Author: Admin

  • iPhone 16 |आयफोन झाला १६ हजार रुपये स्वस्त, कुठं मिळतेय हि ऑफर

    iPhone 16

    iPhone 16 : Apple हा एक प्रतिष्ठित टेक ब्रँड आहे जो वर्षातून फक्त एकदाच नवीन मोबाइल लॉन्च करतो, पण त्याच्या iPhones चे क्रेझ वर्षभर टिकून राहते. 2024 मध्ये कंपनीने आयफोन 16 लॉन्च केला होता, जो पॉवरफुल प्रोसेसर, प्रगत फीचर्स आणि AI तंत्रज्ञानासह सादर करण्यात आला. लॉन्चवेळी या आयफोन ची किंमत ₹79,900 होती, परंतु आता आयफोन 16 फक्त ₹63,999 मध्ये खरेदी करता येईल. आयफोन 16 वर तब्बल ₹15,901 पर्यंत सूट मिळणार आहे.

    HSRP नंबर प्लेट म्हणजे काय?


    सविस्तर माहिती म्हणजे, आयफोन 16 सवलतीच्या दरात Flipkart वर उपलब्ध होणार आहे. Flipkart वर “Monumental Sale” या सेलचा आयोजन करण्यात आला आहे ज्यामध्ये नवीनतम Apple आयफोन कमी दरात विकला जाईल. ही Monumental Sale 13 जानेवारीपासून सुरू होईल. विशेष म्हणजे Republic Day सेलच्या आधीच ग्राहकांना स्वस्त दरात मोबाइल खरेदी करण्याची संधी मिळणार आहे

    सर्वप्रथम सांगायचे झाले तर आयफोन16 भारतात 79,900 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. ही किंमत 128GB स्टोरेज मॉडेलसाठी होती.
    सेल दरम्यान iPhone 16 फक्त ₹63,999 मध्ये खरेदी करता येणार आहे.
    लॉन्च प्राइसच्या तुलनेत iPhone 16 ₹15,901 कमी दरात उपलब्ध होणार आहे.
    Flipkart च्या सेलमध्ये आयफोन 16 वर डिस्काउंटसह आकर्षक बँक ऑफर्स देखील मिळतील.
    HDFC बँकेच्या ग्राहकांना iPhone 16 खरेदीवर 10% सवलत मिळेल. ही सवलत क्रेडिट कार्ड पेमेंट आणि Easy EMI वर लागू होईल.
    सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नवीनतम आयफोन वर लॉन्चनंतर फक्त 4 महिन्यांतच इतका मोठा ऑफर मिळणे खरोखरच चकित करणारे आहे.

    https://youtu.be/GDlkCkcIqTs?si=SsnOCEERDP9rOde9

    आयफोन 16 चे फीचर्स

    डिस्प्ले:
    आयफोन 16 मध्ये 6.1-इंचाची Dynamic Island सुपर रेटिना XDR स्क्रीन आहे, जी OLED पॅनलवर आधारित आहे. या डिस्प्लेवर 2000nits ब्राइटनेस, HDR10, आणि Dolby Vision यांसारखे प्रगत फीचर्स दिले आहेत. फोनच्या स्क्रीनला Ceramic Shield Glass द्वारे संरक्षित केले गेले आहे.

    परफॉर्मन्स:
    iPhone 16 मध्ये नवीनतम iOS 18 ऑपरेटिंग सिस्टम आहे. प्रोसेसिंगसाठी यात Apple A18 Bionic चिपसेट वापरले गेले आहे. हा 6-कोर CPU आहे ज्यामध्ये 3.89GHz क्लॉक स्पीडचे 2 परफॉर्मन्स कोर आणि 2.2GHz क्लॉक स्पीडचे 4 एफिशियन्सी कोर आहेत. iPhone 16 चा CPU iPhone 15 च्या तुलनेत 40% जलद आणि 35% अधिक कार्यक्षम आहे.

    कॅमेरा:
    iPhone 16 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

    • मुख्य कॅमेरा: 48MP फ्यूजन सेन्सर, 26mm, f/1.6 अपर्चरसह.
    • दुसरा कॅमेरा: 12MP टेलीफोटो लेन्स, 120° फील्ड ऑफ व्ह्यू, f/1.6 अपर्चर.
      फ्रंट कॅमेरा: 12MP टेलीफोटो लेन्स, f/1.9 अपर्चरसह.
      iPhone 16 मध्ये नवीन डिझाइनसह एक कॅमेरा कंट्रोल बटण दिले आहे, जे अनेक कामांसाठी उपयुक्त आहे.

    बॅटरी:
    आयफोन 16 मध्ये 3,500mAh क्षमतेची बॅटरी आहे. ऍपलच्या मते, ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 22 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक आणि 80 तासांचा ऑडिओ प्लेबॅक देऊ शकते. यात 25W MagSafe वायरलेस चार्जिंग आणि 15W Qi वायरलेस चार्जिंगसुद्धा उपलब्ध आहे.

  • Devendra Fadnavis on Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार नाराज आहे का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात

    Devendra Fadnavis on Sudhir Mungantiwar

    Devendra Fadnavis on Sudhir Mungantiwar : विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला जनतेने बहुमताचा स्पष्ट कौल दिला, भाजप पक्ष या निवडणुकीत मोठा भाऊ ठरल्याने देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.

    त्यांनतर मंत्रिमंडळ विस्तराचा मुहूर्त पार पडला, भाजपने ऐनवेळी विधानसभा निवडणुकीत सातव्यांदा विजय प्राप्त करणारे सुधीर मुनगंटीवार यांचा पत्ता कट केला, यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते नाराज झाले.

    माता महाकाली मंदिर परिसराचा विकास पूर्णत्वास नेणार – मुख्यमंत्री फडणवीस

    राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाल्यावर पहिल्यांदा चंद्रपुरात त्यांचे आगमन झाले. राज्याचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रमासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार हे अनुपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांनी मुनगंटीवार नाराज आहे का? असा प्रश्न उपस्थित केल्यावर फडणवीस म्हणाले कि त्यांनी मला याबाबत संपर्क केला होता. त्यांची या कार्यक्रमाला येण्याची इच्छा होती मात्र त्यांचं वयक्तिक काम आल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही.

    तर दुसरीकडे मुनगंटीवार यांनी मुंबई येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली, यावेळी प्रसार माध्यमांनी चंद्रपुरातील कार्यक्रमाला आपण अनुपस्थित का आहे? असा प्रश्न विचारला. यावेळी मुनगंटीवार म्हणाले कि कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार जोरगेवार यांनी मला फोन केला होता मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे फोन काही उचलला गेला नाही.

    चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री पदावर असताना त्यांनी अनेक विकासात्मक कार्ये केली होती, मेडिकल कॉलेज, बॉटनिकल गार्डन यासह मोठे प्रकल्प जिल्ह्यात सुरु झाले. मात्र मंत्रिमंडळ विस्तार वेळी माशी कुठं शिंकली हे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

  • Devendra Fadnavis on Mahakali mandir | महाकाली मंदिर परिसर विकासाचा कार्यक्रम पुर्ण करु – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis on Mahakali mandir

    Devendra Fadnavis on Mahakali mandir :  मुख्यमंत्री झाल्या नंतर प्रथमच चंद्रपूर शहरात आलोय आणि या दौ-याची सुरवात माता महाकालीच्या दर्शनाने होणे हा शुभसंकेत आहे. काम करत असतांना शक्तीचा आर्शिवाद महत्वाचा आहे. मातेची ईच्छा असेल तर ठरविल्या पेक्षा मोठे काम इथे होणार, आपण पाठपूरावा करुन मंदिर परिसर विकासाचा कार्यक्रम पुर्ण करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    mahakali temple chandrapur

         मा. सां. कन्नमवार रौप्य महोत्सव कार्यक्रमा निमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शुक्रवारी चंद्रपूर दौ-यावर होते. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने महाकाली मंदिर येथे मुख्यमंत्री यांच्या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री यांनी माता महाकालीची आरती केली.

