Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Mahakali temple Chandrapur festival । “गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाचा नवा प्लॅन – महाकाली यात्रेकरिता विशेष नियोजन”

    Mahakali temple Chandrapur festival

    Mahakali temple Chandrapur festival : चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली माता महाकाली यात्रा महोत्सव 3 एप्रिलपासून सुरू होत आहे. सदर यात्रा 3 ते 15 एप्रिलपर्यंत राहणार आहे. या दरम्यान विविध जिल्ह्यातून तसेच इतरही राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे त्यांना देण्यात येणा-या सोयीसुविधांबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. 

    चंद्रपुरातील ८०० नागरिक अयोध्येला रवाना

    जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, महाकाली मंदीर विश्वस्त मंडळाचे सुनील महाकाळे, मुख्य पुजारी गजाननराव चन्ने आदी उपस्थित होते.

    यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, महाकाली यात्रेकरीता चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यामुळे त्यांना मंदीर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणा-या सोयीसुविधा चांगल्या असायला पाहिजे. गर्दीचे योग्य नियोजन करून बस गाड्यांची पार्किंग व्यवस्था उत्तम ठेवावी. बाहेर जिल्ह्यातून येणा-या बसेसची संख्या किती राहील, सदर बसेस कोणत्या जिल्ह्यातून येतील, त्यांची पार्किंग कुठे केली जाईल, आदी बाबींचे योग्य नियोजन करावे. तसेच मंदीर परिसरात जाणारा मार्ग व इतर अनुषंगीक बाबी नागरिकांना क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल का, याबाबतही विचार करावा. कॉल सेंटर, पोलिस चौकी, अग्निशमन व्यवस्था 24 बाय 7 उपलब्ध ठेवावी. Facilities at Mahakali temple Chandrapur

    उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भाविकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच मंदीर परिसरात असलेल्या नदीची स्वच्छता, तेथे पाण्याची उपलब्धता ठेवावी. मंदीर परिसरात विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे अखंडीत सुरू असले पाहिजे. जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही. तसेच येणा-या भाविकांची नोंदणी करणे शक्य असेल तर त्यांची नावे, मोबाईल क्रमांक नमुद करावा. महानगर प्रशासन, पोलिस विभाग, वाहतूक शाखा तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार आणि संबंधित यंत्रणेच्या अधिका-यांनी तात्काळ मंदीर परिसराची पाहणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

  • Mukhyamantri Tirth Darshan Yojana Mahiti । रामलल्लाच्या दर्शनासाठी चंद्रपूरचे 800 ज्येष्ठ नागरिक रवाना

    Mukhyamantri Tirth Darshan Yojana Mahiti

    Mukhyamantri Tirth Darshan Yojana Mahiti : जेष्ठ भाविक नागरिकांना, राज्य तसेच देशातील प्रसिध्द तीर्थक्षेत्राचे दर्शन व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 800 भाविकांना घेऊन विशेष ट्रेन अयोध्येकरीता आज (दि.19) रवाना करण्यात आली. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या प्रमुख उपस्थितीत भाविकांना शुभेच्छा देऊन सदर ट्रेन मार्गस्थ झाली. राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील 800 भाविकांना अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. Ayodhya Ram Mandir Tirth Darshan

    चंद्रपूर जिल्हा पर्यटनाच्या बाबतीत क्रांती घडविणार – आमदार किशोर जोरगेवार

    राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील जेष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने तीर्थक्षेत्राच्या दर्शनाला जाऊ शकत  नाही. ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळी जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिकतेचे दर्शन व्हावे, यासाठी राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची /दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे. Chandrapur Tirth Darshan Yojana Labharthi Yadi

    त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 800 लाभार्थी श्रीराम मंदिर (अयोध्या) करिता पात्र करण्यात आले. 19 ते 23 मार्च या कालावधीत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सदर यात्रा पार पडणार आहे. 19 मार्च रोजी चंद्रपूर रेल्वे स्थानाकावरुन यात्रेकरूंना घेऊन सदर रेल्वे 20 मार्च रोजी श्रीराम मंदीर अयोध्या येथे पाहोचणार आहे. 21 मार्च  रोजी सांयकाळी अयोध्या रेल्वे स्थानकावरुन निघून 23 मार्च रोजी चंद्रपूर येथे पोहोचणार आहे.

