Author: Admin

  • Sudhakar Adbale news । आ. सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या प्रलंबित समस्या मार्गी

    Sudhakar Adbale news

    ऑन-द-स्पॉट नियुक्त्या आणि पदोन्नतीला गती

    Sudhakar Adbale news : आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या ‘समस्या तुमच्या, पुढाकार आमचा’ या उपक्रमाअंतर्गत आज शिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प. चंद्रपूर यांच्याकडे जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ समस्या निवारण सभा आज मा. सा. कन्नमवार सभागृह, चंद्रपूर येथे पार पडली. यावेळी ३ अनुकंपा व १ उपमुख्याध्यापक पदोन्नती प्रकरणांना ‘ऑन द स्पॉट’ मान्यतेचे पत्र देण्यात आले. (Teacher appointment news Chandrapur)

    चंद्रपुरात छत्रपती महोत्सवाचा शुभारंभ

    मागील दोन्‍ही सभेत प्रलंबित प्रकरणे रात्री ९ वाजेपर्यंत ‘ऑन द स्पॉट’ निकाली काढण्यात आली होती. यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांचा समस्‍या निवारण सभेत ‘ऑन द स्पॉट’ प्रकरणे निकाली काढण्याचा धडाका कायम असल्‍याने शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे. (On-the-spot teacher approvals)

    मागील दोन वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित होती. आमदार सुधाकर अडबाले निवडून आल्‍यापासून समस्‍या निवारण सभेच्या माध्यमातून त्‍या निकाली काढण्याचा धडाका लावला. आज पार पडलेल्‍या विषयसूचीतील १०० प्रकरणांपैकी जवळपास ८० टक्‍के प्रकरणे समस्‍या सभा होण्यापूर्वीच निकाली काढण्यात आली.

    ३ नियुक्त्या व पदोन्नती

    सभेत अनुकंपा तत्वाअंतर्गत कार्तीक दुधपचारे यांना जनता कन्‍या विद्यालय नागभीड येथे शिपाई सेवक, नित्‍यानंद मोतेवाड यांना कै. अण्णाभाऊ साठे माध्य. व उच्च माध्य. विद्यालय कुंभेझरी येथे प्रयोगशाळा परिचर सेवक, वैष्णवी बंडू भगत हिला आदर्श किसान विद्यालय तथा क. महा. नारंडा येथे कनिष्ठ लिपीक सेवक तर नंदा मुप्‍पीडवार (भवानजीभाई चव्हाण हाय. व क. महा. चंद्रपूर) यांना उपमुख्याध्यापकपदी पदोन्नती पदास ‘ऑन द स्पॉट’ मान्यतेचे पत्र देण्यात आले. सदर सभा पाच तास चालली. (Zilla Parishad teacher issues)

    on-the-spot teacher approvals

    यावेळी मागील सभेतील इतिवृत्तावर चर्चा करण्यात आली. त्‍यानंतर सामूहिक व वैयक्‍तिक प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या विषयसूचीतील बरीच प्रकरणे निकाली काढण्यात आली. व उर्वरित प्रकरणे १० दिवसांत निकाली काढण्यात यावी, अशा सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना दिल्‍यात.

    सभेला शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पातळे, उपशिक्षणाधिकारी निकीता ठाकरे, वेतन पथक अधीक्षक श्री. वडेट्टीवार, जगदीश जुनघरी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्‍हाध्यक्ष सुनील शेरकी, जिल्‍हा कार्यवाह दीपक धोपटे, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, लक्ष्मणराव धोबे, केशवराव ठाकरे, श्रीहरी शेंडे, मारोतराव अतकरे, आनंद चलाख, हेमंतकुमार किंदरले, डॉ. विजय हेलवटे, नितीन जीवतोडे, रुपेश पुरी, प्रज्ञा बारेकर, आसमा खान, अजय विधाते, नंदकिशोर वर्धेलवार, नामदेव ठेंगणे, पाचभाई सर, नाकाडे सर, श्री. निखाडे, अनिल कंठीवार, सतीश मेश्राम व मोठ्या संख्येने जिल्ह्यातील विमाशि संघाचे सदस्‍य, समस्‍याग्रस्‍त शिक्षक उपस्‍थित होते. 