    सामान्य माणसांचा विकास हेच आपल्या सरकारचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष  हरीश शर्मा,  महानगर अध्यक्ष राहुल पावडे, नेते खुशाल बोंडे, विजय राऊत, कल्याणी किशोर जोरगेवार, संध्याताई गुरनुले, महिला अध्यक्ष सविता कांबळे, संजय कंचर्लावार, रघुवीर अहिर, मनोज पाल, सुभाष कासनगोट्टूवार, युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर, डॉ. मंगेश गुलवाडे, महामंत्री  किरण बुटले, संदीप आवारी, विवेक बोडे, दशरथ ठाकूर, नामदेव डाहुले, अमोल शेंडे, राशीद हुसेन, नकुल वासमवार, विश्वजीत शहा, जितेश कुळमेथे, 

    mahakali temple

    सलीम शेख, प्रकाश देवतळे,  सुमित बेल, रामपाल सिंग, दत्तप्रसाद महादानी,  महाकाली महोत्सव सामीचे सचिव अजय जयस्वाल, कोष्याध्यक्ष पवनजी सराफ, विश्वस्त मिलिंद गंपावर, प्रा. श्याम धोपटे, प्रा. शाम हेडाऊ, अशोक मते , संजय बुरघाटे, मनीषा पडगिलवार, डॉक्टर जयश्री कापसे गावंडे, वंदना हातगावकर, सायली तोंडरे, सविता दंडारे,  आशा महाकाले आदिंची उपस्थिती होती. यावेळी महाकाली मंदिर परिसरात भव्य स्वागत मंच उभारण्यात आला होता.

            येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमण होताच श्री महाकाली माता महोत्सव समिती आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, सामान्य मानसांचे जीवन सुखर होईल असे काम करण्याचा आशीर्वाद माता महाकालीला मागीतला आहे. महाराष्ट्र आणि सर्व समाज एकसंघ राहिला पाहिजे. समाजात काम करता असतांना शवेटचा माणूस डोळ्यासमोर राहिला पाहिजे. लाडक्या बहिणींचा आर्शिवाद आम्हाला मिळाला त्यातुन ऊर्जा मिळत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

      यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार (kishor jorgewar) म्हणाले कि, 500 वर्ष जुने अस इथ महाकालीचे मंदिर (mahakali mandir chandrapur) आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकला जात असतांना त्यांनी माता महाकालीचे दर्शन घेतले असल्याचे ईतिहासात नमुद आहे. येथील परिसराराचा विकास करण्यासाठी 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम आपण लवकर सुरु करण्याची मागणी त्यांनी यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. आमंत्रण स्वीकारून आपण आल्या बदलही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

    आपल्या नेतृत्वात राज्यासह चंद्रपूर जिल्हाचा सर्वसमावेशक विकास होईल असा विश्वास यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार (kishor jorgewar) यांनी व्यक्त केला. आपण चंद्रपूरचे भुमिपूत्र आहात त्यामुळे अधिक अपेक्षा या जिल्हाच्या आपल्याकडून असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी आणि श्री महाकाली माता सेवा समीतीच्या सदस्या आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शाल श्रिफळ, अम्मा टिफिन आणि सन्मानचिन्ह देत आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.

  • Devendra Fadnavis on chandrapur | सामान्य माणसांचा विकास हेच आपल्या सरकारचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis on chandrapur

    Devendra Fadnavis on chandrapur : तुलनेने अतिशय मागास असलेल्या कष्टकरी समाजात दादासाहेब कन्नमवार यांनी जन्म घेतला, मात्र स्वत:च्या मेहनतीवर त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले. दादासाहेब हे ध्येयवादी नेते होते. राज्याचा आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन ते संपूर्ण जीवन जगले. अशा नेत्यांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे, असे मनोगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी व्यक्त केले.

    प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे बेलार समाज संघटना व रौप्य महोत्सव समितीच्या वतीने आयेाजित कर्मवीर मा.सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय वडेट्टीवार तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, सुधाकर अडबाले, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, आयोजन समितीचे राहुल कन्नमवार, सुर्यकांत खनके आदी उपस्थित होते. (chandrapur news)

    आयुध निर्माणी चांदा येथे पदभरती

    लोकनेते दादासाहेब कन्नमवारांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आज येथे उपस्थित राहता आले, याचा अतिशय आनंद आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, दादासाहेब यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. भारत – चीन युध्दाच्या वेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना देशाच्या संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मा.सा. कन्नमवार यांनी राज्याची सुत्रे सांभाळली. या पदावर ते 1 वर्ष 4 महिने होते. युध्दाचा तो काळ होता. अशा परिस्थितीत आर्थिक सहाय्य करण्यासाठी दादासाहेबांनी जनतेला आवाहन केले. त्याकाळात चंद्रपूर जिल्ह्याने तसेच महाराष्ट्राने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशासाठी सोने-नाणे, आर्थिक मदत दान केली.

    शिक्षण आणि आरोग्य हे अतिशय महत्वाचे विषय आहेत. प्रत्येक गावात आरोग्य केंद्र असावे, असा सर्वप्रथम विचार कर्मवीर दादासाहेबांनी मांडला. तसेच शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी अनेकांना प्रेरीत केले. या राज्याच्या प्रगतीसाठी अतिशय मोठे योगदान दादासाहेबांनी दिले आहे. विधानसभेच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात येईल.

    chandrapur news

    पुढे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, (devendra fadnavis) सामान्य माणसांचा विकास करणे, हेच आपल्या सरकारचे सुध्दा ध्येय आहे. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करावे.  त्यामुळे जिल्ह्याच्या संदर्भात सर्व अडचणी सोडविण्यात येईल. तसेच ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत, त्यासुध्दा पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

    मा.सा. कन्नमवार यांच्याकडे विकासाची दृष्टी : सर्वसाधारण कुटुंबात जन्म घेतलेल्या मा.सा. कन्नमवार यांनी आपल्या कर्तृत्वाने शिखर गाठले. कर्मवीर दादासाहेबांना विकासाची दृष्टी होती. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन मुख्यमंत्री चंद्रपूर जिल्ह्याने दिले आहे. अनेक बाबतीत दादासाहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस (devendra fadnavis) यांच्यात साम्य असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुध्दा दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांच्या पुढाकारातूनच समृध्दी महामार्गाचा विस्तार चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

    तसेच चंद्रपूर येथे होत असलेल्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कॅन्सर रुग्णालयाकरीता 100 कोटींची आवश्यकता असून राज्य शासनाने सदर निधी द्यावा. जिल्ह्यातील धानोरा बॅरेज पूर्ण करावा. कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांची जयंती शासकीय स्तरावर जाहीर करावी. तसेच चंद्रपूरात 400 एकरवर 287 कोटी रुपये खर्च करून होत असलेला टायगर सफारी प्रकल्प मार्गी लावावा, अशा मागण्यासुध्दा आमदार श्री. जोरगेवार यांनी केल्या.

    अध्यक्षीय भाषणात आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, विहिरी आणि घरे बांधणा-या कष्टकरी समाजातून आलेले दादासाहेब हे राज्याच्या सर्वोच्च पदी पोहचले. चंद्रपूर आणि गडचिरोली या दुर्गम जिल्ह्यात त्यांनी अनेक विकासकामांची पायाभरणी केली. चंद्रपूर येथे होत असलेल्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे नाव द्यावे तसेच अल्प असलेल्या या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ निर्माण करावे, अशी मागणी त्यांनी केले.

    यावेळी मान्यवरांच्या हस्ते मा.सा. कन्नमवार गौरव स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे समाजातील डॉ. गजानन कोटेवार, प्रभा चिलखे, रुपेश कोकावार, देवराव कासटवार, गजानन चंदावार यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले.

