Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • Tadoba Mahotsav : ताडोबा फेस्टिव्हल मध्ये जायचं आहे? तर या मार्गाने यावं लागणार

    Tadoba Mahotsav : ताडोबा फेस्टिव्हल मध्ये जायचं आहे? तर या मार्गाने यावं लागणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील जगविख्यात ताडोबा अभयारण्यातील वाघ तर आपण बघितले असणारचं आता या वाघाची विविधता बघण्यासाठी वनविभागाने 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. Tadoba festivals

     

    1 मार्च ते 3 मार्च दरम्यान शहरातील चांदा क्लब मैदानावर ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आयोजित महोत्सवाचे उदघाटन सिने अभिनेत्री व वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या महोत्सव दरम्यान वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये याबाबत पोलीस प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष सूचना जारी केली आहे. Tadoba sanctuary

     

    आयोजित महोत्सव कार्यक्रम दरम्यान चांदा क्लब मैदान परिसरात नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी म्हणून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशाने वाहतूक मार्गात काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. Chandrapur district

     

    1 ते 3 मार्च दरम्यान दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत वरोरा नाका चौक ते मित्रनगर चौक तसेच पाण्याची टाकी ते वरोरा नाका पर्यंतचा मार्ग हा ताडोबा महोत्सव करीता येणाऱ्या वाहनाखेरीज इतर वाहनांसाठी बंद राहील. वरील दोन्ही मार्ग नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. Wildlife enthusiast

     

    नागरिकांनी पोलीस प्रशासनाने सूचित केलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. नागपूर कडून शहराकडे जाणारे वाहन वरोरा नाका उड्डाण पूल ते सिद्धार्थ हॉटेल, बस स्टॅण्ड, प्रियदर्शिनी चौक मार्गे किंवा जिल्हाधिकारी निवासस्थान ते मित्र नगर चौक, संत केवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश केल्या जातील. शहरातून बाहेर जाण्यासाठी नागरिकांनी जटपूरा गेट ते प्रियदर्शिनी चौक ते बस स्टॅण्ड ते सिद्धार्थ हॉटेल मार्गे उड्डाण पूल वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक मित्र नगर चौक ते जिल्हा स्टेडियम मार्गे जिल्हाधिकारी निवासस्थान हुन बाहेर जातील.  Chandrapur vehicle parking

     

    ताडोबा महोत्सवात येणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनाने वाहनतळ नियोजित केले आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, चांदा क्लब मैदान समोरील न्यू इंग्लिश/दरगाह मैदान, चर्च मैदान, कृषी भवन जवळील ट्रॅव्हल स्टॅण्ड जवळ नागरिकांनी आपले वाहन पार्क करावे. नागरिकांनी सदर आदेशाचे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.

  • Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पावर चंद्रपुरात संमिश्र प्रतिक्रिया

    Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पावर चंद्रपुरात संमिश्र प्रतिक्रिया

    News34 chandrapur

    राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार

    चंद्रपूर – राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी,  कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजग, व्यापारी अशा घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा अर्थसंकल्प राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा असल्याचे अर्थसकंल्पावर प्रतिक्रिया देतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. Mla kishor jorgewar

     

       सरकार सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करित आहे. याचाच प्रत्यय पुन्हा अर्थसंकल्पातून आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलांना स्वयंरोजागारातून आत्मनिर्भर बनविण्यासाठी मतदार संघात आपण  ग्रीन आटो संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्नशील होतो, आता या अर्थसंकल्पात 5 हजार  महिलांना पिंक रिक्षा उपक्रम राबविणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. State budget

     

    त्यामुळे हा उपक्रम महिलांच्या आर्थिक उन्नती सह महिला सुरक्षेसाठी महत्वपूर्ण योगदान देणारा ठरणार आहे. रोजगार हमी योजनेसाठी 2 हजार 205 कोटी रुपये, मराठी विभागासाठी 71 कोटी रुपये, जिल्हा वार्षीय योजनेसाठी 18 हजार 165 कोटी रुपयांची तरदुत अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.18 लघु-वस्त्रोद्योग संकुल स्थापन करुन सुमारे 36 हजार रोजगार निर्मिती करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात डायलसीस सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. एंकदरित विचार केल्यास समाजातील सर्व घटकाला स्पर्श करुन न्याय देणारा राज्यहिताचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. Finance minister ajit pawar

     

    शाळांचा विकास आणि शैक्षणिक क्षेत्राकडे दुर्लक्ष करणारा “बजेट”

    आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शैक्षणिक क्षेत्रासाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. शाळांचा विकास आणि शैक्षणिक सुविधांसाठीही या अर्थसंकल्पात अंतर्भाव दिसून येत नाही. अंशत: अनुदानित शाळांना टप्पा अनुदान वाढ देण्यात आले नाही. शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न असलेल्या जुन्या पेंशनबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. आय टी शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत कुठलीही तरतूद या अर्थ संकल्पात करण्यात आलेली नाही.

    – सुधाकर अडबाले, आमदार
    महाराष्ट्र विधान परिषद

     

    सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प

    राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, महिला, युवकांसाठी कोणतिही मोठी तरतूद केलेली नाही. युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ घोषणाबाजी अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प आहे.
    – रितेश (रामू) तिवारी,
    जिल्हाध्यक्ष
    चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर

     

    राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला. अंतरिम अर्थसंकल्पातही अर्थमंत्री अजित पवार यांनी शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकास साधण्याच्या राज्याच्या धोरणाला गती देण्यास प्राधान्य दिले. मात्र, चंद्रपूरसारख्या प्रदूषित जिल्ह्यासाठी शुद्ध हवा, पर्यावरण आणि इरई नदी खोलीकरण आणि पूरग्रस्त स्थिती कायमस्वरूपी दूर करण्यासाठी कोणतीही ठोस तरदूत करण्यात आली नाही. या शिवाय राज्यातील शासकीय शाळांच्या प्रगतीसाठी कोणतीही निधीची तरतूद नाही. त्यामुळे गरीब विद्यार्थ्याची पिळवणूक होईल.

    बहुजनांचे प्रतिनिधी
    श्री. राजेश वारलुजी बेले
    अध्यक्ष | संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था
    चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा निवडणूक 2024

  • Maha prasad : माँ.दुर्गा मंदिर मुल येथे वर्धापन (स्थापना दिवस) निमित्त मातेचा दुग्धाभिषेक व कुंकुम पूजन

    Maha prasad : माँ.दुर्गा मंदिर मुल येथे वर्धापन (स्थापना दिवस) निमित्त मातेचा दुग्धाभिषेक व कुंकुम पूजन

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – श्री. माँ दुर्गा मंदीर सेवा समिती मूलच्या वतीने मंदिराच्या आवारात जागृत माता श्री. माँ. दुर्गादेवी मंदीराचा आठवा वर्धापन दिन सोहळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवार दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ वा. समिती संचालक रुपलसिंह रावत व सौ. मोना रावत यांनी यांचे हस्ते मंदिराचे पुजारी मुकेशजी मिश्रा यांच्या मंत्रोपचार पद्धतीने पुजा अर्चा करण्यात आली.

     

    नंतर सकाळी ९ वा. पासुन मातेचा दुग्धाभिषेक सोहळा मंदिर समितीचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत व सौ. मामता रावत यांनी महाआरती असंख्य भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आली. दुपारी १ वा. पासुन महीलांकरीता कुंकुम पुजा आणि संध्याकाळी ७ वा. आरती नंतर महाप्रसाद (महाभोजन) आयोजित करण्यात आला.

     

    या महाप्रसादाचा आस्वाद तालुक्यातील व मुल शहरातील चार हजारांच्या वर भाविकांनी आस्वाद घेतला. माँ.दुर्गा मातेचा द्वीदिवसीय सोहळा आयोजनासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे मार्गदर्शनात समितीचे उपाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, सचिव संजय पडोळे, संचालक घनश्याम येनुरकर, राजेंद्र कन्नमवार , केदारनाथ कोटगले, गुरु गुरनुले, चतुर मोहुरले, सुरेश देशमुख, छोटू रावत, सुनील मंगर, यांनी सहकार्य केले. महाप्रसाद भोजन व्यवस्थेसाठी राकेश रत्नावार, घनश्याम येनरकर, संजय पडोळे, राजेंद्र कन्नमवार, रुपल रावत, सुनील मंगर, गुरु गुरनुले, केदारनाथ कोटगले, लोमेश नागापुरे, व्यंकटेश पुल्लकवार, तेजस महाडोळे व युवशक्तीची पूर्नटीम, यांनी परिश्रम घेतले. महिलांच्या गर्दीसाठी शामलता बेलसरे, राधिका बुक्कावार,संमता बनसोड,सीमा भसारकर यांनी मेहनत घेतली.

