Author: Admin

  • congress on amit shah | केंद्रीय गृहमंत्र्यांचे विधान देशासाठी वेदनादायी – खा. प्रतिभा धानोरकर

    congress on amit shah

    congress on amit shah : दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या विधानाचे पडसाद देशभर उमटू लागले आहे. इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वक्तव्याचा संसदेबाहेर निर्दशने करुन निषेध केला.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना संविधानावरील चर्चे दरम्यान आपण आंबेडकर-आंबेडकर करता हि फॅशन झाली आहे. त्या ऐवजी देवाचे नाव घेतल्यास स्वर्गात जागा मिळेल असे विधान करुन संपुर्ण देशवासीयांच्या भावना दुखावल्या असल्याची खंत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली.

    पीक विम्याच्या मुद्द्यावर खासदार धानोरकर आक्रमक

    कॉग्रेस सहीत सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांनी भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमा हातात घेऊन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा (amit shah news) यांच्या विधानाचा निषेध केला.

    या संदर्भात या वक्तव्याप्रती केंद्रिय गृहमंत्री यांनी देशवासीयांची माफी मागावी व संविधान निर्माण करणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक व्हावे अशी भावना देखील खासदार धानोरकर यांनी व्यक्त केली.

  • Chandrapur road accident | गडचांदूरात लालपरीचा अपघात, एकाचा मृत्यू

    Chandrapur road accident

    Chandrapur road accident : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा ते गोविंदपूर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे, या मालिकेत 18 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. बस चालकाला गंभीर दुखापत झाली असून बसमधील 7 ते 8 प्रवासी किरकोळ जखमी झाले.

    आज सकाळी किनवट आगाराची बस चंद्रपूर कडे येत होती, या दरम्यान कोरपना – गडचांदूर मार्गावरून जात असताना अचानक समोर दुचाकी आल्याने बस चालकाने दुचाकी चालकाला वाचविण्याचा प्रयत्न केला असता बसचे नियंत्रण सुटले, आणि दुचाकीला धडक देत बस डिव्हाईडर तोडत रस्त्याच्या खाली उतरली.

    मुनगंटीवार यांच्या मंत्रीपदासाठी कार्यकर्त्यांची पदयात्रा

    या अपघातात दुचाकी चालक गडचांदूर निवासी 45 वर्षीय कान्होजी संन्याशी डायले यांचा मृत्यू झाला. बस मधील 8 ते 10 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून बस चालकाला या अपघातात गंभीर दुखापत झाली.

    अपघाताची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, जखमी प्रवासी व बस चालकाला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.

  • Pushpa 2 OTT Release | पुष्पा 2 चा थरार आता OTT वर

    Pushpa 2 OTT Release

    Pushpa 2 OTT Release : थिएटरनंतर, आता अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसह बरेच लोक OTT वर पुष्पा 2 च्या रिलीजची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत एक मोठे अपडेट समोर आली आहे.


    पुष्पा २: द रुलने जवळपास सर्व भारतीय चित्रपटांना मागे टाकले आहेत. अल्लू अर्जुन (allu arjun) आणि रश्मिका मंदान्ना यांचा हा चित्रपट दररोज भरघोस कमाई करत आहे. पुष्पा 2 ने आतापर्यंत जगभरात 1100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

    तर तुमचाही मोबाईल हॅक होतोय, लगेच डिलिट करा या एप्स

    10 दिवस उलटले तरी अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची कमाई कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. थिएटरनंतर आता अभिनेत्याच्या चाहत्यांसह बरेच लोक OTT वर पुष्पा 2 च्या रिलीजची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

    सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांवर विश्वास ठेवला तर अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 पुढील वर्षी 9 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल. तथापि, चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप त्याच्या OTT रिलीजबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सहसा, कोणताही चित्रपट चित्रपटगृहांनंतर OTT वर प्रदर्शित होण्यासाठी 40 ते 50 दिवस लागतात.

