सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांच्या प्रयत्नांना यश
University PhD viva process : गोंडवाना विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता Ph. D. पदवी प्रदान करण्याची अधिसूचना (Notification) थेट Viva-Voce च्या दिवशीच प्रकाशित केली जाणार आहे. यामुळे संशोधन विद्यार्थ्यांना त्वरित प्रमाणपत्र मिळेल आणि ते सरकारी व खाजगी नोकरी भरती प्रक्रियेत त्वरित पात्र ठरू शकतील. PhD certificate verification
पूर्वी, गोंडवाना विद्यापीठात Ph. D. Viva-Voce झाल्यानंतर साधारणतः 15 दिवस ते एक महिना अधिसूचना जाहीर करण्यात विलंब होत असे. त्यामुळे या कालावधीत जर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती निघाली, तर संबंधित विद्यार्थी पात्र ठरत नव्हता आणि त्याला संधी गमवावी लागत होती.
या समस्येची दखल घेत, गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तथा युवासेना विभागीय सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांनी ही प्रक्रिया गतिमान करण्याचा ठराव मागील अधिसभेत मांडला. सिनेट सदस्य डॉ. प्रवीण जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली हा ठराव मांडण्यात आला आणि तो सभागृहाने मंजूर केला. यामुळे आता Viva-Voce पार पडल्यानंतर लगेचच विद्यापीठ अधिसूचना प्रसिद्ध करेल आणि विद्यार्थ्यांना लगेच त्याचा लाभ मिळेल.
Ph. D. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी प्रा. निलेश बेलखेडे आणि डॉ. प्रवीण जोगी यांचे विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाकडून मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले जात आहेत.
Wcl Workshop theft case : वेकोलि बल्लारपूर मधील वर्कशॉपच्या भिंतीला होल पाडून अज्ञातांनी डबल टेंडन्ट गेअर पंप व इतर भंगार असा एकूण ५ लाख ७२ हजार रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी पोलिसांनी २ आरोपीना अटक केली आहे.
बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेकोलिच्या वर्कशॉप मध्ये चोरांची नजर पडली आणि त्यामधील लोखंडी साहित्यांची धाडसी चोरी करण्यात आली. यासाठी आरोपींनी एखाद्या चित्रपटासारखी कामगिरी करीत वर्कशॉपच्या भिंतीला होल पाडत त्यामधील महागड्या लोखंडी वस्तू २ मग टेंडन्ट गियर पंप आणि भंगार चा माल चोरून नेला. double tandem gear pump theft
याबाबत सुरक्षा व्यवस्थापकाने बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, बल्लारपूर पोलिसांनी कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याबाबत तपास सुरु करीत अज्ञात आरोपी व चोरी गेलेल्या मालाचा शोध सुरु केला.
पोलिसांनी या चोरी प्रकरणात २० वर्षीय श्रीराज संग्राम बहुरिया राहणार सरदार पटेल वॉर्ड बल्लारपूर व २२ वर्षीय करण इंदू निषाद राहणार रामनगर सस्ती राजुरा याला अटक केली. आरोपीसोबत इतरही साथीदार होते अशी माहिती पोलिसांना तपासात प्राप्त झाली. stolen scrap metal recovery
दोन्ही आरोपीनी चोरी केलेला मुद्देमाल वेकोलि वर्कशॉप च्या मागील भागात असलेल्या झुडपात लपून ठेवला होता. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात सपोनि मदन दिवटे, पोलीस कर्मचारी आनंद परचाके, रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सुनील कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, शरदचंद्र कारुष, वशिष्ठ रंगारी, मिलिंद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, नासिर सय्यद, अनिता नायडू यांनी केली.