    भाविकांना शुभेच्छा देतांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातून आज 800 लोक अयोध्येला रवाना होत आहे. भाविकांसाठी ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून जिल्ह्यातील नागरिकांना रामलल्लाच्या दर्शनाची संधी मिळाली आहे. Mofat Tirth Yatra Yojana Maharashtra

    यावेळी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, नागपूर येथील सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त (समाजकल्याण) विनोद मोहतुरे, तहसीलदार विजय पवार, समाजकल्याण विभागाचे दीपक धात्रक, स्मिता बैरमवार, सचिन फुलझेले आदी उपस्थित होते.तत्पुर्वी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चंद्रपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना ओळखपत्र देऊन त्यांचे स्वातग करण्यात आले.

    गत महिन्यात 5 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत बौध्दगया येथे तीर्थदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील 203 पात्र लाभार्थ्यांनी महाबोधी मंदीर (बौद्धगया) येथे दर्शन घेतले होते.

  • Heat wave information । उन्हाळ्यात तुम्ही काय काळजी घेत आहात?

    Heat wave information

    Heat wave information. : चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत 40 अंशपार तापमान गेले असून येणा-या काही दिवसात यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने उष्माघाताच्या लाटेपासून आपले व कुटुंबियांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे. heatwave

    जिल्हाधिकारी कार्यालयात उष्माघात कृती आराखड्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, आयुक्त विपीन पालीवाल, उपविभागीय अधिकारी संजय पवार, अपर अधिक्षक रिना जनबंधू, तहसीलदार विजय पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाते आदी उपस्थित होते.

    विधानसभेत चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाचा मुद्दा गाजला

    उष्ण लाटेमध्ये नागरिकांनी काय काळजी घ्यावी, त्याबाबत आरोग्य विभागाने जनजागृती करावी. शाळा, महाविद्यालये, गर्दीचे ठिकाण आदी ठिकाणी नियमितपणे नागरिकांना याबाबत अवगत करावे. तसेच लहान मुले, वयोवृध्द नागरिक यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दुपारच्या उन्हात कुणीही बाहेर जाण्याचे शक्यतो टाळावे. तसेच प्रशासनामार्फत येणा-या सुचनांचे पालन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या. Heatwave safety tips for elderly

    नागरिकांनी उष्ण लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता :

    काय करावे : पुरेसे पाणी प्या, शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा. घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला/उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडद्यांचा वापर करावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टिव्ही, किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. Heatwave first aid tips

    काय करू नये : उन्हात अतिकष्टाची कामे करु नये. दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये. दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये.

  • RTO Chandrapur Vayuveg । राख वाहतुकीत नियमांचे उल्लंघन, आरटीओने दाखवला ‘लाल डोळा’!

    RTO Chandrapur Vayuveg

    RTO Chandrapur Vayuveg :  चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या  वायुवेगपथकाने अचानक भेट देऊन प्रकल्पाच्या मागील भागातील सायवान परिसरात कडक तपासणी करून 13 टिप्पर वाहनांवर कारवाई केली. Chandrapur Thermal Power Station RTO Action

    कारवाई करण्यात आलेल्या सहा वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात अटकाव करून ठेवण्यात आले तर उर्वरित वाहनांना चालान देण्यात आले आहे.  केंद्रीय मोटार वाहन  नियम 138 नुसार, एकरुप नसलेला माल  हा व्यवस्थितरित्या ताडपत्रीने आच्छादित करून किंवा बंद कंटेनरद्वारा वाहतूक करणे अत्यावश्यक असतांना सदर वाहनातील राखेवर  फक्त ग्रीननेटचे आवरण होते. राखेला व्यवस्थितरित्या आच्छादित न करता वाहतुक  करणाऱ्या वाहनांवार मोटार वाहन कायाद्यातर्गंत कडक कारवाई करण्यात येते.  RTO Vehicle Check Maharashtra