  • Stray Dog Control Program | चंद्रपूरकरांसाठी दिलासादायक बातमी – भटके श्वान आता नियंत्रीत

    Stray Dog Control Program

    Stray Dog Control Program : शहरातील मोकाट,बेवारस,भटके श्वान यांची संख्या नियंत्रित ठेवणे,रेबीज निर्मुलन व मनुष्य – प्राणी संघर्ष टाळणे या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे श्वान लसीकरण व निर्बीजीकरणाची मोहीम सुरु असुन याअंतर्गत 4020 मोकाट श्वानांचे निर्बिजीकरण तज्ञ डॉक्टरांद्वारे करण्यात आले आहे.  (Municipal Dog Control Plan)

    चंद्रपुरात आजपासून छत्रपती महोत्सवाला सुरुवात


       मोकाट, भटके श्वान ही अनेक ठिकाणची गंभीर समस्या आहे. गाडीच्या मागे धावणे,चावा घेणे,रात्रीच्या वेळेस अंगावर धाऊन जाणे त्यामुळे अपघात होणे इत्यादी प्रकारचे त्रास या बेवारस कुत्र्यांमुळे होतात. पिसाळलेल्या श्वानांच्या चाव्यामुळं,अनेकांना प्राण गमवावे लागतात किंवा रेबिजपासून वाचण्यासाठी अनेक इंजेक्शन टोचून घ्यावे लागतात. (Stop Rabies Outbreak)

    प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा 1960 व ॲनिमल बर्थ कंट्रोल 2001 नुसार श्वानांना मारण्यास बंदी आहे. मात्र मोकाट, भटके श्वान यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाते. यावर नियंत्रण आणण्यासाठी चंद्रपूर मनपाद्वारे सदर मोहीम राबविली जात आहे.


        शहरातील मोकाट श्वानांची नसबंदी करण्याची जबाबदारी पेटानिटी अँड ॲनिमल रिहॅबिलिटेटर्स (प्यार ) फाऊंडेशनकडे सोपविण्यात आली आहे. शहरात अंदाजे 8 ते 9 हजार बेवारस श्वान असुन त्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने निर्बीजीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मनपातर्फे आतापर्यंत 4020 श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे.


        शहरातील मोकाट श्वानांचे निर्बिजीकरण हे तज्ञ डॉक्टरांद्वारे निःशुल्क करण्यात येत आहे. निर्बिजीकरणाबाबत काही तक्रार असल्यास स्वच्छता विभाग प्रमुख डॉ.अमोल शेळके यांना 7588591331 या मोबाईल क्रमांकावर अथवा मनपा कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • Grand Chhatrapati Festival 2025 | छत्रपती महोत्सवाचा शानदार प्रारंभ – चंद्रपुरात मॅरेथॉन स्पर्धेत उत्साहाचा जल्लोष

    Chhatrapati Festival 2025

    Chhatrapati Festival 2025 : चंद्रपूर -:छत्रपती महोत्सव 2025 चे उदघाट्न आज गांधी चौक चंद्रपूर छत्रपती मॅरेथॉन ने संपन्न झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मॅरेथॉन ला हिरवी झेंडी दाखवून उदघाट्न केले. यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष आमदार सुधाकर अडबाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील स्पर्धकानी मोठया संख्येने सहभाग घेतला सर्वं स्पर्धकामध्ये चैतन्यपूर्ण उत्साह होता. (Chandrapur Shiv Jayanti Celebration)

    चंद्रपुरात नळ धारकांसाठी अलर्ट

    शिवरायाच्या घोषणाने वातावरण दुमदुमले होते पारितोषिक विजेते गट 1 पुरुष वय 8 ते 14वर्ष प्रथम रोशन ठाकरे, द्वितीय कृष्णा पारखी, तृतीय ,कुशल कामडे गट 2 पुरुष खुला प्रथम भूषण आस्वले द्वितीय रितिक धोडरे तृतीय, पियुष गायधनी गट 1 महिला वय 8 ते 14 वर्ष प्रथम सखी दोरखंडे द्वितीय श्रेया येवले, तृतीय तेजस्वी ठाकरे गट 2 महिला खुला प्रथम रुचिका नागरकर, द्वितीय साक्षी पेलेजवार, तृतीय लावण्या नागरकर यांनी क्रमांक प्राप्त केले तर लक्ष्मी पुंगाटी हिने प्रोत्साहन पर पारितोषिक प्राप्त केले सर्व विजेते व सहभागी यांनी 20 फेब्रुवारी ला भव्य कार्यक्रमात बक्षीस दिले जाणार आहे. (Chhatrapati Marathon 2025)