    अल्लू अर्जुन पुन्हा एकदा सुकुमार दिग्दर्शित पुष्पा 2 मध्ये पुष्पराजच्या भूमिकेत आहे. प्रत्येकजण त्याच्या अभिनयाचे आणि चित्रपटाच्या कथेचे कौतुक करत आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, पुष्पा 2 मध्ये रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, सुनील, राव रमेश आणि जगपती बाबू हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

    या सर्व लोकांच्या अभिनयाचे चित्रपटात खूप कौतुक होत आहे. पुष्पा 2 चे बजेट जवळपास 550 कोटी रुपये आहे. अवघ्या 3-4 दिवसांत बजेट वसूल करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला.

  • Padyatra | सुधीर मुनगंटीवार मंत्री होणार? कार्यकर्त्यांची पदयात्रा

    Padyatra

    Padyatra : राज्याचे हेविवेट नेते आणि भाजपाची मुलुख मैदानी तोफ सुधीर मुनगंटीवार यावेळी मंत्रिमंडळात नाहीत. भाजपची सत्ता आली आणि मुनगंटीवार मंत्रिमंडळात (cabinet expansion) नाहीत, असे आजवर कधी घडलेच नव्हते. पण यावेळी हे विपरीत घडले. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मुनगंटीवार स्वतः नाराज नाहीत. पण त्यांच्या समर्थकांनी नाराजी स्पष्ट बोलून दाखवली आहे. अनेक कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले आहेत.

    चंद्रपुरातील अनेक लाडक्या बहिणींचे ऊर आपल्या भावाचं नाव नसल्यानं भरून आलं आहे. ज्यांच्यासाठी मुनगंटीवार धावून गेले असे अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक, निराधार माता-भगिनी, विद्यार्थी, शेतकरी यांचा कंठ दाटून आला आहे. मुनगंटीवार यांनी ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ अशी भूमिका घेतली असली तर आम्ही गप्प राहणार नाही, असं या सगळ्यांची ठरवलं आहे. त्यातूनच मुनगंटीवार यांचे चाहते चंद्रपुरातून पायीच निघाले,पुढे ते नागपूर नंतर दिल्लीकडे कूच करणारं आहे.

    चंद्रपूरपासून दिल्ली गाठेपर्यंत आमचे पाय रक्तबंबाळ झाले तरी चालेल पण सुधीरभाऊंना मंत्रिपद मिळायलाच हवं, अशी भूमिका या सगळ्यांनी घेतली आहे. मुनगंटीवार यांचे चाहते एक एक करीत या अनोख्या पदयात्रा (padyatra) सत्याग्रहात सहभागी होत आहेत. त्यांना एकच उत्तर हवं आहे. का सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांना मंत्रिमंडळातून ऐनवेळी का वगळण्यात आलं. सुरुवातीला हे सगळे कार्यकर्ते नागपूर येथे पायी पोहोचणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीकडे कूच करणार आहेत.

    मागणी रास्तच

    ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे राज्यगित ज्यांनी दिलं त्या सुधीर मुनगंटीवार यांनाच दिल्ली मंत्रिपदापासून कशी काय वंचित ठेऊ शकते असा प्रश्न या सगळ्या कार्यकर्त्यांना भेडसावत आहे. कार्यकर्त्यांची चंद्रपूर ते नागपूर अशी पदयात्रा (padyatra) मंगळवारी दुपारी (17 डिसेंबर) सुरू झाली आहे. नागपूरमध्ये या कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर ठिक अन्यथा त्यांनी पुढचा प्रवास दिल्लीच्या दिशेने करण्याचा पक्का निर्धार केला आहे.