    चंद्रपूरकरांसाठी आनंदाची बातमी

    तसेच याबाबत सीटीपीएसच्या वरिष्ठ  अधिका-यांशी भेट घेऊन सदर राख आच्छादित न करता वाहतुक केल्याने होणाऱ्या दुष्परिणामाबाबतचे सांगण्यात आले. सार्वजनिक परिसरात वाहतुक न करता सीटीपीएस स्तरावर प्रकल्पातर्गंतच्या जागेवर राखेची विल्हेवाट लावावी, असेही निर्देश देण्यात आले. चंद्रपूर थर्मल पॉवर  स्टेशन  सीटीपीएस येथून उत्पन्न होणारी राख एएसएच सुरक्षित आणि नियमानुसार होण्यासाठी  आरटीओ  कार्यालयाकडुन सीटीपीएस प्रवेशद्वारावर निरीक्षण ठेवण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येईल, असे आरटीओ विभागाकडून  स्पष्ट करण्यात आले आहे.

                  सदर कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निदीक्षक दिपक काळे,  विलास ठेंगणे, अनुराग सालनकर, निखिल गायकवाड, सुरज मुन यांच्यामार्फत करण्यात आली.

  • Chanda Fort railway stop । चंद्रपूरकरांसाठी आनंदाची बातमी: ‘चेन्नई-गया’ ट्रेन आता चांदा फोर्टला थांबणार!

    Chanda Fort railway stop

    Chanda Fort railway stop : चैन्नई-गया या  साप्ताहिक ट्रेनचा (१२३९०)  थांबा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा  राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अथक प्रयत्नाने चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर मंजूर झाला असून दि. १८ मार्च रोजी ही ट्रेन रात्री ११:४५ वाजता चांदा फोर्टवर पहिल्यांदाच थांबणार असल्याने चंद्रपूर व जिल्ह्यातील प्रवाशांना या थांब्यामुळे मोठी सोय झाली आहे. Chandrapur train news

     ट्रेन नं. १२३८९ गया-चैन्नई या परतीच्या  प्रवासाचा थांबा चांदा फोर्ट  येथे मंजूर झालेला नसला  तरी लवकरच हा  थांबाही मंजूर केला जाईल. त्याकरिता रेल्वेच्या वरिष्ठांना अहीर यांनी कळवून प्रवाशांची गैरसोय टाळण्याची सुचना केली आहे. सदर ट्रेनचा बल्लारपूर रेल्वे स्थानकावर थांबा असल्याने चंद्रपूर व परिसरातील रेल्वे प्रवाशांना रात्रीचा प्रवास करून बल्लारशाह गाठावे लागत होते. चैन्नई-गया ट्रेनचा चांदा फोर्ट स्थानकावर थांबा मिळाल्याने प्रवाशांची होत  असलेली फरफट थांबणार आहे. Railway news Maharashtra

    चंद्रपुरात ३८ लाखांचे डिजिटल लाखांचे कॉइन जप्त

                    ट्रेन नं. १२३९० चा चांदा फोर्टला थांबा मिळाल्याने बिहार, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश मधील मोठ्या प्रमाणात चंद्रपुरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना तसेच व्यापारी, व्यवसायी, कर्मचारी, विद्यार्थी व अन्य प्रवाशांनाही या थांब्यामुळे मोठी सोय झाली आहे. New train stop in Maharashtra 

