Author: Admin

  • ias transfer maharashtra : राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

    ias transfer maharashtra

    ias transfer maharashtra : महायुती सरकारचे खातेवाटप झाल्यावर सरकार ऍक्शन मोड वर आले आहे. शासनाने राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे.

    यामध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली ही दिव्यांग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. (IAS officer transfer Maharashtra 2024)

    मोफत रुग्णवाहिकेचे चंद्रपुरात लोकार्पण

    हर्षदीप कांबळे यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात झाली असून त्याचाच भाग म्हणून या बदल्यांकडे पाहिलं जातंय.

    या अधिकाऱ्यांच्या बदल्या

    • मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली.
    • महाजेनकोचे अध्यक्ष अनबाल्गन यांच्याकडे आता उद्योग विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी.
    • गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांकडे नागपूर टेक्सटाईल आयुक्तपदाची धुरा.
    • आयुक्त अविशांत पांडा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी पदावर बदली.
    • वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली.
    • राज्य कर सहआयुक्त सी वनमाथी यांची वर्ध्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
    • सा वनमाथी यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ संजय पवार यांची वर्णी.
    • विवेक जोन्सन हे चंद्रपूरचे नवे जिल्हा परिषद सीईओ.
    • पुणे विभागीय महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण यांची महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या सीईओपदी बदली.
    • गोपीचंद कदम यांना सोलापूर स्मार्ट सिटी सीईओपदी नियुक्ती
  • free ambulance service | आमदार जोरगेवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

    free ambulance service

    free ambulance service : भाग्यजीत बहुउद्देशीय विकास संस्थेने लोकसहभागातून खरेदी केलेल्या दोन रुग्णवाहिकांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विधीवत लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर आता या दोन्ही रुग्णवाहिका रुग्णसेवेत रुजु झाल्या आहे. या माध्यमातून रुग्णांना मोफत सेवा दिली जाणार आहे.

    अमित शाह विरोधात कांग्रेसचा निषेध मोर्चा

     एम.ई. एल प्रभागातील इंदिरानगर येथे आयोजित या लोकार्पण कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष जितेश कुळमेथे, सिद्धार्थ मेश्राम, विलास नखाते, विजय पाटील, गणवीर, तापोष डे,  महेश चहारे, सिंपल उरकुडे, परशू चव्हाण, मुकेश पुरटकर, बाळू कुळमेथे, एकनाथ मोहितकर, रुपेश मुलकावांर, प्रवीण पचबुधे, विराज सुरपाम, निखिल कोडापे, दिलीप साहू, संतोष साहू, मुन्ना जाधव, चैत्राम ठाकूर, पंकज चटप, नितेश कौरासे, अनिल बडवाईक, मोरेश्वर कुरेकार, आत्माराम खैरे आदींची प्रमूख उपस्थिती होती.

       भाग्यजीत बहुउद्देशीय विकास संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असुन संस्थेच्या (NGO offering free ambulance service) वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जात आहे. आता आरोग्य क्षेत्रात सेवा करण्यासाठी संस्थेने पूढाकार घेतला असुन दोन रुग्णवाहिका रुग्णसेवत रुजु करण्यात आल्या आहे.

    चंद्रपुरात गोवंश जनावरांची तस्करी, स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई

    या दोनही रुग्णवाहिकांचे संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले आहे.

      या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, आजचा हा प्रसंग अतिशय महत्त्वाचा आहे. आज एक नव्या जीवनदायी सुविधेचा शुभारंभ होत आहे. आरोग्य ही कोणत्याही समाजाची खरी संपत्ती असते, आणि त्या दृष्टीने ही रुग्णवाहिका सेवा आपल्यासाठी एक मोठे वरदान ठरणार आहे.

    ही रुग्णवाहिका केवळ आपत्कालीन स्थितीत उपयोगी पडणार नाही, तर प्रसूती, अपघात आणि गंभीर (Free ambulance for patients) आजारांमध्येही वेळेवर उपचार मिळवून देण्याचे कार्य करणार आहे. वेळेवर उपचार मिळाले तर अनेक जीव वाचवता येतो त्यामूळे या रुग्णवाहिकांचा मोठा उपयोग रुग्णांना आणि पर्यायाने रुग्णांच्या नातलगांना होणार असल्याचे ते यावेळी बोलतांना म्हणाले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Amit shah controversy : चंद्रपुरात अमित शाह विरोधात कांग्रेसचा निषेध मोर्चा

    Amit shah controversy

    Amit shah controversy : आंबेडकर, आंबेडकर हे नाव घेणं आता फॅशन झाली आहे, देवाचे नाव घेतलं असत तर तुम्हाला स्वर्ग भेटला असता, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या या विधानाने देशात वादंग सुरू झालं.


    अमित शाह यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला, (amit shah on ambedkar) यासाठी शाह यांनी देशातील जनतेची माफी मागत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी कांग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आजच्या निषेध मोर्च्यात केली.

    चंद्रपुरात गोवंश जनावरांची तस्करी

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर शहर काँग्रेस, जिल्हा काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मंगळवारी (२४ डिसेंबर) सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून मोर्चास प्रारंभ झाला. (Chandrapur congress morcha)

    या मोर्चामध्ये काँग्रेसच्या विविध फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत मोर्चा पार पडला. सहभागी झालेल्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना जाहीर माफी मागण्याची तसेच त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली.

    चंद्रपूर पोलिसांना मिळाला जल्लाद

    मोर्चामध्ये प्रमुख नेत्यांमध्ये माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी सहभाग घेतला.
    मोर्चादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

    काँग्रेस कार्यकर्त्यांनी शाह यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत देशातील लोकशाही व घटनात्मक मुल्यांचे रक्षण करण्यासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

  • Cattle smuggling case | चंद्रपुरात गोवंश जनावरांची तस्करी, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    Cattle smuggling case

    Cattle smuggling case : तेलंगणा राज्याला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातून गोवंश तस्करी मोठया प्रमाणात होत असते, यासाठी तस्करी छुपा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असतात मात्र अनेकदा हे तस्कर पोलिसांच्या जाळ्यात अडकतात.

    अशीच एक मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने (crime branch) केली आहे, कत्तलीसाठी नेत असताना गुन्हे शाखेने 45 गोवंशीय जनावरे ताब्यात घेत प्यार फाउंडेशन मध्ये दाखल केले.

    चंद्रपूर शहर पोलिसांनी जल्लाद ला केली अटक

    23 डिसेंम्बर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत होते, यादरम्यान कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.

    माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धानोरा फाटा घुग्गुस येथे नाकाबंदी केली, त्यादरम्यान ट्रक क्रमांक CG24 S 2672 ला थांबवित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 45 गोवंश जनावरांचे पाय बांधलेल्या अवस्थेत आढळले.

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

    पोलिसांनी ट्रक व 45 गोवंश जनावरे असा एकूण 19 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, याप्रकरणी 2 आरोपीना ताब्यात घेत त्यांना (chandrapur police) घुग्गुस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

    सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन अधिकारी SDPO चौगुले, API कांक्रेडवार, PSI सामलवार, पोहवा महात्मे, जयंता, चेतन, पो.अं. वकाटे, सावे व पोहवा दिनेश यांनी केली.

  • burglary theft accused | चंद्रपूर शहर पोलिसांनी केली ‘जल्लाद”ला अटक

    burglary theft accused

    burglary theft accused : 22 डिसेंबर रोजी बाबूपेठ भागातील डीएड कॉलेज परिसरामागे होमगार्ड जीवने यांच्या घरी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान एकाने संधी साधत सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कमेवर डल्ला मारला.

    गुन्हा दाखल झाल्यावर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत काही तासात आरोपी 21 वर्षीय युवकाला अटक केली.

    वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू

    घरी आल्यावर कपाटातील सामान अस्तव्यस्त दिसल्याने घरी चोरी झाल्याचे समजताच याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

    शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, सीसीटीव्ही फुटेज घेतले आणि सुरू केला आरोपीचा शोध, विशेष बाब म्हणजे शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चोरी च्या घटनेनंतर अवघ्या 5 तासात आरोपीला अटक केली. (Burglary accused case updates)

    गडचांदूर पोलिसांचे कौतुकास्पद कार्य

    रेकॉर्डवरील 21 वर्षीय आशिष उर्फ जल्लाद अक्रम शेख राहणार फुकटनगर, संविधान चौक याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.

    22 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजता गौतम जीवने हे मॉर्निंग वॉक साठी बाहेर गेले, त्यांची पत्नी रजनी जीवने ह्या तुकुम येथील होमगार्ड कॅम्प करिता हजर होत्या, त्यामुळे गौतम जीवने हे घरी एकटे होते, त्यामुळे चोराने संधी साधत आपला डाव साधला.

    कोण आहे जल्लाद?

    जल्लाद शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, त्याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहे, विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आला होता. बाहेर निघाल्यावर पोलिसांची त्याच्यावर पाळत होती. आरोपी जल्लाद हा आपल्या घरी राहत नव्हता. त्यानंतर सुद्धा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अथक परिश्रम करीत त्याला अटक केली. (Accused in theft case)

    पोलिसांनी आरोपी जवळून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 42 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक बैसाने, पोउपनी संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, संतोषकुमार कणकम, कपूरचंद खैरवार, इम्रान खान, राजेश चिताडे, दिलीप कुसराम, रुपेश रणदिवे, इर्शाद खान, विक्रम मेश्राम यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास संतोषकुमार कणकम करीत आहे.

  • Human-wildlife conflict tiger | वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, आतापर्यंत 29 नागरिकांचा बळी

    Human-wildlife conflict tiger

    Human-wildlife conflict tiger : चंद्रपूर : २३ डिसेंबरला सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास कापूस वेचणी करीत असताना महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना विरूर स्टेशन वनपरिक्षेत्रातील कविठपेठ येथे घडली.


    वच्छलाबाई अर्जुन आत्राम (५९, रा. कविठपेठ) असे मृतक महिलेचे नाव आहे. आतापर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकूण 29 नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 27 वाघाच्या, 1 बिबट व एक रानडुक्कर यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

    गडचांदूर पोलिसांचे कौतुकास्पद कार्य

    कविठपेठ येथील गणपत आत्राम हे नेहमीप्रमाणे आज (दि. २३) सकाळी ११ वाजताच्या सुमारास कविठपेठ बंजारागुडा शेतशिवारात शेतात बैलबंडीने पत्नी वच्छला, मुलगा, सून व एक मजूर यांना सोबत कापूस वेचणीसाठी गेले होते. वेचणीदरम्यान सदर महिला काही अंतरावर कापूस काढण्याचे काम करत होती. त्यादरम्यान विरूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १३६ जवळ असलेल्या शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून वच्छला आत्राम यांना ठार केले. (Recent tiger attack incidents)

    चंद्रपुरात अवघ्या 2 सेकंदात युवकाने चोरला मोबाईल


    18 डिसेंबर ला या वनपरिक्षेत्र मध्ये 53 वर्षीय जंगू मारू आत्राम हे कापूस वेचण्याकरिता सकाळी 7 वाजता आपल्या शेतात गेले होते, त्याचक्षणी दबा धरून बसलेल्या वाघाने जंगू वर हल्ला करीत ठार केले, जंगू वर वाघाने हल्ला केला ही बाब कुणालाही कळली नाही, 21 डिसेंबर रोजी मृतकाची बहीण कापूस वेचण्याकरिता शेतात गेली असता तिथे जंगू चा मृतदेह पडून होता, त्यानंतर सदर घटना उघडकीस आली होती. (Tiger attack on humans)


    काही दिवसांपूर्वी तेलंगणा राज्यातील थिबेट नामक वाघ महाराष्ट्र राज्यात आला, या वाघाने गोंडपीपरी व राजुरा तालुक्यातील गावात चांगलाच धुमाकूळ घालत अनेक वन्यप्राण्यांना ठार केले, वाघावर नजर ठेवण्यासाठी 8 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते, या दोन्ही घटनेत हल्ला करणारा थिबेट वाघ असू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    घटनेची माहिती मिळताच विरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे सहायक वनसंरक्षक पी.एन. अवदुतवार यांनी कार्यालयातील क्षेत्रसहायक, वनरक्षक, कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास मध्यचांदा उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय परिविक्षाधिन वन अधिकारी पवनकुमार जोंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

  • Police teamwork examples | रवि चा जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी कापले ट्रक चे केबिन

    Police teamwork examples

    Police teamwork examples : कायद्याच्या विरोधात काम करणाऱ्या पोलिसांचे अनेक उदाहरणे पुढे येतात मात्र कायद्यात राहून माणुसकी साठी काम करणारे पोलीस हे क्वचितचं आहे, असेच माणुसकीचे कार्य गडचांदूर पोलिसांच्या हातून घडले.

    अवघ्या 2 सेकंदात चोरट्याने मोबाईल लांबविला

    23 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास भोयेगाव-गडचांदूर मार्गावर कोळसा वाहतूक करणारा ट्रक क्रमांक MH34 BG 6749 हा उलटला, ट्रक उलटल्यावर क्लिनर मनीष पांडे हा बाहेर पडला मात्र ट्रक चे संपूर्ण केबिन चालक रवि प्रसाद यांच्या अंगावर पडले.


    एका बाजूला जमीन तर दुसऱ्या बाजूला ट्रक च्या केबिन चा भार रवी प्रसाद च्या अंगावर होता, रात्रीचे 2 वाजले मदतीला येईल तरी कोण? अशी चिंता क्लिनर पांडे यांना लागली, त्यांनी याबाबत तात्काळ गडचांदूर पोलिसांसोबत संपर्क साधत माहिती दिली.
    विशेष बाब म्हणजे माहिती मिळाल्यावर पोलीस काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले.


    ट्रक चे केबिन चालकाच्या अंगावर होते तो त्यामध्ये अडकून पडला होता, पोलिसांनी वाहन चालकाचा जीव वाचविण्यासाठी घटनास्थळी हायड्रा व क्रेन बोलावली.
    पोलिसांनी ट्रक चे केबिन कापण्यास सुरुवात केली, तब्बल 2 तास शर्थीचे प्रयत्न करीत पोलीसांनी चालक रवी प्रसाद याला सुखरूप बाहेर काढले. (Good policing examples)


    चालक प्रसाद याला तात्काळ गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले, सध्या रवी प्रसाद यांची प्रकृती उत्तम आहे, चालक प्रसाद यांचे प्राण वाचविल्याबद्दल त्यांनी गडचांदूर पोलिसांचे आभार मानले.


    सदर यशस्वी बचाव मोहीम पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल कुंभरे, वाहतूक पोलीस शिपाई सुभाष तिवारी, रामसिंग पवार, खंडू मुंडकर, गोविंद सुरणार, साईनाथ उपरे, बंडू महात्मे, प्रकाश बाजीगर व सिद्धार्थ रणवीर यांनी केली.

  • mobile phone thefts | चंद्रपुरात अवघ्या 2 सेकंदात मोबाईल चोरी

    mobile phone thefts

    mobile phone thefts : अवघ्या 2 सेकंदात खिशातून मोबाईल लंपास करण्याचा प्रकार 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता चंद्रपूर शहरातील बाजार समिती मध्ये घडला.

    ताजा भाजीपाला घेण्यासाठी नागरिक सकाळी चंद्रपूर शहरातील बाजार (morning theft live) समिती रामनगर येथे जातात, मात्र गर्दी झाल्यावर काही चोर त्याठिकाणी आपली हात सफाई दाखवितात.

    रामनगर पोलिसांनी पकडला नायलॉन मांजा

    असाचं एक प्रकार 2 डिसेंम्बर रोजी बाजार समिती मधील भंडारी यांच्या लहसून विक्री दुकानात घडला.

    चाळीशी पार एक नागरिक आपल्या शर्टाच्या वरच्या खिशात मोबाईल ठेवत लहसून खरेदी करीत असतो त्यावेळी जॅकेट व टोपी परिधान केलेला युवक लहसून घेण्यासाठी त्या दुकानात येतो.

    सकाळी मॉर्निंग वॉक ला गेले आणि 50 हजार गमावून बसले

    त्याचक्षणी त्या युवकाची नजर खिशात ठेवलेल्या मोबाईल वर पडते, आणि तो थांबत संधीची वाट बघतो.
    तितक्यात ते गृहस्थ लहसून घेत आपल्या पिशवीत टाकण्यासाठी खाली वाकतात आणि अवघ्या 2 सेकंदात जॅकेट परिधान केलेला युवक लहसून घेण्याचं नाटक करीत पिशवी त्या गृहस्थाच्या जवळ नेत त्यांच्या खिशातील मोबाईल लंपास करतो.


    त्यानंतर त्या गृहस्थाला शंका येते, ते काही वेळ युवकाकडे बघत आपल्या पिशवीतील भाजीपाला तपासतात मात्र त्यांचं लक्ष खिशातून लंपास झालेल्या मोबाईल वर पडत नाही.

    काही वेळाने ते गृहस्थ तिथून निघून जातात मोबाईल चोरणारा युवक मोबाईल पिशवीच्या बाहेर काढत आपल्या खिशात टाकून पोबारा करतो.

    आणि अशाप्रकारे आपल्या निष्काळजीपणामुळे खिशातील 38 हजारांचा मोबाईल अवघ्या 2 सेकंदात चोरीला जातो. घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (cctv footage) कैद झाला आहे.

    याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल चोरीची फिर्याद नोंदविल्या गेली असून पोलीस त्या युवकांचा शोध घेत आहे.

  • Bagheera OTT Release In Hindi | आता होणार शिकाऱ्यांची शिकार

    Bagheera OTT Release In Hindi

    Bagheera OTT Release In Hindi : अभिनेता श्रीमुरलीचा ‘बघीरा’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 31 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून ते ओटीटीवर कन्नड, तामिळ, मल्याळम आणि तेलुगू भाषांमध्ये धुमाकूळ घालत आहे. पण आता निर्मात्यांनी हा चित्रपट हिंदी भाषेत रिलीज (hindi release 2024) करण्याची घोषणा केली आहे. तो हिंदीत कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल ते जाणून घ्या.

    गेल्या काही दिवसांपासून चाहते ‘बघीरा’च्या हिंदी रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. निर्मात्यांनी अखेर जाहीर केलं आहे की ‘बघीरा’ चित्रपट हिंदी भाषेत डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीजसाठी सज्ज आहे. श्रीमुरलीचा कन्नड चित्रपट ‘बघीरा’ सध्या नेटफ्लिक्सवर दक्षिण भाषांमध्ये उपलब्ध आहे, परंतु आता त्याची हिंदी आवृत्ती इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिट होईल. त्यासाठी आता काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

    अमेझॉन प्राईम व्हिडीओ चे स्वस्तात मस्त रिचार्ज

    चित्रपट कधी आणि कुठे बघता येईल?

    रविवारी, ‘बघीरा’च्या निर्मात्यांनी घोषणा केली की कन्नड चित्रपटाची हिंदी आवृत्ती 25 डिसेंबर 2024 पासून डिजनी प्लस हॉटस्टारवर (Disney hotstar) प्रदर्शित होईल. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनेही या बातमीला दुजोरा दिला आणि लिहिले, ‘बघीरा शिकाऱ्यांची शिकार करण्यासाठी येत आहे. 25 डिसेंबरपासून हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होणार आहे. (Bagheera OTT Release In Hindi)

    काय आहे चित्रपटाचे कथानक?


    ‘बघीरा’ चित्रपटाची कथा एका मास्कच्या मागे राहणाऱ्या माणसाभोवती फिरते. तो गुन्हेगारांविरुद्ध कठोरपणे लढतो आणि न्याय शोधतो. मात्र, त्याच्या पद्धती कायद्याला धरून नाहीत.

    ‘

    या अभिनेत्यांची मुख्य भूमिका

    बघीराचे दिग्दर्शन सुरी यांनी केले आहे. यात श्रीमुरली, रुक्मिणी वसंत, सुधा राणी, प्रकाश राज आणि रंगायना रघु यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बी अजनीश लोकनाथ यांनी चित्रपटाला संगीत दिले असून एजे शेट्टी यांनी छायांकनाची जबाबदारी उचलली आहे. आयएमडीबीच्या रिपोर्टनुसार, ‘बघीरा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी 20 कोटी रुपये खर्चून बनवले होते आणि त्यातून 30 कोटी रुपये कमविले होते.

  • Pending salary | सिध्दबलीतील पूर्व कामगारांना रोजगार व प्रलंबित राशी तातडीने द्यावी- हंसराज अहीर

    Pending salary

    Pending salary : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष  हंसराज अहीर यांनी सिध्दबली इस्पात प्रकल्पातील विविध प्रश्न, समस्या, कामगारांच्या अडचणी, प्रकल्पात होणारे अपघात व अन्य महत्वपुर्ण विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेतली.

    दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा, निवासी उपजिल्हाधिकारी डि.एस. कुंभारे, तहसिलदार विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, सहायक कामगार आयुक्त राजदिप धुर्वे, जिल्हा उद्योग केंद्र अधिकारी कु. शालु घरत, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे भादुले, सिध्दबलीचे वरिष्ठ अधिकारी व अन्य विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या बैठकीत हंसराज अहीर यांनी सिध्दबली कंपनीशी निगडीत यापूर्वी झालेल्या बैठकांच्या कार्यपूर्ती अहवालाचा आढावा घेतला. कंपनीतील विविध बाबींचा तपास करण्यासाठी गठीत समितीच्या कार्याविषयी या बैठकीत माहिती घेतली.

    रामनगर पोलिसांनी पकडला नायलॉन मांजा

    बैठकीमध्ये सिध्दबलीमधील जुन्या कामगारांचे नोकरीत पुनर्स्थापन व प्रलंबित वेतन (pending salary) व अन्य देणी याविषयी माहिती घेत अहिर यांनी कंपनीने पत्र दिलेल्या कामगारांपैकी ५ कामगार कामावर रूजू झाले असून ६९ कामगारांपैकी ५० वर्षाखालील ४८ कामगारांना नोकरीचे पत्र देण्यात यावे अशा सुचना केल्या. 

    कंपनीने या सुचना मान्य करीत लवकरच पत्र जारी करण्याची हमी दिली. जे कामगार काही कारणवश रूजू होण्यास असमर्थ असतील अशा कामगारांच्या नातेसंबंधातील व्यक्तीस नोकरीत सामावून घ्यावे अशी सुचनाही अहीर यांनी कंपनी प्रबंधनास दिली.

    यावेळी हंसराज अहीर (hansraj ahir) यांनी सिध्दबली  मध्ये कार्यरत शैलेंद्र नामदेव या कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु झालेला असतांना प्रकरण रफादफा करण्याच्या हेतुने त्याचेशव उपचाराच्या बहाण्याने नागपूरला हलविण्याचा प्रयत्न केला.

    या गंभीर गुन्ह्यांचा सखोल तपास करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले. या व्यतिरिक्त झालेल्या अन्य कामगार अपघात प्रकरणात आयोगाच्या पाठपुराव्यामुळे कामगार न्यायालय, चंद्रपूर यांचे माध्यमातून संबंधित कुंटूंबियास नुकसान भरपाई मिळल्याबद्दल अहिर यांनी समाधान व्यक्त केले.

    जुन्या कामगारांच्या प्रलंबित वेतनाबाबत चर्चेदरम्यान आयोगाकडून सुवना देण्यात आल्या की, क्लोजर रिपोर्ट न देता कंपनीचे काम बंद करण्यात आल्यामुळे कंपनी बंदच्या कालावधीत सिध्दवली व सनविजय या कपन्यांनी कामगारांना प्रलंबित मोबदला देण्याची जबाबदारी घ्यावी, याबाबत कामगार आयुक्तांनी दोन्ही कंपनीच्या कालावधीतील देय असलेली रक्कम निश्चित करावी. 

    याविषयी दोन्ही प्रबंधनाने अनुकूलता दर्शविली असल्यामुळे मा. जिल्हाधिकारी व सहायक कामगार आयुक्त यांनी विशेष पुढाकार घेवून हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा व येत्या ६ जानेवारी २०२५ रोजी बैठकीचे आयोजन करून प्रगती विषयक माहिती सादर करण्याची सुचना एनसीबीसी अध्यक्षांनी संबंधितांना केली. बैठकीमध्ये राजू घरोटे, धानोरा (पि.) सरपंच विजय आगरे, उपसरपंच विनोद खेवले, पवन एकरे, मधूकर नरड, उत्तम आमडे व अन्य उपस्थित होते.