how local leaders solve citizen issues : आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूस येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. स्नेहप्रभा मंगल कार्यालयात झालेल्या या जनता दरबारात घुग्घूसवासीयांनी अधिकाऱ्यांसमक्ष आपल्या समस्या मांडल्या. यावेळी आलेल्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. जनता दरबार हा केवळ समस्या मांडण्याचा नव्हे, तर त्या सोडवण्याचा प्रभावी मंच आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुरावा कमी करून प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले जाईल, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. MLA public meeting impact
यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, घुग्घूस नगर परिषदेचे मुख्य अधिकारी निलेश रांजनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश अमरशेट्टीवार, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, महावितरण विभागाचे अभियंता पेंदोर, वेकोलीचे उपक्षेत्रीय व्यवस्थापक रेड्डी, आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे अधिकारी तसेच घुग्घूसचे माजी सरपंच संतोष नुने, उपसरपंच संजय तिवारी, माजी जिल्हा परिषद सभापती नितू चौधरी,
माजी ग्रामपंचायत सदस्य वैशाली ढवस, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विवेक बोढे, इमरान खान, सुधाकर रेड्डी, राजकुमार गोडशेट्टीवार, सुनिता गिवे, स्वप्निल वाढई, मुन्ना लोढे, उषा आगदारी, मयुर कलवल, विशाल दामेर, श्याम आगदरी, विनोद चौधरी, वनिता निहाल, अनिल बाम, निरिक्षण तांड्रा, कुसुम सातपूते, साजन गोहणे, नितू जैस्वाल, सविता गोहणे, सिनु रामटेके, विनोद चौधरी, मल्लेश बल्ला, नंदकिशोर यादव, राहुल झाडे आदींची उपस्थिती होती. Local Government Public Meetings
घुग्घूस शहरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी स्नेहप्रभा मंगल कार्यालयात आयोजित जनता दरबार मोठ्या प्रतिसादात पार पडला. या दरबारात शेकडो नागरिकांनी हजेरी लावून स्वतःच्या समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. प्रशासनाच्या वतीने विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहिल्याने नागरिकांच्या अडचणी तत्काळ नोंदवून त्यावर उपाययोजना करण्यास गती मिळाली. जनता दरबारात पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, वेकोलीशी संबंधित तक्रारी, वसाहतीतील नागरी सुविधा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. नागरिकांच्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी गांभीर्याने उत्तर देत काही तक्रारींवर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. how public hearings help citizens
घुग्घूसच्या नागरिकांनी आपले प्रश्न प्रामाणिकपणे मांडले. मात्र, प्रश्न उपस्थित करणे हेच शेवटचे पाऊल नाही, तर त्यावर तोडगा काढणे हा जनता दरबार मागचा खरा उद्देश आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने शहराचा विकास साधला जाईल. तुमच्या प्रत्येक समस्येवर तातडीने निर्णय घेतला जाईल आणि आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
आज या जनता दरबारात आपण उत्साहाने सहभागी झाला आहात, हेच या उपक्रमाचे यश आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करता तेव्हाच लोकशाहीचे खरे स्वरूप दिसते. आज येथे आलेल्या प्रत्येक नागरिकाने आपली अडचण मांडली आणि प्रशासनाने ती गांभीर्याने ऐकून घेतली आहे. जनता दरबार केवळ चर्चेपुरता मर्यादित नसून, अमलबजावणीची सुरुवात आहे असेही आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि घुग्घूसवासीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Ghuggus Chandrapur shocking incident : चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस येथे संतापजनक घटना घडली असून ३९ वर्षीय इसमाने शाळकरी मुलींना बघून हस्तमैथुन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, याप्रकरणी त्या विकृताला शाळकरी मुली यांच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली.
घुग्घूस येथे शनिवारी, दिनांक 22 मार्च रोजी, सुभाष नगर येथील बस स्टँड परिसरात शाळेतील मुले शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना आणि शाळेतून परत येताना चिल्ड्रन पार्क परिसरात एका विकृत ३९ वर्षीय सागर आरापेल्ली निवासी शालीकराम नगर, घुग्घूस) याने मुलींना आपल्या लाल रंगाच्या बलेनो कारमध्ये (क्रमांक MH 34 CD 8166) बसून हस्तमैथुन केले. Schoolgirls harassment case India 2025
यासह शाळकरी मुलींना आरोपीने अश्लील हातवारे केले या प्रकाराबाबत मुलींनी आपल्या पालकांना सांगितले. संतप्त झालेल्या पालकांनी याची तक्रार पोलिसांना केली. पोलिसांनी या विकृत व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 75 (2) बी आणि पोक्सो कायद्यांतर्गत कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला चंद्रपूर न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आणि त्याची गाडी जप्त करीत घुग्घूस पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे. पुढील तपास घुग्घूस पोलीस करत आहेत.