    गया-चैन्नई ही ट्रेन चांदा फोर्ट वरून  रात्रीच्या वेळेस जात असल्याने  ट्रेन नं. १२३८९ चा थांबाही चांदा फोर्टवर मंजूर  करणे प्रवाशांच्या दृष्टीने अनिवार्य असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने परतीचा प्रवास करणाऱ्या गया-चैन्नई या  ट्रेनचा सुध्दा चांदा फोर्ट स्थानकावर त्वरीत थांबा मंजूर करून  प्रवाशांना न्याय द्यावा अशी मागणी चंद्रपूर रेल प्रवासी सेवा संस्थेने  हंसराज अहीर यांच्या माध्यमातून रेल्वेमंत्री व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. Hansraj Ahir railway initiative

    चैन्नई-गया (ट्रेन नं. १२३९०)  या साप्ताहिक  ट्रेनचा चांदा फोर्ट  स्थानकावर थांबा  मंजूर करून दिल्याबद्दल  संस्थेचे  अध्यक्ष रमणिकभाई चव्हान, कार्याध्यक्ष तथा झेडआरयुसीसीचे सदस्य दामोदर मंत्री व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या वतीने हंसराज अहीर यांचे विशेष आभार मानले आहे.

  • Amma Sanskar Bharti । चंद्रपुरात संस्कारांची शाळा: आमदार जोरगेवारांच्या ‘अम्मा संस्कार भारती’चा शुभारंभ!

    Amma Sanskar Bharti

    Amma Sanskar Bharti : आपल्या संस्कृतीचे संवर्धन आणि पुढच्या पिढीला योग्य संस्कार देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आपण उचलले आहे. अम्मा संस्कार भारती हा उपक्रम चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक नवे व्यासपीठ आहे. अम्मा संस्कार भारती म्हणजे केवळ एक शिक्षणपर उपक्रम नाही, तर मुलांच्या मनोभूमीवर संस्कारांची गोड शिदोरी ठेवण्याचा आमचा एक प्रयत्न असून, यातून संस्कारक्षम पिढी घडविण्याचा आमचा संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Amma Sanskar Bharti initiative

    चंद्रपूर येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आणि स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘अम्मा संस्कार भारती’ या विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी लक्ष्मी नारायण मंदिर येथे मुलांमध्ये भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये आणि शारीरिक-मानसिक विकास घडविण्यावर भर दिला जाणार आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर उपक्रमाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, प्रशिक्षिका अनामिका चहारे, प्रशिक्षक राजु जोशी, प्रशिक्षिका मिनाश्री ठेंगडी, प्रशिक्षिका रुपाली तोषनीवाल, प्रशिक्षक अनिरुद्ध टिकले, श्रद्धा सेलोटे, मृनाल पनके, लक्ष्मी नारायण मंदिरचे विश्वस्त जुगल सोमानी, कैलास सोमानी करणसिंग बैस, आदींची उपस्थिती होती.

    थेट मुलाखत थेट नोकरी, २९ मार्चला चंद्रपुरात रोजगार मेळावा

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, सध्याच्या तंत्रज्ञान प्रधान युगात मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये मानसिक अस्थैर्य आणि जीवनशैलीत विस्कळीतपणा दिसून येत आहे. गॅझेटच्या आहारी गेलेल्या मुलांना आपली परंपरा, संस्कारांची ओळख व्हावी, त्यांना जीवनमूल्ये मिळावीत, यासाठी आपण हा उपक्रम सुरू केला आहे. स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपण हा उपक्रमाचा राबवत आहोत. या उपक्रमाला पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. Indian culture for kids Chandrapur

    amma sanskar bharti initiative

    भारतीय संस्कृतीत बालपणी दिलेले संस्कार संपूर्ण जीवनाचा पाया घडवतात. म्हणूनच ‘अम्मा संस्कार भारती’ उपक्रमाच्या माध्यमातून ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी मंत्रजप, श्लोक, स्तोत्र पठण, प्राणायाम, सूर्यनमस्कार, चारित्र्य संवर्धन, पौराणिक कथा, चित्रकला आणि आर्ट अँड क्राफ्ट असे विविध उपक्रम घेतले जात आहे. मुलांच्या मनामध्ये सकारात्मक विचार रुजावेत, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना चांगले आचरण आणि आदर्श विचार मिळावेत, यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. Traditional values learning India

