Author: Admin

  • Chandrapur Flying Club Inauguration । चंद्रपूर-गडचिरोलीतील तरुणांसाठी आकाशाला गवसणी घालण्याची संधी

    Chandrapur Flying Club Inauguration

    “सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरमध्ये वैमानिक प्रशिक्षण केंद्र!”

    Chandrapur Flying Club Inauguration :  चंद्रपूर-गडचिरोली या जिल्ह्यांतील तरुणांना वैमानिक होता यावे, यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला होता. विद्यार्थ्यांचे आकाशात उंच झेप घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. याठिकाणी प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी वैमानिक होतील, तेव्हा चंद्रपूर आणि गडचिरोलीचीच मान अभिमानाने उंचावणार आहे, याचा विचार आमदार श्री. मुनगंटीवार यांनी केला होता. उद्या, दि. २० फेब्रुवारी २०२५ ला दूपारी १.०० वाजता चंद्रपूर फ्लाईंग क्लबचे उद्घाटन होत आहे. त्यामुळे आता आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश आले आहे.

    चंद्रपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरचं

    हा प्रकल्प भविष्यातील वैमानिकांसाठी मोठ्या संधी निर्माण करेल, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. या फ्लाईंग क्लबचे उदघाटन केंद्रिय माजी नागरी विमान वाहतूक मंत्री, खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या हस्ते दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०१ वाजता मोरवा येथे पार पडणार आहे. प्रशिक्षणार्थी विमानाचे उड्डाण करण्यासाठी मोरवा येथील धावपट्टीच्या (Chandrapur Airstrip Development) दुरुस्तीसाठी ५ कोटी ६३ लक्ष तर संरक्षण भिंतीसाठी ११ कोटी ९३ लक्ष रुपये तातडीने मंजूर करण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या. दिलेल्या सूचना पुर्णत्वास आल्या असून आता विमानतळ परिपूर्ण तयार आहे.

    सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील धावपट्टीचे कार्पेटिंग विमानाच्याच गतीने करावे, यात संबंधित यंत्रणेने विशेष लक्ष द्यावे. निवड करताना पहिल्या टप्प्यातील १० प्रशिक्षणार्थ्यांमध्ये मागास प्रवर्गातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा समावेश आवर्जून करावा, अशा सूचनाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या.

    चंद्रपूरसाठी ऐतिहासिक पाऊल !

    आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरचे फ्लाईंग क्लबचे उद्धाटन होत आहे . यामुळे जिल्ह्यातील तरुणांचे वैमानिक होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. आ.मुनगंटीवार यांनी फ्लाईंग क्लबसाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी जनतेकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे. Sudhir Mungantiwar Aviation Initiative

  • Chhatrapati Shivaji Maharaj Equestrian Statue । चंद्रपूरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार – आ. किशोर जोरगेवार

    Chhatrapati Shivaji Maharaj Equestrian Statue

    छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा – महाराष्ट्राच्या अभिमानाचा नवा अध्याय

    Chhatrapati Shivaji Maharaj Equestrian Statue : छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्याचा योग लाभला आहे. पण इथेच थांबायचे नाही. याच ठिकाणी लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. ही केवळ एक कल्पना नव्हे, तर हा आपला संकल्प आहे. याबाबतच्या सर्व प्रक्रिया गतीशीलपणे पुढे नेण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

    शिवजयंतीनिमित्त (Shivaji Maharaj Jayanti Celebration) छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे नेते विजय राऊत, अनिल फुलझेले, दशरथसिंग ठाकूर, माजी महापौर अंजली घोटेकर, संदीप आवारी, रवी आसवानी, रघुवीर अहिर, तुषार मोहुर्ले, माजी नगरसेवीकां वंदना तिखे, वनिता डुकरे, माजी नगरसेवकर देवानंद वाढई, रवी लोणकर, प्रशांत चौधरी, विकास खटी, अरुण तिखे, शेखर शेट्टी, विनोद शेरकी, रमेश भुते, तेजा सिंग, वंदना हातगावकर, सविता दंढारे, प्रमोद शास्त्रकार, वंदना हजारे, कौसर खान, विमल कातकर, संगीता लोखंडे, प्रवीण गिलबिले, मीना गरडवा, राजू घरोटे, ईश्वर विरुटकर, आशा मोगरे, रेणू घोडेस्वार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    छावा चित्रपट करमुक्त करा – खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी

    यावेळी ते म्हणाले, शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हा केवळ एक स्मारक नसून, तो आपल्या अभिमानाचा आणि प्रेरणेचा स्तंभ असणार आहे. या पुतळ्याकडे पाहताच आपल्या पिढ्या शिवरायांच्या पराक्रमाची आठवण ठेवतील, त्यांचे विचार आत्मसात करतील आणि आपल्या संस्कृतीचे दर्शन घडेल. हा पुतळा म्हणजे आपल्या इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्यातील प्रेरणास्थान असेल. Shivaji Maharaj Historical Landmark

    यासंबंधी सर्व प्रक्रिया वेगाने सुरू आहेत. रामकुमार अक्कापेल्लीवार या शिवप्रेमीने याबाबत जवळपास सर्व परवानग्या मिळवल्या आहेत. शेवटच्या काही परवानग्या मिळविण्याचे काम सुरू असून, नुकतीच महानगरपालिकेत बैठक घेऊन प्रशासनाला लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ स्मारक उभारणे हा उद्देश नाही, तर हे स्मारक भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणा देणारे ठरावे, यासाठी त्याचे भव्य आणि ऐतिहासिक स्वरूप असावे, यावर भर दिला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

    छत्रपती शिवाजी महाराज हे सामर्थ्य, शौर्य आणि न्यायाचा आदर्श होते. (Chhatrapati Shivaji Maharaj Inspiration) त्यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे. शिवराय हे केवळ एका व्यक्तीचे किंवा एका गटाचे नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्राचे, संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. शिवरायांचा पुतळा हा न्यायप्रिय राज्यकारभाराची जाणीव ठेवणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल. हा स्मारक उभारणीचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे, आणि भविष्यात ही भूमी केवळ एक स्मारक नसून, प्रेरणेचे, सन्मानाचे आणि इतिहासाच्या उज्ज्वल आठवणीचे केंद्र बनेल, यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    Chhatrapati Shivaji Maharaj Equestrian Statue

  • Chhava Movie Tax-Free Maharashtra । खासदार धानोरकर यांची मोठी मागणी

    Chhava Movie Tax-Free Maharashtra

    ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त?

    Chhava Movie Tax-Free Maharashtra : संभाजी राजे यांच्या जिवनाची यशोगाथा सांगणारा छावा चित्रपट महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिध्द झाला असून सदर चित्रपटातून संभाजी राजे यांच्या यशोगाथेतून युवकांना तसेच सर्व सामान्यांना ऐतिहासिक महाराष्ट्र व तत्कालीन शुर राजांचा वारस्याची माहिती सर्व सामान्यांना व्हावी या करीता छावा हा चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करावा अशी मागणी खासदार धानोरकर यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे. Ashish Shelar Cultural Minister

    चंद्रपुरात शिवकालीन युद्धकौशल्याचे पुनरुज्जीवन

    संपुर्ण देशात प्रसिध्द झालेला छावा ह्या चित्रपटातून संभाजी राजे यांच्या जिवनाची यशोगाथा तसेच ऐतिहासकालीन महाराष्ट्रातील परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे. विपरीत परिस्थितीतील संभाजी राजे यांनी केलेले कार्य व आपल्या राज्यातील जनतेची घेतलेली काळजी, हि संपुर्ण यशोगाथा सर्व सामान्य नागरीकांना बघता यावी व युवा पिढीला यातून प्रेरणा मिळावी व विद्यार्थ्या मध्ये देशभक्ती निर्माण व्हावी.

