Author: Admin

  • Shabari Tribal Housing Scheme Chandrapur | चंद्रपूर शहरातील नागरिकांना असा मिळेल घरकुल योजनेचा लाभ

    Shabari Tribal Housing Scheme Chandrapur

    Shabari Tribal Housing Scheme Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत गावठाण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या लाभार्थ्यांकडे जमीनीची मालकी नाही अशा लाभार्थ्यांना मागील 3 वर्षाच्या मालमत्ता कर पावतीच्या (टॅक्स पावती) आधारे, मनपा कार्यालयात अर्ज करुन घरकुलाचा लाभ (रु.2.50 लक्ष अनुदान) देण्यात येत आहे.

    गडचिरोली मधील नामांकित संस्थेत काम करण्याची सुवर्णसंधी


        आदिवासी उपयोजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत, जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडा मातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहतात अशा अनुसूचितील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी वैयक्तिक लाभाची राज्य शासनाची “शबरी आदिवासी घरकुल योजना” चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येत आहे. (Chandrapur Municipal Corporation Housing Scheme)


        त्याचप्रमाणे चंद्रपूर शहरात अनुसूचित जमातीतील जागा उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांना गावठाण क्षेत्रांतर्गत बांधण्यात आलेल्या (बांधण्यात येणाऱ्या) सदनिकांमध्ये (फ्लॅट्स) शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ घेण्याकरिता मनपा कार्यालयात घरकुल मागणीसाठी रितसर अर्ज करुन रु. 2.50 लक्षचा लाभ मिळविता येईल.


       चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सदर योजनेबाबत आवश्यक माहिती जसे योजनेसाठी पात्रता,उत्पन्न मर्यादा,  आवश्यक कागदपत्रे इत्यादींकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यालय, सात मजली इमारत, प्रथम माळा, घरकुल विभाग येथे संपर्क साधावा.

  • Gadchiroli job update | गडचिरोली जिल्ह्यातील शासन मान्यता प्राप्त संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी

    Gadchiroli job update

    Gadchiroli job update : लोककल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर द्वारा संचालित
    विशेष दत्तक संस्था (SAA) गडचिरोली (Lok Kalyan Sanstha recruitment)

    सरकारी मान्यता प्राप्त संस्था मार्फत विविध पदांची भरती

    राज्य शासनाच्या रिटपी -2024/प्र.क्र.44/का-08, दिनांक 28 ऑगस्ट 2024 या शासन निर्णयानुसार तसेच अनुज्ञाप्ती क्रमांक GAD-2/SAA/2024/486 दिनांक 11.09.2024 अंतर्गत विशेष दत्तक संस्था (SAA) गडचिरोली येथे खालील पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

    रिक्त पदांची माहिती:

    1. समुपदेशक (Counselor) – 1 पद
    • शैक्षणिक पात्रता: बी.एस.डब्लु (B.S.W) / एम.एस.डब्लु (M.S.W)
    • अनुभव: संबंधित क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
    1. अधिपरिचारीका (नर्स) – 1 पद
    • शैक्षणिक पात्रता: ए.एन.एम (A.N.M) / जी.एन.एम (G.N.M)
    • अनुभव: अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
    1. चौकीदार (Watchman) – 1 पद
    • शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण
    • अनुभव: अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

    वेतन आणि इतर सुविधा:

    • वेतन शासन निर्णयानुसार दिले जाईल.
    • सर्व नियुक्त्या संबंधित नियम आणि अटींच्या अधीन राहून करण्यात येतील.

    अर्ज करण्याची पद्धत:

    इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर प्रत्यक्षरित्या येऊन अर्ज सादर करावा किंवा संपर्क साधावा:

    संपर्क पत्ता:
    विशेष दत्तक संस्था (SAA) गडचिरोली,
    आय.टी.आय. बायपास चौक, हनुमान मंदिराच्या मागे,
    बजरंग नगर, गडचिरोली – 442605
    मोबाइल: 8879699138

    अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

    चंद्रपूर RTO चा वसुली नाका

    महत्वाची सूचना:

    • निवड प्रक्रियेत अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेला प्राधान्य दिले जाईल.
    • संस्थेचा निर्णय अंतिम राहील आणि कोणत्याही प्रकारचे शिफारस पत्र स्वीकारले जाणार नाहीत.
    • अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे आणि ओळखपत्राच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.