    आजच्या मुलांमध्ये चांगले विचार आणि सशक्त व्यक्तिमत्त्व निर्माण करणे, हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. म्हणूनच हा उपक्रम केवळ संस्कारांची शिकवण देणारा नसून, आपल्या समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी चिमुकल्यांसह पालकवर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Sewer line road damage repair । सीवरेजमुळे खोदलेले रस्ते लवकरच होतील सुरळीत – 20 कोटींच्या निधीतून दुरुस्ती होणार सुरू

    Sewer line road damage repair

    Sewer line road damage repair : शहरातील सीवरेज लाईनच्या कामामुळे अनेक रस्ते खोदण्यात आले आहेत. परिणामी नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आज शनिवारी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील प्रमुख मार्गांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंजूर 20 कोटी रुपयांच्या निधीतून त्वरित रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याचे निर्देश दिले. City road repair after sewer work

    घोडाझरी तलावात पोहायला गेलेल्या ५ युवकांचा बुडून मृत्यू

              यावेळी मनपाचे शहर अभियंता विजय बोरिकर, शाखा अभियंता अविनाश भारती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्रीकांत भट्टड यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी महानगर शहर अध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, अमोल शेंडे, सलिम शेख, करण नायर, करणसिंग बैस, स्वप्निल पटकोटवार, सुमित बेले, चंद्रराज बातो आदींची उपस्थिती होती.

              सीवरेजसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांवरून प्रवास करणे नागरिकांसाठी मोठे संकट बनले आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थिती पाहता आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्य मार्गांची पाहणी केली. सीवरेजचे काम पूर्ण होताच तातडीने रस्त्यांची पुनर्बांधणी सुरू करावी. चैत्र नवरात्र यात्रा 3 एप्रिलपासून सुरू होत आहे, त्यामुळे या यात्रेपूर्वी जटपूरा गेट ते जटपूरा गेट हा प्रमुख मार्ग संपूर्णतः तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. Sewerage project affecting traffic

              शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी नगर विकास निधी अंतर्गत 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, सीवरेज लाईनच्या कामामुळे रस्त्यांचे खोदकाम सुरू असल्याने पुनर्बांधणी थांबवण्यात आली होती. आता शहरात सिवरेजचे काम पूर्ण होत असल्याने तातडीने दुरुस्तीला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय साधत कामे वेगाने पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. City traffic problems due to roadwork

              यापूर्वीही आमदार किशोर जोरगेवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सीवरेजच्या कामामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली होती. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत, कामे लवकर पूर्ण करून रस्त्यांची पुनर्बांधणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. विशेषतः शहरातील मुख्य मार्गांचे काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय बैठकीत झाला होता.

    sewerage project affecting traffic

              शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्राथमिक टप्प्यात सर्वाधिक रहदारी असलेल्या मार्गांचे काम करण्यात येणार आहे. चैत्र नवरात्र यात्रा सुरू होण्यापूर्वी यात्रेकरूंना आणि स्थानिक नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जटपूरा गेट ते जटपूरा गेट हा मार्ग तयार करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहेत. यात्रेच्या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी मनपा प्रशासनाने सिवरेजचे उर्वरित काम वेगाने करावे, असे आदेश त्यांनी दिले. Municipal corporation road repair plan

              सीवरेजचे काम पूर्ण होताच गांधी चौक ते पठाणपुरा, आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट यासह इतर दोन प्रमुख मार्गांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, ज्या भागात सिवरेजचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी रस्त्यांचे डागडुजी करण्याच्याही सूचनाही त्यांनी दिल्या.नागरिकांना वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांपासून लवकरच दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने त्वरीत पावले उचलावीत असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले आहे.

