Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Lok Sabha candidate Pratibha Dhanorkar : आमदार धानोरकर यांचं जंगी स्वागत

    Lok Sabha candidate Pratibha Dhanorkar : आमदार धानोरकर यांचं जंगी स्वागत

    Lok Sabha candidate Pratibha Dhanorkar 24 मार्च रोजी लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यावर 25 मार्चला सकाळी साडे अकरा वाजता आमदार प्रतिभा धानोरकरांचे नागपूर विमानतळावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केले. यावेळी आमदार धानोरकर यांना अश्रू अनावर झाले होते.

    हे ही वाचा – चंद्रपूर जिल्हा प्रशासन सतर्क

    त्या म्हणाल्या की अनेक संघर्षानंतर मला लोकसभेची उमेदवारी मिळाली, माझ्या पतीने राज्यात राखलेला गड मी पुन्हा काबीज करणार असा विश्वास आमदार धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केला. Lok Sabha candidate Pratibha Dhanorkar

    हे ही वाचा – चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार 26 मार्च रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची गर्दीने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे.

    24 मार्च 2019 ला स्वर्गीय बाळू धानोरकर यांना लोकसभेचे तिकीट मिळाले होते, 5 वर्षांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांना सुद्धा 24 मार्च रोजी लोकसभेचे तिकीट मिळाले. Lok Sabha candidate Pratibha Dhanorkar

     

    आमदार धानोरकर यांची थेट लढत भाजपचे दिग्गज नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत होणार आहे, सध्या सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे, आता धानोरकरांचा प्रचार उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर होणार. Lok Sabha candidate Pratibha Dhanorkar

     

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची गर्दीने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे.

    24 मार्च 2019 ला स्वर्गीय बाळू धानोरकर यांना लोकसभेचे तिकीट मिळाले होते, 5 वर्षांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांना सुद्धा 24 मार्च रोजी लोकसभेचे तिकीट मिळाले. Lok Sabha candidate Pratibha Dhanorkar

    आमदार धानोरकर यांची थेट लढत भाजपचे दिग्गज नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत होणार आहे, सध्या सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे, आता धानोरकरांचा प्रचार उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर होणार.

  • Administration alert for Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर प्रशासन सतर्क

    Administration alert for Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर प्रशासन सतर्क

    Administration alert for Lok Sabha elections संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि नि:पक्षपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात विविध पथकांचे गठन करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्याच्या सीमेवर तैनात स्थायी निगराणी पथकांनी (एसएसटी) जिल्ह्यात प्रवेश करणा-या वाहनांची कडक तपासणी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहे.

     

    भद्रावती तालुक्यातील पाटाळा आणि वणी मतदारसंघातील सीमेवर असलेल्या चेकपोस्टला जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी भेट दिली. यावेळी वरोराच्या उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम, तहसीलदार योगेश कौटकर (वरोरा), अनिकेत सोनवणे (भद्रावती) आदी उपस्थित होते.  Administration alert for Lok Sabha elections

     

    लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्याच्या सीमेवर स्थायी निगराणी पथक (एसएसटी) तैनात करण्यात आले आहे. पाटाळा (ता. भद्रावती) येथील पथकांची पाहणी करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात प्रवेश करणा-या प्रत्येक वाहनांची कडक तपासणी झाली पाहिजे. यात कोणताही निष्काळजीपणा करू नये. Administration alert for Lok Sabha elections

     

    चारचाकी वाहनाच्या डिक्की सह वाहनाच्या सीट जवळील भागसुद्धा तपासावा. यात असणा-या बॅग्ज व इतर बाबींची तपासणी करावी. काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याबाबत संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी. पूर्णपणे खात्री झाल्यावरच संबंधित वाहनाला प्रवेश द्यावा. तसेच तालुक्यातील वरीष्ठ अधिका-यांनी रात्री – बेरात्री चेकपोस्टवर अकस्मिकपणे भेट द्यावी, असे निर्देश दिले. Administration alert for Lok Sabha elections

     

    यावेळी जिल्हाधिका-यांनी वरोरा – वणी मार्गावरील पाटाळा आणि वणी येथील चेकपोस्टला भेट दिली. किती जणांची टीम लावण्यात आली आहे, प्रत्येक टीममध्ये किती लोकांचा सहभाग असतो, प्रत्येक शिफ्टमध्ये काम करणा-यांच्या वेळापत्रक कसे आहे, आदी बाबींची माहिती जाणून घेतली. तसेच दोन्ही चेकपोस्टवरील अधिकारी व कर्मचा-यांनी ऐकमेकांना मोबाईल क्रमांक देऊन ठेवावे, जेणेकरून एखादे वाहन न थांबता सुसाट गेले आणि संशयास्पद वाटले तर त्याची माहिती लगेच दुस-याला देणे शक्य होईल. Administration alert for Lok Sabha elections

     

    वरोरा येथे स्ट्राँग रुमची पाहणी : तत्पुर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी वरोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या स्ट्राँग रुमची पाहणी करून या परिसराला बॅरिकेटींग करावे, तसेच स्ट्राँग रुम सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस विभागाने विशेष दक्ष राहावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

     

    असे आहेत प्रत्येक मतदारसंघनिहाय तैनात असलेले एसएसटी पथक : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 62 स्थायी निगराणी पथकांचे (एसएसटी) गठन करण्यात आले आहे. यात राजुरा विधानसभा मतदार संघात 15, चंद्रपूर – 4, बल्लारपूर – 6, वरोरा – 12, वणी – 13 तर आर्णी विधानसभा मतदारसंघात 12 पथकांचा समावेश आहे. याशिवाय गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात 8 तर चिमूर मतदारसंघात 4 एसएसटीचे गठण करण्यात आले आहे.

  • Bankruptcy of Chandrapur Municipality : चंद्रपूर मनपाची दिवाळखोरी?

    Bankruptcy of Chandrapur Municipality : चंद्रपूर मनपाची दिवाळखोरी?

    Bankruptcy of Chandrapur Municipality चंद्रपूर: आचारसंहितेचा भंग करून मनपाचे आयुक्त विपिन पालीवाल यांनी रामाळा तलावाच्या पुनर्जीवनाचे 24 कोटीचे कंत्राट देण्यासाठी 18 मार्च रोजी निविदा प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणात एकीकडे आचारसंहितेचा भंग झालेला असताना दुसरीकडे 6 दिवसात निविदा प्रक्रिया आटोपती घेऊन मर्जीतील कंत्राटदाराला काम देण्यासाठी नियम डावलल्याचा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे केला.

    हे ही वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील 4 गुन्हेगारांना पोलिसांनी केले हद्दपार

    महानगरपालिकेत खुलेआम करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत असून या भ्रष्टाचारामुळे चंद्रपूर महानगरपालिका दिवाळखोरीच्या मार्गावर असल्याचा इशाराही त्यांनी दिला.विपिन पालीवाल हे ‘कमिशनर’ नव्हे तर ‘कमिशन-नर’ म्हणजेच फक्त ‘कमिशन खाणारा माणूस’ आहे अशी टिप्पणी देशमुख यांनी केली. Bankruptcy of Chandrapur Municipality

    24 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यासाठी घाई करण्याचे कारण काय ?

    24 कोटी रुपये किमतीच्या रामाळा तलावाच्या पुनर्जीवनाच्या कामासाठी निविदा भरण्यासाठी 22 मार्च ते 27 मार्च पर्यंत फक्त 6 दिवसांचा कालावधी देण्यात आला. मनपाला हे काम करण्याची कोणतीही घाई नाही. या कामाचा कालावधी 540 दिवसाचा म्हणजे सुमारे दीड वर्षाचा आहे. तरीही निविदा भरण्यासाठी फक्त 6 दिवसांचा वेळ देणे संशयास्पद आहे. कमिशन घेऊन विशिष्ट काम देण्याच्या हेतूने लगबगीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असा आरोप देशमुख यांनी केला.

    हे ही वाचा – अम्मा च्या टिफिनचे नाव आता इंग्रजांच्या देशात

    करोडो रुपये किंमत असलेल्या मोठ्या कामांमध्ये अशा पद्धतीने घाई करण्याची नवीन पद्धत आयुक्त पालीवाल यांनी सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला. याच दरम्यान कंपोस्ट डेपो वरील दोन छोट्या कामांसाठी कंत्राटदार नेमण्याच्या हेतूने 15 ते 26 मार्च पर्यंत म्हणजे 12 दिवस एवढा पर्याप्त वेळ निविदा भरण्यासाठी देण्यात आला. शहरात प्रस्तावित ई-बस डेपो बांधण्यासाठी 10 कोटी रुपये अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या कामासाठी निविदा भरायला 15 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत म्हणजे 18 दिवस वेळ देण्यात आला.

     

    महानगरपालिकेतर्फे भूमी अधिग्रहण करण्याचे हेतूने एजन्सी नेमण्यासाठी 11 मार्च ते 26 मार्च पर्यंत 16 दिवस वेळ निविदा भरण्यासाठी घेण्यात आला.
    मात्र 540 दिवस कामाचा कालावधी असलेल्या 24 कोटी रुपये किमतीच्या रामाळा पुनर्जीवनाच्या कामासाठी 6 दिवसांत निविदा प्रक्रिया आटोपती घेतली.

     

    भ्रष्टाचारामुळे मनपा दिवाळखोरीच्या मार्गावर

    महानगरपालिकेत करोडो रुपयाचे काम देताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. सर्वांच्या समोर खुलेआम मनपाच्या तिजोरीची लूट होत आहे. वारंवार तक्रारी करूनही मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही. अदृश्य अघोरी शक्तींचे भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठबळ मिळत असल्याने मनपाची आर्थिक स्थिती खालावली आहे. भविष्यात कर्मचाऱ्यांचे वेतन देणे ही मुश्किल होईल अशी मनपाची स्थिती झालेली असून लवकरच आकडेवारी सह याबाबत गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती पप्पू देशमुख यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.

  • Amma Ka Tiffin Chandrapur : अम्मा च्या टिफिन ची चर्चा आता सात समुद्रपार

    Amma Ka Tiffin Chandrapur : अम्मा च्या टिफिन ची चर्चा आता सात समुद्रपार

    Amma Ka Tiffin Chandrapur अम्मा का टिफिन हा उपक्रम आता राज्यभर चर्चेला जात असतांना आज युनायटेड किंगडम सरकारचे फॉरेन, कॉमनवेल्थ आणि डेव्हलपमेंट ऑफिस एशिया पॅसिफिकचे राजकीय आणि द्विपक्षीय वार्ताकार प्रमुख जॉन एम निकेल यांनी आज अम्मा का टिफिन उपक्रमाची भेट घेत उपक्रमाचे कौतुक केले आहे.

     

    यावेळी गंगुबाई ऊर्फ अम्मा, आमदार किशोर जोरगेवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष गौर, कल्याणी किशोर जोरगेवार, श्री महाकाली माता महोत्सव समितीचे कोष्याध्यक्ष पवन सराफ, अॅड. दीपक चटप यांची उपस्थिती होती.  Amma Ka Tiffin Chandrapur

     

    अम्मा यांच्या सुचनेनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरात अम्मा का टिफिन हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचा तिसरा वर्ष सुरु आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरातील गरिब गरजूंना दररोज घरपोच जेवणाचा टिफिन पोहचविला जात आहे. Amma Ka Tiffin Chandrapur

     

    आता या उप्रकमाची राज्यभर चर्चा असुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नुकतीच या उपक्रमाला भेट देत कौतुक केले आहे. तर या अगोदर अनेक मोठ्या नेत्यांनी व विविध सामाजिक संघटनांनी या उपक्रमाला भेट दिली आहे. अम्माने सुरु केलेल्या या उपक्रमा बदल अनेक संस्थाच्या वतीने अम्माला पुरस्कृत करण्यात आले आहे. Amma Ka Tiffin Chandrapur

     

    दरम्यान आज युनायटेड किंगडम सरकारचे फॉरेन, कॉमनवेल्थ आणि डेव्हलपमेंट ऑफिस एशिया पॅसिफिकचे राजकीय आणि द्विपक्षीय वार्ताकार जॉन एम निकेल यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहचत सदर उपक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी अम्माचे कार्य प्रेरणादाई असल्याचे म्हटले आहे. भारत हा सेवेकरी देश आहे. या देशाकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहे. चंद्रपूर हे सुंदर शहर आहे. येथे येण्याचा योग आला आणि या सेवेच्या उपक्रमाला भेट देता आल्याचा आनंद असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. Amma Ka Tiffin Chandrapur

     

    अम्माच्या टिफिन उपक्रमाबाबत संपूर्ण माहिती यावेळी त्यांनी जाणून घेतली. उपक्रम राबविणे सहज आहे. मात्र आपण त्यात सातत्य ठेवले हे कौतुकास्पद असल्याचे ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी अम्मा का टिफिन उपक्रमाची संपुर्ण चमू उपस्थित होती.

  • Two Wheeler fancy number : तुमच्या दुचाकी वाहनाला हवा फॅन्सी क्रमांक? बघा ही बातमी

    Two Wheeler fancy number : तुमच्या दुचाकी वाहनाला हवा फॅन्सी क्रमांक? बघा ही बातमी

    Two Wheeler fancy number उपप्रादेशिक परिवहन कर्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील  दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एम.एच. -३४, CJ-०००१ते एम.एच.-३४,CJ-९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

    वाचा – चंद्रपुरात आचारसंहितेचे उल्लंघन?

    ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांकरिता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल, त्यांनी परिवहन कार्यालयात 26 मार्च 2024 पर्यंत (दुपारी 4)  अर्ज सादर करावेत.

    वाचा – चंद्रपूर लोकसभेसाठी कुणी भरला उमेदवारी अर्ज?

     

    तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्क ( DD उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर यांचे नावे ) विहीत शुल्काच्या रकमेचा भरणा मालिका सुरु झाल्यावर करून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावेत. तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्रे तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील. Two Wheeler fancy number

     

    सदर मालिका चालु असतांना  वाहन ४.० प्रणाली कार्यान्वीत झाल्यांनतर बंद करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. नविन मालिका दिनांक 27 मार्च 2024 पासून सुरु करण्यात येईल. Two Wheeler fancy number

     

    प्राप्त होणारे अर्ज दुपारी  4 वाजेपर्यंत स्विकारले जातील व 26 मार्च रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास खालील पध्दतीने क्रमांक जारी करण्यात येतील. 27 मार्च रोजी सायंकाळी 4.30 वाजता बंद लिफाफे  उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश परत करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

  • Violation of the Code of Conduct : चंद्रपुरात आचारसंहितेचे उल्लंघन

    Violation of the Code of Conduct : चंद्रपुरात आचारसंहितेचे उल्लंघन

    Violation of the Code of Conduct चंद्रपूर : आचारसंहितेच्या काळात रामाळा तलावाचे पुनर्जिवन प्रकल्पाच्या 24.62 कोटी रूपये कामाची ई-निविदा प्रक्रिया सुरू करुन मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या आयुक्तांचे निलंबन करुन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी राज्याचे तसेच चंद्रपूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.

    वाचा – अरविंद केजरीवाल यांना अटक, आप कार्यकर्ते आक्रमक

     

    22 मार्च रोजी सांयकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी विनय गौडा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन देशमुख यांनी लेखी तक्रार केली.
    लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता 16 मार्च पासून लागू करण्यात आली आहे. Violation of the Code of Conduct

     

    आदर्श आचारसंहिता लागू झाल्याच्या तारखेपासून कोणत्याही नवीन कामाची ई-निविदा प्रकाशित करणे किंवा ई-निविदा प्रक्रिया सुरू करणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग ठरतो. मात्र तरीसुद्धा मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी १८ मार्च रोजी ‘चंद्रपूर शहरातील रामाळा तलावाचे पुनर्जिवन प्रकल्प’ या नविन कामाची सुमारे २४.६२ कोटी रूपये अंदाजपत्रक असलेली ई-निविदा राज्य शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केली आहे. आपातकालिन परिस्थिती नसताना किंवा अत्यावश्यक काम नसताना तसेच सक्षम निवडणूक अधिकाऱ्यांची मंजुरी न घेता पालीवाल यांनी आचारसंहितेच्या काळात सदर ई-निविदा प्रक्रिया सुरू करुन आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन करुन फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. Violation of the Code of Conduct

    वाचा – कुणी भरला चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून उमेदवारी अर्ज?

     

    आचारसंहितेपूर्वीच प्रसिद्ध केल्याचे भासवले

    ऐन आचारसंहितेच्या तोंडावर १५ मार्च २०२४ रोजी तीन वर्तमानपत्रांमध्ये सदर ऑनलाइन ई-निविदेची जाहिरात दिली. या जाहिरातीमध्ये दिनांक १८ मार्चपासून सदर ऑनलाइन ई-निविदा प्रकाशित करण्यात आल्याचे नमूद केले. १५ मार्चपासून सदर ई-निविदा प्रक्रिया सुरू झाली असे भासविण्याकरिता त्यांनी हे सर्व कटकारस्थान केले. ज्या तारखेला शासनाच्या वेबसाईटवर निविदा प्रपत्र विक्री करिता अपलोड होते त्याच तारखेपासून ई-निविदा प्रक्रिया सुरू होते याची पुरेपूर माहिती पालीवाल यांना आहे. असे असतानाही त्यांनी सदर कामाची ई-निविदा प्रक्रिया आचारसंहितेच्या दरम्यान सुरू केली व आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोपही देशमुख यांनी तक्रारीत केला आहे. Violation of the Code of Conduct

    सात वर्षांपासून जिल्ह्यातच नियुक्ती

    विपिन पालीवाल हे २०१५ ते २०२० पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर व पोंभुर्णा नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. मार्च २०२० नंतर जवळपास एक वर्षाकरिता त्यांची वर्धा येथे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली.

     

    जून २०२१ पासून आतापर्यंत पालिवाल चंद्रपूर शहर महानगरपालिकेत कार्यरत आहेत. सुमारे एक वर्षाचा वर्धा जिल्ह्यातील कार्यकाळ वगळता पालीवाल हे सुमारे सात वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांची कारकीर्द वादग्रस्त असून मर्जीतील कंत्राटदारांना लाभ पोहोचविण्यासाठी करोडो रुपयांच्या अनेक कामांमध्ये गैरव्यवहार केल्याचे आरोप त्यांच्यावर असल्याचे देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे.

     

    मनपा आयुक्त या आरोपांवर काय म्हणाले?

    15 तारखेला निविदा टाकली, 16 मार्च ला वर्तमान पत्रात जाहिरात आली, 16 व 17 मार्च रोजी सुट्टी असल्याने निविदा 18 मार्च रोजी अपलोड करण्यात आली त्यामुळे आम्ही कसल्याही आचारसंहितेचा भंग केला नाही, याबाबत आम्ही देशमुख यांच्या आरोपाबाबत उत्तर देऊ – विपीन पालिवाल, मनपा आयुक्त चंद्रपूर

  • Chandrapur Police Mission All Out : चंद्रपूर पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले

    Chandrapur Police Mission All Out : चंद्रपूर पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले

    Chandrapur Police Mission All Out लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलीस एक्शन मोड वर आली असून 19 मार्च ते 20 मार्च दरम्यान जिल्ह्यात तब्बल 35 ठिकाणी नाकाबंदी करीत मिशन ऑल आऊट मोहीम राबविण्यात आली.

     

    ऑल आऊट मोहिमेदरम्यान 78 हॉटेल, लॉज व धाबे चेक करण्यात आले, यावेळी 821 वाहनांची तपासणी करून 64 वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करीत 10 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. Chandrapur Police Mission All Out

     

    या मोहिमेत रेकॉर्ड वरील व कारागृहातून सुटलेले व प्रलंबित खटल्यातील 160 समन्स बजावणी करून 61 आरोपीना अटक करण्यात आली.

     

    वाचा – सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेत आव्हान देणारा नेता भाजपात सामील

    अवैध दारू बाळगणाऱ्यावर तब्बल 22 केसेस, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे 1 व पोलीस स्टेशन येथे 2 केसेस भारतीय हत्यार कायद्यांव्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले. Chandrapur Police Mission All Out

     

    तसेच राजुरा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुगंधित तंबाखू बाळगणाऱ्या इसम विरुद्ध गुन्हा नोंद करून 3 लाख 36 हजार 200 रुपयांचा माल असा 8 लाख 36 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर जिल्हा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मधील 52 पोलीस अधिकारी व 265 पोलीस अंमलदार यांनी केली.

  • Bablu Katre’s entry into BJP : विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांना आव्हान

    Bablu Katre’s entry into BJP : विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांना आव्हान

    Bablu Katre’s entry into BJP लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते व पदाधिकारी पक्ष बदलवित असतात या पार्श्वभूमीवर ठाकरे गट शिवसेनेचे माजी पदाधिकारी बबलू कटरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.

    वाचा – चंद्रपुरातील सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

    वर्ष 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर मधून निवडणूक लढत थेट सुधीर मुनगंटीवार यांना आव्हान देणारे शिवसेनेचे माजी कामगार सेना जिल्हाप्रमुख बबलू कटरे यांनी भाजप पक्षात प्रवेश करीत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. Bablu Katre’s entry into BJP

    वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात कलम 144 लागू

    चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बबलू कटरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.

     

    वर्ष 1993 पासून शिवसेनेत तब्बल 30 वर्षे काम करणारे बबलू कटरे यांनी शाखा प्रमुख, दुर्गापूर ग्रामपंचायत सरपंच ते कामगार सेना जिल्हाप्रमुख पदापर्यंत मजल मारली. Bablu Katre’s entry into BJP

    वाचा – राजेश बेले यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

    विशेष म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कटरे यांनी थेट सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात निवडणूक लढली होती.

     

    यावेळी कटरे यांच्याशी संपर्क केला असता मी 30 वर्ष शिवसेना पक्षात काम केले, अनेक पदे पण भूषवली मात्र आज शिवसेना सोडून जाताना मी असंख्य आठवणी सोडून जात आहो अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली, मात्र काही कारणासाठी वेगळा निर्णय घ्यावा लागतो अशी प्रतिक्रिया कटरे यांनी दिली. Bablu Katre’s entry into BJP

     

    बबलू कटरे यांनी मुनगंटीवार यांच्या उपस्थित आपले सहकारी अतुल कटरे, श्याम वाढई, राजू कटरे सह भाजपात प्रवेश केला, यावेळी मुनगंटीवार यांनी पक्षाचा दुपट्टा कटरे यांच्या गळ्यात टाकत त्यांचे पक्षात स्वागत केले.

  • Deportation of criminals from Chandrapur : चंद्रपूर शहरात एकावर हद्दपारीची कारवाई

    Deportation of criminals from Chandrapur : चंद्रपूर शहरात एकावर हद्दपारीची कारवाई

    Deportation of criminals from Chandrapur अवैध दारूविक्र, भांडण, मारहाण, धमकी असे विविध गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर चंद्रपूर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे.

     

    चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पंचशील वार्डातील रहिवासी 26 वर्षीय शुभम अमर समुद या सराईत गुन्हेगारांला जिल्ह्यातून 6 महिण्याकरिता हद्दपार केले आहे. Deportation of criminals from Chandrapur

    वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात कलम 144 लागू

    शुभम समुद वर अनेक गुन्हे दाखल आहे, त्याच्यावर पोलिसांनी यापूर्वी कारवाया केल्या मात्र त्यामध्ये काही सुधारणा झाली नाही, वारंवार पोलिसांनी शुभम वर प्रतिबंधात्मक कारवाई केली, मात्र तो धाडसी प्रवृत्तीचा असल्याने परिसरातील लोकांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

     

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व सुव्यस्था बिघडू नये याकरिता शहर पोलीस निरीक्षकांनी शुभम विरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी विहित मुदतीमध्ये हद्दपार च्या प्रस्तावाची प्राथमिक चौकशी केली, त्यानंतर हद्दपारीचा आदेश काढण्यात आला. Deportation of criminals from Chandrapur

     

    पोलिसांकडून होत असलेल्या कारवाया व हद्दपारीच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे,  गुन्हेगारी वृत्ती संपावी व त्यांनी गुन्हेगारी पासून इतर धंद्याकडे वळावे अन्यथा अश्या कारवाया होत राहणार असे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी कळविले आहे.

  • Chandrapur Lok Sabha candidate Sudhir Mungantiwar : वणी तालुक्याशी माझं जुनं नातं

    Chandrapur Lok Sabha candidate Sudhir Mungantiwar : वणी तालुक्याशी माझं जुनं नातं

    Chandrapur Lok Sabha candidate Sudhir Mungantiwar चंद्रपूर लोकसभेसाठी भाजप पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाल्यावर नामदार सुधीर मुनगंटीवार यांचं आज चंद्रपुरात आगमन झालं.

     

    मुनगंटीवार यांचे नागपूर ते चंद्रपूर विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी भव्य सत्कार केला. 18 मार्च ला गांधी चौकात भव्य आशीर्वाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.

     

    वाचा – निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा नको – जिल्हाधिकारी गौडा

    Chandrapur Lok Sabha candidate Sudhir Mungantiwar आयोजित सभेत महायुती मधील शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेसने मुनगंटीवार यांचा सत्कार केला, यावेळी नागरिकांना संबोधित करताना मुनगंटीवार यांनी वणी तालुक्यासोबत आपलं जुनं नातं असल्याचा उल्लेख करीत आज त्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली असून मी आपल्या लोकसभा क्षेत्राचे नाव दिल्लीच्या शिखरावर पोहचविणार असा विश्वास व्यक्त केला. 

     

    आयोजित आशीर्वाद सभेत असंख्य नागरिक व भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.