  • Congress Party : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुल तालुका सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान

    Congress Party : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुल तालुका सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या अध्यक्ष,श्रीमती सोनियाजी गांधी, राष्ट्रीय युवा नेते खासदार राहुल गांधी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार व काँग्रेसचे पॉवर फुल नेते विधान सभेचे विरोधी पक्ष नेते यांच्या नेतृत्वात व जिल्ह्यातील कांग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या प्रमुख मार्गदर्शनात, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व जिल्हा महासचिव राकेश रत्नावार, माजी सभापती, संचालक तथा जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, ग्रामीण नेते राजू पाटील मारकवार, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, जिल्हा किसान सेल अध्यक्ष दीपक पा. वाढई, ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस गुरुदास चौधरी, महासचिव दशरथ वाकुडकर, बंडू गुरनुले, सुमित आरेकर, यांचे सह अनेक ग्रामीण कांग्रेस पदाधिकारी यांचे उपस्थितीत नियुक्त करण्यात आलेल्या सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांची निवड त्या -त्या विभागाकडून करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे पत्र विधान सभेचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांचे शुभ हस्ते व मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. Congress party

     

    महाराष्ट्र ओबीसी विभागाच्या प्रदेश सचिव पदी कांतपेठ येथील राजेंद्र वाढई यांची नियुक्ती झाल्याने नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच मुल तालुका अनुसूचित जाती(एस.सी.) विभाग तालुका अध्यक्ष पदी चिखली येथील संजय गेडाम, अनुसूचित जमाती. (एस टी.)सेल तालुका अध्यक्षपदी दहेगाव येथील काँग्रेसच सक्रिय किशोर पेंदाम यांची नियुक्ती तर आदिवासी विभाग मुल शहर अध्यक्षपदी काँग्रेसचे निष्ठावान, होतकरू संगीत विशारद नेतृत्व असलेले अशोक येरमे, विमुक्त जाती भटकी जमाटी विभाग (एन. टी.) सेल तालुका अध्यक्षपदी गणेश गेडाम मुल यांची निवड झाली. तर मुल तालुका महिला कांग्रेस पदाधिकाऱ्यांनाही ना.वडेट्टीवार यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. Vijay wadettiwar

     

    यात ग्रामीण मुल तालुका आदिवासी सेल विभाग तालुका अध्यक्षपदी मरेगाव सरपंच सौ. जोत्सना पेंदोर, मुल शहर महिला कांग्रेस अध्यक्षपदी संयमी निगर्वी संघटन नतृत्वगुन संपन्न असलेल्या व्यक्तिमत्व सौ. नलिनी आडपवार , मुल शहर उपाध्यक्षपदी माजी नगर सेविका सौ.लीना फुलझेले, मुल शहर महिला सचिव पदी, कांग्रेस निष्ठावान धडाडीच्या पुढाकार घेणाऱ्या वक्तृत्व गुण असलेल्या सौ. शामला बेलसरे यांनी निवड झाली.

     

    तर शहर महिला कोषाध्यक्ष पदी नियमित सक्रिय कार्यरत असलेल्या सौ.राधिका बुक्कावार, शहर उपाध्यक्षपदी धडाडीच्या सौ.समता बनसोड, यांची निवड, तर मुल शहर सचिव पदी सौ. अल्का कामडे, सहसचिव सौ. फर्जना शेख, इत्यादींची निवड करण्यात आली असून महिला तालुका व शहर महासचिव पदावर काही होतकरू सक्रिय नियमित येणाऱ्या महिलांची नियुक्ती तातडीने करण्यात येणार आहे. यांच्या नियुक्तीचे वर्तमान काळात काँग्रेस मोठ्या प्रमाणात व संख्येने उभी करावी व कांग्रेस संघटन मजबूत करावे. आपली जबाबदारी प्रामाणिकपणे सर्वांनी पार पाडवी अशी अपेक्षा व्यक्त केले असून उपस्थित सर्व कांग्रेस नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती पत्र देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

  • Vijay Wadettiwar : मातेच्या आशीर्वादाने पुन्हा मंत्री होण्याची संधी मिळाली तर मातेचा परिसर अतिशय देखणा करु – विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार

    Vijay Wadettiwar : मातेच्या आशीर्वादाने पुन्हा मंत्री होण्याची संधी मिळाली तर मातेचा परिसर अतिशय देखणा करु – विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – जिल्हा खनिज विकास निधी व खासदार स्थानिक विकास निधी मधून बांधकाम करण्यात आलेल्या माॕ दुर्गा मंदिर सामाजिक सभागृहाचा लोकार्पण करतांना विधान सभेचे विरोधी पक्ष नेते नाम. विजय वडेट्टीवार यांनी अभिवचन दिले.

     

    लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, प्रमुख अतिथी गडचिरोली माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, डाँ. नामदेव किरसान, ज्येष्ठ कार्यकर्ते हसन जिलानी, प्राचार्य देविदास जगनाडे, कृषी उत्पन्न बाजार सभापती राकेश रत्नावार, सिदेंवाहीचे नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, माजी सभापती व संचालक घनश्याम येनुरकर, माजी नगरसेवक नंदुजी नागरकर, माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, सा.बां. उपविभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले, माजी महापौर वसंता देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

     

    जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर मंदिरात सामाजिक सभागृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावे. अशी विनंती ना. विजय वडेट्टीवार यांना केली असता तात्काळ निधी उपलब्ध करुन दिल्यानेच हे सभागृह साकारल्याचे मत मंदिर समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती राकेश रत्नावार यांनी मंदिर बांधत असताना अनेक अडचणी आल्या परंतु मातेच्या आशीर्वादाने व विजयभाऊच्या सहकार्याने अडचणी दूर झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मंदिर समितीचे सचिव संजय पडोळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन मंदिर समितीचे सदस्य गुरु गुरनुले यांनी मानले.

     

    कार्यक्रमानंतर विजय वडेट्टीवार यांचे हस्ते मुल तालुका कांग्रेस, महिला काँग्रेसच्या वतीने नियुक्त केलेल्या सर्व सेलच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सहसचिव यांना नियुक्ती पत्र देवुन सन्मानित करण्यात आले.

  • Mahila Morcha Bjp : चंद्रपूर भाजपा महानगर महिला मोर्चा कार्यकारिणी जाहीर

    Mahila Morcha Bjp : चंद्रपूर भाजपा महानगर महिला मोर्चा कार्यकारिणी जाहीर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुर महानगर भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सविता कांबळे यांनी नवनियुक्त चंद्रपूर महानगर भाजपा महिला मोर्चा कार्यकारिणीची नावे जाहीर केली आहे. यामध्ये सरचिटणीस, उपाध्यक्ष, सचिव,यांचा समावेश आहे. Chandrapur mahanagar bjp

     

    भाजपा चंद्रपूर महानगर महिला मोर्चाच्या
    महामंत्रीपदी शीला चव्हाण,सुषमा नागोसे कल्पना बगुलकर,याची नियुक्ती करण्यात आली असून उपाध्यक्षपदी चंद्रकला सोयाम,संगीता खांडेकर, जयश्री जुमडे,माया उईके, कविता जाधव, मंजुश्री कासंगोट्टूवार, वंदना तिखे,शितल गुरुनूले,माया मांदाडे,वंदना संतोषवार,कोणीका सरकार, पुष्पा शेंडे, उषा मेश्राम, प्रियंका चिताडे,आशा अबोजवार, सिंधू राजगुरे यांची नियुक्ती करण्यात आली. Mahila morcha bjp

    सचिवपदी वनिता डुकरे, ज्योती गेडाम, शितल आत्राम, पुष्पा उराडे,कविता सरकार, कल्पना गिरडकर, वंदना राधारपवार, स्मिता रेभनकर, वंदना जांभूळकर, सुवर्णा लोखंडे,वर्षा सोमलकर, रेखा चन्ने, सुनिता जयस्वाल, भावना नागोसे,लीलावती रविदास यांच्या नावाची घोषणा चंद्रपुर महानगर भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता कांबळे यांनी केली आहे. Executive members

     

    नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री
    सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीयआयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष हरिश शर्मा, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर,माजी आमदार प्रा. अतुल देशकर,माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, प्रमोदभाऊ कडू,चंद्रपूर जिल्हा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार,रामपाल सिंग, किरण बुटले, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस,प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपा नेते अशोक जीवतोडे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, तुषार सोम विशाल निंबाळकर, मनोज पोतराजे, धम्मप्रकाश भस्मे, धनराज कोवे, चाँद पाशा सय्यद, रवी चहारे, संदिप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, रवी लोनकर, पुरुषोत्तम सहारे, आदींनी अभिनंदन केले आहे.

  • Healthcare Infrastructure : चंद्रपुरातील या वास्तूचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण

    Healthcare Infrastructure : चंद्रपुरातील या वास्तूचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभागाच्या जिल्हा औषधी भांडार नवीन इमारतीचे तसेच तडाली (ता. चंद्रपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचा-यांच्या नवीन वसाहतीचे लोकार्पण रविवार दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. Pradhan Mantri Ayushman Bharat Health Infrastructure Mission

     

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील. national health mission

     

    दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी राजकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पाच एम्सचे लोकापर्ण करण्यात येणार आहे. healthcare infrastructure

     

    यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान व प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर अभियानांतर्गत विविध कामांचे डीजीटल पध्दतीने लोकार्पण व भुमिपूजन करण्यात येणार आहे. medical services

     

    या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा औषध भांडार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नवीन इमारत जवळ, चंद्रपूर तसेच तडाली येथील अधिकारी कर्मचारी नवीन वसाहतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. inauguration ceremony

  • Bullock Traders Suicide : ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव येथे बैल व्यापाऱ्याची आत्महत्या

    Bullock Traders Suicide : ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव येथे बैल व्यापाऱ्याची आत्महत्या

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव येथे राजेश्वर तुकाराम या बैल व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. 22 फेब्रुवारी रोजी राजेश्वर आपल्या दुचाकीवरून नागपूरला जाणार असून संध्याकाळी परतणार असल्याचे कुटुंबीयांना सांगून सकाळी घरून निघून गेला. Tragic event

     

    मात्र, संध्याकाळ झाली तरी राजेश्वर घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबियांची चिंता वाढली. कुटुंबीयांनी राजेश्वरचा शोध सुरू केला, परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले कारण तो कोणताही मागमूस न घेता गायब झाल्याचे दिसत होते. दुसऱ्या दिवशी 23 फेब्रुवारी रोजी सकाळी राजेश्वरची दुचाकी तोरगाव ते मौशी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापडली. दुर्दैवाने राजेश्वरचा निर्जीव मृतदेह दुचकीजवळील सागवान नर्सरी येथे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. Bullock traders suicide

     

    राजेश्वरने स्वतःचा जीव घेण्याच्या निर्णयामागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे. ब्रह्मपुरी पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दुःखद घटनेला कारणीभूत असलेल्या परिस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी तपास सुरू केला आहे. राजेश्वरच्या वैयक्तिक जीवनाभोवतीचा तपशील आणि त्याच्या मानसिक स्थितीत योगदान देणारे कोणतेही संभाव्य घटक चालू तपासाचा भाग म्हणून कसून तपासले जातील.  तपासावरील पुढील अद्यतने उपलब्ध होताच सामायिक केली जातील. Torgaon incident

  • Jivati Taluka : भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र शासनाला दाखविले चप्पल, जोडे

    Jivati Taluka : भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र शासनाला दाखविले चप्पल, जोडे

    News34 chandrapur

    चंद्रपूर :- भारत राष्ट्र समिती जिवतीच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आहे. जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट जमिनीचे पट्टे देण्यात यावे व इतर मूलभूत सुविधा पुरविण्यात यावी याकरिता भारत राष्ट्र समितीतर्फे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस असून आतापर्यंत महाराष्ट्र शासन व प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे भारत राष्ट्र समितीने आज महाराष्ट्र शासन व प्रशासनाचा निषेध करण्याकरिता तहसील कार्यालय जिवती येथे चप्पल व जोडे दाखवीत निषेध व्यक्त केला. bharat rashtra samiti

     

    12 ऑक्टोबर 2023 रोजी जिवती तालुक्यातील प्रश्नांना घेऊन बीआरएसने भुषण फुसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य जनआक्रोश मोर्चा काढला होता. मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. Jivati taluka

     

    महाराष्ट्राचा शेवटचा टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्हातील जिवती तालुक्याची निर्मिती 21 वर्षांपूर्वी झाली, मात्र अद्यापही विकासाचा मुख्य प्रवाहात तालुका आलेला नाही. मागासलेपणाची चादर ओढून हा तालुका उभा आहे. अनेक गावात मूलभूत सुविधांच्या अभाव आहे. तालुक्यात धड रस्ते नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत, पिण्याचा पाण्यासाठी येथे सारखी वनवन करावी लागते, इथली शिक्षण व्यवस्था पार कोडमलेली आहे. शेत जमिनीचे पट्टे द्या, ही येथील जनतेची मुख्य मागणी आहे. Farmer protests

     

    तालुक्यातील जमिनीचे अद्याप फेरफार सुरू झालेले नाही. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट शेत जमिनीचे पट्टे देण्यात यावे, शेत जमिनीचे फेरफार त्वरीत सुरू करावे, सिंचनाचे प्रकल्प, युवकांना रोजगार उपलब्ध करूण देण्यात यावा, गावात पाण्यासाठी नळ, घरकुल, ग्रामीण रुग्णालय, बसस्थानक, न्यायालय, वसतिगृह, बीएसएनएलचे मोबाईल टावर, पटांगण, व्यायाम शाळा व वाचनालय सुरू करण्यात यावे. जिवती तालुक्यातील वन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी, स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा उघडण्यात यावी अशा अनेक महत्त्वपूर्ण व रास्त मागण्यांसाठी भारत राष्ट्र समितीतर्फे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पासून जिवती तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. Maharashtra government

     

    आंदोलनाच्या चौथ्या दिवस लोटूनही शासन व प्रशासनाने दखल घेतली नसल्याने बीआरएस आंदोलनकर्त्यांच्या वतीने शासनाला चप्पल – जोडे दाखवीत निषेध नोंदवला. Agricultural sector

    शासन व प्रशासनाने आंदोलनाची दखल घ्यावी आणि जिवती तालूका वासीयांना योग्य न्याय द्यावा असे आवाहन बि आर एस नेते भूषण फुसे यांनी केले आहे.

  • Alcoholic Teacher : ओ गुरुजी तुम्ही दारू पिऊन आले, नो नाय नेव्हर

    Alcoholic Teacher : ओ गुरुजी तुम्ही दारू पिऊन आले, नो नाय नेव्हर

    News34 chandrapur

    चंद्रपूर/जिवती – चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालुक्यातील आसापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी नुकतेच मद्यधुंद मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या भयानक सवयीबद्दल नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे. मुख्याध्यापक श्री मेश्राम आणि सहाय्यक शिक्षक श्री व्यंकटी भदाडे हे वारंवार मद्यधुंद अवस्थेत शाळेत येताना दिसले आहेत, त्यामुळे शाळेतील समाजात खळबळ उडाली आहे. Alcoholic teacher

     

    अतिमद्यप्राशन केल्याने सहाय्यक शिक्षक बेशुद्धावस्थेत कैद झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने हा प्रकार उघडकीस आला. या वागणुकीचा शाळेच्या शैक्षणिक वातावरणावर होत असलेल्या नकारात्मक परिणामामुळे विद्यार्थी आणि पालक अतिशय त्रस्त आहेत. School environment

     

    शाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित असल्याने, शिक्षकांच्या आचरणावर दारूचा प्रभाव पाहणे निराशाजनक आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्या, बिडीचे बंडल आणि खर्रा घेऊन साक्ष दिल्याची नोंद केली आहे, ज्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणखी वाढली आहे. Education department

     

    परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संबंधित पालक व विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाकडे आपले गाऱ्हाणे मांडले आहे.

    आसापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आपल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. विद्यार्थ्यांचे कल्याण आणि शैक्षणिक प्रगती सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये अल्कोहोलच्या गैरवर्तनाच्या समस्येवर त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. Asapur zilla parishad highschool

     

    जिवती पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जि.प.उच्च प्राथमिक शाळा आसापूर येथील मुख्याध्यापक मंगलदास मेश्राम व सहाय्यक शिक्षक व्यंकटी भदाडे यांनी १६ फेब्रुवारी शुक्रवारी शाळेत दारूच्या नशेत बेधुंद होऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार विद्यार्थी व पालकांनी उघडकीस आणत त्यांच्या विरोधात शिक्षण विभागाकडे २० फेब्रुवारी ला तक्रार दाखल करून दारूच्या नशेत शाळेत झिंगाट होऊन आलेल्या मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकांला निलंबित करण्याची मागणी केली होती. Alcohol abuse

     

    त्यामुळे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक यांना विदाऊट पे करुन कारणे दाखवा नोटिस बजावत या शाळेवर तात्पुरत्या स्वरूपात दोन शिक्षकांना डेप्यूटेशवर देण्यात आले आहेत.आसापूर येथील पालकांनी दिलेल्या
    तक्रारीवरून २२ फेब्रुवारी गुरूवारी शिक्षण विभागाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी ज्ञानराज आवारी,व विस्तार अधिकारी रामा पवार यांनी येथील मदतनीस व पालकांचे एकत्रित बयाण नोंदविले आहे.या संदर्भातील चौकशीचा अहवाल दोन दिवसांत वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.