  • road accident news in Chandrapur । चड्डा ट्रान्सपोर्टच्या ट्रकने घेतला वाहकाचा जीव

    road accident news in Chandrapur

    आरटीओची डोळेझाक, ट्रान्सपोर्टची मुजोरी

    road accident news in Chandrapur : चंद्रपूर शहरातील रस्ते अरुंद असल्याने नागरिकांना वाहतुकीस अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, शहरापेक्षा भयावह स्थिती हि नागपूर रोडवरील आहे, या रस्त्यावर मोठ्या ट्रान्सपोर्टने आपला ठिय्या मांडलेला दिसून येतो. यामुळे १५ मार्च रोजी मध्यरात्री हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी समोर नागपूर वरून चंद्रपूरकडे येणाऱ्या बस ची धडक रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्र्क ला दिली या धडकेत बस मधील वाहक ठार झाला तर १३ जण गंभीर जखमी झाले. Nagpur to Chandrapur road accident

    माजरी वेकोलि मध्ये महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांना चोरी करताना अटक

    कसा झाला अपघात?

    राज्य परिवहन विभागाची बस क्रमांक MH14 KA 8587 नागपूरवरून चंद्रपूरच्या दिशेने येत होती. यावेळी रस्त्यावर उभा असलेला चड्डा कंपनीचा ट्र्क क्रमांक MH31 CA 3171 ला बसने जोरात धडक दिली. धडक इतकी जोरदार होती कि बस चा समोरील भाग चक्काचूर झाला.

    बसचालकाने याबाबत माहिती दिली कि राखेच्या धुळीमुळे रस्त्यावर पुढे काही दिसले नाही, त्यामुळे अचानक उभ्या ट्रकला धडक बसली.

    अपघातानंतरची परिस्थिती काय होती?

    मध्यरात्री अपघात झाला अशी माहिती पोलीस व राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली, त्यांनतर घटनास्थळी पोलीस व राज्य परिवहन विभागाचे अधिकारी दाखल झाले, प्रवाशांना पोलीस नागरिकांच्या मदतीने बसमधून बाहेर काढत रुग्णवाहिकेत बसवीत होते. बसचे चालक दत्तात्रय इंगोले यांना नागरिकांनी बाहेर काढले. बसचे वाहक संदीप वनकर ट्र्क व बसच्या सीट्मध्ये फसून गेले होते. त्यांच्या मागे बसलेले एसटी महामंडळाचे कर्मचारी सिद्धार्थ मडामे या दोघांना बसचा पत्रा कापून बाहेर काढत होते.

    वाहक संदीप वनकर यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यासह एकूण १० ते १५ जखमी झाल्याची माहिती आहे. Chandrapur bus accident today

    ट्रान्सपोर्ट धारकांना रस्ते गहाण

    चंद्रपूर शहर व महामार्गावर चड्डा व डीएनआर ट्रान्सपोर्ट धारकांनी अक्षरक्षा कब्जा केल्याचे दिसून येते. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी ५०० रुपयांची लाच प्रकरणी प्रकाशझोतात आलेल्या RTO विभाग यावर डोळेझाक करून आहे. आरटीओ विभाग व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे साटेलोटे असल्याने कारवाई होताना दिसून येत नाही याचा परिणाम अश्या अपघाताच्या घटनेत सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो.

    रस्त्यावर ट्र्क उभा ठेवल्यास त्याला झाडाची फांदी, रेडियम लावण्याचा नियम आहे मात्र आपलं कुणीही काही बिघडवू शकत नाही अशी वृत्ती ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची असल्याने ते मुजोरीवर उतरतात.

    एसटी महामंडळाने याबाबत पडोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत चड्डा ट्रान्स्पोर्टचे चालक राजन बनवारी यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार दिली आहे. ST bus accident in Maharashtra

  • Chhatrapati Sambhaji Maharaj flyover naming | चंद्रपुरातील या उड्डाणपुलाला मिळणार छत्रपती संभाजी महाराजांचे नाव?