“छोट्या गावात मोठा जुगार: चंद्रपूरमध्ये सट्टेबाजीचे जाळे”
IPL betting impact on youth -आजच्या आधुनिक युगात बेरोजगार तरुण ऑनलाईन माध्यमातून बक्कळ पैसे कमवू शकतात, मात्र त्यासाठी मार्ग हे साधे किंवा खडतर असतात. यासाठी शिक्षण हे गरजेचं असते का? तर काही ठिकाणी शिक्षणाला महत्व तर काही ठिकाणी आपल्याला समजण्याइतकं मोबाईल ज्ञान हवे. ऑनलाईन माध्यमातून पैसे कमविण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहे मात्र चंद्रपुरात थोडे पैसे देऊन आपण ३ तासात लाखो रुपये कमवू शकतो. IPL betting addiction signs
२२ मार्चपासून आयपील क्रिकेट हंगामाला सुरुवात झाली असून यासाठी सध्या अनेक क्रिकेट सट्टेबाज सक्रिय झाले आहे, तरुणाईला जुगाराच्या विळख्यात आणण्याचे प्रयत्न या सट्टेबाजांकडून सुरु आहे. आपल्याला या सट्टेबाजांसोबत काम करायचे असल्यास सहजपणे आपण त्यांच्या संपर्कात येऊ शकतो पण अजूनही पोलीस विभाग यांच्या संपर्कात जसा यायला हवा तसा आला नाही. Youth gambling prevention strategies
चंद्रपुरात असलेल्या सट्टेबाजांच्या बॉक्स ला अनेक तरुणाई जुळली आहे. Nice7777 नंतर आता Nice45 या ऑनलाईन वेबसाईटचा धुमाकूळ सुरु झाला आहे. हे नेटवर्क चालविणारे सट्टेबाज यांचं शिक्षण कमी पण प्रशिक्षण मात्र चांगलं आहे, शासकीय अधिकरी महिन्याला जितका पगार कमवितो तितका पगार हे एका तासात कमवितात, कारण याच्यामागे राजकीय नेत्यांचं चांगलं पाठबळ व पोलीस प्रशासन आपलं काही बिघडवू शकत नाही अशी भावना यांच्या मनात रुजलेली आहे. Impact of online gambling on Indian youth
पोलिसांनी कारवाई जरी केली तर लगेच जामीन होतो, कायदा तसाच आहे, मात्र हे नेटवर्क संघटित गुन्हेगारीच्या श्रेणीत येत असल्यावर सुद्धा यांच्या त्या पद्धतीने कारवाई केल्या जातात नाही हि एक शोकांतिका आहे. कायद्याची कसलीही भीती नसणारे सट्टेबाज आज तरुणाईला जुगाराचे ऑनलाईन व्यसन लावत त्यांचं आर्थिक नुकसान करीत आहे. देशात जुगार व सट्टेबाज यावर प्रतिबंध असला तरीही खुलेआम हे कार्य केल्या जाते त्यासाठी त्यांना आर्थिक क्रांती आणावी लागते.
चंद्रपुरात युवकांना कमी वेळात पैसे कमविण्याची संधी देणारे प्रमुख सूत्रधार अविनाश-राकेश, महेश-राजीक, नीरज-बंटी व प्रदीप अजूनही नावे यामध्ये आहे, युवकांना क्रिकेट जरी खेळता येत नसेल तर त्यांना काही एक घाबरण्याचे काम नाही कारण हे सदरील व्यक्ती त्यांच्यासाठी एक गुरु आहे. युवकांना फक्त घरबसल्या आयपीएल सामने बघत त्यावर पैसे लावायचे आहे, पैसे जिंकलात तर नशीब नाहीतर आर्थिक नुकसान झालंच बघा.
पोलिसांकडे सक्षम यंत्रणा असून सुद्धा ऑनलाइनच्या माध्यमातून सुरु असलेल्या या जुगारावर त्यांचे अद्यापही नियंत्रण नाही, नागपुर-दुबई मधून ऑनलाईन जुगाराची सूत्रे हलविण्यात येतात हि बाब पोलीस यंत्रणेला सुद्धा माहिती आहे. गडचिरोली पोलिसांनी हे नेटवर्क उध्वस्त करण्याचा निर्भीड प्रयत्न केला होता पण त्यानंतर आज हा जुगार लाखो वरून कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहचलेला आहे, ज्यामुळे तरुणाई या जुगाराच्या चक्रात फसलेली दिसून येते.
Lok Adalat Case Resolution India : विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभीश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली 22 मार्च रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर लोक अदालतीमध्ये प्रलंबीत न्यायालयीन प्रकरणे एकुण 9447 व दाखलपुर्व प्रकरणे 15842 ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबीत न्यायालयीन प्रकरणांपैकी 774 प्रकरणे तर दाखलपुर्व प्रकरणांपैकी 366 अशी एकूण 1340 प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रलंबीत प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे 25 निकाली काढण्यात आली असुन नुकसान भरपाई रक्कम 2 कोटी 19 लाख 55 हजार रूपये वसुल करण्यात आली. Chandrapur District Court News
निकाली प्रकरणांपैकी एका प्रकरणात 45 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. तसेच भुसंपादनाची एकुण 6 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात नुकसान भरपाईची रक्कम 42 लाख 17 हजार रूपये मंजुर करण्यात आले. धनादेश प्रकरणांपैकी 125 प्रकरणे निकाली काढण्यात आली. कामगार व औद्योगीक न्यायालयातील एकुण 3 प्रकरणे निकाली काढण्यात आली. Benefits of Lok Adalat
चंद्रपूर जिल्हयातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, सर्व वकील, सर्व न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.
Maharashtra police crime crackdown : गुन्हेगारी क्षेत्रात तरबेज व पोलिसांच्या अटकेपासून मागील २० वर्षांपासून पसार असलेला ६० वर्षीय आरोपी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला. सदर आरोपी चोरी केलेले सोन्याचे दागिने चंद्रपुरात विक्री करण्याकरिता आला असता त्याला अटक करण्यात आली.
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशाने जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा सतत कारवाई मोहीम राबवित आहे, या मोहिमे दरम्यान चंद्रपूर शहरात एक इसम सोनीचे दागिने विकणेकामी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. Chandrapur police crime news
माहितीच्या आधारे पोलिसांनी ६० वर्षीय सुरेश महादेव कामरे राहणार पुनवट तालुका वणी जिल्हा यवतमाळ ला अटक करण्यात आली. आरोपी कामरे जवळ २ लाख ६१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
आरोपी सुरेश कामरे यांनी नुकतीच पोलीस स्टेशन तळोधीच्या हद्दीत चोरी केल्याची बाब पोलिसांसमोर कबुल केली. आरोपीने आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती मध्ये १, वरोरा ३, सावली १, मुल १, तळोधी ५ व नागभीड तालुक्यात १ घरफोडी अश्या एकूण १२ घरफोड्या केल्या अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली. १२ घरफोडी मधील तब्बल १९ लक्ष १० हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.
आरोपी सुरेश कामरे हा मागील २० वर्षांपासून घरफोडी गुन्ह्यात सक्रिय असून तो आजपर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही, चोरीसाठी आरोपी हा ग्रामीण भागातील घराना लक्ष्य करीत होता. २० वर्षात त्याने अनेक गुन्हे केले मात्र चंद्रपुरात दागिने विकण्याकरिता आला असता याठिकाणी तो फसला. Criminal arrested after 20 years
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मूमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल कचोरे . यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोउपनि सुनील गौरकार, पोलिस कर्मचारी धनराज करकाडे, सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, चेतन गज्जलवार, सुरेंद्र महंतो, प्रफुल गारघाटे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अमोल सावे,दिनेश अराडे व मिलिंद टेकाम यांनी केली.
