Author: Admin

  • Nylon kite manja : चंद्रपुरात रामनगर पोलिसांनी पकडला प्रतिबंधित नायलॉन मांजा

    Nylon kite manja

    Nylon kite manja : चंद्रपूर – मकरसंक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पतंग प्रेमींनी आकाशात पतंग उडविणे सुरू केले आहे, पण यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा वापरण्याचा ट्रेंड मोठ्या जोरात सुरू आहे.

    फिरायला गेले आणि 50 हजार गमावून बसले

    या प्रतिबंधित मांजाने नागरिकांचे गळा चिरण्याचे प्रकार, पशु पक्षांच्या जीवितास धोका निर्माण होतो.

    चंद्रपूर जिल्ह्यातील मकरसंक्रांत सणात या घटनांना आळा बसावा यासाठी चंद्रपूर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे.

    22 डिसेंबर रोजी शहरातील सेंट मायकल शाळेजवळ अष्टविनायक पतंग सेंटर मधून प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती रामनगर पोलिसांना ( ram nagar police ) मिळाली होती.

    पोलिसांनी माहितीच्या आधारे नियोजनबद्ध पद्धतीने अष्टविनायक पतंग सेंटरमध्ये धाड मारली असता गौरव हेमराज गोटेफोडे हा शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा विक्री करीत होता.

    पोलिसांनी मारलेल्या धाडीत नायलॉन मांजाचे 104 बंडल एकूण किंमत 1 लाख 23 हजार 800 रुपयांचा माल जप्त करीत गौरव गोटेफोडे ला ताब्यात घेण्यात आले.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक देवाजी नरोटे, हिमांशू उगले, पोलीस कर्मचारी आनंद खरात, सचिन गुरनुले, लालू यादव, पेतरस सिडाम, प्रशांत शेंदरे, शरद कुडे, मनीषा मोरे, अमोल गिरडकर, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, अमित, ब्ल्यूटी साखरे यांनी केली.

  • Burglary theft | सकाळी फिरायला गेले आणि 50 हजार गमावून बसले

    Burglary theft

    Burglary theft : चंद्रपूर शहरात सध्या अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून घरातील दागिने, दुचाकी चोरी जाण्याच्या घटना घडत आहेत. अश्यातच शहरातील बाबुपेठ येथील डी एड कॉलेजच्या मागे राहणारे गौतम जीवने हे आज 22 डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास बाहेर फिरण्यासाठी गेले होते.

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या साहित्य खरेदीसाठी 100 कोटींचा निधी द्या – आमदार जोरगेवार

    घरी कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने दरवाज्याचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला, घरातील कपाट फोडत चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख 15 हजार असा एकूण 50 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

    गौतम जीवने हे घरी परत आल्यावर घरातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत आढळले असता त्यांनी कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याचे समजताच त्यांनी जीवने यांनी चंद्रपूर शहर पोलिसात (city police station) माहिती देत गुन्हा नोंद केला.

    Crime chandrapur

    पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला. गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही कॅमेरे तपासून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

  • Gmc chandrapur | मेडिकल कॉलेजसाठी 100 कोटीचा निधी द्या – आमदार जोरगेवार

    Gmc chandrapur

    Gmc chandrapur : चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र येथे आवश्यक वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची गरज असून, सदर मेडिकल कॉलेज रुग्णसेवेसाठी तात्काळ सुरू करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, अशी मागणी अधिवेशनात (winter session nagpur 2024) औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

    youtube च्या नव्या नियमाने अनेक चॅनेल होणार बंद

    शनिवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदार संघातील प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजचा विषय उचलत साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपये देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

      बहुप्रतिक्षित चंद्रपूर मेडिकल कॉलेजची सुमारे ५० एकरातील नवीन वास्तूचे बांधकाम (new campus) पूर्णत्वास आले असले तरी वैद्यकीय साहित्य आणि फर्निचरसाठी निधी उपलब्ध झाला नाही. साहित्य खरेदीसाठी सुमारे १०० कोटी रुपयांची आवश्यकता असून, तातडीने हा निधी मिळावा म्हणून कॉलेज प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. नवीन इमारतीत लाकडी फर्निचरसाठी ५७ कोटी रुपये तर वैद्यकीय साहित्यासाठी ४१ कोटी ७६ लाख रुपयांची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.  मात्र सदर  प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

       लगतच्या गडचिरोली, यवतमाळ, तेलंगणातील आसिफाबाद, करीमनगर या भागातील रुग्णसुद्धा चंद्रपुरात उपचारासाठी येत असतात. सध्याच्या परिस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरू आहे. दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटांची संख्या कमी पडत आहे. रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. निवासी डॉक्टरांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत असल्याने नव्या जागेतील इमारतीत कॉलेज हलविण्यात यावे, अशी सातत्याने मागणी होत आहे. परंतु, आवश्यक साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध झालेला नसल्याने सर्व काम रखडले आहे.

      हाच विषय आता आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उचलून धरला. यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, मेडिकल कॉलेजचे काम पूर्ण झाले आहे. परंतु साहित्य खरेदी करण्यासाठी लागणारे 100 कोटी रुपये न मिळाल्याने रुग्णालय बंद आहे. अतिशय सुंदर परिसरात सुंदर वास्तू तयार झाली असली तरी फर्निचर आणि वैद्यकीय साहित्य नसल्याने रुग्णालय सुरू होत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तात्काळ साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी सभागृहात केली आहे.

  • Youtube Thumbnail | आता हे Youtube channel होणार बंद

    Youtube Thumbnail

    Youtube Thumbnail : YouTube आता दिशाभूल करणाऱ्या thumbnail वर कारवाई करत आहे. हे क्लिकबेट वापरणारे व्हिडिओ काढून टाकेल. नियम वारंवार मोडल्यास चॅनल्सवर बंदी येऊ शकते. YouTube प्रथम चेतावणी देईल, नंतर व्हिडिओ काढून टाकेल. हे पाऊल प्रेक्षकांना अधिक चांगली सामग्री प्रदान करण्यासाठी आहे.

    YouTube हे एक व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे जे लाखो कंटेंट क्रिएटर्स चे घर आहे. कंटेंट क्रिएटर्स या लोकप्रिय प्लॅटफॉर्मद्वारे पैसे कमवतात. तथापि, दृश्ये आणि सदस्य मिळविण्याच्या शर्यतीत, काही निर्माते ‘Clickbait Thumbnail’ चा अवलंब करतात. ही दिशाभूल करणारी thumbnail किंवा शीर्षके आहेत जी व्हिडिओच्या वास्तविक कंटेंट सोबत जुळत नाहीत. या वाढत्या समस्येचे विश्लेषण केल्यानंतर कंपनीने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

    असं सोडवा मुलांचं मोबाईल व्यसन

    क्लिकबेट थंबनेल्सवर YouTube ची कारवाई
    Clickbait Thumbnail म्हणजे काय?

    क्लिकबेट थंबनेल्स दर्शकांना आकर्षित करण्यासाठी सनसनाटी किंवा असंबंधित व्हिज्युअल आणि मथळे वापरतात. उदाहरणार्थ, व्हिडिओची Thumbnail दावा करते की “राष्ट्रपतीने राजीनामा दिला!” पण आशयात असे काहीही नाही. अशा युक्त्या प्रेक्षकांना गोंधळात टाकतात आणि प्लॅटफॉर्मवरील कंटेंटच्या विश्वासार्हतेला हानी पोहोचवतात.

    दिशाभूल करणाऱ्या सामग्रीसाठी YouTube ची योजना
    अलीकडील ब्लॉग पोस्टमध्ये, YouTube ने क्लिकबेटला सामोरे जाण्यावर आपली भूमिका हायलाइट केली. प्लॅटफॉर्म हे करेल:

    • दिशाभूल करणारे लघुप्रतिमा असलेले व्हिडिओ, विशेषतः ब्रेकिंग न्यूज किंवा अलीकडील घटनांशी संबंधित असलेले व्हिडिओ काढून टाकले जातील.
    • या धोरणाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या चॅनलवर बंदी घातली जाईल.
    • दिशाभूल करणाऱ्या लघुप्रतिमांची उदाहरणे
    • ज्या व्हिडिओंची थंबनेल ‘टॉप पॉलिटिकल न्यूज’ सूचित करतात परंतु संबंधित बातम्या देत नाहीत ते काढून टाकले जातील. हे नवीन धोरण नसून सध्याच्या नियमांची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे YouTube ने स्पष्ट केले आहे.

    प्रथम चेतावणी, नंतर सामग्री काढली जाईल
    क्लिकबेट सापडताच चॅनलवर तात्काळ बंदी घातली जाणार नसल्याचे यूट्यूबने स्पष्ट केले आहे. सुरुवातीला केवळ दिशाभूल करणारे व्हिडिओ काढले जातील, जेणेकरून सामग्री निर्माते त्यांची सामग्री धोरण बदलू शकतील.

    उच्च दर्जाच्या सामग्रीचा प्रचार केला जाईल
    YouTube द्वारे हे पाऊल प्लॅटफॉर्मवर प्रामाणिकपणाचा प्रचार करण्याच्या दिशेने उचलले जाते आणि दर्शकांना अस्सल आणि उच्च-गुणवत्तेच्या सामग्रीचा आनंद घेता येतो.

    नवीन ‘watch later’ प्लेलिस्ट वैशिष्ट्य
    ज्यांना नंतर पाहण्यासाठी प्लॅटफॉर्मवर कोणताही व्हिडिओ सेव्ह करायचा आहे त्यांच्यासाठी YouTube ने ‘नंतर पहा’ प्लेलिस्ट वैशिष्ट्य जोडले आहे. हे एक दीर्घ-प्रतीक्षित वैशिष्ट्य आहे जे वापरकर्त्यांना नंतर प्लॅटफॉर्मवरच सहजपणे व्हिडिओंमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देते.

  • Coal Mine Tourism | भूमिगत कोळसा खाणीत पर्यटन सुरू होणार

    Coal Mine Tourism

    Coal Mine Tourism : चंद्रपूर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. येथे वन पर्यटनासह धार्मिक आणि औद्योगिक पर्यटन सुरू करण्यावर त्यांचा भर आहे. आज त्यांनी वेकोलीच्या सिएमडी कार्यालयात बैठक घेतली आणि वेकोलीच्या भूमिगत खाणी पर्यटनासाठी खुल्या करण्याची मागणी सीएमडी जयप्रकाश द्विवेदी यांच्याकडे केली आहे.

    चंद्रपूर पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान

    आमदार किशोर जोरगेवार (kishor jorgewar news) यांनी नागपूर येथील वेकोलीच्या  सीएमडी कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. याप्रसंगी हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवकुमार यादव यांची उपस्थिती होती.

    उत्तर अचूक पण संगणकाने चुकविलं, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत गोंधळ

      चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून येथे अनेक उद्योग आहेत. त्यामुळे औद्योगिक पर्यटनाच्या माध्यमातून या जिल्ह्याला पर्यटनाचे हब तयार करता येईल. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. ताडोबा अभयारण्य येथे येणारा पर्यटक केवळ ताडोबा पाहून परत न जाता, त्या पर्यटकांनी येथील इतर ऐतिहासिक वास्तू, उद्योग आणि प्राचीन धार्मिक स्थळांना भेट द्यावी, यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

     दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी भूमिगत खाणी पर्यटनासाठी खुल्या करण्याची मागणी  सीएमडी जयप्रकाश द्विवेदी यांच्याकडे केली. याबाबत  सीएमडी यांनी सकारात्मकता दर्शवली असून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

      याशिवाय, आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोलीने सीएसआर फंडातून दोन गार्डनची निर्मिती करावी, माना येथील जलाशयात बोटींग पर्यटन सुरू करावे, तुकूम आणि लालपेठ येथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून निधी द्यावा, लालपेठ आणि रयतवारी कॉलरी येथे दोन सामाजिक भवनांची निर्मिती करावी, ग्रामीण भागात वॉटर एटीएम मशीन्स बसवाव्यात अशी मागणीही केली. या सर्व मागण्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच निर्णय घेतले जातील, असे   सीएमडी  जयप्रकाश द्विवेदी यांनी म्हटले आहे.

  • operation muskaan | चंद्रपूर पोलिसांचे ‘ऑपरेशन मुस्कान” यशस्वी

    operation muskaan

    operation muskaan : ऑपरेशन मुस्कान, ज्याला सामान्यतः ऑपरेशन स्माईल असेही संबोधले जाते, हा गृह मंत्रालयाने (MHA) सुरू केलेला प्रकल्प आहे. हरवलेल्या मुलांचा शोध घेणे आणि त्यांचे योग्य पुनर्वसन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ही मोहीम महिनाभर चालवली जाते, त्यादरम्यान राज्य पोलिसांचे कर्मचारी हरवलेल्या मुलांची ओळख पटवण्यासाठी, त्यांची सुटका करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा जोडण्यासाठी विविध उपाययोजना करतात.

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत गोंधळ, उत्तरात झाला बदल

    1 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत चंद्रपूर पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान मोहीम राबवित बेपत्ता मुले, महिला, पळविलेली मुले, मुली यांच्या शोध घेत जिल्ह्यातील 210 मुले, मुली आणि महिला पुरुषांचा यशस्वी पणे शोध लावला.

    या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कक्षाने यशस्वी कामगिरी बजावली.

    अमित शाह विरोधात युवासेनेचे आंदोलन

    चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या (chandrapur police) पोलीस स्टेशन अंतर्गत बेपत्ता व पळविलेल्या महिला, मुली व मुले व पुरुष यांच्याबाबत माहिती घेत पोलीस पथकाने 133 महिला आणि 71 पुरुष यासोबत जिल्ह्यातील पळविलेल्या पैकी 1 मुलगा व 5 मुलींचा शोध घेऊन त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

    महत्वाची बाब म्हणजे वर्ष 2016 व 2017 मध्ये हरविलेल्या 2 तरुणींचा या मोहिमेत शोध घेण्यात पोलीस दल यशस्वी ठरले.

    सदरची यशस्वी मोहीम अप्पर पोलीस अधीक्षक व प्रभारी पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी सह स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन अधिकारी यांनी मोलाची कामगिरी बजावली.

  • cdcc bank exam : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत उत्तरात झाला बदल आणि..

    cdcc bank exam

    cdcc bank exam : सहकार क्षेत्रातील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती परीक्षेत आज सकाळी चांगलाच गोंधळ उडाला, परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर धरणे आंदोलन करीत मध्यवर्ती बँकेचा निषेध केला.
    अखेर मुंबई आयटीआय कंपनीने आजचा पेपर रद्द करीत उमेदवारांना पुढची तारीख मेल व मोबाईल द्वारे कळविण्यात येणार असे सांगितले.

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत 358 पदांची पदभरती निघाली होती, यामध्ये लिपिक 261 व शिपाई पदासाठी 97 जागा निघाल्या, या पदभरती प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. (Cdcc bank recruitment 2024)

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विरोधात युवासेनेचे आंदोलन


    358 पदासाठी राज्यभरातून तब्बल 31 हजार उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केला, 21 ते 23 डिसेंबर या कालावधीत सदर परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर घेण्यात येणार होत्या मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी चंद्रपुरातील आंबेडकर कॉलेज केंद्रावर चांगलाच गोंधळ झाला.
    पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळाने उत्तर सेव्ह करीत असताना निवडलेल्या पर्यायात बदल व्हायला लागला.
    याबाबत उमेदवारांनी केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सदर प्रकार सांगितला काही वेळाने सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याचे कारण समोर करीत परीक्षा रद्द केली.

    बँकेच्या परीक्षेत घोळ, आमदार जोरगेवार संतापले

    विशेष बाब म्हणजे चंद्रपुरात या पदभरती परीक्षेचा पेपर देण्यासाठी नांदेड, पुणे, छत्रपती संभाजी नगर, अकोला या जिल्ह्यातील उमेदवार आले होते परीक्षा रद्द झाल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त करीत (cdcc bank chandrapur) चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.


    ही परीक्षा आधीच सेट केली आहे असा आरोप उपस्थित उमेदवारांनी केला. आम्ही 700 किलोमीटर चे अंतर कापून परीक्षेत सहभागी झालो मात्र पेपर सुरू झाल्यानंतर अचानक हा गोंधळ झाल्याने आम्हाला मानसिक व आर्थिक त्रास झाला, करीता आता आम्हाला स्थानिक जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणी उमेदवारांनी केली.

    बँक प्रशासन म्हणते, ती जबाबदारी आमची नाही


    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी आपले हात झटकत आमचा करार मुंबई आयटीआय कंपनी सोबत झाला असून ही सर्व जबाबदारी आहे, यामध्ये बँक प्रशासन जबाबदार नाही अशी प्रतिक्रिया कल्याणकर यांनी दिली.

    आमदार जोरगेवार यांचे गंभीर आरोप

    नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षा केंद्रावर झालेल्या गोंधळाबाबत मुद्दा उपस्थित केला, ते म्हणाले की या भरती प्रक्रियेत एका जागेचा दर हा 40 लाख रुपये असून यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहे, राज्यात 9 जिल्ह्यामध्ये ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे.

    आज झालेल्या गोंधळामुळे ही परीक्षा रद्द केली मात्र बाहेर आलेल्या उमेदवारांना याचा आर्थिक भुर्दंड बसला असून सदर परीक्षा आता पारदर्शक पध्दतीने घेण्यात याव्या व उमेदवारांना स्थानिक जिल्ह्यातील परीक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणी अधिवेशनात आमदार जोरगेवार यांनी केली.

  • yuva sena on amit shah | अमित शाह माफी मांगो

    yuva sena on amit shah

    yuva sena on amit shah : चंद्रपूर – लोकसभा हिवाळी अधिवेशनदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले, यानंतर त्या वक्तव्याचे देशात पडसाद उमटले.

    विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निषेध करीत त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करीत सभात्याग केला.

    जिल्हा बँकेची पदभरती, अधिवेशनात आमदार जोरगेवार संतापले

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान अमित शाह (amit shah controversy) यांनी आपल्या वक्तव्यातून केल्याने आज 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर चंद्रपूर जिल्हा युवासेनेतर्फे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात अमित शाह यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आले.

    संविधानाचे जनक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान देशवासी खपवून घेणार नाही, बाबासाहेब यांच्या संविधानामुळे आज नागरिकांना समान अधिकार मिळाला आहे, आज देशातील सर्वोच्च सभागृहात जाण्याचा मान बाबासाहेब यांच्यामुळे मिळाला आणि तुम्ही जगाच्या महामानवाचा आपण अश्या शब्दात अपमान करता हे अतिशय निंदनीय बाब आहे.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ देशातील जनतेची जाहीर माफी मागावी अन्यथा या आंदोलनाचे पडसाद भविष्यात बघायला मिळणार असा इशारा व प्रतिक्रिया युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी दिली.

    निदर्शने आंदोलनात.माजी जिल्हा महिला संघटिका कुसुम उदार, जिल्हा समन्वयक विनय धोबे,बाळू भगत, प्रदीप गेडाम, सुजित पेंदोर, तालुका प्रमुख सूरज शेंडे,शहरप्रमुख शहबाज शेख, उप तालुकाप्रमुख विवान रामटेके, उपशहरप्रमुख स्वप्निल पाटील, तालुका समन्वयक प्रज्वल आवळे,शहर प्रमुख  महेश श्रीगिरवार ,सागर धनसकार, सागर गभाणे,सागर रायपुरे, विशाल पाटील, अभिजित वाघाडे,पृथ्वी ठाकूर, धम्मादीप खोब्रागडे, सलमान शेख, राहुल पाटील, शाहरुख शेख यांची उपस्थिती होती.