    Chhatrapati Sambhaji Maharaj flyover naming

    Chhatrapati Sambhaji Maharaj flyover naming : गेल्या अनेक वर्षांपासून राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एक उड्डाणपूल (फ्लाईओव्हर) बांधण्यात आला आहे. हा उड्डाणपूल महामार्ग रस्ता बल्लारपूर मार्गाला जोडतो. मात्र, अद्याप या उड्डाणपुलाला कोणतेही नाव देण्यात आलेले नाही.

    महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानांना चोरी करताना रंगेहात अटक, माजरी वेकोली मधील घटना

    म्हणून, आयुक्त साहेबांना निवेदन देऊन या उड्डाणपुलाला श्री छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, जेणेकरून त्यांची वीरगाथा आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान येणाऱ्या युवा पिढीच्या मनात कायम स्मरणात राहील. Chandrapur flyover Chhatrapati Sambhaji Maharaj

    अशी मागणी सामाजिक सेवेत अग्रेसर असणारे भाजप कार्यकर्ते रुपेश पांडे यांनी आपल्या सहकाऱ्यासहित चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांना केली.

    उड्डाणपुलाचे महत्त्व:

    • हा उड्डाणपूल महामार्ग रस्ता आणि बल्लारपूर मार्ग यांना जोडतो, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होते आणि प्रवासाचा वेळ वाचतो.
    • राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ असल्याने, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हा उड्डाणपूल खूप महत्त्वाचा आहे. Chandrapur flyover name request
    • छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी:
    • छत्रपती संभाजी महाराज हे एक महान योद्धा आणि स्वराज्याचे रक्षक होते.
    • त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.
    • त्यांच्या बलिदानाची आणि शौर्याची आठवण युवा पिढीला राहावी, यासाठी या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देणे योग्य आहे.
    • छत्रपती संभाजी महाराज हे एक महान प्रेरणास्थान आहेत आणि त्यांचे नाव या उड्डाणपुलाला दिल्याने, लोकांना त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची प्रेरणा मिळेल.
    • निवेदनातील मुद्दे:
    • उड्डाणपुलाला अद्याप कोणतेही नाव दिलेले नाही.
    • छत्रपती संभाजी महाराजांचे नाव दिल्याने त्यांची स्मृती कायम राहील.
    • युवा पिढीला त्यांच्यापासून प्रेरणा मिळेल.
    • या मागणीचा सकारात्मक विचार करून, उड्डाणपुलाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावे.
  • Chandrapur Holi Safety । चंद्रपूर पोलिस सज्ज

    Chandrapur Holi Safety
    होळीत मद्यपी वाहनचालकांवर करडी नजर! होळीत रॅश ड्रायव्हिंग? पोलिसांचा इशारा, कारवाई अटळ!

    Chandrapur Holi Safety :  होळी व धुलीवंदन हा उत्सव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सदर उत्सवादरम्यान मोठ्या  प्रमाणात रंगाची उधळण  होते.  तसेच ठिकठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते.  या कालावधीत काही अतिउत्साही तरुणमंडळी  मद्य प्राशन करून दुचाकी / चारचाकी  वाहने भरधाव  वेगाने, बेदरकारपणे चालवितात. तसेच रोडने रॅश (Rash) ड्रायव्हिंग, स्टंटबाजी सारखे कृत्य करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याचे दृष्टीने 13 आणि 14 मार्च  या कालावधीत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी  नाकेबंदी लावण्यात येणार आहे. (Drunk Driving Chandrapur)

    चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल

    त्यामुळे कुणीही मद्य प्राशन करून वाहन चालविणार नाही. जर मद्य  प्राशन करून  वाहन चालवितांना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, यांची सर्वांनी नोंद  घ्यावी. जिल्हयातील वाढते अपघात कमी करण्याकरीता मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवून कडक  अंमलबजावणी करण्यात येणार आहे. (Holi Festival Drunk Driving)

    तरी होळी व  धुलीवंदन साजरा करतांना वाहन धारकांच्या चुकीमुळे निष्पाप नागरीकांचा बळी जाऊ नये, याकरीता वाहन चालकांनी वाहतुकीच्या  नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन चंद्रपूर पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे.