Author: Admin

  • how to reduce road accidents । रस्ते अपघात कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा – खासदार प्रतिभा धानोरकर

    how to reduce road accidents

    how to reduce road accidents : रस्ते अपघात किंवा त्यात होणारे मृत्यु हा अतिशय गंभीर विषय आहे. हे अपघात कमी करायचे असले तर रस्त्यावरील खड्डे बुजविणे, रस्त्यावर असणा-या अवैध पार्किंगला आळा घालणे, नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक तथा कायदेशीर कारवाई करणे आदी बाबींसह आवश्यक उपाययोजना त्वरीत कराव्यात, अशा सुचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्या.

    नियोजन सभागृह येथे संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, परिविक्षाधीन पोलिस अधिकारी अनिकेत हिरडे आदी उपस्थित होते.

    कार्यकर्त्याच्या घरी खासदारांनी घेतला भोजनाचा आस्वाद

    यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, रस्त्यावर ठिकठिकाणी असलेले खड्डे तात्काळ बुजवावे, जेणेकरून अपघात होणार नाही. संबंधित यंत्रणेला याबाबत जिल्हा प्रशासनाने पत्र देऊन निर्देश द्यावेत. जड वाहनांतून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. या वाहनांवर ताडपत्री झाकणे आवश्यक आहे. मात्र अजूनही काही वाहने विना ताडपत्री वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वाहनांवर तात्काळ कारवाई करावी. शहरात मोठ्या प्रमाणात खाजगी ट्रॅव्हल्स रस्त्यावर उभ्या राहतात. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतो. अशा ट्रॅव्हल्सधारकांवर कारवाई करावी. road safety

    शहरातील ज्या हॉटेलमालकांकडे पुरेशी पार्किंग व्यवस्था नसेल, त्यांना जिल्हा प्रशासनाने नोटीस द्यावी. हॉटेलमालकांनी आपल्या ग्राहकांसाठी पर्यायी पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. जेणेकरून रस्त्यावर वाहने उभी राहणार नाहीत. महामार्गावर वेग मर्यादेचे ठळक अक्षरात फलक लावावेत. सर्व शासकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांना हेल्मेटसक्ती करावी. विद्यार्थ्यांना वाहतुकीचा नवीन परवाना देण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर मोहीम सुरू करून वाहतुकीच्या नियमांबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, अशा सुचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्या. यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. (how to reduce road accidents)

    या विषयांवर झाली चर्चा : संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या गत बैठकीचे इतिवृत्त, सन 2023-24 मधील अपघाताची तुलनात्मक माहिती, रस्ता सुरक्षा अभियान – 2025 अंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन करणे, रस्ता सुरक्षा विषयक विशेष तपासणी मोहीम कार्यवाही तिव्रता वाढविणे, अपघातप्रसंगी मदत करणा-या जिल्ह्यातील जीवनदुतांचा सन्मान आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

    यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सादरीकरण केले. बैठकीला अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, वाहतूक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  • flipkart monumental sale । आजपासून फ्लिपकार्टच्या नव्या सेलची सुरुवात

    flipkart monumental sale

    flipkart monumental sale : Flipkart ने Monumental Sale ची घोषणा केली असून ही सेल 13 जानेवारी दुपारी 12 वाजता सुरू होईल. मात्र, प्लस मेंबर्स आणि VIP मेंबर्सना या सेलचा ऍक्सेस 12 तास आधी मिळेल. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, होम अप्लायन्सेस, स्मार्टवॉचेस आणि इतर गॅजेट्सवर मोठ्या सवलती दिल्या जात आहेत. Flipkart Monumental Sale दरम्यान मिळणाऱ्या सर्वोत्तम ऑफर्सची सविस्तर माहिती येथे दिली आहे.

    आयफोन झाला १ ६ हजार रुपये स्वस्त

    ही सेल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली एक मोठी सेल आहे. जास्तीत जास्त सवलत मिळवण्यासाठी ग्राहक बँक ऑफर्स वापरू शकतात. HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रान्झॅक्शन्सवर 10% त्वरित सूट मिळेल.

    सेलमधील मुख्य ऑफर्स:

    कॅमेरे:

    • Canon DSLR आणि मिररलेस कॅमेरे ₹25,900 पासून सुरू होतील.