    तसेच सर्व सामान्यांना ऐतिहासीक महाराष्ट्राची माहिती व्हावी याकरीता सदर चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्याची विनंती खासदार धानोरकर यांनी ज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात स्वतः ते मंत्री महोदयांशी वार्तालाप करुन विनंती करणार असल्याचे त्यानी पाठविलेल्या प्रसिध्दी पत्रकातून कळविले आहे.

  • Lathi Kathi demonstration । चंद्रपुरात शिवकालीन युद्धकौशल्याचे पुनरुज्जीवन

    Lathi Kathi demonstration

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने लाठीकाठी प्रशिक्षण!

    Lathi Kathi demonstration : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून लाठीकाठीचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. आपल्या युद्धकौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना लाठीकाठी च्या कौशल्याने विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. या सर्व विद्यार्थ्यांचा आमदार किशोर जोरगेवार यांनी ‘अम्माचा टिफिन’ देऊन सत्कार केला.

    चंद्रपूर मनपातर्फे मालमत्ता कारवाई

    लाठी काठी ला आमदार जोरगेवार यांचं प्रोत्साहन

    लुप्त होत चाललेल्या या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्याचे कार्य भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने केले जात आहे. याच उद्देशाने त्यांनी नेहरू विद्यालय येथे लाठीकाठीचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात प्रशिक्षक मेघा राहुल मुधोळकर  यांनी जवळपास ३० युवक-युवतींना प्रशिक्षण दिले. पुढेही हे शिबिर सुरू राहणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. Lathi Kathi training program

    विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके
    lathi kathi training program

    आज शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार किशोर जोरगेवार कार्यक्रमस्थळी पोहोचताच विद्यार्थ्यांनी लाठीकाठीची प्रात्यक्षिके सादर करीत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. या वेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. Shiv Jayanti event 2025

    शिवजयंती निमित्त चंद्रपुरात किल्ले सफाई अभियान

    विद्यार्थ्यांनी सादर केलेली प्रात्यक्षिके शिवकालीन युद्धतंत्राचे उत्कृष्ट दर्शन घडवणारी होती.छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, त्यांचे लढाऊ तंत्र आणि शौर्य नव्या पिढीने आत्मसात करावे, यासाठी या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मरक्षण कौशल्ये विकसित होणार असून त्यांना आत्मविश्वास मिळेल,”असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

  • How to avoid property tax seizure | चंद्रपूर मनपाच्या 15 पथकांची धाड: दररोज 10 मालमत्ता जप्त

    How to avoid property tax seizure

    How to avoid property tax seizure : मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांवर मनपा वसुली पथकांनी कारवाई केली असुन 51 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत, विहित मुदतीत जर कराचा भरणा झाला नाही तर या मालमत्ताचा लिलाव केला जाणार आहे.

    शिवजयंतीनिमित्त चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान

       
       यापुढेही अशीच धडक कारवाई सतत सुरु राहणार असल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात येत असुन सवलत देऊनही मालमत्ता कर न भरण्याकडेच नागरिकांचा कल दिसत असल्याने सक्त पाऊले मनपाला उचलावी लागत आहे. जप्त केलेल्या मालमत्तांवर असलेली थकबाकी ही जप्त केल्यानंतर 15  दिवसांच्या आत मनपाला जमा करावी लागते, अन्यथा त्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा अधिकार मनपाला आहे. (Property tax defaulters action)


       15 फेब्रुवारी पर्यंत केवळ 8734 मालमत्ता धारकांनी 50 टक्के शास्तीत सवलतीचा लाभ घेतला होता. 15 फेब्रुवारी नंतर ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट मनपातर्फे देण्यात येत आहे. करवसुली करिता महानगरपालिकेतर्फे 15 पथके नेमण्यात आली असुन प्रत्येक पथकाला दर दिवशी किमान 10 मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याचे तसेच जप्तीसोबतच मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.  

    property tas defaulters action


        ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट ही 31 मार्चपर्यंत लागू राहणार असुन कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने 31 मार्च पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे. ज्या मालकांना त्यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने आर्थिक उत्पन्न प्राप्त होत असतानाही मालमत्ता कर थकविणार्‍या थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपल्या थकीत कराचा भरणा करून महानगरपालिकेकडून करण्यात येणारी जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. (Municipal corporation tax concession)

  • Chandrapur Fort cleanliness drive । हेरिटेज वॉक मार्ग स्वच्छतेसाठी एकत्र आले विद्यार्थी – इको-प्रोच्या उपक्रमाला प्रतिसाद!

    Chandrapur Fort cleanliness drive

    शिवजयंतीनिमित्त चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान

    Chandrapur Fort cleanliness drive – इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने शिवजयंती निमित्ताने चंद्रपूर जिल्हा परकोट स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. आज बगड खिडकी ते अंचलेश्वर गेट पर्यंतच्या हेरिटेज वॉकच्या मार्गाची स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले. आज स्थानिक राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय व सारथी इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी श्रमदानात सहभाग घेतला.

    भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित करणार, चंद्रपूर मनपाची मोहीम

    या अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी व अन्य युवकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. लवकरच बगड खिडकी ते अंचलेश्वर गेट पर्यंतच्या हेरिटेज वॉक म्हणजे चंद्रपूर किल्ला व ऐतिहासिक वास्तू पर्यटनाला सुरुवात करण्यात येईल. यापूर्वी इको-प्रो ने चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान सलगएक हजार वीस दिवस नियमित राबविले तसेच चंद्रपूर पर्यटनास चालना मिळावी म्हणून किल्ला पर्यटन सुरू केले होते. आज हेरिटेज वॉक (Heritage walk Chandrapur) मार्गातील स्वच्छता करण्यात आली, बुरुज 4 व त्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

    ऐतिहासिक वारसा जपण्याची गरज

    स्वच्छता अभियान नंतर शिवजयंती निमित्त छोटा कार्यक्रम घेण्यात आला. आपला स्थानिक ऐतिहासिक वारसा आणि युवकांची भूमिका, शिवाजी महाराजांचे खरे स्मारक असलेले गडकिल्ले त्यांचे महत्व आणि संरक्षण-संवर्धनाची गरज, गोंडकालीन इतिहासाविषयी आणि किल्ला संवर्धनासाठी सुरू असलेले प्रयत्न याविषयी इको-प्रो चे (Eco-Pro organization Chandrapur) अध्यक्ष बंडु धोतरे यांनी माहिती दिली.

    या अभियानात प्रा. प्रमोद सहारे, संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे, सुमित कोहळे, अभय अमृतकर, कुणाल देवगिरकर, राजू काहिलकर, मनीष गावंडे, सचिन धोतरे, मोरेश्वर मडावी, रुद्राक्ष धोतरे तर भाविक गोरे, रोहित सत्यपाल, गणेश दाढे, पूजा देऊलकर, गौरी कोहपरे, वैभवी रंगनकर, आकाश नागोलकर, कोमल घोडे, संकेत झाडे व अन्य विद्यार्थी सहभागी होते.

  • Cement industry labor laws । कामगारांच्या न्यायहक्कांसाठी विजय वडेट्टीवार आक्रमक

    Cement industry labor laws

    सिमेंट कंपन्यांना दिला सडेतोड इशारा

    Cement industry labor laws : कामगार धाम गाळतो तेव्हाच कारखान्यातून उत्पादन तयार होते. कामगाराच्या समर्पित भावनेशी कुठलाही खेळ न करता त्यांना मिळणारे भत्ते, सुविधा व त्यांच्या न्यायिक हक्काबाबत  कुठलीही तडजोड नको. अशा सूचना राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार आ. विजय वडेट्टीवार यांनी अंबुजा सिमेंट कंपनी येथे आयोजित व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना दिल्या. 

    तंबाखू नियंत्रणासाठी चंद्रपूर जिल्ह्यात भरारी पथकाची स्थापना

    औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात सिमेंट उत्पादक कारखान्यासह अन्यही मोठे उद्योग सुरू आहेत. या औद्योगिक क्षेत्रात कामगारांचा न्याय हक्क त्यांना मिळावा यासाठी युवक काँग्रेस सरचिटणीस तथा विजय क्रांती कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार सदैव प्रयत्नशील असतात.

    जिल्ह्यातील अनेक औद्योगिक कंपन्यांमध्ये विजय क्रांती संघटनेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली असून कामगारांचे अनेक प्रश्न सोडविले आहे. अशातच नुकत्याच चंद्रपूर जिल्ह्यातील अंबुजा सिमेंट कंपनी (Ambuja Cement worker issues) व एसीसी सिमेंट कंपनी यातील कामगारांनी स्वच्छ निवृत्ती किमान वेतन भत्ते (Minimum wage for cement workers) व इतर काही सुविधांबाबतच्या समस्या विजय क्रांती कामगार संघटने पुढे मांडल्या.

    कामगारांचा छळ करून नका

    या संदर्भात राज्याची माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जबरदस्तीने कामगारांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात येऊ नये व कुठल्याही प्रकारे कामगाराचा छळ करण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

    यावर अंमलबजावणी न झाल्यास योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी खडसावून सांगितले. आयोजित बैठकीस विजय क्रांती संघटना अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार, राजुरा चे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, विजय ठाकरे ,प्रवीण लांडगे, अंबुजा सिमेंट कंपनी तथा एसीसी सिमेंट कंपनीचे कामगार व विजय क्रांती संघटनेचे अन्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

  • Tobacco Control Program । चंद्रपूर जिल्ह्यात तंबाखूमुक्तीची मोहीम

    Tobacco Control Program

    जिल्हा स्तरावर उपाययोजना आणि जनजागृती

    Tobacco Control Program : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक  मुख्य कार्यकारी अधिकारी  विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. सभागृह येथे पार पडली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश चिंचोळे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ.श्वेता सावलीकर आदी उपस्थित होते.

    अनधिकृत अतिक्रमणावर मनपाची मोठी कारवाई

    यावेळी तंबाखू प्रतिबंधक उपाययोजना बाबत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागातर्फे सन २०२४–२५ मध्ये एकूण 8678 नागरिकांचे आरोग्य संस्थेतील तंबाखू मुक्ती केंद्रात समुपदेशन करण्यात आले.  विभागतर्फे प्रत्येक ग्रामीण रुग्णालय , उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय स्तरावर तंबाखू मुक्ती केंद्र स्थापित करण्यात आली असून नागरिकांनी त्याचा पुरेपूर उपयोग घ्यावा, असे बैठकीत सांगण्यात आले. Anti-Tobacco Awareness Campaign

    तंबाखू प्रतिबंध उपाययोजनेबाबत जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम घेऊन नागरिकांना तंबाखूच्या दुष्परिणाम बाबत अवगत करावे, तसेच शाळा महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्री करण्यास मनाई आहे (Tobacco-Free Schools Campaign), याबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. कोटपा कायदा ६ ब चे उल्लंघन ज्या शैक्षणिक संस्थेच्या परिसरात होत आहे, असे सर्व पानठेले त्वरित जप्त करण्याचे व आरोग्य विभाग, महानगरपालिका, पोलीस विभाग, अन्न व औषधी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने मोहीम काढावी.

    tobacco free school campaign

    तसेच अनधिकृतरित्या सुरू असलेल्या पानठेल्यांवर त्वरित कारवाई करावी याच्या सूचना मनपाला दिल्या. मागील वर्षभरात चंद्रपूर शहराचा आकडा बघता एकूण 30 मौखिक कर्करोग रुग्ण चंद्रपूर शहरात आढळले. ज्यामध्ये तीस वर्षावरील व तीस वर्षाखालील अशा दोन्ही रुग्णांचा समावेश आहे. कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारा पासून नागरिकांना सतर्क करण्याकरिता शहरातील विविध ठिकाणी दर्शनीय भागात जनजागृतीपर बॅनर लावावे.  युवा पिढी कॅन्सर सारख्या आजाराला बळी पडत आहे, याबाबत जनजागृती करून नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, अशा सूचनासुद्धा देण्यात आल्या.

    दरम्यान सिगरेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम कायदा (कोटपा) 2003 (COTPA Act 2003 Compliance) विविध कलमा अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने सण 2024 –25 मध्ये 697नागरिकांकडून 69 हजार 977 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस विभागाच्या वतीने 617 प्रकरणांमध्ये 1 लक्ष 24 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. अन्न व औषधी प्रशासन विभागामार्फत 6 प्रकरणांमध्ये 330.275 किलो साठा 4 लक्ष, 81 हजार 110 रुपये किमतीचा जप्त करण्यात आला. आरोग्य विभागामार्फत सन 2024,- 25 मध्ये 232 शाळा तंबाखमुक्त करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

  • Festivals in Chandrapur । चंद्रपूर जिल्ह्यात सर्वधर्मीय सण शांततेत साजरे करण्याचे प्रशासनाचे आवाहन

    Festivals in Chandrapur

    उत्सवाची शांती राखण्यासाठी नागरिकांची सामाजिक जबाबदारी

    Festivals in Chandrapur : आगामी काळात शिवजयंती, महाशिवरात्री, होळी व रमजान ईद असे सर्वधर्मीय 11 सण येत आहे.  हे सण जिल्हयात मोठ्या प्रमाणात साजरे होणार असून चंद्रपूर हा जिल्हा शांततेसाठी प्रसिध्द आहे. जिल्ह्याचा हाच लौकिक कायम राखण्यासाठी तसेच सर्वधर्मीय सण शांततेत आणि उत्साहात साजरे करतांना प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी केले.

    नियोजन सभागृह येथे पोलिस दलातर्फे आयोजित जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सुधाकर अडबाले, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, सहायक पोलिस अधिक्षक अनिकेत हेरडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, पोलिस पाटील तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. (Festival safety regulations)

    अतिक्रमण विरोधात चंद्रपूर मनपाची मोठी कारवाई

    सण आणि उत्सवासंदर्भात प्रशासनाकडून देण्यात येणा-या सूचनांचे सर्वांनी गांभिर्याने पालन करणे गरजेचे आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये (Avoid fake news during festivals), असे सांगून श्री. चौधरी म्हणाले, शहरात तसेच तालुका स्तरावर महसूल, नगर पालिका प्रशासन आाणि पोलिस विभागाच्या अधिका-यांनी मिरवणुक/रॅली, पदयात्रा मार्गाला त्वरीत भेट देऊन पाहणी करावी. मिरावणूका काढतांना वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अग्निशमन, रुग्णवाहिका तसेच दुचाकी-चारचाकी वाहने सुरळीत वाहतूक करू शकतील, याची दक्षता घ्यावी. (Traffic issues Chandrapur)

    लेजर लाईटवर बंदी आहे, त्यामुळे कुणीही त्याचा वापर करू नये. डीजेचा (DJ noise restrictions) आवाज मर्यादेतच ठेवावा. राष्ट्रगीत आणि राज्यगीताचा एक ठराविक प्रोटोकॉल आहे, त्यामुळे डीजेवर राष्ट्रगीत व राज्यगीत वाजवू नये. तसेच मंडळांनी फायर ऑडीट करून घ्यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

    नागरीकांनी सण साजरे करतांना आपली सामाजिक जबाबदारी ठरवावी

    : अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू

    सण, उत्सव साजरे करणे ही आपली संस्कृती आहे. सर्व सण मिळून साजरे केल्याने सामाजिक सलोखा राखला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरीकांनी सण साजरे करतांना आपली सामाजीक जबाबदारी ठरवावी, असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांनी केले. पुढे त्या म्हणाल्या, कोणतीही मिरवणूक काढण्याआधी प्रशासनाकडून रितसर परवानगी घ्यावी, जिल्हयात रॅली, मिरवणूक तसेच बॅनर लावण्यासाठी देण्यात येणारी परवानगी प्रकीया ऑनलाईन करण्यात आलेली आहे, या सूविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा.

    festival safety regulations

    मनपा आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, कोणतेही सण, उत्सव साजरे करतांना शहारात बॅनर लावण्यात येतात. सदर बॅनर लावण्याबाबतची रितसर परवानगी घेणे आवश्यक असून याबाबत 24 तास ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सूविधा देण्यात आली आहे, त्यामुळे मा.उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार मनपा प्रशासन अवैध बॅनर संदर्भात गंभीर असून अवैध बॅनर धारकांवर गेल्या काही दिवसात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

    नागरिकांच्या सुचना : यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी विविध सुचना केल्या. यात सद्या परिक्षांचा काळ सुरु, त्यामुळे डिजेच्या आवाजावर बंधन असावे, सायबर सेलच्या माध्यमातून अफवांवर नियंत्रण ठेवावे. नागरिकांनीही अफवांवर विश्वास ठेवू नये, रस्त्यावरचे गड्डे त्वरीत बुजवावे, शांतता समितीची बैठक चार महिन्यातून एकदा घ्यावी, डीजे चा आवाज मर्यादेत असावा, सर्व सीसीटीव्ही कॅमेरे त्वरीत सुरू करावे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा आदींचा  समावेश होता.

  • Effective Encroachment Removal । चंद्रपूर महापालिकेची कठोर भूमिका

    Effective Encroachment Removal

    अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई

    Effective Encroachment Removal : शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्या अतिक्रमणधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेने कारवाई केली असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बिनबा गेट परिसरातील अतिक्रमण शहर पोलीस स्टेशन व वाहतूक पोलिस विभागाशी समन्वय साधुन काढण्यात आले आहे.

    शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांची ऑन द स्पॉट सुनावणी


        अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवितांना या भागातील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात काढुन रस्ते मोकळे करण्यात आले आहे. पत्र्याचे शेड लाऊन फुटपाथवर व रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याचे आढळुन आल्याने रस्त्यावर आलेले दुकानाचे शेड त्या दुकानदारांना स्वतःहुन काढण्यास लावण्यात आले तर काही शेड कटरने काढण्यात आले. (Illegal Street Encroachments)

    ठेले जप्त

    भंगाराची दुकाने हटविण्यात आली त्याचप्रमाणे त्यांच्याकडुन रस्त्यांवर जो मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता तो हटवुन कचरा करण्याबाबत दंड ठोठावण्यात आला व रस्त्यावर उभे करण्यात आलेले ठेले सुद्धा जप्त करण्यात आले आहे.  

    illegal Street encroachment


         मागील काही दिवसांपासुन रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी स्वतः हुन अतिक्रमण काढण्याच्या सुचना मनपातर्फे देण्यात आल्या होत्या .मात्र त्याकडे दुर्लक्ष करून,कारवाईची तमा न बाळगता अतिक्रमण उभेच होते त्यामुळे मनपा,पोलीस विभाग व वाहतुक पोलीसांद्वारे कारवाई करण्यात आली आहे. तसेच फुटपाथ व सार्वजनिक रस्त्यांवर पुन्हा फुटपाथवर अतिक्रमण न करण्याच्या सूचना अतिक्रमणधारकांना देण्यात आल्या आहेत. कारवाई दरम्यान अतिक्रमण निर्मुलन पथक,पोलीस पथक पूर्णवेळ उपस्थीत होते.