदहस्त असलेले वाळू माफिया, अवैध वाळू उपस्याचा चंद्रपुरात बळी

    राजकीय वरदहस्त असलेले वाळू माफिया, अवैध वाळू उपस्याचा चंद्रपुरात बळी

    News34 chandrapur

    चिमूर –  वन विभागाच्या जंगलातून अवैध रेती उपसा करणाऱ्या चालत्या तरक्टर वरून मजदुर पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास मुरपार मार्गावर घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

     

    चिमूर तालुक्यातील मुरपार – पीटीचूआ जंगलातील मुरपार मार्गावर अवैध रेती उपसा करून नेणाऱ्या ट्रॅक्टर वरून आकाश धनराज सोंनटक्के हा युवक ट्रॅक्टर वर बसून असताना चालत्या गाडीतून खाली पडल्याने ट्रॉलीचे मागचे चक्के त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला शवविच्छेदना करिता चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

     

    प्राप्त माहितीनुसार नाना मेश्राम यांचे मालकीचे बिना नंबर च्या ट्रॅक्टरने ट्रॅक्टर चालक रोशन रमेश जाधव रोज रात्री अवैध रेती उत्खनन करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जास्तीत जास्त रेती उत्खनन करण्याच्या नादात ही दुर्घटना घडल्याची माहिती मृत्काच्या नातेवाईकांनी दिली.

     

    मृतक आकाश धनराज सोनटक्के हा युवक 22 वर्षाचा असून आई वडिलांना एकटाच मुलगा होता. वडील अपंग असल्याने व आई शेतमजुरी करीत असल्याने उदरनिर्वाह भगविण्याकरिता आकाश नाना मेश्राम यांचे ट्रॅक्टर वर अवैध रेती उपसा करण्याचे काम करत होता.

     

    आकाशच्यां जाण्याने आई वडिलांवर संकट कोसळले आहे पण अवैध रेती उत्खनन बंद झाले नाही तर पुन्हा बळी गेल्याशिवाय राहणार नाही. आता तरी महसूल प्रशासन. वनविभाग जागे होईल का.! की पुन्हा बळी घेण्याची वाट बघणार.

  • चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा मृत्यू

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा मृत्यू

    News34 chandrapur

    (प्रशांत गेडाम)
    सिंदेवाही- ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या शिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बीटातील मेंढा चक, येथील एका खासगी शेत शिवारात गट क्रमांक. १६४ मध्ये एक वाघ आज सकाळी शेताकडे गेलेल्या एका शेतकऱ्याला मृत अवस्थेत दिसून आला घटनास्थळी तोंडाला विद्युत करंट लागून वाघ मेल्याचे निदर्शनास आले मृत वाघाचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षे असून नर वाघ आहे.

     

    त्यावेळेस मोक्का पंचनामाच्या वेळी घटनास्थळी वन्यजीव प्रेमी यश कायरकर स्वाब नेचर केअर फाउंडेशन, बंडू धोत्रे एनटीसीए प्रतिनिधी, विवेक करंबेकर मानद वन्यजीव संरक्षक ब्रह्मपुरी, पंकज माकोडे नेचर एनवोर्मेन्ट अँड वाईल्डलाईफ ऑर्गनायझेशन ब्रम्हपुरी, यांच्या उपस्थित मध्ये मोक्का पंचनामा करून शव विच्छेदनाकरिता शिंदेवाही वन विभागाच्या लकडा डेपोमध्ये नेण्यात आले व बातमी लिहे पर्यंत शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती.

     

    शव विच्छेदन डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी ताडोबा, डॉ.शालिनी लोंढे पशुधन विकास अधिकारी शिंदेवाही, डॉ. सुरपाम पशुवैद्यकीय अधिकारी सिंदेवाही, यांनी केले समोरील तपास सहाय्यक उपवनसंरक्षक चोपडे, यांचे मार्गदर्शनात विशाल सालकर वनपरिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही हे करीत याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली अशी माहिती आहे.

  • मासेमारी करणे बाप-लेकाच्या जीवावर बेतले

    मासेमारी करणे बाप-लेकाच्या जीवावर बेतले

    News34 chandrapur

    वरोरा – वरोरा जवळील नंदोरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काळ्या गिट्टीच्या खदानी आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात शेकडो खोल खड्डे खोदून गौणखनिजाचे उत्खनन केल्या जात आहे.
    खड्डे खोदल्यानंतर शासनाचा महसूल वाचवण्यासाठी या गड्ड्यां मध्ये वरोरा येथील औष्णिक विद्युत केंद्रातून निघालेल्या राखीतून हे गड्डे बुजवण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

     

    असाच प्रकार नंदोरी येथील पंकज जैन खदानीच्या परिसरात घडला असुन नंदोरी येथील स्थानिक मजुरांचे मुले या ठिकाणी मासे पकडण्यासाठी मंगळवारी गेले होते. यानंतर पाण्याजवळ दोघे जात असताना राखे चे ढिगारे खचून पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

     

    यामध्ये मुलांचा व वडिलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सोबत असलेल्या दोन मुलांनी गावात जाऊन सांगताच परिसरातील लोकांनी आरडाओरडा करत या खदानी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हे ठिकाण निर्जन स्थळी असून मदत न मिळाल्याने रामचंद्र जंगेल वय 60, व मुलगा योगेश जंगेल वय 27 यांचा दुर्दैवी अंत झाला. सदर मृतक बाहेरील राज्यातील असून यापूर्वी सुद्धा अशीच घटना झाली असल्याचे समजते.

  • हिवाळी अधिवेशनात घुग्घुस नगरपरिषदेचा मुद्दा

    हिवाळी अधिवेशनात घुग्घुस नगरपरिषदेचा मुद्दा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 50 ते 60 हजार लोकवस्ती असलेल्या घुग्घूस नगर परिषदेचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेच्या साँफ्टवेअरमध्ये  नसल्याने येथील नागरिकांना सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने घूग्घूस नगर परिषदेचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट करण्यात यावे  अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी आज अधिवेशनात बोलतांना केली आहे.

     

              घुग्घूस शहराच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरु आहे. या भागाच्या प्रलंबीत विकासकामांसाठी विविध विभागाअंतर्गत मोठा निधी त्यांनी उपलब्ध करुन दिला आहे. यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहेत तर काही कामे प्रस्तावीत आहे. चंद्रपूर जिल्ह्याअंतर्गत घुग्घूस  गावातील वाढती लोकसंख्या व जलद गतीने नागरीकरण यामुळे ग्रामपंचायतचे रूपांतर करून दिनांक ३१-१२-२०२० रोजी नवनिर्मीत घुग्घूस नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली आहे. घुग्घूस शहर हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक औद्योगिक नगर असून येथे मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी, लोह शुद्धीकरण प्रकल्प, सिमेंट कारखाने आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग व कमी उत्पन्न गटातील नागरिक वास्तव्यास आहे. बहुतांश नागरिकांकडे पक्के घरे नाहीत. त्यातच प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेमध्ये घुग्घूस नगरपरिषदेचे नाव अद्यापही समाविष्ट करण्यात आले नाही.

     

      त्यामुळे घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हक्काच्या पक्या घरापांसून वंचित राहावे लागत आहे. सद्यास्थितीत नगर परिषद घुग्घूस येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ४५० पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आली आहे. मात्र सदर योजनेच्या सॉफ्टवेअरमध्ये घुग्घूस नगर परिषदेचे नाव नसल्याने लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यासाठी घुग्घूस नगर परिषदचे नाव प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी आज अधिवेशनात बोलतांना केली आहे.

     

      यावेळी बोलतांना त्यांनी राज्य सरकार मोदी आवास योजना राबवित आहे. याबदल सरकारचे अभिनंदन केले. यावर बोलताना ते म्हणाले कि सदर योजने अंतर्गत 3 ते 10 लाख घरे बांधण्याचा संकल्प सरकारने केला आहे. मात्र प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांची घरे मोदी आवाज योजनेत जात आहे. मात्र या योजनेत जात प्रमाणपत्राची अट आहे.

