Author: Admin

  • Traffic congestion due to road work । चंद्रपूर शहरात रस्ते आहेत की खड्ड्यांचा सापळा? प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव!

    Traffic congestion due to road work

    Traffic congestion due to road work : चंद्रपूर शहरात मागील २ महिन्यापासून अमृत २.० व मलनिःस्सारण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली मात्र कसलेही नियोजन न करता रस्त्याचे खोदकाम सुरु केले, मात्र या खोदकामामुळे शहरात सर्वत्र धुळीचे वातावरण निर्माण झाले. वाहतूक व्यवस्था अक्षरक्षा खोळंबली. Chandrapur Traffic

    बिहारची बंदूक, चंद्रपूरचे तीन गुन्हेगार

    आधीच प्रदूषणाची झळ सोसणाऱ्या चंद्रपूरकरांना रस्त्यावरील धुळीचे प्रदूषण सोसावे लागत आहे. शहरातील मुख्य मार्ग कस्तुरबा व महात्मा गांधी मार्ग खोदण्यात आला आहे, नागरिकांना शहरातून जात असताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

    सदर काम सुरु होण्यापूर्वी वाहतुकीचे व प्रदूषणाचे काय होणार याच कसलेही नियोजन मनपाने केलं नसल्याचं चित्र शहरातील वातावरण बघून निदर्शनास येते. जिल्हा परिषद मार्ग ते गिरनार चौक या मार्गावरून जाताना नागरिकांचे चेहरे लाल होत आहे. गिरनार चौकातून महात्मा गांधी मार्गावर गेल्यास थेट प्रियदर्शिनी चौकापर्यंत ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहे. Dust pollution from road construction

    या कारणामुळे चंद्रपुरातील संडे मार्केट बंद

    सदर कामापूर्वी चंद्रपूर वाहतूक विभागाने वाहतुकीचा खोळंबा होणार नाही याच नियोजन का केलं नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. चंद्रपूर शहरातील मार्ग हे अरुंद आहे, विशेष म्हणजे विविध ठिकाणी अतिक्रमण सुद्धा आहे, कामापूर्वी मनपाने अतिक्रमण काढले असते तर नागरिकांना या मार्गावरून जाताना त्रास झाला नसता.

    शहरातील जटपुरा गेट ते जिल्हा परिषद मुख्यालयाच्या रस्त्यावर वारंवार ट्रॅफिक जॅम होत असून वाहतूकदारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज या जॅम मध्ये ४ ते ५ रुग्णवाहिका अडकत आहे, नागरिक वाहतुकीच्या नियमन न जुमानता आपली वाट काढतात मात्र याना नियम सांगणार वाहतूक विभाग यावर काही उपाययोजना करताना कुठेही दिसत नाही आहे.

  • Ballarpur police action । बिहारची बंदूक, चंद्रपूरचे गुन्हेगार

    Ballarpur police action

    Ballarpur police action : चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अनियंत्रित झाली आहे, हत्या, एमडी ड्रग्स असे अनेक गुन्हे दररोज जिल्ह्यात बघायला मिळत आहे. 25 मार्च रोजी बल्लारपूर पोलिसांनी 3 युवकांना बंदुकीसह अटक केली.

    चंद्रपुरातील संडे मार्केट बंद

    पेट्रोलिंग करीत असताना बल्लारपूर पोलिसांना साईबाबा वार्ड येथे तीन आरोपिकडून बंदुकीसह जिवंत काडतुस जप्त करण्यात आले, तिघे आरोपी हे चंद्रपुरातील असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. Chandrapur gun seizure

    illegal arms chandrapur

    आरोपी 24 वर्षीय अभि वाल्मिक, 24 वर्षीय विनोद नानाजी तावाडे व 24 वर्षीय संकेत रवींद्र येसेकर अटकेतील आरोपीचे नाव आहे.
    बंदूक व जिवंत काडतुस सोबत घेऊन ते आलापल्ली जिल्हा गडचिरोली च्या दिशेने निघाले होते मात्र वाटेतच त्यांना पोलिसांनी अटक केली. सदर बंदूक बिहार वरून आणल्याची माहिती आहे. Illegal arms Chandrapur


    बल्लारपूर पोलिसांनी लोखंडी गावठी बनावटीचा देशी कट्टा, 1 जिवंत बुलेट असा एकूण 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीवर भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाने यांच्या नेतृत्वात सपोनि मदन दिवटे, पोउपनी सौरभ साळुंखे, सुनील धांडे, पोलीस कर्मचारी आनंद परचाके, सुनील कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सत्यवार कोटनाके, वशिष्ट रंगारी, लखन चव्हाण, शरदचंद्र कारुष, शेखर माथनकर, भास्कर चीचवलकर, कैलास चीचवलकर, अनिता नायडू यांनी केली.

  • Utkrushtha Mahila Manch Events । “उत्कृष्ट महिला मंचचा भव्य सोहळा: नृत्य, फॅशन आणि सक्षमीकरणाचा संगम”

    Utkrushtha Mahila Manch Events

    Utkrushtha Mahila Manch Events : चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उत्कृष्ट महिला मंच तर्फे इंदिरा गांधी नाट्य सभागृहात भव्य दिव्य समूह नृत्य स्पर्धा आणि कपल फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. प्रेरणा कोलते यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला तसेच उत्कृष्ट महिला मंचच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. Group Dance Competition

    आश्रमशाळेतील शिक्षकांच्या समस्या सुटणार

    कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रभावती एकुरके (पोलीस निरीक्षक, सिटी पोलीस स्टेशन) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या सुरक्षेविषयी महत्वपूर्ण माहिती दिली तसेच उत्कृष्ट महिला मंचच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. International Women’s Day Events

    international woman's day events

    कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये

    उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्षा माजी नगरसेविका छबुताई वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य उपक्रम पार पडला. स्पर्धेमध्ये महिलांच्या आधुनिक पेहरावासह विविध नृत्य प्रकार सादर करण्यात आले. विशेषतः 70 वर्षांपर्यंतच्या महिलांचा सहभाग आणि जेष्ठ नागरिकांचा कपल फॅशन शोमध्ये सहभाग हा या स्पर्धेचा मुख्य आकर्षण ठरला. Women Empowerment Events 2025

    group dance competition


    स्पर्धेचे विजेते

    समूह नृत्य स्पर्धा:

    🥇 वुमनिया डान्स ग्रुप – ₹11,000 रोख व मानचिन्ह
    🥈 गृही गर्ल्स डान्स ग्रुप – ₹7,000 रोख व मानचिन्ह
    🥉 डॅझ क्रीव डान्स ग्रुप – ₹5,000 रोख व मानचिन्ह
    🔹 12 संघांना ₹2,000 रोख व प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

    कपल फॅशन शो स्पर्धा:

    🥇 रोहित-सुरभी गाडगे – ₹10,000 रोख व मानचिन्ह
    🥈 अर्जुन-मल्लिका कावळे – ₹7,000 रोख व मानचिन्ह
    🥉 प्रशांत-माधवी घोडमारे – ₹5,000 रोख व मानचिन्ह
    🔹 10 जोडप्यांना ₹2,000 रोख व प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

    स्पर्धेचे परीक्षक

    ▪️ समूह नृत्य स्पर्धा – रत्नाकर शेळके, आशुतोष पाटील, किरण बल्की, सारिका भुते
    ▪️ कपल फॅशन शो – केतन अरमरकर, स्मिता जावडे, सारिका भुते, प्रणिता जुमडे

    प्रमुख उपस्थित मान्यवर

    कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सौ. कल्याणी किशोर जोरगेवार, डॉ. सुशील मुंदडा, प्राध्यापक संजय बेले, राजेंद्र भाऊ रघाताटे, अमित राव (पारस डेव्हलपर्स), मंजुश्री कासमगोटूवार उपस्थित होते.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान

    कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन वैशाली कन्नमवार व धनश्री मुसने यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साक्षी कार्लेकर, स्नेहल बांगडे, मनीषा कन्नमवार, अर्चना चहारे, माया खानके, जयश्री साखरकर, मनीषा भाके, मंगला रुद्रपवार, योगिता धनेवार, अभिलाषा मैदळकर, छाया चवरे, कल्पना बडी, वैशाली कांमडे, सुषमा बेले, चंदा घोडमारे, शालिनी राऊत, रजनी हरणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

    कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष छबुताई वैरागडे यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार मानले तसेच भविष्यात महिलांसाठी आणखी नव्या उपक्रमांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.

  • Gondwana University fee hike । “शिक्षण महागले! गोंडवाना विद्यापीठाच्या निर्णयाने विद्यार्थी हादरले”

    Gondwana University fee hike

    Gondwana University fee hike : गोंडवाना विद्यापीठातर्फे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सत्र २०२४-२५  या सत्राच्या मध्यतरी शैक्षणिक शुल्कात अचानक भरमसाठ वाढ केली असून गोंडवाना विद्यापीठाच्या संलग्नीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेवून विद्यापीठाने केलेल्या दरवाढीबाबत माहिती दिली.

    चंद्रपुरातील संडे मार्केट बंद

                श्री रघुवीर अहीर यांनी सदर शैक्षणिक दरवाढीची गंभीर दखल घेत दि. २५ मार्च रोजी भाजयुमो चे शिष्टमंडळ व विद्यार्थ्यांसह रघुवीर अहीर यांनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांची भेट घेत शुल्कवाढ रद्द करण्याचे निवेदन दिले व शैक्षणिक सत्राच्या मध्यतरी केलेले शुल्कवाढ हे विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही शुल्कवाढ तात्काळ रद्द करावी व विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.

                यावेळी कुलगुरु डॉ. बोकारे यांनी याबाबत येत्या दोन दिवसात योग्य निर्णय घेवू असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.

  • Sunday Market chandrapur । चंद्रपुरातील संडे मार्केट बंद

    Sunday Market chandrapur

    Sunday Market chandrapur : येत्या 6 एप्रिल रोजी श्रीरामनवमी आहे तसेच रविवार असल्याने होणारी संभाव्य गर्दी पाहता दर रविवारला भरणारे संडे मार्केट हे बंद ठेवण्यात येणार आहे.

    आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार ला धमकी


     चंद्रपूर मनपा हद्दीतील न्यु इंग्लीश शाळेसमोर तसेच जयंत टॉकीज जवळ मुख्य रस्ता ते झाडे हॉस्पीटल चौक या रस्त्यावर दर रविवारला संडे मार्केट या नावाने बाजार भरतो. यात विविध तात्पुरत्या स्वरूपाची दुकाने, हातठेले,फेरीवाल्यांची दुकाने लावण्यात येतात. या दुकानांमुळे रविवारी या परिसरात गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. chandrapur news

     
       6 एप्रिल रविवार रोजी श्रीरामनवमी सणानिमित्त भाविकांद्वारे भव्य शोभायात्रा काढण्यात येते असल्याने सदर भागातील पुर्व-पश्चिम बाजुला नागरीकांची वर्दळ वाढून काही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर ठिकाणी रविवारला भरणारे संडे मार्केट बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाद्वारे देण्यात आले आहे.

  • Maharashtra tribal education problems | विदर्भातील आश्रमशाळा शिक्षकांसाठी चांगली बातमी! आमदार अडबाले यांनी मंत्र्यांसमोर मांडल्या मागण्या

    Maharashtra tribal education problems

    Maharashtra tribal education problems : चंद्रपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासोबत लोहगड बंगला, मुंबई येथे २५ मार्च २०२५ रोजी राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय / अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ सहविचार सभा पार पडली.

    यावेळी शासकीय / अनुदानित आश्रम शाळेतील मुलांच्या भोजनाची वेळ बदलून ती सकाळी १० वाजता करण्यात यावी, याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मंत्री महोदय यांनी दिले. Tribal development school teachers’ demands

    अनुदानित आश्रमशाळेतील विशेष खास बाब म्हणून मान्यता देण्यात आलेल्या १४३३ कर्मचाऱ्यांचे थकबाकी वेतन अदा करण्यात यावी, याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सचिव महोदयांना दिले. Pending salaries of tribal school staff

    1982/84 ची जुनी पेन्शन योजना जशीची तशी लागू करण्यात यावी. यासंदर्भात मा अपर आयुक्त, नागपूर यांचे दि.10/10/2024 चे आदेश पूर्ववत कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी केली. याबाबत वित्त विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती मा. सचिव महोदय यांनी दिली.

    चंद्रपुरात भव्य रोजगार मेळावा

    तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी यांचे वेतन एक तारखेला करण्यात यावे, आदिवासी नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना जो वेतन आयोग लागू असेल त्यानुसार बेसिकच्या 15% मर्यादित किमान 200 व कमाल 1500 यानुसार प्रोत्साहन भत्ता लागू करणे, शाळा व वसतिगृह विभाग वेगळा करण्यात यावा, नवीन आकृतीबंध रद्द करून विलोपित झालेली पदे पुनर्जीवित करण्यात यावीत. Adiwasi vikas department teacher demands

    विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजुरी देण्यात यावी, शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करणे, अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना NPS मध्ये समाविष्ट करून PRAN CARD देण्यात यावे, रोजंदारी (वर्ग ३ व वर्ग ४) व कंत्राटी (कला, क्रीडा, संगणक) तत्वावरील कर्मचाऱ्यांना कायम करावे तसेच रिक्त पदावर तातडीने भरती करावी, शासकीय व अनुदानित आश्रम शाळेत नर्स पदाची भरती प्राधान्याने करण्यात यावी, शिक्षकांना १०-२०-३० ही तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी, शिक्षण कक्षातील पदोन्नती कोट्यातील पदे तातडीने भरण्यात यावी व शिक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावा, मुख्याध्यापकांना राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांकरिता पदोन्नतीचे सेवा प्रवेश नियम तयार करून त्यांना पदोन्नतीची संधी देण्यात यावी. Tribal development school teachers’ demands

    ग्रंथपालांना सुधारित वेतनश्रेणी व पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, अनुदानित आश्रमशाळेकरीता असलेला  “काम नाही वेतन नाही” हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, चारही विभागातील बदल्या ह्या दिनांक ९ एप्रिल २०१८ च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार समुपदेशनानेच व पारदर्शक पद्धतीने केल्या जाव्यात, प्रतिनियुक्तीच्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी तसेच शिक्षक संवर्गास कोणत्याही परिस्थितीत प्रतिनियुक्ती देण्यात येऊ नये, शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील माध्यमिक शिक्षकांना एक स्तर अंतर्गत ४८०० ग्रेडवेतन व प्राथमिक शिक्षकांना ४३०० ग्रेडवेतन लागू करण्यात यावे.

    दहावी व बारावीचा निकाल ५०% किंवा ८०% च्या आत असल्यास शिक्षक व मुख्याध्यापक यांची वेतनवाढ थांबवण्यात येऊ नये, सर्व आश्रम शाळांमध्ये लिपिक संवर्गाचे पद मंजूर करून त्यांची भरती करण्यात यावी. मंजूर असलेल्या पदावर नियमित भरती होईपर्यंत मानधन तत्वावर लिपिक संवर्गीय पद भरण्यास मंजुरी देण्यात यावी व इतर समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. आश्रमशाळेतील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकजी उईके, मा. सचिव, आयुक्त यांनी यावेळी दिले. सदर सभा दीड तास चालली.  
     
    बैठकीला आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सचिव विजय वाघमारे, आयुक्त लिना बनसोडे, अपर आयुक्त अमरावती जितेंद्र चौधरी, उपसचिव श्री. जाधव, कक्ष अधिकारी श्री. बंडगर, अपर आयुक्त नागपूर उपायुक्त श्री. दिगंबर चव्हाण, अन्य अधिकारी, सिटू संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. डी एल कराड, राज्य सरचिटणीस प्रा. बी टी भामरे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर, शशांक मोहोड, सिटू संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष आर. टी. खवशी, संस्कृती संघटनेचे भोजराज फुंडे, अमोल वाबळे, शरद बिरादार, माधुरी पवार व समस्याग्रस्त शिक्षक उपस्थित होते.

  • Mayur Raikwar Threat Case | या मॅटर मध्ये पडू नको, आप जिल्हाध्यक्षाला धमकी

    Mayur Raikwar Threat Case

    Mayur Raikwar Threat Case : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या बांधकामासाठी 95 लाख रुपये खर्च करण्यात येत असून, केवळ एका बाजूलाच भिंत उभारली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला हजारो लोकांची वस्ती असूनही कोणतीही भिंत उभारली जात नाही. यावरून, हा निधी सार्वजनिक हितासाठी वापरला जात आहे की स्थानिक आमदारांच्या नातेवाईकांच्या फायद्यासाठी, असा प्रश्न आम आदमी पार्टीने उपस्थित केला आहे. Chandrapur Nala Protection Wall

    चंद्रपूर शहरात झळकले मालमत्ता कर थकबाकीदारांचे नावाचे बॅनर

    चौकशी करा
    आम आदमी पार्टीने या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले असून, 8 दिवसांच्या आत चौकशीचे आदेश देण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणात सत्य समोर आणू नये म्हणून आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांना धमकी देण्यात आली आहे, याचाही निषेध करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. Aam Aadmi Party Chandrapur

    गैरव्यवहाराचे ठळक मुद्दे:

    • नाल्याच्या दोन्ही बाजूंना भिंत बांधणे आवश्यक असताना, केवळ एका बाजूला बांधकाम सुरू आहे.
    • दुसऱ्या बाजूला हजारो नागरिकांची वस्ती असूनही भिंत बांधली जात नसल्याने पूरस्थितीचा धोका आहे.
    • 95 लाख रुपये खर्च करून बांधली जाणारी भिंत, यापूर्वी शहरात कधीही बांधली गेली नाही.
    • या प्रकल्पाला कोणाच्या मागणीनुसार मंजुरी देण्यात आली, याचा तपशील सार्वजनिक करावा.
    • पाटबंधारे विभागाला इतकी मजबूत आणि महागडी भिंत उभारण्याची गरज का भासली, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे.

    आम आदमी पार्टीच्या मागण्या:

    • या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
    • जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाने धमकी देणाऱ्यांची चौकशी करावी.
    • आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी.
    • आम आदमी पार्टीने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

    जिल्हाधिकारी गौडा यांना निवेदन देताना आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, संघटन मंत्री संतोष बोपचे, मनीष राऊत, जिल्हा सचिव राजकुमार नगराळे, शेतकरी जिल्हाध्यक्ष दीपक बेरशेट्टीवार, महानगर महिला अध्यक्ष तबस्सूम शेख, कुणाल शेटे व विशाल बिरमवार उपस्थित होते.

  • Chandrapur Collector Vinay Gowda । “तहसीलदार ते जिल्हाधिकारी: कार्यक्षमतेसाठी नवे नियम, समितीची सुरुवात!”

    Chandrapur Collector Vinay Gowda

    Chandrapur Collector Vinay Gowda : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या कार्याविषयक नियमपुस्तिका तयार करण्याकरिता विभागीय आयुक्त कोकण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा समावेश करण्यात आला आहे. Maharashtra Land Revenue Code 1966

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची लागणार एसआयटी चौकशी

    यापूर्वी 18 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार गठीत समितीमध्ये यवतमाळ जिल्हाधिकारी ऐवजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी असा बदल करण्यात आला असून चंद्रपूर आणि नांदेड जिल्हाधिका-यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे सुधारीत शुध्दीपत्रक आज 25 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आले. Land Revenue Policy Maharashtra

    महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांची कार्यविषयक नियमपुस्तिका तयार करण्याबाबत गठीत समितीचे अध्यक्ष हे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त असून सदस्य सचिव म्हणून कोकण विभागाचे उप आयुक्त (महसूल) हे आहेत. इतर सदस्यांमध्ये जिल्हाधिकारी चंद्रपूर, अहिल्यानगर, जालना, जळगाव, नांदेड यांचा समावेश आहे.

    गठीत करण्यात आलेल्या समितीने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 व त्या अनुषंगिक महसूल विषयक योजना / धोरणे इत्यादींचा अभ्यास करून शासनास तीन महिन्यात शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • PM Internship Scheme 2025 । टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप! 31 मार्चपर्यंत नोंदणी करा, भविष्य घडवा!

    PM Internship Scheme 2025

    PM Internship Scheme 2025 : पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास पॅकेज अंतर्गत पंतप्रधान इंटर्नशिप योजना केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. या योजनेची उमेदवारांनी नोंदणी करण्याचा कालावधी 31 मार्च 2025 पर्यंत आहे. नोंदणीसाठी pminternship.mca.gov.in.  या वेबपोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी करावी. या योजनेअंतर्गत देशातील टॉप 500 कंपन्यामध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अंतर्गत पाच वर्षात एक कोटी तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक इंटर्नसाठी वार्षिक 66 हजार रुपये देण्यात येणार आहे. दरमहा 5हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार असून कंपनी त्यांच्या सीएसआर निधीतून 500 रुपये व केंद्र सरकार 4500 रुपये देणार आहे. नियुक्तीच्या वेळी उमेदवारांना एकरकमी 6 हजार रुपये अनुदान दिले जाईल. Prime Minister Internship India

    चंद्रपुरात भव्य रोजगार मेळावा, ९०० च्या वर नोकऱ्या उपलब्ध

    भारत सरकार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत या शिक्षणार्थीसाठी विमा कवच देखील दिले जाणार आहे. ज्या उमेदवारांचे वय 21  ते 24 वर्ष असून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी, पुर्णवेळ शिक्षण किंवा रोजगार नसलेले बेरोजगार तरुणांसाठी ही संधी आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.

  • Pandit Deendayal Upadhyaya Employment Fair | चंद्रपुरात 900+ नोकऱ्या! 28 मार्चला रोजगार मेळावा, संधी सोडू नका

    Pandit Deendayal Upadhyaya Employment Fair

    Pandit Deendayal Upadhyaya Employment Fair : जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करीअर सेंटर आणि जनशिक्षण संस्था यांच्या संयुक्त  विद्यामाने  28 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जनशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.

    चंद्रपूरातून क्रिकेट बुकींचे पलायन, सट्टा मात्र सुरूच

    जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, आय.टी.आय, पदविका, पदवी इत्यादि बेरोजगार उमेदवारांना विविध  क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध  देणे तसेच राज्यातील नामांकित उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. सदर मेळाव्यातून 900 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे. Job Opportunities in Chandrapur 2025

    यात एस.बी.बाय. लाईफ इन्शुरन्सचे फिल्ड वर्कर, विदर्भ क्लिक वन सोल्युशन यांचे फिटर, वेल्डर इलेक्ट्रिशियन, डेक्सॉन इंजिनिअरींग प्रा. लि. नागपूर यांच्या मोटार मॅकेनिकल, इलेक्ट्रिशिअन, डिझेल  मॅकेनिकल, वैभव  इंटरप्रायझेस, नागपूर यांचे आय.टी.आय विद्यार्थ्याकरीता मॅकनिकल, नवभारत फर्टिलायझर छ. संभाजीनगर यांचे ॲग्रीकल्चर ऑफीसर, सेल्स रिप्रेसेन्टेटिव्ह, संसुर सृष्टी प्रा. लि. चंद्रपूर यांचे सेल्स मॅन, मल्टीव्हेव पॉलिफायबर, चंद्रपूर यांचे  लूम ऑपरेटर, हेल्पर, अंकाऊंट मॅनेजर, वाईडर मॅन, क्वालिटी सुपररवायझर, क्लिनर, सदर कंपन्याचे विविध पदे असल्याचे उद्योजकाकडून कळविण्यात आलेआहे.

    मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे झेरॉक्स प्रतीसह (कमीत कमी तीन) प्रती उपस्थित राहावे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी व ऑनलाईन अप्लाय सुध्दा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. Mahaswayam Registration Guide

    या मेळाव्याकरीता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

    अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर 07172-252295 या दूरध्वनीवर संपर्क करावा. जिल्हातील जास्तीत जास्त  उमेदवारांनी सहभागी होण्याचे व मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.