    पिकविम्याच्या मुद्द्यावर लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार धानोरकर आक्रमक

    चंद्रपूरमधून निघालेले हे कार्यकर्ते या थंडीत तहान-भूक विसरून पायपीट करीत राहणार आहेत. पडोली, भद्रावती, वरोरा, खांबाळा या भागातून कार्यकर्ते या पदयात्रेत जुळले जाणार आहेत. नागपुरात पोहोचेपर्यंत या सत्याग्रह पदयात्रेतील कार्यकर्त्यांची संख्या मोठी होईल, असा विश्वास मुनगंटीवार यांच्या समर्थकांचा आहे.

    कारवां बढता रहे..

    ‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर
    लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’, अशी मुनगंटीवार यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. आपल्या 30 वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी माणसं जोडली. त्यामुळं त्यांच्यासाठीही आता चाहत्यांचा ‘कारवाँ’ तयार होत आहे. सद्य:स्थितीत फारुख शेख, हरीश व्यवहारे, सुरज पारखी, अमित तामटकर, अरविंद बोरकर, देवानंद थोरात, भोजराज शिंदे, मनोज ठेंगणे, दीपक सिंग आदी कार्यकर्ते चंद्रपुरातून निघाले आहेत. मात्र ही संख्या आता वाढत जाणार आहे. वाटेत लागणाऱ्या प्रत्येक गावातून सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते या सत्याग्रह पदयात्रेत जुळत जाणार आहेत.

    मी नाराज नाही. नाराज होणारा मी माणूस नाही. पण मंत्रिमंडळात माझा समावेश आहे, हे निश्चित झाले होते. शपथविधीचा दिवस आल्यावरही मला फोन आला नाही. यामागचे कारण मला कळले नाही. मला ते कारण जाणून घ्यायचे आहे. बाकी मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती प्रामाणिकपणे पार पाडेल. पूर्ण शक्तीने जबाबदारी पार पाडणे, हे माझे कर्तव्य आहे. हे कर्तव्य मी आजपर्यंत निभावत आलो. यापुढेही निभावत राहणार आहे, असे मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. त्यामुळं कधीही न हरणाऱ्या मुनगंटीवार यांच्यासाठी लढवय्ये कार्यकर्तेही सज्ज झाले आहे.

    सातव्यांदा आमदार

    चंद्रपूर जिल्ह्यातून सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या जिल्ह्यात आतापर्यंत जी काही कामे दिसत आहेत, ती त्यांच्यामुळेच झालेली आहेत. सुधीर मुनगंटीवार नसते, तर चंद्रपूर जिल्हा 20 वर्ष मागे असता. त्यामुळे त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने आम्ही चांगलेच नाराज आहोत. आम्ही येथून पदयात्रेने नागपूरला जाणार आहोत. तेथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. येथे आमचे काम झाले तर ठीक. नाहीतर तेथूनच पुढे पदयात्रेने दिल्लीला जाऊ. दिल्लीत आमचं म्हणणं मांडू. जोपर्यंत सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळत नाही, तोपर्यंत आमची पावलं थांबणार नाहीत. पायांतून रक्ताच्या धारा निघाल्या तरी ही पावलं थांबणार नाही, अशा भावना चंद्रपूर येथून पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

  • Social activities | आमदार जोरगेवार यांच्या वाढदिवशी विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न

    Social activities

    Social activities : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस यंदा विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    याप्रसंगी शेकडो विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा नोटबुक वाटप करण्यात आले. पुढील सहा दिवसांत पाच हजार विद्यार्थ्यांना एकूण 27 हजार नोटबुक वाटण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. तसेच दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

    चंद्रपुरात प्रसारमाध्यम कार्यशाळा संपन्न

      सकाळी आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकाली मंदिरात महाआरती केली आणि विविध धार्मिक स्थळांना भेट देत प्रार्थना केली. त्यानंतर सामाजिक उपक्रमांची सुरुवात झाली. भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने जनसंपर्क कार्यालयात आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात 200 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत “रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान” हा संदेश दिला.

    Blood donation

      दुपारी 11 वाजता बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले शाळेत आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आले. पुढील सहा दिवसांत महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा नोटबुक देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

     पडोली येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. बाबुपेठ छोटा बाजार येथे लाडू तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

    दीक्षाभूमी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात उपस्थित राहून आमदार जोरगेवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.

      तुकुम येथील आरोग्य शिबिराचे उद्घाटनही आमदार जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. जोड देऊळ येथे आयोजित दिव्यांग साहित्य वाटप कार्यक्रमात आमदार जोरगेवार यांनी दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप केले. योग नृत्य परिवार यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला.

    भारतीय जनता पक्ष आणि आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने शहरातील विविध धार्मिक स्थळांवर महाआरतीआणि यज्ञ आयोजित करण्यात आले होते. शहरातील अनेक भागांमध्ये आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, लाडू तुला, साहित्य वाटप यांसारखे विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले.

      आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस समाजहिताची भावना व्यक्त करणाऱ्या या उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र आणि मित्रपरिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  • media conclave | चंद्रपुरात प्रसारमाध्यम कार्यशाळा ‘वार्तालाप’  संपन्न

    media conclave

    media conclave : महाराष्ट्र राज्यात वाघांची सर्वाधिक  संख्या असलेल्या आणि विस्तीर्ण वनव्याप्ति असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यात वन्यजीव पर्यटनाच्या व्यतिरिक्त इको पर्यटन आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याची गरज असून पत्रकारांनी पर्यटनाची क्षमता ही गोंंडकालीन   मंदिरांमधील सांस्कृतिक पर्यटन, ऐतिहासिक स्थळे, गावांमधील खाद्यपदार्थ आणि जीवनशैली अशा बाबीमध्ये शोधण्याचे आवाहन करुन प्रसारमाध्यमे पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच संवर्धनाशी संबंधित बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात असे प्रतिपादन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज चंद्रपूर मध्ये केले.

    विनय गौडा यांच्या हस्ते प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (Press Information Bureau) पत्र सूचना कार्यालय (पीआयबी) नागपूरने आयोजित केलेल्या प्रसार माध्यम कार्यशाळेचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. या एक दिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळेची संकल्पना ( media conclave) ‘चंद्रपुरातील संवर्धन आणि विकासाच्या दिशेने प्रयत्न’ अशी होती.

    याप्रसंगी उद्घाटकीय सत्राला केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार मंगेश इंदापवार, पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम संवाद अधिकारी सौरभ खेकडे, धनंजय वानखेडे उपस्थित होते. 

    त्यानंतर आयोजित तांत्रिक सत्रा मध्ये उपसंचालक (बफर ) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पियुषा जगताप (भारतीय वन सेवा) यांनी  ‘वन्यजीव संरक्षण आणि प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर पत्रकारांना संबोधित करताना   सांगितले की, धारणा निर्माण करण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे.

    media conclave 1

    प्रसारमाध्यमांनी वनसंबंधित समस्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंवर प्रकाश टाकावा. मनुष्य आणि प्राणी यांचेही संघर्षाव्यतिरिक्त सहअस्तित्व आहे, ज्याला प्रसारमाध्यमांनी (vartalap) चांगल्या वृत्तांकनाच्या माध्यमातून रेखांकित करणे गरजेचे आहे.  

    इकोटूरिझमला चालना देणे, मांसाकरीता वन्यप्राण्याच्या शिकारीच्या दंडात्मक कारवाईबद्दल जागरूकता पसरवणे हे प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनासाठी काही रोचक पैलू आहेत ज्यामुळे वन्यजीव संरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण जागरूकता निर्माण होऊ शकते, असेही जगताप यांनी सांगितले.

    जंगलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी ‘पर्यायी उपजीविके’ बद्दल संबंधितांमध्ये जागरूकता पसरवावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पत्रकारांनी मानव वन्यजीव संघर्षाबाबत प्रश्न विचारले ज्याला श्रीमती जगताप यांनी त्यांच्या या क्षेत्रातील अनुभवांसह उत्तर दिले.

    केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीचे शैक्षणिक सल्लागार मंगेश इंदापवार ‘वन्यजीव संरक्षण आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावरील तांत्रिक सत्राला संबोधित करताना म्हणाले की, पर्यावरणविषयक समस्यांवरील पत्रकारांनी केलेल्या वृत्तांकनामुळे पर्यावरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायपालिकेने स्वत:हून  याचिका दखल घेतली आहे. 

    वन्यजीव संरक्षण हे मानवी जीवनाइतकेच महत्त्वाचे आहे आणि प्रसारमाध्यमे या मुद्द्यांवर एक सजग प्रहरी म्हणून काम करत असल्याने असल्याने संबंधितांमध्ये प्रभावी बदल घडवून आणण्यास मदत होऊ शकते.

    media conclave 2

    या एक दिवसीय (vartalap) प्रसारमाध्यम कार्यशाळे दरम्यान शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवादाच्या सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. लाभार्थ्यांनी पंतप्रधान-स्वनिधी, दीनदयाल उपाध्याय अंतोदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान एनयुएलएम सारख्या योजनांमधून त्यांना मिळालेल्या लाभांबद्दल समाधान व्यक्त केले. बांबू प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र -बीआरटीसी चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनीही या संस्थेतील बांबूच्या पायाभूत सुविधांशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्याच्या अनुभवाची माहिती दिली.   

    पीएम स्वनीधी योजनेचे लाभार्थी अजब ठावरे यांनी त्यांच्या झुणका भाकर केंद्राला पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्ज सहाय्यामुळे फायदा झाल्या असल्याचे सांगितले. शिवशंकर कोलते या दिव्यांग लाभार्थी यांनी एनएलयूएम या योजनेअंतर्गत त्यांना स्वयंरोजगार मिळाला असल्याचे सांगून दिव्यांगांना मदत करणारी ही योजना केंद्र सरकारने आणल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभार मानले. 

    बांबू संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची कास धरणाऱ्या महिला कीर्ती तसेच बांबू रिसर्च ट्रेनिंग सेंटर मधून डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी चा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थी आकाश यांनी आपले अनुभव कथन केले.

     ‘चंद्रपूर विभागातील पर्यावरण शाश्वतता आणि रोजगार निर्मितीच्या संधी’ या विषयावर आधारित कार्यशाळेच्या सत्रात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी-सिपेट, चंद्रपूरचे पुष्कर देशमुख म्हणाले की, प्लास्टिकचा वापर दैनंदिन जीवनात होत असून ते   सर्वव्यापी आहे या क्षेत्रात प्रचंड रोजगार क्षमता असून केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत सिपेट सारख्या केंद्रीय संस्था प्लॅस्टिक अभियांत्रिकीमध्ये अल्पकालीन व्यावसायिक अभ्यासक्रम, त्याचप्रमाणे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहेत ज्यामुळे कुशल तरुण प्लास्टिकशी संबंधित उद्योगांमध्ये नोकरी शोधू शकतात आणि स्वयंरोजगारही निर्माण करू शकतात.

    या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांच्या मोठ्या फायद्यासाठी प्रसार माध्यम संस्था अशा संस्थात्मक प्रयत्नांना पुढे आणू शकतात आणि पर्यावरण स्नेही प्लास्टिकच्या व्यवस्थापनाबाबत  जागृती करु शकतात, असेही देशमुख यांनी सांगितले.

    पीक विमा मुद्द्यावर खासदार धानोरकर आक्रमक


    या प्रत्येक तांत्रिक सत्रा नंतर पत्रकारांनी वक्त्यांना प्रश्न विचारले ज्याची उत्तरे विस्तारपूर्वक देण्यात आली . या कार्यशाळेच्या शेवटी पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम संवाद अधिकारी सौरभ खेकडे यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या कार्यप्रणाली बाबत एक सादरीकरण केले. याप्रसंगी श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूरचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर तसेच ज्येष्ठ पत्रकार डॉ. पंकज मोहरील यांनी प्रातिनिधीक स्वरूपात या कार्यशाळेच्या संदर्भात आपला प्रतिसाद आणि प्रतिक्रिया शेवटी व्यक्त केली. Press Information Bureau

    या एकदिवसीय कार्यशाळेत चंदपूर आणि लगतच्या  भागातील पत्रकार सहभागी  झाले होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन आकाशवाणी चंद्रपूरचे उद्घोषक हेमंत शेंडे यांनी केले.

  • Crop insurance scheme | पीक विम्याच्या मुद्द्यावर खासदार धानोरकर आक्रमक

    Crop insurance scheme

    Crop insurance scheme : दिल्ली येथे लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून विविध प्रश्नांच्या माध्यमातून खासदार प्रतिभा धानोरकर ह्या सरकार चे लक्ष वेधून घेत आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान सन 2023 ची प्रधानमंत्री पिक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे सरकार च्या लक्षात आणून दिले.

    आमदार जोरगेवार यांच्या वाढदिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन

    खासदार प्रतिभा धानोरकर (mp pratibha dhanorkar) यांनी दिल्ली येथे लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात विविध विषयाच्या अनुषंगाने सरकार ला धारेवर धरले असून कृषी व शेतकरी विषयाच्या संदर्भात त्यांनी आक्रमकपणे आपले प्रश्न मांडले आहेत.

    किटकनाशकांमुळे अनेक शेतकऱ्यांचे व त्यांच्या पाल्यांचे मृत्यु होत असल्याचे सरकार च्या निर्दशनास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आणून दिले. तसेच किटकनाशकामुळे होणारे दुष्परीणामांसाठी सरकार ने उपाययोजना कराव्यात. त्यासोबतच अशा प्रकरणात दवाखान्यांना देखील आवश्यक सूचना द्याव्यात या संदर्भात खासदार धानोरकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

    मी नाराज नाही – सुधीर मुनगंटीवार

    त्यासोबतच 2023 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पिक विम्याचे पैसे अद्यापही मिळाले नसल्याचे सभागृहात खासदार धानोरकर यांनी सांगितले. संबंधीत पिक विम्याचे पैसे तात्काळ देण्यात यावे व संबंधीत कंपनीवर कार्यवाही करावी अशी मागणी देखील खासदार धानोरकर यांनी सभागृहात केली. संबंधीत कंपनीची मुजोरी या सरकार ने बंद करावी व शेतकाऱ्यांना न्याय द्याव, अशी देखील विनंती सरकार कडे केली.

  • Kishor jorgewar birthday | वाढदिवस लोकनेत्याचा

    Kishor jorgewar birthday

    Kishor jorgewar birthday : सकाळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक चंद्रपूरच्या आराध्य दैवत माता महाकालीची महाआरती करत आजच्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर योग नृत्य परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

    आता मी पुस्तकांचा अभ्यास करणार – सुधीर मुनगंटीवार


    भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पक्ष आणि आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने शहरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

    Kishor jorgewar birthday

    सकाळी आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकालीचे दर्शन घेत पूजा-अर्चना केली. त्यानंतर आझाद बाग येथे योग नृत्य परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. दिवसभर आयोजित विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना त्यांनी भेटी देत शुभेच्छुकांचे शुभेच्छा स्वीकारल्या. Kishor jorgewar


    आज विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार किशोर जोरगेवार यांनी या शिबिरांना भेट देऊन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आभार मानले. या शिबिरांमध्ये शेकडो रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यासोबतच हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

    Birthday program


    नागपूर रोडवरील दर्गा येथे आयोजित कार्यक्रमातही आमदार किशोर जोरगेवार यांनी सहभाग घेतला. त्यानंतर एमआयडीसी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी जैन गुरूंचे आशीर्वाद घेतले.


    वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक व धार्मिक उपक्रमांमुळे चंद्रपूर शहरात एक सामाजिक एकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या या कार्यक्रमांचे नागरिकांनीही भरभरून स्वागत केले.

  • sudhir mungantiwar on cabinet expansion : मी नाराज नाही, आता पुस्तकांचा अभ्यास करणार – सुधीर मुनगंटीवार

    sudhir mungantiwar on cabinet expansion

    sudhir mungantiwar on cabinet expansion : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (16 डिसेंबर) नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मुनगंटीवार यांचे नाव नव्हते. त्यानंतर त्यांनी सोमवारी यासंदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेऊन सुमारे दीड तास त्यांच्याशी चर्चा केली.

    आपण नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन घेतले. नितीन गडकरी हे सुरुवातीपासून आपले मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेतली असे मुनगंटीवार म्हणाले.

    आपण कोणत्याही प्रकारे नाराज नाही. आपण कधीही नाराज असू शकत नाही. अनेक वर्ष आपण विरोधी पक्षांमध्ये होतो. त्यावेळी देखील आपण जनतेच्या हिताची कामे केली. आता आपण मंत्री नसलो तरी आमदार म्हणून जनतेच्या हितासाठी संसदीय आयुधांचा वापर करणार आहे. जनतेच्या सेवेचे व्रत आपण घेतले आहे, ते कायम सुरू राहणार असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी ठामपणे नमूद केले.

    पक्ष मोठा

    भारतीय जनता पार्टीचे आपण एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. याच जन्मात नव्हे तर पुढील अनेक जन्मातही आपण भाजपमध्ये असू. राष्ट्रसेवा करण्याची संधी आपल्याला भाजपनेच दिली. त्यामुळे पुढील रणनीती ही भाजपचा आमदार म्हणून जनसेवेची असेल.

    44 नागरिकांवर नळ कपातीची कारवाई

    मंत्री म्हणून आपण यापूर्वीही जनतेचीच कामे करीत होतो. आता आमदार म्हणूनही जनतेची कामे करताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

    पक्षाने आपल्याला वेगळी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याचे आपल्याकडून कळले आहे. त्यामुळे पक्ष देईल ती नवी जबाबदारी स्वीकारणार असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. विधिमंडळाशी संबंधित सर्व पुस्तकांचा पुन्हा आपण अभ्यास करणार आहे.

    संसदीय आयुधांचा वापर करीत आपण जनतेच्या सेवेचे कामे करणार असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून अशा प्रकारे वागणूक भाजपमध्ये दिली जात नाही. पक्षाने योग्य विचार करूनच काहीतरी निर्णय घेतला असेल असे देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

    प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपले नाव यादीत असल्याचे सांगितले होते. पण नंतर नाव नव्हते. असेही सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

    अधिवेशनाच्या (Winter Session) पहिल्या दिवशी सुधीर मुनगंटीवार हे कामकाजामध्ये उपस्थित नव्हते. त्यावर बोलताना ते म्हणाले की, पहिल्या दिवशी फार काही महत्त्वाचे कामकाज नव्हते. मंत्री म्हणून अनेक फाइल्स हाताळाव्या लागतात. अधिकाऱ्यांकडून चर्चेतील मुद्द्यांवर ब्रीफिंग केले जाते.

    आजचा कोणताही मुद्दा नव्हता. त्यामुळे आपण विधिमंडळात आलो नाही. आपण कोणत्याही परिस्थितीत नाराज नाही. आपण नाराज राहणारे व्यक्ती नाही असे मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा नमूद केले.

  • mobile apk file | ताबडतोब डिलिट करा या app

    mobile apk file

    mobile apk file सायबर गुन्ह्याच्या घटना दररोज उघडकीस येतात, ज्यामध्ये हॅकर्स नवीन मार्गाने लोकांची फसवणूक करतात. स्मार्टफोन यूजर्सच्या फोनमध्ये असे अनेक ॲप्स आहेत, जे वैयक्तिक माहिती चोरून हॅकर्सचे काम सोपे करतात. अश्या ॲप्स तात्काळ डिलीट करावीत.

    ॲप्सशिवाय स्मार्टफोन वापरणे हे फीचर फोन वापरण्यासारखे असेल. तथापि, आपण जाणूनबुजून किंवा नकळत असे अनेक धोकादायक ॲप्स आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करत असतो, ज्यामुळे आपल्याला मोठे नुकसान सहन करावे लागते.

    अलीकडच्या काळात सायबर गुन्ह्यांच्या घटना अनेक पटींनी वाढल्या आहेत. सायबर गुन्हेगारांपर्यंत आपली वैयक्तिक माहिती पोहोचणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. बऱ्याच ॲप्समध्ये मालवेअर असतात, जे तुमच्या स्मार्टफोनमधून तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील देखील चोरू शकतात.

    नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार असे अनेक लोन ॲप्स गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहेत. हे कर्ज ॲप लाखो वापरकर्त्यांनी जाणूनबुजून किंवा नकळत डाउनलोड केले होते. गुगल प्ले स्टोअरवर असलेले हे ॲप वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती जसे की नाव, पत्ता, फोन नंबर आणि बँक तपशील इत्यादी चोरत होते. याशिवाय अनेक फोटो एडिटिंग ॲप्समध्ये मालवेअरही आढळून आले आहेत, ज्याचा वापर करून हॅकर्स लोकांची फसवणूक करत होते.

    हे एप्स करा डिलिट

    तुम्ही तुमच्या फोनमध्ये थर्ड पार्टी ॲप्स इन्स्टॉल केले असतील तर ते लगेच डिलीट करा. थर्ड पार्टी ॲप्स Google Play Store च्या सुरक्षिततेला बायपास करतात, ज्यामुळे तुमची संवेदनशील माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचू शकते. थर्ड पार्टी ॲप्स हे ॲप्स आहेत जे तुम्ही Google Play Store वरून डाउनलोड केलेले नाहीत. वापरकर्ते ही ॲप्स कोणत्याही वेबसाइट, एपीके लिंक, व्हॉट्सॲप किंवा मेसेज लिंकवरून डाउनलोड करतात.

    कांद्याचा रस राखणार तुमच्या केसांची निगा

    फोनमध्ये असे ॲप्स इन्स्टॉल करण्यासाठी अननोन सोर्स ॲप इन्स्टॉलेशनचे फीचर इनेबल करावे लागेल. बरेच वापरकर्ते चुकून हे वैशिष्ट्य सक्षम करतात जेणेकरून ते त्यांच्या आवडीचे ॲप फोनवर डाउनलोड करू शकतात. अशा परिस्थितीत फोनवरील एक प्रकारची सुरक्षा ढाल तुटते आणि फोन हॅक होण्याचा धोका असतो.

    ही चूक करू नका

    अनेक कंपन्या तुमची वैयक्तिक माहिती जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्ता इत्यादी तत्काळ कर्जाच्या नावाखाली घेतात. चुकूनही असे इन्स्टंट लोन ॲप्स तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करू नका. अशा प्रकारे तुमची वैयक्तिक माहिती हॅकर्सच्या हाती पडू शकते.

    याशिवाय फोनवरील कोणत्याही ॲपला मायक्रोफोन, फोटो, फाइल्स, एसएमएस, लोकेशन, कॉल इत्यादीसाठी परवानगी देऊ नका. असे केल्याने, हे ॲप्स बॅकग्राउंडमध्येही तुमची वैयक्तिक माहिती चोरत राहतील आणि ती हॅकर्सला देत राहतील. अशा प्रकारे तुमची फसवणूक होऊ शकते.