    यावेळी छत्रपती महोत्सव आयोजन समितीचे निमंत्रक संतोष कुचनकर कार्याध्यक्ष प्रा दिलीप चौधरी,सचिव हरीश ससनकर, उपाध्यक्ष राजीव कक्कड, सहसचिव बंडू धोत्रे, सोहेल शेख, कोषाध्यक्ष प्रा निलेश बेलखेडे सहकोषाध्यक्ष प्रा वैशाली तुमराम प्रसिद्धी प्रमुख विजय मुसळे मार्गदर्शक प्राचार्य सूर्यकांत खणके, नंदुभाऊ नागरकर, विजयराव टोंगे कार्यकारी सदस्य चंद्रकांत वैद्य, राजेंद्र खांडेकर, दिलीप रिंगणे, निमेश मानकर, दीपकभाऊ जेऊरकर, निशिकांत देशमुख, दिलीप होरे, विनोद थेरे, प्रा कमलकार धानोरकर, पायल अन्नदेलवार हे उपस्थित होते. संचालन हरीश ससनकर यांनी प्रास्ताविक दीपक जेऊरकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.निलेश बेलखेडे यांनी केले. मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनासाठी विजय बोरकर, जितेंद्र पिंपलशेंडे, मुकेश तेलतुंबडे, गोविंद पवार, आदर्श सर, नावेद व कृष्णा, रोशन बुजाडे यांनी सहकार्य केले.

    Chhatrapati Marathon 2025


    19 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव पालखी मिरवणूक,
    सायंकाळी 4 वाजता मार्ग गांधी चौक, जटपुरा गेट गांधी चौक या मार्गाने निघणार आहे. पालखी मिरवणूकमध्ये ढोल पथक लेझीम पथक व तसेच मिरवणुकीचे आकर्षण म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील प्रसंगावर आधारित 10 देखावे राहील,मिरवनूक मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व शिवप्रेमी साठी ड्रेस, भगवा कुर्ता व पांढरा पायजामा, महिलांसाठी भगवी साडी अथवा ड्रेस यासह इच्छुकांना फेटे घालून देण्याची व्यवस्था राहणार आहे. (Shivaji Maharaj Palakhi Procession)

    सायंकाळी 8 वाजता जाहीर व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज व आजची लोकशाही या विषयावर राजदादा घुमनर यांचे राहणार आहे.

  • Online property tax payment Chandrapur । २५% सूट घेऊन कर भरा, नाहीतर जप्त होईल मालमत्ता

    Online property tax payment Chandrapur

    15 फेब्रुवारी पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्याना ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 50 टक्के तसेच ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 45 टक्के शास्तीत सवलत मनपातर्फे देण्यात आली होती .मात्र सवलत देऊनही कर भरणा करणाऱ्यांचे प्रमाण फार  कमी असल्याने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.  

    आमदार सुधाकर अडबाले यांचा आक्रमकपणा, निप्पोन चे काम पाडले बंद

     
        15 फेब्रुवारी पर्यंत केवळ 8734 मालमत्ता धारकांनी शास्तीत सवलतीचा लाभ घेतला आहे. 15 फेब्रुवारी नंतर सुद्धा ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट मनपातर्फे देण्यात येत आहे. सवलत देऊनही मालमत्ता कर न भरण्याकडेच नागरिकांचा कल दिसत असल्याने सक्त पाऊले मनपाला उचलावी लागत आहे. (Chandrapur Municipal Corporation tax discount)

    करवसुली करिता महानगरपालिकेतर्फे १५ पथके नेमण्यात आली असुन प्रत्येक पथकाला दर दिवशी किमान १० मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याचे तसेच जप्तीसोबतच मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आले आहेत.  

    chandrapur property tax 25% discount


        ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट ही 31 मार्चपर्यंत लागू राहणार असुन कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने 31 मार्च पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे. ज्या मालकांना त्यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने आर्थिक उत्पन्न प्राप्त होत असतानाही मालमत्ता कर थकविणार्‍या थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपल्या थकीत कराचा भरणा करून महानगरपालिकेकडून करण्यात येणारी जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  Chandrapur property tax 25% discount

  • Chandrapur water bill late payment penalty । चंद्रपुरात नळधारकांसाठी अलर्ट! देयक न भरल्यास मनपाची कठोर कारवाई