    नोकरीच्या संधीचा लाभ घ्या आणि संस्थेचा एक भाग बना!

  • Sushma Swaraj Skill Development Center Ballarpur । सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूरमध्ये अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र उभारणीच्या कामाला वेग

    Sushma Swaraj Skill Development Center Ballarpur

    Sushma Swaraj Skill Development Center Ballarpur :  बल्लारपूर येथे साकारत असलेल्या स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीच्या कामाची पाहणी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. हे केंद्र 20 मे पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या केंद्रात वातानुकूलित बैठक हॉल्स, अत्याधुनिक वर्कशॉप, ई-लायब्ररी तसेच 100 महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या सुविधांसाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

    पाहणी दरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, मुकेश टांगले कार्यकारी अभियंता, भाजपाचे पदाधिकारी लखनसिंग चंदेल, , प्रज्ज्वलंत कडू, सुरज पेद्दूलवार, संजोग मेढे उपअभियंता, वैभव जोशी शाखा अभियंता, किशोर चीदरवार आदी उपस्थित होते.

    थकबाकीदारांवर चंद्रपूर मनपाची धडक कारवाई

    यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वातानुकूलित हॉलमध्ये इनबिल्ट माईक आणि पोडियम असावेत, अशा सूचना दिल्या. संपूर्ण केंद्रात सीसीटीव्ही सुरक्षा प्रणाली आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ यंत्र बसवावे. महिलांसाठी ई-लायब्ररी आणि वर्कशॉप सुविधा अधिक सक्षम करावी. अतिथी निवासाची व्यवस्था जागा उपलब्धतेनुसार करावी. केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. असे निर्देश दिले. Ballarpur vocational training center update

    स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यासाठी स्व. सुषमा स्वराज यांच्या कुटुंबातील ॲड. बासुरी स्वराज यांना तसेच त्याच्या परिवारातील अन्य सदस्यांना विशेष निमंत्रण देण्याचे नियोजन करावे. बांधकामासाठी अतिरिक्त निधीची मागणी असल्यास नगर विकास विभागाकडून मागणी करण्यात येईल.  हे प्रशिक्षण केंद्र महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचा भक्कम पाया ठरेल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

  • Ballarpur new court building project । बल्लारपूरमध्ये नव्या न्यायालयाची उभारणी – राज्यातील सर्वोत्तम न्यायालयांपैकी एक होणार!

    Ballarpur new court building project

    Ballarpur new court building project : बल्लारपूर येथे नवीन न्यायालयाची इमारत उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पासाठी रु. 36 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या इमारतीत सौरऊर्जा प्रणाली, अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, महिला वकिलांसाठी हिरकणी कक्ष, डिजिटल सुविधांनी सुसज्ज ई-लायब्ररी, तसेच परिसराचे सौंदर्य खुलविण्यासाठी लँडस्केपिंग आदी अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे. ही न्यायालयीन इमारत केवळ बल्लारपूरच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील उत्कृष्ट न्यायालयीन इमारतींपैकी एक ठरेल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. Women lawyers’ facility Ballarpur

    बल्लारपूर विश्रामगृह येथे न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी, मुकेश टांगले कार्यकारी अभियंता,संजोग मेंढे उपअभियंता ,पवन सावरकर कनिष्ठ अभियंता, ॲड. आशिष धर्मपुरीवार, ॲड. आय.आर. सय्यद, ॲड बुराडे, ॲड. विकास गेडाम, ॲड. भाले, ॲड. लिंगे, ॲड उपाध्याय, ॲड. जिवणे, ॲड. पिंपळकर, ॲड. पोसलवार, ॲड. हस्ते, ॲड. आमटे, ॲड. खर्तड, ॲड. तित्रे, ॲड. गेडाम, ॲड. केशवानी, ॲड भाळे, ॲड. बाजपेयी, ॲड. अविनाश सिंग, ॲड. खनके आदीची उपस्थीती होती.