    त्यामुळे  60 ते 80 वर्षांच्या वयोवृध्दांना सदर जात प्रमाणपत्र काढण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे या योजनेतून 60 ते 80 या वयातील वयोवृध्दांसाठी सदर अट रद्द करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

  • आणि त्या मृत युवकाच्या कुटुंबाला राजेश बेले यांनी दिला आधार

    आणि त्या मृत युवकाच्या कुटुंबाला राजेश बेले यांनी दिला आधार

    News34 chandrapur

    पोंभूर्णा :- तालुक्यातील देवाडा खुर्द येथे धान मळणी करीत असतांना अचानक थ्रेशर मशीनमध्ये दोन्ही पाय व कमरेखालचा भाग ओढल्या गेल्याने नितेश पिपरे या मजूराचा रविवारला मृत्यू झाला. आर्थिक स्थिती बेताची व कर्ता पुरुषाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.दुर्दैवी मृत्यू पावलेल्या नितेश पिपरे (वय ३४) यांच्या कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी आर्थिक मदत करुन कुटुंबाचे सांत्वन केले.

     

    नितेश पिपरे हा गरिब कुटुंबातील पण कर्तबगार मुलगा होता. तो मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन चिमुकल्या मुली असा सुखी संसार सुरू होता.रविवारला मृतक नितेश हा मजुरीसाठी थ्रेशर मशीनवर गेला आणि त्याचा जीव गेला.घरची आर्थिक स्थिती बेताची.नितेशच्या पश्चात पत्नी,दोन चिमुकल्या मुली व वृद्ध आई- वडील असा परिवार आहे.

     

    कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला.आर्थिक कोंडी सुरू झाली. अशावेळी चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी मृतक नितेशच्या कुटुंबीयांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून दहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली व कुटुंबाचे सांत्वन केले.

     

    यावेळी मृतकाची पत्नी सुषमा पिपरे,वडिल बाबुराव पिपरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले,माजी उपसभापती ज्योती बुरांडे,सामाजिक कार्यकर्ते शैलेश जुमडे,सोनल धोपटे, कालिदास गव्हारे उपस्थित होती.

  • इको प्रो चा वाघ-अधिवास सत्याग्रह

    इको प्रो चा वाघ-अधिवास सत्याग्रह

    News34 chandrapur

    चंद्रपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी इको-प्रो ने वरोरा-चिमूर मार्गावरील वहानगाव शेतशिवारात जाऊन “वाघ अधिवास सत्याग्रह” आंदोलन केले. ही सत्याग्रह करण्यात आलेली जागा म्हणजे ताडोबा मधील प्रसिद्ध वाघ असलेले बंजरंग आणि छोटा मटका यांच्या झुंज झालेली होय, या झुंजीत बंजरंग वाघ मृत झालेला होता. ही झुंज कोर, बफर च्या बाहेर वनक्षेत्र बाहेर शेतशिवारात झालेली होती. हा अधिवास या वाघांनी स्वीकारला असून तिथे जाऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा दृष्टीने तसेच वाघाचा वावर आज जंगलाच्या बाहेर असून, वन्यप्राणी संघर्ष तीव्र आहे. वनविभागाने योजना राबविताना फक्त बफर आणि कॉरिडॉर वनक्षेत्रचा विचार न करता “वाघ अधिवास जिथे, वनविभागाच्या योजना तिथे” अशी मागणी करीत ‘वाघ अधिवास सत्याग्रह’ करण्यात आला.

    चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहचला आहे, यात मागील पाच वर्षात शेकडो मनुष्यहानी वाघसह अन्य वन्यप्राणीच्या हल्ल्यात झालेली आहे. मनुष्यहानी म्हणजेच संघर्ष नसून शेतकरीचे शेतपिक नुकसान, पाळीव जनावरे मारली जाणे, वाघाच्या भीतीच्या वातावरणात राहणे आदी अनेक समस्या संघर्षास कारणीभूत आहेत. वाढती वाघाची संख्यामुळे एकीकडे पर्यटन विकास तर दुसरीकडे मानव वन्यप्राणी संघर्ष अशी परस्पर विरोधी परिस्थिती आहे.

     

    वाढते वन्यप्राणी सर्वत्र वाघ वावर यामुळे स्थानिक गावकरी-शेतकरी कायम संकटात राहणे, आणि त्रासाला सामोरे जाणे अशी परिस्थिती असताना मात्र विविध योजनेचा लाभ मात्र बफर आणि कॉरिडॉर मधील क्षेत्रातील गावाचा विचार करणे कितपत योग्य आहे? आज वाघाला कुठलीही सीमा नाही, तो जंगलाच्या बाहेर शेतशिवारात असतो, गावालगत असतो, शहरात सुद्धा असतो, विविध उद्योगाच्या क्षेत्रात असतो तेव्हा त्याचा वावर जिथे असतो तिथे संघर्ष आणि समस्या निर्माण होतात. मात्र ठराविक भागातील गावात वनविभागाच्या योजनेचा लाभ दिला जातो, यात धोरणात्मक बदल होणे आवश्यक आहे.

     

    चंद्रपूर शहरालगत असलेली गावात चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र मधील वाघ लगतच्या सात-आठ गावात महिना-दोन महिने वावर असल्याने तिथे बफर, कॉरिडॉर नसताना श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेचा लाभ देत त्या गावाचा समावेश करण्यात आला. मात्र जिल्ह्यात तीनही वनविभाग अंतर्गत शेकडो गावे आहेत जे वाघाच्या दहशतीखाली आहेत, या भागात वाघ-मानव संघर्ष निर्माण झाल्यास लोकडाऊन सारखी परिस्थिती असते. त्यामुळे या सर्व गावांना “वाघ तिथे योजना” संकल्पना राबवून सर्वाना समान लाभ देण्याची मागणी करण्यात आली.

     

    वाघ-अधिवास सत्याग्रह आंदोलनाच्या मागण्या

    सोबतच या सत्याग्रह आंदोलनातून शेतपिक नुकसान भरपाई देण्याची वनविभाग, कृषी विभाग व महसूल विभाग असा तिघाडा न ठेवता सरळपणे एकाच विभागाकडे जवाबदारी सोपवावी. प्रत्येक क्षेत्रातील पाळीव जनावरे वन्यप्राणी हल्ल्यात मृत झाल्यास बफर च्या धर्तीवर लवकरात लवकर देण्यात यावे, परिसरातील सिंचन व्यवस्था व शेतीची वीज यांची वेळ दिवसा असावी, वाघ-मानव संघर्ष बाबत राज्यशासनाने गठीत केलेली समितीचा अहवाल नुसार कार्यवाही त्वरित करावी, वाघ अधिवास क्षेत्र असलेल्या लगतच्या सर्व गावात पिआरटी गठण आणि त्यांचे मानधन नियमित देणे, या सर्व गावातील शेतकरी करिता सौरऊर्जा कुंपण त्वरित देणे, कॉरिडॉर नसलेल्या भागात वनक्षेत्रालालगतच्या शेतीला कायम स्वरूपी कुंपण घालणे आदी मागण्या वाहणगाव येथे करण्यात आलेल्या “वाघ-अधिवास सत्याग्रह” आंदोलनातून शाशनाकडे करण्यात आलेली असून या मागण्याकरिता येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बंडू धोतरे यांनी दिला आहे.

     

    आज करण्यात आलेल्या आंदोलनात इको-प्रो चे अध्यक्ष तथा माजी मानद वन्यजीव रक्षक, माजी सदस्य राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ चे माजी सदस्य बंडू धोतरे यांचे नेतृत्वात कुणाल देवगिरकर, धमेंद्र लुनावत, राजू काहिलकर, सुधीर देव, सचिन धोतरे, राहुल कुचनकर, हरीश मेश्राम, रॉजर रंगारी, प्रकाश निर्वाण, अमोल दौलतकर, प्रितेश जीवने, चित्राक्ष धोतरे सहभागी होते, यावेळी वहाणगाव येथे स्थानिक गावकरी यांना या सत्याग्रह विषयी, “वाघ तिथे वनविभागाच्या योजना” या विषयी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी माहिती देत येत्या काळात करण्यात येणाऱ्या आंदोलन विषयी माहिती दिली, यावेळी स्थानिक गावकरी मध्ये सरपंच प्रशांत कोल्हे, उपसरपंच हरिभाऊ दडमल, शंकर नन्नावरे, गजानन गायकवाड, शेतकरी सुधाकर दडमल, तानाजी सावसाकडे, सुभाष दोडके, राजू कुळमेथे, पांडू दोडके यावेळी उपस्थित होते.