    Chandrapur water bill late payment penalty

    Chandrapur water bill late payment penalty : देयक प्राप्त होताच पहिल्या 15 दिवसांत देयकाचा भरणा करणाऱ्या नळधारकांसाठी चंद्रपुर महानगरपालिकेतर्फे 10 टक्के सूट देण्यात असुन त्यानंतरच्या 15 दिवसात देयकाचा भरणा करणाऱ्या नळधारकांना 5 टक्के सूट देण्यात येणार आहे. मात्र उपरोक्त कालावधीमध्ये देयकाचा भरणा न केल्यास देयक रकमेवर 2 टक्के प्रति माह दंड आकारण्यात येणार असुन जलमापकामधे कुठल्याही प्रकारची हेरफेर केल्याचे आढळल्यास दुपटीने कर आकारणी व 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती मनपा पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.  (Chandrapur water supply latest update)

    chandrapur water supply latest update


       नळ कनेक्शन घेतांना अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या नावाने वेगवेगळे जोडणी घेण्यात आली आहे.परंतु अश्या नळांमधुन पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अश्या 47 अपार्टमेंटची नोंद घेऊन त्यांचे नळ कनेक्शन कपात करण्यात आले असुन एका अपार्टमेंटला एक नळ जोडणी या तत्वावर 25 एमएम किंवा 50 एमएम आकाराचे कनेक्शन घेण्याकरिता नोटीस देण्यात आली आहे. How to pay water bill online in Chandrapur 

    राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा

           
       दरम्यान जलमापक यंत्र ( मीटर ) काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या 1560 नळ धारकांवर नळ कपातीची कारवाई करण्यात आली असुन 570 जलमापक यंत्र जप्त करण्यात आले आहे.तसेच मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या 2407 नळधारकांची नोंद घेण्यात आली असुन त्यांनी मीटर जोडणी न केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.   Municipal Corporation water disconnection notice  


       काही नळ ग्राहक हे पाणी वापराचा खर्च टाळण्याच्या दृष्टीने पाईपलाइनवर बसविण्यात आलेले जलमापक यंत्र काढुन पाणी भरत असतात. त्यामुळे अनेकदा  नागरिकांचे देयक हे शून्य रुपये येते.सदरची बाब नियमबाहा असल्याने असे प्रकार थांबविण्याच्या दृष्टीने येत्या 15 दिवसांत पाणी पुरवठा कार्यालयात प्रत्यक्ष अथवा भ्रमणध्वनी व्दारे संपर्क करून नळ जोडणी करून घेण्याच्या सूचनाही व्हॉल्वमनमार्फत सदर नळ धारकांना देण्यात आल्या होत्या. परंतु अजुनही काही नळ धारकांनी नळ जोडणी न केल्याने अश्या ग्राहकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.

    how to pay water bill online in chandrapur


        नळ कपातीसाठी महानगरपालिकेमार्फत 6 पथक तयार करण्यात आले आहे. ज्या नळ ग्राहकांची नळ कपात करण्यात आलेली आहे अश्या ग्राहकांनी पुनश्चः नळ जोडणीकरिता आवश्यक शुल्क आकारणीचा भरणा करावा, यासाठी मनपा पाणी पुरवठा विभाग अथवा पाण्याची टाकी कार्यालय येथे संपर्क करण्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • Nippon Dendro Project Protest । निप्पॉन डेंड्रो प्रकल्पस्थळी तणाव – आमदारांच्या हस्तक्षेपानंतर कंपनीचे काम थांबले!

    Nippon Dendro Project Protest

    Nippon Dendro Project Protest : चंद्रपूर : निप्पॉन डेंड्रो प्रकल्पाकरीता संपादित करण्यात आलेल्या भद्रावती तालुक्यातील मौजा विजासन, रुयाड (रिठ), पिपरी (देश.), टोला, चारगांव, लोणार (रिठ), तेलवासा, कुनाडा, चिरादेवी व ढोरवासा या गावातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रशासनासोबत चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे आज, दि. १७ फेब्रुवारी २०२५ ला पोलिस बंदोबस्ताचा वापर करुन खाजगी कंपनीने काम सुरु केले होते. प्रकल्पग्रस्तांमार्फत विरोध होऊ नये, यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाने प्रमुख चार प्रकल्पग्रस्तांना स्थानबद्ध करून ठेवले होते. या घटनेची माहिती शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांना मिळाली असता त्यांनी लगेच पोलिस स्टेशन गाठून स्थानबद्ध केलेल्या प्रकल्पग्रस्तांना बाहेर काढले व घटनास्थळी जावून कंपनीचे काम बंद पाडले.