    चंद्रपूर जिल्ह्यात नवं महसुली गाव

    आमदार श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, भविष्यातील गरजांचा विचार करून, 100 वकिलांसाठी स्वतंत्र इमारत उभारण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सदर न्यायालयीन इमारतीमध्ये सोलर व्यवस्थेसह प्रत्येक मजल्यावर आरो मशीनसह स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. ई-लायब्ररी, वकिलांसाठी विशेष ॲडव्होकेट कॉन्फरन्स हॉल, महिलांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष, आधुनिक सुसज्ज स्वच्छतागृहे, तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. अखंड वीजपुरवठासाठी 200 केव्ही क्षमतेचा जनरेटर, तसेच महत्वाच्या दस्तऐवजांच्या सुरक्षिततेसाठी लॉकर्स आणि कॉम्पॅक्टरची व्यवस्था करावी. Ballarpur court construction approval

    वाहनांसाठी नियोजनबद्ध पार्किंग सुविधा याशिवाय, इमारतीसाठी उत्कृष्ट दर्जाचे टिकवुडचा फर्निचरसाठी वापर करण्याचे निर्देश संबंधितांना दिलेत. पुढील दोन ते तीन महिन्यांत वकिलांच्या उपस्थितीत या इमारतीचे भूमिपूजन करण्याचा निर्णय वकील परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू करण्यात येणार आहे. सदर इमारत महाराष्ट्राच्या उत्तम न्यायालयाच्या इमारतीपैकी एक असेल असा विश्वास देखील श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

  • Rajoli Chak revenue village update । वाघांचा धोका आणि अंतराचा अडथळा – प्रशासनाचा ग्रामस्थांसाठी मोठा निर्णय!

    Rajoli Chak revenue village update

    Rajoli Chak revenue village update : सावली तालुक्यातील मौजा राजोली चक हे महसूली गाव, चकविरखल या तलाठी साझ्यातून कमी करून बोथली तलाठी साझ्यामध्ये समाविष्ट करण्याबाबतची अंतिम अधिसुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी प्रसिध्द केली आहे.

    चंद्रपूर आरटीओचा वसुली भाई

    महाराष्ट्र शासन राजपत्रान्वये, तलाठी साझा पुर्नरचना करून चंद्रपूर जिल्ह्यात या पूर्वी असलेल्या 299 तलाठी साझ्यांमध्ये नव्याने 133 तलाठी साझे निर्माण करण्यात आले आहेत. सावली तालुक्यातील चिचबोडी येथील सरपंचांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. यात मौजा राजोली चक हे गाव नव्याने अंतर्भूत झालेल्या चकविरखल या साझ्याच्या मुख्यालयापासून 15 कि.मी. दूर आहे. त्यामुळे ग्रामस्थांना शासकीय कामाकरीता ये-जा करण्याकरीता दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. तसेच रस्त्यात घनदाट जंगल असून वाघांची भीती असल्यामुळे मौजा राजोली चक हे महसूली गाव चकविरखल या साझाऐवजी बोथली या साझ्यामध्ये अंर्तभूत करण्याची मागणी केली होती. Revenue village transfer notification Maharashtra

    या निवेदनाच्या अनुषंगाने सावलीच्या तहसीलदारांनी मौका चौकशी करून अहवाल सादर केला. मौजा राजोली चक हे महसूली गाव चकविरखल या साझ्याच्या मुख्यालयापासून 15 कि.मी दूर असल्याने ग्रामस्थांना शासकीय कामाकरीता ये-जा करण्याकरीता दळणवळणाच्या दृष्टीने 2 कि. मी दूर असलेला बोथली हा साझा सोयीचे असल्याचे कळविले होते. त्या अनुषंगाने अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या तलाठी साझांची पुनर्रचना करण्याबाबत शिफारसी मधील मुद्दा क्र. 6.1.3 मध्ये “प्रत्येक तलाठी साझाचे मुख्यालयापासून त्या साझ्यास संलग्न करण्यात येणारे गाव 10 कि.मी पेक्षा जास्त अंतरावर शक्यतो नसावे. उपलब्ध दळण-वळण व्यवस्थेचा विचार करून त्याबाबतचा निर्णय संबंधित जिल्हाधिकारी यांनी घ्यावा” असे नमूद आहे. Chandrapur district government gazette

    महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 4 पोटकलम (2) नुसार तलाठी साझा निर्मिती किंवा फेरबदल करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. तसेच, अधिनियमाच्या कलम 4 पोटकलम (4) च्या अन्वये अंतिम अधिसुचना प्रसिध्द करण्यापूर्वी प्रारूप अधिसुचना 2 जानेवारी 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. प्रारूप अधिसुचनेच्या प्रसिध्दीनंतर कोणताही आक्षेप किंवा उजर या कार्यालयास विहीत वेळेत प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी तलाठी साझा पुनर्रचनेबाबत 10 नोव्हेंबर 2017 रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रात बदल करून अनुसूचीप्रमाणे मौजा राजोली चक हे महसुली गाव चकविरखल या साझामधून कमी करून बोथली या साझाला पुर्ववत जोडण्यात आले आहे.

  • Chandrapur municipal tax news | चंद्रपूर मनपाची धडक कारवाई – थकबाकीदारांवर टाच, जप्तीचे सत्र सुरू!

    Chandrapur municipal tax news

    Chandrapur municipal tax news : मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांवर मनपा वसुली पथकांची कारवाई सुरु असुन 86 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत,त्याचप्रमाणे 44 नळ कनेक्शन धारकांवर कपातीची कारवाई करण्यात आली आहे.


       जप्त मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया करून थकीत रक्कम वसुलीची कारवाई करण्याकरीता झोननिहाय ३ पथके गठीत करण्यात आली असुन थकबाकीचा भरणा न केल्यास जप्ती केलेल्या मालमत्तांवर 15 दिवसांच्या आत कारवाई करण्याचा अधिकार मनपाला असल्यांने पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. यापुढेही अशीच धडक कारवाई सतत सुरु राहणार असल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात येत असुन सवलत देऊनही मालमत्ता कर न भरण्याकडेच नागरिकांचा कल दिसत असल्याने सक्त पाऊले मनपाला उचलावी लागत आहे. Property tax recovery Chandrapur

    चंद्रपूर RTO चा वसुली भाई, 500 रुपयांची लाच घेताना अटक


       15 फेब्रुवारी पर्यंत केवळ 8734 मालमत्ता धारकांनी 50 टक्के शास्तीत सवलतीचा लाभ घेतला होता. 15 फेब्रुवारी नंतर ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट मनपातर्फे देण्यात येत आहे. करवसुली करिता महानगरपालिकेतर्फे 15 पथके नेमण्यात आली असुन प्रत्येक पथकाला दर दिवशी किमान 10 मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याचे तसेच जप्तीसोबतच मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.  

    Property tax recovery Chandrapur


        ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट ही 31 मार्चपर्यंत लागू राहणार असुन कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने 31 मार्च पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे. ज्या मालकांना त्यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने आर्थिक उत्पन्न प्राप्त होत असतानाही मालमत्ता कर थकविणार्‍या थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपल्या थकीत कराचा भरणा करून महानगरपालिकेकडून करण्यात येणारी जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • chandrapur rto checkpost | चंद्रपूर RTO चा “वसुली नाका’

    chandrapur rto checkpost

    chandrapur rto checkpost : चंद्रपूर येथील प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) मधील सहायक मोटार निरीक्षक लाच प्रकरण आणि एका खासगी कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले गेल्याची घटना समोर आली आहे. ही कारवाई महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती लक्कडकोट RTO चेकपोस्टवर करण्यात आली.

    लक्कडकोट RTO चेकपोस्टवरील बेकायदेशीर वसुली

    महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील RTO चेकपोस्टवर बेकायदेशीर वसुली सुरू असल्याचे उघड झाले आहे. RTO अधिकारी लाच प्रकरण हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. Amravati Acb

    200 रुपयासाठी चंद्रपुरात नशेचा बाजार

    या सततच्या वसुलीला कंटाळून एका ट्रक मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) तक्रार केली. तक्रारदाराचे ट्रक महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये वाहतूक करतात. कागदपत्रे व्यवस्थित असतानाही RTO अधिकाऱ्यांकडून लाच मागितली जात होती, त्यामुळे त्यांनी ही तक्रार नोंदवली.

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

    या तक्रारीनंतर अमरावती ACB विभागाने सापळा रचला. 21 फेब्रुवारी रोजी पंचासमोर सहायक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभूते यांनी खाजगी एजंट जगदीश डफडे यांना तक्रारदाराकडून 500 रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने दिलेल्या नोटा स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. Chandrapur corruption

    RTO चेकपोस्टवरील झडती आणि मोठा घोटाळा उघड

    या कारवाईनंतर RTO चेकपोस्ट कार्यालयाची झडती घेण्यात आली. तेथे 56,100 रुपये रोख रक्कम आढळली. चौकशीत RTO लाच प्रकरणाचा पर्दाफाश झाला. विशेष म्हणजे, या रकमेची कोणतीही नोंद अधिकृत कॅशबुकमध्ये नव्हती.

    अटक आणि पुढील कारवाई

    सहायक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभूते आणि एजंट जगदीश डफडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या मोहिमेत पोलीस उपअधीक्षक मंगेश मोहोड, पोलीस निरीक्षक केतन मांजरे, योगेशकुमार दंदे, तसेच पोलीस कर्मचारी युवराज राठोड, राजेश मेंटकर, वैभव जायले आणि आशिष जांभळे यांनी सहभाग घेतला.

    या कारवाईमुळे चंद्रपूर RTO घोटाळा उघडकीस आला आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांकडून आणि ट्रक मालकांकडून केली जात आहे.

  • Chandrapur drug sales : 200 रुपयांच्या कमिशनसाठी चंद्रपूर शहरात एमडी पावडरची विक्री

    Chandrapur drug sales

    चंद्रपूरमध्ये अंमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश: दोन आरोपी अटकेत, पोलिसांची मोठी कारवाई

    चंद्रपूर शहर आणि जिल्हा दिवसेंदिवस अवैध धंद्यांचे केंद्र बनत चालला आहे. विशेषतः युवा वर्गाला व्यसनाच्या आहारी नेण्याचे प्रकार वाढत आहेत. अशातच, चंद्रपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी पावडर (मेफेड्रोन) नावाच्या घातक अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४०,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    गुन्हे शोध पथकाची गुप्त माहितीवर कारवाई

    २२ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर शहरात एका युवकाकडून अंमली पदार्थांची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई करत कोहिनूर तलाव येथे सापळा रचला. काही वेळातच संशयित अमान खान (वय २४, रा. बाबूपेठ, चंद्रपूर) येथे आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

    महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

    ९.४० ग्रॅम एमडी पावडर जप्त

    अमान खानची झडती घेतली असता त्याच्याकडे ९.४० ग्रॅम एमडी पावडर सापडली, ज्याची बाजारातील किंमत अंदाजे ३०,००० रुपये आहे. पोलिसांनी अधिक तपास केल्यावर अमान खानने ही पावडर आवेश शब्बीर कुरेशी (वय ३८, रा. भंगाराम वॉर्ड, चंद्रपूर) याच्याकडून घेतली असल्याची कबुली दिली. तसेच, एक पुडी विकल्यावर त्याला २०० रुपये कमिशन मिळत असल्याचे त्याने सांगितले. MD powder seizure

    पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

    पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास करत बाबूपेठ येथील अमान खान आणि भंगाराम वॉर्डातील आवेश शब्बीर कुरेशी यांना अटक केली. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून एकूण ४०,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Chandrapur police action

    चंद्रपूर पोलीस दलात बदली

    पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई

    ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
    या संपूर्ण मोहिमेत पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे आणि पोलीस कर्मचारी सचिन बोरकर, संतोष कणकम, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, इम्रान खान, रुपेश रणदिवे, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, सारिका गौरकार आणि दीपिका झिंगरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. Chandrapur illegal businesses

    संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू

    या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज बैसाणे करत असून, आरोपींच्या मागील नेटवर्कचा शोध घेतला जात आहे. चंद्रपूर शहरात अंमली पदार्थांचा वाढता वापर हा चिंतेचा विषय असून पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कडक कारवाई सुरू ठेवण्याची गरज आहे. Chandrapur Crime

    शहरातील तरुणांना व्यसनाच्या आहारी जाण्यापासून वाचवा

    अंमली पदार्थांचा व्यवसाय हा शहरातील तरुणांना व्यसनाच्या दलदलीत ओढत आहे. त्यामुळे नागरिकांनीही सजग राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जर कुठे अशा अवैध व्यवसायाबाबत माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, जेणेकरून या समाजविघातक प्रवृत्तीवर आळा बसू शकेल.

  • iPhone models discontinued । iPhone 16e लाँचनंतर Apple ने तीन जुन्या iPhone मॉडेल्सची विक्री केली बंद

    iPhone models discontinued after iPhone 16e launch

    iPhone models discontinued : iPhone 16e काही दिवसांपूर्वी भारतासह जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीने या नवीन मॉडेलसाठी जागा तयार करण्यासाठी काही जुन्या फोनना आपल्या अधिकृत वेबसाइटवरून हटवले आहे. iPhone 16e च्या 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 59,900 रुपये आहे. 256GB आणि 512GB स्टोरेज कॉन्फिगरेशनच्या किंमती अनुक्रमे 69,900 रुपये आणि 89,900 रुपये ठेवण्यात आल्या आहेत.

    Apple ने नवीन iPhone 16e साठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी भारतात काही जुने हँडसेट बंद केले आहेत. नवीन मॉडेलसाठी जागा तयार करण्याच्या प्रक्रियेत तिसऱ्या पिढीचा iPhone SE टप्प्याटप्प्याने हटवला जात आहे, कारण iPhone 16e तीन वर्षे जुन्या फोनच्या तुलनेत अनेक अपग्रेड्स देते. या फोनमध्ये Apple इंटेलिजेंससाठी सपोर्ट असलेली A18 चिप आणि चार्जिंगसाठी USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहे. असे दिसते की क्यूपर्टिनो-बेस्ड कंपनीने नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोनच्या लाँचनंतर 2022 मध्ये लाँच झालेला स्टँडर्ड iPhone 14 देखील आपल्या वेबसाइटवरून हटवला आहे.

    सकाळी उठल्यावर शुगर किती असावे?

    iPhone 16e च्या लाँचनंतर, जुने iPhone SE, iPhone 14 आणि iPhone 14 Plus मॉडेल्स Apple च्या अधिकृत वेबसाइटवरून गायब झाले आहेत. हे मॉडेल्स अद्याप फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या तृतीय-पक्षीय रिटेलर्सकडून किंवा भारतातील रिफर्बिश्ड स्टोअर्समधून खरेदीसाठी उपलब्ध आहेत, परंतु लवकरच त्यांचा स्टॉक संपण्याची शक्यता आहे. हे सर्व फोन 2022 मध्ये लाँच करण्यात आले होते.

    iPhone SE (2022) मार्च 2022 मध्ये 43,900 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीसह लाँच करण्यात आला होता. दुसरीकडे, iPhone 14 आणि iPhone 14 Plus हे सप्टेंबर 2022 मध्ये अनुक्रमे 79,900 रुपये आणि 89,900 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीसह आले होते. Apple ने iPhone 16 मालिकेच्या लाँचनंतर गेल्या वर्षी iPhone 15 Pro सीरिज आणि iPhone 13 मॉडेलची विक्री बंद केली होती. युरोपियन युनियनने बहुतेक उपकरणांवर USB टाइप-C चार्जिंग पोर्ट अनिवार्य करण्याचा नवीन कायदा लागू केल्यामुळे कंपनीने अनेक युरोपीय देशांमध्ये आपल्या ऑनलाइन स्टोअरमधून iPhone 14, iPhone 14 Plus आणि iPhone SE हटवण्यास सुरुवात केली आहे.

    Apple च्या सध्याच्या स्मार्टफोन पोर्टफोलिओमध्ये iPhone 15 सीरिज, iPhone 16 सीरिज आणि नवीन iPhone 16e समाविष्ट आहे. कंपनीने iPhone 17 लाइनअपची घोषणा केल्यावर स्टँडर्ड iPhone 15 आणि iPhone 15 Plus बंद करण्याची शक्यता आहे. iPhone 16e च्या 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 59,900 रुपये आहे. 256GB आणि 512GB स्टोरेज व्हेरियंटसाठी किंमती अनुक्रमे 69,900 रुपये आणि 89,900 रुपये आहेत. हा फोन 21 फेब्रुवारीपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल आणि 28 फेब्रुवारीला विक्रीसाठी जाईल.

    नवीन iPhone 16e iOS 18 वर चालतो आणि त्यामध्ये 60Hz रिफ्रेश रेट असलेली 6.1-इंचाची OLED स्क्रीन आहे. यामध्ये 3nm A18 चिप आहे आणि हा Apple इंटेलिजेंस फीचर्सला सपोर्ट करतो. यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबलायझेशन (OIS) असलेला 48-मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा आणि सेल्फी व व्हिडिओ कॉलसाठी 12-मेगापिक्सलचा ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा आहे. या फोनला डस्ट आणि वॉटर रेसिस्टंससाठी IP68 रेटिंग मिळाली आहे. चार्जिंगसाठी यामध्ये USB टाइप-C पोर्ट असून हा 18W वायर्ड चार्जिंग आणि 7.5W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.

  • Chandrapur police transfers | चंद्रपूर पोलीस बदल्या, वादग्रस्त बढती

    Chandrapur police transfers

    Chandrapur police transfers : चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून त्यामध्ये वादग्रस्त अधिकाऱ्यांना बढती देण्यात आल्याचे चित्र आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी शुक्रवारी सायंकाळी चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश दिले.

    चंद्रपूर जिल्ह्यातील 1 हजार 491 विद्यार्थी आरटीई साठी पात्र

    एलसीबीचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी भद्रावतीचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षभरात काचोरे यांची चौथ्यांदा बदली झाली आहे. दुर्गापूर येथील पोलिस निरीक्षक लता वाडिवे यांची बदली भद्रावती येथे तर प्रभारी पोलिस उपाधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणारे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांची दुर्गापुर पोलिस स्टेशनला बदली करण्यात आली आहे. (Chandrapur police inspector)

    एलसीबीसाठी मोठी स्पर्धा

    एलसीबीचे ठाणेदार महेश कोंडावार यांचा कार्यकाळ संपताच एलसीबीसाठी अनेक ठाणेदारांनी जोरदार प्रयत्न केले होते. जिल्ह्यातील चार ते पाच ठाणेदारांची नावे एलसीबीसाठी चर्चेत असताना अखेरीस भद्रावतीचे ठाणेदार अमोल काचोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. Local crime branch

    वादग्रस्त अधिकाऱ्यांना बढती

    अमोल काचोरे हे वरोरा पोलिस स्टेशनमध्ये असताना त्यांच्या कार्यकाळात एका आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या केली होती. या घटनेनंतर त्यांची तातडीने बदली करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा त्यांना स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली असून त्यामुळे अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

    या बदल्यांमुळे पोलिस दलात मोठ्या चर्चेला उधाण आले असून, वादग्रस्त अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर नेमण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

    बदल्यांचा राजकीय आणि प्रशासकीय प्रभाव

    या बदल्यांमुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेबाबत शंका उपस्थित केली जात असताना, काहींना मात्र नेहमीच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचा एकूणच कार्यभार आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी या बदल्यांचा परिणाम कसा होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

    गुन्हेगारी संपुष्टात येणार काय?

    एलसीबी म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक साठी अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली होती, सर्व पोलीस अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील गुन्हेगारी संपविण्यासाठी पुढे आले, या पदावर बसलं की गुन्हेगारी संपुष्टात येते ही भावना फक्त नागरिकांच्या मनात असते अधिकाऱ्यांच्या नाही. जिल्ह्यातील मोठ्या पोलीस स्टेशनमध्ये वादग्रस्त अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी संपुष्टात येणार हा फक्त जनतेच्या डोक्यात असलेला भ्रम आहे. चित्र याउलट दिसेल हे नक्कीचं. Chandrapur crime

    कार्यकाळ

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचा कार्यकाळ तसा ठीक गेला, जाता जाता त्यांनी वाळू तस्करांवर लगाम घालण्याचा प्रयत्न केला, दुर्गापूर पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांचा कार्यकाळ चांगला राहिला, विशेष बाब म्हणजे सिनियर असताना सुद्धा त्यांना लहान पोलीस स्टेशन देण्यात आले होते. क्षमता असलेल्या अधिकाऱ्यांना लहान जबाबदारी तर वादग्रस्त हा शब्द पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती असं चित्र जिल्ह्यात निर्माण झालं आहे.