    लॅपटॉप्स आणि अॅक्सेसरीज:

    • लॅपटॉप अॅक्सेसरीज फक्त ₹99 पासून उपलब्ध.
    • गेमिंग लॅपटॉप्स ₹45,990 पासून सुरू होतील.
    • बेस्ट सेलिंग लॅपटॉप्स ₹10,990 पासून मिळतील.

    टीव्ही आणि अप्लायन्सेस:

    • 4K आणि QLED टीव्ही ₹15,999 पासून.
    • वॉशिंग मशीन ₹6,790 पासून उपलब्ध.
    • वॉटर प्युरिफायर्स ₹6,999 मध्ये खरेदी करता येतील.

    स्मार्टवॉचेस आणि पॉवरबँक्स:

    • टॉप स्मार्टवॉचेस ₹899 पासून सुरू होतील.
    • पॉवरबँक्सवर 50% पर्यंत सूट मिळेल.
    • चार्जर्सवर 70% पर्यंत सूट दिली जाईल.

    फ्लिपकार्ट ओरिजिनल्स:

    • Flipkart Originals डिव्हायसेसवर मोठ्या सवलती दिल्या जात आहेत.
    • टीव्ही ₹7,099 पासून सुरू होतील.

    ही संधी गमावू नका! फ्लिपकार्ट Monumental Sale मध्ये इलेक्ट्रॉनिक्स, अप्लायन्सेस आणि इतर उत्पादनांवर जबरदस्त ऑफर्स मिळवा!

  • Member of parliament | ग्रामीण भागातील जनतेशी माझी नाळ तुटणार नाही. – खासदार प्रतिभा धानोरकर

    Member of parliament

    Member of parliament : लोकसभेच्या अभुतपुर्व यशानंतर अनेक गावात माझ्या भेटी झाल्या नाहीत परंतु ग्रामीण भागातील जनतेशी माझी नाळ तुटणार नाही याचा मी प्रयत्न करणार असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील गावांमध्ये मी दौरा करुन तेथील समस्यांचा आढावा घेणार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बल्लापूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील दौऱ्या दरम्यान मत व्यक्त केले.

    चंद्रपुरात आला कुख्यात गुन्हेगार, मार्केट मध्ये गेला आणि अडकला

    स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनानंतर प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. प्रचंड मोठे असलेल्या या लोकसभा क्षेत्राचा दौरा कार्यक्रम खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुरु केला असून दि. 11 जानेवारी रोजी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कोठारी, कवडजई, मानोरा, ईटोली, किन्ही, बामणी, विसापूर, नांदगाव पोडे या गावातील नागरीकांशी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गावातील समस्या जाणून घेतल्या. (mp dhanorkar)

    या दौऱ्या दरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, लोकसभा क्षेत्रातील नागरीकांच्या प्रेमामूळे आज मी देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची मला संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमाची मी सदैव ऋणी राहणार आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या प्रत्येक समस्या सोडविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. यावेळी त्यांनी प्रत्येक गावातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून कॉग्रेस पक्षाच्या संघटन मजबूत करण्याच्या सुचना दिल्या.

    mp dhanorkar

    या दौऱ्या दरम्यान ईटोली येथे सामान्य कार्यकर्त्याच्या घरी पंगतीत बसून भोजनाचा आस्वाद घेतल्याने गावकऱ्यांनी खासदाराप्रती आदर निर्माण झाला. तसेच दौऱ्या दरम्यान अनेक ठिकाणी खासदार धानोरकर यांनी शाळकरी मुलांशी, तसेच जेष्ठ नागरीकांशी देखील संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत बल्लारपूर नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, बल्लारपूर ग्रामीण चे तालुकाध्यक्ष गोविंदा उपरे यांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

  • Most Wanted Criminal । चंद्रपुरात आला कुख्यात गुन्हेगार

    Most Wanted Criminal

    Most Wanted Criminal : वर्ष २ ० २ ३ मध्ये पंजाब राज्यातील अमृतसर येथे पोलीस चौकीवर हॅन्ड ग्रेनेड टाकत हल्ला करणाऱ्या २ ० वर्षीय जसप्रीत सिंग या संशयित खलिस्तानी (khalistani) दहशतवाद्याला पंजाब राज्यातील गुप्तचर यंत्रणा व स्थानिक पोलिसांनी घुग्गुस मधून शुक्रवारी १ ० जानेवारीला अटक केली.