  • चंद्रपूर जिल्ह्याचा पारा घसरला तापमान 9 अंशावर, नागरिकांनी घेतला शेकोटीचा आधार

    चंद्रपूर जिल्ह्याचा पारा घसरला तापमान 9 अंशावर, नागरिकांनी घेतला शेकोटीचा आधार

    News34 chandrapur

    चंद्रपूर — जिल्ह्यात मागील काही दिवसापासून तापमानात घट झाली असून वातावरणात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. सकाळी पारा 9 अंशावर घसरला असून त्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यासोबत शेकोटीचा आधार घेतला.

     

    जिल्ह्यात उन्हाळा, हिवाळा असो की पावसाळा हे तिन्ही ऋतू आपला रंग जोमात दाखवितात, पावसाळा संपल्यावर हिवाळ्याची सुरुवात झाली मात्र त्यानंतर थंडी ची चाहूल लागली नव्हती.

     

    वर्षाच्या शेवटच्या महिन्यात थंडी ने कहर करायला सुरुवात केली असून ग्रामीण असो की शहरी भाग नागरिकांना आता थंडी पासून बचाव करण्यासाठी शेकोटी हा महत्वपूर्ण आधार मिळाला आहे.

  • माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांची शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्यात यावी

    माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांची शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्यात यावी

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले
    मुल – नागपूर मध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशन वरिष्ठ सभागृहातील सदस्य माजी मंत्री अनुभवी ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी विदर्भाचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या स्मृती जपण्याचा मुद्दा हाताशी धरून विधानपरिष सभागृहात मांडला.

     

    महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. सां. कन्नमवार यांनी अत्यंत गरिबीतून समाज सेवा करीत चंद्रपूर सारख्या मागास जिल्ह्यातील जनतेचे नेतृत्व करीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक लोकोपयोगी योजना राबऊन सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आष्टी येथील वैनगंगा नदीवर मोठा पूल बांधून आदिवासी व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याला वाहतुकीने जोडण्याचे काम त्यांनी पूर्ण केले. म्हणून ही त्यांची कर्मभूमी म्हणू ओळखली जाते.

     

    परंतु अशा महान आणि दुसरे मुख्यमंत्री राहिलेल्या महान व्यक्तिमत्वाचा पाहिजे तसा गौरव अजून पर्यंत महाराष्ट्र शासनाने केल्याचे दिसत नाही ही एक फार मोठी शोकांतिका आहे. याची जाणीव ठेऊन राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्र शासनाने स्व. मा सा.कन्नमवार यांची शासकीय जयंती साजरी करावी. गौरव ग्रंथ चलचित्र तयार करण्यात यावे एखाद्या शासकीय उपक्रमाला कन्नमवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आमदार खडसे यांनी केली. यांच्या मागणीला सरकार तर्फेही सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे उपमुख्यमंत्री,गृहमंत्री नाम.देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे यथोचित सन्मान राखला जाईल सांस्कृतिक विभागामार्फत त्यांचे स्मारक उभारण्यात येईल असा शब्द दिला आहे.

     

    खान्देश या भागातील नेते मध्ये असतानाही विदर्भाच्या मुद्दाद्वारे सुपुत्राचा विदर्भात अधिवेशन मा. सा. होत असतांनाही सन्मान शासकीय होत नाही म्हणत विधानपरिषद मध्ये आवाज उठविल्याबाबत मुलं कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती राजेंद्र उर्फ बालू कन्नमवार यांनी आमदार एकनाथ खडसे यांची भेट घेत त्याचे जाहीर आभार मानले आहे.

  • विद्यार्थीच देशाचा खरा कणा: अफसान सय्यद

    विद्यार्थीच देशाचा खरा कणा: अफसान सय्यद

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आज देशाला गरज आहे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांची, जो आपल्या नावासह देशाचे नाव उज्ज्वल करेल. विद्यार्थीच हा देशाचा कणा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या बल्लारपूर महिला तालुका अध्यक्ष अफसान सय्यद यांनी केले.

     

    काँग्रेस नेत्या खा. मा.श्रीमंती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तसेच चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, कोर्टीमक्ता, कवडजई, किन्ही येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

     

    बल्लारपूर येथील पळसगाव, कोर्टीमक्ता, कवडजई, किन्ही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये नोटबुक वाटप करण्यात आले.

     

    पुढे बोलताना ते म्हणाले आज आपल्याला सामाजिक कार्यासह सर्व क्षेत्रात प्रगती करावीच लागेल. त्याशिवाय तरणोपाय नाही. विद्यार्थी वर्गाने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांचे पालन करून समोर गेले पाहिजे. शिका, संघटित रहा, वेळ पडल्यास संघर्ष करावे लागल्यास करा. जोपर्यंत आपण ध्येय ठेऊन काम करत नाही, तोपर्यंत आपण काय करतो याला महत्त्व नाही. म्हणून समाजात वावरताना कोणता तरी उद्देश समोर ठेऊनच ध्येय प्राप्त करावे लागेलच. विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे.

     

    यावेळी बल्लारपूर काँग्रेसचे ग्रामीणचे तालुकाध्यक्ष गोविंदा पाटील उपरे, बल्लारपूर काँग्रेस महिला विभागाच्या तालुका अध्यक्ष अफसान सय्यद, कोर्टीमक्ताचे सदस्य मनोज सोयाम, सामाजिक कार्यकर्ते महेश थेरे, वर्षा भोयर, मंदा मडावी, मुख्याध्यापक शंकर यादव, मानोरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक दहेलकर, शिक्षिका पुष्पा आडे, रत्नमाला मोकासी, शालिनी गावंडे, आलम सर, वनिता आलाम, विलास गवारे, सय्यद, अर्चना धनराज डोंगे, विनोद गवारे, सुनील कोरे, अजय धोतरे, कवळजई जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नासिर खान, अरविंद सुरजगडे, सिद्धार्थ उंमरे, रविशंकर कोडाम, दिनेश केशकर, ऋषी आलम, पुणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शुभांगी गाजरलावर, किन्हीचे माजी सरपंच वासुदेव येरगुडे, शिक्षक भोजराज चंदेलवार, तसेच शिक्षक, विद्यार्थी, शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

     

  • चंद्रपूर जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीची जय्यत तयारी सुरु

    चंद्रपूर जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीची जय्यत तयारी सुरु

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय अंतर्गत संपुर्ण राज्यभरात जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी आयोजीत करण्यात येत असून चंदपूर जिल्यात तंत्र प्रदर्शनी चे आयोजन भव्य स्तरावर २० डिसेंबर रोजी शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.

     

    संपुर्ण चंदपूर जिल्यातील शाशकिय, अशाशकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था यात सहभागी होणार असून यात जिल्हाभरातून शेकडो मॉडेलस व मोठ्या संख्येने विदयार्थी उपस्थित होणार असल्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रवींद्र मेहंदळे यांनी कळविले आहे.

     

    सदर तंत्र प्रदर्शनीचे उदघाटन नागपूर विभाग शिक्षक आमदार सुधाकरराव अडवाले यांचे हस्ते होणार असून एम.आय.डि.सी. चंदपूरचे चेअरमन मधुसुदन रूंगठा, शिक्षणमहषीं पांडुरंग आंबटकर हे प्रमुख अतिथी असणार आहेत.

     

    या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीतून १० मॉडेलसची राज्य स्तरीय प्रदर्शनी करिता निवड करण्यात येणार असून
    राज्य स्तरीय प्रदर्शनीत् राज्यातून निवडक ३६० मॉडेल्स सहभागी होणार असल्याचे रवींद्र मेहंदळे यांनी सांगितले.

     

    जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचे नियोजनाकरिता विविध समित्या तयार करण्यात आल्या असून जय्यत
    तयारी सुरु असल्याचे नवभारत कनिष्ठ महाविद्यालय व्होकेशनल विभागाचे प्रमुख प्रा.महेश पानसे प्रा.गुणवंत दर्वे, शालिक फाले, प्रभाकर धोटे, अमोल धात्रक, व इतर
    नियोजन समिती सदस्यानी कळविले
    आहे.