    आगीत घर झाले भस्मसात, त्या महिलेला आहे मदतीची गरज

    या घटनेतून प्रशासनाचे दुटप्पी धोरण प्रकल्पग्रस्तांच्या नजरेस आले. परिणामी प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष निर्माण झाला असून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी जिल्हा व तालुका महसूल तथा पोलिस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. सोबतच पुन्हा कंपनीचे काम सुरु झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

    midc land acquisition issue

    उपअभियंता म.औ.वि.म. उपविभाग, चंद्रपुर यांचे कार्यालय, चंद्रपुर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चंद्रपुर येथील भद्रावती औद्योगिक क्षेत्र विकसीत करण्यात आले आहे. सदर औद्योगिक क्षेत्राकरिता तालुक्यातील निप्पॉन डेंड्रो प्रकल्पाकरिता २८ वर्षे अगोदर संपादित करण्यात आलेली मौजा विजासन, रूयाळ, पिपरी, चारगाव, लोणार, तेलवासा, ढोरवासा, चिरादेवी, गवराळा येथिल जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ द्वारा संपादीत केले आहे.

    सदर भुखंड क. बी-०१ क्षेत्र ४३,०००० चौरस मिटर मेसर्स ग्रेटा एनर्जी लिमिटेड भुखंड क. बी-३ क्षेत्र ६३७४८०० चौ.मी मेसर्स न्यु इरा क्लीनटेक सोल्युशन प्रा. लि यांना वाटप करण्यात आली असुन सदर जमीनीचा रक्कमेचा भरणा कंपनीने केलेला आहे. (MIDC Land Acquisition Issue)

    चारगाव येथील सर्वे न.४६ क्षेत्र ७२.५६ हे.आर, लोनार रिठ येथील सर्वे न. ११० क्षेत्र १७६.५४ हे.आर, ढोरवासा येथील सर्वे न. ९१ क्षेत्र १६३. १६, रूयाड रिठ येथील सर्वे न. ५५ क्षेत्र ११९.७६ हे. आर, विजासन येथील सर्वे न. ५० क्षेत्र ११२.८० हे.आर एकुण सर्वे न. ३५२ क्षेत्र ६४४.८२ हे.आर. तसेच मे. ग्रेटा एनर्जी लि. यांना क्षेत्र ५५.०२ हे.आर ही जमिनीवरील अतीक्रमण काढुन कंपनीच्या ताब्यात देण्याकरिता आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ ला पोलीस बंदोबस्तात काम सुरु करण्यात आले. यासाठी पोलिस प्रशासन लाठी व हेल्मेटसह बंदोबस्ताचे तयारीने पोहोचले.

    प्रकल्पग्रस्तांचा विरोध होऊ नये म्हणून चार प्रकल्पग्रस्त प्रमुख वासुदेव ठाकरे, प्रवीण सातपुते, संदीप खुटेमाटे, आकाश जुनघरे यांना आज सकाळपासूनच स्थानिक पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करुन ठेवले. आमदार सुधाकर अडबाले वेळेवर आले नसते तर प्रशासन व कंपनी डाव साधण्यात यशस्वी झाले असते. परंतु, आमदार अडबाले यांच्या दणक्याने कंपनीला काम बंद करावे लागले. (Police Action on Land Protests)

    police action on land protests

    प्रकल्पग्रस्त एकरी दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान व प्रकल्पग्रस्त तथा प्रकल्पबाधित गावातील बेरोजगार यांना कौशल्यानुसार नोकरी देण्यात यावी, या मागणीसाठी चर्चा व बैठका करीत आहे. मात्र, प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता, मागण्यांची पूर्तता न करता, पोलिस बंदोबस्तात कंपनीचे काम सुरु करण्याची प्रक्रिया जिल्हा व तालुका प्रशासनाची दुटप्पी भूमिका दर्शवित असल्याचे यावेळी प्रकल्पग्रस्तांनी म्हटले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त व गावकरी उपस्थित होते. (Nippon Dendro Maharashtra)

    दरम्यान आमदार सुधाकर अडबाले यांची कंपनीचे व्यवस्थापक व उपविभागीय अधिकारी यांचेशी चर्चा झाली असता शेतकऱ्यांसह पुढील बैठक व मागण्यांची पूर्तता होईपर्यंत काम सुरु करणार नाही, असे सांगण्यात आले.

  • State Level Handball Championship । महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला नवी दिशा – श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव

    State Level Handball Championship

    State Level Handball Championship : खेळ केवळ मनोरंजनाचा किंवा शरीरतंदुरुस्तीचा भाग नाही, तर तो शिस्त, संघर्ष, जिद्द आणि विजयाच्या प्रवासाचे प्रतीक आहे. आज येथे महाराष्ट्रभरातील नामांकित संघांनी सहभाग घेतला आहे, ही निश्चितच क्रीडा क्षेत्रासाठी उत्साहवर्धक बाब आहे. हँडबॉल सारखा वेगवान आणि चपळाईचा खेळ खेळताना, प्रत्येक खेळाडूने खेळाडूवृत्ती, संघभावना आणि मेहनतीचे महत्त्व लक्षात ठेवावे. या क्रीडा महोत्सवातून देश पातळीवर राज्याचे नाव लौकिक करणारे उत्कृष्ट खेळाडू घडावेत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने आरोही बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने खुटाळा येथे राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनचे सचिव रणधीर सिंग, आरोही बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धीरज वर्मा, अशोक मत्ते, क्रीडा संयोजक बाल्मीक खोब्रागडे, खुटाळा माजी सरपंच गुड्डू सिंग, हँडबॉल असोसिएशन चंद्रपूरचे सचिव प्रकाश दुमाने, राशिद हुसेन, नकुल वासमवार, अमोल शेंडे, स्वप्निल पटकोटवार आदी मान्यवर उपस्थित होते.

    त्या महिलेला आहे मदतीची गरज, घराला लागलेल्या आगीत संसार उघड्यावर

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, राज्यभरातील युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, त्यांची कौशल्ये विकसित व्हावीत आणि ते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला नवीन दिशा मिळेल. संघर्ष हाच खरा विजय असून सामना जिंकणारा संघच नाही, तर या स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक खेळाडू विजयासाठी पात्र आहे. खेळाच्या माध्यमातून सशक्त समाज आणि सशक्त राष्ट्र घडविण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे.

    आपण दरवर्षी श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करत असतो. यंदाही हे यशस्वी आयोजन सुरू असून आपण विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचेही आयोजन केले होते. यात विदर्भातील १५० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. आपण आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेमुळे चंद्रपुरात अनेक कुस्तीपटू घडत आहेत. असे आयोजन नियमित करण्याचा पुढेही आमचा प्रयत्न असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. (Chandrapur Sports News)

    ही स्पर्धा म्हणजे केवळ एक स्पर्धा नाही, तर ती महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीला मिळालेली नवी दिशा आहे. जीवनात संघर्षाला कसे सामोरे जायचे, अपयशावर मात करून यश कसे मिळवायचे, हे खेळ आपल्याला शिकवतात. त्यामुळे ‘खेलो इंडिया (Khelo India)’, ‘फिट इंडिया’ अशा मोहिमांद्वारे सरकारही क्रीडा क्षेत्राला भरघोस पाठबळ देत आहे. विजय किंवा पराजय हा क्षणिक असतो, पण जिंकण्याची मानसिकता आणि खेळाडूवृत्तीच तुम्हाला आयुष्यात मोठे बनवते. मैदानात उतरताना फक्त सामना जिंकायचा असा विचार न करता, खेळाचा आनंद घ्या, स्वतःला सिद्ध करा, असे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    chandrapur sports news

    या स्पर्धेत राज्यभरातील संघांनी सहभाग घेतला होता. २० वर्षांनंतर प्रथमच हँडबॉल स्पर्धेचे राज्यस्तरीय (Handball Tournament 2025) आयोजन करण्यात आले होते. काल, रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. यात नागपूर संघाने २६-११ अशा फरकाने अमरावतीच्या संघावर  दणदणीत विजय मिळविला. तर तृतीय क्रमांकासाठी झालेल्या कोल्हापूर विरुद्ध मुंबई या संघाच्या सामन्यात मुंबई संघाने २४-१० च्या फरकाने कोल्हापूर संघाचा पराभव केला. त्यानंतर हँडबॉल असोसिएशन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अध्यक्ष अनिल धानोरकर, राज्य संघटनेचे पदाधिकारी सोर, नामदेव डावले, गुड्डू सिंग, मनोज ठेंगणे, विकी रामकृष्ण आदी मान्यवरांच्या हस्ते विजयी संघाला पुरस्कार वितरित करण्यात आला.

  • Chandrapur House Fire |चंद्रपूरमध्ये भीषण आग: शिक्षणासाठी ठेवलेली रक्कमही भस्मसात

    Chandrapur House Fire

    अंचलेश्वर मंदिर वार्डमध्ये घराला भीषण आग; संगीता हांडे यांचा संसार उघड्यावर

    Chandrapur House Fire – चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर मंदिर वार्ड येथे आज सकाळी १० वाजताच्या सुमारास एका घराला भीषण आग लागली. या आगीत संगीता हांडे यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले असून, या दुर्घटनेमुळे त्यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे. (Family Homeless After Fire)

    घटनेचा तपशील

    अंचलेश्वर बस स्टॉपच्या मागील भागात संगीता हांडे आपल्या मुलीसोबत राहत होत्या. आज त्यांची मुलगी बारावीच्या परीक्षेसाठी लवकर घरातून निघून गेली होती, तर संगीता हांडे या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि घराच्या सर्व भागांना वेढा घातला.

    चंद्रपूर लवकरच बनेल मेडिकल टुरिझम हब

    नागरिकांची तत्परता आणि अग्निशमन दलाचे प्रयत्न

    घरातून धूर निघताना पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या काही वेळात घटनास्थळी पोहोचल्या आणि अथक प्रयत्नानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण घर आणि त्यातील साहित्य जळून खाक झाले होते.

    संपत्तीचे मोठे नुकसान

    घराची अवस्था पाहून संगीता हांडे यांनी टाहो फोडला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी साठवलेले ५० हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने आगीत भस्मसात झाले. संगीता हांडे यांचे पती दोन वर्षांपूर्वी निधन पावले होते, त्यानंतर त्या आपल्या मुलीसोबत येथे राहत होत्या. या आगीने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

    आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही

    या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्ट सर्किट किंवा गॅस गळतीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अधिकृत तपास सुरू असून, प्रशासनाकडून संगीता हांडे यांना मदतीसाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

    संगीता हांडे यांना मदतीची गरज

    या दुर्घटनेत सर्वस्व गमावलेल्या संगीता हांडे यांना समाजातील दानशूर व्यक्ती तसेच प्रशासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. विशेषतः त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात, जेणेकरून तिचे शिक्षण अडथळ्याशिवाय सुरू राहू शकेल. (Woman Loses Home in Fire)

  • Top NMMS Scholarship Achievers । चंद्रपूर महानगरपालिका शाळेतील यशस्वी विद्यार्थी

    Top NMMS Scholarship Achievers

    Top NMMS Scholarship Achievers : चंद्रपूर महानगरपालिकेच्या पीएम श्री सावित्रीबाई फुले शाळेतील 20 विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ( एनएमएमएस ) परीक्षेत उत्तीर्ण झाले असुन शहरातील एका शाळेतील सर्वात अधिक संख्येने या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान मनपा शाळेने मिळविला आहे.

    सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सवी सोहळा

     
        जातीनिहाय आरक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या अनेक कल्याणकारी शिष्यवृत्ती योजनांचा दरवर्षी लाभ मिळत असतो. परंतु ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशपातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रक्षेची जोपासना, तसेच त्यांचे 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. (Scholarship Opportunities for Bright Students)

    शिष्यवृत्तीत १२ हजार रुपयांची वाढ


        प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती  सलग चार वर्षे म्हणजे 8 वी ते 12 वी पर्यंत मुलांना देण्यात येते. यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रति वर्षासाठी बारा हजार याप्रमाणे चार वर्षासाठी 48 हजार रुपये मिळत होते. आता यात एक वर्ष वाढल्याने त्यात 12 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच याआधी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा दीड लाख रुपये होती. आता त्यात दोन लाखांनी वाढ झाल्याने साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांना देखील ही शिष्यवृत्ती परीक्षा देता येत आहे. (NMMS Scholarship 2025)

    हे आहेत यशस्वी विद्यार्थी


       मनपा शाळेतील गुणवंतांमध्ये अनुष्का भालेराव, गणेश ठाकरे, संस्कृती घोटेकर,वैष्णवी कंदीकुरवार, शौर्य आंबटकर,रिंषा मुजुमदार,प्रशिल रामटेके,भूमिका निखाडे,सोहम सोरते,कैसीकौर भोयर,गौरव नंदनवार,माही निमगडे,श्रेयस दुर्योधन,रचना शंभरकर,समीक्ष गोदरवार,रोजीना सिद्दीकी,लुकेश जेंगठे,आरुषी देवघरे,प्रज्वल वैरागडे,वंश पवार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (Chandrapur’s Best NMMS Performers)    
       आयुक्त विपीन पालीवाल,अतिरीक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले व प्रभारी शिक्षणाधिकारी नागेश नीत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.  

  • Women cooperative bank in Chandrapur । “सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सव: मुख्यमंत्री फडणवीस यांची सहकार क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!”

    Women cooperative bank in Chandrapur

    Women cooperative bank in Chandrapur : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. जेथे आर्थिक संस्था उभ्या राहतात, तेथे विकास भरभरून होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग क्षेत्रासोबत जोडले आहे. आज भारतातील प्रत्येक नागरिकाचे बँक खाते आहे. त्यामुळे एक डीजीटल ओळख निर्माण झाली आहे. त्याचा फायदा थेट नागरिकांना मिळत असून देशाच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासामध्ये आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा असतो, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

    सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त प्रियदर्शनी इंदिरा सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, कीर्तिकुमार भांगडीया, करण देवतळे, देवराव भोंगळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी मंत्री व बँकेच्या संचालिका शोभाताई फडणवीस, अध्यक्षा डॉ. रजनी हजारे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते. (Women cooperative bank in Chandrapur )

    सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेने 25 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केले, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सहकार क्षेत्रात विदर्भातील एक अग्रगण्य बँक म्हणून सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेची ओळख आहे. (Sanmitra Women’s Cooperative Bank) महिलांना अर्थकारण उत्कृष्टपणे समजते. बचत करणे हा महिलांचा मूळ गुणधर्म आहे. त्यामुळे महिलांच्या हाती बँक असेल तर ती उत्कृष्टच चालेल, यात शंका नाही. रिझर्व बँकेच्या कायद्याचे पालन करीत तसेच एनपीए मानकाला छेद न देता बँक चालविणे अतिशय महत्त्वाचे आहे. (Women empowerment in banking)

    सहकारी बँकेवर नागरिकांचा विश्वास असतो. या बँकेबद्दल सामान्य माणसाला आपुलकी असते. बँकेने सुद्धा दिलेले कर्ज शिस्तीमध्ये परत घेतले पाहिजे. आज 300  कोटींची उलाढाल असलेल्या सन्मित्र बँकेचा एनपीए 0.5 टक्क्यांच्या खाली आहे, ही अतिशय उत्कृष्ट कामगिरी असून यासाठी सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. (Cooperative banking success stories)

    पुढे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांनी अतिशय चांगली प्रगती केली आहे. व्यावसायिक बँकांसमोर सहकारी बँकेने आव्हान उभे केले आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सहकारी बँका टिकतील का, असा प्रश्न उपस्थित होत असताना सन्मित्र सारख्या बँकांनी हे आव्हान चांगल्या पद्धतीने स्वीकारून यशस्वीपणे वाटचाल केली आहे. आज या बँकेने कोर बँकिंग, डिजिटल बँकिंग (Digital banking) पद्धती स्वीकारली आहे. सन्मित्र बँकेने ग्राहकांच्या सुरक्षेचे विषय हाती घेतले आहेत. बँकांकडून नागरिकांना कर्ज दिली जातात. त्यामुळे नागरिक स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय करीत आहे. सन्मित्र बँकेने सुद्धा नागरिकांना कर्ज उपलब्ध करून दिले आहेत. त्यातून त्यांनी रोजगार उभा केला. त्यामुळे अर्थव्यवस्थेची चक्र चालण्यास मदत झाली. या बँकेने पुढील वाटचाल अधिक जोमाने करावी. (Cooperative banking success stories)

    sanmitra woman's cooperative bank

    संयुक्त राष्ट्र संघटनेने 2025 हे वर्ष सहकार वर्ष म्हणून जाहीर केले आहे. याच वर्षी सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सव होत आहे, ही आनंदाची बाब आहे. भविष्यात आणखी दमदार पाऊल टाकून 500 कोटी, 750 कोटी आणि 1000 कोटीचा टप्पा बँकेने पार करावा. तसेच इतर सहकारी बँकांसाठी सन्मित्र बँक एक रोल मॉडेल म्हणून उभी राहावी, अशी अपेक्षा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

    चंद्रपूर बनेल मेडिकल टुरिझम हब

    यावेळी बोलताना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा विस्तार सहा-सात जिल्ह्यात झाला असून महिलांना आर्थिक सक्षम करणे, हेच या बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बँकेला नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

    प्रास्ताविकात संचालिका शोभाताई फडणवीस म्हणाल्या, सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस उपस्थित राहिले, याचा मनापासून आनंद आहे. बँकेची वाटचाल यशस्वीपणे होत असून पुढे जाण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे. आज सन्मित्र बँकेच्या सर्व शाखांमध्ये एटीएम, डीजीटल बँकींग आदी सोयीसुविधा आहेत. विशेष म्हणजे आमच्या बँकेचा एनपीए कमी आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बँकेच्या अध्यक्षा डॉ. रजनी हजारे यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.

    cooperative banking success stories

    तत्पुर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘लक्षलक्षिता’ या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कर्मवीर मा.सां. कन्नमवार यांचे नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कीर्ति चांदे यांनी तर आभार माधवी तांबेकर यांनी मानले.