    जसप्रीत सिंग सहा दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्यात दाखल झाला होता, जसप्रीतचा अंमली पदार्थ तस्करी व बाईक चोरी यासह विविध अवैध धंद्यात सहभाग होता, २ ० २ ३ ला अमृतसर येथील पोलीस चौकीवर हॅन्ड ग्रेनेड फेकत त्याने हल्ला केला तेव्हापासून जसप्रीत हा फरार होता. महाराष्ट्र राज्यात येण्यापूर्वी तो मेघालय मध्ये गेला होता, पंजाब राज्यातील गुप्तचर यंत्रणा त्याच्या मागावर होती.

    वनविभागाने जखमी वाघाला केले जेरबंद

    जसप्रीत च्या फोन लोकेशन वरून त्याची माहिती पोलीस घेत होते, यादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे सहा दिवसांपूर्वी जसप्रीत आपल्या ओळखीच्या लोकांकडे आला होता, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने त्याचे फोटो जारी केले होते, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात आलेला व्यक्ती हा जसप्रीत सिंग आहे का याबाबत पोलिसांना शहानिशा होत नव्हती.

    अश्यातच गुरुवारी जसप्रीत हा घुग्गुस येथील सुपर मार्केट मध्ये खरेदी करण्यासाठी आला त्यावेळी पंजाब मधील जसप्रीत सिग हा तोच आरोपी असल्याचे सिद्ध होताच गुप्तचर यंत्रणा व स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचत अटक करण्यात आली.

  • Tiger attack wounds । जखमी T – १ ० ० अखेर वाघ जेरबंद

    Tiger attack wounds

    Tiger attack wounds : ४ जानेवारीला ब्रह्मपुरी वनविभागातील नागभीड वनपरिक्षेत्रातील मींडाळा मध्ये २ नर वाघांमध्ये झुंज झाली, या झुंजीत T- १ ० ० वाघाच्या समोरील पायाला गंभीर जखम झाली तर दुसऱ्या वाघाला मानेवर, पाठीवर व पायावर जखमा झाल्या. वाघ झुंजीत जखमी झाल्याने दोन्ही वाघाला उपचाराची आवश्यकता असल्याने दोघांनाही जेरबंद करण्याची कारवाई वनविभागातर्फे सुरु होती.

    चंद्रपुरातील मंदिर असुरक्षित, तिरुपती बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा

    वनविभागाच्या मोहिमेदरम्यान १ ० जानेवारीला T – १ ० ० नर वाघाने कोसंबी गवळी नियतक्षेत्रातील मौजा पारडी येथील रहिवासी गुरुदेव पुरुषोत्तम सारवे यांच्यावर हल्ला करून जखमी केले. त्यांनतर वाघाचे वास्तव्य शेतशिवारात कायम होते सोबतच वाघ जखमी असल्याने तो शिकार करू शकत नव्हता. सदर बाब वनविभागाच्या लक्षात आली. १ २ जानेवारीला कोसंबी गवळी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक १ १ ० मध्ये वनविभागाने बचाव मोहीम राबवित सकाळी सदर जखमी वाघाला डार्ट केले. बेशुद्ध झाल्यावर जखमी वाघाला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केले. (Tiger injured)

    जेरबंद करण्यात आलेल्या T-१ ० ० वाघाचे वय अंदाजे १ ० वर्षे असून त्याला पुढील वैद्यकीय उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे.

    वाघाच्या हि बचाव मोहीम वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण कन्नमवार, वैद्यकीय अधिकारी डॉ रविकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे, राकेश अहुजा यांनी यशस्वीपणे राबवली.

  • tirupati balaji Temple in chandrapur | चंद्रपुरात आता मंदिर असुरक्षित

    tirupati balaji Temple in chandrapur

    tirupati balaji Temple in chandrapur : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.
    घरफोडी नंतर अज्ञात चोर दुकानाला टार्गेट करू लागले आहे, चोर आता इतक्यावर थांबले नसून त्यांनी थेट मंदिराला टार्गेट केल्याचा प्रकार उघडकीस आला असून शहरातील दाताला मार्गावरील तिरुपती बालाजी मंदिरात अज्ञात चोरांनी सशस्त्र दरोडा टाकला.