    मुख्यमंत्र्यांनी घेतले माता महाकालीचे दर्शन : चंद्रपूर दौऱ्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेतले व मंदिरात महाआरती केली. मंदिर विकासासंदर्भात बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, ठरविल्याप्रमाणे निश्चितपणे मंदिर परिसराच्या विकासाचे चांगले काम याठिकाणी होईल. तसेच पाठपुरावा करून मंदिर परिसर विकासाचा कार्यक्रम करण्यात येईल.

  • chandrapur jobs | आयुध निर्माणी चांदा येथे २०७ जागांची पदभरती

    chandrapur jobs

    chandrapur jobs : आयुध निर्माणी चांदा येथे डेंजर बिल्डींग वर्कर च्या २०७ पदाची पदभरती निघाली आहे. पदभरती मध्ये अर्ज करण्याची पद्धत हि ऑफलाईन असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.

    दुर्गापूर पोलिसांनी पकडला एमडी

    •  पदाचे नाव: डेंजर बिल्डिंग वर्कर.
    • ⇒ एकूण रिक्त पदे: 207 पदे.
    • ⇒ नोकरी ठिकाण: चंद्रपूर.
    • ⇒ शैक्षणिक पात्रता: NAC/NTC प्रमाणपत्र.
    • ⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु.19900 + DA/-.
    • ⇒ वयोमर्यादा: 18 – 35 वर्षे.
    • ⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
    • ⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 04 जानेवारी 2025.
    • ⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2025.
    • ⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: मुख्य (आनंद सिंग) जे.टी. मुख्य महाव्यवस्थापकांसाठी महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा (ofc chanda), ए युनिट ऑफ म्युनिशन इंडिया लिमिटेड, जिल्हा – चंद्रपूर (एमएस), पिन – 4425O1.

    गरजू उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा..

  • khashaba jadhav | ऑलिम्पिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार

    khashaba jadhav

    khashaba jadhav : शासन निर्देशान्वये 15 जानेवारी हा दिवस ऑलिम्पिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. दिवगंत खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा हेलसिंकी 1952 मध्ये वैयक्तीक क्रीडा प्रकारातील कुस्ती क्रीडा प्रकारात पहिले पदक (कास्य) पटकावून देशाच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे.

    त्यांची आतंरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी राज्याला बहुमान तसेच नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन (State Sports Day) म्हणून साजरा करण्यात येत आहे. याकरीता विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे.

    चंद्रपूर शहरातील हा मुख्य मार्ग राहणार

    ऑलिम्पिकवीर दिवंगत खाशाबा जाधव (khashaba jadhav) यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात यावे. क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी रॅली/ मॅराथॉन स्पर्धांचे आयोजन करावे. शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध खेळा संदर्भात नियमावली, ऑलिम्पिक तसेच अन्य महत्वाच्या स्पर्धा व त्यामधील यशस्वी खेळाडू याबाबत प्राथमिक माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करावे.

    तसेच शालेय विद्यार्थ्यांचा नामवंत खेळाडूंसोबत संवादाचे आयोजन करावे. विविध खेळांचे सामने आयोजित करुन विजेत्यांना पुरस्कार वितरण करावे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, क्रीडा क्षेत्रातील यशवंत खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, नवोदित खेळाडू, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी, पालक, क्रीडाप्रेमी नागरीक यांच्यासमवेत क्रीडा तसेच करीअर संधीबाबत परीसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करावे. यशस्वी क्रीडा विषय, उपक्रम, क्रीडा अकादमींना भेटी देणे आदी उपक्रम राबविण्यात यावे.

    जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासनमान्य, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, क्रीडा संस्था, असोसिएशन, क्रीडामंडळे, क्रीडा अकादमी तसेच अनुदान मिळालेल्या सर्व संस्थांनी राज्य क्रीडा दिनाचे आयोजन करून राज्य क्रीडा दिनाचा अहवाल, फोटो, वृत्तपत्राच्या कात्रणासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

  • road accident today | कामाला जायला निघाला आणि वाटेतचं….

    road accident today

    road accident today : ब्रम्हपुरी-नागभीड मार्गावरील उराडे राईस मिलजवळ 8 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता ट्रक आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत व्यक्तीचे नाव गणेश तुपट आहे.

    मृत व्यक्तीची माहिती:
    गणेश मंसाराम तुपट (वय 23) हा ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापुर येथील रहिवासी होता. तो आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता व रामदेवबाबा साल्वंट उदापुर येथे काम करत होता.

    चंद्रपुरातील मुख्य मार्ग राहणार बंद, कारण काय?

    दुर्घटनेचा तपशील:
    8 जानेवारीच्या सकाळी गणेश आपली मोटरसायकल (क्रमांक एमएच 34 बीसी 8429) घेऊन कामासाठी रामदेवबाबा साल्वंटकडे जात असताना नागभीडहून ब्रम्हपुरीकडे येणाऱ्या ट्रक (क्रमांक एमएच 31 एफसी 3729) सोबत समोरासमोर धडक झाली. (Accident news today)

    दुपारी 12 वाजता गणेशच्या चुलत भावाने श्रीहरी मुरलीधर तुपट यांना या अपघाताबद्दल माहिती दिली. श्रीहरी घटनास्थळी पोहोचले व गणेशला ब्रम्हपुरीच्या सरकारी रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

    दुर्गापूर पोलिसांनी पकडला एमडी ड्रग्स

    पोलिस कार्यवाही:
    या घटनेनंतर श्रीहरी यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आधारे पोलीसांनी ट्रक चालकाविरुद्ध मोटर वाहन कायदा 1988 च्या कलम 184, 281, 106 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पीएसआय बालाजी चौहान करत आहेत.

  • Chandrapur Road | महत्वाची सूचना – चंद्रपुरातील हा मुख्य मार्ग राहणार बंद

    Chandrapur Road

    Chandrapur Road : माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रम 10 जानेवारीला चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित केला गेला असून कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis) यांची उपस्थिती राहणार आहे.

    दुर्गापूर पोलिसांनी पकडला एमडी

    याकरिता कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशावर प्रियदर्शिनी चौक ते वरोरा नाका चौकमार्गावरील सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे सोबतच सदर मार्गावर नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन म्हणून सदर कालावधीसाठी घोषित करण्यात येत आहे.

    या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना रहदारीसाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने पर्यायी मार्ग सुचवला आहे.

    कार्यक्रम कालावधीत नागरिकांनी नागपूर कडून चंद्रपूर शहराकडे जाणारी वाहने वरोरा नाका-उड्डाणपूल, सिद्धार्थ हॉटेल, बस स्टॅण्ड, प्रियदर्शिनी चौक मार्गे किंवा मित्र नगर चौक, संत कंवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश दिला जाणार.


    चंद्रपूर शहरातून बाहेर जाण्यासाठी नागरिकांनी जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, बस स्टॅण्ड चौक, सिद्धार्थ हॉटेल, उड्डाणपूल वरोरा नाका मार्गे किंवा संत कंवलराम चौक, मित्र नगर चौक मार्गे शहराबाहेर जातील.
    नागरिकांनी या कालावधीत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक व वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.

  • Forest Minister Ganesh Naik | मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच निघणार – वनमंत्री गणेश नाईक

    Forest Minister Ganesh Naik

    Forest Minister Ganesh Naik : संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर स्थानिक पातळीवरील वन्यप्राण्यांच्या मुबलक संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना’ या विषयावर भारतातील पहिली परिषद चंद्रपुरात होत आहे. याचा अतिशय आनंद आहे. केंद्र सरकार आणि विविध राज्यातील अनेक तज्ज्ञांनी या संवेदनशील विषयावर येथे चिंतन आाणि मंथन केले. चंद्रपूर येथे तत्ज्ञांच्या निष्कर्षातून निघालेल्या सकारात्मक उपाययोजनेतूनच मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग निघेल, असा विश्वास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (forest minister ganesh naik) यांनी व्यक्त केला.

    वन अकादमी येथे ‘वाईल्डकॉन – 2025’ या दोन दिवसीय परिषदेचा समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (व्यवस्थापन) एम.एस.राव, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी, चंद्रपुरचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, शोभा फडणवीस आदी उपस्थित होते.

    दुर्गापूर पोलिसांनी पकडला एमडी पावडर, 3 आरोपीना अटक

    मानवाने प्राण्यांच्या जागेत अतिक्रमण केले, की प्राण्यांनी आपल्या जागेत अतिक्रमण केले, हा संशोधनाचा विषय आहे, असे सांगून वनमंत्री श्री. नाईक म्हणाले, वन्यप्राण्यांची लोकसंख्या वाढली आहे, हे सत्य आहे. तसेच आपल्याकडे मानवी लोकसंख्या प्रचंड वाढली असून जमीन मात्र मर्यादीतच आहे. शिवाय वनांच्या क्षेत्रामधून विकास कामे होत आहे. त्यामुळे प्राण्यांच्या अधिवासाची जागा कमी झाली आहे. त्यामुळेच मानव – वन्यजीव संघर्षात वाढ झाल्याचे निदर्शनास येते. माणूस आणि वन्यजीव सुद्धा जगले पाहिजे. त्यामुळे या विषयावर इतर देशांनी काय उपाययोजना केल्यात, त्याचा वरिष्ठ वन अधिका-यांनी अभ्यास करावा. (Human Wildlife Conflict)

    wildcon program

    वनविभागात प्रत्येक क्षेत्रीय विभागानुसार किती अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे, त्याचा अहवाल सादर करावा. चंद्रपुरातील टायगर सफारी प्रकल्पाला अतिक गतीने समोर नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांसाठी ताडोबा सफारीचे शुल्क कमी करता येईल का, याचे अधिका-यांनी नियोजन करावे. चंद्रपूर येथे दोन दिवसीय चर्चासत्रात मांडण्यात आलेल्या प्रत्येक समस्या सोडविण्यात येतील. निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. यावेळी त्यांनी बांबू पासून बनविलेल्या वस्तुंच्या प्रदर्शनीची पाहणी केली.

    वन्यजीव पर्यटनाचा फायदा स्थानिकांना व्हावा – आमदार किशोर जोरगेवार

    सरकारच्या कार्यकाळाच्या सुरवातीला आणि नवीन वर्षाच्याही सुरवातीलाच या संवेदनशील विषयावरची पहिली परिषद चंद्रपुरात होत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. वन्यजीवांची लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे नागरी जीवनात त्यांचे आगमन होत आहे. मानवजीव हा सर्वात महत्वाचा आहे, मानवाचा जीव वाचविणे आवश्यक आहे. वन्यजीवांमुळेच चंद्रपूरच्या पर्यटनात वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिकांना त्याचा अधिक फायदा व्हावा. कारण वाईल्ड लाईफ पर्यटन हा लोकांना आनंद देणारा व्यवसाय आहे. त्यातून रोजगारनिर्मिती होण्यास मदत मिळेल. तसेच स्थानिक लोकांसाठी सफारीचे शुल्क कमी करावे, अशी मागणी श्री. जोरगेवार ( mla kishor jorgewar) यांनी केली.

    यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता बिस्वास म्हणाल्या, या दोन दिवसांत महत्वाची चर्चा झाली आहे. स्थानिक स्थरावर फॉरेस्टगार्डला मदतनिसाची गरज असल्याने विभागासाठी नवीन मनुष्यबळ आवश्यक आहे. तर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विवेक खांडेकर म्हणाले, मानव – वन्यजीव संघर्षाचे व्यवस्थापन करणे, संघर्ष कमी करून दोघांनाही वाचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने या परिषदेच्या माध्यमातून पहिले पाऊल चंद्रपुरात टाकण्यात आले आहे. तसेच 20 जिल्ह्यात रॅपीड रेस्क्यू टीमची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

    प्रास्ताविकात क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर म्हणाले, संरक्षित क्षेत्राच्या बाहेर मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आयोजित या दोन दिवसीय परिषदेत नवीन बाबी, नाविण्यपूर्ण माहिती समोर आल्या. याबाबतचा अहवाल शासनाला सादर करून वन्यजीव संरक्षण कसे करावे, याचे नियोजन करण्यात येईल.

    कार्यक्रमाचे संचालन श्रेया खांडीलकर यांनी तर आभार उपसंचालक (बफर) पियुषा जगताप यांनी मानले. दोन दिवसीय परिषदेत केंद्र सरकारचे वन्यजीव या विषयावरील वैज्ञानिक सल्लागार, विविध राज्यातील व्याघ्र प्रकल्पाचे संचालक, राज्यातील उपवनसंरक्षक, पर्यावरणतज्ज्ञ, वन्यजीव विषयावर काम करणा-या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, वरिष्ठ वन अधिकारी आदी सहभागी झाले होते.

  • mephedrone drug | दुर्गापूर पोलिसांनी पकडला एमडी

    mephedrone drug

    mephedrone drug : चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याने युवा वर्ग नशेच्या आहारी जात असून सोबतच गुन्हेगारी क्षेत्रात आपलं नाव मोठं करीत आहे.


    इंजेक्शन, सिगारेट द्वारे युवा वर्ग अंमली पदार्थांचे सेवन करीत आहे. बाबूपेठ, बगड खिडकी, बिनबा गेट असे शहरातील अनेक भाग आहे, ज्याठिकाणी अंमली पदार्थांची विक्री होते.

    तन्मय च्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या, बाबूपेठ वासीयांचा कँडल मार्च


    चंद्रपूर पोलिसांनी नशेचा व्यापार नियंत्रणात यावा यासाठी मोहीम राबवित आहे. दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही युवक अंमली पदार्थांची विक्री करणार अशी गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागली होती, माहितीच्या आधारे 7 जानेवारीला वृंदावन नगर येथे पोलिसांनी सापळा रचला, यावेळी दोन युवक एमडी मफेड्रोन (mephedrone drug) पावडर सोबत घेऊन आले.


    युवक येताच दुर्गापूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले, गणेश सदानंद देवगडे, शेख नदीम शेख रहीम यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ प्लॅस्टिक च्या पन्नी मध्ये एमडी मफेड्रोन पावडर 7.330 ग्राम किंमत 27 हजार 320 व दुचाकी वाहन किंमत 60 हजार असा एकूण 87 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    आरोपी युवकांवर दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये कलम 8 (क), 21(ब), 29 NDPS ऍक्ट 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


    सदर अंमली पदार्थ आरोपी युवकांनी नागपुरातून आणले असल्याची कबुली दिली त्यानंतर दुर्गापूर पोलिसांनी नियोजनबद्ध कामगिरी करीत नागपुरातून एका आरोपीला अटक केली असून या प्रकरणी आरोपीची संख्या आता 3 झाली आहे.

    दुर्गापूर पोलिसांनी (durgapur police station) थेट नागपूर येथील आरोपीला अटक केल्याने अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे, दुर्गापूर पोलिसांनी हिम्मत दाखवीत कारवाई केली पण इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुद्धा अंमली पदार्थांची विक्री होत आहे, आता त्यांनी सुद्धा हिंमत दाखवीत नशेचा व्यापार संपुष्टात आणावा.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वात पोउपनी गिरीश मोहतुरे, पोलीस कर्मचारी योगेश शार्दूल, रुपेश सावे, संपत पुल्लीपाका, मंगेश शेंडे, प्रमोद डोंगरे, किशोर वलके, नरेश शेंडे यांनी केली.