Chaitra Navratri preparations 2025 : ३ एप्रिलपासून चंद्रपूरात चैत्र नवरात्र यात्रेला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून महाकाली मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत चंद्रपूर शहर महानगरपालिका, भारतीय जनता पक्ष, श्री महाकाली माता महोत्सव समिती, महाकाली मंदिर ट्रस्ट आणि महाकाली भक्त यांनी संयुक्त सहभाग घेतला. Mahakali Temple Chandrapur events
यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, संतोष गर्गेलवार, स्वच्छता अधिकारी डॉ. अमोल शेडके, श्री महाकाली माता ट्रस्टचे श्याम धोपटे, अजय जयस्वाल, सुनील महाकाले, मिलिंद गंपावार, अजय वैरागडे, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय राऊत, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, भाजप नेते प्रकाश देवतडे, दशरथसिंह ठाकूर, मनोज पाल, प्रमोद शास्त्रकार, माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, प्रदीप किरमे, श्याम कणकम, दिवाकर पुडट्टवार, गणेश गेडाम, वंदना हातगावकर, सविता दंढारे, संजय बुरघाटे, करणसिंग बैस, सलीम शेख, कालीदास धामनगे, विनोद अनंतावर, प्रतीक शिवणकर, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा गंधेवार, आशा देशमुख, सुबोध चिकटे, शंकर दंतुलवार आदींची उपस्थित होते.
महाकाली मंदिर परिसरात चैत्र नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मंदिर परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक आणि शासकीय संस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. यात्रेच्या काळात महाकाली मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसर स्वच्छ आणि सुरळीत रहावा, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेत व्यापक स्वच्छता अभियान हाती घेतले. Chandrapur temple cleanliness drive
मंदिर परिसरातील रस्ते, सभामंडप, मंदिर प्रांगण आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात आली. कचरा संकलन, निर्जंतुकीकरण आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला. यात्रेच्या काळात भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अस्वच्छतेचा त्रास होऊ नये, यासाठी विशेष स्वच्छता पथक तैनात करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठक घेऊन यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी महाकाली मंदिर परिसरातील स्वच्छता, भाविकांसाठी असलेल्या सुविधा आणि गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली. महाकाली मंदिर हे चंद्रपूरचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असल्याने येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असे ते म्हणाले.
महाकाली यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आमदार किशोर जोरगेवार सातत्याने पाठपुरावा करत आहेत. यात्रेच्या कालावधीत उत्तम सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ठरविलेल्या उपाययोजनांची पूर्तता तपासण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांसह महाकाली मंदिर परिसराची पाहणी केली आणि आवश्यक सूचना दिल्या होत्या. आज त्यांनी स्वतः पुढाकार घेत मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यात्रेच्या दरम्यान गर्दी नियंत्रण, स्वच्छतेच्या कायमस्वरूपी उपाययोजना आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने आवश्यक तयारी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
“ऑनलाइन जुगाराने तरुणाई बरबाद – चंद्रपूरात कोट्यवधींचा खेळ कोण खेळतंय?”
Online cricket betting in India : देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी पण लोकप्रियता क्रिकेटच्या खेळाची आहे, या क्रिकेटने तरुणाईला जुगाराचे वेड लावले. जुगार काही साधा नाही, हा ऑनलाईन जुगार आहे. आयडी पासवर्ड घ्या आणि लावा पैसे. क्रिकेट जुगाराचे संपूर्ण नेटवर्कचे केंद्रबिंदू हे नागपूर आहे. संत्रा नगरीतून इतरत्र धंदा सुरु करायचा असल्यास त्यासाठी नागपूरला जावे लागते. २२ मार्चपासून देशात आयपीएल च्या पर्वाला सुरुवात होत आहे. क्रिकेटप्रेमी या हंगामाची वाट बघत असून क्रिकेट सट्टेबाज यांनी सुद्धा आपल्या परीने याबाबत तयारी केली आहे.
आजपासून संघटित गुन्हेगारीचा महासंग्राम सुरु होत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, कारण या T२० क्रिकेटवर हजारो कोटी रुपयांचा सट्टा लावला जातो, या सट्ट्याचं केंद्रबिंदू विदर्भातील नागपूर आहे. नागपुरातून या जुगाराची सूत्रे हलविण्यात येते.
चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस दलात काही फेरबदल झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने क्रिकेट सट्टेबाजांवर कारवाई केली मात्र अजूनही ठोस कारवाई करण्यात आली नाही. पहिल्या कारवाईत ३ आरोपी आणि दुसऱ्या कारवाईत १ पहिल्या गुन्ह्यातील आरोपी हे पोहचलेले सट्टेबाज आहे. मात्र पोलीस विभाग अजूनही ह्या जुगाराचा मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचू शकले नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील मोठे सट्टेबाज?
महेश-राजिक, रामनगर येथील नीरज, राकेश-अविनाश, प्रदीप हे या जुगारात मुख्य केंद्रबिंदू, यांच्या मार्फत हा व्यवसाय चंद्रपूर जिल्ह्यात फोफावला आहे.
अशी होते आयडी तयार..
कुणाला जुगार खेळायचा असल्यास वरील जुगाराना कॉल करीत आयडी तयार करावी लागते, आयडी २ हजार ते १ लाख रुप्यापर्यंत असते, आयडी बनल्यावर त्याचं पेमेंट ऑनलाईन किंवा कॅश पद्धतीने करण्यात येते. काही कमिशन कट झाल्यावर आयडी धारकांच्या खात्यात डिजिटल कॉइन जमा करण्यात येतात. १ बॉल, १ ओव्हर, रन, अर्धशतक, शतक व विकेट यावर हजारो लाखों रुपये बेट लावत क्रिकेट प्रेमी घरी बसून आस्वाद घेतात. आयडी धारक सट्टा हरत असेल तर त्याला आयडी रिचार्ज करण्यासाठी पुन्हा पैसे द्यावे लागतात. How to start cricket betting online
आयडी चा तपशील काय?
स्थानिक गुन्हे शाखेने व्यंकटेश हॉटेल मध्ये मारलेल्या धाडीत ३८ बँक खाते फ्रिज केले त्यामध्ये तब्बल ६० लक्ष रुपये असल्याची माहिती होती. त्यावेळी nice ७७७७ व इतर आयडी मिळून आल्या मात्र आता Nice४५ ह्या आयडी ची धूम सट्टा बाजारात जोमात सुरु आहे. रामनगर येथील नीरज बुकी याच संपूर्ण काम बंटी नावाचा पंटर सांभाळतो. तर अविनाश, राकेश, प्रदीप, महेश आणि राजीक हे स्वतः व इतरांच्या माध्यमातून हि ऑनलाईन संघटित गुन्हेगारी चालवितात. Cricket betting ID cost
जिल्हा स्तरावर क्रिकेट जुगार सुरु करायचा झाल्यास त्याची सर्व योग्यरितीने अलिखित परवानगीने तयारी करावी लागते. जिल्ह्यात काम सुरु करणे म्हणजे बॉक्स घेणे, त्या बॉक्स मधून पंटरांना जोडणे. ग्राहकाला आयडी पासवर्ड दिला कि कॉईन च्या माध्यमातून जुगार खेळणे. कॉइन संपले तर ऑनलाईन पेमेंट करीत पुन्हा कॉइन घेणे. Chandrapur betting racket
क्रिकेट जुगारामुळे चंद्रपुरात अनेकांचं आयुष्य बदलून गेले, म्हणजे हा व्यवसाय जो करतो तो करोडपती आणि जो पैसे लावून खेळतो तो रोडपती अशी साखळी अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात बेधडकपणे सुरु आहे. या जुगाराचे सोनेरी दिवस म्हणजे आयपीएल या मौसमात हजारो कोटींचा जुगार खेळला जातो.
पोलीस कारवाई होऊ नये यासाठी अर्थकारणाचा खेळ आधीच खेळल्या जातो, तसे चंद्रपुरात नावाजलेले नाव या व्यवसायात गुंतलेले आहे. ते कधी पोलिसांच्या हाती लागले नाही भविष्यात चांगला पोलीस अधिकारी आला कि त्यावेळी शक्यता आहे, मोठा मासा अडकण्याची. त्याला अजून खूप वेळ आहे.