    सदर घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला, विशेष म्हणजे अज्ञात चोरांनी बंदुकीचा धाक दाखवीत पुजाऱ्याचे दोन्ही हात बांधत मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडत त्यामधील लाखो रुपये घेऊन पसार झाले.
    तिरुपती बालाजी मंदिर परिसरातील इतर मंदिर फोडण्याचा प्रयत्न यावेळी झाला मात्र कुलूप न तुटल्याने चोरांनी तिथून पळ काढला. (Chandrapur crime)

    रात्री 2 वाजता सुरक्षा रक्षकाला सदर बाब निदर्शनास आल्यावर घटनेची माहिती इतरांना देत बंधक असलेल्या पुजाऱ्याची सुटका करीत पोलिसांना चोरी प्रकरणाची माहिती दिली.

    अंमलीपदार्थ तस्करी मोडून काढा – आमदार जोरगेवार

    दाताला मार्गावर स्थित तिरुपती बालाजी मंदिर संचालित करणाऱ्या ट्रस्ट चे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलीया आहे, नुकताच या मंदिरात ब्रम्होत्सव सोहळा संपन्न झाला होता.

    आधी रेकी मग चोरी

    शनिवारी रात्री एक इसम या मंदिरात आला, त्याने मंदिर परिसराची पूर्ण पाहणी करीत रेकी केली होती, त्यानंतर मध्यरात्री 7 ते 8 इसम सशस्त्र मंदिरात दाखल झाले, मंदिरात लागून असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कापड टाकून त्यांनी दरोडा टाकला.
    रामनगर पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहे.

  • BJP convention shirdi | भाजपचे महाधिवेशन, चंद्रपुरातील कार्यकर्ते शिर्डीला रवाना

    BJP convention shirdi

    BJP convention shirdi : शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र महाअधिवेशन होणार असून, आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरमधील भारतीय जनता पक्षाचे शेकडो कार्यकर्ते शिर्डीकडे रवाना झाले आहेत. या प्रवासासाठी पाच बस आणि चारचाकी वाहने यांचा वापर करण्यात आला असून, सर्व कार्यकर्ते शिर्डीत दाखल होणार आहेत.

    अंमली पदार्थ विरोधात आमदार आक्रमक

      रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या महाअधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. चंद्रपूरमधील कार्यकर्त्यांनी प्रचंड ऊर्जा, राष्ट्रसेवेची बांधिलकी आणि दृढ संकल्पाने या प्रवासाला सुरुवात केली आहे. या प्रवासात महिला, पुरुष, युवा, तसेच वरिष्ठ कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. शिस्तबद्ध संघटन, देशसेवा, आणि एकात्मतेच्या भावनेने प्रेरित हे कार्यकर्ते शिर्डीकडे मार्गक्रमण करत आहेत. (Bjp chandrapur)

    महाअधिवेशनात पक्षाच्या धोरणांचा आढावा घेऊन आगामी दिशा ठरवली जाणार आहे. यामध्ये कार्यकर्त्यांसाठी संघटनात्मक बळकटीवर मार्गदर्शन, आगामी निवडणुकांसाठी रणनीती ठरवणे, तसेच जनतेपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी नव्या उपक्रमांची चर्चा होणार आहे.

    चंद्रपुरातील मालमत्ता धारकांना सवलत जाहीर

    चंद्रपूर मतदारसंघातील कार्यकर्ते पक्षाच्या उद्दिष्टांसाठी सतत तत्पर असतात आणि त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे पक्षसंघटना अधिक बळकट होत आहे. “या महाअधिवेशनातून नव्या दिशा मिळतील असे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले आहे.

  • Property tax exemption | चंद्रपूर मनपातर्फे मालमत्ता धारकांना सवलत जाहीर

    Property tax exemption

    Property tax exemption : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्याना शास्तीत सवलत देण्यात येत असुन २ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकास ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास ५० टक्के तसेच ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास ४५ टक्के शास्तीत सवलत देण्यात येत आहे.