  • Kishor Jorgewar on cdcc bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक पदभरतीवरून हिवाळी अधिवेशनात आमदाराचा संताप

    Kishor jorgewar on cdcc bank

    Kishor jorgewar on cdcc bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील नोकरी भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सदर परीक्षा विदर्भातील लगतच्या जिल्ह्यांमध्ये न घेता पुणे, नाशिक या दूरच्या जिल्ह्यांमध्ये घेतली जात आहे. यामुळे उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

    तसेच या भरती प्रक्रियेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप असून, सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी मागणी अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी केली आहे.

    माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांचा रौप्य महोत्सवी सोहळा, मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित


    जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या लिपिक 261 आणि शिपाई 97 अशा 358 पदांसाठी 31,156 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. मात्र, या परीक्षेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत.

    एका उमेदवाराकडून 40 लाख रुपयांपर्यंत पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी येत असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केला आहे.
    यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील नोकरी भरतीची जाहिरात निघाली. त्यानुसार 21, 22 आणि 23 डिसेंबरला परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र ही परीक्षा चंद्रपूर, नागपूर किंवा विदर्भातील लगतच्या जिल्ह्यांमध्ये न घेता पुणे, नाशिक अशा दूरच्या जिल्ह्यांमध्ये घेतली जात आहे.

    राज्यातील 31,156 उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, या परीक्षा प्रक्रियेबाबत अनेक उमेदवारांच्या मनात शंका आहेत. एका जागेचा 40 लाख रुपये असा दर असल्याच्या तक्रारी असून, सदर परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मागणी अधिवेशनात बोलताना त्यांनी केली आहे.

    रद्द झालेल्या परीक्षेतील उमेदवारांना स्थानिक परीक्षा केंद्र द्या – आ. किशोर जोरगेवार

    आज चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या (cdcc bank chandrapur) उमेदवारांची परीक्षा होती. मात्र, पेपर देत असताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या. प्रश्नाचे उत्तर लिहिल्यानंतर ते सेव्ह करताच लिहिलेले उत्तर बदलत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यानंतर याची दखल घेत अर्धा तास पेपर झाल्यावर सदर पेपर रद्द करून परीक्षा दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली.


    मात्र, या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष असून, याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी वरिष्ठ अधिकारी आणि परीक्षा घेणाऱ्या दिल्ली येथील आयटीआय लिमिटेड कंपनीचे ओडीएस प्रविण सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून, आता पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा उमेदवारांच्या स्थानिक केंद्रावरच घेण्यात यावी.

    त्यांना पुन्हा बाहेर जिल्ह्यात केंद्र देऊन आर्थिक भुर्दंड लादू नये, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. सदर कंपनी व्यवस्थापनाने ही आता पुढील परीक्षा स्थानिक केंद्रावर घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे पुढील वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सोयीच्या केंद्रांवर ही परीक्षा घेतल्या जाणार आहे.

  • marotrao kannamwar ex cm maharashtra | चंद्रपुरात माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांचा 125 वा रौप्य महोत्सव कार्यक्रम

    marotrao kannamwar ex cm maharashtra

    marotrao kannamwar ex cm maharashtra : राज्याचे माजी मुख्यमंत्री, जिल्ह्याचे सुपूत्र स्व. मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा आयोजित केला आहे.

    या सोहळ्यानिमित्त १० जानेवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ द्यावा, अशी विनंती आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेत त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.

    चंद्रपुरात महिला व मुलींवर हल्ला


       कर्मवीर मा. सा. कन्नमवार १२५ वी शतकोत्तर रौप्य महोत्सव समिती चंद्रपूरच्या वतीने मा. सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत.

    त्यामुळे या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविण्यात यावे, अशी विनंती आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. यावेळी सूर्यकांत खनके, डॉ. सुरेश महाकुलकर, संदीप गड्डमवार यांच्यासह अन्य उपस्थित होते. या सोहळ्यात स्मरणिकेचेही प्रकाशन केले जाणार आहे.