महाकाली, भिवापूर, सिंधी कॉलोनी, बंगाली कॅम्प, विठ्ठल मंदिर वॉर्ड, रघुवंशी कॉम्प्लेक्स, जटपुरा गेट असे अनेक सुगीचे ठिकाण आहे जिथून हे नेटवर्क सुरु होते. सध्या हॉटेल्स मध्ये रूम घेऊन एसी च्या थंड हवेत हा जुगार खेळल्या जातो. एखादी बुकी पोलिसांच्या हाती लागला तरी त्याला सूचनापत्र देऊन जामिनावर सोडून दिल्या जाते. Illegal Betting Network
चंद्रपूर पोलिसांकडे सक्षम यंत्रणा असूनसुद्धा जुगारी त्यांच्या हाती लागत नाही हि कमालच म्हणावी लागेल. असो हा व्यवसाय सुरु केल्यावर आपल्याला काही समजलं नाहीतर थेट दुबई गाठत (Dubai Betting Training) नवीन एप बाबत आपल्याला प्रशिक्षण घ्यावे लागते. व्यावसायिकाचे दुबई मार्गक्रमण करीत जुगाराचा रोजगार अंगिकारावा लागतो.
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी कारवाई तर केली पण त्यामधील मूळ कोण आहे याबाबत त्यांनी शोध लावल्यास मोठे मासे त्यांच्या गळाला लागतील हे नक्कीच. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे सध्या पंटर लोकांनी अंदर बाहर, खिलाना बंद केले आहे. पोलिसांनी क्रिकेट सट्टा बहाद्दर यांच्या मुसक्या आवळण आता गरजेचे बनलं आहे.
Free mock test for students : शिवसेना, युवासेना चंद्रपूर जिल्हा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आयोजित चंद्रपूर जिल्हा व शहरातल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत महासराव सिईटीचे आयोजन चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरीता त्यांच्या उज्वल भविष्यासाठी चंद्रपूर युवासेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने येत्या 29 तारखेला सकाळी 10 वाजता अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सीईटीचा ,मॉक टेस्ट आयोजन करण्यात आलेले आहे. MHT-CET mock test practice
यासंदर्भात २१ मार्चरोजी शासकीय विश्रामगृहात युवासेनेने पत्रकार परिषद घेत मॉक टेस्ट बाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे, पूर्व विभागीय सचिव युवासेना व सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ निलेश बेलखेडे, युवासेना सहसचिव व युवतीसेना जिल्हाप्रमुख रोहिणीताई पाटील, जिल्हा युवासेना विस्तारक संदीप रियाल, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे उपस्थित होते.
दरवर्षी युवासेना तर्फे शैक्षणिक हिताचे कार्य केल्या जाते या अनुषंगाने राज्यात निशुल्क मॉक टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती हर्षल काकडे यांनी दिली, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांनी माहिती दिली कि विद्यार्थ्याचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचा लाभ घेत आपले उज्वल भवितव्य घडवावे हे उद्दिष्ट ठेवून महाराष्ट्रात वैद्यकीय, अभियांत्रिकी,फार्मा तसेच विधी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NEET तसेच MHT-CET ची माॅक टेस्ट (सराव परीक्षा) चे मोफत आयोजन करण्यात येत आहे. तरी या सराव परीक्षेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा याकरिता १२ वी (विज्ञान) शाखेतील आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांना या सराव परीक्षेचा लाभ घ्यावा. Career preparation for 12th students
चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली कि, चंद्रपूर जिल्ह्यात अनेक होतकरू विद्यार्थी आहे, आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात भविष्य उज्वल करायचे असते मात्र त्यांना त्याबाबत ठराविक माहिती उपलब्ध नसते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आम्ही त्या होतकरू विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षेची पूर्वतयारी बाबत संपूर्ण माहिती देतो म्हणजे भविष्यात स्पर्धात्मक परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत नाही, चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी या निशुल्क मॉक टेस्ट चा लाभ घ्यावा यासाठी चंद्रपूर युवासेना प्रयत्नशील आहे. आयोजित पत्रकार परिषदेत विनय धोबे जिल्हा समन्वयक,सुमित अग्रवाल जिल्हा चिटणीस,चेतन बोबडे कॉलेज कक्ष लोकसभा संघटक, युती सेना उपजिल्हाधिकारी धनश्री हेडाऊ आदींची उपस्थिती होती. Medical entrance exam preparation free
“आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी मोफत मॉक टेस्ट – सामील व्हा!”