    अंमली पदार्थ विरोधात आमदार जोरगेवार यांनी ठोकला शड्डू


       त्याचप्रमाणे १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च पर्यंत थकबाकीसह पूर्णत कराचा भरणा करण्याऱ्या मालमत्ता धारकांना ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास २५ टक्के तसेच ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास २२ टक्के शास्तीत सूट देण्यात येणार आहे. तसेच सन २०२४-२०२५ या वर्षामध्ये माहे डिसेंबर २०२४ पर्यंत ज्या मालमत्ता धारकांनी शास्तीचा भरणा केलेला आहे त्यांचे ५० टक्के शास्तीची रक्कम पुढील आर्थिक वर्षात समायोजित करण्यात येणार आहे. (Cmc chandrapur)


       महापालिका क्षेत्रात ८० हजाराहुन अधिक मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करण्यात येते. कर न भरल्यास दंड वसुली तसेच प्रसंगी मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.


        चंद्रपूर महानगरपालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढुन कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर किरकोळ खर्च पालिकेला स्वतःच्या उत्पन्नातून भागविण्याचे दृष्टीने मालमत्ता कराची वसुली नियमित व प्रभावी होण्याकरीता शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये सुधारणा करून विहित कालावधीनंतर शास्ती लागु करण्याची तरतूद केलेली आहे. अश्या प्रकारे लागु होणाऱ्या शास्तीमध्ये पुर्णतः किंवा अंशतः सूट देण्याचे अधिकारी महानगरपालीकेस आहेत.


        मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीकरीता व संभाव्य उद्दिष्ट पूर्ती करीता मनपातर्फे शास्तीत सवलत जाहीर करण्यात आली आहे. या शास्ती माफीचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • kishor jorgewar on Drugs । अंमली पदार्थविरोधात आमदार जोरगेवार यांनी ठोकला शड्डू

    kishor jorgewar on Drugs

    kishor jorgewar on Drugs : नशेत असलेल्या चार युवकांनी तन्मय खान यांची हत्या केली. हे सर्व युवक अल्पवयीन आहेत. त्यांच्या हातात अमली पदार्थ कसे पोहोचले, असा प्रश्न उपस्थित करत, अमली पदार्थ विक्रीची पायमुळे शोधून काढत विक्रेत्यांचा कायमचा बंदोबस्त करा, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांना दिल्या आहेत.

      चार युवकांनी मिळून बाबूपेठ येथील रहिवासी तन्मय खान यांची हत्या केल्याची घटना गौतम नगर परिसरात घडली होती. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, आरोपी नशेत असल्याचे उघड झाल्याने गांजा, ड्रग्जसारख्या अमली पदार्थांच्या विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    चंद्रपूर युवासेना कॉलेज कक्ष पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

      दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी तन्मय खान (tanmay khan) यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, शांतप्रिय चंद्रपूर जिल्ह्यासाठी अशा घटना अत्यंत घातक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदारांनी शहर पोलिस ठाण्याच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बाबूपेठ परिसरात पोलिस गस्त वाढवण्याचे निर्देश दिले.तसेच, अमली पदार्थ विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

        जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्याशीही त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून अमली पदार्थ विक्रीबाबत चिंता व्यक्त केली. शाळा पातळीवर जनजागृती मोहिम राबवावी, तसेच अमली पदार्थ विक्री करणार्‍यांवर कारवाईसाठी विशेष पथक तयार करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

      स्थानिक नागरिकांना अशा पदार्थांच्या विक्रीबाबत माहिती असते, तर पोलिसांना ती कशी मिळत नाही, असा सवाल उपस्थित करत, पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा गुन्हेगारी व्यवसायात गुंतलेल्यांवर कठोर कारवाई करून कायदा-सुव्यवस्था राखावी, असेही यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक याना सांगितले आहे.

    tanmay khan house

    जनजागृती मोहिम राबवा..
    शाळकरी अल्पवयीन युवक अमली पदार्थांच्या नशेच्या आहारी जात आहेत, ही चिंताजनक बाब आहे. असे युवक आढळल्यास त्यांच्या पालकांना माहिती द्या. शाळा-महाविद्यालय पातळीवर जनजागृती मोहिम राबवून नशामुक्त समाज निर्मितीकडे विशेष लक्ष द्या, अशा सूचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहेत.

  • Yuvasena college kaksh | चंद्रपूर युवासेना कॉलेज कक्ष पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

    Yuvasena college kaksh

    Yuvasena college kaksh : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना -युवासेना सचिव,आ. वरून सरदेसाई यांच्या आदेशानुसार, युवासेना कार्यकरणी सदस्य हर्षलजी काकडे, युवासेना पूर्व विदर्भ सचिव,सिनेट सदस्य निलेशजी बेलखेडे, युवासेना सहसचिव रोहिणी पाटील,विस्तारक संदीप रियाल पटेल, युवासेना जिल्हा युवा अधिकारी विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कॉलेज कक्ष पदाधिकारी नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. yuvasena 

    सुधीर मुनगंटीवार नाराज आहे का?

    युवासेना कॉलेज कार्यकारिणी, जिल्हा चंद्रपूर.
    इंजि. चेतन बोबडे यांच्याकडे घुग्घूस शहर प्रमुख सोबतच अतिरिक्त कॉलेज कक्ष लोकसभा अध्यक्ष (चंद्रपूर-वणी-आर्णी), इंजि. वतन मादर यांच्याकडे जिल्हा अध्यक्ष (चंद्रपूर-बल्लारशाह राजुरा),आदर्श लाडस्कर -जिल्हा सचिव, सार्थक शिर्के- विधानसभा अध्यक्ष (चंद्रपूर- विधानसभा), सोनू चावरे विधानसभा उपाध्यक्ष(चंद्रपूर- विधानसभा )यांची प्रमुख पदाधिकारी म्हणून नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.यासोबतच विविध महाविद्यालय येथे युवासेना कॉलेज कक्ष यूनिट यांची घोषणा करण्यात आलेली आहे. yuvasena 

    सोबतच ब्रम्हपुरी येथील महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ब्रह्मपुरी मध्ये युनिट अध्यक्ष म्हणून यश दंगत, उपाध्यक्ष पदी वैभव गायकवाड तर सचिव पदी प्रज्वल इंगळे यांची निवड करण्यात आलेली आहे.
    मुंबई येथे झालेल्या युवासेना विभागीय सचिव यांच्या बैठकीमध्ये सिनेट सदस्य तथा पूर्व विदर्भ सचिव प्रा.निलेश बेलखेडे यांनी युवासेना सचिव आमदार वरुणजी सरदेसाई यांच्याशी चर्चा करून त्त्यांच्या मान्यतेने पूर्व विदर्भात जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयामध्ये विद्यार्थी, युवकांच्या यांच्या समस्या सोडविण्यासाठी,शिक्षण, आरोग्य व रोजगार यासंदर्भात त्रिसूत्री कार्यक्रम राबवून युवक- युवतीना सहकार्य करण्याकरिता तसेच पुढील विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये युवासेना कॉलेज कक्ष महत्वाची भूमिका पार पाडेल असा विश्वास व्यक्त करीत चंद्रपूर जिल्ह्यपासून कॉलेज कक्षाची सुरवात करण्यात आलेली आहे.यावेळी आमदार म्हणून निवडून आल्यामुळे शिवसेना युवासेना सचिव श्री.वरून सरदेसाई यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. yuvasena 

    हाइटेक कॉलेज ऑफ़ फार्मेसो पाडोली चंद्रपूर येथे प्रणय मोहितकर, युनिट अध्यक्ष, प्रथमेश रायपुरे उपाध्यक्ष, तनिश्क़ गानापुरापू, सचिव पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

    सोमय्या पॉलिटेक्निक अँड डी फार्मा कॉलेज, चंद्रपूर येथे युनिट अध्यक्ष म्हणून विशाल यादव, उपाध्यक्ष म्हणून जिशान बंडली आणि सचिव म्हणून जाहिद शेख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

    राजिव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, चंद्रपूर.मध्ये युनिट अध्यक्ष म्हणून
    गणेश बुक्कावर, उपाध्यक्ष म्हणून साहिल गेडाम, सचिव म्हणून
    साहिल सूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

    श्री. साई पॉलिटेकनिक अंँड आई टी आय मध्ये युनिट अध्यक्ष म्हणून हर्शल खनके उपाध्यक्ष रूपेश चौलागे, तर सचिव म्हणून ओम संगणवार नियुक्त करण्यात आले.

    राजुरा येथील कोरपना आईटीआई कॉलेज, कोरपना येथेयुनिट अध्यक्ष म्हणून विशाल जुम्नके, उपाध्यक्ष प्रफुल केराम आणि सचिव पदी गौरव तालांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

    यादवराव धोटे कॉलेज, राजूरा येथे युनिट अध्यक्ष म्हणून अनिकेत येरणी
    उपाध्यक्ष म्हणून कुणाल ढोलेआणि चैतन्य रोहणकर
    सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत.